1️⃣
#12.48 am
♦️ सौ. मीरा शेबे, भंडारा.
🐂🐄 चित्रकाव्य 🌄🌌
माळरांनी चरावया गेली खिल्लारे
अस्तास निघाला दिनकर,परताया लागली सारे.
तिन्ही सांजा होतांना हंबरती धेनु वासरे
लगबग धावती चरण परताया घराकडे.
पिवळे-तांबूस ऊन कोवळे,
निलांबराचे ते रुप सावळे
गगणांतरी विचरण करीती
बलाकमाला विहंग मेळे.
पंख विहीन, फडफड करीती
अधिर सारे
दूर घरट्यात सोडूनी गेली
चरावयास पाखरे.
एकवटूनी बळ सारे घेती उंच भरारी
परताया लागली सांजवेळी माघारी.
दुडूदुडू धावती बाळे, झपझप पाऊले पडे
दिशा दिशांना गुलाल उधळीत गो-रज उडे.
सांज होता होता,रवी कलतो क्षितीजाकडे
काळोखाच्या गर्भात विसावे
चाहूल परत उदया कडे
गोरज मुहूर्ताला वाजे सन ई चौघडा
नव दांपत्याच्या जीवनात मांगल्याचा दरवडा..
-----------------------------------------------------------------
2️⃣
#6.20 am
♦️ सौ.के.बी.सार्वे भंडारा.
।।चित्रकाव्य।।🐄
झाली सांजवेळ ओढ लागली घराची।
पाऊले पडती झपझप त्या वाटेची।
जसजसा सूर्य अस्तास जाई।
तसतसे बेभान मन मायेचे होई।
दिसेनासे होई खाचखळगे वाटेची।
ओढ लागली भेटावया वासराची।
नजर एकटक ती त्या गोमातेची।
मनी एकच धुंदि भेटावया बाळाची।
सांभाळून न होई प्रेमाचा तो पान्हा।
गोठ्यात वाट पाही बाळ तो तान्हा।
हंबरून वासराला चाटे जेव्हा गाय।
ऊंबरठा तेव्हा माझा धन्य धन्य होय।
गायीत जेव्हा मला दिसते माझी माय।
प्रणाम त्या गोमातेला धन्य धन्य होय।
क्षितीजावरतीही ती आभा झळकून जाय। 🐄👏।
----------------------------------------------------------------
3️⃣
12.44 pm
सुभाष धांदे सर , यवतमाळ
🙏🏻ओढ .....💐💐
तांबूस ल्याली , पहाट झाली .
पूर्व दिशा उजळली.
गोठ्यामधील गाय -वासरु,
हंबरून जागी झाली ...
फुटता पान्हा तव मातेला,
वासरे त्रूप्त झाली.
माया -ममता पाझर डोळीं,
भल्या पहाटे न्याहाळीं ..
रानी -वनीं चरण्यासाठी,
गाय मुक्त ही झाली ..
मागे ठेऊन वासराला,
निरोप घेऊन निघाली ....
उन्हं तापता झाडाखाली,
गोहणाची गर्दी झाली.
रवन्थ करता -करता,
दुपार टळून गेली ..
पुन्हा चरुन सायंकाळी ,
ओढ घराची लागे,
चरैवेती , चरैवेती,
असे आयुष्याचे धागे ..🐄🐄
-------------------------------------------------------------------
4️⃣
1.01pm
-मंगला डहाके, भंडारा
चित्रकाव्य--
गाय
हिंदुधर्मात गायीला
महत्व अनन्य साधारण
गायीमुळे पृथ्वीवरील
सुधारते वातावरण ।।
गोमय गोमूत्र गायीचे
दूध, दही अन लोणी
यांच्या मिश्रणाने होते
पंचगव्य बहुगुणी ।।
गाय ही संपन्नतेची
सुबत्तेची आहे खाण
तिच्यामुळे देश झाला
आपला कृषिप्रधान ।।
गायच आहे देशात
एकमेव प्राणी
ऑक्सिजन घेतो
सोडतो आणि ।।
गाय ही मांगल्याचे,
पावित्र्याचे प्रतीक
अंगणी घाला
रांगोळी गोपदम स्वस्तिक ।।
गायीच्या दुधात
अन्य उपयुक्त घटक
खनिजे, प्रथिने
कर्बोदके,जीवनसत्वे घटक ।।
गायीचे महत्व सारे जाणूया
नको तिची प्रतारणा
तीच भारतीयांचे दैवत
नित्य करूया आराधना ।।
---------------------------------------------------------------
5️⃣
5.44pm
नंदा भोयर, अमरावती
-------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment