सौ.के.बी.सार्वे भंडारा
।।पणती।।
या ऊठा पणत्यांनो काळोख दूर सारा।
आवरा पसारा या अंधाराचा।
पोर्णिमेच्या प्रकाशातही पणतीची शान भारी।
तिच्या विणा सुनी पडती देवालय ही सारी।
चंद्र,सूर्यास ठावे तिचे ते तर्हाणे
काळोखातही ठाम राहुनी तिचे ते नहाणे।
अमावश्येला ही धाक पणतीचा भारी।
कोणत्या रूपाने भेटेल मजला तिची स्वारी।
पणतीचे ते मर्म जाणिले कुणी ।
स्वतः जळूनी प्रकाश देई सांजी तिन्ही।
पणतीस सावराया रूपडे अनेक आली।
पण शान पणतीची कुणा ही न आली।।
---------------------------/------------/-/---------------------------/
सौ.आर.बी.झंझाड
पणती
ईवली ईवलीशी ही पणती
रंगबिरंगी आकर्षक पणती
तेल तुपाची घेई साथ
सोबत कापसाची वात
सायंकाळी लावली पणती
मुले शुभम करोति म्हणती
शुभ अशुभ कार्यातही
पणती सदा तेवत राही
दिवाळीचा झगमगाट
तरीही पाहे पणतीची वाट
स्वतः मात्र जळत असते
सर्वाना प्रकाशमय करते
तमसो मा ज्योतिर्गमय
अशी सांगत असते पणती
पणतीचा हा वसा घेऊ
इतरांसाठी तेवत राहू
पर्यावरण पूरक पणती लावु
धरती माता स्वच्छ ठेवु
---------------------------------------------------------------------
सौ. नंदा भोयर, अमरावती
-सुभाष धांदे सर, यवतमाळ
सौ. मंगला झेड डहाके, भंडारा
------------/------------/-------------/-----------/-------/------
प्रा.डाँ जयश्री रेहपाडे.
स्वामी विवेकानंद समाजकार्य म.विद्यालय नागपुर.
पणती
पणतीच्या पोटी
असह्य वेदना
भोगल्या त्या वेणा
जिवंतपणी.....
कित्येक झेललं
दुःखाचे सल
सोसाट्याच्या वाऱ्यात
तेवत राहुनी.......
आता रितेपणी
आटले बळ
थरथरते वात
अजुनही.......
विझल्या वाती
पणती च्या पोटी
प्रकाशमान अवनी
करण्यासाठी.....
---------------------------------------------------------------- सौ.मीरा नरेंद्र शेबे, भंडारा.
🪔🪔पणती
पणती गं पणती
तुझी प्रकाश्याशी नाती
टिम टिम करीत वाट दावी
काळोखाच्या राती.
. तुझा संदेश सकल जना
भयमुक्त बना
प्रकाशाचा एक किरण
घालवी नैराश्य जीवना.
पणती गं पणती
तू आहे जगी महान
तम सारुनी सारे
देई प्रकाशाचं महादान.
तेल अन् वात
. . पेटविती ज्योत
एक एकट्याने ते
नाही प्रकाशत.
पाच बोटांची जशी मूठ
तसे सारे व्हा एकजूट
अधर्म, अनिती चा
करू नायनाट.
पणती एक माता
तिला निज लेकरांची चिंता
देह जळो अन् जग उजळो
हीच तिची ममता.
झगमगाट करण्या
विजेची रोशनाई
पणती आशेचे किरण
तिची सर नाही.
देव्हाऱ्यातील इवलीशी पणती
पावित्र्य, मांगल्याचे व्रती
अखंड तेवत राहूनही
सत्य प्रकाश जगती.
पणती पणती पेटवूनी
बणतो दिपस्तंभ
माणूसकी अन् सहकार्याचा
दिप उजळू अखंड.२
-----------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment