[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (४८)
द्यावया निरोप बाप्पाला
मन हरकते मिरवणूकीला
या वर्षाला असंही करू
घरीच आटोपू विसर्जनाला.
दनाअ, नागपूर
दि.०१सप्टेंबर२०२०
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पहाटवारा🌺
पार्वती माता
निरोप घेतांना
सांगा तव सुता
न्यावा कोरोना.
सौ. वीणा द. अतकरी.
नागपूर
दि.०१/०९/२०२०
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.६०*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*मूर्ती स्वरूपातल्या बाप्पांचे*
*आज होणार विसर्जन*
*गणपती बाप्पा तुम्ही तर सदैव*
*आमच्या हृदयात स्थानापन्न*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.५५
बाप्पा आज जाणार
व्याकुळ झालं मन
दहा दिवसांचा पाहुणा
घरदार सुन सुन.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
अष्टविनायक विशेष. (१०६)
""रांजनगावचा श्री महागणपती""
रांजनगावाला महागणपती
अष्टविनायकात शक्तीमान
महागणपती म्हणती तया
मुर्ती स्थापीली श्रीशंकरानं.
श्रीक्षेत्र रांजणगाव तिर्थ
पौराणिक काळी मणीपूर
केले स्थापन शिवशंकरानं
उजवी सोंडेची कमळासन.
मुर्ती रूप आहे विक्राळ
दहा सोंड न् विस हात
वसली तीथं तळघरात
पुज्य मुर्ती गाभाऱ्यात.
मंदीरा,पेशवे जिर्णोध्दारीले
किबे सरदार ते इंदौरचे
बांधले लाकडी सभामंडप
दिशासाधन पूर्वाभिमुखाचे.
सुर्यकिरण प्रभाती मुर्तीवर
दक्षिणायना,उत्तरायनात
पडतात मुर्तीचे कपाळावर
ऋध्दि,सिध्दी उभ्या आहेत.
दनाअ, नागपूर
दि.०१/०८/२०२०
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक विशेष काव्यलेखन
रांजणगावचा श्री महागणपती
शंकराने रांजनगाव येथे पुजा केली गणपतीची
त्रिपुरासुर राक्षसाचा वध करण्याआधी
शंकराने केले बांधकाम या मंदिराचे
येतात भाविक दर्शनाला अधीमधी.....
मणीपुर हे नाव दिले
शंकराने उभारलेल्या गावाला
दर्शनीमूर्ती आहे मंदिरात
मंदिर साजेस आहे मणिपुर नावाला
मुळमूर्ती दडलेली आहे तळघरात
असा समज आहे सर्वांच्या मनात
२०हात १० सोंडी असलेली असावी ती
सर्वाधिक शक्तीरुप असे महागणपतीत....,
उजव्या सोंडेचा असे श्री महागणपती
या गणेशाला आसन कमळाचे असती
दिशासाधन केले आहे मंदिरात
उगवत्या सूर्याची किरणेथेट मुर्तीवर रचना करीती.....
उत्तरायणात दक्षिणायणात व माध्यान्हकाळी सुर्यकिरणे पडती गणेशाच्या मूर्तीवर
गणपतीची मुर्ती पुर्वाभिमुख मोठ्या कपाळी
शोभुन दिसे ती आसन मांडी घातल्यावरी....
मूर्ती असे अत्यंत मोहक
उभ्या आहेत रिध्दिसिध्दि सुबक
दोन्ही बाजुला गोंडस मूर्ती
सुंदर सजविलेला आहे त्यांच्यासमोर तबक.....
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺
अष्टविनायकातील आठवा
गणपती-रांजणगावाचा
🌺🙏🏻महागणपती🙏🏻
🌺🌺🌺🌺🌺🌺
गणपती आठवा,आठवा गणपती, रांजणगावाचा
महागणपती
मुळ मुर्ती वसे तळघरी
दस शुंडी वीस करी
नाव तिचे असे महोत्कटी
गणेशाचे हे रुप थोर
पाहीले न लोचनी
भक्तासाठी गाभारी
गणराज बैसले कमळावरी
रिध्दी सिध्दी संगती
दक्षिणायन उत्तरायनकाळी
सुर्यकिरणे पडतील सरळ मुर्तीवरी
अशी रचना विशेष
शेंदूर चढता मुर्तीवरी
तेज लखलखे गाभारी
कार्तिक शुद्ध पोर्णिमेला
षडाक्षर मंत्रोच्चारे
शंकराने पूजीले गणेशाला
उध्दारीले त्रिपुरासुरा
स्थापिले श्री गणेशाला
पुर्वाभिमुखी मुर्ती
पावतसे भक्ताला
नमन माझे थोर
या शक्तीशाली गणेशाला।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻🌺
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
~~~~~~~~~~~~~~~
*अष्टविनायक विशेष काव्यलेखन*
~~~~~~~~~~~~~
आठवा गणपती
*रांजणगावचा श्री महागणपती*
*************************
रांजणगाव चे श्री महागणपती
महादेवाने बांधले मंदिर
उभारले नवीन गाव
नाव दिले त्याला मणिपूर
वीस हात दहा सोंड
मूळ मूर्ती आहे तळघरात
दर्शनाकरिता दिसते सुंदर
बैठी मूर्ती मंदिरात
अष्टविनायकामध्ये आठवे स्थान
असे सर्वाधिक शक्तिमान
डाव्या सोंडेचे श्री महागणपती
बसायला कमळाचे आसन छान
सूर्यकिरणे येती दर्शना माध्यान्ही
रिद्धी सिद्धी बाजूला
मूर्ती अत्यंत मनमोहक
नक्की जावे दर्शनाला
*✒️ _ सौ रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
*************************
💢💢💢💢💢💢💢💢💢💢
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
क्रमांक ५६
~~~~~~~~~~~~~
आठवा गणपती
*रांजणगावचा श्री महागणपती*
*************************
पुणे जिल्ह्यात रांजणगावी
वसले महागणपती.......
प्रसिद्ध अष्टविनायक.....
मंदिर आहे पूर्वाभिमुखी
सूर्यकिरणे पडती मूर्तीवर
अशी आहे विशिष्ट बांधणी
मूळ गणपतीस ओळखती
*महोत्कट* इति नावानी
डाव्या सोंडेची आसनस्थ
सुंदर रेखीव मूर्ती दिसती
रुंद कपाळी मूर्तीच्या....
बाजू रिद्धी सिद्धी असती
दहा शुंड अन् विस भुजा
मूर्तीत बाप्पाच्या दिसले
त्रिपुरासूराचा नाश करूनी
गणपती येथेचि राहिले
भाद्रपद शुद्ध चतुर्थीस
गणेशोत्सव करती साजरा
मूर्तीस पूजती भक्तगण
जाऊन देवाच्या गाभारा
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक
आठवा गणपती
रांजणगावचा महागणपती
पुण्याजववळील रांजणगावी
आहे महागणपती
वध राक्षसाचा करण्यापूर्वी
शंकराने गणेश पूजा केली होती।।
हे मंदिर बांधले शंकराने
गावाचे नाव मनिपुर
दर्शनीय मूर्तीही
मूळ मूर्ती दडली तळघर।।
वीस भुजा ,दहा शुंढ
मूर्तीच साक्षात आहे
सर्वाधिक शक्तिमान
महा गणेशाचे रूप आहे।।
उजव्या सोंडेचे गणेश
बसण्या कमळाचे आसन
मंदिरात केले आहे
गणेशासाठी दिशा साधन ।।
उगवत्या सूर्याची सोनेरी
किरणे थेट पडते मूर्तीवर
उत्तरायणात ,दक्षिणायनात
माध्यानातही सोनझळ वरचेवर।।
मूर्ती पूर्वाभिमुख,मोठ्या कपाळी
आसन मांडी घालुन आहे
रिद्धी-सिद्धी दोन्ही बाजू उभ्या
मोहक मूर्ती भक्त पाहे।।
----------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के.सा.स.प.
(१११)
अष्टविनायक विशेष काव्यलेखन.
।।आठवे गणेश।।
🌺रांजणगावचा🌺
🌺महागणपती🌺
त्रिपूरासूराचा वध करण्या
निघाले शंकर भगवान
प्रसन्न करुनी गणरायाला
केले तेथेची पूजन ।।
रांजणगावचा महागणपती
असे आठव्या मानाचा
भोलेश्वर स्थापित गजानना
असे सर्वाधिक सन्मानाचा।।
शंकराने मणिपूर गावा
बांधिले गणाचे मंदिर
उजव्या सोंडेची पूर्वाभिमुख
कमलआसनस्थ मुर्ती सुंदर ।।
अप्रतिम वास्तू दिशासाधन
उत्तरायण, दक्षिणायण
मध्यान्नकाळी सूर्योदयी
सरळ मूर्तीवर पडती किरण ।।
सर्वाधिक शक्तीशाली
रांजणगावचा महागणपती
रिद्धीसिद्धी बाजूस उभ्या
श्रीगणेशाचे रुप पाहती।।
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
१|९|२०२०.
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक विशेष काव्य लेखन
आठवा गणपती
महागणपती
आठवा अष्टविनायक
आहे महागणपती रांजणगाव चा
शंकराने गणेशाची पूजा केली
वध करण्यास त्रिपुराचा ।।
शंकराने बांधले मंदिर
नाव दिले मनिपुर
सर्वाधिक शक्तिमान
गणपतीचे आहे हे मंदिर।।
दर्शनी मूर्ती बसलेली
आहे मंदिरात
मूर्ती मात्र मूळ दडलेली
आहे तळघरात ।।
समज आहे असा
मूर्ती आहे 20 हात व 10 सोंडे चे
गणेशाला आसन कमळाचे
महागणपती आहे उजव्या सोंडेचे।
उगवत्या सूर्याची थेट
किरणे पडती मूर्तीवर
मूर्ती आहे मोठ्या कपाळाची
रिद्धीसिद्धी उभ्या दोन्ही बाजुवर।।
पुनम डहाके, भंडारा
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺महागणपती रांजणगाव🌺
अष्टविनायकातील आठवा गणपती
रांजण गावचे महागणपती
पुणे जिल्हा,शिरुड तालुका
महापूजा करून, ठेवू भक्तीचा ठेवा!!
मुख्य मूर्ती तळघरात,१०सोंड,१२हाताची
दर्शनासाठी जी मूर्ती, ती कमळ वर आसनस्थ
सूर्यकिरणे थेट मुर्तीवरती
गणेशाची भारदस्त मूर्ती!!
त्रिपुरा सुराचा वध साठी
शंकराने केले स्थापित
गणेशाचे केले पूजन
त्रिपुरा सूराचा केला अंत!!
विनायका तुझा महिमा
भक्तांना दर्शन देवून
सकल मनोरथ पूर्ण करतो.
आशिष देवून सर्व जीवन सुखाने जगू!!
माधुरी भुते
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🛕 रांजणगावचा महागणपती 🛕
पुणे जिल्हा शिरूड तालुका
रांजणगावचा महागणपती
अष्टविनायकातिल आठवा
पुणे अहमदनगर मार्गावरती
त्रिपुरासुराला शक्ती दिली शंकरान
शक्तीचा दुरुपयोग केला त्रिपुरासुरान
शंकराने आराधीला गजानन
त्रिपुरासुर मारिला गणेशान
सभामंडप लाकडाचे नक्षीदार
प्रवेशद्वार अदभूत सुंदर
बाप्पा कमळावर विराजमान
मूर्ती मनमोहक मुद्रा प्रसन्न
उजव्या सोंडेचा महागणपती
सोबत त्याच्या रिद्धी सिद्धी
दहा सोंड वीस भुजाधारी
अष्टविनायकाची महिमा न्यारी
सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक विशेष काव्य लेखन
आठवा गणपती
""रांजणगावचे श्रीमहागणपती""
दैत्य त्रीपुरासुरला शंकराचे
शक्तिच्या वरा विध्वंस केला
स्वर्ग पृथ्वी लोक छळू लागला
गणेशाने शंकरा हातून वधला .
रांजणगावी वसले महागणपती
अष्टविनायकात शक्तिमान मानती
सोंड उजवीकडे मूर्ती कमलासणी
पेशव्यांना जीर्णोद्धार केला म्हणती.
.
इंदूरचे किबे नी केले नुतनीकरण
देवळा लाकडी सभामंडप बांधून
१० व्यां शतकातील मोहक मूर्ती
महागणपतीची सर्व जगभर कीर्ती.
मूळमूर्ती नाव महोत्कट
दहा तोंड वीस हात
मूर्ती स्थानापन्न तळघरात
पावन होते श्रद्धेनं नवसात.
पूर्वाभिमुख साधे सुधे मंदिर
अंगावर लाविले लाल शेंदूर
महागणपतीची मूर्ती सुंदर
सर्वांवर ठेवतो कृपेची नजर.
गणेशाचे कपाळ रुंद असून
रिध्दी सिद्धी आहे विराजमान
मंदिराची रचना दिशायमान
सूर्य किरण घेती मूर्ती दर्शन.
सौ.वीणा द.अतकरी
नागपूर.
दि.०१सप्टेंबर२०२०
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *महागणपती रांजणगाव*
रांजणगावचा महागणपती
अष्टविनायकातील आठवा गणपती
पुणे जिल्ह्यात रांजणगावला
आहे भव्य मूर्ती
उजव्या सोंडेचा तू
घेऊन रिद्धी सिद्धी
लाकडावर नक्षीदार काम
कमळावर श्री गणेश विराजमान
दहा हाताची मूर्ती
दुरवर पसरली किर्ती
सूर्यकिरण गणेशावर
वाहती तुला दुर्वांकुर
भक्तांचे श्रद्धेचे स्थान
म्हणून तुला महागणपतीचा मान
नंदा भोयर
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रांजणगावचा महागणपती
आठवा अष्टविनायक
नवसाला पावणारा अधिपती
ख्याती ज्याची या जगती,
आठवा अष्टविनायक
रांजणगावचा गणपती.
त्रिपुराच्या नाशासाठी
पुत्र गणेश,बीज मंत्र देई,
वध करून महादेव
गाभारी गणेशास स्थापिती.
चांदीच्या मखरात पूर्वाभिमुख
दहा सोंड ,वीस भुजेची मूर्ती.
रिद्धी सिद्धी उभ्या,सूर्य किरण
सुवर्णलंकार रूप मोऱयाचे खुलविती.
लाकडी मंडप, दीपमाळ,नगारखाना,
साक्ष माधवराव जीर्णोद्धाराची.
विस्तीर्ण अशा सुंदर क्षेत्री,
पौराणिक चित्रकथा मंदिरी रेखाटली.
जास्वंदी लाल,फुले दुर्वा
वाहू महागणपती,
अष्टविनायकाची यात्रा
सफल संपूर्ण होई या रांजणगावी.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.01.09.2020
[9/1, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺विनवणी🌺
गणेश देवा
वंदितो तुला
कोरोनो चे
विघ्न दूर करी
लोकं त्रयस्थ
भीती पायी
कित्येक काचा
जीव गेला
माणुसकी गेली
अन् आली या
महामारी पायी
हे विघ्नहर्ता
तार आम्हास
या विघ्णा तुन
किती राक्षस मारले तू
कारोनो राक्षस मार तु
कर सुरळीत
जीवन तू
गोरगरिबांचा बाप्पा
आर्त विनंती तुला
साकडे आम्ही
घालतो तुला
प्रसाद मोदकाचा
देतो तुला
लाल फुले दुर्वा
अर्पून तुला
निरोप देतो
तुम्हाला
पुढच्या वर्षी
या तुम्ही या
आनंदाने
हे संकट दूर करी
आमच्या वरचे
विनंतीला मान द्यावे
चूक आमची
पदरात घावी
अंत नको पाहू आता
हीच विनवणी तुम्हाला!!
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया मोरया🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
माधुरी
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.५७
बाप्पा च्या आठवणी
हूरहूर आहेच मनी
प्रतिक्षेत राहून त्याच्या
नित्य गाऊ जीवन गाणी.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प -- 67 वे
अंगणी सुंदर प्राजक्ताचा सडा
पांढऱ्या कपाळी केशरी टिळा
मंद मंद सुगंध देऊनी
जगी फुले आनंद मळा ।।
-----------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (४८)
प्रभाते लखलखीत शिवार
सुर्यकिरणानी रुप मोहरत
किलबिलती पक्षी तरूवर
गाईवासरे हंबरती गोठ्यात.
दनाअ, नागपूर
दि.०२/०९/२०२०
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹|| *अलगूज* ||🌹
*क्र.६४*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*गणपती बाप्पा गेले*
*चैन पडेना जिवाला*
*पुढच्या वर्षी लवकर या*
*बाप्पा आम्हाला भेटायला*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वेलीवरती फुले उमलली
पक्ष्यांची किलबिल सुरू झाली
सूर्याची किरण धरतीवर आली
नवी स्वप्न घेऊनी सकाळ आली
नंदा भोयर
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹पहाटवारा🌹
पूर्वजांचे आशीर्वादान
आपण सुखी संपन्न
श्राद्ध करून त्यांचे
करावे त्यांना प्रसन्न.
सौ.विणा द. अतकरी
नागपूर
दि.०२/०९/२०२०
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
निशिदींनीचा उगवला सुर्य
महालयाचे सुरू पर्व
पूर्वजांच्या आठवणी जागृत
नमन तयांसी कृतज्ञपूर्वक
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.६१*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*डोंगरातून वाहे झरा झरझर*
*रंगीत फुलांचे तुरे डोलतात*
*इवली फुलपाखरे बागडतात*
*निसर्ग देखावे मोहून टाकतात*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
(०१) चारोळी
""माझं गाव""
गाव माझा "वेलतूर" सुंदर
सर्व सोयीसुविधां नी युक्त
नागपूर ते आंभोरा मार्गावर
तालुक्यात बाजारपेठ स्वस्त.
(०२). . चारोळी
""माझं घर""
"नारायणा" घर माझे सिमेंटचे छप्पर
दरवाजा घराचा आहे पूर्वाभिमुख
प्रभातकाळी सुर्यप्रकाश येतो भरपूर
मस्त मिळते आम्हाला समृध्दी सुख.
दनाअ, नागपूर
दि.०२/०९/२०२०
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🏠 🏘️ 🏘️ 🏘️ 🏘️ 🏘️ 🏠
*माझे गाव*
माझे गाव आहे भंडारा.......
तलावांचा जिल्हा आहे ख्याती
पितळी भांडी बनतात येथे.....
तांदळाच्या आहेत विविध जाती
*माझे घर*
माझे घर छोटंसं पण टुमदार
सूर्यकिरणे पडती प्रथम घरावर
घराच्या समोरी छोटा बगीचा
पाहुण्यांची नजर पहिले फुलांवर
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *माझे गाव*
वैनगंगेच्या तीरी वसले माझे गाव
माझ्या गावाचे मांडवी आहे नाव
बाजार हाट शिक्षण सारे होते
दिवसातून एकदाच एसटी येते
नदीवरचा सुंदर पूल
सूर्यास्त बघता मिळे सुख
घराभोवती भले मोठे आंगण
सकाळचे ते रम्य वातावरण
गोठयात दिसती गुरे-वासरे
गोंजारून त्यांना मन हरपते
परंपरा एक गाव एक गणपतीची
मज्जा काही औरच सणवाराची
चढुन जाता चांदपूरचा डोंगर
भक्तीने मिळे आशीर्वाद हनुमंताचा
समृद्ध जमीन पिकवू
धान्य कुठले मोतीच जणू
✍🏻 *योगिनी ढबाले*
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🏡माझे घर🏡
माझे घर इवलेसे त्याला समाधानाचे दार,
सुखदुःखाच्या विटा रचील्या,चढविले मायेचे छप्पर छान।घरासमोरील तुळस करील तुमचा मान।
********************
माझे गाव
माझे गाव दारव्हा, आहे तालुक्याचे ठिकाण.
सासरमाहेर तेच माझे
करीते दोन्ही कुळाचा उध्दार.
********************
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझे गाव--
माझे गाव आहे भंडारा
पिकती विविध प्रकार धानाचे
प्रसिद्ध पितळी भांडी अन तलाव
विदर्भात महत्व भ्रूशुंढ गणेशाचे।।
---------------------------------------
माझे घर --
माझे घर आहे पश्चिममुखी
उतरतं ऊन घरात न्हाते
मुलं खेळतात अंगणी
सुखाचा सुगंध दरवळते ।।
-------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹 कविता 🌹
🏡माझे घर🏡
इवलेसे घर माझे आहे टुमदार छान।
घरासमोर तुळस,करिते
सर्वांचा मान।
घराभोवती अशोक, आंब्याची झाडे।
गुलाब, मोगरा, जाईजुई
आंनदाने डोले।
सर्व सुखसुविधा घरात आहे,तरीही दिवसभर
घर कसं गुमान असत।
सायंकाळी मात्र घराला घरपण येत।
सुखदुःखाच्या आठवणी
घरात आहेत।
घराच घरपण मनात आहे।
दसरादिवाळी सणवारी
घरात गोकुळ भरते।
घर कसं उल्हास आनंदाने
भरून जाते।
सुट्टीच्या दिवसांत घर
आनंदात न्हाते,
इतर दिवशी मात्र वाट पाहते।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻💐
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझं गाव
माझं गाव आहे छान
हिरवी शेते हिरवे रान
स्वच्छतेचे आम्ही भक्त
गाव केले आपुले हगणदारीमुक्त!!
माझे घर
घर माझं टुमदार
बागेचे उमलती फुले सुंदर
अंगणात बागडती, माझी चिमणी पाखरं
स्वर्गाला ही येत नाही,
इथल्या सुखाची सर!!
रंजना हलमारे (सेलोकर )
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *माझं गाव*
भंडारा माझं गाव
आहे इथे भृशुंड मंदिर
रावणवाडी तलाव निसर्ग
आहे खूप सुंदर ।।
*माझं घर*
माझ्या घरात नांदतात
वरद सिद्ध दोन्ही
आपल्या बालकला दाखवुनी
टाकतात, सर्वांना मोहूनी ।।
पुनम डहाके, भंडारा,
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मनोगत
गणेशोत्सवाचे
दहा दिवस मुक्काम असे
गणपतीबाप्पाचा आमच्या रचियतामध्ये
पहिल्या दिवशी स्वरचित आरती
आॕनलाईन गणेशोत्सवाचा यामध्ये .....
नित्य पुजा रांगोळी आरती कर्पुरआरती
मंत्र पुष्पांजली प्रसाद मिळती
याचा आनंद गगनात मावेनासा होती
सहभागी मी रचियतात
माझे भाग्य समजती......
गणेशोत्सव सोहळे
असे डोळ्याचे पारणे फिटणारे
विविध प्रसाद प्रसादकाव्य यातुन मिळे
कविता गाणे पत्रलेखन आगळे......
माहिती भरपूर गोपालदादांनी दिली अष्टविनायकांची
विसर्जन झाले गणपतीबाप्पाचे
दर्शन देती बाप्पा पुढच्या वर्षी
आभारी आहे मी दादा ताई .बी.के.साहित्य संवर्धन ची........
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी
माझे गाव, माझे घर
माझे गाव
*********
उपराजधानी महाराष्ट्राची
जग प्रसिद्ध 'संत्रा' नगरी
रामटेक, गणेश टेकडी, दीक्षाभूमी
ओळख माझे गाव नागपूरची.
माझे घर
**********
दारापुढे उभी रांगोळी,तुळस
हसत खेळत पार करी
सुख दुःखाचे क्षण
'समाधान' हेच माझ्या,घराचे वैशिष्ट्य.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.02.09.2020
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझे गाव,माझे घर...
आटपाट नगर आटपाट नगरात
नागपूर शहर,नागपूर शहरात
विकासाचा वाटा,सोयींनी युक्त
नागपूरचे संत्री अण मंत्री प्रसिद्ध.
माझे घर🏬
नागपूर शहर,नागपूर शहरात
रेशिमबाग नगर,आमचं राहतं घर
मोठी इमारत सर्व सोयींनी युक्त
प्रेमाने आप्त स्वकीय राहतो गुण्यागोविंदाने.
माधुरी भुते
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *उपक्रम चारोळी*
*माझे गाव*
नोकरीनिमित्त फिरस्ती बिर्हाड
नवीन गावे बघायला मिळतात
नवीन संस्कृती आणि खाद्यपदार्थ
आवर्जून शिकून घ्यायला आवडतात
*माझे घर*
आपुलकीने विचारपूस
मनापासून काळजी घेती
नात्यांची गुंफण आहे
अशी माझ्या घराची ख्याती
*सौ.रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🏞️ माझं गाव माझ गाव आहे अमरावती. अपार आहे अंबा व ऐकवीरा मातेच्या श्रद्धेची महती. चरण स्पर्श लाभलेली संत गाडगेबाबा,तुकडोजी महाराजाची ही धरती.. शिक्षणाच्या क्षेत्रात माझ्या गावाची अलोकिक महती. 🙏" माझं घर " 🏡 घर आहे टूमदार प्रवेश करताच स्वागत करते रेखीव रांगोळी. तुळस ,लाॕनआणि फुलांनी नटलेल्या वेली. देतात आनंद उत्साहाची परवणी. घरात नादते सुख दुःखाची रेलचेल नवी. ✍️प्रा. सौ. स्वाती संजय शिंगणजुडे (पिंगळे) अमरावती
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के.सा.स.प.
११२.
चारोळी लेखन.
।।🌺माझे गाव🌺।।
* माझे गाव बेला *
* आहेच जणू अलबेला *
* महामार्गाची शान *
* अवगत येथे स्थापत्यकला *
।। 🌺माझे घर 🌺।।
* आंबे,चिकू,मोसंबी,फळझाडे*
* फुलझाडे वेली सभोवताल *
* मधे आमचे डौलदार घर "श्री"*
* प्रभातकाळी पक्षी करी
किलबिल*
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
२|९|२०२०.
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के.सा. सं.प.
( ०१ ) चारोळी
""माझे गाव""
गाव माझे उपराधानी नागपूर
संत्री नागपूरची प्रसिद्ध सर्वदूर
सोज्वळ, व्यवहारिक लोकंमन
पोट भरतात सर्व प्रांतीय जन.
(०२). चारोळी
""" माझे घर""
घर माझे महाकलीनगरात
दक्षिण मुखी 'नारायणा'नाव
नांदतो घरात गुण्यागोविंदानं
नाही इर्षा, अहंकार बडेजाव.
सौ.वीणा द. आतकरी
नागपूर
दी.०२/०९/२०२०
[9/2, 5:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *चारोळी लेखन माझं गाव माझं घर*
माझं गाव अमरावती
आहे अंबा एकवीराच स्थान
नवरात्रामध्ये नऊ दिवस उत्सव असतो छान
अमरावती आहे जिल्ह्याचे ठिकाण
घर माझं गार्डन समोर
सकाळ होता दिसते हिरवळ
लहान मुलांची दिवसभर तेथे धावपळ
मस्त जातो आमचा वेळ
नंदा भोयर
[9/2, 5:28 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गाव माझे अमरावती
अंबाची ही अंबानगरी
उनीव न कशाची
करा खरेदी मनभर
वेगवेगळ्या प्रकारची
गावात जाता दुकान भारी मोची गल्ली गर्दी सारी.
घरात येता घडते दर्शन गजाननाचे
मनी प्रसन्नतेची भावना दिसे
आनंद ही आनंद असे नांदते मी सौख्यभरे
जिकडेतिकडे सुखाचे झरे.
🙏
सौ. भूमिका राजेश बोंद्रे.
अमरावती.
💐💐💐💐
[9/2, 5:28 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझे गाव --
माझे गाव आहे.
वर्धाजिल्यात.
आर्वी या गावात. या गावात हिंदूमुस्लिमाचे मंदिर . तेलंगरायचे मंदिर त्या मंदिराला वलीसाहेब बाबा असे आहे नाव.
येथे जवळ जवळ आहे संताचे मंदिर.
येथील जनता सुखी, समृद्धी, संपन्न हे गाव. पाण्याचे तलाव आहे. हनुमान जयंतीला असते यात्रा छान .
----------------
माझे गाव
----------------
माझे घर
माझे घर आहे पूर्वभीमुख. . माझे घरआहे चैरस्त्यावर. येथे येणाऱ्या जाण्याराची असते वरदड. घरात येते ऊन छान .
---------------
सौं
शोभा राजेश खोकले
यवतमाळ
[9/2, 5:28 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझे गाव आहे नागपूर
इथे पिकति संत्रे
इथली पोहा तर्री आहे प्रसिद्ध
सावजी आहे तोंडाला तिखट देणारी
इथला टेकडी गणपती आहे खूप प्रसिद्ध
नागपूर आहे माझे गाव
मला माझ्या गावाचा खूप अभिमान आहे.
-------------------------------------
माझे घर
-------------
माझे घर आहे पूर्व भिमुख
घरात येतो ऊन छान
समोर ग्राउंड आहे.
तिथे मुलं खेळतात.
त्यांना बघून आपल्याला आपलें लहानपण आठवतो.
असे आमचे छोटेसे घर आहे नागपूरला.
🙏🏼🙏🏼
********
सौ,
प्राजक्ता रेहपाडे
पुणे
*********
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"". (५०)
गावाकडचा मजूर शहरात आला
शहरात रोजंदारीचा फज्जा उडाला
लोक झाली बेरोजगारीनं सैरावैरा
गावात थांबला तोच सुखी राहिला.
दनाअ, नागपूर
दि.०३/०९/२०२०
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सौ.विणा द.अतकरीचे वाढदिवसानिमित्त
"चारोळी"
विणा माझी मानाची
झाली दोन सुनांची
आजी ती मुक्ताईची
शुभेच्छा वाढदिवसाची.
दनाअ.
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.समूहावर सकाळच्या संस्कारधारा सध्याचे अर्धशतक(५०)अंक आज पूर्ण झालेत.
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.५८
रानफुलांचा मोहक दरवळ
खगगणांचा मधुर गुंजारव
उगवली सुरम्य सकाळ
नमन माझे तुज भाष्कर.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प -- 68 वे
पात्राला व्हावा काकस्पर्श
म्हणून आपण धडपडतो
पितरांच्या आठवणीत
संस्कार हृदयी जपतो ।।
मंगला डहाके, भंडारा
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹पहाटवारा🌹
मनाशी जोडलेल्या नात्याला
नावाची गरज नसते
न सांगता जुळलेल्या नात्याची
परिभाषा निराळी असते.
सौ. वीणा द. आत्करी.
नागपूर.
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नाते तुझे नि माझे
घट्ट नेहमी रहावे
स्वप्नातही मी
तुझ्या अंतरी दिसावे
शुभ सकाळ. नंदा भोयर
.
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
**********
गुरू पदावर फुले वाहुनी
गायिली गुरू स्तुती
नमामी शरणंम
प्रणाम सद्गुरू
द्यावी सुसंगती
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (१०७)
""" जोडलेली मनाची नाती"""
प्रेम शब्द अडीच अक्षर
लावलं तर फार सुंदर
फुललं जातय जीवन
घट्ट ती नात्याची शिवण.
नाती जोडली मनाची
जिव्हाळा न् विश्वासाची
क्षण देतो घेतो सुखाची
गुरूकिल्लीच आयुष्याची.
नातं असावं नितळ निर्मळ
नकोत इर्शा अन् स्पर्धेची
सुखदुःखात साथ मिळावी
नसावी नुसती जपण्याची.
नात्याविन आयुष्य सुने
बिनपाणाचे झाड दिसते
पतीविन सौंदर्य न् खुलते
नारीसह जिवन फुलते.
आदर व्हावा भावनांचा
मिळतय सुख नात्यांचा
रक्ताचा वा मानल्याचा
ना लवलेश रुसण्याचा.
दनाअ, नागपूर
दि.०३/०९/२०२०
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.६२*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*मध चाखून बघितल्याशिवाय*
*मधाचा गोडवा कळत नाही*
*मैत्री करून बघितल्याशिवाय*
*मैत्रीची ताकद कळत नाही*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: क्रमांक ५७
*मायेनं जोडलेली नाती*
~~~~~~~~~~~~~
प्रेमाने माणसे जुळती
अहंकाराने दूर जाती
विश्वासाच्या धाग्यांनी
एकमेकांत बांधली जाती
कौतुकाची थाप पाठीवर
दुःखात द्यावा मदतीचा हात
आनंदात सोबत आपल्या
सुखात लाभो त्यांची साथ
नको इर्षेचा लवलेश.....
स्पर्धा नको या नात्यांशी
एकमेकांना सोबत घेऊन
जावे यशाच्या देशी.....
नकोत रुसवे फुगवे......
अतिअपेक्षा त्यांच्याकडून
मानपानाची नको आशा
न वागावे सीमा सोडून
नका दूर करू नाती
मतलब साधून स्वतःचा
रागाच्या भरात बोलताना
विचार करा नात्यांचा
काही नाती जन्मतः....
लाभती काही मैत्रीने
जपावी सर्व नाती
आपुलकी अन् प्रेमाने
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जोडलेली मनाची नाती
जोडलेली मनाची नाती
अद्भुत गोष्टी शिकवून जाती
सहजच एकमेकांना भेटत
नवीन नात जातं नटत
एकमेका समजून घेता
जागा बनवती आपल्या मना
मित्र-मैत्रिणी शेजार-पाजार
एकमेकांना देती आधार
मन हे चंचल बावरते
समजून घेत नाते सावरते
सहमत नसलं की होतो गैरसमज
बोलल्याशिवाय नाही करमत
फिरता फिरता आठवणींमध्ये जगू
मनामधील गोष्टी आपुलकीने सांगू
सन्मान आवडी-निवडींचा
अविभाज्य घटक आयुष्याचा
✍🏻 *योगिनी ढबाले, पुणे*
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जोडलेलं मायेचं नातं--
मायेने जोडलेली नाती
विश्वास पूर्ण असावी
परस्परांच्या हृदयात
स्नेहबंध भावना दिसावी।।
रक्ताच्या नात्यापेक्षाही कधी कधी
जवळची असती मायेची नाती
एकमेकांच्या हृदयातील दुःख
परस्परांच्या नयनात पाहती।।
न सांगता ही त्यांना
सुखदुःखाची कळते सल
अडचणीत येते तेव्हा
नेत्राचं पाणी ओघळते गाल ।।
प्रेम, जिव्हाळा अंतरी
पुरून उरणारा विश्वास नात्यात
देण्याघेण्याचे व्यवहारही
नसावं या नातं जपण्यात।।
अहंकार, द्वेष ,स्वार्थ ना लवलेश
खांद्यावर ठेवी धीराचा हात
शाबासकीची थाप पाठीवर देऊन
परस्परा द्यावी मदतीची साथ ।।
---------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जोडलेली मनाची नाती
नात्यात नसावा नुसताच स्वार्थ!
नात्याला असावा अर्थ!
नाती नसावी नुसती रक्ताची!
नाती असावी आपुलकीची!
नाती असावी जिव्हाळ्याची!
नाती असावी प्रेमाची!
नाती असावी विश्वासाची!
नाती अशी असावी मनामनात गुंतलेली!
नात्यांची वीण असावी फिट्ट!
नाते होतील मगच घट्ट!
नात्यात नसावा दुरावा!
नात्यात सदा असावा ओलावा!
नात्यात भाव असावा प्रेमळ!
नात्यात मिळे एकतेचे बळ!
नात्यांची असावी किंमत!
नात्यामुळेच येते जगण्याची हिंमत!!
रंजना हलमारे (सेलोकर )
साकोली
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मनाची जोडलेली नाती
जन्म येता
सोबत येती
नाती रक्ताची.
स्नेहभाव आपुलकीने
नाती जुळती
मना मनाची.
प्रेम,विश्वास
बांधते घट्ट
वीण नात्याची.
जोडली नाती
ओळखीते अबोल
गुज मनातली.
इर्षा, द्वैष
नसे कुठे
भेद,हेवादावा.
भाव भावनांचे
मिलन स्वीकारी
आपुलकीचा लळा.
देणे घेणे
निस्वार्थ असते
लागता जीव
जोडली नाती
खरीच ठरती
आयुष्याची ठेव
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.03.09.2020
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जोडलेलं मनाचं(मायेचं) नातं
***********************
आयुष्याच्या वाटेवर,
भेटतात लोकं जीवभर,
कळत-नकळत जुळून येते,
मानलेले मायेचे नाते।
रक्ताची नाती,
जन्माने मिळतात,
मानलेली नाती,
मनाने जुळतात।
मायेच्या नात्यात,
नसते भाषा अधिकाराची,
फक्त भाव-भावना,
असते परोपकाराची।
आलेल्या संकटात,
असतो मदतीचा हाथ
देऊन भक्कम आधार,
असते निस्वार्थ साथ।
रक्ताच्या नात्यात,
जुडलेली असते नाळ,
पण मायेच्या नात्यात,
जुळतात मनाचे तार।।
सौ. संगीता कढव, भंडारा
*********************
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जोडलेली मायेची नाती
जोडलेली मायेची नाती असावी
दुधावरच्या सायी सारखी
ईर्षा, द्वेष, राग बाजूला सारून
दरवळणाऱ्या फुलासारखी ।।
नसतात नाती रक्ताची
तरी सुख देऊन जाणारी
मायेचा हात डोक्यावर ठेवून
दुःखातही अश्रू जपणारी ।।
एकमेकांवर असावा विश्वास
नको यामध्ये कुठलाही रुसवा
नाती असावी जिव्हाळ्याची
हात मायेने हाती धरावा ।।
नातं असावं न सांगताही
डोळ्यातून समजून घेणार
शाबासकीची थाप देऊन
पुढे घेऊन चालणार ।।
पुनम डहाके, भंडारा,
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के.सा.स.प.
११३.
।।🌺मायेची माणस🌺।।
मायेची माणस असतात
निष्पाप,निर्मळ मनाची
सर्वांना सोबत करणारी
नसतात स्वार्थी वृत्तीची ।।
नाते जपावे अलगद
विश्वासास जपणारे
नकोच दिखाऊपणा
जलदच ऊबणारे ।।
हृदयाच्या कप्प्यात राहणारे
मनाचा मोठेपणा असणारे
राग,द्वेश,ईर्षा नसाव्याच
नसावेत "मी"पणा दाखवणारे।।
मायेच्या माणसांना
अपेक्षा,उपेक्षेची पर्वा नसतेच
ती असतात कर्तव्यनिष्ठ,प्रेमनिष्ठ
असतेच काळजी आपल्यांचीच।।
मायेच्या पसार्यात
दिसतात सर्वच सारखे
आपण प्रेम लुटून जातो
पण ते होतात पारखे ।।
हाती नसते येणे
हाती नसते जाणे
श्वास आहे तोवरी
सारे माझेच म्हणने।।
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
३|९|२०२०.
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जोडलेली मायेची नाती 🌹 रेशीमगाठी 🌹 आयुष्याच्या वाटेवरती किती नाते मिळतीजुळती
काही टिकती,काही साथ
सोडूनि जाती।
नातं हे चिरकाल टिकाव
ठेच लागता नयनी पाणी भराव।
फुलावं नित नव्या अनुभवे
क्षणभंगुर ते नसावं।
नात्यात असावा आधार
पाठीवर कौतुकाची थाप।
सुखदुःखाच्याउनसावलीत
आपुलकीची साथ।
नात्यामध्ये असावा अर्थ
त्यात नसावा
राग लोभ द्वेष व्यर्थ।
रक्ताची जी नाती मिळती
अहंभावे तुटूनी जाती।
प्रेमाच्या नात्यामधी
ना कोणत्या वाटाघाटी।
परोपकारे स्नेहभावे
जुळुनी येती रेशीमगाठी।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जोडलेली मायेची नाती
मायेनं नाती जुळती
रागाने लांब जाती
जोडलेली मनाची नाती
नाविण्यपुर्ण शिकवुन देती.....
जिव्हाळा प्रेम मनी
ठेवून विश्वास नात्यात
देणं घेणं गोष्टीही
नसाव या नात्यात.,...
द्वेष मत्सरांना नसते इथे दाद
निस्वार्थ निर्मळ मनाची
सर्वाना देणारी साथ
नसतात आप्पलपोटी वृत्तीची......
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: "नाती"
नाती येतात आयुष्यात,
सहज निघून ही जातात।
मनातल्या भावना अखेर
मनातच राहतात।।
जीवनात नाती तशी
अनेक असतात।
पण ती जपणारी लोक
फार कमी असतात।।
जगासमोर मिरवणारी
नाती खूप असतात ।
मनाला समजून घेणारी
सगळीच नसतात ।।
निस्वार्थ ना ती खुप आठवतात,
स्वार्थी नाती सलत राहतात।
जीवनाचा हिशेब मात्र
ही नातीच चुकवून जातात।।
सौ.सीमा अ.निवर्ती
मुंबई
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *मनानी जोडलेली नाती*
मनानी जोडलेली नाती
रक्ताच्या नात्या पलीकडली
जी सहज बोलता बोलता
मन जुळलेली
निर्मळ मनानी बहरलेली
हेव्या दाव्यात कधी न गुंतलेली माणसामाणसात रमलेली
कर्तव्याला न विसरलेली
सतत मनात प्रेमाची
ज्योत जागवलेली
माझं तुझं असं मनात
कधी धरून न बसलेली
रक्ताच्या नात्या पार
मनाला भावलेली
नकळत एकमेकात गुंतलेली
सहवासाने बहरलेली आणि फुललेली मनानी जोडलेली
सौ नंदा अ भोयर
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: II चारोळी II
धागे ते नात्यांचे
कधी तू कधी मी गुंफावे
मनातल्या मनात का असेना
नाते अलगद जपावे
🌿मंगेश बांते, पूणे🌿
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जोडलेली नाती....
मनाचे नाते असते प्रेमळ
भाव असते मैत्री चे
संबंध सलोख्याचे
जिव्हाळा सुखं दुःखाचा!!
जीवन जगताना
माणसं भेटतात भरपूर
जोडलेलया नात्यात
वैशिष्ट्ये तसूभर!!
जन्माचा नात्यात असतो
हेकेखोरपणा,कर्तव्यनिष्ठ
मानलेल्या नात्यात
भावनेला अर्थ, प्रेमाची साथ!!
रक्ताची नाती
जन्माने जुळतात
मानलेली नाती
मनाने जुळतात!!
जोडलेले नात्यात
उन्मळून येतात मनाचे नाती
जोडलेली नाती टिकविणे
आपल्याच हाती!!
माधुरी भुते
[9/3, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: Il जोडलेली मनाची नाती ll
जोडलेली मनाची नाती
प्रेम भावना आपुलकीची
त्यात नसे द्वेष तिरस्कार
तारे जुळती आत्म्याची
दोन आत्म्याचा भाव
त्यात असे कळवळा
एकमेका देऊन जाई
हृदयी प्रेम जिव्हाळा
मदत करण्या एकमेका
धावुनी येई तत्पर
असले कितीही दुःख
दिसेल मायेचा पाझर
कधी रक्ताच्या नात्यापेक्षा
त्यांच्या कडून जास्त अपेक्षा
चिरकाल टिकण्याकरिता
असावी मनी सहनशीलता
सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: दारापुढे सडा
त्यावर छान रांगोळी
सर्वांना माझा नमस्कार प्रभात काळी
नंदा भोयर
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा""(५१)
पाऊस पाण्याचा हंगाम साजरा
सोयाबीन लह-या मारी गोजरा
दुष्ट अळीनं साराच घात केला
पान खाऊन फस्त केलं पिकाला.
दनाअ, नागपूर
दि.०४/०९/२०२०
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प -- 69 वे
रातराणी शुभ्र वस्त्र लेऊनी
शोभे हिरवी किनार
भारी सुगंध देऊनी साऱ्यांना
प्रसन्न करते अपार ।।
मंगला झेड.डहाके
भंडारा
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
दोन शब्द प्रेमाचे पुरती
जुळती मनाची नाती
अभिष्टचिंतन प्रातःकाळी
स्वीकारावे सखी
सौ. प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ******************************
*B. K. च्या साहित्य जगात*
******************************
*B. K. साहित्य जगात*
रमून जावे सार्यांनी
कल्पनेचे विश्व कधी
भावनारुपी शब्दांनी
साधन असे बहुमूल्य
प्रबोधन करण्याचे...
शब्दात शब्द गुंफती
नाना विचारांचे......
साहित्याच्या जगात
झाली महान व्यक्ती
अर्पूणी साहित्यास
केली त्याचीच भक्ति
गर्दी नाना शब्दांची
साहित्याच्या जगात
अर्थ त्याचा समजण्या
होतो गोंधळ मनात
*B. K. एक माहेरघर*
साहित्याच्या जगातील
शब्दातील गुंफण निराळी
सगळ्यांच्याच कवितेतील
शब्दांची गुंफण जमली
हातात लेखणी घेतल्यावर
लेखक जागा झाला.....
शब्द उतरले कागदावर
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
कविता (१०८)
--बि.के.च्या साहित्य जगात--
बि.के.च्या साहित्य जगाची
विविधरंगी सुंदर बाग झाली
लेखनीत विश्र्वास साखळली
तोलामोलाची शब्द शृंगारली
बागेतील अनेकविध भावरंग
ऐकता वाचता मन होई दंग
बहुविषयी काव्याचा सुगंध
बि.के.समूहा दरवळतो संग.
धांदेदादानी बाग निर्मीली छान
सारस्वतांना मिळाले शब्दबाण
विविध नगरातील पर्यटकाले
शब्दरूपे काव्य सजवु लागले.
बि.के.च्या साहित्य जगाने
आम्हा नवोदितां मंच दिले
रचना लिहण्या बळ आले
शब्दचिंतनाने लेखन झाले.
दादा ताईंसह नाते विणले
बि.के.मंचात शब्द स्फुरले
विविधांगी विषय काव्याचे
धनुष्य मंगलाताईनं पेलले.
दनाअ, नागपूर
दि.०४/०९/२०२०
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: साहित्याच्या जगात
साहित्याच्या जगात
रमते मी खुप मस्त
अक्षर अक्षर गुंफुनी
शब्दरुपी माळ करते स्वस्त.....
काव्यलेखनाचा होता छंद
पण ते राहायचं कागदावरच
ना पेपरमध्ये देणे ना कुठे भाग घेणे
बीके साहित्य संवर्धन माहेरमुळे मन मोकळे त्यावर.......
सद्भाभ्य मी माझे समजते
नवनविन साहित्य मला
सर्व संवर्धन मधे मिळते
कितीही थकले तरी कविता ती स्फुरते.....
घरकाम नोकरी मर्जी सांभाळणे सर्वांची स्त्रीयांसाठी
असते ती तारेवरची कसरत
बीके साहित्याकडे टाकली नजर की
मन बहरुन जाते हर्षत.......
द्रोणकाव्य,पंचाक्षरी
सारे हे कळले साहित्य संवर्धन मधुन
नव्हती याबाबत जाण
थोडे ज्ञानीवंत झाले यातुन......
कदर होते साहित्याची
साहित्य समुहात
विषय दिसला की
रमतो आम्ही सारे लिखाणात......
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: B. K.च्या साहित्य जगात--
बि.के .साहित्य समूहाचे
जन्मदाते सुभाष दादा
सुबद्ध काव्य करणारे
आमचे दशरथ दादा ।।
बी.के. चे सर्वेसर्वा ,देवराव दादा
सुरेख गझल ,कविता रचणारे
मंगेश ,ओम प्रकाश दादा
मध्ये हजेरीत गजानन दादा ।।
या समूहात मिळाले
मायेचे दादा अन ताई
सर्वांच्या रचनांना सुंदर
गोड अभिप्राय देई ।।
हाती लेखणी घेऊन
जन्मते लेख अन कविता
प्रबोधनाचे कार्य होते
या बिके समूहात आता ।।
मंगला डहाके, भंडारा
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: "B K साहित्य जगात"
साहित्य हा समाजाचा आरसा,
तेच पुढे नेई आपला वारसा.
साहित्यामुळे कळतात समाजाच्या रीती कुरिती,
साहित्य आहे मानवाच्या विचारांची अभिव्यक्ती.
साहित्य आणि संस्कृतीचा आहे अनन्य संबंध,
साहित्य हेच शब्द अर्थ आणि भावनांचा त्रिवेणी बंध.
BK ने दिला ला एक मंच
उलगडायला भावनांचा संच.🙏🏻🙏🏻
सौ. सीमा अ. निवर्ती
मुंबई
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के च्या साहित्य जगात
✒️✒️✒️✒️✒️✒️
बी.के.च्या साहित्य जगात वावरताना, मन मोहरुन जाते।
विसरुन भान जगीचे
लेखनी हाती येते।
बऱ्याच दिवसापासून
मनात होती एक इच्छा
आपणही लिहावे.....
हाती लेखणी घेण्या
मन धजत नव्हते
ओळख झाली बी.के.
साहित्य जगताची
नकळत लेखणी हाती आली भाव मनीचे उतरले कागदावरी झाली शब्दांची गोफणी।
बी.के.साहित्य जगताने
दिला एक परिवार।
त्यातूनझाले मनसंवर्धन
मिळाला शब्दांना आकार।
ताईदादांनी सांगड घातली
दिली कौतुकाची थाप।
शब्दांनाही स्फुरण चढले
नवं काव्य साकारले।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: B. K.च्या साहित्य जगात--
अक्षर एक एक जपुनी
मनातल्या भावना मांडते
शब्दांचीच माळ करूनी
काव्यलेखात नटवते ।।
आम्ही प्रेमी साहित्याचे
उत्स्फूर्त भाव उमटणारे
सौम्य, कडक अलंकारात
काव्य रचना करणारे ।।
शब्द रचता नसते
नकारात्मकता अंतकरणी
छंदा सह मनआरोग्यही
जपतो आपण साऱ्याजणी ।।
सुवर्णकिरणांचे दान देऊनी
रवी पाहि अवनीचा सोहळा
शब्दांनीच त्या गीत गावे
भरावा इथे साहित्य मेळा ।।
साहित्याच्या जगात
मिळतो सर्वत्र मान
आम्हासाठी आहे
B.K. आमचा समूह महान।।
साहित्याच्या जगात आम्हा
आनंदात शब्द स्फुरावे
B.K.ग्रुप मध्ये दादा ताईंना
देवराव दादाचे वरदहस्त लाभावे।।
---------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ""बी.के.च्या साहित्य जगात""
साहित्याच्या जगात
गुरफटून गेलं मन
घेऊन कागद पेन्सिल
सुरू झालं लेखन.
मनात नसताना
अचानक आला योग
म्हणून पेन्सीलचा
केला थोडा प्रयोग.
बी.के.च्या सखीचे
काव्य लेखन बघून
वाटली मना हुरहुर
बघावं म्हणलं लिहून.
बी.के.साहित्य ग्रुप नी
मिळते काव्याचे बळ
शब्द चिंतनात बसुन
लिखाण करा सबळ.
सौ.विणा अतकरी नागपूर
दि.०४/०९/२०२०
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय -BK च्या साहित्य जगात*
BK सोबत झाली
साहित्याची दिंडी सुरू
मिळून सर्व कवी कवयत्री
साहित्य संवर्धन करू
रोज नवीन विषय
होते उत्साहात लिखाण
शब्दांची गुंफण करून
विचार मांडतो छान
पडतो अभिप्रायांचा पाऊस
मिळते शब्बासकी छान
लेखणीस बळ मिळते
विचारांचे आदान-प्रदान
साहित्याच्या जगात
एकटेपणा नसे मुळीच
होते साहित्याची मैत्री
सखोल विचारांची गोडी
काळजातील भाव
लेखणीतून उतरतात
कल्पनाशक्तीची किमया
साहित्यात दिसतात
BK च्या साहित्य जगात
जुळलेले ऋणानुबंध
आदर भाव सर्वांप्रती
कायम राहतील संबंध
*सौ रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: B.k.साहित्याच्या जगात
आधी नव्हते मी
साहित्याच्या जगात
B.k. ग्रुप मुळे आले
मी या विश्वात ।।
एक एक अक्षराच
शब्द एकमेकात गुंफून
शब्दांची करते कविता
मनातलं घेते उतरून ।।
सरस्वती विद्येची देवता
लिहिण्याचं बळ देते आम्हाला
मंगला आई मुळे मिळते
नवीन विषयावर लिहायला ।।
B.k. ग्रुप मध्ये आहे
मोठ-मोठ्या मित्र-मैत्रिणी
देतात कौतुकाची थाप
सर्वांना प्रोत्साहित करूनी ।।
पुनम डहाके ,भंडारा.
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *बी के साहित्य जगात*
बी के साहित्य जग
वाटते स्वप्नासारखे
कधी वाटलं नव्हतं मला
मीही उडेन त्यात फुलपाखरासारखे
काय मज्जा ग्रुप वर
वेगवेगळे विचार
वेगवेगळ्या कविता
जशी वाहते इथे शब्दांची सरिता
अनुभवी कवीही आहे इथे खूप
आम्हाला पण त्यांच्याकडून
शिकायला मिळते खूप
खूप चांगले अनुभव
देताच सगळ्यांना रिप्लाय
शब्द साठ्यांचा होतो भरपूर सप्लाय
बीके ग्रुप ची करावी
तेवढी स्तुती आहे कमी
त्यांच्यामुळेच लिहायला लागलो आम्ही
धन्यवाद बीके ग्रुप
. नंदा भोयर
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के.सा.प.
( ११४)
🌺बी.के.साहित्य जगात🌺
मिळाले व्यासपिठ बी.के चे
व्यासंग ठेवू या जपण्याचा
साहित्याच्या या जगात
ठसा उमटवूया समाजाचा ।।
आवड असेल तर
सवड निघतेच
लिहावे विषयानुरुप
मन मोकळे करावेच ।।
साहित्याच्या जगात
नवनविन शब्दजत्रा
बी.के ही नाहीच मागे
कथा,नाट्याची करु यात्रा ।।
शब्दांचीच असे गुंफण
कधि होई सरळ
कधि बदले चाल
निघे मनाची मरळ।।
कवि असतो स्वच्छंद
असे आपल्याची विश्वात
शब्द शोधतात सत्य
राहू नको रे भ्रमात ।।
जेथे नकाराची घंटा वाजे
तेथे प्रेरणेची ज्योत पेटे
अशी शक्ती साहित्यात
जाणवे शब्दाशब्दाच्या वाटे।।
सलाम माझा साहित्यास
गवसला मला बी.के.सा.परिषदेत
धन्य ते समाजबांधव
मला सामाविले या जगात ।।
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
४|९|२०२०.
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *बी के साहित्य जगात*
बी के साहित्याच्या जगात
वावरताना
खूप मस्त वाटते
बुद्धीला तर माझ्या शब्दांचे
नव नवीन खाद्य भेटते
खूप साऱ्या मैत्रिणी
मिळाल्या इथे मला
दिवसातन एकदा तरी
भेटावसच वाटतं तुम्हाला
ग्रुपच्या माध्यमातून
नाती जुळली छान
लिहायला लागलं की
विसरून जाते देहभान
चुकून सुद्धा वाटलं नव्हतं
एवढे सारे ताई-दादा भेटतील
त्यांच्यात प्रोत्साहनामुळे
कविता माझ्या नटतील
किती किती कौतुक करावे
बीके ग्रुपचे बाई
वेळ कसा निघून जातो
माहीतही पडत नाही
नंदा भोयर
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी. के. साहित्य जगात
लिहीत होते कधी कविता मी
गेले होते विसरूनी
बी. के. ग्रुपने दिले स्मरण करूनी
मग काय, घेतली हाती लेखणी!!
भावना येती मनी दाटुनी
शब्द शब्द येती जुळूनी
देते त्यांना आकार
कवितेच्या रूपात होती साकार!!
कधी ओळख नसलेल्या सख्या
झाल्या आता मैत्रिणी
पदार्थांची तर चांगली च झाली मेजवानी
विविध मोदक खाऊन तृप्त झाले मनी!!
बीके ग्रुप अमुचा भोळा
पण गुण आमच्यात सतराशे सोळा
साहित्यिक, कवयित्री, कुणी व्याख्याता
कुणी जपलाय कलेचा वारसा!!
हितगुज करतो ताई दादांशी
छान अभिप्राय मिळाला की मन होते प्रसन्न
आणखी लिहायला येते स्फुरण !!
रंजना हलमारे (सेलोकर )
साकोली
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: साहित्याचा जगात....
B K. साहित्य सू.दादांनी लावला मळा ll
कविता लीहण्याचा लावला लळा ll
साहित्य संवर्धेनाचे काम चालले जोमात ll
दादा, ताईंचा कवितेने टाकले कोमात ll
उपमा,अलंकार, नऊरसने
बहरली कविता ll
शब्दांची गुंफण घालुन
साकारली कविता ll
नवनवीन विषयाने सजली
कविता ll
भक्तिरस,श्रृंगाररस काव्यरसाने
गाजली कविता ll
कवितेला अभिप्राय मिळता
प्रेरणा मनाला ll
लिहण्याची कल्पकता चालना
बुद्धीला ll
Bk.साहित्याने जगात लावली
गोडी ll
दादा ताईची,लिहण्याची
जमली जोडी ll
कवितेला नवनविन कल्पना
आखणी, शब्दांची खाण ll
Bk.साहित्य संवर्धेनला
जगात मिळतो मान ll
माधुरी देवेंद्र भुते
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी. के. साहित्य जगात
-------------------------------
बी. के.साहित्याच्या दुनियेत
होतो कवितांचा संग्रह
नवनवीन,एकाहूणेक कविता
करण्याचा असतो आग्रह।।
मंच आहे बी. के. चा
घोळका आहे सखीचा
देई कवितेला अभिप्राय सर्वांच्या
मिळे थाप मायेचा।।
घेऊन शब्दांची माळ
बनवितात कवितेचं हार
कवितेच्या माध्यमातून
प्रगट करतात आपले विचार।।
बनविले गृप सुभाष दादांनी
त्यात जीव ओतलं दादा आणि
सखींनी
इथे मिळे कला-गुणांना वाव
माझा सर्वाना खूप धन्यवाद🙏
सौ. संगीता कढव, भंडारा
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: BK च्या साहित्य जगात
कलेच्या प्रांतात
साहित्याची सेवा,
Bk ग्रुप मुळेच
प्रवेश मिळाला या जगात.
हातात असून वही लेखणी
उपयोग नव्हता काही,
होती शब्दांची ओळख
पण उमजत नव्हते काही.
Bk ग्रुपचे व्यासपीठ
मिळाले छान,
नव्या विषय आशयाची
व्यक्त होती भाव भावना.
नवी दिशा विचारांची
कल्पनेची उत्तुंग भरारी,
साद घालिते रोज
Bk ग्रुपची मांदियाळी
शब्दांचीच फुले
शब्दांचीच आरती,
शब्दांची ओंजळ
साहित्या चरणी.
साहित्याचे संवर्धन
घेऊया आन,
थोर साहित्यिक
समाजाची शान.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.04.09.2020
[9/4, 8:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: Il बी के च्या साहित्य जगात ll
बी के च्या साहित्य जगात
झाले माझे पदार्पण
समाज भारतीची जोड त्याला
मिळाले नवीन दर्पण
साहित्याचा गंध कधी
नव्हता माझ्या आयुष्यात
केली लिहिण्यास सुरवात
बी के च्या सहवासात
आंतरिक कला गुनांना संधी
बी के च्या साहित्य जगता मंधी
मैफील जमली सर्वांची
कवी मनाच्या भावनांची
अनोळखिंची ओळख झाली
नवनवीन शब्दरचना कळली
दादा ताईंच्या लेखणीला धार
बी के साहित्य जगताचे आभार
सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं..प
""संस्कारधारा ""(५२)
नाम तुझे गा नारायणा
घेई धाव माझे अंगणा
कुठे धावशी मन माणसा
शरण जावा हरी चरणा.
दशरथ अतकरी, नागपूर
दि.०५/०९/२०२०
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌻पहाटवारा🌻
प्रभात समयी आली
वासुदेवाची स्वारी
करा सडा सारवण
नक्षीदार रांगोळी दारी.
सौ. वीणा द. अतकरी
नागपूर.
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प -- 70 वे
भाद्रपद पितृपक्षात
श्राध्द करतात सारे
पंचपक्वान्नांचा पात्र
पुजून वाहती स्मृतींचे वारे।।
मंगला डहाके, भंडारा
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.६५*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*ओल्या मातीच्या गोळ्याला*
*कुंभार देतो योग्य आकार*
*तसेच विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्व*
*घडण्यास शिक्षकांचा आधार*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹|| *अलगूज* ||🌹
*क्र.६७*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*शिक्षित करण्यास समाजास*
*शिक्षक नेहमी झटत असतो*
*विद्यादान करूनी लोकांस*
*ज्ञानाचा सुगंध चहूकडे पसरवितो*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
घेऊनि ज्ञानाचा वसा
देतो समाजाला दिशा
गुरुजनांच्या महान कार्यास
शतशः नमन आज
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शिक्षक आहे महान
ज्ञानदानाची खान
त्यांना करूया
शतशः प्रणाम
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सौ नंदा अनिल भोयर
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*क्रमांक ५९*
*समाज प्रबोधन*
***************************
अनेक संतानी या भूमिवर
*समाज प्रबोधन* केले
कार्यासच देव मानूनी
आयुष्य आपले अर्पिले
अंधश्रद्धा दूर करण्यास
झटले नरेंद्र दाभोळकर
बुवाबाजी, करणी थोतांड
विज्ञानच गोष्टींचा आधार
स्वच्छता राखा मूलमंत्र
दिला संत गाडगेबाबांनी
वृक्षवल्ली आम्हा सोयरे
सांगितले संत तुकारामांनी
शिक्षणाचा प्रसार केला
जोतिबा अन् सावित्रीबाईंनी
त्यावरच शेण, माती अन्
चिखल फेकले लोकांनी
दिवसरात्र एक करून....
शिक्षणाची महती पटविली
विद्येच्या माहेरघरी मुलींची
पहिली शाळा काढली
सुरू आहे अजूनही....
कार्य समाज प्रबोधनाचे
लोकांची बुरसटलेली...
मानसिकता बदलण्याचे
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वंदू गुरुराया..
लाभताचि गुरु..दिसू लागे वाट
ज्ञानाची पहाट.. होऊनिया
पहाट होऊन.. उजेडाचे दान
अंधाराची मान..चिरली गा
चिरुनी अंधार ..उजळले नभ
हटले मळभ..अज्ञानाचे
मळभ हटून..चकाकली दिशा
जगण्याची आशा..बळावली
बळावली आशा..झालो भाग्यवंत
असा मी श्रीमंत..गुरुराया
वंदू गुरुराया..मायेचे आगर
ज्ञानाचा सागर..गुरुदेवा
- गजानन मते
___________________________
शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय -समाज प्रबोधन*
भारत देशात झाले
मोठं मोठे प्रबोधनकार
परिवर्तन समाजात केले
नाही घेतली माघार
अनिष्ट,रूढी-परंपरा,अंधश्रद्धा,व्यसन
यांचे माजले आहे काहूर
कष्ट घेतले प्रबोधनकारांनी
देशहित जाणून ठेवन्या सर्व दूर
बालविवाह, सतीप्रथा दूर केल्या
राजा राम मोहन रॉय यांनी
आधुनिक भारताचे जनक
स्त्रियांना मान दिला त्यांनी
समर्थ रामदास स्वामींनी सांगितले
स्वधर्म निष्ठा आणि राष्ट्रप्रेम
संत तुकाराम निर्भीड अभंग रचून
दूरकरी समजुती शिकवी वृक्षप्रेम
गाडगे महाराज राबवित
स्वच्छता मोहीम गावोगावी
कर्मकांड सोडावे रंगे कीर्तन
शोधा माणसात देव-देवी
बाबासाहेब आंबेडकर झटले
केले अस्पृश्यता निवारण
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
खंजिरी भजन करी राष्ट्रप्रेम जागरण
सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले
अहोरात्र झटले स्त्री शिक्षणाकरिता
शिक्षित होऊन स्त्रियांनी
ताठ मानेने जगण्याकरिता
प्रबोधनाचे कार्य आजही
अविरत सुरू आहे
स्वरूप बदलले असले तरी
राष्ट्रहित हाच हेतू आहे
*सौ. रुपाली अमोल बोंद्रे ,भंडारा*
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज प्रबोधन
समाज प्रबोधन ही गरज काळाची,
समाजापुढे नित नव्या समस्या येती
स्त्री शिक्षण, हुंडाबळी
आजही सर्वत्र निनादती
आजही नाही येथे
मुलगा-मुलगी समान
मुलाच्या लालसेपोटी
होती गर्भपात
आजही शिक्षणाच्या
वाटा मुलींसाठी बंदच आहेत
समाजप्रबोधन......
वाढत आहे व्यसनधिनता
दारु,वरली,मटका
दारुच्या व्यसनापायी
कुटुंब उध्वस्त होतच आहेत,उध्वस्त कुटुंबात
लहानग्यांचा विचारच नाही
समाजप्रबोधन.......
अर्धवट शिक्षणाने
बेकारी वाढतच आहे
तळ्यात ना मळयात
अशी गत युवकांची
होत आहे
समाज प्रबोधन......
आत्मविश्वासाच्या अभावानेच आत्महत्या
होत आहेत
जीवन अमुल्य आहे
हेच जणू विसरले आहे
समाजप्रबोधन.......
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (१०९)
""समाज प्रबोधन""
थोर हि संतांची भूमी
झाले बहु जणी मुनी
सेवे समाज प्रबोधने
महाराष्ट्र हा शिरोमनी.
स्वराज्यातुन शिवबानं
अभंगातून तुकोबानं
गाडगेबाबा स्वच्छतेनं
किर्तने समाजशिक्षण.
सावित्री महात्मा फुलें नी
स्त्रीशिक्षणातून प्रबोधले
शेतक-यांना हक्क सांगून
साथी रोगाला सेवेत आले.
शेतकरी केल्या कष्टानं
देशाचा पोशिंदा झाला
धान्य भाजीचं पिकवून
टाळेबंदीत नाही थांबला.
गावापासून देशापर्यंत
प्रबोधनले ग्रामगितेनं
तुकड्याच्या खंजेरीनं
केलेत लोकांनी चिंतन.
अनिष्ट रूढी परंपरा
अंधश्रध्दा थोतांडची
प्रबोधनाने जण हो
करा सुटका कायमची.
दनाअ, नागपूर
दि.०५/०९/२०२०
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: लाभले भाग्य आम्हाला
जहालो शिक्षक।
झाले खरचं धन्य बनले शिक्षक।
धर्म,पंथ,जात, वर्ण
न जानती शिक्षक।
विदयार्थी हेच दैवत
मानती शिक्षक।
मायेच्या ममतेने
शिकवीती शिक्षक।
लहानग्यात रमती,
मुलात खेळती
फुलपाखरू होऊनी
उडतीबागडती शिक्षक।
ना करती भेदभाव
मातेसमान जपती बालके
सर्वांच्या मनात घर
करती शिक्षक।
लाभले भाग्य आम्हाला
जहालो शिक्षक।
💐💐सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक स्वागत💐💐
सौ.सरोज मते
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज प्रबोधन--
समाजाला जागृत करण्या
संतांनी केलेले कार्य महान
अंधश्रद्धा समूळ मिटविण्या
केले जगी प्रबोधन छान ।।
वृक्षवल्ली आम्हा सोयरे
संत तुकाराम वदले अभंगातुनी
पर्यावरणाचे महत्त्व दाविले
त्यांच्या गोड वाणी तुनी ।।
तुकडोजी वदले ,मनी नाही
भाव, म्हणे देवा मला पाव
मूर्तीपूजा ,केवळ नाही मार्ग
अंतःकरनी असुद्या श्रद्धाभाव ।।
स्वच्छतेची महती सांगितली
थोर संत गाडगे बाबानी
वास्तवतेचं सुंदर दर्शन
दर्शविले आपल्या कीर्तनातूनी।।
शेण-- गोळे , दगड-धोंडे
सहन करून समाजाचे
सावित्रीबाईंनी शिकविले
स्त्रियांना महत्व शिक्षणाचे ।।
अनिष्ठ रूढी, प्रथा ,परंपरा,
अंधश्रद्धेला आळा घालण्या
गरजेचे ते समाज प्रबोधन
भारतीय संस्कृतीत प्रगत होण्या।।
मंगला डहाके ,भंडारा
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *समाज प्रबोधन*
भारत देश माझा
आहे संतांची भूमी
समाज प्रबोधन करण्या
झटले सारे संत मुनी
गाडगेबाबा तुकडोजी महाराज
यांनी तळागाळातील लोकांपर्यंत
परिवर्तन घडवून आणले
अनिष्ट रूढी प्रथा परंपरांना
हाणून यांनीच पाडले
सावित्रीबाईंनी
स्त्रियांकरता उघडले शिक्षणाचे दार
समाजात बदल घडविण्या करता
खाल्ला शेणाचा मार
कितीतरी थोर व्यक्ती
झटले आपल्याकरता
एकच मंत्र देऊन गेले
शिक्षित करा सर्व जनता
नंदा भोयर
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजप्रबोधन
समाजप्रबोधन गरज ही काळाची
चांगलेवाईट घडती जगात
त्यातुन परावृत्त करण्याची
समाजप्रबोधन म्हणजे
योग्य दिशा दाखविण्याची..,.,.
झाले थोर संतविभुती
अपुल्या भारत देशात
परिवर्तन आणले घडवुन
मानवा मानवा मनात
गाडगेबाबा गेले शिकवुन
मंत्र अपुला स्वच्छतेचा
रोगराई दुर करण्याचा भुकतहान गरीबांची जाणण्याचा,.....
झटले ज्योतिबा अन् सावित्रीबाई फुले.स्त्रियांच्या शिक्षणहक्काकरीता
शिक्षित करुन स्त्रियांना
स्वाभिमानाने जगण्याकरिता....,
सौसुषमा पडोळे भंडारा
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज प्रबोधन
थोर संतांनी केले प्रबोधन
अनिष्ट रूढींना आळा घालण्या
अंधश्रद्धा, जुन्या प्रथा
परंपरांना समाजातून काढण्या ।।
स्त्री पुरुष समानच
तुकडोजींची शिकवण
जात-पात अन्याय
नष्ट करूया आपण ।।
संत तुकाराम सांगतात
ज्याचे मन मोठे फार
त्याला यातना अतोनात
येई अडचणी अपार ।।
गोपाळ हरी देशमुख
होते फार प्रामाणिक
प्राणीमात्रांवर दया करा,करु
नका भ्रष्टाचार व फसवणूक ।।
होऊनी गेले भारतात
खूप समाज प्रबोधनकार
त्यांच्या शिकवणीमुळे मिळतो
आपल्या जीवनाला आकार ।।
पुनम डहाके, भंडारा.
[9/5, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ---समाज प्रबोधन---
महाराष्ट्र भूमी संतांची
धडे दिले प्रबोधनाची
कीर्तन अभंग पोवड्यानं
प्रबोधन कार्य शहीरांची.
सावित्री ज्योतिबांनी स्त्री
शिक्षणाचा रचला पाया
गावोगावी शिक्षण घेऊन
साक्षर झाल्या आयाबाया.
गाडगेबाबा तुकडोजीनी
दिली स्वच्छतेची शिकवण
सावता, तुकाराम सांगती
निसर्गाचे करा रे संगोपन.
अनिष्ट बुरसटले विचार
ऐकून प्रबोधने घालवा
वाट उज्ज्वल भविष्याची
माणसा माणसात जागवा.
सौ. वीणा द. अतकरी.
नागपूर.
दि.०५/०९/२०२०
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.६०
पूर्वक्षितीजी प्रभा पसरली
नभात कुमकुम लाली चढली
प्रकाशाचे गीत गाऊ या
काळोखाची भिती नुरली.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌻पहाटवारा🌻
मल्हार मल्हार
जेजुरी गडावर
बानूची भक्ती थोर
देव झाले धनगर
सौ वीणा द. अतकरी
नागपूर.
दि.०६/०९/२०२०
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि. के.सा.सं.प.
""संस्कारधारा ""(५३)
मंदिर दिसते सुने सुने
दुरुन पाहता वाटे उणे
भितीने देवाला कोंडले
वृध्द विरंगुळ्या मुकले.
दनाअ, नागपूर
दि.०६/०९/२०२०
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प-- 71 वे
रजनीनाथासवे, निशा सरता
उषाच्या पदरात सोनेरी किरणे
घाईत लागले कामाला बळीराजा
वाट तुडवीत शेतात धरणे ।।
मंगला डहाके, भंडारा
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रविवार दिवस आज
रवी कीरण झळकली खास
मना लागली आस
घेतला कविता लिहिण्याचा ध्यास
नंदा भोयर
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
सोनेरी किरण पडता दारी
पाने फुले बहरली
जाई जुईच्या सुगंधाने
मन प्रफुल्लित होऊनी
मोहरली.
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नवी पहाट, नवीन आशा,
उजाडल्या दाही दिशा,
झेप घेउनी आकाशा,
करू स्वप्न पूर्तीची आकांक्षा।।
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🙏शुभ प्रभात🙏
सौ. संगीता कढव, भंडारा
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.६६*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*रोज नवी पहाट*
*घेऊन नवीन चैतन्य*
*नको राहू उदास माणसा*
*कष्ट सर्व श्रेष्ठ कर मान्य*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चल ना प्रिये
चल ना प्रिये चांदण्यात, घेऊन हात हाती
छळतात ग मला,अशा सा-या चांदराती
एकटा मी...एकांत,छळतो, पेटवून वाती
याद येता तुझी उगीच धडधडे छाती
नको झाकू अशी, स्मृतींच्या पडद्याआडूनी
ये अशी सामोरी,पूर्ण प्रीतीत माखुनी
बंध सारे तोडून, ये पूर्ण विश्वासाने
चंद्रही अधीर ऐकण्या,तुझे माझे प्रीत गाणे
विनोद तीरमारे
९४२२९१५७८६
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 💫💫💫💫💫💫💫💫
*क्रमांक ६०*
*द्रोणकाव्य*
*विषय:- श्रावणधारा"*
श्रावण महिन्यात
गंमतच भारी
हिरवळीत
बरसती
उन्हात
सरी
हो
फुलपाखरू उडे
पाना फुलांवर
माणिक पडे
तृणांवर
आवडे
मज
हे
वसुंधरा दिसते
नववधुपरी
रूप सजते
गालातच
लाजते
धरा
ही
इंद्रधनू गगनी
सुशोभित दिसे
मुग्ध धरणी
प्रफुल्लीत
होऊनी
बघे
हो
येता *श्रावणधारा*
फुले पाने चिंब
उनाड वारा
शिळ घाली
शहारा
अंगी
गं
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: विषय-- मैत्रीचं नातं
मैत्रीच्या नात्यात
असतो गोड भाव
पारदर्शीपणा ला जोड
अत्यानंद हेच नाव ।।
स्वच्छ आणि निखळ भाव
असतो मैत्रीच्या नात्यात
जात-पात, भेद न बघता
प्रेमाने हात हाती घेतात ।।
मनातील प्रेम, हास्य
आनंदाचे सुवर्ण क्षण
निस्वार्थ नातं जपून
त्या सुखावतात अंतःकरण।।
गळ्यात गळे घालून
मोर पिसारा फुलवतात
आभाळी गवसणी घालून
आनंदच अनुभवतात ।।
-----------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अभंग*
*विषय -माझा गणराया*
माझा गणराया l नमितो तुझिया l
तूच गुरुराया l गौरीपुत्रा l
प्रथम वंदिते l बुद्धीची देवता l
जगाचा पालक l गजवक्रा ll
तू श्री लम्बोदर l तूचि एकदंत l
माझा दंडवत l विनायका ll
भक्तांचा कैवारी l आहे सुखकर्ता l
तूच विघ्नहर्ता l कृपासिंधू ll
कंठी असे माळ l शोभते सुंदर l
भक्तांचा उद्धार l सदा करी ll
विश्वाचे संकट l व्हावे दूर देवा l
तुझा हस्त ठेवा l आम्हावरी ll
*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *तुझ्या प्रेमात दंग*
झाले सख्या मी
तुझ्या प्रेमात दंग
जिकडे तिकडे वाटे
मज तुझाच गंध ।।
वाऱ्याची झुळूक येईल
तुझा स्पर्श घेऊनी
मन आनंदी होईल
तुझ्या रंगात रंगुनी ।।
तुझ्या सोबत असण्याने
दुःख जातात विसरुनी
तुझ्या दूर जाण्याने
विरहात जाते तळमळूनी ।।
तुझ्या ते गोड हसण्याने
मन होई प्रफुल्लित
जीवन जगण्यात व्हावे
मी अति आनंदित ।।
----------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: * सर*
' सर' शब्दात अर्थ जाहला
सर तुम्हीच माझा मार्ग दाविला
स - सत र - रस्ता
खात होतो जेव्हा मी खस्ता!
तुम्हा मुळेच आरूढ या पदावर
वरदहस्त तुमचा सदा शिरावर
तुम्हीच सर आमची प्रेरणा
काय द्यावी तुम्हा दक्षिणा?
संस्कार तुमचे कणाकणात
शिकवणे तुमची आचरणात
समाज- सेवेचा दिला तुम्ही संदेश
ध्यानी ठेवीन सदैव तुमचा उपदेश
स्वच्छतेचे पाजिले बाळकडू
ग्रामसफाई करू हाती धरून झाडू!
आदर्श अपूले गांधी महात्मा
निर्मळ, प्रेमळ सर तुमचा आत्मा!
दिन तुमचा 5 सप्टेंबर
आठवते तुमची मूर्ती निरंतर
संकटकाळी वाटे तुमचाच आधार
वार्धक्य तुमचे सर जावो सुकर
हीचकरिते प्रार्थना जोडूनी दोन्ही कर!!
( कालच्या शिक्षक दिनानिमित्त)
रंजना हलमारे (सेलोकर )
साकोली
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वरचित आवडीची कविता
मोबाईल
मोबाईल असे कामाचा नि मोलाचा
उपयोगात वेळ घालवायचा
मोबाईल वाचवी श्रम नि वेळ
दुरजवळ अंतराचा घाली मेळ.....
खुशीच्या सरी दुःखदायी लहरी
सर्व तो झेली वरचेवरी
दुरचे जवळ बाहेरचे आत
सर्वाचा जवळीक तो आपुल्या परी.....
मोबाईल गुणी आहे तो ज्ञानी
ऐकत राहावे वाटेमधुर त्याची वाणी
सांगे आम्हा तो सुंदर म्हणा गाणी
मोबाईल असे निरंतर ध्यानी मनी.....
छंद जडला मोबाईलचा बीकेसंवर्धन गृपपायी
मन आवरता आवरेना हो दादाताई
पती म्हणतात मोबाईल तुझं सर्वस्व बाई
वेडी झालीय काय गं?ह्या मोबाईलपायी.....
सौ.सुषमा पडोळे
भंडारा
कधीपासुन लागलाय तुला मोबाईलचा छंद
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *मैत्री*
मैत्रिणी माझ्या आहेत
खूप छान
ऑनलाईन कविता सादरीकरणचा मीळतो सन्मान पत्रांचा मान
सहवासात त्यांच्या
असते मी खुश
दिवसभर गप्पा
हृदयात माझ्या त्यांच्याकरता रिकामा एक कप्पा
मनमोकळं रडणं
मनमोकळं हसणं
मन होऊन जात हलक
दिलखुलास जगणं
वेळ कसा जातो
माहीतच पडत नाही
विचार करायला सुद्धा
वेळ मिळत नाही
सौ नंदा भोयर
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अबोला
अबोला,अबोला अबोला
महिन्यातून एकदा तरी होतो अबोला....
असं कसं नातं आपलं
तुझं माझं जमेना
तुझावाचून करमेना
अबोला अबोला अबोला......
शरीराने दोघे वेगळे
पण मन मात्र एक
असं कसं रे मन आपलं
अबोला,अबोला अबोला......
कधी नात्यामुळे तर कधी मुलानं मुळे
कधी तुला किंवा मला राग येतो
अबोला,अबोला,अबोला....
तुला किंवा मला दुःखले,लागले
वेदना मात्र एक
असं कश्या रे वेदना आपल्या
अबोला,अबोला अबोला.....
अबोल असलास की
तुझा चेहरा मरगडल्या वाणी
असं कसं रे नातं आपलं
अबोला, अबोला अबोला....
बाहेर गावी असताना
अबोला असला की
असं वाटते की या जगात माझं कुणीच नाही? असं कसं रे नातं
अबोला अबोला अबोला....
रात्री झोपताना इकडची कडतिकडे,तिकडची कड इकडे
पण झोप काही लागत नाही..
असं कसं रे नातं आपलं
अबोला, अबोला ,अबोला
महिन्यातून एकदा तरी होतो अबोला...
माधुरी भुते
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रमणीय सायंकाळ
****************
रमणीय अशी सायंकाळ
बेल्यात राहायला आल्यापासून
नव्हती पाहिली मी कधी
मिरग पांडसं हरणं जवळून
दरदिवशीचे सोबती
झाडी मधून डोकावती
हळूहळू दिवस जाई
स्वछंद विहार गवतावरती
पाठीमागे कुत्रे लागती
इकडून तिकडे उड्या मारी
कधी धावती जवळून
कधी होती पाठमोरी
दिसती ना एक दिवस
नजर शोधण्या भिरभिरती
सायंकाळच्या फिरण्यावर
मज वाटे जणू पाबंदी
मोबाईल मध्ये करी कैद
आगळा वेगळा मिळे आनंद
फिरनारे सर्व सान थोर
पाहूनि थकवा करी दूर
सौ रेणुका झंझाड भंडारा (बेला)
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आवडती कविता*
सांजवात
---------------------
सूर्य मावळता,
पक्षी येती घरट्यात,
वंदन करुनी देवाला,
करिते सांजवात।।
करुनी सांजवात,
मन होई प्रसान्नित,
अगरबत्ती, धूप च्या सुगंधाने,
घर होई प्रफुल्लित।।
लाभोनी सुख-शांती,
सर्वांचे आयुष्यात,
हीच माझी प्रार्थना,
जोडुनी दोन्ही हात🙏
सौ. संगीता कढव, भंडारा
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडती कविता
धुंद धुंद बहरली
रात्र चांदण्याची
घेता हात हाती
डोळ्यात स्वप्ने जागली
चमचमत्या चांदण्यांना
प्रकाश जरी स्वतःचा
काळोखास भेदतो
शीतल प्रकाश पौर्णिमेचा
चकोरास भूल पडली
चंद्र चांदण्यात न्हाहण्याची
स्वप्नात मी ही रंगली
विसरून भान या जगाची
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.06.09.2020
[9/6, 6:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज प्रभोधन
समाजाच्या अघोरी प्रथा
करण्या दूर,
संत, सुधारक, प्रभोधनकार
झटले खूप.
शिक्षण हेच शस्त्र
जाणिले ज्यांनी,
अज्ञान, अंधकार दूर करण्या
पुढे आले ते ज्ञानी.
खाऊन शेणा मातीचा मार,
मुलींसाठी शिक्षणाचे उघडले दार.
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी,
झटले सावित्री अन ज्योती.
अंधश्रद्धा, स्वच्छतेचा देण्या संदेश,
गाडगेबाबांनी कृती कीर्तनातून
दिला उपदेश.
तुकोबा,तुकड्या,आंबेडकर
दीन दलितांच्या उद्धारासाठी,
करीती ज्ञानाचा जागर.
काल आणि आज आहे गरज
नरेंद्र,श्याम मानव,सारख्या सुधारकांची,
गाथा,ग्रामगीता,ग्रंथ साहित्य
शास्त्रीयदृष्ट्या अवलोकनाची.
हुंडाबळी,अंधश्रध्दा,व्यसनादी ची जागृती,
सुरुवात करू घरापासूनी.
सुदृढ समाजाची उभारणी
हीच खरी राष्ट्राची संपत्ती.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.06.09.2020
काल वेळेत कविता पाठवू शकली नाही तरी क्षमस्व.
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र५१
रवि किरणांची आरास
नभी मंडपी खास
नमन माझे दिनकरास
दाटू दे जगी उल्हास.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (५३)
सर्वाधिकारानं बेभान नका सुटू
नका गरिबांना पायदळी तुडवू
रोजंदारी तया साधन जगण्याचा
जिवनातुन दिनांना नका उठवू.
दनाअ, नागपूर
दि.०७/०९/२०२०
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌻पहाटवारा🌻
हर हर महादेव म्हणता
दुःख पळून जाती दूर
करोणा व्हायरस कधी जाणार
मनी लागली हूर हूर.
सौ.वीणा द. अतकरी
....नागपूर.
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प -- 72 वे
पिवळ्या सोनेरी छटेत
लावण्यवती प्रभात आली
अलवार अवनी लाजून
माणिक मोती शृंगाराने नटली।।
--------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रात्रीचा अंधार सारूणी
नवी पहाट आली
नवी स्वप्न घेऊनी
प्रसन्न सकाळ झाली
सुप्रभात.
. नंदा भोयर
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
शुभ सोमवार
भोळ्या शंकराचा वार
बेल फुल वाहुनी
कर्पूर आरती सह
जप ओम नमः शिवाय
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.६७*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
अडवा, जिरवा, सांभाळा मला
मी एक थेंब पाण्याचा
नका वाया घालवू मला
मीच आधार तुमच्या जीवनाचा
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*उखाणे*
***** *********************
१) आयुष्यातील प्रत्येक काम
करते मी एकाग्र चित्ताने
*दयानंदरावांसोबत* संसार
करते मी *सुखाने*
२) *सुख* म्हणजे काय
शोधत बसले मी
*दयानंदरावांच्या* साथीने
संसारात नाही कसली कमी
३) *सुख* कधीच
मिळत नाही बाजारात
*दयानंदरावांचं* नाव
कोरलंय माझ्या हृदयात
४) *सुखात* लाभते
सर्वांचीच साथ
*दयानंदराव* दिवा
मी त्यांची वात
५) हिरवा शालू त्यावर लाल काठ
*दयानंदराव* नेहमी मला ठेवतात *सुखात*
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 💐 उखाणे💐
01) आयुष्याच्या वेलीवरती पुजा,स्वप्नील
नावाची फुले छान
गणेशरावांच्या जीवनात
नाही सुखाला वान।
🌾🌾🌾🌾🌾🌾
02)आयुष्याच्या वाटेवर
आहेत अनेक सुखदुःखाचे पाडाव,गणेशरावांचे नाव
घेते पहाटेचे गोडवे गात.
🌾🌾🌾🌾🌾🌾
03)श्रावणमासी हर्ष मानसी सुखसमृद्धी चोहीकडे, गणेशरावांचे नाव घेते कान करा इकडे.
🌾🌾🌾🌾🌾🌾
4)संसाराच्या सागरात
सुखदुःखाच्या लाटा,
गणेशरावांच्या जीवनात
माझा अर्धा वाटा.
🌾🌾🌾🌾🌾🌾
5)शरदाच्या चांदण्यात
मंदमंद वाही वारा
गणेशरावांच्या संगतीने
सुखात वेळ जाई सारा.
🌾🌾🌾🌾🌾🌾6) थंडीच्या दिवसात धुकं
पडल दाट गणेशरावांच्या
संगतीने सुखात चालते वाट.
🌾🌾🌾🌾🌾🌾
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.केसा.सं.प. (१११)
विषय.. उखाणे पाच
"" सुख ""
(०१)
सौ.विणाचे येण्याने
सुख मला मिळाले
संसाराचे वेलीवर
बघा, झाली दोन मुले.
(०२)
विणानं संस्कारे
मुलांना घडविले
धडेच शिक्षणाचे
सुखाला प्रसवले.
(०३)
विणा लग्नानंतर
झाली पदविधर
जाणीवेचे सुख
देते आयुष्यभर.
(०४)
घरात सुखाला
विणाची कमाल
आरोग्य लाभलं
स्वच्छता धमाल.
(०५)
शेगांवची वारी
विणासह केली
नामाचे सुखाने
मन भारावली.
दनाअ, नागपूर
दि.०७/०९/२०२०
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
उपक्रम..उखाणे पाच
"" सुख""
(०१)
देवात देव शंकर महादेव
दशरथजीना सुखात ठेव.
(०२)
सूर्याचं किरण धरतीवर पडले
रावांच्या पायी सुख दारी आले.
(०३)
मोग-याचा सुगंध दरवळतं अंगणी
दशरथजी सह सुखी मी जीवनी.
(०४)
मुक्ताईच्या रुपात सुख आले घरी
दशरथरावांनी उचलले खांद्यावरी.
(०५/
बी. के. म्हणजे शब्दाची खाण
काव्यलेखने मिळत सुख महान.
सौ.विणा द.अतकरी, नागपूर
दि.०७/०९/२०२०
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌷उखाणे (स्वयंरचित)🌷
*********************
1) दागिन्यांत दागिना सोन्याची
सुधाकर रावांच्या सोबतीने
चाहूल लागली सुखाची☺️
2) प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे
प्रेमाचा करते साठा
सुधाकर रावांच्या सुख दुःखात
अर्धा माझा वाटा👍🏻
3)लग्न मंडपी वाजे, सनई चौघडा
सुधाकर रावांसोबत चालविते
सुखाने संसाराचा गाडा🤗
4)हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृनाच्या मखमली चे
सुधाकर रावांच्या सहवासात
क्षण जावो सुखाचे❤️
5)अंधाऱ्या रातीत, लखलखतो
तारा
सुधाकर रावांच्या सहवासाने
मिळे सुखाचा आनंदित वारा😎
6)मंदिरात तेवतो, अविरत दिवा
आमच्या सुखी संसाराचा
सर्वांनाच वाटतो हेवा😛
(शेवटचं आणि माझं आवडतं उखाणा)
7) आम्ही दोघे आणि आमचं एक
असा आमचा छोटसं परिवार
ओढून सुखाची चादर
रावांसोबत करते सुखी संसार
😍♥️❣️🥰❣️♥️😍
सौ. संगीता सु.कढव, भंडारा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाच उखाणे
१)शुन्यअधिक एक बरोबर एक
सुखरामजी देतात सुख
आहेत ते नेक.
२)एक अधिक एक होतात दोन
सुखरामजींच्या नावातच आहे सुख
त्यांच्या विहिणीचा आलाय फोन
३)एकआणिक दोनमिळुन
होतात तीन
सुखरामजींच मिळतय सर्वांना सुख
सुखरामजींच नाव घेताच
हरवली विहिणबाईंची चांदीची पीन,
)
४)दोन आणखी दोन
होतात चार
गावी जाण्यासाठी असतो
त्यांचा शनिवार
त्यात त्यांच सुखसमाधान
दोन आणि तीन मिळुन होतात पाच
सुखरामजींच नाव घेते
सुंदर करतात ते नाच.त्यातुन सर्वाना देतात ते सुख,
सौ,सुषमा पडोळे भंडारा
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *उखाणे*
नीलवर्णीय नभातून,
मोत्यांच्या धारा बरसल्या
झिंगर रावांच्या सुखातच
जीवनाच्या वाटा गवसल्या ।।1
इंद्रधनू हे सप्तरंगी
भासते डौल कमान
झिंगर रावांचे आयुष्य
माझ्या सुखाचे प्रमाण ।।2
क्षितिजापर्यंत पोहोचण्या
असती नागमोडी वाटा
झिंगर रावांच्या जिवनी
सुखाचा नसे तोटा ।।3
सोनपावलांनी धरतीवर
चैतन्याची पहाट झाली
झिंगर रावांच्या हसण्यातच
सुख चंद्रमा गाली ल्याली ।।4
पाचू , माणिक, मोत्यांनी
वसु नवयौवना ही सजली
झिंगर रावांच्या सुखासाठी
मी अलंकारात नटली ।।5
मंगला डहाके, भंडारा
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उखाणे
********
तुळशीराम माझे पिता
यमुना माझी माऊली
आयुष्याच्या सुखदुःखात
भगवानरावांची सावली
कोरोनाच्या काळात
कमी झाले प्रदूषण
भगवानरावांच्या सुखासाठी
माझे श्रावणात उपोषण
पुरामध्ये होतं नव्हतं
सगळं गेलं वाहून
बहिणीच्या सुखासाठी
भगवानराव गेले धावून
सुखाच्या शोधा करीता
करावे लागते कष्ट
भगवानराव असोत तंदुरुस्त
देवा तुझेच वरदहस्त
मैत्रिनिंच्या सहवासात
जीव सुखावून गेला
भगवानराव सोबतीला
मग काय कमी मला
दुःखाच्या सागरात
एक कप्पा सुखाचा
भगवानरावांच्या संसारात
रममाण जीव माझा
सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *उखाणे ...विशेष शब्द सुख*
🌺१....
ऊन-पावसाचा खेळ
श्रावणात रंगे छान
अमोलरावांमुळे जीवनात
सुखाची सप्तरंगी कमान
🌺२.
छत्रपती शिवाजी महाराजाच्या
स्वराज्यात आहेत सर्व सुखी
अमोलराव रायगडला नेतात
महाराजांचे नाव सदा मुखी
🌺३....
बागेतील मोगर्याचा
सुवास सर्वत्र दरवळतो
अमोल रुपाली मिळून
सुखी संसाराची गाणी गातो
🌺४...
अमोल रावांना कळला
सुखी जीवनाचा मंत्र
मी करते बडबड
ते बसतात शांत
🌺५...
सुखी संसार रुपी गाडीचे
नवरा बायको दोन चाक
गोड पदार्थात अमोलला
आवडतो जास्त मैसुरपाक
*✍सौ. रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उखाणे सुखाचे
बीके ग्रुप मुळे मिळते
सुख आणि समाधान
अनिल रावांसोबत करते
विचारांचे आदान-प्रदान
उपवास असला की
लागते मला भूक
अनिल रावां मुळे
मिळाले जीवनात सुख
हाती घेते लेखणी
लीहीते मी कविता
अनिल रावण सोबत
वाहाते सुखाची सरिता
संसाराच्या वेलीवर
मुले दोन छान
त्यांच्या येण्याने मिळाले
जीवनात सुख महान
कुंकू लावते ठसठशीत
हळद लावते किंचित
अनिल राव माझे
सुखाचे वंचित
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उपक्रम उखाणे 5
"सुख"
1.प्रेम,विश्वास,समाधान
सुखी जीवनाचे सूत्र,
सोपानरावांनी माझ्यासाठी
घडवले सोन्याचे मंगळसूत्र.
2.सुख म्हणजे सुख म्हणजे
सुख नक्की काय असत,
मी रुसली असतांना
सोपानरावांनी माझ्यासाठी आणलेलं
कॅडबरी चॉकलेट असत.
3.सुमधुर संगीताला
सुरांचा गोडवा,
सोपानराव सोबत असतांना
मिळतो सुखाचा गारवा.
4.झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे
गोड गोड पाणी,
सोपानरावांनसोबत गाते
मी सुखाची गाणी.
5. 25 वर्षाच्या संसारात
नाही कशाची कमी,
सोपानरावसारखे निर्व्यसनी पती मिळाले
मी सुखाची धनी.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.07.09.2020
[9/7, 5:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उखाणे
1-- बरसत्या जलधारांनी
भिजल्या वृक्षवेली
पंकज रावांच्या सुखात
मी प्रेमात न्हाली ।।
2--विशाल सागरात
सुख दुःखाच्या लाटा
पंकजराव म्हणाले इडली केली
आधी चटणी वाटा ।।
3-- ना कोणी मोठा
ना कोणी लहान
पंकज राव म्हणतात सुखी रहा
या माहामारीत ही छान।।
4-- चहाचा कप
आधाराला बशी
पंकज रावांनी दिल्या
पदरी सुखाच्या राशी ।।
5-- सुख म्हणजे काय
कळलं का हो तुम्हाला
पंकज रावांची साथ
थोर भाग्य लाभल मला ।।
पुनम डहाके, भंडारा
[9/7, 5:15 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उखाणे
----------------------------------------
१) पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
श्रीकांतरावांचे नाव घेऊन
आशिर्वाद मी मागते....
२)चांदीच्या वाटीत साखरेच खडे
श्रीकांतरावांचे नाव घेते देवापुढे
३)गावठी गुलाबाला सुगंध सुवास
श्रीकांतरावांना भरवते मी
श्रीखंडपुरीचा घास.....
४)हळद असते पिवळी
कुकू असते लाल
श्रीकांतरावांची मिळाली
मला साथ जीवन
झाले खूशहाल....
५)सूर हवा ताल हवा
ताल हवा सूर हवा
श्रीकांतरावाचे नाव
घ्यायला वेळ कशाला
हवा....
----------------------------------------सौ. शितल श्रीकांत ठवकर.
(तुमसर रोड, देव्हाडी, तुमसर).
----------------------------------------
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन
क्र ६३
काजव्यांचा प्रकाश
काळोखाची रात्र
जिवनात सारथी
सुसंगती मात्र.
सौ.मीरा शेबे भंडारा
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा ""(५४)
खसखस लागता घशात घ्या
कोमट पाण्यात लिंबू पिळून
नाकापासुन ते फुफुसापर्यंत
श्वासोच्छवास होईल छान.
दनाअ, नागपूर
दि.०८/०९/२०२०
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌻पहाटवारा🌻
तुळस फुलली अंगणी
तिला घालते प्रदक्षिणा
सुख समृध्दी दे जीवनी
अशी करते प्रार्थना.
सौ. वीणा द. अतकरी
..नागपूर..
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.६८*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
विज्ञानाच्या मदतीने
मानवाने लावले वेगवेगळे शोध
परिवर्तन काळाची गरज
मानव स्वीकारत नाही बिनविरोध
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प -- 73 वे
विद्यादाना सारखे
जगी कोणते काम नाही
समाज पात्र होण्या
संस्कारसम शिदोरी नाही ।।
---------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बरसल्या सरी
आनंदली वृक्षवेली
पक्षांची किलबिल सुरू झाली
उठा उठा सकाळ झाली
नंदा भोयर
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
सडासंमार्जन रांगोळी दारी
भक्तीगीताची सुरेल गाणी
प्रसन्न हसरी पहाट झाली
सुप्रभात वंदन सर्व मैत्रिणी
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
क्रमांक ६१
*बापाचं हृदय*
**************
*बापाचं हृदय* कधीच
कळले नाही कुणाला
फाटकी चप्पल पायात
नवे बूट दिले पोराला
जमविला एकेक पैसा
काटकसरीने संसारात
पोराला शिकायला मात्र
पाठविले मोठय़ा कॉलेजात
एकच शर्ट घातला
कित्येक वर्षापासून
लेकीला बाहुली मात्र
घेऊन दिली मनापासून
सासुरा निघाली मुलगी
रडला बाप मनातच
अश्रू पुसून डोळ्यातील
लेकीपुढे आला हसतच
पोटच्या गोळ्यासाठी....
घर बांधले मोठ्या कष्टाने
म्हातारा झाल्यावर बापास
वृद्धाश्रमात पाठविले पोराने
बापाच हृदय कुणाला.....
कधीच कळलं नाही.....
कितीही वेदना झाल्या पण
कधीच तो खचला नाही
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बिग.के.सा.सं.प.
कविता. (११२)
""बापाचं ह्रदय""
बाप हा कुटुंबाचा
आधारवड असतो
मोठे मोठे झंझावात
धैर्याने सांभाळतो.
सुखाच्या क्षणाला
कधी नाही उधाण
दुःखात धिरगंभीर
वैचारीकेनं संधाण.
ह्रदय बापाचा
आहे महासागर
माय गाळतेअश्रृ
बाप करी जागर.
लेक ती लग्नाला
हात पिवळे करा
सासरी धाडतांना
पाझरे ह्रदय झरा.
लेकीला घ्यायला
दमणीला जुपावं
सुखाला मुलीला
चार दिवस ठेवावं.
कुटुंबाच्या सुखाला
तिलांजली स्वत:ला
फणफण तापातही
जातो ना कामाला.
बापाच्या ह्रदयाचा
ठाव कोण रे घेतो
थांग त्याचे मनाचा
कोणा शोधा वाटतो.
दनाअ, नागपूर
दि.०८/०९/२०२०
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बापाचे ह्रदय
बापाचे ह्रदय असते कठोर
पण मनातून कोमल।
जसे नारळातील पाणी,
फणसातील गरे।
घेत असते ठाव
मुलांच्या मनाचा,
दाखवत असला जरी
मुलांचे उणे।
त्याचेही मन झुरत असते
मुलांच्या भल्यासाठी।
वरपांगी कठोर दिसणारा बाप मनातून आसुसलेलाअसतो
,मुलांच्या आर्त हाकेसाठी
दिवसभर राबराब राबतो,
संध्याकाळी घरीआल्यावर मुलांना शोधतो।
त्यालाही गरज आहे
दोन प्रेमाच्या शब्दांची,
मुलांच्या आपलेपणाची।
पाषाणह्रदयी वाटनारा बाप पाषाण नसतो मुळी
मुलीला सासरी पाठवतान
सर्वांच्या नकळत रडतो
पण चेहऱ्यावर हास्य ठेवतो।
काळजाच्या तुकडयाला
शोधत घरभर फिरतो।
उन्हापावसाच्या आघाताने
सरसावलेला बाप
मुलांच्या सुखासाठी
वाटेल ते करतो।
त्यांच्यातच आपले
सुख शोधतो,
हरवलेल बालपण शोधतो।
उतारवयाचा आधार शोधतो।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ❤️बापाचं हृदय❤️
-----------------
बापाचं हृदय,
नारळ जसे,
वरून कडक,
आतून नरम तसे।
बापाचं रागावणं,
वाटे कडू कारले,
पण त्यांच्या रागवण्याने,
आयुष्य सफल झाले।।
संस्कार रुपी मोती देऊन,
देई जीवनी आकार,
मी आहे ना पाठीशी,
म्हणुनी देई भक्कम आधार।
बाप आहे म्हणून,
वाटते हिम्मत फार,
जसं भाकरीला,
तव्याचा आधार।।
बापाची माया, मुलाला समजत नाही,
बापाचं काळीज काय असते,
ते स्वतः बाप झाल्याशिवाय,
उमजत नाही।।
बापाची सर ,
कुणालाच नाही,
म्हणूनच म्हणतात ना,
आई-बापा शिवाय दुसरे दैवत नाही।।🙏🙏
सौ. संगीता कढव, भंडारा
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बापाचं हृदय
वरुता फणसा काटे
आत रसाळ गरे
बापाचं हृदय जाणा
फणसा सम खरे.
श्रीफळ दिसतो कठीण
आत निर्मळ जीवन
बापाचं वागणं कठोर
आत पाझरते मन.
येऊ देत भयान संकटे
तोंड देण्यास बाप एकटे
छत्रछाया शिरावर धरी
सोसे उन्हाचे चटके.
काटे रक्षती गुलाबास
बाप राखतो घरकुलास.
ऊन वारा पाणी पाऊस
तमा नच याची तयास.
बापाचं हृदय थोर
जसंअथांग सागर
धावती लाटांवर लाटा
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बापाच्या हृदय❤️
बापाच्या हृदय हे बापाचं असते!
त्याला नसते कुणाची सर,
त्याची करावी कदर !!
बापाचे ह्रदय म्हणजे नारळाचे खोबर!
आत गोड मऊ वरून कठोर!
बापाचं हृदय म्हणजे फणसाचा गर!
वरून काटेरीआत मऊ सर !
बाप म्हणजे सूर्य तेजस्वी ओजस्वी प्रखर!
त्याविना न चाले जीवन चक्र!
बापाच काळीज वसुदेव पुत्रमोह अपार !
दुथडी भरली यमुना केली पार !
बापाचं काळीजम्हणजे दशरथ पुत्रविरहाने सोडीला प्राण!
बापाचं काळीज गहिवरते!
लेक जाताना सासरी लपून अश्रू ढाळते !
बाप फाटकेच कपडे फाटके चपला घालून मिरवते! पुत्राच्याभविष्यासाठी पै पैजोड ते! म्हातारपणी मात्र पुत्र वृद्धाश्रमात धाडते !!
रंजना हलमारे( सेलोकर)
साकोली
ते
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा .सं.प.
""बापाचं हृदय""
कष्टाळू बाप माझा
चाकरी करी दिनरात
काळजी संसाराची
सुख नाही जीवनात.
बापाच्या हृदयाचा ठाव
कुणा समजेल कसा
न घेतयं कुणी वसा
मासा पाण्यातला जसा.
बापाला थकल्यावर
तुम्ही बना रे आधार
द्या जिवंतपणी आदर
नका करू रे अनादर.
बापाच्या ह्रुदयात
मुलगी राहते प्रत्येक
ती राहावी सुखात
स्वप्न साकारी अनेक.
सासरी जेव्हा निघाले
बापाचे नेत्र पाणावले
बाबा मी आहे सुखात
ऐकूनचं मला निरोप दिले.
सौ.वीणा द. अतकरी
नागपूर
दि.०८/०९/२०२०
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *बाबाच हृदय*
आईच मन समजू
शकतो आपण
पण बाबांच हृदय
समजू का आपण ।।
बाबा रात्रंदिवस काम
करून पैसे जमवतो
मुलांना कमी नको
म्हणून सर्व काही करतो ।।
बाबा नेहमी असतो
फार स्वाभिमानी
आपल्या मुलांचे शिक्षण
करतो तो कष्ट घेऊनी ।।
बाबा दुःख लपवून
हसत राहतो नेहमी
घरात कसलीही
होऊ देत नाही कमी ।।
बाबा जवळ हट्ट करून
सर्व काही मिळवतो
सुख दुखात नेहमी
तोच पाठीशी राहतो ।।
पूनम डहाके, भंडारा.
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बापाचं हृदय---
बापाचं हृदय कठोर
दिसतसे वर वर
तरीही मृदू भाव
भारी दाटे अंतर।।
घराचा तो पाया
मजबुत सदा
पत्नी, मुलांना सांभाळी
येऊ न देई कधी गदा।।
दिसे त्याच्या ठाई
स्वाभिमान, कठोरपना
पाणी पापणीत साठवून
दावी कुटुंबाचा बाणा ।।
छाती दिसे पहाडाची
कष्ट करी रात्रंदिनी
दिसे कमालीचा रुबाब
घामाचे थेंब पिऊनी ।।
पत्नी मुलांसाठी सदा
करी मेहनत फार
शिकुन मुलं मोठे व्हावे
स्वप्नांची संसार तलवार।।
कुटुंबाला सदा सुखात
ठेवू तो पाहतो
सासरी लेक जाताना
जन्मभराचा उर दाटतो।।
मंगला डहाके, भंडारा
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बापाचं ह्रदय
बाप माझा जिव्हाळा नि प्रेमाचा
सांभाळ करी सर्वाचा
कोमलता बापाच्या ह्दयी
प्रश्न सोडवी आयुष्याचा....
दुःख भारी झाल्यावरी
याहाताचे दुःख त्या हातालानसे ठाव
बाप झेली वरचेवरी
मोतीराम त्यांचं नाव..,,,
प्रेमाचाहो माझा बाप
रोज जाई कारखान्यात
टोपी कुर्ता धोतर पेहराव
रोज खाऊ देई माझ्या हातात ......
माझा बाप मायेची खाण
सर्वांवर प्रेमवर्षाव करीत छान
लहान सान त्यांना बापू म्हणत
थट्टा मस्करी कामात नसे वान.....
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बापाचे हृदय...
बाप बाप असतो
बापा सारखं कुणीच नसतं
रणरणत्या उन्हात
राबतो घरासाठी.
पै पैं जमवून उभारतो राशी
मुलांना सर्वकाही मिळविण्यासाठी
खर्च करतो धनराशी
पोटाला चिमटा घेतो स्वतः साठी
कणखर बाणा त्यांचा
लेकरांना वाटे दरारा
स्वाभिमानाची जगणं
शिस्तप्रिया ला भीस्थ
सूर्या सारखे तेजस्वी, प्रखर
चंद्रा सारखं शीतल हृदय
लेकरांना तारका सारखे गोंजारावे
लोण्यासारखे मन विरघळअवें
सासरी जाताना मुलगी
बापाचे काळीज गहिवरते
डोळयातले पाणी लपवितो
आनंदाने देतो पोरीला निरोप
सर्वाचा सुखा साठी
करतो जीवाचे रान
मुलासाठी बांधतो घ र
सुखाने नांदतो सहपरिवार.
माधुरी भुते
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बापाचं हृदय
************
बापाचं हृदय असतं जणू
कवटीचं टणक नारळ
आतून प्रेमाचा झरा
सदा वाहे झुळझुळ
बाप असतो घराचा
जसा मणक्याचा कणा
नजर लागे ना कुणाची
अंगी कणखर बाणा
दिवस रात्र राबतो
आपल्या कुटुंबासाठी
कधी जगतांना दिसतो का
तो अपुल्या स्वतः साठी
लेक जातांना सासरी
उर दाटुनिया येई
अश्रू टिपून शेल्यानं
हळूच सामोरे जाई
बापाचं हृदय अजून
कोणाला कळलं नाही
मोठं संकट आल्याशिवाय
बाप काही आठवत नाही
सौ रेणुका झंझाड भंडारा
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *बापाचं हृदय*
बापाचं काळीज
कळत नाही कुणाला
कठोर आहे बाबा
सोपं वाटतं म्हणायला
सगळ्यांचाच भार
तोच असतो पेलायला
कुटुंबावरील संकटे
तो असतो झेलायला
बापा शिवाय
घराला नाही घरपण
त्यांच्याच अंगाखांद्यावर
जातें आपलं बालपण
कुटुंबाची काळजी घेता
स्वतः झिजतात
संसाराचा गाडा कसा
सुखरूप ओढत नेतात
नंदा भोयर
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बापाचं हृदय
वरुता फणसा काटे
आत रसाळ गरे
बापाचं हृदय जाणा
फणसा सम खरे.
श्रीफळ दिसतो कठीण
आत निर्मळ जीवन
बापाचं वागणं कठोर
आत पाझरते मन.
येऊ देत भयान संकटे
तोंड देण्यास बाप एकटे
छत्रछाया शिरावर धरी
सोसे उन्हाचे चटके.
काटे रक्षती गुलाबास
बाप राखतो घरकुलास.
ऊन वारा पाणी पाऊस
तमा नच याची तयास.
बापाचं हृदय थोर
जसंअथांग सागर
धावती लाटांवर लाटा
गवसती मोकळ्या वाटा.
कोण जाणी हृदय बापाचं
चंद्र सूर्याच्या प्रकाशाचं
मनी लेकरांचा भाव
स्वप्न साकारण्या धाव.
हाडांची करूनी काडे
तन भिजतो घामात.
कष्टाचं मोल नाही त्याच्या
उर भरून विश्वासात.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/8, 7:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कविता
"बापाचं हृदय"
अंकुरल्या बीजापोटी
माय जपते कुशीत,
करावया निगराणी
बाप जागे रात्रंदिस.
बापाचे हृदय,म्हणतो
पाषाण तू कसे,
तुझ्या शिक्षण धंद्यासाठी
त्यानं केली हाडाची रे काडे.
बाप संसाराचा कणा
नाही कुठे रे तो उणा,
घराच्या सुखासाठी
तो फिरे वण वणा.
लेकीच्या सुखासाठी
बाप खाई रे खस्ता,
लेक सासुरा जाता
रडे मनात ढसा ढसा.
म्हणे ,लेक माझी माऊली
दया प्रेमाची साऊली,
जीवापाड हो जपली
करून हाताची मी हो झोळी.
बापाचे हृदय
जाण रे तू पोरा,
म्हातारपणी नको करू
त्याची तू अवहेलना.
तुमच्याच सुखासाठी त्याच्या
जीवाचा रे आटापिटा.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.08.09.2020
[9/8, 9:32 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: -------------
बापाचे हृदय ---
-------------
बाप हा एक मजबूत
घराचा पाया आहे.
ज्यांना नाही त्यांना
विचारा की बाप
काय असतो
.
बाप मुला, मुलीचा मित्र
असतो, काही कमी पडला की बाप आठवतो.
असे म्हणतात की आई पेक्ष्या बापाची ओझंड ही मोठी असते. त्या ओजडीत खुप मावते.
बाप हा दोन ओजडी भर भरून आणतो . मुलांना कुठे कमी पडू नये. म्हणून दिवस , रात्र मेहनत करतो.
बाप मेहनत करतो . म्हणून आपण चागलं आयुष्य जगतो. मुलांनी खूप मोठं व्हाव. मी आहे त्यापेक्षा माझ्या मुलांनी मोठं व्हाव. त्यासाठी बाप सर्व कष्ट सहन करतो.
त्याची जाणीव सुद्धा मुलां, मुलीना किंवा
बायकोला सुद्धा होऊ देत नाही.
बाप स्वतःचे दुःख कोणाला सांगत नाही.
दिसतो खबीर , परंतु आतून नारळासारखा
वरून कडक, आतून नरम, अशी बापाचे
हृदय असते.
मुलगी माहेरी जाताना
मुली समोर हसून तिला वाटी लावतो. मुलगी गेली. कि कोपऱ्यात जाऊन बाप एकटाच रडतो.
बापाचे काळीज हे
विशाल डोगरा सारखे
असते . बापची जागा कोणी घेऊ शकत नाही.
****************
सौं.
शोभा राजेश खोकले
यवतमाळ
********-******
[9/8, 9:32 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बापाचं हृदय...
बापाच्या हृदयाला तोड नाही कुणाची
फाटकी चप्पल स्वतः घालतो
पण पैसे साठवतो मुलाच्या बुटासाठी
वरून जरी कडक दिसे
परी आत कोमल हृदय असे
घरच्यांच्या सुखासाठी दिवसरात्र लढत असे
मुलाच्या शिक्षणासाठी पै पै जमवितो
मुलगा उच्च शिक्षित झाल्यावर
बापाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवीतो
मुलीवर भारी जीव त्याचा
मुलगी सासरी जाताना
रडतो मात्र ढसाढसा
आपले दुःख कधीच सांगत नाही
मनातल्या मनात कुढत असतो
असा हा बाप कधीच कुणाला कळला नाही.
सौ.कीर्ती प्रदीप शेंडे.....नागपूर
[9/8, 9:32 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बापाचे हृदय
त्रास असूनही प्रामाणिक राहणं
संपत्ती असूनही साध रहाणं अधिकार असूनही नम्र राहणं राग असूनही शांत राहणं
यातच बापाचा स्वभाव आहे
बाप म्हणजे बाप असते घराला घरपण असते
संसाराच्या सागरात लाटा ओढून नेणारा बाप असते
आपल्या चिमणी पाखरांच धडधडत काळीज म्हणजे बाप असते
जगातील प्रत्येक घर हे शाळा असते आणि त्या शाळेचे शिक्षक म्हणजे बाप असते
बाप म्हणजे काळाच्या सागरातून सुखरूप किनारी पोहोचणारा जहाज असते
आपले चिमुकले हात धरून चालायला शिकवणारे बाप असते
आयुष्याच्या वाटेवर चांगल्या गोष्टीचे ज्ञान देणारे बाप असते
जसे कोवळे फुल शोभून दिसते झाडाला
तसे बापाची किमया शोभून दिसते घराला
सौ श्वेता स. कानतोडे (वैद्य) अमरावती
[9/8, 9:32 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: **बापाचं हृदय **
आपण आयुष्यभर आईचे गुणगान करतो
पण बिचारा बाबा धडपड करून स्वतःच पाणी करतो.
संकट प्रसंगी बापच धावून येतो.
आपण फक्त आई ग आई ग एवढच करत बसतो.
आई असते संस्काराची किल्ली
तर बाप असतो संयमाची गुरुकिल्ली
सदा आठवते जेवण बनवणारी ही प्रेमळ आई
पण त्याच शिदोरीची सोय ही बापच नेहमी पाही.
काटकसर करुन खर्चाला देतो पॉकेटमनी
स्वतः मात्र वापरतो शर्ट-पॅन्ट जुनी
घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी
पण मुलांना मात्र घेतो नवीन ड्रेस नवीन गाडी.
वयात आल्यावर मुलं आपल्याच विश्वात मग्न
बापाला दिसते मुलांचे शिक्षण पोरीचे लग्न
जिवंतपणी पूर्ण करावी आई-वडिलांची सर्व इच्छा.
त्यांना समजून घ्यावी हीच शेवटची इच्छा हीच शेवटची इच्छा.
सौ नीलिमा लक्ष्मणराव ठवकर (पिंगळे) यवतमाळ
[9/8, 9:32 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय- बापाचं हृदय*
आई असली श्वास तर
बाबा आहेत प्राणवायू
बाबांच्या कष्टामुळे आज
चांगले दिवस आले भाऊ
आयुष्यभर काटकसर करून
मुलांच्या भविष्याचा सदा विचार
मुलांना सर्वकाही पुरवणार
स्वतः करिता नाही काही घेणार
चिमणीला आपल्या सोपवतांना
बापाचं हृदय धडधडतं
काळजीने मुलीच्या विरहात
आतल्या आत रडतं
जीवनाच्या उतारवयात
बापाला मुलाचा आधार लागतो
स्वाभिमानी बाप मात्र
आपल्या यातना लपवत असतो
काय झालं कधी कधी
रागावलेच जरा चुकून
तुम्ही पण समजून घ्या ना
तेही जातात यामध्ये थकून
घरट्यातील पिल्लं मोठी होताच
भुरकन उडून जातात बाहेर
आईचे अश्रू बोलतात पण
बापाचे हृदय कसं बोलणार
*सौ. रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/8, 9:32 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बापाचं हृदय
वरुता फणसा काटे
आत रसाळ गरे
बापाचं हृदय जाणा
फणसा सम खरे.
श्रीफळ दिसतो कठीण
आत निर्मळ जीवन
बापाचं वागणं कठोर
आत पाझरते मन.
येऊ देत भयान संकटे
तोंड देण्यास बाप एकटे
छत्रछाया शिरावर धरी
सोसे उन्हाचे चटके.
काटे रक्षती गुलाबास
बाप राखतो घरकुलास.
ऊन वारा पाणी पाऊस
तमा नच याची तयास.
बापाचं हृदय थोर
जसंअथांग सागर
धावती लाटांवर लाटा
गवसती मोकळ्या वाटा.
कोण जाणी हृदय बापाचं
चंद्र सूर्याच्या प्रकाशाचं
मनी लेकरांचा भाव
स्वप्न साकारण्या धाव.
हाडांची करूनी काडे
तन भिजतो घामात.
कष्टाचं मोल नाही त्याच्या
उर भरून विश्वासात.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/9, 7:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🎼🎤🎼🎤🎼🎤 चारोळी -- "माझे आवडते गायक" जगजीत सिंग सारखे गझलकार नाही कुणी मनाला स्पर्श करतात त्यांची बहारदार गाणी.. 🎼🎤🎼🎤🎼🎤 " माझी आवडती गायिका " मंगेशकर घराण्याची शान महाराष्ट्राला मिळाला बहुमान गायिले हिंदी मराठी बहारदार गान. अशी ही गानकोकिळा जिचा सर्वांना वाटतो अभिमान. ✍️ प्रा.सौ. स्वाती संजय शिंगणजुडे (पिंगळे)अमरावती
[9/9, 7:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझा आवडता गायक
---------------------
माझा आवडता गायक किशोर दादा
किशोर दादा सारखे
गायक न झाले ना होणार.
त्याच्या सुरेला आवाजानी सर्वाना मंत्रमुग्ध करायचे.
किशोर दादा चे सदाबार गाणे आज ही अजग्रामर आहे.
***************
माझी आवडती गायीका
***************
माझी आवडती गायिका -लता मंगेशकर
लता मंगेशकर चा आवाज आज प्रयन्त कोणाला जमलं नाही .
स र्वाना त्याच्या आवाजाने मंत्र मुग्ध केले. लता मंगेशकर यांना ज्ञानसम्राज्ञानी म्हटलं जाते. त्याना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीय
केले आहे.
*********-*****
सौं
शोभा राजेश खोकले
यवतमाळ
****************
[9/9, 7:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी ---माझे आवडते गायक
माझा आवडता गायक किशोर दादा.
त्यांच्या आवाजांनी मन प्रसन्न होते.
किशोर दादाचे एकाहून एक गाणे आजही अजग्रामर आहे.
************************-
माझी आवडती गायिका
--------------------------------
माझी आवडती गायिका गानकोकिळा लता मंगेशकर.
त्याच्या आवाजात आहे स्पतरंगी गाण्याच्या लहरी.
लता मंगेशकर यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानीय केले आहे.
*************************
सौ.
प्राजक्ता रेहपाडे
पुणे
*********
[9/9, 7:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🎻. माझी आवडती गायिका
श्रेया घोषाल
तिने सुरेल आवाजाने
केले घायाळ
माझा आवडता गायक
मन्ना डे
त्यांच्या आवाजाला नाही
तोड रे.
सौ .रोहिणी दे.मुलंडे
[9/9, 7:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी
माझी आवडती गायिका लता मंगेशकर
यापुढे न होणे अशी गायिका
भारताची आहे ती गानकोकिळा
अनेक पुरस्काराने विभूषित
करते आपल्या गाण्याने मंत्रमुग्धीत
आवडते गायक मोहम्मद रफी जी
आवाज त्यांचा गोड,मधुर
अनेक त्यांचे संगीत प्रेमी
पण त्यांच्या सारखी छाप पाडली नाही कुणी.
सौ.कीर्ती प्रदीप शेंडे.....नागपूर
[9/9, 8 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹 माझी आवडती गायिका
वर्ण तो सावळा
गोड तो गळा
लता दीदी च्या गाण्याचा आवडता
सुर आगळा वेगळा
🌹 आवडता गायक🌹
आवडते गायक माझे
अजय-अतुल आहेत
त्यांच्या मधुर स्वरांनी
मन माझे मोहिले
सौ. नीलिमा ठवकर
यवतमाळ
[9/9, 8 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 💐माझा आवडता गायक💐
माझा आवडता गायक कुणीच नाही
कारण मला आवडत नाही
अस कुणीच नाही
प्रत्येक गायकाचा वेगळाच अंदाज आहे
प्रत्येकाच्या कंठात वेगवेगळा राग आहे
प्रत्येकाच्या कलेचा मला वाटतो अभिमान
ज्यांच्यामुळे वाढते आहे आपल्या देशाची शान🤴
आवडती गायीका
लताजी,अल्काजी, सुनिधी कींवा नेहा
प्रत्येकीच एकेक गाण एकदा ऐकुण तर पाहा
लताजी तर आपल्याला लाभलेल देवाच वरदानच आहे
ज्यांच्या कंठात खुद् सरस्वतीचा वास आहे
प्रत्येकीचा अप्रतीम आवाज आहे
प्रत्येक गायीका माझ्यासाठी खास आहे👸
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र ६४.
ब्रम्हमुहूर्तास
ईश्र्वराचा वास
भाव फुलांची ओंजळ
वाहू चरणास.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (५५)
कपालभाती,ओंकार,अनुलोम विलोम
फुफसातील साचली घाण काढते छान
नियमीत प्रात:काळी केल्यान ह्रुदयाला
रक्ताभिसरण होण्या नाही पडत ताण.
दनाअ, नागपूर
दि.०९/०९/२०२०
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 💐प्रभात वंदना- १४💐
_________________________
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
ओंजळीत बसेल एवढं
नक्की घ्या......
पण सांडण्या अगोदरच
ते वाटायलाही शिका......
सुप्रभात.......
_________________________
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
सौ. शितल श्रीकांत ठवकर.
(तुमसर रोड, देव्हाडी, तुमसर)
_________________________
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प---74 वे
अंगणातील रांगोळी
रांगोळीत काढली नक्षी
किलबिलाट करती
झाडावरील पक्षी ।।
------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹|| *अलगूज* ||🌹
*क्र.७१*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*मुक्या प्राण्यांनाही असतात*
*माणसांसारख्याच भावना*
*कधीतरी त्यांचा हात*
*हातात घेऊन बघाना*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
हिरवं शिवार डोलू लागलं
झुळझुळ पाणी वाहू लागलं
बहर सृष्टीचा देखुनी डोळ
मन आनंदानं नाचू लागलं
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.६९*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*बागेतील मनमोहक फुले*
*माझ्याकडे बघून हसतात*
*क्षणिक त्यांचे अस्तित्व तरी*
*नवी चैतन्यमय उमेद देतात*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पहाटवारा🌺
संयुक्त मोठ्या कुटुंबात
नातीगोती, मित्र परिवार
संकट समयी आपल्याला
मिळतो त्यांचाच आधार.
सौ. वीणा द.अतकरी
नागपूर
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
*माझा आवडता गायक*
*किशोर कुमार* आहे
माझा आवडता गायक
गाणे त्यांचे वाटतात
सगळेच मनमोहक
*माझी आवडती गायिका*
आवडती गायिका माझी
गोड गळ्याची लतादीदी
ऐकते गाणी त्यांची......
रोज झोपण्याआधी......
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
चारोळी
(०१) ""माझा आवडता गायक""
माझे आवडते गायक सुरेश वाडकर
मराठी,हिंदी विविध गितांचे पार्श्वगायन
सहचारिणी पद्मासह,लता,आशादीदी. आशिर्वादा पावले पद्मश्री पुरस्कार छान.
(०२) ""माझी आवडती गायीका""
माझी आवडती गायीका आहे
लता मंगेशकर, जन्म इंदूरात
हिंदी,मराठीसह इतरही गायन
भारत रत्नासह पुरस्कार बहुत.
दनाअ, नागपूर
दि.०९/०९/२०२०
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा उपक्रम:-चारोळी
विषय :-माझा आवडता गायक
किशोर कुमार
----------------------------------------
ते आहेत भारताचे पार्श्वगायक
गायनाने त्याच्या मन मोहीत झाल
दुसर कोणी नाही गायक आणि नायक त्यांच्या सारख आल.....
----------------------------------------
आवडती गायीका
लता मंगेशकर
भारताची आहे ति कोकीळा
नाही दुसरी कोणी होणार
देश आणि विदेशातील लोकांचे
मन दुसरे कोणी नाही मोहणार...
----------------------------------------
सौ. शितल श्रीकांत ठवकर.
(तुमसर रोड, देव्हाडी, तुमसर)
----------------------------------------
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझा आवडता गायक--
आवडता माझा गायक
आहे संदीप खरे
आयुष्यावर बोलू काही
भावपूर्ण गातो गोड स्वरे।।
--------------------------------
माझी आवडती गायिका --
आवडती माझी गायिका
गानकोकिळा लता मंगेशकर
बालपणापासून ऐकते गाणे
मंत्रमुग्ध सूर, ख्याती जगी दूरवर।।
मंगला झेड डहाके,
भंडारा
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: विषय- माझा आवडता गायक
सुधीर फडके( बाबूजी)
कडक आणि स्पष्ट आवाज
भावगीत, युगल गीतांना चढविला त्यांनी साज
गीत रामायण गाऊन मात्र
उभे केले संपूर्ण रामायणाचे चित्र
आवडती गायिका
आशा भोसले
बहुआयामी व्यक्तिमत्व
लावणी असं वा भावगीत
अथवा असो पॉप संगीत
प्रत्येक गाण्याला दिला त्यांनी न्याय
त्यांच्यासारखी गायिका दुसरी कुणी नाय
रंजना हलमारे( सेलोकर)
साकोली
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उपक्रम चारोळी
आवडती गायिका आणि गायक
आवडती गायिका,लता मंगेशकर
****************
स्वरांची आराध्या,गानसम्राज्ञी,गाणकोकीळा
गोड गळ्याची गायिका 'लतादी'
मंत्रमुग्ध स्वर,जादूई आवाज
असा नसे कोणी ज्यांनी त्यांना ऐकले नाही
आवडता गायक,शंकर महादेवन
************.
'ब्रिथलेस'गाणं ज्याची ओळख
हिंदी मराठी स्वरांवर पक्की पकड
'सूर निरागस' ऐकून हरवते भान
'शंकर महादेवन'गातो छान.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.09.09.2020
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *चारोळी *
आवडती गायिका लता दीदी
गोड आवाज
मंत्रमुग्ध होतात सगळे
त्यांच्या आवाजानी
वेड लागले मज गडे
कुमार सानू आवडता गायक
कुमार सानू
आवडता माझा गायक
वेगळी शैली वेगळा आवाज
देतात गाण्याला नवीन साज
नंदा भोयर
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *चारोळी*
*विषय - आवडती गायिका*
*अल्का याग्निक*
अल्का याग्निक माझ्या आवडत्या गायिका
मंत्रमुग्ध करतो त्यांचा आवाज
सिनेसृष्टी मध्ये अनोखी ओळख
गाणं ऐकताच मनाला भिडतं सहज
*आवडते गायक - सोनू निगम*
आवडते गायक आहेत सोनू निगम
आवाज त्यांचा अतिशय गोड
ऐकावे वाटे रोज रोज
गाणे ऐकताच वटवीत होतो मूड
*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळीलेखन
माझा आवडता गायक
पंडीत भिमसेन जोशी
पंडित भिमसेन जोशी
माझा आवडता गायक
माझं माहेर पंढरी हे गीत आवडीचे
भान हरपून जातात ते गाताना वेधक.
माझी आवडती गायिका
लता मंगेशकर
लता मंगेशकर माझी आवडती गायिका
ए मेरे वतन के लोगो हे गीत त्यांचं सुंदर
काय सुरेल गातात
गान कोकीळा नि मोहिका
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी
माझे आवडते गायक
अर्जित सिंग यांच्या
गाणे ऐकून येते ऊर्जा
युवा पिढीला आहे भावणारा
आवडती गायिका-लता मंगेशकर
गान कोकिळा गानसम्राज्ञी
भारतातला कंठ हिरा
आवाजातल्या जगातला नगिना
गोड गळ्याने मंत्रमुग्ध करणारी
आवडती गायिका लतादीदी.
माधुरी भुते
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के. सा. सं.प.
चारोळी
""माझा आवडता गायक""
माझा आवडता गायक जगजितसिंग
हिंदी,भजन,गजल गातो सुरेख
सहज मधुर आवाजाने प्रसिद्ध
दुरूनच होते आवाजाची पारख.
""माझी आवडती गायिका""
माझी आवडती गायिका लतादीदी
पार्श्वगायन करते मराठी,हिंदी
अनेक पुरस्काराने गौरव केला
गोड सूराने आवडते सर्वाला.
सौ. वीणा द. अतकरी
नागपूर.
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹 चारोळ्या🌹
1)माझी आवडती
गायिका
गानसम्राज्ञी लतादी
आवडी मजला
गानकोकीळा म्हणुनी
नावाजली भारता।
..................................
2)माझा आवडता गायक
पार्श्वगायक किशोरकुमार
आवडे मजला,
फिल्मफेअर अवार्ड मिळाले त्याला।
गातसे सुमधूर गीते
हिंदी, मराठी विविध भाषे।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आवडते गायक-गायिका *
देशात आहेत
गायक-गायिका एकाहूणेक
सर्वांची गायन शैली वेगवेगळी
कसं घेऊ मी नाव एक
आपापल्या शैलीत
सर्वांचं गायन महान
कुणी पद्मश्री ने तर कुणी भारतरत्न ने सन्मान
जुने-नवीन सर्वच
गातात फार छान
देशातच नाही तर
विदेशातही मिळविला मान
सौ. संगीता कढव, भंडारा
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ** माझा आवडता गायक **
माझा आवडता गायक
असे किशोरकुमार
त्यांच्या गाण्यामध्ये
अनेक आवाज प्रकार
** माझी आवडती गायिका **
लता दिदींचे गायन
जसा कोकिळेचा कंठ
येता ताणतणाव मनी
गाणं ऐकून होई तंदुरुस्त
सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[9/9, 8:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझे आवडते गायक
आवडते गायक माझे
सुरेश वाडकर आहेत
हिंदी आणि मराठी गाणी
भावपूर्ण स्वरात गातात
____________________
माझी आवडती गायिका
आवडती गायिका माझी
आहे कार्तिकी गायकवाड
तिच्या मधुर स्वरात चिंब
तीच माझी भारी आवड
___________________
पुनम डहाके भंडारा
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.६५
प्रभात समयी
चिंतन प्रभूचे
प्रसन्न चित्ताने
आर्जव मांगल्याचे.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पहाटवारा 🌺
श्री. गुरुदेव दत्ताचा
वास औदुंबरावर
जाई मरगळ निघून
श्रीपाद वल्लभ स्मरल्यावर
सौ. विणा अतकरी नागपूर
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (५६)
वृध्द रूग्णांना दवाखान्यात जागाच नाही
रूग्णवाहिका नेली दारावर दया नाही काही
घेऊन फिरा शहरभर गाडीतच जिव जाई
भयानं लोकं झटपट मरती कोणी नाही वाली.
दनाअ, नागपूर
दि.१०/०९/२०२०
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प-- 75 वे
शेगावी भव्य मंदिर हे
माझ्या गजाननाचे
गण गण गणात बोते
या मंत्रातच सार कृपेचे ।।
-------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गजानना च्या पायी
नतमस्तक मी होते
गजानना चा मंत्र एकच
गण गण गणात बोते
सुप्रभात
नंदा भोयर
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
सत्कर्म शांतीचा
मार्ग दाखवी
योगीराज गुरू
माझी माऊली
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
क्रमांक ६२
*शेगावचे गजानन*
वसले श्रीसंत गजानन महाराज
बुलढाणा जिल्ह्य़ातील शेगावी
नाना चमत्कार करूनी तेथे.....
अवलिया हा साक्षात्कार घडवी
लोकांच्या उष्ट्या पत्रावळीतील
अन्नाचे कण वेचूनी खायचे.....
गुराढोरांना पिण्यास ठेवलेले...
पाणी आनंदाने गजानन प्यायचे
मुखी भजन असायचे नित्य
गण गण गणात बोते.......
भक्तजनांना मार्गदर्शन करणारे
अवलिया दिगंबर वृत्तीचे होते
आवडायचे त्यांना खायला फार
मुळ्याच्या शेंगा, आंबाडीची भाजी
नैवेद्याला अजूनही सारेच करतात
झुणका भाकर अन् हिरवी मिरची
संचार केला चैतन्य देहाने.....
बत्तीस वर्षे शेगावी राहिले.....
या सिध्दयोगी पुरुषाने भक्तांसी
भक्तिमार्गाचे महत्व पेटविले
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शेगावचे जय गजानन--
शेगावी भव्य मंदिर हे
सद्गुरु गजानना चे
गण गण गणात बोते
मंत्रातच सार कृपादृष्टीचे ।।
पवित्र गाभाऱ्यात
सद् मूर्ती गजाननाची
श्रद्धेने दर्शना जाती
दाटी होइ भक्तांची ।।
स्वच्छतेचे आगार ते
भक्त कामा लागती
श्रीमंत-गरीब सारखे
पोथी पारायण करती ।।
फुले, हार, प्रसाद
घेऊन जाती मंदिरी
महाप्रसाद गजाननाचा
मिळे भक्तांना पोटभरी।।
सद्गुरु, न सांगता, जाणता
उरी द्या, सदा चरणाचा ठेवा
तुम्हीच करता,आणि करविता
घडू द्या अनाथ, गरिबांची सेवा।।
देवा, असू द्यावी कृपादृष्टी
आम्हासारख्या पामरावरी
श्रद्धा, भक्ती तुम्हा अर्पिते
कोटी कोटी नमन चरणावरी।।
-------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.७०*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*निसर्गाशी खेळून*
*मानव लावतो शोध*
*दुष्परिणाम लक्षात घेता*
*त्यातून घ्यावा थोडा बोध*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *शेगावचे गजानन*
शेगावीचा राणा
माझा गजानन
तुला पाहता रे
माझे प्रसन्न होते मन
शेगाव माझं माहेर
असं मनाला वाटे
निघताना तेथून
अश्रू डोळ्यात दाटे
प्रसन्न मूर्ती प्रसन्न नगरी
शेगावची दूरवर ख्याती
शेगाव आहे पवित्र भूमी
पवित्र तेथील माती
दूर दुरचे भक्तगण
दर्शना येथे येती
महाप्रसाद घेऊन मुखी
तृप्त होऊनी जाती
कोणी करती पायी वारी
कुणी जाती दर गुरुवारी
गजानन माझा आहे
सावळा हरी
किती किती गुण गावे
गजानना तुझे
गुण गाण्या करता
शब्द अपुरे पडतील माझे
नंदा भोयर
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शेगावचे गजानन
शेगाव चे सद्गुरु गजानन
माझे आहेत श्रद्धास्थान
दर्शना जाती भक्त
पदरी पावे सुख समाधान .
साक्षात जागृत मूर्ती
आहे माझ्या गुरुरायाची
गणगण गणात बोते
मुखी वृष्टी मंत्राची .
झुणका भाकर प्रसाद
घेवून भक्त होती तृप्त
पोथी पारायण भक्त करूनी
हृदयी भक्ती संपृक्त .
गजानना वंदिते
मी शतशः चरणा
कृपादृष्टी असू दे देवा
या आपल्या भक्तगणा .
सद्बुद्धी अन कृपादृष्टीचा
ठेवा हात माथ्यावरी
संकटातही बळ द्या
राहा प्रसन्न आम्हावरी .
__________________
पुनम डहाके ,भंडारा
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शेगावचे श्री गजानन महाराज
संत शिरोमणी विदर्भ भुषण
शेगावचे श्री स्वामी गजानन
सर्वदा चुटकीवरी गाती भजन
गण गण गणात बोते आनंदे।
आवडी तयासी गांजाचिलीम
परी नसे ते तयांचे व्यसन
भक्त अभिलाषा जाणोनि
करती गांज्याचे सेवन।।
जना रिझवी करोनी लिला
पेटवी अग्नीवाचून चिलमेला
आणी जल निर्जल व्यापीला
स्पर्शे श्वान जिवंत केला।
अन्न हे पुर्णब्रम्ह सांगण्या
केले उष्ट्या पत्रावळी भोजन
पिले ओढ्याचे गढूळ जल
क्षणात भ्रमीले भुमंडल।
आजही दर्शना येती जन
पायी वाऱ्या दिंडया घेवुन
करती गजाननाचे पारायण
अंतरी बहु लाभे समाधान।
शेगाव असे तिर्थ महान
आनंदसागरास विशेष मान
पाहून नयनरम्य पर्यटन
प्रसन्न होतील भक्तजन।।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🙏संत श्री गजानन महाराज 🙏*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*शेगावचे संत श्री गजानन महाराज*
*मार्ग दाखवा भक्तांना संकटात आज*
*भगवंत वसतात आमच्या हृदयात*
*संत आणि भगवंत एकरूप साक्षात*
*शेगांव नगरी विदर्भाची पंढरी*
*स्वच्छता देखणी भासे स्वर्गापरी*
*लोक सुखाचे सोबती संकटकाली अव्हेरिती*
*दुःखाच्या ही प्रसंगी रघुपति साथ देती*
*शिरा पुरिची गोडी नसे गुरुराया आपना*
*गरीबाची भाकरी गोड लागे दयाघना*
*गुरूच्या शिकवणीचे दिसे साक्षात्कार*
*आदरभाव एकमेकांप्रती दिसें भक्तांवर*
*अशीच कृपादृष्टी स्वामी गजानन निरंतर*
*असावी आम्हांवर आम्ही आपले पामर*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: Il शेगावचे गजानन ll
गजानन महाराजाचे निवास
बुलठाना जिल्ह्यातील शेगाव
भक्त दर्शना येति खास
तिथे नसे कुणाला अटकाव
मंदिर खूप असे सुंदर छान
फुलाचे हार प्रसाद घ्यावे दर्शन
गण गण गणात बोते प्रार्थना
मनोभावे करावी आराधना
श्री नि घेतली समाधी
मंदिर बांधीयले त्याच जागी
समाधीच्या चरणाला स्पर्श
मनी उल्हास वाटे हर्ष
संस्थांच्या बसेस घेऊन
जाती आनंदसागरला
नयनरम्य दर्शन होई
भासे स्वर्ग अवतरला
देवस्थानात मिळे महाप्रसाद
भक्तांना राहण्यास निवास
सर्व सोईनी असे परिपूर्ण
खरे स्वच्छतेचे महादर्शन
सौ रेणुका झंझाड भंडारा (बेला)
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कृपादृष्टी
कृपादृष्टी तुझी देवा
करी नित्य भक्तांवरी
शेगावचे गजानन महाराज
लक्ष करी आम्हावरी...
गणगणगणात बोते
भक्तगण जपती मंत्र
तुमचे भजन करी भक्तीभावे
पुजेचे स्विकारुनी तालतंत्र....
सार्या जगावरी कृपादृष्टी तुझी
असु दे नित्य तुझी छाया
दुर कर अज्ञानाला
करुनी सार्यांवर माया.,.,
मुखी तुझे नामस्मरण
असू दे सदासर्वदा
जय गजानन जय गजानन
सुर लाउ अनेकदा....
झुणकाभाकर प्रसाद आम्हा
वाटे बहुमोलाचा
तुझ्या चरणी ठेऊन माथा
क्षण उपभोगु आनंदाचा,
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ' जय गजानन '
' गण गण गणात बोते. '
वदुनी ,मंत्रमुग्ध जना केले
खाऊनी उष्ट्या पत्रावळीचे अन्न
जना ,सहजची उपदेशीयेले....
धन्य ती गजानन माऊली
प्रगटली शेंगाव नगरी
जन होती आश्वस्त
पाहुनी गजाननाची मुर्ती......
घेतली जरी समाधी
दावुनी ,चमत्कार जगा उद्धारीसी
रंजल्या -गांजल्याची देवा,
तुच माय माऊली........
माजली अराजकता जागोजागी
मृत्यूचे भय घाबरवती मनासी
थांबव देवा हे आकांत तांडव
पुन्हा दे सर्वांसी कृपेची सावली.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
' जय गजानन '
' गण गण गणात बोते. '
वदुनी ,मंत्रमुग्ध जना केले
खाऊनी उष्ट्या पत्रावळीचे अन्न
जना ,सहजची उपदेशीयेले....
धन्य ती गजानन माऊली
प्रगटली शेंगाव नगरी
जन होती आश्वस्त
पाहुनी गजाननाची मुर्ती......
घेतली जरी समाधी
दावुनी ,चमत्कार जगा उद्धारीसी
रंजल्या -गांजल्याची देवा,
तुच माय माऊली........
माजली अराजकता जागोजागी
मृत्यूचे भय घाबरवती मनासी
थांबव देवा हे आकांत तांडव
पुन्हा दे सर्वांसी कृपेची सावली.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के.सा.सं.प.
"शेगावचे गजानन"
महाराष्ट्रात संत अनेक
त्या संतांच्या जोडीचा
गजानन महाराज एक
असा राणा शेगावीचा.
माझं माहेर शेगांव
खामगाव तालुक्यात
गर्दीला नाही ठाव
भक्त जमती एकत्रीत.
ठेवल्यास श्रध्दा त्यावरी
पूर्ण होतील मनोकामना
हात सदैव ठेवी डोक्यावरी
प्रणाम बाबा गजानना.
गजाननाने दिलं मला अमाप
मुलेबाळे,सुख, संपन्न
श्री मुख दर्शन होताच
मन होते प्रसन्न.
गरीब श्रीमंत नसे भेदभाव
सारे करती एकत्र पारायण
गण गण गणात बोते मंत्र
जपती एक मुखाने सर्वजण.
गजानन गजानन म्हणता
दुःख जाते विलया
दंडवत घालते
शेगावीच्या देवालया.
सौ. विणा द.अतकरी, नागपूर.
[9/10, 4:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹स्वामी गजानन🌹
गजानन माऊली,
नावातच प्रचंड शक्ती,
केली लीला अद्भुत,
भक्तगण उधळे भक्ती।🙏
विराजमान शेगावी,
भव्य इमारत, सुंदर मूर्ती
पसरली गावोगावी,
तुझीच अफाट कीर्ती🙏
लांब लांब रांगा जरी,
दर्शनाची आस मनी,
ठेवते माथा चरणी,
तु भक्तांचे उद्धार करी🙏
प्रसाद तुझा झुणका भाकर,
खाई उष्ट्या पत्रावळ,
नाही आस कशाचीच,
क्षणात भ्रमण करी इच्छा स्थळ🙏
केली रे तुझी सुधाकर रावांनी,
पायदळ दिंडी यात्रा,
भजन-कीर्तन गात,
गाठली शेगावची वाट🙏
हे स्वामी गजानना,
तूच भक्तांचा कैवारी,
करुनी मुक्त संकटातूनि
कृपा कर आम्हावरी🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹
सौ. संगीता सुधाकर कढव
भंडारा
[9/10, 5:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺 शेगावचे गजानना🌺🌺
शेगाव येथे प्रकटले गजानन,
विदर्भाची पंढरी म्हणून, शेगावला मिळालेले मोठे स्थान.
उष्ट्या पत्रावळीतील उष्टे ते कन
वेचुनी खात होते ते गजानन.
कवरा ची ती कांदा न भाकर,
ग्रहण केली त्यांनी आवडीने फार
गणगण गणात बोते, हा त्यांचा नाम गजर.
ऋषीपंचमीचा समाधी उत्सव असतो फार मोठा
भक्त दर्शना येति लांबलांबू नी
सर्वांच्या मुखी असतो एकच शब्द
जय गजानन माऊली...
🌺🙏🏻 गणगण गणात बोते🙏🏻🌺
सौ. नीलिमा ठवकर (पिंगळे)
यवतमाळ
[9/10, 5:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शेगावचे गजानन
----------------------
माघ वद्य सप्तमीला प्रगटले
गजानन महाराज.
उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण.
वेचूनि खाती.
सर्व प्रथम पाहले ब्याकटलालानी गुरे ढोरें पाणी पिती तेच पाणी महाराज पिती.
त्याचे आवडते भजन असायचे
गण गण गणांत बोते.
त्यांना आवडायचे झुणका भाकर कांदा मिरची.
अंबाडीची भाजी आणी मुळ्याच्या शेंगा.
त्यांनी पृथ्वीवर 32 वर्षां संचार केला.
महाराजांनी सर्व भक्तांना भक्ती मार्गाचे महत्व पाठविले.
आजही ते त्यांच्या आवडत्या भक्तांना दर्शन देतात.
आपण त्यांची मनापासून सेवा केली तर ते सुद्धा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात.
शेगावचे मंदिर भव्य दिव्य आहे.
तिथली शांतता मनाला प्रसन्न करते.
दरवर्षी शेगावला उत्सव होतात.
लांबलांबून भक्त दर्शनाला येतात.
1910 साली त्यांनी संजीवन समाधी घेतली.
तो दिवस म्हणजे ऋषिपंचमी.
महाराज आपल्या आवडत्या भक्तांना स्वनात जाऊन सांगती.
आपल्या समाधीची मात.
महाराज असू द्यावी कृपा दृष्टीं सर्व भक्तावर.
गण गण गणांत बोते
*******************
🙏🏼🙏🏼
सौ.
प्राजक्ता रेहपाडे
पुणे
*********
[9/10, 5:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शेगावचे *श्री गजानन*
संत गजानन शेगावात
प्रगट झाले मध्यान्हात
दर्शन अनेकांना ते जाहले
उष्ट्या पत्रवलीतील , अन्न
खाऊनी,गढूळ पाणी निर्मळ ते केलें,
बंकटलाल नी ओळखीले,
ते. परब्रम्ह.
येती संकट भक्तांवर
आधी त्यांनी ओळखले,
योग्य मार्ग दाखऊन
प्राण ते वाचविले.
संत असतात प्रेमाचे भुकेले,
कुणी आयोजीले आणावयाचे शिदोरी,
उपाशी राहून भक्ताची
वाट ते पाही.
विना विस्तव अग्नी पेटविली,
कोरड्या विहिरीला पाणी
आणी,म्हणून काहीच कमी नसे शेगावी.
असे शेगावात वसले गजानन,
"गण गण गणात बोते"
मंत्र देवूनी , भक्ता केले पावन🙏🙏🙏
[9/10, 5:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹शेगावचे गजानन🌹
शेगावचे गजानन महाराज
वद्य पंचमीला प्रगटले शेगावात
गण गण गणात बोते
हे भजन त्यांना आवडते
उष्ट्या पत्रावळी तील
वेचूनी खाती माऊली
अशी गजाननाची साऊली
आतुरतेने वाट पाहुनी
कांदा भाकर कवराची
ग्रहण केली त्यांनी
ऋषी पंचमीला असतो
समाधी उत्सवाचा थाट
दूरदूरचे भक्तजन येत त्यात.
🙏🌹जय गजानन माऊली🌹🙏
सौ.रोहिणी दे.मुलंडे ( यवतमाळ)
[9/10, 5:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शेगावचे गजानन महाराज🌹🌹
माघ वद्य सप्तमीस अवतरले गजानन
झाले अवघे शेगाव पावन
जगाच्या कल्याणासाठी संत प्रगटला
दुःख निवारण करण्या गोरगरिबांचे
लीला अनंत केल्या बंकट सदनास
भक्त बापुना भोळा भाविक
दाविलासी विठ्ठल त्याला
पितांबराची घेता परीक्षा
पाने आणलिसी वृक्षासी
पेटविले अग्निवाचूनी चीलमेस
क्षणात आणीले जीवन निर्जल वापीस
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश
सती बायजा अमर जाहली
पुंडलिका सी भगिनी शोभली
ऐकीले तुवा स्वप्नी येवूनी
पुंडलिका सी प्रसाद दिला
भाऊ कवराची झुणका भाकर
प्रसाद अती प्रेमाने सेवन केला
घेतली समाधी ऋषिपंचमीला
पावन शेगावात
दास गणूंनी रचिला "गजानन विजय"ग्रंथ बहुमोल
पारायणी लाभतसे आनंद अमोल
भक्तांचे संकट निवारीले तुम्ही घेऊनिया अवतार
दशमी,एकादशी,द्वादशी पर्वावर
जो करी पारायण गजाननाचे
होई सकळ मनोरथ पूर्ण तयाचे
"गण गण गणात बोते" मंत्र देवूनी
केले अनेकांचे कल्याण
सौ.कीर्ती प्रदीप शेंडे....नागपूर
[9/10, 5:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺शेगावचे गजानन🌺
शेगावचे राणा
गजानन बाबा
मूर्ती दिगांबर
सोवळे पितांबर ll
अवतरली मूर्ती जगी
माद्य वद्य सप्तमीला
येन तारुण्य भित री
उष्ट्या पत्रावळी खाणे अन्न ll
चमत्कार जगी दाखविले
दुःख निवरत जनाचे
करावे मनोरथ पूर्ण
नवस करणाऱ्यांचे ll
पोथी त्यांची विजयग्रंथ
करता पारायण पूर्ण
कांदा भाकर,झुणका
मोदक, नैवद्यासी अर्पा ll
गण गण गणात बोते
भजन सद्गुरुंचे
मुखी गजाननाचे नाव
सदा स्मरावे गजानना स
ऋषीपंचमीलां देह ठेवला
समाधी शेगांवाला
दर्शनास सदा रांगा
शेगावच्या गजाननाला ll
माधुरी भुते
[9/10, 5:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शेगावचे गजानन महाराज
पूर्वीचे शेवगाव
आताचे शेगाव
माऊली गजानना
प्रसिद्ध झाले नाव.
उष्ट्या पत्रावळी
सेवन अन्नाचे करी
रंजल्या गांजल्यांची
विपदा सारी हरी.
चवताळला वारू
मालकास न आवरू
चौखुरात लोळता
शांत झालं लेकरु.
सुकलेली विहीर
तुडुंब भरले निर
आनंदले चराचर
गजाननाचा गजर.
कागांची काव काव
बेजार झाले गाव
दूर जाण्यास सांगे
एक तपानं यावं.
चमत्कार लयी केले
बंकटलाल दास झाले
वाळले वृक्ष पालविले
पितांबराचे दुःख हरले.
मुखी मंत्र सदोदित
गण गण गणात बोते
भक्तांच्या हाकेला
माऊली धाऊन येते.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/10, 10:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शेगावचे गजानन महाराज🙏
शेगावच्या गजानन महाराज अगाध तुझी लिला ,
मूर्ती तुझी ध्यानात राहे मज दिनरात स्मरले तुला,,
शेगावला आहे गजाननाची मूर्ति
पसरली जगी तुझीच कीर्ती, जडले प्रेम तुझ्या वरती पाहता क्षणी चढे स्पूर्ती,,
मंदिरात चाले पोथी पारायण तल्लीन झाले दास नारायण, ठेवूनिया भास लागे चरण शेगावचे महाराज गजानन,,
सोडून गेले बाबा ऋषिपंचमीला
दुःख झाले साऱ्या जनतेला, गजानन बाबा स्वप्नी आले दर्शनाचा लागला ध्यास म्हणाला,,
शेगाव मध्ये रोज दसरा-दिवाळी
खाण्यापिण्याची चिंता न्याहळी ,
अशी गजाननाची महिमा न्यारी
दर्शनासाठी येते नरनारी,,🙏🙏💐🌷🌷🌺
सौ श्वेता स कानतोडे (वैद्य) अमरावती
[9/10, 10:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।शेवगावचे संत श्री गजानन।।
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
माय माझी गुरु माऊली
आहे ती शेगांव निवासी
धन्य धन्य झाले नगरवासी
प्रकट झाली जेव्हा भक्तांसाठी।।
अनेक रुपांची तिची सावली
भासे विट्ठलमुर्ती कधी शिवशक्ती
भाव जसा रेखाटला अंतर्मनी
जाणुन ठसवी रुपदर्शनी।।
कलीयुगाचा देव मानती
सार्या जगात अशी ख्याती
चांगल्या वाईटांची देती प्रचिती
माय माझी गजानन माऊली।।
।।गण गण गणात बोते।।
मंत्र हाच चिंता हरती
एकविस अध्याय पारायण रचती
भक्तांच कल्यान साधती।।
श्रध्दामनी ज्यांच्या अंतर्कनी
चमत्कार घडवी सदैव भारी
दुःख संकटे दुर सारी
सदैव जय गजानन नाम ओठी।।
बोला ..👏जय जय श्रीगजानन
सौं चंदा वनवे शेंडे नागपुर.
[9/10, 10:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 👍 मिरा टिचकुले भंडारा
मिराशे,
शेगावचा गजानन महाराज अगाध तुझी लिला
मूर्रती तुझी ध्यानात राहे
मज दिनरात स्मरते
सोडुन गेले बाबा कूषिपंचमिला
दुःख झाले साय्या जनतेला
गजाननाची महीमा न्यारी
दशॅनाश येती नरनारी।।
मंदीरात चाले रोज पोथीपारायण
झाले तल्लिन सारे सेवक गण
शेगावला आहे गजाननाची मूतीछोटपण त्याची कीती पसरली सार्या जगजेठी।।
प्रेमज़ढले पाहा लोकाचे त्यावरती
गण गण गणात बोंते वदुंनी मंञमूग्धं होती।।
खाऊनी उष्ट्या प्रत्रावळीचे अंत्रं
दाखविला लोका चमत्कार
सरवांना आहे गजाननाचा आधार।।।
गजाननाच्या गं दरबारी गं शेगाव नगरी भक्तजन करती आवडीने वारी
दर गुरूवारी पालखी निघे ही भारी
का लेझिम खेडती हावशीने नरनारी हो हे जय गजानन
गण गण गणात बोंते
[9/10, 10:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के हा सं.प. (११३)
""शेगावचे गजानन""
विदर्भ व-हाड प्रांतात
पुण्यभूमी श्रीचे शेगाव
माघ वद्य सप्तमीला
दिगंबर 'गजानन'प्रगट.
देवदासा घरील पंगत
फेकल्या पत्रावळीचं
उष्ट अन्न करून एकत्र
विदेही बसले खातच.
बंकटलाल दामोदरपंत
यांनी पाहिले स्वामीला
ओठी चिलीम पेटविती
गोसाव्याच्या नवसाला.
जगातून भाविक जणं
येती शेगावी दर्शनाला
गणी गण गणात बोते
दुःख सांगती बाबाला.
आरोग्य सेवा दे दिनदुबळ्यास
चालविते संस्थान अन्नछत्रास
बघावे मंदीर, वाटे जणू स्वर्गच
होतात कार्य दानधर्मानं सर्वच.
दनाअ, नागपूर
दि.१०/०९/२०२०
[9/11, 5:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.६५
पहाटेचा गारवा
ऋतू आहे हिरवा.
बहरला निशिगंध
निसर्ग पसरे सुगंध
बघून प्राजक्ताचा सडा
प्रभू दर्शने मन वेडा.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/11, 5:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
सकाळ सकाळी
लगबग झाली
चोचीमध्ये
घेऊन दाणा
पक्षी भरवी
घास पिल्लांना
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/11, 5:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पहाटवारा 🌺
भूदान चळवळीचे प्रणेते
विनोबा नरहरी भावें
केला वैयक्तिक सत्याग्रह
प्रसिद्धी सर्वोदय नेते.
सौ.विणा द.अतकरी नागपूर.
[9/11, 5:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (५७)
सत्तेला आयुष्यच नाही
सेवेला ना बंधन काही
अहो,खरा तोच माणूस
जो संकटाला सामोरं जाई.
दनाअ, नागपूर
दि.११/०९/२०२०
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प-- 76 वे
शुभ्र वस्त्रात हिरवे स्तृत घेऊन
मोगरा सुगंधात दरवळला
हार ,गजरे अन पूजेसाठी
तोच तबकात सजला ।।
--------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹|| *अलगूज* ||🌹
*क्र.७३*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*मृत विवाहित स्त्रियांचे*
*श्राद्ध करतात नवमीला*
*नका पुजू जीवंत असताना*
*पण सन्मान तर द्या ना तिला*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अंहकार मनाचा गळून जावा
शब्दात माझ्या गोडवा यावा
सुमधुर वाणीनी सुगंध पसरावा
दुसर्यांना आनंद मिळावा
नंदा भोयर
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
*विदर्भाच्या भाषेची कोकणात मजा*
पिशवी घेऊन निघाले मी
आणायला भाजी
हिरवी-हिरवी छान छान
सगळीच होती ताजी
तीन-चार भाजीवाल्या बायका
बसल्या होत्या रांगेत
हिरव्या भाजीचे वाटे करून
ठेवले होते छोट्या जागेत
भाजीवालीला मी मोठ्याने
सांबारचा भाव विचारला
ती पडली विचारात
इथे सांबार कुठून आला
मला म्हणे भाजीवाली
बाय माझ्याकडे सांबार नाय
इडली वाल्याकडे जा
इडली सोबत मिलेल बाय
मला आले खूप हसू
सांबार बोटाने मग दाखवाला
कोथिंबीर पाहिजे काय
तीने भाव सांगितला
कोथिंबीर ला सांबार
आता नाही तशी म्हणायची
विचारतांना सवयी मुळे
गल्लत झाली भाषेची
*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.७१*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*निरागस निर्मल*
*अल्लड बालपण*
*कशातही पटकन*
*रमतं बालमन*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वेळ वाया न घालवता
आनंद घ्या जीवनाचा
कारण आयुष्याचा
खेळ आहे क्षणाचा
***********
सौ. संगीता कढव
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ***************************
*हास्य कविता*
~~~~~~~~~~~~~~
*परीक्षा*
होते मी इयत्ता दुसरीत......
अभ्यास करून गेले परीक्षेला
पेपर खूपच सोपा होता......
पूर्ण अभ्यास पेपरमध्ये उतरला
एका वाक्यातील प्रश्न मी
सोडविले एकाच झटक्यात
रिकाम्या जागाही लिहिल्या
मी एकाच फटक्यात......
चूक शब्द खोडा.......
होता असा प्रश्न पुढचा
चूक शब्द खोडण्यास
वापर केला खोडरबरचा
खोडता खोडल्या जाईना
चुकीचा असलेला शब्द
पेपर फाटून गेला शेवटी
झाले मी एकदम स्तब्ध
अश्रू आले डोळ्यातून
काय करावे काही सुचेना
भीती होती माझ्या मनात
नापास तर होणार नाही ना
बाईंनी समजावले तेवढ्यात
चूक शब्दाला तिरपी रेषा...
मारायची असते बाळा......
नको करू आता निराशा
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
विषय.. हास्य कविता (११४)
""मर्कटलीला""
पावसाळ्यात सरपणाला
शेतात फोडता लाकडाला
लाकुड फोड्यानं पाचरच
ठोकली मोठ्या लाकडाला.
मध्यान्हाला बेत जेवण्याला
तेवढ्यात कळप वानरांचा
पोहचला तिथे खेळण्याला
एक वानर पाचर हलवायचा.
पाचर हलवतांना शेपूट
गेली लाकडाच्या चिरेत
फट्ट पाचर हातात आली
शेपूटच अडकली तिचेत.
आकांताने खेकाऊ लागला
भितीनं कोणी नाही धावला
शेपूट तेव्हा रक्तानं माखली
काही वेळानं तुटून निघाली.
मुर्खपणाचे चाळे पाहुन
सारे सोबती गेले पळून
अंगलट त्या मर्कटलिला
लाजुन गेला शेपूट तोडुन.
दनाअ, नागपूर
दि.११/०९/२०२०
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
करोना
झाले आज महिने सहा
करोनाचे प्रमाण वाढले पहा
शाळा परीक्षा सुट्टया संपल्या
घराला तुरुंग करून गेल्या।
सँनेटायझरने केली कमाल
परफ्यूम ची उडवली धमाल
घरांवर एचसीएल फवारले
सर्वांचे त्याने धाबे दणाणले।
गल्ल्याबोळा झाल्या सुनसान
घरात वाढला कल्लोळ छान
समोसा कचोरी व्यंजन प्रकार
खाऊन झाले सारे ताजेतवान
करोनाने सारे कंबरडे मोडले
रोगराई, आजार दूर पळाले
सर्दी, पडसे ,तापाला घाबरले
झाडपत्ती काढयावर विसंबले
लग्न, पार्ट्या,तेरव्या,मरण
रुसवे, फुगवे, करोना भ्याले
मानपान सारे जागी थांबले
स्वतःसाठी जगू लागले।।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
आठवणीतील एक
गोष्ट सांगते तुम्हाला
लग्न करून आले
मी सासर गावाला ।।
एकदा म्हणे यांना आई
पोपट घेऊन येशील
मी म्हटलं कशाला बरं
आई म्हणे, भाजी करशील ।।
मी म्हटले आईला
भाजी मी नाही करणार
पोपट ची भाजी
कशी काय वाटणार ।।
पोपट ची भाजी ऐकून
मी चकितच झाले
उडणारा पोपट
डोळ्यासमोर चाले ।।
सर्व लागले हसायला
पोपटी ची उसळ मस्त
कधी नाही खाल्ली का
एकदा खाशील तर करशील फस्त।।
----------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्यकविता--
पुरणपोळी
गेली मी मैत्रिणीच्या घरी
ती म्हणे, करते पुरणपोळी
पुरणाचा घाट तिने घातला
नेसली नवी साडी चोळी ।।
पुरणाची पाती केली
कणीक त्यात भरली
पोळी काही जमेना
खूप विचार करू लागली।।
हात पाय धुऊन
नट्टापट्टा केला
पुरणाच्या गोळ्यात
कणकेचा गोळा भरला ।।
पुरणपोळी जमेना
उठ म्हणलं, मी करते
कणकेची पारी करून
पुरण त्यात भरते ।।
लाटून तव्यावर घालते
वरून तुपाची धार सोडते
गरम गरम पुरणपोळी
दोघनाही खायला देते ।।
मैत्रीण म्हणाली, आता कुठं
मी पुरणपोळी शिकली
धन्यवाद ग सखे, करीन
मी आता पुरणपोळी चांगली ।।
----------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
गांजा गेला, गोवर गेला
स्वाइन फ्लू ही गेला
मंग चिकनगुनिया आला
जवान बुढ्याले पार झपाटून टाकला
हैराण झाली होती सारी दुनिया
बुढी झाली हैरान न हैराण झाली मुनिया
रोग्याई चे झाले मोठे हालहाल
ते डी मेडी झाली होती त्याई ची चाल
आता आला कोरोना
कधी मेला जातो काही कळेना
घरात राहून राहून आता करमेना
नाही हॉटेल नाही पार्टी, नाही सिनेमा
सदानकदा बैलासारखा तोंडाले बांधतो मुस्का
याच्या पाई मेकपचा होतो सारा पचका
नाही दिसत गालाची लाली
नाही दिसत वठाची लाली
साडी नेसून नवी मिरवता येईना
मटकाचा आता चान्सच मिळेना
जा रे जा रे आता मेल्या कोरोना!!
रंजना हलमारे( सेलोकर)
साकोली
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के.सा.सं.प.
विषय.. हास्य कविता
""कुठचा भूत कूठचं काय""
शेजारी राहत होत्या ताई
त्यांना नव्हती बिमारी काही
तरीही टेन्शन जास्त घेई
त्यांना वेडेपणाचा दौरा येई.
एक दिवस काय झालं बाई
करू लागल्या पागलावाणी
दवाखान्याची आली गाडी
डॉक्टर, नर्स त्या सर्वजणी.
शेजारचा सद्गृहस्थ आला
त्याला वाटलें भूताने पछाडला
त्याने तिच्या पकडले केसाला
सांग म्हणे कुठं धरले याला.
वडावरचा की पिंपळावरचा?
तिनं त्याच्याकड रोखून पाहिलं
ताडकन कानशीलात हाणलं
भूत तिचं नाही त्याचंच उतरलं.
टेन्शन घेणं काही बरं नाहीं
चांगली बाई पागल होई
अंधश्रद्धा जेव्हा होते बाई
मांत्रिक लोकाची लुडबुड घाई.
सौ.विणा द.अतकरी नागपूर.
दि.११/०९/२०२०
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्यकविता
शेजारचा पिंट्या फारच ईल्लती,
घरबसल्या आणते नुसत्या आफती.
एकदा गेला मामाच्या गावी,
सतर्क झाली मामा,मामी.
मामाच्या घरात लावतो भांडण,
मजा पाहतो दुरून आपण.
नावडत्या भाजीत,टाकतो मीठ वरून,
सगळी भाजी लागते,द्यावी फेकून.
दिवाळीला घरात पेटवले फटाके,
जळून गेले सारे कपडे.
मामाच्या मुलाचे झोपेत कापले केस,
मुलाच्या तोंडाला आला रडून रडून फेस.
मामाच्या मुलानही याची चांगलीच जीरवली,
झोपेतच याच्या डोक्यावर मशीन फिरवली.
गावातली पोर टकल्या टकल्या चिढवू लागली,
तेव्हापासून यान मामाच्या गावची
वाटच नाही धरली.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.11.09.2020
[9/11, 5:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
एक दिवस सपनात
हेमा मालिनी आली
माया संग काम करशीन का
अशी विचारणा केली
मी म्हणल हो उशीर नाही केला
पटकन बसून गाडीत जाऊ मुंबईला
तिच्यासंग मी मुंबईत आली
सिनेमाची माया शुटींग सुरू झाली
मले बाई मंग लयच वाटे मस्त
हेमामालिनी पेक्षा माय फॅन जास्त
कपडे माये अलग सॅंडल होतीउंच
मग काय मले खुला होता मंच
मोठ-मोठ्या हिरोबरोबर
ओळख मायी झाली
सकाय झाल्या बरोबर
जाग मले आली
काही म्हणा बाई मले झोप मस्त आली
सारी रात माई हेमामालिनी संग गेली
सौ नंदा भोयर
[9/11, 5:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
🐱 मांजरीच पिल्लू🐱
माझ्या घरी होत एक मांजरीच पिल्लू
नाव ठेवल होत त्याच टिल्लू
आईचा करायचा फारच लाड
आईचा जसा कुकुला बाळ
एकदाची गंमत सांगते मी त्याची
मामा ,टिल्लू आणी रक्षाबंधनची
रक्षाबंधनला आले होते मामा
टिल्लूनी केला खोडकर ड्रामा
मामा माझे गोल मटोल
पोटही त्यांच गोलगोल
रात्र झाली ,आम्ही सारे झोपलो
मामा वर,आम्ही खाली झोपलो
मामा लागले घोरायला
टिल्लू लागला खेळायला
मामाच्या पोटावर जाऊन बैसला
आणी जणु खुदकन हसला
मामाच्या पोटावर उड्या मारू लागला
मस्त वरखाली डावडाव होऊ लागला
मामाला आली चटकन जाग
त्याला पाहील पण,नाही आला राग
उद्या जातोच रे सोन्या ,मी माझ्या गावाला
त्रास नको देऊस रे
माझ्या पोटाला
अस आमच मांजरीच पिल्लू
नाव ज्याच होत टिल्लू🐱
सौ निकीता हेमंत भोयर
[9/11, 5:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता*
*डोंगर गड ची यात्रा*
नवरात्रात डोंगर गड ले
यात्रा भरते मोठी
आमच्या यांनी ठरवल
मित्रांसोबत जायचं तेथी
मीन मनलो,मी बी येतो
न्या मले संग
नाई म्हणे त त्याईच्या वर .
डोळे वटारले मिनं
नवरात्रात सर्वांच्या आंगी
संचारते देवी
घरच्या देविषी पंगा घेणं
बरं नव्हे धनी😄
ते मित्र आम्ही मैत्रिणी
गेलो संग संग
तीत पायातो तर लई
जमले होते लोकं
पोलीसानं काडी धरली
वेगळे केले बाया माणसं
काडी सोडली का ढोराईच
गोवन सुटल्याबाणी धावे
बाया माणसं
गर्दी पाऊण हेत बाप्पा
थांबूनाच. गेले
आमाले बाप्पा गोवणात
फरफटत नेले
मांग. पाहायला जागा नाई
ढकलत ढकलत पुढे गेलो
रात्रीची वेळ झुळझुळ वाऱ्या संगे मजा घेत गेलो
गर्दी मंदी देवही लई जवळ
दिसते
देवा संग भेटण्या
मन आतुर होते
देऊळ पाहून एका बाईन
चप्पल हातात धरली
मीन विचारलं तू हे का करून राह्यली
त ते म्हणे एवढं दूर आलो
चपला मधीच मन राहीन
पिशवीत ठेऊन बिन्फिकर
राहीन तर देवीले
डोळा भर तरी पाहीन
आश्शी बाई बायकां ची
गोष्ट असते न्यारी
पायता पायता माई बी
सफल झाली वारी🙏
सौ अंजली हेमंत बांते भंडारा
[9/11, 5:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
***********
ग्रामीण हास्य कविता
फ्याशन
---------------------
कलियुगात फ्याशन आली
दामोकार वागायला लागली.
नवरा बसला मागे
ही फटफटी चालाय लागली.
हळदीकुंकू हिने देवीला वाहिले.
आन टिकली लावाय लागली.
तोंडाला पावडर आन ओढाला लाली.
ही मोबाईल चालवायला लागली.
केसाचे वजन डोक्यावर झाले
आन ही बाबकट करायला लागली.
हातातल्या बांगड्या फेकल्या
आन ही घड्याळ लावाय लागली.
निवडून आली बाय सभेत
सरपंच झाली.
नवरा बसला घरात रिकामा ही हॉटेलात जया लागली.
कलियुगात फ्याशन आली
दामोकार वागायला लागली
नवरा बसला मागे
ही फटफटी चालाय लागली.
सौ.
प्राजक्ता रेहपाडे
पुणे
********
[9/11, 7:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: Il हास्य कविता ll
भूत (सत्य घटनेवर आधारित)
नागपुरात शिकताना गेलो मित्राकडे
अभ्यास करून झोपलो तेथेच
खेड्यातून एक मित्र आला
तो ओट्यावर जाऊन झोपला
अमावस्या त्या दिवशी होती
भूत फिरते असे मित्र संगती
उन्हाळ्याचे दिवस गर्मी फार
कसेबसे आम्ही झोपलो चार
रात्रीचे वाजले मग बारा
भूत पायऱ्या चढून आला तरातरा
ओट्यावरच्या खिडकीतून टाकला हात
ओट्यावरचा मित्र दचकला जोरात
डोळे उघडले पुढे खिडकीत पाहिलं
पांढरे दात न भूत त्याला दिसलं
भुय भुय म्हणून जोरात कल्ला
ओट्यावर तो खालीवर झाला
सगळे घाबरून लाईट लावला
भूत काही दिसेना दार उघडला
आमच्या कल्ल्यानं लोक झाले जागे
भूत दिसला मग गेट मध्ये
खेड्यातला पोरगा मी
धावत पायऱ्या उतरलो
गेटमधून धावत जाऊन
भुतालाच पकडलो
हात धरून आणला लोकांकडे
चिमटा घेऊन दावला लोकांपुढे
भूत म्हणून सांगता आम्हाला तुम्ही
पोरगी ही अभ्यास कसा करू आम्ही
आमचा मित्र घाबरला बोलत नाही
कोणालाच कशी कीव नाही
सकाळीच उठलो गेलो बहिणीकडे
गायलो जाऊन भुताचे पोवाडे
गेलो कालेजात मित्रही आलीत
बरा झाला म्हणे तू गेला सकाळीच
मोहल्ल्यातील जमा गुंड मवाली
रूमवर भेटता वाट असती लावली
सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.६७
मनीचे गूज सांगते ईश्वरा
तुझ्या तेजानं उजळावी धरा
कणाकणात फुलावा चैतन्य
प्रभात वंदन जोडून द्विकरा.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (५८)
उन्हाने वाढते दाहकता शरिराची
पैश्याची उब वाढवे गर्मी मनाची
ज्ञानयोगी जव होतो अभिमानी
समजावा त्याचा गेला हो प्राणची.
दनाअ, नागपूर
दि.१२/०९/२०२०
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पहाटवारा🌺
अडचणी अनेक मनात
आयुष्यात काही नसती
मनावर विजय मिळवा
आपोआप मार्ग निघती
सौ.विणा द. अतकरी नागपूर.
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प-- 77 वे
पाणी पडे आभाळातून
थेंब थेंब थेंब रे
नाचू गाऊ आपण सारे
धरणीमाय साथ रे ।।
---------------------------------
मंगला डहाके भंडारा
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
कोवळं ऊन पडलय
चमके सूर्याची लाली
हास्य मधुर येऊ दे
सखी तुझ्या गाली
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सखे तुझ्या मैत्रीने
जीवनात मिळते सुख
मैत्री तुझी नि माझी
अशीच राहूदे हसतमुख
शुभ सकाळ
नंदा भोयर
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.७२*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*परोपकार शिकवी*
*आपला निसर्ग*
*अवनी वाटे*
*निसर्गा संवे स्वर्ग*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
क्रमांक ६४
*वाढती बेरोजगारी*
***************************
पिढी शिकली सुशिक्षित झाली
पण भारत पडला आजारी.....
मनाने अपंग झाले कुणी.......
कारण *वाढती बेरोजगारी*
खस्ता खाऊन शिकले तरुण.....
फर्स्ट क्लासची डिग्री त्यांच्या हाती
बेरोजगारीच्या टांगत्या तलवारीने
केली त्यांच्या आयुष्याची माती...
नोकरी मिळाली नाही म्हणून
उद्योग करायचा विचार केला
कॉलेजची अमाप फीस भरून
बापाचा पूर्ण पैसा खर्च झाला
तरुणाच्या मानगुटीवर बसलं
बेरोजगारीचं भूत नेहमीसाठी
रोजगाराची कवाडं उघडतील का
कुणी आजच्या तरुण पिढीसाठी
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: तरुणांमधील वाढती
बेरोजगारी
भारतीय लोकसंख्या वाढीवर
त्यात तरुणाई चढीवर
शिकून सवरून मोठी झाली
नोकरीसाठी बाहेर पडली।
एमपीएससी, युपीएससी
सरकारी नोकरी साठी
दिनरात अभ्यासात गढली
निकाल पाहून खाली बसली।
सुरू करण्या उद्योगधंदयास
जवळ पुरेसे भांडवलच नाय
मेकइंडियाची ऐकली घोषणा
पण तेथेही झाली निराशा।
शेतीत नवीन प्रयोग केले
निसर्गलहरीने तेही फसले
मेषपालन,कुकुटपालन झाले
हाती मात्र काही नाही उरले।
काम नाही ,धंदा नाही ,
शिक्षणाला तर किंमतच नाही
समाजात वाढली बेरोजगारी
मनातुनच खचली तरुणाई।
सौ.सरोज मते
दारव्हा
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वाढती बेरोजगारी--
खस्ता खात, शेती विकून
उच्च शिकविती मुलाला
तरी नोकरी ना मिळे
न्यूनगंड येई मनाला ।।
प्रत्येकाला हवी नोकरी
व्यवसाय ,उद्योग धंदे नकोत
न मिळे हाताशी काही
व्यवसायाशी मिळवती हात ।।
भारत देशात ही
दुर्दशा घडत आहे
तरुण नोकरी पाई
प्राण गमवत आहे।।
तरुण बेरोजगारीवर
उपाय कुणी सांगेल का
मुलांसोबत कुटुंबही
हर्षित मनाने जगेल का ।।
------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.स.प. (११५)
""वाढती बेरोजगारी""
अहो,संकटावर संकटे आली
माणसाची पार दैना झाली
वाढत्या बेरोजगारीला पाहता
नैराश्यता जिवनात आली.
शिलेदारांन नोटबंदी केली
व्यापारी लोका चिंता झाली
मालकाच्या काळ्या पांढ-यात
धंद्याचे बंदीनं नोकरी गेली.
महामारीत टाळेबंदी झाली
उद्योग धंदे बंद होवू लागली
बेरोजगार झाल्यानं मजुरं
सैरावैरा स्वगावी पायी गेली.
खाजगीकरणात पगार कमी
नोकरीची आहेच कुठं हमी
कसंकाय भराव पोट आम्ही
पगाराचा तर काही खरं नाही
तरुणवर्ग शिकले सवरले
आशेत बापाने खर्च केले
स्पर्धा परिक्षेच्या तयारीला
जिवापाड अभ्यासा भिडले.
नोकर भरती पाहून थकले
उमेदीचे वर्ष निघून चालले
खाजगीकरणानं कसे झाले
बेरोजगारीचे लोंढे भटकले.
दनाअ, नागपूर
दि.१२/०९/२०२०
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *वाढती बेरोजगारी*
शिकलेल्याची झाली गर्दी
अंगावर चढली पांढरी वर्दी
ज्याला त्याला हवी नोकरी
वाढत चालली सुशिक्षित बेकारी
शेती नको कुणाला
ऊन लागते अंगाला
स्वप्न मोठ-मोठे उरी
शिकलेला फिरतो आहे दारोदारी
दिशाहीन झाला तरुण
सुचेनासं झालं काही
सगळे उपाय हरले त्याचे
हात टेकले पैशापायी
बाप करतो शेती
पैसा नसतो हाती
पैसे कुठून भरेल
पोराच्या नोकरीसाठी
पैशाशिवाय नोकरी नाही
गुणवत्तेला किंमत नाही
खोटी आशा मनात राही
नोकरीचे स्वप्न हे स्वप्नच राहि
नंदा भोयर
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: Il वाढती बेरोजगारी ll
पोरगा शिकून मोठा होईल
असं वाटत होतं बापाला
म्हणून त्याच्या शिक्षणासाठी
त्यानं विकला जमीन जुमला
शिकून झालं आली डिग्री
पोराच्या मग हाता मंधी
बाप जाम खुश झाला
सांगे चार चौघा मधी
डिग्री घेऊन फिरू लागला
नोकरी करिता दारोदार
सगळी दारं बंद दिसती
कोणी ना घेई कारखानदार
जागे साठी एका एका
लागत होत्या लांब रांगा
वाढत होती बेरोजगारी
शिक्षित तरुण तरुणी घरोघरी
कोरोनाच्या काळात कहर झाला
ज्याचा होता रोजगार तोही गेला
वाढत्या बेरोजगारीन झाला भकास
कसा होईल देशाचा विकास
सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: तरुणांमधील वाढती बेरोजगारी
लोकसंख्या भस्मासुर भारतात या
त्यात नगण्य तरुणपिढींची संख्या ही
शिकुन सवरुन तरुण रिकामे
नोकरी नाही धंद्याची लाज
वाटे शेती करण्याची लाज ही..,.,..
शिकुन शहाणे मोठी,झाली
नोकरी बाहेर पडली
सरकारी नोकरीसाठी
दिवसरात्र अभ्यासात गढली.......
जोतो म्हणे नोकरी हवी
शेतीउद्योग नको ते
राबराब राबुनी
हातात काही न मिळते......
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *वाढती बेरोजगारी*
वाढती बेरोजगारी
आली आपल्या भारतात
यातून बाहेर कसं पडाव
मार्ग नाही सापडत ।।
एक एक पैसा जमा करून
बाप पोरांना शिकवतो
उद्या चालून नोकरी लागेल
याच आशेवर तो राहतो ।।
पावसावर अवलंबून असते
शेतकऱ्याचे जीवन
कधी पाऊस घात करतो
शेतकऱ्याचा जीव घेऊन ।।
स्पर्धा वाढल्या आहेत
खूप या जगात
मुलं झाली हताश
या स्पर्धेच्या युगात ।।
-----------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वाढती बेरोजगारी
भारतातला बेरोजगारी
हा बिकटच प्रश्न,
तरुणपिढी ल आव्हान
शिकून सवरून बसली
नोकरी नाही पदरात.!!
व्यवसाय करावयास
भांडवल मोठे,
व्यवसायाचा ताळमेळ
न बसला तर
तर नुकसानच मोठे!!
शेती करावयाची
निसर्गावर अवलंबून
आळस अंगी बांधला
तर शेती कुठे पीके!!
तरुणांनौ धीर नको सोडू
तुमची आवड ज्यात त्याचे
कौशल्य अंगी जोपासू महत्त्वाकांक्षा ठेवून !!
विकासाचा वाटा शोधू
बेरोजगारीला उधळून लावू!!
माधुरी भुते
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वाढती बेरोजगारी
ट्युशन कलासेस लावले भारी,
मुलांच्या डोळ्यात स्वप्ने न्यारी.
डॉक्टर,इंजिनिअर,सिव्हिल सर्व्हिसची तयारी,
शहरात जाऊन शिकती सारी.
आई वडिलांच्या उरी आशा,
शिकून मुल होईल राजा.
चिमटा पोटाला घेऊन शिकवू,
मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवू.
पै पै पैका करून खर्च,
शिकवले मुली अन् मुल.
हातात आली कॉलेजची डिग्री,
बेरोजगारीन तरूणपिढी घरात बसली.
जगण्यासाठी लागतो पैसा,
काही केल्याशिवाय येईल कैसा.
वाढत्या बेरोजगारीन दिला दगा,
शिकली मुले वाटती साऱ्यांना बोजा.
तरूणपिढी वाया न घालवू,
कला कौशल्य अंगी बाणवू.
बेरोजगारीचा फज्जा उडवू,
उन्नतीचे मार्ग शोधू .
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.12.09.2020
[9/12, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 😔वाढती बेरोजगारी😔
माय बापाच स्वप्न एक
मुलामुलींना शिकवुन बनवावं नेक
त्याकरीता चालें कष्टांचा खेळ
रात्रदिवस राबुन घाली पैसांचा मेळ।।
अशी मनोकामना प्रत्येक नागरिकांची
आधुनिक युगाची स्पर्धा भारी
स्पर्धत टिकावे मुले आपली
होते नव्हते सर्वच लावले शिक्षणांसाठी।।
मुलेही करती मेहनत फार
रात्रंदिवस जागुन करती अभ्यास
मिळवुन घेती डिग्री हजार
मेहनती कामांची वाटे लाज।।
नोकरीसाठी फिरती दारोदार
रोजगार नाही बनती गुन्हेगार
पैसा कमवणे हीच गरज आज
तरुण पिढींचा असे एकच ध्यास।।
यावर सरकारने तोडका काढावे
कला कौशलचे ही शिक्षण द्यावे
जे काम मिळेल ते करीत राहावे
नोकरीचे सतत प्रयत्न ठेवावे।
तरच होईल देशाचा विकास
बेरोजगारांनाही मिळेल काम
गुन्हेगारीवर बसेल आळ
वाढत्या बेरोजगारी वर रामबाण उपाय।
सौं.चंदा वनवे शेंडे नागपुर.
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वाढती बेरोजगारी
सर्वप्रथम ज्यानी आपल्यासाठी शिक्षणाची दारे उघडी करून दिली शिक्षणाच्या प्रचारासाठी अपार कष्ट सहन केलेमानअपमानाची पर्वा न करता समाज शिक्षित व्हावा म्हणून खूप झटले. कारण समाज शिक्षित झाला तर देश सुधारेल हा त्यांचा उद्देश. राजश्री शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, फुले दांपत्य, गोपाळ कृष्ण गोखले. त्यांचा उद्देशही सफल झाला. आनंदीबाई भारताच्या पहिल्या डॉक्टर तर सावित्रीबाई प्रथम शिक्षिका. या सगळ्यांचे शतशः आभार मानते.
आज प्रत्येकाला शिक्षणाचे महत्त्व कळलं आहे. गरीबातला गरीब व्यक्तीसुद्धा आपल्या मुलाला उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. शिकून सवरून मोठी झाल्यावर व डिग्री मिळाल्यावर प्रत्येकाला नोकरीच हवी असते डिग्री असल्यामुळे मजुरी करायला त्यांना लाज वाटते( मग दिवसभर टपरी राखली तरी चालेल). कमाई नसल्यामुळे युवकांची किंमत कमी होते कारण आई-वडील बायको-मुलांना त्याच्याकडून फारअपेक्षा असते. पण त्यांची समस्या फार बिकट असते नोकरी कुणाकुणाला मिळणार?
या गोष्टीसाठी आजचा तरुणही जबाबदार आहे. शेतीकडे वळायची कुणाची तयारीच नाही. युवकांनो शेती करा कष्ट करायची तयारी ठेवा व आपल्या शिक्षणाचा उपयोग आधुनिक पद्धतीने शेती करून नवनवीन प्रयोग करा. म्हणजे आपल्या कृषिप्रधान देशाची शान आणखीनच वाढेल. हाताला कामही मिळेल व बेरोजगारी ची समस्या नक्कीच कमी होईल. स्वाभिमानाने जीवन जगा कारण आजचायुवक हाच देशाचा कन्हाआहे.
रंजना हलमारे( सेलोकर)
साकोली
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🤦♀️बेरोजगारी🤦♂️
गरीबांपुढे आहे गरीबी आणी लाचारी
मुलांच्या शिक्षणासाठी बाप फिरतो आहे दारोदारी
ज्याच्याकडे पैसा त्याच्याच दारी सरकारी नोकरी
गरीब तरूणांपुढे उभी आहे बेरोजगारी
उच्चशिक्षीत असला जरी, करतो आहे पुढारयाची चाकरी तर,
कुणी करत आहे चपराश्याची नोकरी
याला जबाबदार आहे वाढती बेरोजगारी
व्यवसाय करायचा तर, पैसे आणायचे कोठूण
शिक्षणाच्या खर्चापायी
मायबाप गेले तुटूण
कधी मिळेल नोकरी हा,
प्रश्न कधी सुटेल का?
बेरोजगारीचा काळोख प्रकाशात बदलेल का?
जागा असतात पाचशे
फाॅमॆ भरतात पाचहजार
या फाॅमॆच्या फिजपायी
तरूण झाले आहे बेजार
ज्याची जी कुवत त्याला,
तेच काम मिळेल का?
देशातुन आपल्या ही बेरोजगारी सरेल का?
सौ निकीता भोयर , यवतमाळ
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वाढती बेरोजगारी
भारत देशात लोकसंख्या वाढत असल्यामुळेच तरुणांची बेरोजगारीची संख्याही वाढत आहे. स्वतः खस्ता खाऊन शेती विकून मुलांना शिकवतात आणि पदवीधर, पदव्युत्तर करतात . आजही विज्ञान युगात तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी ची समस्या ही बिकट आहे. कित्येक समाजसुधारकांनी जसे- राजश्री शाहू महाराज ,महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारं सताड उघडी करून दिलीत. प्रत्येकाला आज शिक्षणाचे महत्त्व ही कळले आहे, मुलं आज उच्च शिक्षण घेतात तरीही तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी ही समस्या वाढतच आहे . शिकलेली मुलं ही नोकरीच्या मागे लागतात, कुठला व्यवसाय करून प्रगत करावा हा विचार देखील करत नाहीत, जेव्हा हाताशी काहीच मिळत नाही तेव्हा, ते उद्योगधंद्याकडे वळतात .
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे पण शेती करताना देखील निसर्ग केव्हा आपला घात करेल, हे सांगता येत नाही .कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ ,कधी अतिवृष्टी होऊन आलेले पीक जाते, तर कधी इतका तप्त होतो की त्यामुळे पीक सुकून जातात काहीच कळत नाही ,त्यामुळे शेतकरी सुद्धा हैराण झालेले आहेत .आता तर कोरोना महामारी मुळे बरेच उद्योग धंदेही शिथिल झालेले आहेत ,पुन्हा बेरोजगारी वाढणार देशाची आर्थिक परिस्थिती आणि अंदाजपत्रक पूर्णपणे ढासळणार. अशावेळी वाढती महागाई सर्वसामान्यांना जीवघेणी ठरणार आहे ,अशावेळी स्वतःला ओळखून स्वतःचा आत्मविश्वास जागृत करून ,आपण काय करू शकतो, त्यावर थोडा विचार करून, स्वतःचा व्यवसाय सुरु करावा आणि प्रगत करावा असे मला वाटते, धन्यवाद 🌹🙏
मंगला डहाके, भंडारा
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: भारताची वाढती लोकसंख्या आणि त्याच्यामागे भारतातील वाढता बेरोजगार हे दोन्ही प्रश्न आपल्या समोर आहे.
सध्या भारतात खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी, बेकारी भूकबळी, शेतकऱ्याची आत्महत्या, त्याचे फार मोठे थैमान चालू आहे. भारतात भारत हा शेतीप्रधान देश आहे. आणि शेती ही पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाची अतिवृष्टी किंवा अनावृष्टी यामुळे दुष्काळ पडतो त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. आता शेतकरी सुद्धा खूप त्रासलेला आहे कारण कधी पाऊस बरोबर पडत नाही तर कधी खूप जास्त पडतो त्यामुळे त्यांचे खूप नुकसान होत असते त्यामुळे त्यांचं सुद्धा कल वाढलेला आहे की नोकरी मिळावी म्हणून शेतीत काहीच ठेवलेला नाही असं त्यांना वाटतं.
आपण सर्व शिक्षणावर खूप भर देतो पण आपल्याला नोकरी मिळेलच याची शाश्वती नसते स्पर्धा खूप वाढलेल्या आहेत आणि ज्याच्याजवळ पैसा आहे तोच आपल्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये घालू शकतो गरीबाचा मुलगा हुशारही असला तरी तो मागे पडतो त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे सुद्धा तो मागे येतो.
शिक्षण पूर्ण होऊन नोकरी मिळत नाही त्यामुळे तरुण पिढी हताश होतात पण हताश न होता आपण जे मिळालं ते काम करावं काम मोठे किंवा छोटे नसते. कुठलेही काम मन लावून केलं तर यश आपल्याला नक्कीच मिळेल. त्या अनुभवातूनच आपण खूप काही शिकू शकतो.
----------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: Il वाढती बेरोजगारी ll
पोरगा शिकून मोठा होईल
असं वाटत होतं बापाला
म्हणून त्याच्या शिक्षणासाठी
त्यानं विकला जमीन जुमला
शिकून झालं आली डिग्री
पोराच्या मग हाता मंधी
बाप जाम खुश झाला
सांगे चार चौघा मधी
डिग्री घेऊन फिरू लागला
नोकरी करिता दारोदार
सगळी दारं बंद दिसती
कोणी ना घेई कारखानदार
जागे साठी एका एका
लागत होत्या लांब रांगा
वाढत होती बेरोजगारी
शिक्षित तरुण तरुणी घरोघरी
कोरोनाच्या काळात कहर झाला
ज्याचा होता रोजगार तोही गेला
वाढत्या बेरोजगारीन झाला भकास
कसा होईल देशाचा विकास
सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ....वाढती बेरोजगारी...
******
वाढती बेरोजगारी ही देशासाठी एक गंभीर समस्या आहे. आजच्या computerआणि mobile च्या चकचकीत युगातही बेरोजगारीची समस्या ठाण मांडून आहे. भारताची अर्थ व्यवस्था मंदीमुळे ठप्प झाल्याने देशातील रोजगार निर्मीतीवर विपरीत परिणाम झाला आहे. असं नाही की मुले शिकलेली नाहीत, आजचा प्रत्येक मुलगा व मुलगी उच्च शिक्षित आहेत आणि उच्च शिक्षण घेत पण आहेत. परंतु शिक्षण घेऊन पण आजच्या परिस्थितीत नौकरी मिळेल याची खात्री नाही. आधी 10-15 लाख donation देऊन नौकरी मिळायची. आता mpsc, upsc चे classes मोठ्या प्रमाणात open झाले आहे. आणि बरेच मुलं या compatetive exam कडे वळलेले आहे.कारण तिथे merrit bess वर job मिळते. सरकारने vacancy काढणे पण आवश्यक आहे. बेरोजगारी वाढण्यामागे कुठे ना कुठे सरकार पण जबाबदार आहे.निवळ आश्वासन देऊन चालणार नाही तर सरकारने योग्य धोरण आखून त्या धोरणावर अमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्या-त्या क्षेत्रात टप्याटप्याने vacancy काढून exam घेऊन पात्रतेच्या आधारावर भरती करायला हवी. आपल्या देशातील कित्येक तरुण नौकरी साठी विदेशात जातात. उद्योग, लघु उद्योग, मोठे उद्योग, शेती क्षेत्रात पण आजची तरुण पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम करत आहेत. पण शेती तर पूर्ण पणे निसर्गावर अवलंबून आहे. उद्योग धंद्यांमदे पण होणारा तोटा, नुकसान सहन करून धंदा सावरता आलं पाहिजे
येणाऱ्या समोरच्या वर्षात आर्थिक मंदी दूर होऊन आपल्या देशात भरपूर प्रमाणात नौकऱ्या उपलब्ध होवोत अशी आशा करते.
सौ. संगीता कढव, भंडारा
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ... वाढती बेरोजगारी..
*****************
आपल्या भारत देशात बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे.
याला कारण म्हणजे आपली वाढती लोकसंख्या.
आज कितीही गरीब असला तरी त्याची एकच इच्छा असते की माझा मुलगा शिकला पाहिजे. त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली पाहिजे.
पण तसं काही होतच नाही.
व्यवसाय करायचा म्हटलं तर पैसा नाही. शिक्षणाच्या या खर्चामुळे बापाची उसनवारी होते.
अशावेळी मुलं खूप हताश होतात.
म्हणून म्हणते कि आपल्या भारत देशातून ही बेरोजगारी कधी संपेल?
सौ. नीलिमा ठवकर (पिंगळे)
यवतमाळ
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🍁 वाढती बेरोजगारी🍁
भारत हा लोकशाहीचा देश आहे. विविधतेने नटलेला आपला हा कृषिप्रधान देश आहे. प्रत्येकाला स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची मुभा आहे.. परंतु कुठेतरी देशाला आज बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे .एकीकडे वाढती लोकसंख्या आणि दुसरीकडे तरुणांमध्ये बेरोजगारी चे प्रमाण वाढते आहे.कारण सर्वांचं स्वप्न एकच असतं की खूप शिकायचं खूप मोठा व्हायचं आणि छान नोकरी करायची. शिक्षणाचा उपयोग फक्त नोकरीसाठीच अशी त्यांची कल्पना होऊन बसली आहे. नोकरीच्या शोधात ते व्यवसाय, शेती याकडे दुर्लक्ष करतात. आपला देश शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण आधुनिक शेती करण्यासाठी देखील करू शकतो. उत्तम व्यवसाय करू शकतो. परंतु आपल्या डोक्यात असते फक्त नोकरी. आई-वडील पैसे लावत असतात मुलं शिकत असतात आणि नोकरीची वाट बघत असतात. यात वर्षानुवर्ष निघून जातात आणि रोजगाराची समस्या निर्माण होऊन जाते. एकविसाव्या शतकाच्या या तरुणांमध्ये डिप्रेशन, व्यसनाधिनता अशा समस्या उद्भवतात. Computer च्या या युगामध्ये तरुणांनी खंबीर उभे राहायचं असतं तेव्हा वेळ येते ही वाढत्या बेरोजगारीची..
देशाच्या वाढत्या बेरोजगारी कडे सरकारनेही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. स्पर्धात्मक परीक्षा घेऊन, कोणाकडून नौकरीचे पैसे न घेता, जागा भरायला हव्या. तेव्हा कुठे बेरोजगारी कमी होवून तरुण सक्षम उभा होईल.....
सौ.अश्विनी अमर सपाटे लुटे
अमरावती
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वाढती बेरोजगारी
भारताची लोकसंख्या अफाट आहे.त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण हे वाढणारच. अर्थव्यवस्था मंदीमुळे ढासळली आहे.टेक्नाॅलाॅ जीच्या या युगात उच्च शिक्षित असूनही नोकरी मिळेल याची गॅरंटी नाही.competative exm मध्ये तर खूप competition बघायला मिळत आहे.दिवसरात्र मेहनत घेऊनही, या स्पर्धेच्या युगात मुलांना अतिशय हलाखीच्या परिस्थिती ला तोंड द्यावे लागत आहे.बिकट समस्या आहे.त्यामुळे काही मुले तर depression मध्ये देखील गेलेली आपण बघतो.मुला मुलींना समान हक्क दिल्यामुळे,आता मुली पण सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. मुले मुली दोन्ही नोकरीच्या वाटेवर असतात.आधी फक्त मुलेच जास्त नोकरी वर असायची त्यामुळे एवढी बेरोजगारी दिसत नव्हती.वरून लोकसंख्या वाढलेली.आता होत असे आहे की,मुलांच्या तुलनेत मुलींचा competitive मध्ये पण कट ऑफ कमी असतो.त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुली समोर जात आहेत.मुली नोकरीवर तर मुले बेरोजगार,अशी सध्याची परिस्थिती आहे.मुलांची फार वाईट स्थिती आहे.मुले ही गोष्ट घरी शेअर करतात.मुलींना फी माफ आहे.आपली मुलगी सेल्फ बनली पाहिजे,जेणेकरून भविष्यात काही घडले तर ती परिस्थितीचा सामना करू शकेल.यासाठी मुला मुलींना दोघांनाही नोकरीची गरज आहे.म्हणून जास्तीत जास्त vacancy काढणे काळाची गरज झालेली आहे.अशावेळी उद्योगाची साथ घेणे गरजेचे राहील. उद्योगक्षेत्रात प्रशिक्षण घेऊन उद्योगाकडे जर पाऊल उचलले तर बेरोजगारी कमी होऊ शकते.त्या साठी सरकारने,छोटे,मोठे उद्योग आणण्याची व त्यासाठी लोन मिळण्याची जर व्यवस्था केली, तर बेरोजगारी कमी होऊ शकते.मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियल कंपन्या जर भारतात आल्या तर त्याचा अधिक फायदा होऊ शकतो.आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय केला तर तेही एक चांगले माध्यम आहे.सरकारने या साठी जागरूक होऊन लक्ष देणे गरजेचे आहे.
सौ.कीर्ती प्रदीप शेंडे...नागपूर
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वाढती बेरोजगारी
आपल्या देशातील वाढत्या बेरोजगारी ला कारणीभुत काही अंशी आपणच आहोत.जर आपण कमवा आणि शिका हेच धोरण चालू ठेवलं असतं तर अवढ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली नसती.पूर्वी शेती हाच मुख्य व्यवसाय होता.पैसे मोजके होते तरी मुले ,मुली शिकत होते,आणि मिळेल ते काम करण्याची तयारी होती.
आता जसजसा शिक्षणाचं दर्जा वाढत गेला,मुलांजवल मोठया मोठ्या डिग्र्या आल्या,अर्थातच त्यांच्या अपेक्षा वाढल्या.आणि आणखी एक मुख्य कारण म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या.आपल्या देशातली बेरोजगारी हा बिकट प्रश्न आहे आणि याकरिता नवीन कंपन्या महाराष्ट्रात,भारतात उघडायला पाहिजेत.याकरिता युवा पिढीने पुढाकार घेऊन प्रयत्न करायला पाहिजेत.आपल्या हक्कांसाठी लढायला पाहिजे.आपल्या स्किल्स वापरून नवीन उद्योग उभारायला पाहिजेत.आताची पिढी त्याकरिता ही पालकांकडू
मोठ्ठ्या गुंतवणुकीची अपेक्षा करते.
सौ अंजली हेमंत बांते. भंडारा.
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वाढती बेरोजगारी.
आज आपल्यासमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे ती म्हणजे बेरोजगारी!
सगळे आपल्या मुलाला उच्च शिक्षण प्राप्त होण्याकरिता झटत आहे.माझा मुलगा उच्च शक्षित झालं की त्याला चांगली नोकरी मिळेल,अश्या भ्रमात आपण आहोत.उच्च शिक्षण घेणारा कुठे धंदा करणार त्यालाही चंगल्या नोकरीची अपेक्षा राहणार.
नोकरी करणारा सुखी कारण त्याला छान सुट्या मिळणार,हवं त्यादिवशी रजा घेऊन घरी राहता येणार.असा सगळ्यांचा समज असल्यामुळे सगळी मंडळी नोकरीच्या मागे लागलेली दिसते.
बेरोजगारी च एक मोठं कारण म्हणजे वाढती लोकसंख्या.आज मुली सुद्धा मुलाबरोबर उच्चशिक्षण नोकरी करत आहे.ही चांगलीच बाब आहे त्यात शंकाच नाही.पण ५० पैकी २५ ते ३० जागा ह्या मुलींनी व्यापून घेतल्यामुळे बाकीचे २५ ते ३० मुलं बेरोजगार झाले. हे पण बेरोजगारी च कारण माझ्या मते असू शकते.
का आपण धंद्यात उतरत नाही.धंद्यात उतरून चार लोकांना रोजगार देऊ शकतो.पण आजच्या लोकांचा असा समज आहे की कोण ती डोकेदुखी करणार मी आपली नोकरीच करेन.
भारत देश हा क्रू शी प्रधान देश आहे.पण शेती करणारे बोटावर मोजता येईल इतकेच या क्षेत्रात आहेत.आज शेती करणारा सर्व बाजूने त्रस्त आहे हे आपण जाणुनच आहे. त्यात एक भर शेतकरी मुलगा कितीही सदन असू दे त्याला चांगली शिकलेली मुलगी देण्यास त्या मुलीकडील मंडळी तयार नाही हे वास्तव आहे.
म्हणून मझ्या मते जे काम मिळेल ते करण्यास तरूणांसोबत घरची मंडळी तयार असणे काळाची गरज आहे.
म्हणून फक्तं नोकरीच्या मागे न लागता जे काम मिळेल तयार होऊन काही अंशी बेरोजगारी कमी करू या.
🙏धन्यवाद🙏
सौ.रोहिणी दे. मुलंडे.(यवतमाळ)
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: llवाढती बेरोजगारी ll
भारत देशा मध्ये वाढती बेरोजगार संख्या वाढत चालली आहे. याचे कारण मुळात लोकसंख्या आहे.कुटुंब मध्ये सदस्य संख्या सात आठ,असते आणि कमावणारे दोन,किंवा एक असे असतात.त्यामुळे सामान्य गरजा ही भागत नाही .अशातच ज्यांचा घरी तीन चार मुले असली तर त्यांना धड शिक्षण घेता येत नाही.
मग त्यांना एकतर मोलमजुरी,करावी लागते किवा छोटासा व्यवसाय करावा लागतो त्यासाठी भांडवल उभा रावे लागते. व्यवसाय करावा तर नफा आणि तोटा ही आला तो सहन करण्याचे बळ माणसात पाहिजे.तेव्हाच व्यवसाय स्थिर राहतो.आज शिक्षणाचे महत्व सर्वांना माहीत आहे त्यामुळे तरुण मुले मुली उच्चशिक्षित आहे.प्रायव्हेट मध्ये नोकऱ्या करतात. पण तिथे वास्तविक स्वरूपाचा नोकऱ्या नाहीत.आज इथे तर उद्या तिथे व बरयाच जणांना नोकरीतून काडूनही टाकल्या जाते.सरकारने नवीन नोकरांच्या संधी उपलब्ध करून द्यायला हवे .ठोस पावले उचलायला पाहिजे.
एमपीएससी,वा upsc याद्वारे सरकारी जागा भरल्या जातात.ते चागलं आहे परंतु जे अभ्यासात कमकुवत आहे अश्या ना या संधीचा उपयोग होत नाही.
Vacancy कमी आणि बेरोजगारी जास्त आहे. असं च चित्र दिसून येते .आपल्या भारतातली मुले ही विदेशमध्ये नोकऱ्या करतात व त्यांचा हुषारीचा फायदा बाहेरचा देशाला जास्त होत आहे.सरकारने अशा मुलं साठी काही निर्बंध आखायला पाहिजे व आपल्या देशाला त्याचा उपयोग व्हावा या साठी पावले उचलायला पाहिजे. विदेशा मध्ये जे नोकरीला आहेत त्यामुळे थोडासा प्रमाणात बेरोजगारी दूर होत आहे.भारतामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे.शेतीकरणारे लोकही मुलांना शिकवून नोकरी कडे वळवित आहे. खं र तर त्यांना शेतीचे आधुनिकीकरण करून शेती करायला पाहिजे. कारण त्यांना मुळापासून शेती चे नॉलेज असते.शेती ही संपूर्ण पणं निसर्गावर अवलंबून असते त्यामुळे शेतीतही खूप नुकसान असते. पण नुकसानला भिवून जर शेती सोडली तर कृषिप्रधान देशाची वाटच लागेल.कर्जबाजारी पायी शेतकरी वर्ग आत्महत्या करीत आहे.शासनाचा असंख्य योजना कागदवरच राहत आहे. त्यातही सरकारी माणसांचे कमीशन देता देता शेतकरी वर्ग अशा योजना पासुन दूर राहत आहे.काळी आई कधी ना कधी चांगले पीक देईल या आशेने आधुनिक पद्धतीने शेती करायला पाहिजे.सरकारने निदान शेतकरी लोकांना त्यांचा उदरनिर्वाह चालल एवढे पैसे त्यांचा अकाउंट जमा केले पाहिजे.शेतकऱ्यांचा आत्महत्या होणार नाही. कारण ते प्रामाणिक पणें शेती करतात. शेतकऱ्यांना मुलगी देत नाही .असे दिवस आले आहे या साठी शेतकरी लोकं मुलांना शिकवून नोकरीचा पाठीमागे लागले आहे खर तर मुलांचा हा येहाच्चिक प्रश्न आहे की त्याला जे करायचे आहे त्या fild त्याने जायला पाहिजे.परंतु बेरोजगारीमुळे त्याला जे मिळेल ते काम ते करीत आहे.माझा मते नोकरी,व्यवसाय,आणि शेती,मोलमजुरी यांचा विकास व्हायला पाहिजे तेव्हाच हा बेकरीचा प्रश्न सुटू शकतो.जे हाताला काम येईल ते मुलांनी करायला पाहिजे.
सौ.माधुरी देवेंद्र भुते.
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 😔वाढती बेरोजगारी😔
माय बापाच स्वप्न एक
मुलामुलींना शिकवुन बनवावं नेक
त्याकरीता चालें कष्टांचा खेळ
रात्रदिवस राबुन घाली पैसांचा मेळ।।
अशी मनोकामना प्रत्येक नागरिकांची
आधुनिक युगाची स्पर्धा भारी
स्पर्धत टिकावे मुले आपली
होते नव्हते सर्वच लावले शिक्षणांसाठी।।
मुलेही करती मेहनत फार
रात्रंदिवस जागुन करती अभ्यास
मिळवुन घेती डिग्री हजार
मेहनती कामांची वाटे लाज।।
नोकरीसाठी फिरती दारोदार
रोजगार नाही बनती गुन्हेगार
पैसा कमवणे हीच गरज आज
तरुण पिढींचा असे एकच ध्यास।।
यावर सरकारने तोडका काढावे
कला कौशलचे ही शिक्षण द्यावे
जे काम मिळेल ते करीत राहावे
नोकरीचे सतत प्रयत्न ठेवावे।
तरच होईल देशाचा विकास
बेरोजगारांनाही मिळेल काम
गुन्हेगारीवर बसेल आळ
वाढत्या बेरोजगारी वर रामबाण उपाय।
सौं.चंदा वनवे शेंडे नागपुर.
[9/12, 8:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: विषय
वाढती बेरोजगारी
वाढती बेरोजगारी सर्व जन सामान्यांसाठी ज्वलंत असा प्रश्न आहे.मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईवडील होईल तेवढी मदत याच आशेवर करतात की भविष्यात मुलांना चांगले दिवस बघायला मिळतील.
आताची पिढी हुशार आहे पण शिकूनही मुलांना आपल्या आवडत्या क्षेत्रात नोकरी व्यवसाय मिळत नाही आणि एवढं शिकल्यावर दुसरे काम त्यांना नको असत
साध्या शिपाई पदासाठी शिकली इंजिनिअर पदव्युत्तरशिक्षण घेतलेली मुले अर्ज करताना दिसतात. प्रत्येकाजवळ उद्योगधंद्यासाठी पुरेसे भांडवल असेल असेही नाही सरकारी योजनेचा लाभही अल्प प्रमाणातच दिसते.
वाढत्या बेरोजगारीने तरूणपिढी बरबाद होत आहे मग नको त्या वाममार्गी लागून आपले आयुष्य वाया घालवतांना दिसते
माझ्या मते काही अंशी याला आपली शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे आज मुलांना प्रात्यक्षिक शिक्षण देऊन त्यातूनच व्यवसाय निर्मिती करणे गरजेचे आहे.कारण सगळ्यांची बुद्धीमत्ता सारखी नसते तसेच आरक्षणमुळेही हुशार मुले दुर्लक्षित होतात तेव्हा गुणवत्तेनुसारच त्यांना न्याय द्यायला हवा.
सरकारने या ज्वलंत प्रश्नावर तातडीने उपाय करणे गरजेचे आहे.सध्या भारत हा तरुणाईचा देश म्हणून ओळखला जातो तिला योग्य दिशा देणे हीआपली सर्वांची गरज आहे.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.12.09.2020
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.६८
पूर्वाईला रवि आला घेऊन
सोनेरी किरणांची भेट.
पंकदलाची सोडवून मिठी
भ्रमर उडाले अलगद.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पहाटवारा🌺
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
वारकरी करती नाम गजर
आज पंधरवाडी एकादशी
पंढरी जाऊ कशी सुना दरबार.
सौ.विणा द. अतकरी नागपूर.
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (५९)
आईवडील सज्जन गुरूजन
यांचेशी कपट कधी न् बरा
अंगी गुण जर अधमपणाचा
नाश जिवनाचा इथेच खरा.
दनाअ, नागपूर
दि.१३/०९/२०२०
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प-- 78 वे
हे भाष्करा
नमन तुला
सोन्याचे दान
दिले अवनिला ।।
----------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
तुळशीला बहर
मंजिरी फुलांचा
विठ्ठलाला भाव
माझ्या भोळ्या भक्तीचा
इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
सौ.प्रतिभा सोपान वाठ( गरबडे)
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.७३*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*तू नसताना जवळ*
*मन उदास होतं*
*तू सोबत असताना*
*आयुष्य किती छान वाटतं*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मुखी असावे हरिनाम
शुद्ध ठेवावे अंतकरण
ठेवूया मनी
समाज हिताचे भान
नंदा भोयर
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पहाटवारा🌺
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
वारकरी करती नाम गजर
आज पंधरवाडी एकादशी
पंढरी जाऊ कशी बंद दरबार.
सौ.विणा द. अतकरी नागपूर.
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: क्रमांक ६५
प्रकार-दशपदी काव्य रचना
*विषय-स्वप्नांची दुनिया*
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
माझ्या *स्वप्नांची दुनिया* आहे
सुखसमृद्धीने भरलेली
बळीराजासवे कष्टकरी
गृहलक्ष्मी ही सुखावलेली
स्वतंत्र दिसती पशुपक्षी
विहंग गगनी विहरती
हिरवळ दाटे चहूकडे
जनावरे मुक्त चारा खाती
भरूनी वाहे पाण्याचे पाट
फुलांसवे लता बहरती
बघूनी सुंदर दृश्य असे
सारे आनंदे नाचती गाती
नसे दुःखाचा लवलेशही
सुखाची असो भरभराट
प्रेम जिव्हाळा सगळ्यांमध्ये
मनी मोदाचा थयथयाट
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
कविता (११६)
""जळता कशाला कुणावर""
हेव्यान करावं दाव्यानं खावं
कशाला रं कुणावर जळाव
संधी प्रत्येकाला उत्कर्षाची
ध्येयानं मार्गे पळत सुटावं.
'प्रयत्ने रगडीता वाळुचे
कण'तेलही गळते प्रमाण
जळता कशाला कुणावर
घ्याना प्रेरणा त्यासमान.
कष्टाविन फळ ना मिळते
जरी कळते तरी ना वळते
थोरही सांगूनी थकुन गेले
कर्मगतीला कधीच मुकले.
जगात ते स्वकर्माने तरले
नाही कुणाला बोट दावीले
सकारात्मक विचार घेऊनी
वाट प्रगतीची चालु लागले.
दारावरची बंधने तोडा,करा
आंघोळ छान घामाने श्रमाला
रिध्दी सिध्दीही घालेल पिंगा
अहो,जळता कुणावर कशाला.
दुसऱ्या ताटात ना बघावे
आपले वाढणे पोट भरावे
कष्टाची ती चटणी भाकर
मना संतोष त्यात मानावे.
दनाअ, नागपूर
दि.१३/०९/२०२०
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हाहाकार पुराचा---
हाहाकार पुराचा
निसर्गाने का केला
सर्वत्र पाणी पाणी
घरा-घरात पूर आला ।।
धानशेती, मळे
नुकसान पिकांचे झाले
वर्षाकाठची शीदोरी
अश्रूत वाहून गेले ।।
विस्कळीत जनजीवन
रस्ते, बांधही तुटले
वाहत्या पाण्यासोबत
आयुष्य स्वप्नही मोडले ।।
छप्पर गेले डोक्यावरचे
लोक रस्त्यावर आले
मुलांना वाचवण्यासाठी
स्वतःचे प्राण गमावले ।।
जिकडे तिकडे दिसे
पाणीच पाणी ,परी
15 दिवस होऊनही न
येई नळाला पिण्याचे पाणी।।
जागृत होऊया आपण
हरितक्रांती घडवूया
झाडे लावू, झाडे जगवू
पर्यावरणाचे संतुलन राखूया।।
--------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता
""आजोळची गंमत""
लहान गाव मामाचं
नेहमीच होत जाणं
मामीचा स्वभाव छान
तिला सर्व देती मान.
मामा होते श्रीमंत फार
कामाला नोकरचाकर
तिथे होई आदर सत्कार
रोज नवनविन पाहुणचार.
कालांतराने झालं लग्न
जाण येणं जरा थांबलं
संसारात झाली मग्न
प्रपंचात मनच गुंतलं.
वर्षांतून एकदा सर्वजणी
जमतो दिवाळी सणासाठी
एकमेकींशी होई हितगुज
त्यातच होतहोत्या भेटीगाठी.
एक दिवस ठरायचा
डबा पार्टीचा बेत
धमाल मस्ती करत
हुंदडत होतो शेत.
सौ.विणा द.अतकरी
नागपुर
दि.१३/०९/२०२०
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सत्य परीस्थितीवर आधारीत कविता
😢देवाघरी गेलेले बाबा😢
असा काय गुन्हा केला बाबा मी
ना पाहिले मला ना दिसले तुम्ही
हाक मारली होती मी आईच्या गर्भातुन
मी येण्याआधिच का गेले जग सोडून
जन्माला आल्यावर,बाबा म्हणायला कुणी नव्हते
बापाविणा मी कीती पोरकी झाले होते
लहान असुनसुद्धा शहाण बनाव लागल
तुमच्या प्रेमासाठी खुप झुराव लागल
कसे होते तुम्ही,होती कशी काया
ना मिळाल प्रेम,ना मिळाली माया
इतरांचे बाबा पाहुण आठवण तुमची येते
मन येते दाटून, पाणी डोळ्यात येते
आईलाही बाबा, बाप बनाव लागल
एवढ मोठ आयुष्य एकटीने काढाव लागल
बाबा जमत असेल तर
प्लिज तुम्ही याना
पिल्लूला तुमच्या पंखाखाली घ्याना
खुप काही सोसल बाबा, तुम्ही नव्हते म्हणून
काळजी करू नका, मी राहील धिट बणून
कळला मला इथला नात्यांचा नुसताच बोलबाला
म्हणुनच कमी भासते, सतत तुमची मला😔
सौ निकीता भोयर ,यवतमाळ
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडती कविता
निसर्ग कविता
सांजवेळी बागेत फिरतांना
पाहिल्या झाडांवर कळ्यांना
इवल्या इवल्याशा टिकल्यांना
कोमल त्या अल्लड कुमारींना
पहाट होता, उठुनी पाहिले
कळया नव्हत्या झाडांवरी
रातपरीने फुंकर घातली
दवबिंदूने फुले उमलवली।
सुंदर-सुंदर, नाजूक-नाजूक
रंगबिरंगी,मनमोहक फुलं
चोहीकडे सुगंध उधळत
मनमुराद पणे हासत डोलत।
फुलांना देखील माहित नव्हते
जीवन त्यांचे क्षणभंगुर ते
आपल्या तालात आनंदाने
लोकांचे लक्ष वेधत होते।
मदमस्त भोवरे फुलांभोवती
आनंदाने पिंगा घालत होती
फुलपाखरे देखील स्वच्छंदी
मधुर रस शोषित बागडती।
झाडावरील सारी फुले खुडुनी
तयांची सुंदर माला गुंफली
देवाच्या गळ्यात वाहिली
बहुमान तो फुला लाभिला।
सायंकाळी कोमेजली माला
पायाखाली तुडविल्या गेली
जगली जीवन अल्पायुषी
आपले सर्वस्व अर्पुनी ती।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता
छान किती छान
छान छान छान
आमच्या मॕडम किती छान
बोलणंछान वागणं छान
शिकवितात किती छान.....
इंग्रजी छान त्यांच मराठी छान
गणित किती छान
उच्च मॕडमला इवल्या
मुला मुलींचा अभीमान.......
चुकल्यावरती मारही देतात
प्रेम जिव्हाळा देवुनी वागतात किती छान
क्षमाशिलतेनी माफ करतात
छान किती छान आमच्या
मॕडम किती छान
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: यार-गद्दार...
माता तुझ्या विरांना,हार पसंत नाही..
प्राण गेले तरी बेहत्तर..माघार पसंत नाही......!!
आस्तिनीतील सापही आता,डंख माराया लागले...
दुध पाजले जयांना,विष ओकाया लागले...
यार-गद्दारांच्या हातूनी,आम्हा संहार पसंत नाही...
प्राण गेले तरी बेहत्तर,माघार पसंत नाही.....!!
निर्वासितांचे लोंढे आमच्या ह्रुदयावरी घाव आहे....
दोस्तीच्या नावाखाली दुश्मनांचा डाव आहे...
यारांच्या वेषातील आम्हा,गद्दार पसंत नाही..
प्राण गेले तरी बेहत्तर,माघार पसंत नाही....!!
दोस्तीचा हात देता...रक्तपात होतो...
शांतीचा दूत गेला...तरी घात होतो.....
शपथ तुला माते असा,शेजार पसंत नाही...
प्राण गेले तरी बेहत्तर. माघार पसंत नाही.....!!
"पारस"
राजीव बुध्दे, मांढळ..
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *उद्रेक सरीतेचा*
मानवाच्या वागणुकीचा
होतो तुझाही संताप
कधी उद्रेक सरितेचा
कधी करे तो पूर्ण संप ।।
आला पाऊस मुसळधार
वैनगंगा नदी भरून
वाहू लागले पाणी
जागा मिळेल तिकडून ।।
पाणी घराघरात
गेले खूप शिरुन
दिले सर्वांच्या
डोळ्यात अश्रू देऊन ।।
मुलीच्या लग्नासाठी जमवले
पैसे गेले वाहून
कोण भरून काढेल
झालेले खूप नुकसान ।।
असा सरितेच्या उद्रेक
नाश आपण करूया
झाडे लावून भरपूर
चला जागृत होऊ या ।।
----------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडती कविता
* प्रिय सखी*
अति व दुःखातून जन्मते ही कविता!
आनंदाच्या लहरी वर लहरते ही कविता !
भावना मनातील सांगते ही कविता!
वेदना अंतरीच्या जाणते ही कविता!!
घुसमटलेल्या मनाची वाट ही कविता!
डबडबलेल्या अश्रूंची धार ही कविता!
प्रणय रसाच्या हिंदोळ्यावर हिंदळते ही कविता!
विरहातील भेटीची तगमग ही कविता!!
सीमेवरील सैन्याची स्फूर्ती ही कविता!
आर्त मनातील आर्त स्वर ही कविता!
गुजमनातील माझ्या जाणते ही कविता!
अशी माझी प्रिय जिवलग सखि ही कविता!!
रंजना हलमारे( सेलोकर)
साकोली
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय -श्राद्ध*
मुलांच्या भविष्यासाठी
मायबाप जन्मभर झटतात
आपले कर्तव्य इतरांवर सोपवून
मुले पैशामागे धावतात
ऑफिसमधून सुट्टी काढून
मुलगा श्राद्ध घालतो
जिवंतपणी बोलायला
मुलाला वेळ नसतो
दारात उभ्या भिकाऱ्याला
धुडकावून देतो
कावळ्यासाठी मात्र
पानावर घास ठेवतो
इतर वेळी नको वाटते
कावळ्याची ती काव काव
श्राद्धा करिता कावळ्याला
मिळतो जास्तच भाव
जिवंतपणी द्या ना
वेळ,माया आणि प्रेम
देवाघरी गेल्यावर
पंचपक्वानचे काय काम
*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *योगाचे महत्व*
रोज करूया योगा
तब्येत ठेवूया मस्त
औषध नाही स्वस्त
डॉक्टर पैसा करतात फस्त
योगाला नाही पडत पैसे
ऐक ना जरा मावशे
काम ठेव बाजूला
जरा वेळ दे योगाला
पॉईंट दाबा हाताचे पायाचे
करा प्राणायाम व कपालभाती
ज्यांनी आपल्या नाड्या
पूर्ण शुद्ध होती
नका घालवू व्यर्थ पैसा
व्यायामाला वेळ द्या थोडासा
काम काम करत बसू नका
अमूल्य जीवन आपले
त्यांला फुलासारखे जपा
सौ नंदा अनिल भोयर
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌷बालपण🌷
बालपण खरच छान असतं
सार जग कसं मोकळं रान असतं
त्या चिमूल्या पंखांना
आभाळ देखील लहान असतं।
बालपण खरच छान असतं...
आईचं धरलेलं बोट
जगाचं एक एक टोक असतं
माऊलीच्या कुशीमध्ये
आपलं सारं ब्रम्हांड असतं।
बालपण खरच छान असतं...
ना समाजाची चिंता
ना कशाचीच लालसा
कधी भेद असे ना खंत
एका चॉकलेट मधे पूर्ण विश्व वाटतं।
बालपण खरच छान असतं...
म्हणूनच वाटे मना
लहानपण देगा देवा
आलं लावण्य तारुण्य
तरी वाटे बालपणाचा हेवा।
बालपण खरच छान असतं..
सौ. संगीता कढव
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *लोक काय बोलतच राहतील....*
आयुष्यात सगळ्यात जास्त भीती वाटणारी गोष्ट!
हास्य तरंगते चेहऱ्यावर,
सुरवात होते जळण्याची।
माखला चेहरा अश्रूंनी,
लोकांना सवय हसण्याची।
नाविण्याची सुरुवात,
होते विरोधाने।
चुकलास तर,
नाव ठेवून बोलण्याने।
कशालाही गमावं,
म्हणतील अपयशी।
कितीही कमव,
विचारतील माजलीस कशी?।
पाय खेचण्याचा प्रयत्न,
पुढे चालताना।
मजा येते लोकांना,
मागच्याला तुडवताना।
मदतीच्या हाताला,
ओळख साथीची।
स्वचा विचार देतात,
जाणीव स्वार्थाची।
कौतुकाची थाप,
धान्यावादाने गाजेल।
मनातला कोपरा,
उणिवेमुळे दुखेल।
खूप केलेस तरी,
जाताना के नेणार विचारतील।
काहीच नाही तर,
काय कमवलंस म्हणतील।
म्हणूनच, तू जग तुला हवं तसं।
जगाच काय ते काहीही म्हणतील...।।
कु. योगिनी सुरेंद्र ढबाले, पुणे
[9/13, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडीची कविता
Il माय ll
असा कसा आला चालून
सारा नियतीचा खेळ
त्या वर्षी पडला दुष्काळ
खळ्यात नव्हती गडली मेळ
तेव्हा दावले माह्या मायन
आपल्या अंगीचे गुण
घेऊन आली चटच तंबाखू पानं
गुंडाळून दावल्या विड्या तिनं
रात रात जागत होती
तेव्हा माझी माय
जेव्हा येई शहरातून
डोळ्यांनी मी सगळं पाह्य
पहाटेला चार वाजती
तेव्हाच उठत होती
मुलं बाळं जगवण्याची
तिची धडपड मोठी
अविधवा नवमीच्या दिवशी
आली तिची आठवण
काठ पापण्यांचे भरले
आला कंठ हा दाटून
🙏🙏🙏🙏🙏
सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (६०)
प्रभाते बघावं परसबागेला
सडा शिंपडला प्राजक्तांचा
उठा ललनांनो वेचू या गं
गुफुणं,सौंदर्य वाढवू वेणीचा.
दनाअ, नागपूर
दि.१४/०९/२०२०
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प-- 79 वे
अंगणात काढली रांगोळी
रांगोळीत भरले रंग
त्यात हाताची नक्षी
काढण्यात सिद्ध दंग ।।
---------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹पहाटवारा🌹
देह हा क्षणभंगुर
कधी जाई निघून
शब्द नकोत वाईट
लागे कंठाला लांच्छन.
सौ.विणा द.अतकरी नागपूर
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.७४*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*समुद्राच्या किनारी नारळी बाग*
*तुझा हात माझ्या हातात*
*कधीच सरु नये ही संध्याकाळ*
*भास्कराला जोडले दोन्ही हात*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जेवणात असू द्यावी लोणच्याची फोड
दिवसभर घ्यावे मुखी
हरिनामाचे शब्द गोड
नंदा भोयर
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
**********
ओजस्वी तेजस्वी
नभीच्या भास्करा
अर्पिते तुज अर्ध्य
पवित्र सूर्यनारायणा
***************
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
विषय.. पाककृती काव्य. (११७)
""मासे काप तळणं""
मंडी तून मासोळी घ्यावी
पातळ पातळ काप करून
खवले व्यवस्थीत करावी
काढा घाण स्वच्छ पाण्यानं.
बाजारातील मासे तळन
मसाला अन् तिखट,रवा
त्यात टाकावा लिंबुरस
प्रमाणात मिसळून ठेवा.
माशांच्या चापांना मसाला
पातळ लावून घ्यावे छान
त्या सर्वांना द्या एक तास
थंड वातावरणाच विरजनं.
तवा पात्रात तेल पसरवून
मंद आचेवर मासे चाप
घ्यावे दोन्ही बाजू परतून
तळा खात्रीनं, काढा काप.
छान आकृतीत ठेवा ताटात
त्या कोशिंबीर,खोबराकिस
सुंदर लालसर, तांबडे छान
द्या ताट सजवून यजमानास.
खाण्याचा आनंद तो भारी
तव बोटं चाटून ताव मारी
जेव्हा तेव्हा येते आठवण
मासे कापची चव लयन्यारी.
दनाअ, नागपूर
दि.१४/०९/२०२०
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: Il पाककृती काव्य ll
पुरणपोळी
***********
चांगली घेतली शिजवून
चण्याची डाळ एक शेर
तेवढीच टाकली त्यात साखर
पाक येऊ लागला सुमधुर
विलायची जायफळ त्यात
टाकले बारीक करून
चवीपुरते मीठ घातले
घेतले चांगले वाटून
कणिक घेतली एका वाडग्यात
थोडे मोहन घातले त्यात
चवीपुरते मीठ न पाणी टाकून
घेतले छान मऊ शार मळून
कणकेची घेतली पाती करून
दिला त्यात पुरणाचा गोळा भरून
हलकेच लाटली पुरणपोळी
उचलून अलगद तव्यावर टाकली
दोन्ही बाजूनी घेतली शेकून
वरून साजूक तूप टाकून
पुरणपोळीचा खमंग वास
सर्व्ह केले तुपासोबत खास
सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाककृती काव्य
नारळी भात--
मोकळा भात
शिजवून घ्यावा
हाताने तो
मोकळा करावा ।।
थोड्या तूप तेलात
लवंग विलायची घालून
त्यात भात घालावा
अलगद घ्यावा ढवळून ।।
घट्ट साखरेचा पाक करून
त्यात थोडा घालावा
मोकळा होत पर्यंत
छान छान ढवळावा ।।
थोडा थोडा पाक
घालत राहावे त्यात
खोबर कीस घालून
सारखे राहावे ढवळत ।।
मोकळा भात झाल्यावर
काजू ,बदाम घालावे
केशर , पिस्ते घालून
प्लेटमध्ये सजवावे ।।
-----------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *रेसिपी काव्य*
*पाटवडी*
बेसन होतं घरात
घेतली हातात परात
परातीत घेतलं बेसन
त्यात टाकलं ओवा जिरं लसूण
पेस्ट केली सगळ्यांची
बेसनात ती मळायची
छान पोळी लाटायची
छोट्या चौकोनी वड्या पाडायच्या
खोबरं आलं कांदा लसुन जिरं
कोथिंबीर एकत्र करून वाटायचं
नंतर फोडणीला टाकायचं
ना घट्ट ना पातळ मिडीयम ठेवायचं
उकळी आली रस्याला
वड्या त्यात टाकायच्या
कोथिंबीर त्यात टाकून उकळी येऊ द्यायची
गरमागरम पाटवडी ची भाजी
मिटक्या मारत मारत खायची
सौ नंदा अनिल भोयर
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाककृती काव्य
पुलाव
......................................
बाजारातून आणली भाजी
ताजी ताजी बटाटे गोबी
हिरवे हिरवे वाटाने मिरची
लाल टमाटे कांदेकोथिंबीर
भाजी धुवून स्वच्छ केली
पावशीने ती चिरून घेतली
डब्यातून काढले तांदूळ
तिखट मीठ हळद तेल।
पेटवली शेगडी,ठेवला गंज
टाकले तेल,दिली फोडणी
फोडणीसाठी लसूण जिरे
त्यात टाकले मसाले सारे।
सर्व भाज्या परतवून घेतल्या
पातेल्यात भात शिजवला
भाजी भाताच्या लेयर रचल्या
वाफेवरती शिजवून घेतल्या।
घरात सर्वत्र सुगंध दरवळला
तोंडाला पाणी सोडून गेला
पुलावाची मेजवानी झाली
जिभेवर चव सोडून गेली।
......................................
सौ.सरोज मते दारव्हा
🙏🏻🙏🏻
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाककृती काव्य
खमंग चकल्या
एक वाटी चनादाळ
पाऊन वाटी मूग डाळ
पाउण वाटी उडीद डाळ
पाऊन वाटी गहू
स्वच्छ धुऊन घेउ( वेगवेगळे)
दोन वाट्या तांदूळ त्याला पण धुऊ
सगळेच जिन्नस घरातच वाळऊ
दळायला देताना मुठभर जाडे पोहे घालू
पीठ घेऊ परातीत तिखट मीठ, धने-जिरेपूड, थोडी आले-लसूण पेस्ट, कढीपत्त्याची बारीक चिरलेली पाने, सांबार, ओवा तीळ
सर्व मिक्स करून गरम पाण्याने भिजवू
भिजवताना गरम तेलाचे मोहन एक मोठा चमचा घालू
गोल गोल काटेदार चकल्या ग पिळु
मध्यम आचेवर तेलात तळू
कुरकुरीत खमंग चकल्या
सान थोर सगळे मिळून खाऊ
रंजना हलमारे( सेलोकर)
साकोली
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाककृती काव्य
डोसा इडली दक्षिण कडले
खाद्य अन्न भारी
दोसाची मेजवानी पाहून
मुले जाम भारी
पोळी भाजी खावून
आई झालो मी boar
काही तरी वेगळे कर
मग केले मी दो से
3 शेर तांदूळ घेतले
1 शेर उडीद डाळ
1 वाटी तुरीची डाळ
10,15 मेथीचे दाणे
भिजत घातले रात्रभर
मिक्सर मध्ये बारीक केले
दोसाचे सारण तयार केले
आलू उकळून घेतले
कांदा, मिर्ची, सोप धणे
फोडणी घालून भरीत केले
वरण केले तुरीचा डाळीचे
फोडणी देउन केला सांबार
भिजत घालून चण्याची डाळ
बारीक केली दही टाकून
गोडलिंब,हिंग,जिरा मोवरी
मिठ घालून,फोडणी दिली चटणी
निर्लेप तवा ठेवून गॅसवर
मंद आचेवर दो सा केला.
Plate मध्ये , सांभार चटणी
डोसा मध्ये भरीत भरले.
गरम गरम सर्व्ह केले.
मुले म्ह नाले झाले मस्त
केले सर्वांनी फस्त.
माधुरी भुते..
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाककृती काव्य
शेवयांची खीर
शेवया घेऊन
हाताने बारीक केल्या
थोड्या तुपात
हलकेच त्या भाजल्या।।
दूध ठेवले पातेल्यात
गॅसवर उकळायला
नंतर भाजलेल्या
शेवया त्यात घातल्या ।।
एक उकळी आल्यावर
साखर घातली
लवंग विलायची ची
पावडरही सोडली ।।
वरून छान काजू
बदामाचे काप घातले
वाट्यांमध्ये गरम-गरम
सर्वांना सर्व्ह केले।।
----------------------------
पूनम डहाके, भंडारा
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाककृती काव्य
"चंद्रकला"
खवा साखरचं
केल एकत्र मिश्रण
विलायची पुड घालुन
तयार झाले सारण.
तेलाचे मोहन टाकून
मैदा घेतला मळून
छोटे छोटे गोळे करून
पात्या घेतल्या लाटून.
एक पाती घेऊन
ठेवी सारणाचा गोळा
दुसरी पाती ठेवून
हलका दाब दिला.
पाकळ्या पाडल्या खास
तळून ठेवून तबकात
पाकात बुडविले त्यास
चंद्राचा आकार म्हणून चंद्रकला
ही पाककृती करायला
वेळ लागतो फार
चव बालुशाही पेक्षा
खूपच लज्जतदार.
सौ. विणा द.अतकरी . नागपूर
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाककृती काव्य
बेसन लाडू (बिन पाकाचे)
2 वाटी बेसन चाळून घेतले,
गॅसवर कढईत
भरपूर साजूक तूप टाकले.
तुपात बेसन खमंग लालसर
भाजणी केली,
थंड होण्या बाजूला ठेवली.
2 वाटी पिठी साखर
चाळून घेतली.
काजू बदामाचे केले काप,
सोबत किसमीस मिसळविले त्यात.
वेलची जायफळ पूड बारीक केली,
तीही झाकून बाजूला ठेवली.
थंड बेसनाचा गोळा मोकळा केला,
पिठीसाखर घालून एकजीव केला.
सुकामेवा जायफळ वेलचीपूड
टाकून वळविले गोल लाडू.
बिनपाकाचे लाडू होतात छान,
पंगतीत मिळतो त्याला मान.
प्रसादला ही लाडू होतात मस्त,
खाणारे करतात लगेच फस्त.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.14.09.2020
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाककृती काव्य
😋स्वादिष्ट बासुंदी😋
दिवस काल सुट्टीचा
ताण नाही कामाचा
इच्छा झाली गोड खाण्याचा
बेत बनलं बासुंदी पुरीचा
दूध आणले डेअरीतून
लिटर पाच
स्वच्छ पातेल्यात दूध घेऊन
उकळायला ठेवलं मंद आंच
गुलाबी रंग येताच
साखर टाकली त्यात
विलायची पूड आणि
सुका मेवा घातले दुधात
दूध उकळून 3,4 तास
दुधाचे प्रमाण निम्यावर आले
छान गुलाबी छटा आली त्यास
पातळ दूध उकळून मस्त घट्ट झाले
झाली बासुंदी तैयार
दिसायला छान फार
काचेच्या वाटीत सजवली छान
घाई करी खायला मुले लहान
सर्वांना वाढली बासुंदी वाटीत
गरम गरम पुरी सोबत
बासुंदी पुरीचा घेतला आस्वाद
सर्वांनी मिळून ऐटीत।।
सौ. संगीता कढव, भंडारा
[9/14, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाककृती काव्य
रवा बेसन लाडु
प्रथम घेतला बेसन भाजुन
साजुक तुपामध्ये
रवाही त्याप्रमाणे घेतले भाजुन
साजुक तुपामध्ये,...
दोघांनाही चांगले घेतले परतुन
साखरेचापाक करुनी
त्यात लवंग विलायची घालुनी
काजु बदाम बारीक करुनी.....
बेसन रवा पाकात मिश्रण
घेतले काजु बदाम ढवळुन
झाले सर्व एकत्र सिंचन
करुया आपण लाडु वळवून .....
चेंडुसारखे गोल लाडु
करताक्षणीच तोंडाला सुटले पाणी
सर्वानी लाडु
खुपच छान लाडु सर्वांची एकच वाणी....
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/14, 9:28 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌱पौष्टिक मुंग उसळ🌱
अंकुरलेल्या मुंगाच उसळ
पौष्टिक व रेसेपी साधीसरळ
कच्ची खावी शिजवुन खावी
स्वास्थाला सदैव लाभकारी।।
दोन वाट्या मुंग घ्या
छान निवडुन खडे काढा
दोनदा धुऊन घ्या
पाण्यात रात्रभर भिजत घाला।।
सकाळी उठुन चाळणीत काढा
वरुन दुसरी चाळणी झाका
दिवसभर पाण्याचा छट्टका मारा
अंकुरेल बीज रोप जसा।।
कळईत थोड तेल घाला
जिरा राई कढीपत्ता
कांदा मिरची हळद टाका
चवीनुसार मीठ घाला
नंतर टोमैटो टाका।।
अंकुरलेल मुंग मिक्स करा
दहा मिनिट शिजवुन घ्या
प्लेटमध्ये घेऊन सांभाराने सजवा
गरम गरम खाऊन बघा ।।
सौं.चंदा वनवे शेंडे नागपुर.
[9/15, 8:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌸पहाटवारा🌸
ऊन सावलीचा खेळ
चालतो पावसाळ्यात
सर सर सरी बरसती
घन दाटे नभी क्षणात.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[9/15, 8:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा" (६१)
सांगा काय परिस्थिती आली
दवाखान्यात नाही बेड खाली
अरे,हे जग सोडल्यावर चित्तेला
दहन ओट्यात जागा ना मिळाली.
दनाअ, नागपूर
दि.१५/०९/२०२०
[9/15, 8:15 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प --- 80 वे
अरे संसार संसार
वेल्हावे काठी पाण्यावर
कधी बुडे गळामंदी
कधी तरंगे जळावर ।।
------------------------------
मंगला डहाके ,भंडारा
[9/15, 8:15 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
***********
सरोवरात फुलले
पुष्प कमल
मकरंद सेवीत
भ्रमर करीती
मधुर गुंजन
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/15, 8:15 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अरे संसार संसार
काम पुरती दिवसभर
वेळातील वेळ काढून
कविता टाकते ग्रुप वर
*सौ नंदा भोयर*
[9/15, 8:15 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.७५*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*प्रभातकाळी मंगल समयी*
*दाट धुके दिसें चहूकडे*
*ऊन कोवळे वाट काढती*
*पोहचती धरणीकडे*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/16, 4:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रंजल्या गांजल्याची सेवा
हीच आहे पूजा
हीच आहे भक्ती
देवा मज दे कृतीत उतरविण्याची शक्ती
नंदा भोयर
[9/16, 4:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प-- 81 वे
शोधूनी पाहे
देव कुठे तरी
मग तो भेटे
आपल्या अंतरी ।।
-------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/16, 4:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
**********
चिंब पावसात न्हाली
तरुवेलींची कोवळी पाती
ऊन ऊन ऊन्हात
टव टव चमकली
*************
सौ.प्रतिभा सोपान वाठ (गरबडे)
[9/16, 4:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌸पहाटवारा🌸
सुंदर ते ध्यान उभा मळ्यात
उगवी ताज्या भाज्या छान
उत्पादन काढी काळ्या मातीत
असा शेतकरी राजा महान.
सौ.विणा द.अतकरी. नागपूर
[9/16, 4:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (११८)
""एखादी सर येऊ दे""
ग्रीष्माचे तापमानाने
अंग करे लाही लाही
एखादी सर येऊ दे
दयाघना कुठं रे पाही.
मृदा ही भेगाळली
तृष्णा वाढे धरतीची
चातक पाही वाटची
सरीवर सर येण्याची.
एखादी सर बरसताच
मनामध्ये हुंकार भरतो
या तृष्णेच्या रे मनाला
थेंब किती हवा वाटतो.
दोन थेंब तप्त लोहावर
पडता रंग येती अनेक
बरसताच एखादी सर
शमविते मातीचा शेक.
बळीराजा डोकावतो
घणनिळा बघण्याला
ओशाळं नजर त्याची
पाणी तरळते नेत्राला.
पाखरांनी बांधली घरटी
तयारी तुझ्याच येण्याची
शेतीशिवार सज्ज झाले
वाटं, एखादं सर येण्याची.
दनाअ, नागपूर
दि.१६/०९/२०२०
[9/16, 9:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एखादी सर येऊ दे
एखादी सर येऊ दे
काळोखल्या ढगांचा
झाकोळल्या मनाचा
मळभ दूर करण्यासाठी, एखादी सर......
एखादी सर येऊ दे
चिंब भिजणाऱ्या
मृदगंधाच्या धुंद
ओल्या शहाऱ्यासाठी,एखादी सर.........
एखादी सर येऊ दे
सुकलेल्या गवतपाती
लतावेली,सरीतेला
नव संजीवनी देण्यासाठी,एखादी सर.........
एखादी सर येऊ दे
बळीराजाच्या मनातले
हिरवे स्वप्न
फुलवण्यासाठी,एखादी सर........
एखादी सर येऊ दे
धुंद मोहरणाऱ्या
व्यतीत क्षणांच्या
सुखद गारव्यासाठी,एखादी सर.........
एखादी सर येऊ दे
इंद्रधनूच्या रंगाने
जीवन सृष्टीत
रंग उधळण्यासाठी,एखादी सर..........
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.16.09.2020
[9/16, 9:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: Il एखादी सर येऊ दे ll
एखादी सर येऊ दे
भिजेल तहानलेली धरणी
सुखावतील पशू पक्षी प्राणी
हिरवीगार होई भुरानी
एखादी सर येऊ दे जीवनी
आसुसलेल्या प्रेमाची
चिंब चिंब मन भिजवूनी
देई नाती आपुलकीची
एखाद्या सुखद सरिन
मिळे थंडावा गारवा
झाडे पाना फुलांना ओलावा
मन बहरून यावा
एखादी सर येई
नवचैतन्य घेवून
नव आशेचा किरण
सुखवी तन मन
सौ रेणुका झंझाड भंडारा
[9/16, 9:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *एखादी सर येऊ दे*
उन्हान तापली धरणी
गुरेढोरे व्याकुळलेली
पाण्यासाठी दाही दिशा
रानीवनी भटकली
एक तरी सर येऊ दे
वृक्षवल्ली नाहून निघू दे
व्याकुळलेली चिमणी पाखरं
अमृताने तृप्त होऊ दे
धरतीला पडलेल्या भेगा
सरींची वाट तिला
धरती म्हणते सरीला
एकदा तरी भेट मला
व्याकुळलेली जनता
हात जोडते जलदेवतेला
नको अंत पाहू
जीव कंठाशी आला
सौ नंदा अनिल भोयर
[9/16, 9:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: "एखादी सर येऊ दे"
सुर्याचे वाढले तेज
उन्हाची वाढे तिव्रता
एखादी सर येऊ दे
त्रस्त झाली रे जनता.
पाऊस पडला तरीही
नाही मनाला रे धीर
जीव होई लाही लाही
हवीहवीशी वाटे सर.
सरीवर सरी बरसती
लोट वाहती रस्त्यावर
सर थांबेना पावसाची
गाव जातील रे वाहून.
निसर्गाचे असमतोलानं
ऋतूत झाला फेरबदल
झाडे लावा झाडे जगवा
करून संकल्प याबद्दल.
मग येईल पाऊस
बरसती त्या धारा
मन होईलं प्रसन्न
तुप्त होई वसुंधरा.
सौ.विणा द.अतकरी.नागपूर.
[9/16, 9:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एक सर येऊ दे
💐💐💐💐💐💐
केला खूप कहर कोरोनाने
एक सर येऊन दे
जाईल कोरोना वाहून वेगाने
जाईल दुःखाला घेऊन मुकाट्याने
संवेदना जाग्या होतील पुन्हा प्रेमाने
खूप झाला भ्रष्टाचार ऐकू येईल सतत
एखादी सर येऊन दे
निघेल भ्रष्टपणा सर्व धुवून कचर्यात
सगळे होईल मग नीट,सुरळीत
कारण प्रामाणिक आहे नागरिक भारतात
अरे बापरे किती आहे प्रदुषण जगात
एक सर येऊन दे
सर्व झाडे जाईल सरसर वाढत जाई जल्लोषात
झाडे लावून झाडे जगवू चालवू मोहीम जोशात
विद्यार्थ्यांना करू जागरूक तेव्हा जीवन जाई आनंदात
क्षणाक्षणाला मानव घाबरतो आहे नष्ट होईल जीवन
एक सर अशी येऊ दे
क्षणाक्षणाला जगता येईल ,जीवन होई सुखी संपन्न
क्षण सुध्दा वाटेल मग जगतांना अगदी प्रसन्न
क्षणभर मानवा विचार करेल मग सकारात्मक येई हसणं
सौ. वैशाली संजय टिचुकले यवतमाळ
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[9/16, 9:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एखादी सर येऊ दे
एखादी सर येऊ दे
तप्त भूमीला सुखवु दे।
भिजेल ही धरणी
पसरेल सुगंध मातीचा
तृप्त होतील लतावेली
सुखवेल कोना मनाचा।
एखादी सर येऊ दे
पक्ष्याप्राण्यांना सुखवु दे।
झाली ग्रीष्मात लाहीलाही
उन्हाच्या झळांनी त्रासलेली
शोधिती गारवा या भूवरी
मिळण्या शांती तनीमनी।
एखादी सर येऊ दे
विसावु दे या तृष्णीत मनाला।
हळुवारपणे उमलू दे
मिटलेल्या कळयांना
तु साद दे,तु हाक दे
शीण सारा निघु दे।
एखादी सर येऊ दे
जीवना नवं उभारी येऊ दे।
नवचैतन्य या आसमंतात
या चराचरात, या मनामनात
प्रत्येकाच्या आचरणात येऊ दे
एक सर प्रेमाची
एक सर चैतन्याची
एक सर सुखाची
प्रत्येकाच्या जीवनी येऊ दे।।
......................................
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बिग.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (६३)
पोवाडे गाण्यानं दिसते कुठे ना
वागण्यात,व्यवहारात माणुसकी
ठेवली केव्हाच खुंटीस टांगून, खाते
मृतांचे टाळुवरची लोणी साजुकशी.
दनाअ, नागपूर
दि.१७/०९/२०२०
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प-- 82 वे
तुळस औषधी दिव्य
ऑक्सिजन देते भरपूर
पानांमुळे नायनाट रोगांचे
मनही प्रेरित साकार ।।
--------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पहाटवारा.🌺
वाड वडीलांनी दिले संस्कार
मिळून मिसळून राहण्याचे
अर्ध्य,तर्पन देवून करू पूजन
पितृमोक्ष दिनी पुण्य स्मरणाचे.
सौ.विणा द.अतकरी.नागपूर
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹|| *अलगूज* ||🌹
*क्र.७९*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सर्वपित्री अमावस्येला*
*पूजतात सारे मृत माणसाला*
*जीवंतपणी हिरावून घेतात*
*घास मात्र तोंडातला*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
**********
पितृपूजन म्हणजे
समर्पण भाव
ऋण तयांचे
कधी न फेडले जाय
*************
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: देव घरात माझ्या
मंद तेवतो दिवा
देवा तुला एकच मागणे मागते
आंम्हा सर्वांना सुखी ठेवा
सौ नंदा भोयर
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संस्कारधारा
युग आजच बघा कस
एकटे करण्यास सारी धडपड
युग त्यावेळच होत अस
एकत्र राहण्यास सारी धडपड।
सौ.चंदा वनवे शेंडे
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संस्कारधारा
युग आजच बघा कस
एकटे करण्यास चालली धडपड
युग त्यावेळच होत अस
एकत्र राहण्यास चाले धडपड।
सौ.चंदा वनवे शेंडे
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
क्रमांक ६७
*एखादी सर येऊ दे*
***************************
जमिनीला पडल्यात भेगा
उकाडा वाढलाय किती
*एखादी सर येऊ दे*
भिजू दे थोडी माती
पीके चालली वाळत..
बळीराजा झालाय कष्टी
*एखादी सर येऊ दे*
हिरवी होऊ दे सृष्टी....
पाण्यासाठी वणवण सुरू
आहे अजूनही लोकांची
*एखादी सर येऊ दे*
पातळी वाढू दे पाण्याची
पशुपक्षी आहेत तहानलेले
शोधती चहूकडे पाणी....
*एखादी सर येऊ दे*
आनंदाने सारे गातील गाणी
*एखादी सर येऊ दे*
चिंब मला भिजू दे.....
शरीरासोबत मनाचीही
मरगळ सारी निघू दे
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एखादी सर येऊ दे
उन्हाने धरणीमाय
लाही लाही झाली
उष्णतेने शरिराची आग आग झाली
एखादी सर येऊ दे भली.....
पशुपक्ष्यांची उन्हापायी इतस्तता भटकंती
गुरेवासरे उन्हामुळे
शिणुन ती जाती
एखादी सर येउ दे ती,,...
तप्त ऊन बादल
होई वातावरणात बदल
क्षणातखुप जमतो
वाटतयं पाऊस तो येईल.....
एखादी सर येऊ दे तरी
थंडपणाचा गोडवा दे आम्हावरी
भिजुन सर्व चिंबआनंदून
पेटलेला वणवा शांत कर आतातरी.....
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.७७*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*वृक्षवल्ली हिरवे कुरण*
*मुक्या जिवा चरायला रान*
*स्वर्गच भासे पठारावर*
*धुक्यांचे नभी आच्छादन*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *एखादी सर येऊ दे*
उन्हाच्या झळांनी
त्रासली धरणीमाता
एखादी सर येऊ दे
मोर पिसारा फुलवता ।।
तहानलेले पशुपक्षी
ही येती शहरात
एखादी सर येऊ दे
या प्राण्यांच्या जंगलात ।।
दुःख कमी होण्याची
गरीबही वाट बघत
एखादी सुखाची सर येऊ दे
त्यांच्याही जीवनात ।।
एखादी सर येऊ दे
सगळ्यांच्या आयुष्यात
नवे मार्ग दाखवनी
स्वप्न पूर्ण करण्यात ।।
--------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सर्वपित्री अमावस आज
आओ नमन करे पूर्वजो के काज
जीवनभर न किया मान।
खिला रहे आज पकवान ।
कर रहे आज तर्पण ।
जिते जी था करना
मीठे बोल अर्पण।।
जीभर जीले अपने लिए
छोड मत भरोसे किसीके।
अपनी आशा-आकांक्षायें ।।
कल जो थे अपने
आज बन गये पूर्वज ।
है जो आज यहां
बन जायेंगे कल पूर्वज ।।
घमंड न कर कार्य कर अच्छे ।
प्रभु को याद कर मनसे सच्चे ।।
जय श्रीराम
सौ.सीमा अ.निवर्ती
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय - एखादी सर येऊ दे*
एखादी सर येऊ दे
या माळरानी खडकात
तृप्त होईल चातक
थेंब पाण्याचे जाता मुखात
वृक्ष वेली जाती कोमेजुन
कडक तडपत्या उन्हात
एखादी सर येऊ दे
गारवा घेऊन वातावरणात
धकाधकीच्या जीवनात
संकटे आणि दुःखाचे डोंगर
एखादी सर सुखाची येऊ दे
तेवढाच प्रवास सुखकर
प्रेमाचा ओलावा लागे सर्वांना
कोरडेपणा काय आधार देणार
मायेच्या सरी येत राहाव्या जीवनात
कुणीच नाही घेणार माघार
*सौ. रूपाली अमोल बोंद्रे ,भंडारा*
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एखादी सर येऊ दे
वाऱ्यासंगे गारव्यात
एखादी सर येऊ दे
अवनीला भिजुनी
चिंब चिंब होऊदे ।।
दाटलेल्या नभातून
येती तुषार पाण्याचे
वृक्ष वेली न्हाऊन गाती
गाणे गोड प्रीतीचे ।।
हरीत तृनांचे लेवून
माणिक ,मोती अलंकार
ढग कधी बासरी तर
कधी वाजवी गोड झंकार ।।
पक्षांचे चिवचवते गाणे
करणाला मधुर भासती
वासरे ही पान्हयासाठी
धेनु मणी ची वाट बघती ।।
तप्त उकाड्यात या
वाऱ्याची झुळूक दे
केशकुंतला चे थेंब घेण्या
एखादी सर येऊ दे ।।
मंगला डहाके, भंडारा
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एखादी सर येऊ दे
वरून राजा खुप बरसला!
नदी-नाले फुलवून गेला!
पुर येऊनी घरात घुसला!
संसार सारा उध्वस्त केला!
आता कुठे रे दडून बसला!
रुसू नको रे घननिळा- एखादी सर येऊ दे
दाही दिशा झाल्या तप्त- एखादी सरयेऊ दे
अंगाची झाली लाही लाही- एखादी सर येऊ दे
उभी पिके शेतातली आसुसली- एखादी सर येऊ दे
बळीराजा बघतो वाट चातका परी- एखादी सर येऊ दे
आतुर झाली धरणी मिळण्या- एखादी सर येऊ दे
मना मनाला चिंब भिजण्या- एखादी सर येऊ दे
कोरोना ला घेऊन जाण्या- एखादी सर येऊ दे
रंजना हलमारे( सेलोकर)
साकोली.
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एखादी सर येऊ दे......
निरागसपणाला स्पर्श करण्या
मेघ गरजती।
लहानपणी पालक
भिजायला सोडती।
छत्री,रेनकोट शोधण्याची
होते लगभग।
अचानक आलेल्या सरीमुळे
होते चकमक।
बळीराजाला ओढ लागे
एका सरीची।
वर्षभराची सोय।
मशागत करतो शेतीची।
शंका कुशंकाची मात
जीवन जगावे सुरात।
सरीच्या निखळपणाने
बरसावे मनमुराद।
नवीन सरीची चाहूल
नियोजन फिरस्तीचे।
आठवणी गोळा करु
मित्रांच्या मस्तीचे।
निजलेल्या कळ्या
हळूच बहरती।
प्रेमाच्या स्पर्शाने
मन लहरती।
ग्रीष्माचे तापमान
तापते भूमी।
सरीने सुखावते
मातीने व्यापलेली कर्मभूमी।
✍🏻 *कु. योगिनी सुरेंद्र ढबाले, पुणे*
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एखादी सर येऊ दे
प्रखर उन्हाने तापली धरणी
भेगा पडल्या सर्वांगावर
एखादी सर येऊ दे
तृष्णा तिची भागू दे !!
मातीतून सुंगंध दरवळला
लता वृक्ष वेली पाण्याविना
वाळल्या, कोमेजले्या
एखादी सर येऊ दे
हिरवळीने दाटू दे !!
प्राणी पक्षी,आणि मानव
शुधेने झाले वैफल्यग्रस्थ
एखादी सर येऊ दे
तृष्णा त्यांची भागू दे!!
पैशविणा ,गोरगरिबांचे
दारिद्रय त जिणे
एखादी सर येऊ दे सुखाची
आनंदाने जगू दे!!
बळीराजा ची चिंता भारी
जेवढी गरज त्यांना पाण्याची
एखादी सर येऊ दे
बळीराजाला सुखवू दे!!
प्रेमाने आसुरलेले मन
जीवनाला गरज दया ,प्रेमाची
एखादी सर येऊ दे ममतेची
नवचैतन्य बहरू दे जिवनात !!
माधुरी भुते
[9/17, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹एक सर येऊ दे🌹
रखरखत्या उन्हात शेतकरी राजा
मशागत करी धरनी मातेची
आस लागे लई मनी
पावसाची एक सर येण्याची।।
बीज पेरला धरनी पोटी
अंकुरेलच दोन्ही कर जोडुनी
निश्चितच वृक्ष होईल एके दिवशीं
अंवलबुन पावसाची एक सर येण्यावरती।।
सौ चंदा वनवे शेंडे नागपुर
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (६४)
अधिक मासाचे करावे स्वागत
होते आगमन दर तिनं वर्षान
पुरुषोत्तम मासही म्हणती यांस
पोथी श्रवणाने मिळे समाधान.
दनाअ, नागपूर
दि.१८/०९/२०२०
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.७४
रात्रीचा समय सरोनी
पहाटेची झाली नांदी
पूर्वाईला आली जाग
नव शुभ कार्याची संधी.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प-- 83 वे
सुरु अधिक मासारंभ
यात नसते शुभकार्य
जावयाला अधिक मान
सासरचे दाखवती औदार्य।।
---------------------------------------
मंगला डहाके भंडारा
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺 पहाटवारा 🌺
🕉️नमो भगवते वासुदेवाय नमः
मंत्राचा जप करा महीनाभर
सुख संपन्नता येईल अपार
असा पुरुषोत्तम मास महीमा थोर
सौ.विणा द.अतकरी.नागपूर.
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अंधार सारूणी
सकाळ झाली
नवी स्वप्न घेऊन
रम्य पहाट आली
सुप्रभात. नंदा भोयर
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
**********
बारा महिन्याच्या अधिक तिथी
मेळ साधण्या येई 'मास अधिक'
तोचि 'पुरूषोत्तम मास' पुण्यदाई
पुण्यकर्मे साधुनी करावी चित्त शुद्धी
**************************
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.७८*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*स्वतःला घडवताना नेहमी*
*सद्गुणांची असावी खान*
*दुर्जन होती सज्जन संगती*
*प्रभाव असा वाटे अभिमान*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 😄😄😄🤣🤣😁😁😁😁
क्रमांक:-६८
*हास्य कविता*
~~~~~~~~~~~~~~~
*एका लग्नाची गोष्ट*
***************************
*एका लग्नाची गोष्ट*.....
काय सांगू बाई तुम्हाला......
लिपस्टिक भेटली नाही म्हणून
लाल कागद लावले ओठाला
गोरी दिसावे म्हणून लावले
कोलगेट मंजन चेहर्याला
काळा स्केचपेन लावला
काजळ समजून डोळ्याला
लग्नात दिसावी खूप सुंदर...
म्हणून मेकअप केला मी छान
कोणती हेरॉईन आली म्हणून
सगळे बघतील वर करून मान
मस्त नटूनथटून लग्नामध्ये
मिरवू लागले इकडे तिकडे
*मंगला आत्या* मला म्हणाल्या
अशी का दिसतेस गं माकडे
आता मला कळून चुकले....
काय दशा केली या चेहऱ्याची
सगळे लोकं मलाच बघू लागले
मज्जा झाली भारी लग्नाची...
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹हास्यकविता🌹
वाड्यातील गमती जमती
राहात असू आम्ही
राजाभोज वाड्यात
दिव्य भव्य वाडा
किराया घराचा पाच रुपयात.,..
वाड्यातील घरात एक काकाजी होते
ते मला नेहमी सुंदरबाई म्हणत
ताईला माझ्या काळभेंडी म्हणत
हे ऐकून मी असे आनंदत.......
ताई माझी सुंदर गोरीपान
अन् मी आहे काळी काळी
ते चिडवल्यागत बोलतात ह्याची नव्हती जाण
मनाने मी आहे आहे साधी भोळी.........
सुंदरबाई म्हंटलं की
मी धावतच जाई
मला काही म्हंटलं तर
रडु भारी येई.,.,,
ते काकाजी होते
खुप ताई कडक
चेहरा पाहिल्याक्षणीच
पळे मी तडक,..,..
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्यकविता
एका लग्नाची गोष्ट
सांगते ,एका लग्नाची गोष्ट
लग्नाला मी उशिरा गेले
अगदी मुहूर्त वेळेत
छान लग्नही लागले ।।
गप्पाटप्पात आम्ही
घालवला वेळ
त्यामुळे झाला
साराच गोंधळ ।।
सुटाबुटातला नवरा
त्याच्याजवळ मी गेले
हात धरून त्याचा
खूप अभिनंदन म्हटले ।।
आजूबाजूच्या लोकांचा
एकच हशा पिकला
अहो नवरा मुलगा मी
नाही, तिकडे आहे बसला ।।
माझे मलाच मग
खूप हसू आले
वेंधळीच आहे ग तू
माझे पती म्हणाले ।।
---------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
अधिक महिना सुरू झाला
पोथीपुराण वाचीन म्हणलं
माणसांन मायाबाई
घरी मटनच आणलं
राग त असाय आला
मनात म्हणलं देऊ काय
याले आता पाला
देव नाईन धरम नाही
जीवाले माया खेव आला
जवा नाही तवा दारूच
येते पिऊन
देव माहे घरातले बाहेर ठेवते नेवून
मले म्हणते जवा तवा देवाजवळ बसतं
मी दिसलो तुले त नाक तोंड मुरडत
तुम्ही सांगा बाई मले
याचा हरीक कसा येईन
किती कच वेळा धमकी देते
आणि न तुयी बहीण
बहिण मायी काय एवढी हाय
सस्ती
लग्नाचे दिन टाकून याच्या घरी येईन
जीवाची आपल्या माती करून घेईन
सौ नंदा भोयर
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
माता माय
अशी कशी व मातामाय तूएकली
सी वेपार निंबा खाल्ल्या जाऊन बसली
आवडे का व तुलेलिंबाचीच सावली!
सत नाही तुझ्या डोहिवर
अंन निंबा वरची ह गती कावर
भटकती तिकडं मोकाट ढोर
कुत्र बीमंग तेती सोडती धार!
गावातली द्वाड पोरं सट्टा जुवा खेळती
अवदसा का व माय अशी तुह्याच माथी
दुसऱ्या देवासाठी मंदिर बांधति
तुह्या पासी निस्ती नवसाचा बोलती!
गांजा गोवर निघते पोराले जवा
याद येते व माय तुहीच तवा
गडू भ र पाणि तुझ्यासाठी आणतो
दहीभाताचा निवद तुला दा
वतो
गोड-धोड सारा मंदिरात धाडतो!
मंदिरे बांधली मोठीमोठी पास
तू लाच काऊन नाही जागा आसपास
एक गण तरी माय, दावचमत्कार जगा
नको राहू आता असी मंगामंगा !!
रंजना हलमारे( सेलोकर)
साकोली
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: विषय ..हास्य कविता
"" आत्याबाईची गोष्ट""
आत्याबाई भारी खट्याळ
खर्रा सदोदीत ठेवी तोंडात
गोष्टी नेहमी करी वाचाळ
म्हणती पीडा आहे घरात.
सतत भटकंती सुरू गावात
जिथं तिथं खुपसायची नाक
नव्हता तिला कोणाचा धाक
हुंदडत फिरे ती बीनधास्त.
आत्याबाई लयच हुशार
रंगवून गोष्टी सांगे खास
गोड बोलान भुलं मनास
म्हणे मी गावातली बाॅस.
मटकण्यात सदा नंबर वन
नट्टापट्टा ची शौकीन भारी
पदर हालवत फिरं गावभरी
पुरुषांच्या नजरा तिच्यावरी.
आत्या गेली स्वप्नात रंगून
ओठांवर मीशी आली फूटून
गोंधळ मांडला तिनं रडून
सगळे शेजारी आले धावून
आत्याबाईला उपमा काय
भटकभवानी म्हणती माय
मुख बघता लोक दुर जाय
आत्या एक व्यक्तीमत्व हाय.
सौ.विणा द.अतकरी,
नागपूर.
दि.१८/०९/२०२०
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
भजनात गेलो आम्ही
आजी-आजोबांसोबत
भजन नाही आवडलं
तर बसलो लिंबू तोडत ।।
आता कुठे ठेवायचे
झाले लिंबू खूप तोडून
आजी म्हणाली पोरांनो
घ्या आता जेवून ।।
जेवण केलं कसंबस
ठेवून लक्ष लिंबा कडे
आजीला माहित न करता
पळत सुटलो घराकडे ।।
घेतले लिंबू फ्रॉक मध्ये
धावतांना लिंबू पडत जाई
वाटलं होतं निंबु पाहून
होईल खुश माझी आई ।।
पण झाले सारे उलटेच
आईने लिंबू दिले फेकून
मार तर भेटलाच
शिक्षा दिली उपाशी ठेवून ।।
------------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[9/18, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय ~हास्य कविता*
*गोष्ट पारदर्शक दाराची*
😀😃😄😁😆😅😁
मी आणि आमचे अहो
गेलो एकदा शॉपिंगला
दुकानात शिरलो
नवीन साडी घ्यायला
रस्त्याला लागूनच होते
हे मस्त साड्यांचे दुकान
आत शिरतांना आम्ही
उघडेच होते दार छान
आतमध्ये होत्या बायका दोन
साड्यांचा ढीग होता समोर
साड्या बघून थकल्या असतील
पाय मोकळे करी उठल्यावर
गप्पा करत असताना त्यांना
बाहेर मैत्रीण त्यांची दिसली
धडपड करत त्यातली एक
काचेच्या दाराला आपटली
काचेचे दार नाही आले ध्यानात
बसली डोक्याला हात लावत
आम्ही सगळेच बसलो हसत
आहोंना तर हसूच नव्हते आवारत
*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/18, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
भागवत सप्ताह
आमच्या घरी पूजा करीत पण
भजन कीर्तन,महाप्रसाद लं
कुणीच जात नसत
आम्हाला असं वाटलं की
देवाचं आपण काहीच
करीत नाही,मग
आम्ही दोघी जणी
मी आणि माझी जावू
भागवत सप्ताह लं गेलो
सोबत माझी मुलगी आणि
जावेचा ४वर्षाचा मुलगा होता
पोरांना आम्ही मांडी वर बसविले
कृष्णची गोष्ट सुरू होती
आम्ही तल्लीन होवून ऐकत होते
पोरांना चागलं boar होत होते
पोरांना आम्हाला चिमटे घेणे
सुरू केले.तरी आम्ही काही
उटलो नाही मग तो महणाला
आई तू उट अन् घरी चल
तरी पण आम्ही उठलो नाही
आई मी ढू सकी सोडू का
मग आम्ही उठलो.
घरी येऊन हसलो
त्यानंतर आम्ही कधी
भागवत सप्ताह नाही गेलो
घरच्या देवळातल्या
देवालाच मानले
घरीच हाथ जोडले.
माधुरी भुते
[9/18, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
एकाच भाषेत फरक किती
बालपणी माहीत नव्हतं कधी
आठवीत गेल्यावर कळती
शिकायला गेली गोंदिया मधी
मुलगी आली वसतिगृहात
म्हणे बोहरी आहे काय
मी तिच्याकडे राह्यली पहात
आणि म्हटलं काय काय
इकडे तिकडे टाकली नजर
तिने उचलला पटकन फळा
तेव्हा मला कळलं खरं
बोहरी म्हणजेच झाडु,फळा
जेवणात भाजी मिळे दोडक्याची
त्या म्हणती खाल्ली तुरयीची
मागती बसयी कपाच्या खालची
कप बशी चहा प्यायची
कधी म्हणे लट्टू दे बारवून
कधी बोले टाक बोहरून
कधी सांगे काढ हेळून
कधी म्हणत खादलुन पिदलुन
बोलता समदा गोंधळ उडी
सगळ्या हासती फिदी फिदी
समद्या होत्या खेड्यातल्या मुली
खेडूत भाषा गावरानी बोली
सौ रेणुका झंझाड भंडारा (बेला)
[9/18, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
एकदिवस निघाला असा
गावाला निघताना दिसला ससा
गेलो आम्ही सगळे लग्नाला
गाडी सुरू होईना काही केल्या
सर्व सामान घेतले सगळे विचारी
गाडीच्या नादात सामान सारे घरी
लग्नाला गेलो घाई घाईत
कपडे होते सर्वच शोधत
कपड्यांची बॅग घरीच राहीली
सर्वांची मग धांदल उडाली
लग्नात घालावे लागले जुनेच कपडे
बोलण्यासाठी सर्वांची जीभ सडसडे
सगळे म्हणे हे नाराज का बरे
यानां नसेल झाला का आनंद खरे
लग्नात सगळे आनंदात होते
घरचे वेगळ्याच स्थितीत होते
सांगितले मग सर्वांना हकीकत
हशा पिकला मग कार्यालयात
वैशाली टिचुकले .
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[9/18, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
विषय..हास्य कविता. (११९)
""मस्तीत मेला""
पूणेच्या स्टेशनामधी
लागली होती गाडी
एक शहाणा चढला
जागाच नाही थोडी.
मग यानं केली युक्ती
जोराने शिंकु लागला
नाकातोंडाला शेंबुड
म्हणती कोरोणा झाला.
धोका पाहून सर्वच
गाडी खाली उतरले
पठ्ठ्यानं चादरीवर
हात पायच पसरले.
याला वाटलं मी मस्त
एकटाच आहे डब्यात
रेल्वेन तोडला डब्बा
पठ्ठा झोपला स्वप्नात.
सकाळला उठतो तर
डब्बा एकटाच यार्डात
आजुबाजु पाहे वाकून
पूणेच्या आहे स्टेशनात.
केलेला नाटकच भोवला
जबरदस्ती वार्डात ठेवला
नाही तो झाला कोरोना
आपल्या मस्तीनंच मेला.
दनाअ, नागपूर
दि.१८/०९/२०२०
[9/18, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: देवा कसा गा तु.
असा कसा बाई देव येडापिसा झाला
भलत्याशीच रेशिमगाठ बांधुन गेला
म्हणत होतो बापाले लग्नं करत नाही
वाचलेच पैसे तर म्हैस घेवु.........
नाही आयकला महा बाप
म्हने हिरो पाहीला तुयासाठी
गुमान उभी राय बोहल्यावरती
लग्न लाऊन देतो मोठी पार्टी........
गप्पगुमान बोहलयावर चढली
नवरदेवाची नजर तिरपी दिसली
बापाले म्हटलं नाही करत लग्न
म्हणे हार घालुन घे मग बोलु पुढे.......
जवळच माह्या माई मैत्रीन होती
तिले म्हटल आता कस ,सांभाळून घेजो
नवरदेवानी हाती घेतली वरमाला
माह्याकडे पाहतमैत्रीनीच्या गळात घातली
सुटली एकदाची म्हणत पळत सुटलो
पळता पळता घरात जावुन लपलो
नवरदेव आला शोध त शोधत
म्हणे नको घाबरू ,तुह्या मैत्रिनीले भी नेतो.
असा कसा देवा तु बदला घेतला
सवतिचा जाच सोबतच दिलास😃🙏🙏🙏
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
[9/18, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्यकविता
🤩हेअर प्याच🤩
***************
आम्ही गेलो एका लग्णात
नवरदेव नवरी आली मंडपात
दोघांच्या हातात दिले हार
घालणार होते एकमेकांच्या गळ्यात।।
मंगलाष्टाला झाली सुरवात
पाच मंगलाष्टात अक्षदा आल्या फेकण्यात
पटाखे ही आले फोडण्यात
बैंड वाजा वाजु लागला क्षणात।।
नवरी घालणार नवरदेवाला हार
मित्रांनी उचले उंच फार
नवरी झाली बहु हताश
खणवु लागली उचला मिळुन पाच।।
तिचा भेद आला लक्षात
म्हणुन नवरीलाही उचले वर फार
घातला तिने नवरदेवाच्या गळयात हार
पण नवरदेवाच्या अभ्रुची लागली वाट।।
त्याचा डोक्याला होता हेअरप्याच
धक्क्याने निघाला टोपीसह केसांचा जाळ
लाजेने नवरदेवाने खाली घातली मान
ठरवले तेव्हाच ...
कधी नाही लावायचा डोक्याला हेअरप्याच।।
सौ चंदा वनवे शेंडे नागपुर.
[9/18, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: " हास्य कविता "
कोरोना
जीवनात झाली कोरोनाची एन्ट्री
आमची घराबाहेर नो एंट्री.
कोरोनामुळे झाले लाॅकडाउन,
लोकांचे होऊ लागले ब्रेकडाउन.
पॉझिटिव्ह शब्द होता छान,
कोरोना ने उतरला त्याचाही मान.
डॉक्टरांनी सांगितले प्यायला काढे,
आमची तर ऍसिडिटीच वाढे.
कोरोनाने दिली सर्वांना रजा,
कुटुंबासोबत करा मजा.
जीवनाचा रंग झाला बेरंग,
जनता करू लागली सत्संग.
कोरोना ने केले कासावीस,
परत येतील सुगीचे दिस.
सौ.सीमा अ.निवर्ती
मुंबई
[9/18, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्यकविता
मैत्रीणीच्या नवऱ्याला घ्यायला लावले
उखाण्यात नाव,
ते म्हणाले तुम्ही पाहतच रहा.
नाव एकल्याशिवाय कुणी न जाव.
पहिलं नाव बायकोसाठी,
म्हशीच्या शेपटीला शेणाचा वास,
बायकोचं नाव घेतो तुमच्यासाठी खास.
बायकोने बघितले डोळे वटारून त्यास.
म्हणे,दाखवते तुम्हाला मजा तुम्ही पहाच.
दुसरे नाव म्हणाले मैत्रिणींनो तुमच्यासाठी
बाभळीच्या झाडावर बसलं भूत,
बायकोच्या मैत्रिणी सहा सहा महिने
आंग नाही धूत.
चेहऱ्यावर मेकअप चोपडतात खूप खूप.
बायको म्हणाली नाव घेतले किती फाजील,
मैत्रिणी माझ्या पळाल्या
साऱ्या होऊन खजील.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.18.09.2020
[9/18, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
...................................
लगीन जमल कोरोना आला
कसं करायच विचार पडला
काय तं वीस लोक लग्नाले
कोनाले धरु सोडू कोनाले।
पहीलच लग्न होतं घरातल
लग्नासाठी सारे झाले गोळा
लग्नाले न गाडी न घोडा
वर्हाडाले म्हणे घरीच सोडा।
नवरदेव तयार झाला
लावून तोंडाला मास्कला
त्यावर बांधल्या मुंडावळ्या
निघाला नवरीला आणायला।
नटलेली नवरी आली
मास्क बांधून तोंडाला
मंगलाष्टक सुरू झाल
सावधान शब्द आला।
साऱ्यांनी मास्क बरोबर केला
ना मानपान, ना चहापान
लग्नसोहळा पार पडला
नवरीसंगे नवरदेव आला।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.७५
गंधाळली माती
पारिजातकाच्या फुलांत
भक्तीमय मन
तुझ्या नामस्मरणात.
सौ.मीरा शेबे भंडारा
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (६५)
कोरोणाचा आक्रमणं वाढत चाललाय
जणलोंढा पोटापाण्यास पळत सुटलाय
मित्रहो, गरम पाण्याचा वाफारा घ्यावा
तुलशी,लवंग,मिरे,हळदीचा काढा प्यावा.
दनाअ, नागपूर
दि.१९/०९/२०२०
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺 पहाटवारा🌺
वाफ घ्यावी वाफ
गरम पाणी वाफ
घशाची खसखस
क्षणात निघून साफ.
सौ.विणा द. अतकरी.नागपूर.
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सूर्योदय ने पहाट रम्य
लता वेली वाऱ्यासंग
गाते अल्गुज गाणे
कोकिळेच्यामधुर स्वरात
निसर्ग बोलका भासे ll
शुभ प्रभात🌹🌹
माधुरी भुते
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 84 वे
बारीक थेंबांची
सुरेख रांगोळी
जणू भासती
आयुष्य ओळी ।।
------------------------------------
मंगला डहाके ,भंडारा
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुरु झालाय अधिक मास
नवा दिवस नवी आस
करूया नामस्मरण ईश्वराचे
प्रसन्न ठेवू मनास
*शुभ सकाळ*
नंदा अनिल भोयर
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
**********
हिरव्या तृणावरील
दवबिंदू
भासती जणू
हिरवे पाचू
क्षणिक सुख
नयनी साठवू
**********
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
क्रमांक ६९
*विषय :लागला अधिक मास*
काव्यप्रकार :अष्टाक्षरी
*************************
*शीर्षक:आला अधिकाचा मास*
पारायण करू सारे
*आला अधिकाचा मास*
पूजापाठ करण्याचा
असे महिना हा खास
स्नेहदीप चेतवून.....
द्यावे दिव्यासह वाण
लक्ष्मीनारायण जोडा
लेकी जावयाला मान
करू पुरणाचे दिंड
इष्टमित्र बोलावून
मानपान करूनीया
त्यांचे करूया भोजन
नारायण नागबली
करा याच महिन्यात
तीर्थयात्रा वास्तूपूजा
नको गं या महिन्यात
स्नान नदीवर करा
उटी सुगंधी लावूनी
उपवास करू सारे
देव कृष्णास पुजूनी
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (१२०)
"" लागला अधिक मास""
भाद्रपदा नंतर लागला
अधिक अश्र्विन मास
वर्षाला अकरा दिवस
तिनवर्षा दिन तेहत्तीस.
आश्विन मासापासून सण
महिना एक पूढे सरकती
चैत्र ते अश्र्विन मध्येच ते
कार्तिक ते फाल्गुन नसती.
उठोनी पहाटेला स्नान
करावी सुगंधी उटीनं
धार्मीक नदी तिर्थास
चिंतनाला मंदीर भेटीनं.
अधिक मासा आवळीच्या
झाडाखाली स्नाना महत्त्व
होती आपल्या मनोकामना
पूर्णत: व्यक्ती, स्थान परत्व.
महिनाभर नित्य वाचती
पुराण पोथी सर्व मिळून
संपताच पोथीचे वाचन
करताती आनंदें समापन.
दनाअ, नागपूर
दि.१९/०९/२०२०
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: " लागला अधिक मास "
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आला अधिक मास
आम्हाला याचे महत्व खास.
करायला ऋतू चक्राचे नियोजन,
झाले या मासाचे आयोजन.
कोणी म्हणे धोंड्या तर
कोणी म्हणे पुरुषोत्तम मास,
पण घरोघरी विष्णूचा वास.
हिरण्यकश्यपुला नृसिंहाने मारले
याच मासात भक्त प्रल्हादला तारले.
प्रथा आहे दान धर्माची,
असु द्या साथ चांगल्या कर्माची.
महत्व या महिन्याचे अपरंपार
भक्ती उपासना हाच याचा सार
जगावर आले कोरोनाचे अरिष्ट,
अधिक मासात कर देवा नष्ट. 🙏🏻🙏🏻
सौ.सीमा अ.निवर्ती
मुंबई
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: लागला अधिकमास
......................................
लागला अधिकमास
पोथीपुराण काढा खास
प्राधान्य नदीच्या स्नानास
गर्दी होते देवदर्शनास।
दान करा धोंडयांचे
तिळाचे,पुरणाचे,अनारस्यांचे
तांब्याचे दान जावया देता
कल्याण होई सासरचे।
लागला अधिकमास
सवाष्णींना दिव्याचे वान
लेकीला साडीचोळी
जावयाला तांब्याचे दान।
लागला अश्विन अधिकमास
एकशे साठ वर्षानी आलेला
वरदान दिले श्रीकृष्णाने याला
दुप्पट फळ देतसे पुण्याला।
पुरूषोत्तम मास म्हणती यास
तिन वर्षातून एकदा भेटतसे
सणउत्सवा उधाण येतसे
आनंदी आनंद जना होतसे।।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: लागला अधिक मास
संपले पितृपक्ष ते
आता लागले अधिक मास
अश्विन शुक्ल दोनतीन
यालाच म्हणती धोंड्याचं मास.....
अधिक मासाने
सण जाती लांब
पोथीपुराण वाचणे
ही महत्वपूर्ण बाब.....
अधिक मासात नदीवर जाणे
आंघोळ करणे असते छान
पोथी वाचुन पुजाअर्चा
गरजवंतांना करावं दान. ...
अधिक मासात आवळीच्या झाडाखालील आंघोळ महत्त्वाची
होती मनोकामना आपल्या
पूर्णत्वास व्यक्ती स्थानाची.....
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: " लागला अधिक मास"
लागला अधिक मास
दर तीन वर्षानं महत्त्व
अश्विन मास अधिकचे
चालीरिती स्थान परत्व.
दानात दान दिपदान
मंदिरात करू अर्पण
विष्णू सहस्त्रनाम पाठ
भगवान होईल पावन.
सुर्य व चंद्र यामधील
संतुलन बनवण्यासाठी
ऋषी मुनीचा आग्रहाने
विष्णूची योजना खास.
कोनी म्हणती यास धोंड्या
तिनं वर्षांतून येतोय एकदा
तिन वर्षांत वाढती ३३दिस
संतुलित करण्या येतो सदा.
आला परुषोत्तम मास
सासू देई दान जावायास
दान देतां होई तिला हर्ष
प्रितं भोज जावईपोरीस.
सौ.विणा द. अतकरी
नागपूर
दि.१९/०९/२०२०
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आला अधिकमास
आला अधिक मास
बाई आला अधिकमास
जावायाचे लाड किती करू
आहे पुरुषोत्तम मास
वाचू किती सत्यनारायण
किती वाचू पोथी पुराणा
पुण्यकर्मात वाढे गणती
होईल मग माझी गणना
तीस आणि तीन धोंडफळ
देऊ सर्व जावयाला
आयुष्यभर सुखी ठेवा
म्हणू आमच्या मुलीला
पुण्यकर्म धर्माचा
हा असे पवित्र काळ
वयोवृद्ध जपत राहती
आपुली तुळशी माळ
अधिक मासाचे असे
खूप महती महात्काम
भरून राही सर्व मंदिर
सकल पुण्य धाम
वैशाली टिचुकले
यवतमाळ
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अधिक मास*
दर तीन वर्षाने
होते आगमन अधिक मासाचे
दानधर्म करूनी
विशेष महत्व या महिन्याचे
नदीवरील आंघोळ धोंड फळ
हे तर खूप महत्त्वाचे
पूजा पाठ करूनी
घरातील वातावरण प्रसन्न करण्याचे
मुलीला आणि जावयाला
विशेष मान या महिन्याचे
तांब्याचं गंगाळ देऊनी यांना
सवाष्णींना देऊया वान
वेगवेगळ्या मंदिरात जाऊन
दर्शन घेतात मनोभावे
अधिक मासाचे महत्त्व
विशेष मनी असावे
*नंदा भोयर , अमरावती*
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अधिक मास आला
अधिक मास म्हणजेच
पुरुषोत्तम मास आला
पूजापाठ करूनी
फळ मिळे पुण्याईला ।।
मुली, जावयाचा
असे खास मान
पुरणाचे दिंडं अन
अनारशाचे वाण ।।
ओम भगवते
वासुदेवाय नमः
हे मंत्र जपून
लागू आपल्या कामा ।।
अश्विन मासातील
हा धोंड्याचा महिना
आला 35 वर्षांनी
दीपदान करूयाना ।।
शुभ कार्य कोणतेही
या महिन्यात नसते
दान ,धर्माला विशेष
महत्त्व दिले असते ।।
लीप ईयर मुळे हा
अधिक मास येतो
अध्यात्माची जोड
देऊन भक्तीतच रमतो।।
---------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आला अधिक मास
तीन वर्षांतून एकदा
येतो अधिक मास
दान धर्माचे महत्व
या महिन्यात खास
श्री विष्णूला समर्पित
हा अधिकचा महिना
नामस्मरण करीत
आणि उपासना
कुंडलिनी चक्राचे
होती दोष दूर
ध्यान धाराना
जोडून दोन्ही कर
दीप दान करुनी
अनरस्याचे अनुपदान
गोपूजेला आहे
विशेष यात मान
जावई आणि मुलीचे
करता कुठे लाड छान
आपापल्या परीने
भेट देतात समजून दान
सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आला अधिक मास*
पारायणे करूया
आला अधिक मास
दंग राहू पूजेत
हेच महिन्यातील खास ।।
नदीवरील आघोंळीला
आहे खूप महत्त्व
वेगवेगळ्या मंदिरातील
दर्शन आपणा घडतं ।।
शुभ कार्य नसते
करत या महिन्यात
खुप लोक रंगतात
भजन-कीर्तनात ।।
मुली जावयाला असते
मान ह्या महिन्यात
सवाशनीला तांब्याचे
दीप वान देतात ।।
पुनम डहाके, भंडारा.
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ***कविता***
लागला अधिक मास
आला आला अधिकमास,
पूजा कृष्णमूरलीधराची.
पुरुषोत्तम मासास,
जप,तप,दान असे फलदायी.
बारा महिन्याच्या
तिथी अकरा अधिक,
तीन वर्षांच्या तेहतीस.
मेळ साधतो तोचि महिना 'अधिक'.
सूर्य राशीसंक्रमण नसे,
वर्जिती काम्य,शुभकर्मे.
अखंड दीप देवापुढे,
गोपूजनाचे महत्व आगळे.
जावई ब्राम्हणास मान अधिक,
देती सत्पात्र अपुपदान.
उजळून ताम्रपत्री दीप,
पुरणधोंड असे विशेष.
सेवाकार्य घडुनी देवा,
मागती पुण्य,मोक्षप्राप्ती.
लागला अधिक मास,
जाणुनी घेऊ अध्यात्मासी
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.19.09.2020
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: लागला अधिक मास
*****************
तीन चांद्र वर्षांनी
लागला अधिक मास
जुनी पिढी म्हणती
धोंड्याचा महिना खास
असे अधिकच्या मासात
मुलगी जावयाचा मान
ओवाळून दिप ज्योत
करु त्यांचे समाधान
जावयाला धोंडफळ
त्यांचा करावा मान
तांब्याची भांडी देवून
श्री विष्णूची पूजा करून
अधिक मासा मध्ये
नदीवर करीती स्नान
पूजा अर्चा करून
करावे दान धर्म
शुभ कार्याला पाबंदी
अधिकच्या महिन्यान
ना करी वास्तुपुजन
नाही करावे लगीन
सौ रेणुका झंझाड भंडारा (बेला)
[9/19, 5:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺अधिकमास🌺
तिन वर्षातून एकदा
1मासाचा अधिकमास
याला म्हणतात धोंड्याचा,
किंवा पुरुषोत्तम मास ll
विष्णुला म्हणतात पुरुषोत्तम
म्हणून विष्णुचे पूजन करिती
मुखी विष्णुची सहस्त्र नाम
घेवून पूजन करावे खास ll
दीप दानाचे महत्त्व असती
दान करावयास जावई लागतो
पूजन स्वाश्णचे करून देता वाण
तांब्याचे भांडे करतात अर्पण ll
33 वस्तू, रेवड्या,अनारसे
किंवा पुरणाचे धोंडफळ
कपडे लत्ते घेवून मुली जावयास
करतात दान,पुण्य मिळवतात ll
आला अधिकमास
पूजा करूया खास
भजन कीर्तन,पारायण
देवदर्शन करून पुण्य कमवू या ll
माधुरी भुते
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (६६)
लावू नका घोर मनाला
सुख कसं मिळे जिवाला
रात्र तर वै-याची दिसते
नाही गोडी उरली सुखाला.
दनाअ, नागपूर
दि.२०/०९/२०२०
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नीलवरणीय नभात
इंद्रधनुष्य ची कमान ll
आई वडीलांना
मुलं मुली समान ll
🌷सुप्रभात🌷
माधुरी भुते
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.७६
सरली चांदण्यांची आरास
पूर्वाईला प्रकाशाचा वारस
रंग छटा उधळल्या नभात
सूर्यस्तवनाने झाली प्रभात.
सौ. मीरा शेबे भंडारा
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹पहाटवारा🌹
जेजुरी गडावर
उधळती भंडारा
पिवळा पिवळा
आसमंत सारा.
सौ.विणा द.अतकरी.नागपूर..
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 85 वे
सोनपावले
पहाट वारा
चैतन्य दावी
मोरपिसारा ।।
-------------------------------
मंगला डहाके , भंडारा
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अंधार सारूणी
प्रकाश आला
नवी पहाट पाहुणी
प्रसन्न वाटे मनाला
. नंदा भोयर
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
**********
सरितेच्या पाण्यावर उमटली
दिनकराची आभा
सुंदर मनभावन दिसे
सोनेरी किरणांची छटा
******************
सौ.प्रतिभा सोपान वाठ( गरबडे)
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.८०*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*काही हसून बोला*
*काही हसून टाळा*
*संकटे सर्वानाच आहे*
*काही वेळेवरही सोडा*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अधिक मासाची करू आठवण
करूनी सत्कर्मे देऊनी दान
ईश्वराचे करूया ध्यान पुजन
त्यानेच मिळे आधार जीवना
वैशाली टिचुकले यवतमाळ
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आवडती स्वरचित कविता*
*विषय :- भेटी लागे जीवा*
गुरू गजानना l खुले करा द्वार ll
जोडूनी मी कर l उभा आहे ll
भेटी लागे जीवा l दर्शनाची आस ll
जरी करी वास l सर्वदूर ll
ठेवू द्यावे माथा l आपुल्या चरणी ll
हिच विनवणी l दयाघना ll
लाभू द्या सोबत l ठेवा सदा दृष्टी ll
बहरली सृष्टी l आपुलिया ll
भक्ताविना सुनी l शेगाव नगरी ll
अवधी पंढरी l भगवंता ll
आपुल्या कृपेने l भय रोग चिंता ll
दूर करा आता l साक्षात्कारी ll
*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
क्रमांक ७०
*वारा गाई गाणी*
*************************
*वारा गाई गाणे*
डोलती पाने फुले
डोंगरासवे झाडेही
प्रीतीची भाषा बोले
उनाड वाऱ्याची शिळ
ऐकू आली झाडाला
शहारा येई फांदीला
स्पर्श होता पानाला
वारा हळूच स्पर्श करी
इवल्या हरित तृणांनाही
फुले इवली गवतावरची
वार्यासंगे उडू पाही..
स्वच्छंदी शुभ्र झर्याला
वेड लावी उनाड वारा..
दिसता झर्यास वारा...
खळखळून हसे झरा
दिवसभर असाच चाले
खेळ उनाड वार्याचा...
सुगंध दूरवर पसरे......
सुगंधित मोहक फुलांचा
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
--माझी आवडती कविता--(१२१)
"🌹"भावापेक्षा आव जास्त"🌹"
घणनिळा तुझा पसारा
जगावेगळा दिसं नजारा
अंदाजाला खोटं ठरवी
हवामानच देते गुंगारा.
सांगतो असतो वर्षाला
येईल टक्क्यावर पाऊस
फुवारा देते आचमनाला
दुराव्यानं नको रे जाऊस.
सारे बघती नक्षत्राला
ऐकते करावे मेघाला
शुध्दता तर केव्हाची
प्रसवण्या धरतीला.
ढगां मांदियाळी अंबरा
सरसरत्या पाऊसधारा
हिरवा शालु पांघरून
तृप्त झालीय ही धरा.
सजधजली वसुंधरा
नको रे येऊ पावसा
विध्वंस होते पूराचा
जाती जण गावकुसा
निमंत्रण एका लबाडाचं
जेवन,भात अन् रस्स्याचं
पोट भरल्यावर मटणाचं
वाढणं करते आग्रहाच.
भरल्या पोटात खाईना
वाढणारा हट्ट सोडीना
भावापेक्षा आव जास्त
अतिवृष्टीनं सुख फस्त.
दनाअ, नागपूर
दि.२०/०९/२०२०
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा उपक्रम
निसर्ग कविता
वारा गाई गाणी
वारा गाई गाणी प्रितीची तराणी
ऐकू येई कानी
मंजुळ ती वाणी.....
वारा गाई गाणी
पानाफुलांसवे
पाने हिरवी सळसळती
बिलगुन वार्यासवे......
वारा गाई गाणी
पशुपक्षांसवे
संचार करु या आपण
स्वच्छंद तुम्हासवे.....
वारा गाई गाणी
वृक्षलतांसोबती
हरखुन जाती सगळे
इवल्या वार्याभोवती.....
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: --माझी आवडती कविता--
🌹🌹 अभंग काव्य🌹🌹
गजानन बाबा! उघडा कवाडं!!
काय हे कुभांड!रचियती!!
भेट व्हावी माझी! शेगांव मंदिरा!!
मनी नाही थारा! गजानना!!
दर्शन देण्यास!उघडीला डोळा!!
असा माझा भोळा! अवलिया!!
मी चरणी दास! मार्ग दावी निट!!
गोडवा अवीट! मायबापा!!
होईन पाईक! तुझ्या पावलांचा!!
वाहून फुलांचा!हार गळा!!
सौ.विणा द.अतकरी, नागपूर
दि.२०/०९/२०२०
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: विठ्ठल तुका एकरंगी
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
तुका माझा ,मी तुझा
हा भाव विठुरायाचा
विठूराया नसे करमत
श्वास आहे तू विठूचा
विठ्ठलास चिंता असे
प्रेमळ तुकारामाची
कसाअसेल काय करतसे
हीच काळजी विठूची
तुकयास काम जादा होई
कीव येई विठूराया
बोल लावे तुकारामा
वाईट वाटे पंढरीराया
तुका लिही अभंग
सुचवी विठूराया
तुका भजनी दंग
विठू ऐकण्यात मग्न
आपणा वाटे नेहमी
दुःख असे सदैव मानवात
भगवंतासही दुःख होई
जेव्हा भक्त पडे संकटात
आनंदाचे डोही
आनंद तरंग
वाटे विठूस तेव्हा
असे जेव्हा तुकाराम संग
वैशाली टांगले टिचुकले
यवतमाळ
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता
विसंगती
दही- दुधाचा होतो अभिषेक
भोकांड पसरले दुधासाठी, कुपोषित बालक
होम -हवनात तुपाची धार
भुकेने पोटात माजले काहूर!
अग्नीत होते धान्याची राख
उपाशी तळमळे केविलवाणे बालक
पहुडती गादीवर गुबगुबीत श्वान
थंडीने कुडकुडेबालक बिचारे सान !
मजेतच च घळती स्वान हाडे सांगाडा दिसे छातीचा, जशी चिपाडे
अशी कशी ही विसंगती?
बघा ना जरा अवतीभवती!
मेळघाट कसला? मृत्यू घाट
निरागस बालकांची लागे तिथे वाट
कुपोषणाचे थांबवूतांडव
जागवून आपला धर्म मानव!!
रंजना हलमारे सेलोकर साकोली
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडती कविता
......................................
कधी सुरू होणार शाळा
आतुरतेने पाही वाट तीची
ऐकण्या कुजबुज पाखरांची
कानही टवकारती।
मार्च महिनी शाळा सकाळी
करोनामुळे सुट्टी मिळाली
बरे वाटले सुरुवातीला
कंटाळला जीव घरी रहायला।
शाळा बंद, शिक्षण नवा मंत्र
आँनलाईन शिक्षणाचे तंत्र
मी साद घातली विद्यार्थ्यांना
आला न प्रतिसाद त्यासी।
कधी गुंजेल घंटी शाळेची
कधी गजबजले शाळा ती
कधी पाखरे हसती बागडती
काहुर उठले मनामधी।
मनी ओढ लागली शाळेची
ऐकन्या कुजबुज पाखरांची
लवकर संकट करोनाचे
नष्ट होवो जगावरचे
शाळा सुरु होवो आमुची।।
.....................................
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जपूया माणुसकीला
जन्म घेतला मानवाचा
माणसा परी वागू या
सहाय्याचा हात देऊनी
एक, माणुसकी जपूया ।।
असावे प्रामाणिक मनाशी
स्वकर्तृत्व असावे चित्ती
तर आयुष्यात नसते
कधीही कुणाची भीती ।।
जीवनी करावा सदा
थोरामोठ्यांचा आदर
लहानांनाही द्यावा
प्रेमयुक्त आधार ।।
राग, लोभ , अहंभाव
मनी नसावे कधी
सुख समाधान ,छोट्या
गोष्टीतून शोधावे अधिमधी ।।
अनाथ, गरिबांचे कैवारी
होऊनी, आनंद घेऊ या
आपल्या घासातील घास
भुकेल्याला देऊ या ।।
--------------------------------
मंगला डहाके , भंडारा
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अभंग
भेटी लागी जीवा
विठ्ठल हा उभा । उभा विटेवरी।
कर कटेवरी । ठेवूनिया ।।
दर्शनास येती। लाखो वारकरी।
पंढरीची वारी । लय भारी।।
हातात चिपळ्या। टाळ वाजवूनी।
वारी आनंदुनी । निघालिया ।।
भेटी लागे जीवा । पाही डोळाभर।
मन हे आतुर। भेटण्यास।।
ठेविते मी माथा। तुझ्याच चरणी।
दुःख निवारूनी । शांती लाभो।।
----------------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आवडती कविता*
नको येऊ मंदिरात
नको आणू पेढे
रंजल्या-गांजल्यात मी
त्यांच्या अंतरी पहा मला वेडे
नको मला हार
नको तुझे उपकार
भुकेलेला खाऊ घाल
अन्न दे पोट भर
आंधळ्या-पांगळ्या त मी
मूर्तीत कधीच नसतो मी
दीनदुबळ्यांची सेवा
माझी पूजाज ही
दही दुधाने अभिषेक
नको मला घालू
मन असू दे निर्मळ
तिथेच वास माझा सदाकाळ
कशाला येतेस देवळात
तुझ्या अवतीभोवतीच मी
फक्त दृष्टी बदल तुझी
रंजल्या-गांजल्यात दिशेन मी
. *नंदा अनिल भोयर*
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडती कविता
चिल्लर गोळा करत घरातून निघतो
कटकासरीच्या जगात तिकीट काठतो
तिकिटाची रांग आणि तिची वेळ
मदतीमध्ये साधावा भेटण्याचा मेळ
माणसांनी गच्च भरलेल्या फलाटाची
जाणीव माणसातल्या विविधतेची
कोणी मदतनीस तर कोणी गरजू
सुख दुःख सांगत एकमेका सांभाळू
धावत्या गाडीत चठायची घाई
नकळत हवेचा स्पर्श होई
अनोळखी लोकांसोबत बनलेली नाती
छोट्या छोट्या कुरबुरी संपता संपत नाही
विक्रेत्यांसाठी न संपणार दुकान
तिच्या जीवावर त्यांच मकान
उतरणाऱ्याची होते नकळत मदत
वाचलेल्या वेळेचा सदुपयोग करत
आयुष्याच्या या रंगांनी घडवलंय मला
लोकलचा प्रवास नसून अनुभव म्हणतात याला
✍🏻 कु. योगिनी ढबाले
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडती कविता
*माणूस*
उंच झाली घरे
उंच झाल्या माङया,
माणसा तू माणूस
म्हणूनच रहा ना.
मातीशी जुळली नाळ
का तोडतो रे पाश,
पैश्याच्या हव्यासापोटी
विसरू नको मायबाप.
जग हे दिखाव्याचे
भौतिक सुखाच्या मागे,
पळू नको तू वेड्या
मृगजळाच्या मागे.
सुख हे तुझ्याजवळी
डोळे उघडून पाही,
साद घालती तुला रे
निसर्ग सौन्दर्य सारे.
माणूस म्हणून माणसा
राख तुझी तू आब,
तुझ्याच हाती आहे
माणुसकीची लाज.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.20.09.2020
[9/20, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रम्य पहाट
झाडांवर पक्षांचा
किलबिलाट झाला
गायी गोठयामध्ये
हंबरू लागल्या ll
शितिजा कडून
सूर्य वर आला
सोन किरणे
हळूच डोकावले ll
अंधाराने गाशा
गुंडाळला
शनाथ बघा
उजाड झाले ll
पक्षांचे थवे आकाशात
विहरू लागले
तरुवरचे दवबिंदू
निथरू लागले ll
मंद मंद वाऱ्याने
लता वेली डोले
हळूच राघव
मिटटू मिटटू बोले ll
कोंबड्या चे आरवणे
गाव जागे झाले
कोकिळेचा कुहुकुहू ने
माणसे डोले ll
बायांनी सडा रांगोळी
घातली अंगणात
मंदिरातील घंटा निनादली
तेवढयात ll
सूर्याने चारही दिशांना
उजाडले
आसमंतात नवंचैतन्य
बहरले ll
माधुरी भुते
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा ""(६७)
टाळेबंदीत मंदीर,मस्जीद नाही पुजले
याने काय कधी कुणाचे दीसते अडले
कधी कुठे कुणी ना बाधीत दिसले
मग ही कर्मठता नुसती उन्माद वाटले.
दनाअ, नागपूर
दि.२१/०९/२०२०
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सावळा हरी
ओठावरी बासरी
उभा यमुने तीरी
माझा श्री कृष्ण हरी
नंदा भोयर
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 86 वे
कृष्णाचे हे तेज
सावळे सुंदर
चित्ती सदा रही
रूप मनोहर ।।
------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺 पहाटवारा 🌺
सकाळी सकाळीच
रामधून आली कानी
आली धावत पळत
दर्शना उभी अंगणी.
सौ.विणा द.अतकरी नागपूर.
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
**********
उगवत्या भास्करा
वंदन तुज निशिदिन
लाभो सर्वास
आरोग्यमयी जीवन
***************
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌻पहाट वारा🌻
रोज नवीन पहाट उगवती
घेऊन नवीन आशा
पक्षी घरट्यातून निघून
करी अन्न-निवाऱ्या साठी भटकंती
***************
सौ. संगीता कढव
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.८१*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*चिमणा चिमणी दोघे मिळून*
*वेचती एक एक काडी*
*संसार उभा घरट्यामध्ये*
*संकटातुनी वाट काढी*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*चारोळी*
१) *अभिमान*
अभिमान आहे मला
भारतीय असण्याचा
परदेशातही करतात जप
ओम नमः शिवायचा
****************************
२) *सन्मान*
जयजयकार करतात
नवरात्रीमध्ये देवीचा
सन्मान करत नाही
देवीसारख्या स्त्रियांचा
****************************
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळ्या
१) अभिमान
लहानाहुनी लहान मुंगी
ना धरी अभिमान
कण कण साखरेचा
गोळा करुनी होई महान।
------------------------------------
२)सन्मान
शेतामधी राबराब राबतो
उन्हा-पावसात कष्टतो
साऱ्या जगाचा पोशिंदा
जग करी सन्मान भूमीपुत्रा।
----–-–-–----------------------
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी लेखन
१)अभिमान
मला अभिमान
माझ्या भारत देशाचा
अभिमान मज माझ्या
मातृ पितृ बंधुभगिनींचा
२) सन्मान
आई वडील देव आपुले
त्यांचा सन्मान करु या
गुरु ईश्वर तात् माय
सन्मान तयांचा राखु या....
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ◆चारोळी◆
"अभिमान"
अभिमान मला स्त्री असण्याचा
प्रेम, वात्सल्य जोपासी माया
त्याग व समर्पणाची ठेऊन भावना
मान वाढवी दोन्ही घराण्याचा
******************
"सन्मान"
कार्य करुनि जनकल्याणाचे
आयुष्य जगावे सन्मानाने
मरून तर मरायचेच आहे
पण सन्मानाने जायचे आहे
***************
सौ. संगीता कढव, भंडारा
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*चारोळी*
१) *अभिमान*
भारताचे नागरीक असल्याचा
आहे मला सार्थ अभिमान
देश स्वतंत्र करण्या करिता
अर्पण केले कित्येकांनी प्राण
****************************
२) *सन्मान*
आपल्या आई वडिलांचा
करा नेहमी सन्मान
वृद्धाश्रमात पाठवून
नका करू अपमान
****************************
*सौ रुपाली अमोल बोंद्रे*
*भंडारा*
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: "चारोळी लेखन"
१) अभिमान
आपल्या देश संरक्षणासाठी
निस्वार्थपणे दिलं बलीदान
त्यांना शत शत कोटी प्रणाम
अशा विरांचा देशाला अभिमान.
२) सन्मान
आरतीसाठी सजवले ताट
त्यात समईचा न्यारा थाट
ओवाळी तव संत तुकारामा
सन्मानाने देऊ हृदयीं पाट.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *चारोळी*
*
*अभिमान*
अभिमान मला हिंदू असण्याचा
माझ्या हिंदू संस्कृतीचा
माझ्या भारत मातेचा
मी एक भारतीय असण्याचा
*सन्मान*
सन्मान करूया स्त्रियांचा
मुजरा तिला मानाचा
अशी ही स्त्री शक्ती
दुर्गा सरस्वती मनी असावी भक्ती
. सौ नंदा भोयर
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अभिमान
अभिमान कशाला करतो माणूस
काही ना उरे येथे शिल्लक कचरा
मग कशाला करती माणूस धाडस
पैलतीरावरती होतो सरणाचा निचरा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सन्मान
सर्वांना द्यावा मान सन्मान
असो लहान मोठे सान समान
शिवू न देता भेदभावाची घाण
कर्तव्य करावे सदासर्वदा महान
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
वैशाली संजय टिचुकले
यवतमाळ
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजची चारोळी
II सन्मान II
शब्दांचे इथे हार
शब्दच तलवार
'सन्मान' शब्दांचा
जपावा वारंवार
.................................
🌿 मंगेश बांते, पूणे 🌿
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के .सा.सं.प.
उपक्रम..दोन चारोळ्या
(०१) ""सन्मान""
मिळाले नवोदितांना हक्काचे
बि.के.सा.सं.प.मानाचे स्थान
वाढविण्या समाजाचा 'सन्मान'
करती सारस्वत काव्य जोमानं.
(०२) ""अभिमान""
'अभिमान' वाटावा देशवासीयांना
महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांचा
जिवाला आपल्या धोक्यात घालून
सेवेनी ठसा उमटवती कर्तुत्वाचा.
दनाअ, नागपूर
दि.२१/०९/२०२०
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळ्या
*******
1.अभिमान
**********
जननी,जन्मभूमी,
प्राणांहून प्रिय आमुची.
सार्थ 'अभिमान' तयांचा,
ह्रदयी बाळगतो आम्ही.
*******************
2.सन्मान
********
कर्तृत्वाने मिळे माणसा,
'सन्मान' या जगी.
थोर महात्मे होऊनि गेले,
भारतभूमीच्या पवित्र कुशीत.
*******************
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.21.09.2020
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: "चारोळी "
सन्मान
मराठी आहे आपली शान,
चला वाढवु तिचा सन्मान .
हिंदी इग्रंजी आहे भविष्याचा गरजा,
त्यात कमी न होऊ देऊ मराठीचा दर्जा .
अभिमान
शिवरायांच्या भूमीत जन्मलो
याचा आहे सार्थ अभिमान,
देशद्रोही कृत्य करोनी
नका करू अपमान.
सौ.सीमा अ.निवर्ती
मुंबई
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कुणब्याची लेक मी
मातापित्याचा अभिमान
तुकारामांच्या संस्कारांचा
करते वर्तनातुन सन्मान🙏🙏🙏
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी लेखन
१) अभिमान
कोरोनात सेवा दिली
आरोग्य कर्मी, पोलिसांनी
देश हिताची जान ठेवली
अभिमान त्यांचा आहे मनी.
२)सन्मान
तळ हाती प्राणज्योती
निष्ठापूर्वक कोरोनायोद्धे लढती
कुटुंब विचार गौण मानती
सन्मानाने नतमस्तक त्यांच्याप्रती.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी
अभिमान
मनुष्य जन्माचा बाळगु अभिमान
समाजकार्यात लावु हातभार
सार्थक करु या जीवाचा
व्यर्थ जाईल पशुसमान
सन्मान
ज्यांनी चालवली आपली बुध्दिमत्ता
सन्मान करु त्या जीवांचा
लाभल्या सर्व सुखसुविधा
मोठा वाटा त्या वैज्ञानिकांचा
सौ चंदा वनवे शेंडे नागपुर
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अभिमान
कोणत्याही विषयावर
लिहितात साऱ्या छान
बीके ग्रुपच्या मैत्रिणींचा
आहे मला अभिमान ।।
सन्मान
ज्या घरात होतो
सन्मान नारीचा
तिथेच असतो
वास लक्ष्मीचा ।।
----------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळ्या उपक्रम
अभिमान
देश माझा भारत किती महान
थोर संत, समाजसुधारक किर्तीमान
जे देशासाठी झटती त्यांचा अभिमान
अशा हुतात्म्यांना माझा सलाम
सन्मान
मातृत्व दातृत्व शक्ती महान
नारी जातीचा करावा सन्मान
स्त्री शक्तीचे व्हावे पुजन
आजचे लिखाण त्यांना अर्पण
सौ रेणुका झंझाड भंडारा बेला
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळ्या
अभिमान
अभिमान आहे मजकर्तुत्वाचा
अभिमान आहे डॉक्टर नर्स, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांचा
अभिमान वाटतो देशाचा
अभिमान मज हिंदुत्वाचा..
सन्मान करावा गुरुजनांचा सन्मान करावा माय पित्याचा
सन्मान करावा स्त्रीशक्तीचा
सन्मान करावा कवी लेखकांचा.....
रंजना हलमारे साकोली.
[9/21, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी उपक्रम
अभिमान
भारतात जन्मल्याचा
मला आहे अभिमान
देशासाठी जवानांनी
दिले आपले बलिदान
सन्मान
लहान मोठ्यांचा
करू या सन्मान
याच शिकवणीतून
लहान देतील मान
----------------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[9/22, 5:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.७८
इतुकेची देई देवा
तुझा विसर न व्हावा
भूतदयेच्या सेवेत
सदा मन रमावा.
सौ.मीरा शेबे भंडारा
[9/22, 5:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पहाटवारा🌺
विष्णु पुराण ऐकावं
चित्त स्थिर ठेवून
मना वाटे समाधान
सहस्त्र नाम जपून.
सौ.विणा द.अतकरी नागपूर.
[9/22, 5:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (६८)
म्हणे वारकरी ओस पडली पंढरी
विना चंदन टिळ्यानं पांडुरंग दारी
महामारीत सेवा करण्या धावताहे
राबतोया अहोरात्र रामकृष्ण हरी.
दनाअ, नागपूर
दि.२२/०९/२०२०
[9/22, 5:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गरमागरम पोहे
सोबत लिंबाची फोड
ग्रुप मधील मैत्रिणीसोबत
दिवसाची सुरुवात होते गोड
नंदा भोयर
[9/22, 5:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 87 वे
प्रामाणिक असावे
मनाशी सदा
संकटांशी लढण्याचे
बळ मिळे सदानकदा ।।
-----------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/22, 5:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.८२*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*निळ्याभोर मोकळ्या आसमंती*
*पक्षी मनसोक्त विहार करती*
*एक जोडपे पारव्याचे मात्र*
*प्रेमात धुंद झालेले दिसती*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/22, 5:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏प्रात:वंदना🙏
मनी ओढ लागे तुझी= विठ्ठला
आहे कोरोनाचा घोर= जीवाला
दाखव तुझी आगाज = लीला
आता तरी संकटातून तार=आम्हाला
🙏🙏🙏
सौ. संगीता कढव
[9/22, 5:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
**********
नात्यात नाते
मैत्रीचे नाते
अलगद जपते
बंध प्रीतीचे
**********
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/22, 5:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌷🌷 पाकळी🌷🌷
क्र.१
करूनी नमन गणरायाला
करिते सुरुवात लिहण्याला
लिहिते पाकळी सदराला
बि.के.साहित्य स.परिषदेत।
सौ.सरोज मते
दारव्हा🌷🌷
[9/22, 5:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
क्रमांक ७१
🌺 *अनाथांची माय*🌺
*सिंधुताई सपकाळ*
*************************
गुरे राखण्यास पाठवी
बालपणी चिंधीस आई
शिक्षणाची आवड त्यांना
शाळेत घेऊनी जाई.....
अक्षदा पडल्या बालपणी
सासुरवास भयानक होई
म्हशीचे शेण काढतांना..
कंबरडे त्यांचे मोडी.......
घेतला संशय चारित्र्यावरी
नाना आरोप केले त्यांवरी
मारहाण करूनी गर्भवतीस
काढले सगळ्यांनी घराबाहेरी
हाती घेऊनी बाळ तान्हुले
भिक मागी पोट भरण्यास
घास देऊनी भुकेल्यास...
पुढे आल्या सेवा करण्यास
मायेने स्पर्शती सिंधुताई...
प्रेमाने पोरक्या झालेल्यांना
प्रेमाने आपलसं करती.....
निराधार कित्येक लेकरांना
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/22, 5:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: व्यक्तीविशेष
अनाथांची माय
सिंधूताई सपकाळ
अनाथांची माय
सिंधूताई सपकाळ ती
पतीने काढीले घराबाहेरी
नऊ महिण्याची गर्भवती.. ..
जन्म बाळा देती
यातना सोसुनी
ती तबेल्यामध्ये
बाळ पदरात घेऊनी....
जिकडे मिळेल वाट
तिकडे ती जाई
मागतसे भिक्षा
ती ट्रेनमध्ये राही.....
आलेली भिक्षा स्वतःसोबत भुकेल्यांना देई
स्वतःअनाथ असुनी
दुसर्यांचे मन ती जाणी.....
कारण ती होती
अनाथांची माई
नसता मायबाप त्या मुलांची ती आई.....
तयांना माया प्रेम
देऊनी आपलेसे करी
नैराश्यवाद्यांना ठेवी आशेच्या किरणावरी.....
दिसता अनाथ कोणी
अश्रु तयांचे पुसुनी
अनाथांची माय ती
होती दीनवानी.....
हजार लेकरांची होती ती माय
एक बाई नसेल तर संसार शुन्य
त्याचं जन्मी त्यांनी
कमविले सारे पुण्य.....
जगणे शिकविले
सिंधुताईंनी अनाथांना
ज्याने त्रास दिले तो पतीगेला शरण त्यांना.....
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/22, 5:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 💢💢💢💢💢💢💢💢💢💢
🌺 *अनाथांची माय*🌺
*सिंधुताई सपकाळ*
*************************
मुलगी झाली नाव ठेवले चिंधी
चिंधीचे नसते म्हणे काहीच मोल
माय बापाला वाटे मुलगी जड
याच चिंधीने कार्य केले अनमोल
पतीने घराच्या बाहेर
गरोदर पनात हाकलले
कन्येला जन्म दिला गोठयात
भीक मागण्यास भाग पडले
लोक करी कन्येची हेटाळणी
सिंधुताई देई आसरा पदरात
रंजल्या गांजलेल्याना करी आपुले
संघर्षमय दिवस राही स्मशानात
भीक मागे, भाषण करी
भरत असे पोट भाकरीने
अडाणी असे माऊली
मंत्रमुग्ध करे शब्दाने
देश विदेशचा दौरा होई
गोळा करण्या देणगी
परिवार झाला हजारोंचा
भरे सर्वांच्या पोटाची खळगी
अनेक पुरस्कार प्राप्त झाले
जीवनावर असे चित्रपट
बघताच डोळ्यात पाणी उभे राहते
असा सिंधुताई सपकाळांचा जीवनपट
*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/22, 5:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कविता
"अनाथांची माऊली "
🌹 सिंधुताई सपकाळ. 🌹
जन्म घेतला महाराष्ट्र राज्यात
दिन चौदा नोव्हेंबर सत्तेचाळीस
तारका अवतरली वर्धा जिल्ह्यात
अभिमान वाटावा असा जगास.
लहानपणी झाले तिचे लग्न
संसाराची काही नव्हती जाण
प्रपंचाचा भार आला तिचेवर
तरीही घरसांभाळ केला तिनं.
अनाथांची माऊलीची माया
शिक्षित करुन मार्ग दावीले
उच्चशिक्षणाचा देऊन या धडा
सर्वांनी संसार सुखाचा मांडला.
गरीबीला देऊन मात
करी अनाथांचा सांभाळ
आवडती लाडकी माई
नाव सिंधूताई सपकाळ.
अशी ती माऊली गेली परदेशा
जाऊन गाजविलं महाराष्ट्राला
शासन दरबारी नोंद ती सारी
नमन माझे त्या व्यक्तीमत्वाला.
सौ.विणा द.अतकरी, नागपूर
दि.२२/०९/२०२०
[9/22, 5:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (१२२)
🌹अनाथांची माऊली. 🌹
""सिंधूताई सपकाळ""
वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे
माहेर कु.चिंधी अभिमान साठे
शिक्षण वर्ग चौथा,अन् लागला
लग्न नवरगावात,पडलेच सोठे.
तिन मुलांची आई मी झाली
शेणखताची लढाई जीकली
पण संसारात माशी शिंकली
शंकेने नवबाळंतीन हाकलली.
घरातील खाती सर्व मटका मारून
गोठ्यातून पाही, ना देती अन्न टाकून
मुलींची नाळ दगडा नाल्यात तोडली
थंड पाण्याने उपाशी आंघोळ घातली.
दहा दिवस पोटात अन्न नाही
दारचेही मागून न् देती काही
आरोपांवर आरोप देती भारी
सोडले घरदार देव तो पाही.
आत्महत्तेचे खुळचट पळाले
मुली ममताला छाती लाविले
कुत्र्याने मैद्याची पुडी ठेवली
त्यांचे शेकोटीवर रिपट थापले.
आयुष्यात संघर्ष, झगडा केला
मेळघाटात मनुष्य तो घडविला
सिंधुताईअनाथांची माऊली देते
धडे देशाभिमानं खंद्या तरूणाला.
दनाअ, नागपूर
दि.२२/०९/२०२०
[9/22, 5:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अनाथांची माऊली
* सिंधुताई सपकाळ*
सिंधुताई सपकाळ माई
असे मायेचा दयेचा अथांग सागर
पतीने केले गर्भवती वर अत्याचार
जन्मदात्या माये न ही न दिला आधार !
माय झाली गाय
बाळाचा जन्म देऊनी गोठ्यात
निघाली दोष देत नशिबास
खाण्यास नव्हते काही
अवतार पाहून तिचा जवळ न कोणी घेई!
स्मशानाला बनविले घर
भूत म्हणुनि पळती दूर
भुकेने होई कासावीस
भाजिली मग भाकरी प्रेतावर!
गोड गळा गाण्याची आवडत
मागुनी भीक स्टेशनवर, काढले दिवस
आत्महत्येस झाली प्रवृत्त,
पण जगण्याची होती आस!
पोटच्या गोळ्याला ठेवून दूर
हजारो अनाथांची झाली माय
भाषणाचे कसंब,ख्याती तिची परदेशात
नऊवारी बेस्टच्या तोऱ्यात!
जाने लोटले दूर
त्यानेच घेतला तिचा आधार
मन केले घट्ट घेतले त्यालाही दत्तक
सगळ्यात छोटे बाळ म्हणूनी आहे आश्रमात!!
रंजना हलमारे( सेलोकर)
साकोली.
[9/22, 5:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹🌹चांदरात🌹🌹
आता पून्हा कुठे ती,चांदरात नाही
गंध तुझ्या वेणीचा,अत्तरात नाही...!!
आल्या विरून गेल्या,त्या मदमस्त राती
तुज सांगते मनीचे,मीही भरात नाही...!!
श्वासात गीत होते,नजरेत धून होती
तू गायलेले संगीत,कोण्या सुरांत नाही...!!
मीही उधाणलेला अन् तुही उधानलेली
ऐसे उधाण येणे,पून्हा सागरात नाही...!!
"प्रितीच्या झुल्यावर" मलाही झुलू दे सखे
ऐसा झुला कुठेही,सा-या जगात नाही...!!
लेणी अजिंठ्याची,मी पाहिली कितीदा
ती मस्तवाल काया,कोण्या पत्थरात नाही...!!
वार तुझ्या नजरेचे,करी घायाळ काळजाला
धार तुझ्या नख-याची,खंजरात नाही..!!
सामावले तुझ्या गे,डोळ्यांत विश्व सारे
तैसेची सुख शांती,सा-या ब्रम्हांडात नाही...!!
'पारस'
राजीव शा.बुध्दे
मांढळ(कुही).,नागपूर....
मो.9673901225.
[9/22, 5:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ♦️♦️सिंधू♦️♦️
वासराची गाय सिंधू
लंगड्याचा पाय सिंधू
दुधावरची साय सिंधू
अनाथांची माय सिंधू.......
अन्यायावर वार सिंधू
धारदार तलवार सिंधू
गरिबांचे घरदार सिंधू
पिडीतांची सरदार सिंधू....
वात्सल्याचा झंकार सिंधू
गांजल्यांचा हुंकार सिंधू
पिडीतांचा सत्कार सिंधू
धरणीवरी चमत्कार सिंधू.....
स्त्रित्वाचे सत्व सिंधू
महिलांचे महत्व सिंंधू
तान्हूल्याचे ममत्व सिंधू.
अनाथांचे पित्रूत्व सिंधू........
सद्धर्माची प्रथा सिंधू
भागवताची कथा सिंधू
संत तुक्याची गाथा सिंधू
हिमालयाचा माथा सिंधू......
कष्टाची परिभाषा सिंधू
जगण्याची आशा सिंधू
विजयाची दिशा सिंधू
दु:खातही 'हशा' सिंधू....
प्रेमाचा आगर सिंधू
मायेचा सागर सिंधू
भक्तिचा जागर सिंधू
अम्रुताची घागर सिंधू.......
मानवतेचा मान सिंधू
भारतियांचा अभिमान सिंधू
राष्ट्रभक्तीच् गान सिंधू
या देशाची शान सिंधू....
'पारस'
राजीव शा.बुद्धे.
मु.+पो.मांढळ(कुही)
जि.नागपूर
[9/22, 5:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अनाथांची माऊली
सिंधुताई सपकाळ
..................................
तु माऊली अनाथांची
तु सावली पोरक्या बाळांची
दिला तु आधार
जी बालके निराधार।
जीवन होते पोरके तुझे
पतीने तूज बाहेर काढले
लहान तान्ही पदरामध्ये
सांभाळून तिला अभिमाने।
पाहुनि अनाथांची दैना
कळवळे ह्रदय तुझे
झाली तु तयांची माय
सांभाळी त्या बालकांना।
शिकविले, घडविले
जगण्यासाठी समर्थ बनविले
पार पाडसी कर्तव्य मायेचे
धन्य जहाली तु खरोखरी।
......................................
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/22, 5:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अनाथांची माय*
*सिंधुताई सपकाळ*
मायेचा सागर
ममतेचे घर
अनाथ लेकरांवर
झाकला तिने पदर
दिली उब त्यांना
अनाथ शब्द पुसुन
माय झाली त्यांची
कंबर आपली कसून
माणूस म्हणून उभी
खंबिर ती सिंधू
म्हणून ठरली ती
मानाचा बिंदू
अनाथांची माय
लिहिण्याकरता शब्द नाय
अशी सिंधुताई सपकाळ
तिला कोटी कोटी प्रणाम
*सौ नंदा अनिल भोयर*
[9/22, 5:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अनाथांची माऊली
"" सिंधुताई सपकाळ ""
डोईवर पदर नववारी पातळ
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ
दिनाची सावली उचली बाळ
हजारो तिचे अनाथ मुलं
तिला शिक्षणाची आवड मोठी
आईने पाठविले म्हशी पाठी
म्हशी ठेवितसे पाण्यात बसवून
जावून येई शाळेमधून
लहानपणी झाले तिचे लग्न
आणि सासरी आले मग विघ्न
सगळ्यांनी तिचा छळ सुरू केला
गोठ्याच्या रस्ता दाखविला तिला
गोठ्यामध्ये मग जन्मले बाळ
दगडाने ठेचुन तोडली नाळ
गाईने केले तिचे संरक्षण
पतिने तारुण्यात दिले हाकलून
रेल्वेत मागे गाणं गाऊन भिक
इतर भिकार्यांना देई घास
टाकलेले अन्न शिळ्या भाकरी
खाऊन राही ती स्टेशनवरी
किती हाल,कष्ट सोसले तरी
खचली नाही अनाथांची माऊली
सासरी, माहेरी सत्कार भारी
बावीस परदेशी झाली तिची वारी
सौ रेणुका झंझाड भंडारा बेला
[9/22, 5:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सिंधूताई सपकाळ
💐💐💐💐💐💐💐
रडत बसणे नसे मानवाचा धर्म
अन्यायास कर प्रतिकार दाखव सामर्थ्य
सिंधूताईने शिकविले करा सत्कर्म
अनाथांना बनविले तिने जगण्यास समर्थ
संघर्ष असे प्रत्येकास जीवनात
त्याचे प्रत्यंतर करावे सकारात
शिकवी हा महान उपदेश सर्वांस
सिंधूताईचे असे उपकार सर्वात
कोणी सांभाळले असते त्या अनाथांना
कोणी घेतली असती काळजी त्या गरीबांची
झाली सर्वांची तू मायबाप पोरक्यांची
त्यांच्यासाठी लावी तू बाजी स्व जीवनाची
असे परखड बोलणे वाटे इतरांना ते कडवी
ना केली पर्वा तिने समाजाची,तिने केले सर्वस्व दान
अशी आमची सिंधूताई असे सर्वांसाठी आदर्श घडवी
तिने जीवनमार्ग दाखविला जगण्यास महान
वैशाली टिचुकले
यवतमाळ.
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[9/22, 5:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: व्यक्तिविशेष
सिंधुताई सपकाळ
भारतीय सामाजिक कार्यकर्त्या
आहेत सिंधुताई सपकाळ
हजारो अनाथ मुलांचं
करतात एकट्याच साभांळ ।।
चिंगी लाडकी माय बापाची
नव्या वर्षी लग्न झाले
श्रीहरी सपकाळ पती मिळाले
सासुरवास अतोनात झाले ।।
संशय करून नवऱ्याने
काढले घराबाहेर
रात्र रात्र काढली
रेल्वे स्टेशन वर ।।
भीक मागून, भजन
गाऊन अन्न मिळवायची
एकटे न खाता सर्व भिकारी
गोळा करून जेवायची ।।
ममता बाल सदन संस्था
स्थापन केले
अनाथ बेवारस मुलांना
आधार दिले ।।
त्यांच्या बोलण्याने
समाजाला प्रभावित केले
कितीतरी पुरस्काराने
त्यांना सन्मानित केले ।।
यशोदा झाली
अनाथांची सिंधुताई
तूच आहे साऱ्या
जगाची आई ।।
---------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[9/22, 5:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अनाथांची माय
सिंधुताई सपकाळ
सिंधुताई सपकाळ
असे अनाथांची माय
स्वतः दुःख भोगून
इतरांना आनंद दिला होय ||
घरच्यांनी तिला
घराबाहेर काढले
समशानातील कणिक
भिजवून भाकरतुकडा खाल्ले।।
गरीब-श्रीमंत, धर्म,पंथ
जातीभेद न बघता
आश्रय दिला अनेक
मुलांना, हीच ती दाता।।
गरिबीनेच तिला
गरीबाची जाण दाखवली
हजारोच्या वर मुलांची
प्रेमळ ती आई झाली।।
शासनानेही पुरस्कार
मोलाच्या कार्याबद्दल दिला
किती तरी आश्रम उघडून
अनाथांना आश्रय दिला ।।
मंगला डहाके, भंडारा
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (६९)
उगवत्या रे सूर्य नारायणा
प्रभाते नमन माझे सकळा
पसरवं तुझा सुवर्ण पसारा
संपू दे ही जगाची अवकळा.
दनाअ ,नागपूर
दि२३/०९/२०२०
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
**********
निळ्या आभाळा
उडतो पाखरांचा थवा
सकाळ झाली सखींनो
सुप्रभात वंदन तुम्हाला
******************
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 88 वे
झाडावरचे पक्षी
करती किलबिलाट
उजळत्या प्रभातीचा
असे सोनेरी थाट ।।
--------------------------------------
मंगला डहाके ,भंडारा
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पहाटवारा🌺
देवघरात ठेवला
नंदादीप तेवत छान
नारायणास मागते
अखंड सौभाग्य दान.
सौ.विणा द.अतकरी.नागपूर.
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वाती🎂
वाढदिवशी दीनी स्वातीला
सर्व सखींचे मिळे आशिर्वाद
बी.के.साहित्य सं.परिषदेनी
केली अभिनंदनाची बरसात.
सौ. वीणा द. अतकरी, नागपूर
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गोड अवीट सुंदर दिसणारी
छान छान कविता लीहणारी
सर्वात आधी कविता टाकणारी
गोड आवाजात गायन करणारी
रचीयता सर्व सन्मान मिळवणारी
सर्वांना अभिप्राय देणारी
अशी ही स्वाती ताई 🍫🍫🍫 जन्मदिवसाच्या खूप खूप 🎂 शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹🌹
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय - साहित्य चोरी*
~~~~~~~~~~~~~~~
वाहवा मिळवावी वाटे मनी
प्रसिद्धीचा हव्यास भारी
तेच करतात साहित्य चोरी
विचारशक्ती आपुली न वापरी
उचलला लेख आणि काव्य
मिटवितात लेखकाचे नाव
पाठवती समूहात तोऱ्यात
घालून आपले ठळक नाव गाव
साहित्याच्या विशाल जगात
स्वतःला समजती हुशार
फसवणूक करून स्वतःची
पुढे कसे हो हें जाणार
बरेच असे लबाड या जगतात
इकडचे साहित्य तिकडे करणारे
लिखाण जमत नसल्यास
लिहितातच का असतील बरे
लिखाण करावे प्रामाणिकपणे
व्यक्त कराव्या आपल्या भावना
विचार थोरामोठ्यांचे जरी
मांडाव्या शब्दात घेऊन प्रेरणा
*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
क्रमांक ७२
*साहित्याची चोरी*
साहित्याच्या जगातही
करतात लोकं चोरी...
एकेक वाक्य चोरून
कथानक पूर्ण करी
दुसर्याच्या कवितेतून
एकेक कडवी चोरतात
कविता पूर्ण करून खाली
आपले नाव लिहितात
काही चोर असतात
कमालीचे अतरंगी..
गूगलवरुनच छापुन
मी केली असं सांगी
काही शब्दांचा तर...
अर्थही त्यांना ना कळे
काय लिहिले काय नाही
त्यांचेच त्यांना ना वळे
चोरायची आणि छापायची
झाले नुसते फुकट खाऊ
भीती नाही त्यांच्या मनात
कधीतरी पकडले जाऊ
नका करू कधीही कुणीही
चोरी दुसर्याच्या कवितेची
एकेक शब्द गुंफून बनवा
कविता आपल्याच मनाची
नसले साहित्यिक शब्द
तरीही काही हरकत नाही
भावना कवितेत व्यक्त करा
कुणी काही म्हणणार नाही
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कविता
""साहित्य चोरी""
शब्द लिहावे मनाचे
घेऊ नये ते जणांचे
कार्य होते चोरीचे
नव्हे साहित्यिकांचे.
करू नका साहित्य चोरी
स्वताच्या मनाच्या चार ओळी
लिहिता वाटे समाधान भारी
मला मिळाली लेखणी भाळी.
इकडून तिकडून घेती
एक एक चोरुन ओळ
समुहात कळलेच की
बदनामीनं हात चोळ.
डोकं ठेवा चिंतनी
घ्यावा विचार मनी
तयार होती शब्द संग्रह
कविता बहरते लेखणी.
सौ.विणा द.अतकरी.नागपूर.
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: साहित्याची चोरी
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
साहित्याच्या चोरीचे प्रकरणं
साहित्यक्षेत्रात वाढले खूप जास्त
कशाला वागती असे चांगली माणसं
मनीच्या भावना असतात का इतक्या स्वस्त
कशास करता अहो अशी चोरीमारी
मनीच्या भावना ना चोरू शके कोणी
असे चौर्यकर्म असे खूप अघोरी
विनासायास कसे मिळे दह्यातून लोणी
दुसर्यांचे साहित्य लिहिती स्वतःच्या नावी
वाटत नसेल का मनाला काय हे खरीखोटी
काय करत असतील हे सर्व इतरांना दाखवी
कोंबडं झाकले म्हणून तांबडे का ना फुटी
साहित्यक्षेत्रात वाढले स्तोम दिखाऊपणाचे
पूर्वी नव्हते हे क्षेत्र इतक्या कमीपणाचे
आज प्रत्येक जण धावतो प्रसिध्दीच्या मागे
फेसबुक,इन्स्टा,स्टेटसला असते दाखवायचे
वैशाली टिचुकले
यवतमाळ.
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: साहित्याची चोरी
चोरी सोन्याची पैशाची चोरी
ऐकतो आपण नेहमी
आमच्या बी के गृपमध्ये
नाही करत साहित्य चोरी आम्ही ...
विषय दिसला की
अक्षर शब्द सुचतात आम्हास्नी
कविता अश्शी बरं
होते तयार पटतयं तुम्हास्नी.....
चोरी कशाला करायची
कुणाच्या साहित्याची आपली तुटकीफुटकी का असेना
आपल्याच कामाची.....
फक्त विश्वास आपलं
असु द्या आपल्यावरी
आपण चोरी नाही केली ना
मग भिती कशाची
पर्वा बी कुणाची होय ना......
साहित्य कोणाचे चोरु नये
साहित्य चोरणे म्हणजे
स्वतःला दुबळे बनवणे
योग्य केली शब्दाची गुंफण की कविता सजे.,...
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बिन.के.सा.सं.प.
उपक्रम..कविता (१२३)
""साहित्याची चोरी""
करती साहित्याची चोरी
वरून सांगते शिरजोरी
करी अपमान लेखनीचा
आणते आव बळजोरी.
अ गा या भल्या माणसा
शब्दांस भटकू नको असा
बसं ना साहित्य वाचना
बघावं शब्द उमगते कसा.
शब्दाला शब्द जोडूनी
होते ओळंच तयार ती
थोडासा यमक शेवटी
वाटते शब्दांची माळ ती.
करा शब्दकोषाचे चिंतन
नका ठेऊ चोरीचे वर्तन
शब्दांची गुंफण असे ही
घ्या लेखनी करा मंथन.
साहित्य चोरीचे महद् पाप
कुणी करू नये उपदव्याप
अशा साहित्यिकाचे कर्मानं
होतात माना खाली शरमेनं.
दनाअ, नागपूर
दि.२३/०९/२०२०
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: साहित्याची चोरी
नका होऊ साहित्यचोर
करा अपुल्या बुद्धी नीच विचार
लिहा जसे जमते तसे
करू नका अपुले च हसे..
चोरी म्हणजे चोरी
मग ती साहित्याची असो वा अन्य कशाची
आपणासच पडते भारी....
नका चोरू दुसऱ्या ची ओळ
शब्द शब्द गुंफूनी जमवामाळ
जाईल सुरुवातीला थोडे कठीण
पण जमेल मग करता प्रयत्न...
कविता करा छान
स्वरचित कवितेचा मिळवा मान
साहित्य आहे महान
साहित्याचा, साहित्यिकांचा करा सन्मान....
रंजना हलमारे( सेलोकर)
साकोली.
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *साहित्याची चोरी*
इकडचे तिकडचे करुनि
कविता तयार करायची
माझीच कविता म्हणून
आपल्या नावावर लिहायची
अंगवळणी पडली सवय
मेल्याशिवाय जात नाही
साहित्य असो वा काही
चोरल्या शिवाय करमत नाही
येईल तसे लिहावे
कशाला कुणाचे विचार घ्यावे
स्वतंत्र विचार मांडावे
दुसऱ्यांचे साहित्य न चोरावे
समाधान न मिळे त्यात
आपणच पडतो बुचकळ्यात
कुठेतरी वाटते मनाला
हे माझे साहित्य नाही कसे सांगावे जनाला
सौ नंदा भोयर
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: साहित्याची चोरी
साहित्याची चोरी
म्हणजे चोरावर मोर
नको नक्कल
लावावी अक्कल ll
साध्या सोप्या भाषेत
मांडावे आपलेच मत
जन व्यवहारी भाषा
तिच शब्दात बाधांवी ll
एक एक शब्द गुंफुणी
बनेल ओळ
यमक जुळवून खास
स्वरचित कवितेचा घ्यावा ध्यास ll
कल्पकता स्वतःची
अभिव्यक्त होतील
मनातील भावना
समाधान वाटेल मनाला ll
माधुरी भुते
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: साहित्याची चोरी
***************
दुसऱ्याची गाय
ना बांधावी दारी
शिकल्या लोकांनी
ना करावी कारागिरी
अपुलेच खावे
मिळे सुख समाधान
दुसऱ्याचे खाता
पडेल उलटीन
कामधंदा करता
डोक्यात आणावा शब्द
त्याचे गीत गाता
शब्दास जोडून शब्द
असे करतांनाच
जुळतील ओळी
आरोप ना लागे
साहित्याची चोरी
शिकून आपण
ज्ञान नवीन घ्यावे
साहित्यीक कवींचे
मान ही राखावे
खरे साहित्यीक
मुळातच दुर्मिळ
स्वत:ला देती झोकुन
लेखणीला त्यांच्या बळ
सौ रेणुका झंझाड भंडारा बेला
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: साहित्य चोरी
चोरी असो कुठलीही,
चोरी ती चोरीच.
असा कसा विचार,
लोक करतात अघोरी.
कला-साहित्य,गुण
अंगी असतात उपजतच.
देवाची देणगी ही,
कशाला उठाठेव फुकटच.
घातल्या पाण्याने,
गंगा कधी वाहत नाही.
चोरीच्या साहित्याने,
मनाला समाधान मिळत नाही.
खऱ्या साहित्यिकाला
नसते कुठलीही आशा.
कौतुक पुरस्कारापेक्षा
हवे,आत्मिक समाधान.
साहित्यिकांचे साधन
साधना ,अभ्यास.
साहित्याची चोरी
असे लांच्छन.
अस्सल साहित्यास,
मिळे जगी सन्मान.
खोटेपणाचे पितळ,
उघडे कधीतरी.
चोरीच्या साहित्यपरी
करावी साधना,
"असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास" ,सांगून गेले "संत तुका".
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.23.09.2020
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🥱साहित्य चोरी🥱
कुणा वाटते व्हावे मोठे साहित्यिक
पहावी करून एखादी छानसी कविता
नाआठवती शब्द तयाला वाचन कमी
पहाती मग चोरुनी इतरांची रचना ||
यास जन म्हणती का साहित्य चोरी
जसेच्या तसे लिहतो जो पाहुनी
देवुन नाव आपले,ही साहित्य चोरी!
पाहुन लिहता घडे साहित्य अवलोकन|
जैसे येईल तैसे लिहावे,स्तोंभ नसावे
न आवडो कुणाही,चित्ती समाधान पावे
जाणते व्हा वे करुन प्रयत्न लिखाणाचे
सुर गवसतील साहित्य लिखाणाचे सारे
वाचता वाचता वाढे शब्दसंग्रह
लेखणी ही चाले मग सहज
शिकता शिकता येते मावळेइतरांचे हसु
परी करावे न सिाहित्य चौर्य||
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: साहित्य चोरी
शब्दकोश वाढवून
कविता आपली करा
आपली कविता
म्हणून स्वतः मिरवा ।।
मनात येईल ते उतरवा
आपल्या कवितेत
नका करू आपलाच
हसा या साहित्यात ।।
दुसऱ्याची कविता
नावावर आपल्या करू नका
फसवणूक आपली
स्वतःची करू नका ।।
साहित्य चोरी यात
काय तो मोठेपणा
असावे आपले साहित्य
नाहीतर ठरतो गुन्हा ।।
----------------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: साहित्य चोरी
.....................................
नका करू चोरी साहित्याची
हानी होईल तुमच्या प्रतिभेची
वेडेवाकडे होईना चारशब्द
लिहण्याचा यत्न करा तुम्ही।
साहित्यचोरा शब्द ना सुचती
उगा जुळवाजुळवी करती
करीती स्वतः फसवणूक ती
कुंठीत करती बुध्दीमत्तेसी।
घेती शब्द इकडचे तिकडचे
कधीकधी तर कडवे सारे
कोणी सांगावे तयासी
असे करणे बरे नोव्हे।
स्वनिर्मितीचा आनंद नसे
ना मिळे चालना बुद्धीसी
करती घात स्वतःचा
करूनी साहित्यचोरीसी।
आम्ही शिलेदार सारे
बिके साहित्य स परिषदेचे
करीतो यत्न लिहण्याचा
नाही करत साहित्याची चोरी।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/23, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हौशी माझी नणंद बाई
कविता रचायची फारच घाई
सदा उत्साहाने भाग घेई
अशी आमची स्वाती ताई
वाढदिवसाच्या खास दिनी
प्रार्थना आहे गुरू चरणी
सुख आरोग्य नांदो अंगणी
ताई आमची आहे सद्गुणी
💐💐💐💐💐💐💐
[9/25, 8:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.८०
काळोखात असते
काजव्यांची साथ
जिद्द परिश्रमाने
देवू संकटांना मात.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌷🌷पाकळी🌷🌷
क्र.२
आई माझी माऊली
तिच माझी सावली
देई नित्य प्रेरणा ती
जीवन जगण्याची।
सौ.सरोज मते
दारव्हा🌷🌷
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌸पहाटवारा🌸
एका मागून एक
संकट येती वरच्यावर
आता थांबव पांडुरंगा
महामारीचा हा कहर.
सौ.विणा द.अतकरी.नागपूर.
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि. के.सा.सं.प.
""संस्कारधारा "" (७०)
प्रात:काळी जागृत होता
करावं नमस्कार सृष्टीला
पवित्र संस्कार तव मना
शिकवून जाते सकळाला.
दनाअ, नागपूर
दि.२४/०९/२०२०
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: दर गुरुवारी
शेगाव ची वारी
गजाननाची माझ्या
लीला न्यारी
नंदा भोयर
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.८४*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*माझ्या घरच्या बागेत*
*आवडता मोगरा लावला होता*
*खुडून नेले फुल त्याचे*
*सुगंध तेथेच सांडला होता*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
**********
गुरू मंत्राचा
महिमा अगाध
सामर्थ्य देई
होई नवप्रभात
"गण गण गणात बोते"
जय गजानन
******************
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
कविता..पदार्थांचे महत्त्व (१२४)
"" मेव्याचे लाडू ""
लाडू मेव्याचे
पौष्टिक असते
रोगप्रतिकारता
मनाची वाढते.
बाजारातून आणा
अठरा प्रकारचे
सौद्यांना आणून
तुपात भाजायचे. थर
मुंग पिठामध्ये
गुळ चिक्कीने
एकत्र मिसळून
लाडू बनवणे.
दररोज दोनवेळा
अगोदर जेवणाचे
आनंदाने खावून
क्षणभर फिरायचे.
रक्त अंगातील
मस्त सळसळते
तरतरी वाढून
मनोबल वाढते.
स्वत:ला विचारा
कसं काय वाटते
प्रसन्न तनमनाने
नकारकता जाते.
दनाअ, नागपूर
दि.२४/०९/२०२०
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 89 वे
मंगलमय पहाट होता
कोकिळ स्वर कानी गुंजते
गायही वासर मुखी
गोड पान्हा सोडते ।।
------------------------------------
मंगला डहाके , भंडारा
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडता पदार्थ पाणीपुरी
पाणीपुरी आवडे मज भारी
खावून टाकावी वाटे सारीच्या सारी
पण अडवी मज सगळे आमच्या घरी
म्हणे खाताना वाटे तू उपाशी नारी
तरीही आवडती मज पाणीपुरी
काय सांगावे या मोठ्यांना तिची महती
तिला आबालवृद्ध सर्व संमती
कुणी केली असेल तिची निर्मिती
देवादिकांना सुध्दा ती आवडती
मग मलाच सगळे का रागावती
तुझे वर्णन किती करू मी निर्गुणी
तू तर आहेस सद्गुणांची खाणी
सर्व समारंभात लागते तुझी वर्णी
लोक आनंदाने गाती तुझी गाणी
गुपचुप खा आता बोलू नका कोणी
वैशाली टिचुकले
. यवतमाळ.
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडता पदार्थ पुरणपोळी
......................................
आवडी मजला पुरणपोळी
लुसलुशीत साजुक तुपातली
स्वादिष्ट चवदार रूचकर
गरम गरम तव्यातली।
पुरणपोळीस विशेष मान
महानैवेद्यात तिचे स्थान
दुध तुप सोबतीला तिच्या
खाण्यास येई मजाच मजा।
होळी, पोळा, दसरा ,दिवाळी
घरोघरी बनतसे पुरणपोळी
मोठा पाहुणचार पाव्हण्यासी
खाऊनी सारे तृप्त होती।
पुरणपोळीची चवच न्यारी
तिची सर कोणी ना करी
साऱ्या पदार्थांची राणी ती
मज आवडते मनापासूनी।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
कविता..पदार्थांचे महत्त्व (१२४)
"" मेव्याचे लाडू ""
लाडू मेव्याचे
पौष्टिक असते
रोगप्रतिकारता
तनाची वाढते.
बाजारातून आणा
अठरा प्रकारचे
सौद्यांना आणून
तुपात भाजायचे.
मुंग पिठामध्ये
गुळ चिक्कीने
एकत्र मिसळून
लाडू बनवणे.
दररोज दोनवेळा
अगोदर जेवणाचे
आनंदाने खावून
क्षणभर फिरायचे.
रक्त अंगातील
मस्त सळसळते
तरतरी वाढून
मनोबल वाढते.
स्वत:ला विचारा
कसं काय वाटते
प्रसन्न तनमनाने
नकारकता जाते.
दनाअ, नागपूर
दि.२४/०९/२०२०
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडता पदार्थ
**********************
भेळ
भेळ चे नाव आठवताच
सुटते तोंडाला पाणी,
जाणून घेऊया तीची
मजेशीर कहाणी.
उरलेसुरले जिन्नस
करोनी एकत्रित,
लिंबू पिळून मग
भेळ बनवली चटपटीत.
भेळ साठी नाही
काही विशेष माप,
नसे मुळीच म्हणुन
डोक्याला ताप.
आबालवृद्ध सर्वांची
आवडती भेळ,
जगू नको अहंकारात
होईल व्यर्थ वेळ.
सर्वांचे चांगले गुण
ग्रहण करोनी,
बनवूया त्याची भेळ
अपुल्या जीवनी.
आहे अमुचे वैशिष्ट्य
विविधतेत एकता,
हीच शिकवण मिळते आम्हा
भेळ चे रूप बघता.
तिखट आंबट गोड
जशी भेळ,
असाच तर आहे
आपल्या जीवनाचा खेळ.🙏
सौ.सीमा अ.निवर्ती
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडता पदार्थ
शंकरपाळी
खुसखुशीत शंकरपाळी
करण्यास अगदी सोपी
साहित्यही लागती कमी
नाही भापट पसारा, लाटतो जाड पोळी....
विविध त्यांचे आकार करा
लांब गोल, त्रिकोणी, चौकोनी
प्रवासातही नेता येई
चिवड्या संगत असतो बरा....
लहान मुलेही बिस्किट सारखे
खाती येताजाता
नाही सांडत पाक, नाही होत हात चिकट
नाही बसत मार आता...
खारे आणि गोड
याचे प्रकार दोन
शुगर वाले ही खाती मस्त
नसती गुलाबजाम, लाडू, जिलेबी सारखे नुसतेच गोड....
जास्त काळ टिकती
केव्हा येता घरी पाहुणे
सादर त्यांच्यासमोर होती
असे खुसखुशीत शंकरपाळी
खुश सगळे होती
याला जेव्हा खाती
तोंडातच मस्त वीरघळती.....
रंजना हलमारे साकोली.
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मुगाच्या डाळीचा हलवा
मुगाच्या डाळी लां
भिजत घाला
जाड सर रवा
सारखा बारीक करा
तुपात खरसुप
भाजा लाल
गरम पाणी
आणि साखर टाका
साजूक तुपात लं
मुगाचा हलवा स्वादिष्ट
चविष्ट लागतो छान
शरीराला आहे पौष्टिक मोठा
लग्नसमारंभात असतो
छोटी मोठी कार्यक्रम
लज्जतदार बनवीत असते
काजू किसमिस ने शोभा वाढविते
माधुरी भुते
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अनारसे*
दिवाळीत अनारशाला
जास्त असतो मान
लक्ष्मीपूजनाला
आवर्जून स्थान
साखरेचे गुळाचे
दोन्हीपैकी एकाचे
करता येतात
तेल किंवा तुपात तळता ही येतात
दोन दिवस तांदूळ
भिजून घ्यायचे
ओलसर जाडसर
मिक्सर वर काढायचे
थोडी कमी साखर
घालून गोळा करायचा
काढतेवेळी चांगला चुरायचा
छोटे छोटे गोळे करून
पुरी लाटून घ्यायची
छान जाळी पडली कि
रेसिपी जमली म्हणायची
गरम-गरम अनारसे
आवडतात कुणालाही
फराळाच्या डिशमध्ये
आवर्जून असतोच बाई
नंदा भोयर
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझ्या आवडीचा पदार्थ
गुलाबजाम
मजआवडते
तिखटपेक्षा गोड
गोड खाल्ल्यांने असते
चांगल्या कामाची ओढ.....
खवा व थोडा मैदा
घ्यावा कढईत परतुनी
थंड करुनी एकजीव
घ्या तळुन छोटे छोटेगोळे करुनी......
एकतारी पाक बनवावा साखरेचा
घालावेत हे गोळे त्यात
लवंग विलाईचीखोबरकिस
घालुनी मुरु द्यावे पाकात.....
खायला द्यावेत सर्वांना
एक तासाने गुलाबजाम
रसरशीत खवखवीत गुलाबजाम.......
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ❣️माझा आवडीचा पदार्थ रसगुल्ला❣️
आवडता माझा रसगुल्ला
साखरेच्या पाकात भिजलेला
गोलाकार अंडाकृती आकाराचा
मऊ पांढरा दुधाने बनलेला।।
कथा वेगळी पोतीपुरानात
बंगाली पदार्थ संबोधतात यास
जगन्नाथ लक्ष्मीस न सांगताच
निघाले होते रथयात्रास।।
परतले जगन्नाथ आपुल्या नगरात
रूसली माता उघडेना दार
खुश करण्यास आखला उपाय
आज पदार्थ मी बनवणार।।
रसगुल्ला आवडी लक्ष्मीला फार
बसले बनविण्यास स्वःता खास
चाहुल लागता आनंदी आनंद महालात
रसगुल्ला नैवेद्य नवरात्री व्रतास।।
वाढला रसगुल्लाचा मान
काविळ रोगावर औषधि रुपात
घेऊन बघा सकाळ सांयकाळ
रोग दुर होतो तीन दिवसात।।
कमी नाही गुणांचा साठा
वर्णिते थोड़ी गुणधर्मांची गाथा
कापा दाबा पिळुन काढा
अशी ही रसगुल्ला कथा।।
सौं चंदा वनवे शेंडे नागपुर.
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडता पदार्थ
( रव्याचा हलवा )
सर्वच पदार्थ
खाई मी आवडीने
गोड, नमकीन
आस्वाद घेई मजेने
त्यात ही आवडे मला
रव्याचा हलवा छान
प्रत्येक शुभ कार्यात
रव्याचा हलव्याला मान
सत्य नारायणाची कथा
असो की असो वास्तू पूजन
रव्याचा असतोच प्रसाद
प्रत्येक घरात निर्विवाद
रव्याचा हलवा
बनवायला असते सोपं
आणि पचायलाही
असते हलकं
सुका मेवा व खोबरं किस
वाढवी हलव्याची शान
गरीब-श्रीमंत आवडीने खाई
वृद्ध, मोठे व लहान
सौ. संगीता कढव, भंडारा
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गाजरचा हलवा
गाजराचा हलवा
सगळ्यांच्या आवडीचा
शरीरासाठी आपल्या
पोष्टीक आणि फायद्याचा ।।
सीझन मध्ये केला
जातो हलवा गाजराचा
डोळ्यासाठी असतो
आपल्या फायद्याचा ।।
गाजर घ्यावे धुऊन
घ्यावे थोडे सोडून
सोलून झाल्यानंतर
किसने घ्या किसून ।।
साजूक तुपात
घ्या ते परतून
साखर विलायची
द्या मग घालून ।।
खवा दूध घालून
अधिकच टेस्टी बनवा
काजू-बदामाचे काप
घालून वरूनच सजवा ।।
आवडीचा फार
मुलांच्या असतो
वरद आणि सिद्ध
बोटं चाटत बसतो ।।
पुनम डहाके, भंडारा.
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कविता..पदार्थांचे महत्व
""इमरती""
उडदाच्या डाळीची
बनवता येते इमरती
गोल गरगरीत छान
. कंगोरे तिचे वरती.
कटोऱ्यात ठेवताच
दिसते खासच मस्त
सर्वांची नजर तिचेवर
क्षणात करतात फस्त.
गरमागरम इमारती
असते बरी कुरकुरीत
दिसे बघा कशी सुरेख
मोह नाहीच आवरत.
जलेबी बाई पेक्षा
इमरती ही खास
घरी बनविण्याचा
जरा केला प्रयास.
सौ.विणा द.अतकरी.नागपूर.
दि.२४/०९/२०२०
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कविता
आवडत पदार्थ
"चिवडा"
खरमरीत खुसखुशीत,
आवडतो चिवडा.
पोहे, दालिया, दाणे, खोबर
आवडीने घेऊ मुरमुरे कमीजास्त.
फोडणीला घेऊ ,
कांदे,मिरची.
भरपूर कढीपत्याची,
पान ताजी.
भाजून तळून मिळऊया,
जिन्नस सारे.
आंबट, गोड ,तिखट चवीचा
चिवडा मस्तच वाटे.
लहानग्यांनाही आवडे,
खरमरीत चिवडा.
शेंगदाण्या,खोबऱ्यावर,
पहिले नजरा.
हवी असेल वेगळी चव,
सोबतीला करावी चना-मटकी उसळ.
कांदा,कोथींबीरीची करावी पेरणी,
आस्वाद काय मग विचारावा कोणी !
कामाच्या गराड्यात,घाईच्यावेळी,
डब्यातला चिवडा येई कामी.
चिवडा मस्त केव्हा कधीही,
खरमरीत खुसखुशीत चवच न्यारी.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.24.09.2020
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌸 पहाटवारा🌸
आपआपल्या परीने
करावी योगसाधना
दुःख पळतील दुरच
कमी होई शरीर यातना.
सौ.विणा द. अतकरी.नागपूर.
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ज्वारीची भाकरी
***************
पचायला हलकी
खायला रुचकर
दररोज खावी
ज्वारीची भाकर
उकळीच्या पिठाची
करावी भाकरी
चांगली मळून
टाकावी तव्यावरी
चांगली भाजून
गरम सर्व्ह करी
झुनका ठेचा बेसन
किंवा भाजी तरी
शरीराला थंड
पित्त करी कमी
वाढता लठ्ठपणा
कमी करण्याची हमी
प्रोटीन मात्रा जास्त
तब्येत तंदुरुस्त
कमी कार्बोहाइड्रेट
शुगर नियंत्रणात
झुनका भाकरीचा
मेनू आता लग्नात
आधी दिसत असे
गरिबांच्या घरात
सौ रेणुका झंझाड भंडारा बेला
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (७१)
जागृतीतून निद्रेला जातांना
करावं चिंतन संधिकाळाला
जावे आनंदें निद्रास्थानाला
आहे हि सहज साधनामाला.
दनाअ, नागपूर
दि.२५/०९/२०२०
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शेताच्या वाटेन
पाऊले चालली
कष्टात त्यांच्या
दिसे विठू माऊली
नंदा भोयर
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌷🌷पाकळी क्र३🌷🌷
ह्रदयात अजूनही
बाबा माझे आहे
नतमस्तक त्यांच्या चरणीं
नंदादीप तेवत आहे।
सौ.सरोज मते
दारव्हा🌷🌷
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
**********
शीळ घालीत वारा घुमतो
दहाही दिशा
सोबत त्याच्या प्रभातवेळी
नवकिरणाची सुर्यप्रभा
********************
सौ.प्रतिभा सोपान वाठ ( गरबडे)
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.८५*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*सूर्य किरणे पोहचती दारात*
*नव्या दिवसाची होई सुरुवात*
*नव्या उमेदीने लागावे कामास*
*सारखेच दिवस नसतात जीवनात*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सकाळी सकाळी करावे ध्यान
करावे पूजन सद्विचारांचे
होईल मन आनंदी, प्रसन्न
त्यानेच मन होई सात्त्विक
वैशाली टिचुकले
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: परिस्थिती येई तसे वागावे
निसर्ग सांगे तसे ऐकावे
परिस्थितीनुरूप बदलावे
लव्हाळे होऊनी जगावे
वैशाली टिचुकले
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्यकविता
सासुरवाडीच्या
गमतीजमती
लग्न झालं माझं
नवरोजींसोबत सासुरवाडीत गेली
थोडी बाहेर निघाली की
जो तो म्हणे मिशीवाल्याची सुन आली.....
गेली मी हातपाय धुवायला
पडली भदकन बाथरुममध्ये
नणंदबाई आली
हात धरुन नेलं मज घरामध्ये.....
दोनतीन दिवसांनी
स्वयंपाक कराया लागली
पाटवडीची भाजी खुप छान जमली. ,,......
चुलीवरचा भात
सवय नव्हती चुलीची
जळला माझा हात
अशी ही गंमत सासुरवाडीची.....
विचारलं मीसासुबाईला
हळदीचा डबा कुठे आहे
म्हणाल्या मला भानसवर पाह्य
भानस कशाला म्हणतात मला नव्हतं ठावं....,
भात होता चुलीवर
म्हणाल्या सासुबाई पिरवर्यावरठेव
पिरवरा कशाला म्हणतात मला नव्हत ठाव.....
भंडार्यावरुन गावीएकटी मी गेली सासुरवाडीला
मला बाई माझं घर आठवेना
माझं घर कुठाय म्हणून विचारले एकीला.....
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: क्रमांक ७४
~~~~~~~~~~~~~~~
😄 *सासुरवाडीच्या गमती जमती*😂
*************************
नवीनच लग्न झाले माझे
गेले मी *सासुरवाडीला*
शंकरपटात बैलाच्या शर्यती
गेले पतीरायांसोबत बघायला
खाऊंच्या सगळया दुकानावर
नेमके माझे लक्ष पडले......
फिंगरचे पॅकेट घेतले विकत
पुढे बघा काय घडले.........
फोडले तिथेच फिंगरचे पॅकेट
मोह ना आवरे खाण्याचा.....
एकेक करून खाऊ लागले
तेवढ्यात नाम्या दिसला गावचा
फिंगर गपकन तोंडात कोंबले
शिस्तीत मग उभे राहिले......
नमस्कार वहिनी म्हणत........
नाम्याने माझ्याकडे पाहिले....
विचारले मला खूप प्रश्न...
मी मात्र तोंड नाही उघडले
मुकी, बहिरी बायको याची
नाम्याने गावभर पसरविले
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
*सासुरवाडीच्या गमती जमती*
नवीन नवीन लग्न झाले
स्वयंपाकाची होई घाई
घरामध्ये माणसे पुष्कळ
मिळून स्वयंपाक करो बाई
धाकटी माझी नणंद म्हणे
वहिनी खायला या आयते
मी म्हटलं एवढे काम मी करते
तरी आयते खायला कशी म्हणते
थोड्यावेळाने दिसले
हिरवे हिरवे धिरडे तव्यावर
हिरव्या लसणाच्या पाल्याला वाटून
तांदूळ पिठात एकजीव केल्यावर
या पदार्थाचे नाव म्हणे
*आयते* असते वहिनी
जोरात हशा पिकला
हसू लागल्या सार्या जणी
*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
उपक्रम.. हास्य कविता (१२५)
""सासुरवाडीच्या गमती जमती""
आमचे लहानपणची गोष्ट
सासुरवाडीला गंमत घडली
जावई बापूंची सासरबुवाने
गमतीजमती वरातच काढली.
जावईबापू सासरला आला
लई दिवस झाले तरी बुवा
घेत नाही नाव जाण्याचा
सासु सासरे कंटाळले भारी.
रात्रीचे वेळी युक्तीच केली
सासरेजावई जेवाया बसली
सासरे म्हणाले तुप टाकावं
सासुने ताटात तेल वाढलं.
सासरे म्हणाले तेल टाकले
सासु म्हणाली तुप वाढले
तेला तुपात भानगड झाली
सास-याने सासुला दचडले.
जावई बापू सोडाया धावले
सासुबाई न दिव्यास फुंकले
अंधारात सासु पळूनच गेली
सास-याने जावयास सुजवले.
सासरे काही ऐकतच नव्हते
जावई बापू निपचित पडले
खुन्नस उतरली तवा पाहिले
जावयाने दोन्ही हात जोडले.
दुसरे दिवशी उठले जावई
कन्हत कन्हत उचलली थैली
मोठ्याच जड अंतःकरणाने
जावई बोवानं वाट पकडली.
दनाअ, नागपूर
दि.२५/०९/२०२०
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्यकविता
"सासुरवाडी ची गंमत जंमत"
पहिल्यांदाच गेले सासरी
सासरे माझे प्रेमळ भारी
म्हणती कसं पोरी पोरी
सासूबाई राहे सदा शेजारी.
नागपूर शहरातली पोरं
सवय नव्हती कामाची
तरीही शेण उचलून मी
खाणीत नेऊन टाकायची.
रोज सकाळी लोटा परेट
अंधारात जावं लागे बाई
संगतीला सासुबाई राही
पुरूष दिसता ऊठबस होई.
एक दिवस काय झालं
सासुबाई नव्हत्या सोबत
कसं बसावं पेच पडल
फेकून लोटा आली पळतं.
अशी झाली माझी गंमत
सासूरवाडीस गेल्यावरी
शौच्छालय नव्हतं घरी
बाई, येत होतं जीवावरी.
म्हणून सांगते पोरींनो
घर बघा विचार करून
ज्या घराला शौचालय
त्या घरी जा सून म्हणून.
सौ. वीणा द. अतकरी,
नागपूर
दि.२५/०९/२०२०
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सासुरवाडी च्या गमती जमती
होत्या मला मोठ्या दोन बहिणी
अन एक होती वहिनी
मी तिसरी होती लाडोबा
कुणी काही म्हटलं तर रागवत बाबा!!1!!
लग्नानंतर पहिल्यांदा केली मी चकली
डाळीचे प्रमाण उमजेना, पण केली
नवर्याला प्रेमानं दिलीखायला
रागाने त्याचा पाराच चढला!!2!!
सासरेबुवांची होती टकली
दिली खायला मी त्यांना चकली
तोंडात त्यांनी टाकली, चकली तर गेली नाही पोटात
पण दात मात्र आला हातात
तेही होते मोठे कडक
प्लेट त्यांनी भिरकावली तडक!!3!!
दुसरा पदार्थ गुलाबजाम
केले खो व्याचे गोळे
तुपात तळे अन पाकात घोळे
मोठ्या प्रेमाने नवऱ्याला दिले!!4!!
गोळ्यातमात्र पाक नाही घुसला
वेंधळी म्हणून नवरा माझा फुगून बसला
मुळुमुळु मी बसले रडत
काय करावे काही नव्हते कळत!!5!!
रंजना हलमारे
साकोली.
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सासुरवाडीतल्या गमतीजमती
💐💐💐💐💐💐💐💐💐
सासुरवाडीत दररोज
गमतीजमतीस नसे कमी
सांगणार मज्जा आज
हसणार नाही याची द्या हमी
मला म्हणे सासूबाई
कावळा आण जेवताना
मी गेली अंगणी आठवे मला आई
तोंड लहानसे करून आले मी परतून
सासूबाई चिडून बोलू लागली
इतका वेळ हिला कावळा आणायला
कुठून आणू कावळा मी मनी बोलायली
तुम्हाला काय जाते सांगायला
मला पकडता येत नाही कावळा
ऐका अहो सासुबाई माझ्या
हसल्या त्या खूप पाहून भाव माझा भोळा
मग दाखविला मला तुपाचा कावळा
वैशाली टिचुकले
यवतमाळ.
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्यकविता😃😃
सासुरवाडीतील गंमतीजंमती
......................................
लग्न करून सासरी आली
नवलाईचे नऊ दिवस सरले
सकाळी उठून अंगण झाडले
सडासारवने कंबरडे मोडले।
तोऱ्याने स्वयंपाकी बसले
चुलीला पाहून मन कचरले
सासु म्हणाली गंजाला पोतीर
आतून बाहेर मातीने लिपले।
तवा ठेवला चुलीवरती
पोळ्या ऐवजी हातच शेकती।
केले तयार भारताचे नकाशे
पाहून सारे मनी हसले।
वरण शिजता शिजेना
काय करावे काही सुचेना
भातामध्ये टाकले पाणी
त्याची बनली पातळ खिर।
स्वयंपाकाचा बट्ट्याबोळ
चुलीमुळे सगळा घोळ
चुलीला रामराम ठोकला
कुकर गँस घरी आला।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *सासुरवाडीच्या गमती जमती
गाव होतं खेड
चुलीवरचा स्वयंपाक
मध्ये सासुबाई ची
जोरात येइ हाक
आज बाई भाकरीच कर
चुलीवरच्या भाकरी लागते रुचकर
लाटून लाटून करत होती भाकरी
सासुबाई म्हणे खायला लागत नाही साजरी
घामानं मी होई ओली ओली
सासरे म्हणे मध्येच बाई
भाजी नाही का झाली
खेड्यात जाऊन मी झाली कामवाली
पेपर नाही वाचले टीव्ही नाही पाहिले
उठ सूट सासुबाई
लावे मला कामाले
वर म्हणे सासुबाई
शिकलेल्या पोरी कामाच्या नाही
चुलीवरचा स्वयंपाक कसाच येत नाही
मी म्हटलं आपण गॅस च घेऊ आई
सौ नंदा भोयर
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सासुरवाडीच्या गमतीजमती
सासरवाडी ची गंमत
काय सांगू तुम्हाला
आठवणीत आजही हसू
आवरत नाही आम्हाला ।।
लग्नानंतर ची पूजा म्हणून
गेलो आम्ही सासरी
जेवणासाठी बनवले होते
श्रीखंड आणि पुरी ।।
बाबा माझे खूप कडक
जेवायला बसलो पंक्तीत
मेव्हणी माझी छोटीशी
मजाक खूप करत ।।
माझ्या बाबांनी पाहिले
मान वर करून
एक क्षण ही न थांबता
गेली तिथून पळून ।।
आजही बाबा पुढे येत
नाही घाबरट भागुबाई
अशी आहे माझी
छोटीशी मेव्हणी बाई
----------------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सासरच्या गमती
माप ओलांडून गृहप्रवेश केला
फुलांचा गालीच्या पायांनी तुडविला||
सासु म्हणे,गृहलक्ष्मीने प्रवेश केला
सांभाळ आता आपले गृह संसार||
पाहुण्याची वर्दळ दोन दिवसात ओसरली
सगळीकडे कशी सामसुम झाली||
आँफिसला जाता जाता नवरा देई सिग्नल
गालावरच्या लालीची चोरी येई समोर||
सासुसासरे एकमेकांकडे पाहुन गालात हसे
माझी होता फसगत मी रूममध्ये पळे ||
नंणदेची होती माझ्यावर मेहर नजर
नविन डे्स देताच म्हणे ,वहिनी लयी गोड||
दीर बिच्चारा काही नव्हता बोलत
बहिण माझी येताच घरी राही हासत ||
एक दिवस शिर्याचा नाश्ता मी केला
घाई गडबडीत रव्याच्या जागी रांगोळी टाकली ||
हासहास हासे सारेच्यासारे घरचे
सासु म्हणे,बाई शिक आता सारे.||
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: "" सासरच्या गमती जमती ""
लग्न होऊन मी गेली सासरी
म्हणे चार पायल्याभात मांड पोरी
विस्तव फुंकून डोळे लाल होई
ग्यासचा जमाना नव्हताच बाई
चुलीवर मांडला तांदळाचा भात
मावससासु पाहे उभी दारात
शिकली सवरलीची परीक्षाच ती
नंदा, सासु आतुन डोकावती
नवर्याने नेले फिरायला शेतावर
लाखोळीचावळगा सासु मांडे डोईवर
सासुन दोन कुडवाचा दिला टोपला
सासु सोबत घेऊन आली घराला
एक दिस साडीला फाल लावू लागली
नवरा म्हणे कायची पट्टी लावली
त्यांच्या घरात कोणी नव्हती पायली
घरच्या शिकवल्या नव्हत्या मुली
सौ रेणुका झंझाड भंडारा बेला
[9/25, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सासरच्या गंमती
नवलाईचे दिवस संपले
चार दिवसात कामाला लागले
केला स्वयंपाक, पाणी
पूजा आटपून मी बसली!!
घरी होती वॉशिंग मशीन
सासू म्हणे धू माझं पातळ
मशीन मध्ये धुतलेले पातळ
त्यांना आवडेना!!
मी गेली गोट्यावर पातळ धुवायला
नऊवारी पातळ हातात काही येईना
अर्ध अर्ध करून कसं तरी घेतलं
नेऊन पटापट आपटल !!
पातळ गेले फाटून
सासू म्हने पातळ तु फाडलं
बोभाटा करून घराला जागवले
नवरा ने केला विचार !!
बायको माझी अशी
कपडे फाडण ४०० ,५००
असेच खर्च होईन
त्यापेक्षा कपडे धुवायला
आपण बाईच लावू !!
मनी मी आनंदली
कपडे धुण्यातुन सुटका झाली
त्यानंतर मला कुणीच कपडे धू
नाही म्हटलं !!
माधुरी भुते
[9/26, 5:59 AM] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बि.के.सा.स.प.
""संस्कारधारा"" (७२)
करुनी चिंतन निद्रीत व्हावे
यामुळे मन प्रशांत वाटते
येते प्रकृतीला साम्यदशा
वाईट स्वप्ने कधीना दिसते.
दनाअ, नागपूर
दि.२६/०९/२०२०
[9/26, 7:00 AM] संपर्क-1: 🌷पाकळी क्र.४🌷
तु माझा अभिमान
तुच माझा गौरव
जन्म तुझा उध्दार माझा
तुच माझे सर्वस्व
जागतिक कन्यादिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷🌷
सौ.सरोज मते
दारव्हा🌷🌷
[9/26, 7:23 AM] +91 98503 02639: निसर्ग उठला झाला तयार
चला उठा सर्व झडकरी
निसर्गास करा नमस्कार
करा सत्कर्मे त्याच्यासारखी
वैशाली टिचुकले
[9/26, 7:51 AM] Vina atkari: 🌹पहाटवारा 🌹
प्रांतकाळी उठून
करावं मंगलस्नान
तुळशी समोर बसून
विष्णुंच करु स्मरण.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[9/26, 7:55 AM] संपर्क-4 Prtibha Sopan Vatha: मंगल प्रभात
*************
चिव चिव चिमण्या
टिपती दाणा
सकाळ झाली सखींनो
रामकृष्ण हरी म्हणा
*****************
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/26, 8:04 AM] महिला1 Rupali Bondre: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.८६*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*पावसाचा कहर थांबताच नाही*
*जेव्हा ये ये म्हणावे तर येतच नाही*
*गरज नसताना बरसायचं सोडत नाही*
*कुणाचा त्याला अजिबात धाक नाही*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/26, 11:18 AM] Swati dayanand Shelokar: क्रमांक ७५
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*तुझे अस्तित्व*
*************************
आईच्या गर्भात
मारून टाकलं
*तुझे अस्तित्व*
आधीच मिटविलं
नाजूक ही कळी
कुस्करल्या गेली
फुल होण्याआधी
गर्भात कोमेजली
झाल्या खूप वेदना
आईच्या मनाला..
समजून घेतले...
नाही कुणी तिला
हत्या केली तुझी
भार समजूनी..
गर्भ झाला सुना
अश्रू आले नयनी
आहे तिलाही....
हक्क जगण्याचा
का पाप करता..
गर्भात मारण्याचा
मिटवू नका अस्तित्व
जन्माआधी तिचे...
डंका वाजेल चहूकडे
तिच्या पराक्रमाचे...
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/26, 12:31 PM] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बि.के.सा.सं.प.
कविता (१२६)
(-जागतिक कन्या दिनानिमित्त-)
"" तुझे अस्तित्व ""
आसं होती मुलीची
पण झाली ती मुले
कन्येमुळे वाटे सुने
झोपाळा रिता झुले.
सुने कुशी प्रसवली
पाहून मनं आनंदली
तुझ्याच अस्तित्वानं
मला नातं मिळाली.
तुझ्या या येण्याने
मम अंगण सजले
दुडुदुडु पावले गं
अंगण माझे धावले.
पाहणे तुझे गोजिरे
हसने तुझे साजरे
किती गोंजारू तुला
ह्रदय माझे पाझरे.
"मुक्ताई"च्या रूपाने
'माया' घरी अवतरली
किलबिलाटानं तिच्या
घर चौबारे निनादली.
ऐका खुळं ते सांगतो
एक मुलगी असावी
आपल्या प्रेम मायेनं
दोन्हीकडं घरं सजवी.
दनाअ, नागपूर
दि.२६/०९/२०२०
[9/26, 12:47 PM] jhanjad tai: Il तुझे अस्तित्व ll
तुझे अस्तित्व आहे
म्हणून जग चालत आहे
संसार रुपी रथाची
तू एक चाक आहे
तुझे अस्तित्व नसता
कुणास मिळतील सूना
मुलं मुलं म्हणता
मुलं राहतील लग्ना विना
माया, ममता,प्रेमाची
मूर्ती तुझ्यात आहे
नवनिर्मितीची शक्ती
तुझ्याच ठायी आहे
तुझे अस्तित्व संपता
जग होईल सुना
म्हणून म्हणते मी
कन्येचे अस्तित्व जाना
कन्या भोजनास
धुंडत असती तुला
मग का? कुस्करावे
लागती मुलीला
जननी जनमदात्री
आहे तुझीच खात्री
विविध रूप कला गुणाची
आहे तूच अभिनेत्री
दुष्टांशी लढाया
आहे तुझ्यात शक्ती
तुझ्या अस्तित्वाची
तूच करी निर्मिती
सौ रेणुका झं झाड भंडारा बेला
[9/26, 12:59 PM] संपर्क-1: जागतिक कन्यादिन
तुझे अस्तित्व
......................................
झाला जेव्हा जन्म तुझा
हुरळून गेले मी
तुझ्यात छबी माझी
शोधत राहीले मी।
वाटते छकुली माझी
खुप मोठी व्हावी
आकाशात तिने
उंच भरारी घ्यावी।
तिनेच करावा
नाव लौकिक माझा
जगावे स्वाभिमाने
दोन्ही कुळा उध्दारावे।
समाजात जगताना
माणूस म्हणून जगावे
रंजल्यागांजल्यांना
मायेची उब द्यावे।
अस्तित्व तुझे हे
गौरवास्पद असावे
ओठांवर नेहमीच
तुझे नाव असावे।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/26, 2:10 PM] संपर्क-5 Ranjana halamare: 🌹 तुझे अस्तित्व🌹
इवल्याशा रूनझुन पावलांनी, घर सारे फुलते
बोबड्या तुझ्या बोलण्याने, घर सारे हसते
अंगणात तुझ्या खेळण्याने, घर सारे खेळते
ला गतातुला इवली ठेच, घर सारे विव्हळते
असे तुझे अस्तित्व साऱ्या घरात नांदते.......
मायेच्या पोटचा गोळा तू
बाबाच्या काळजाचा ठोका तू
दादाची ग ताई तू
अस्तित्व तुझे सदैव जपणा
र तू.......
नाती अनेक तूच ज पशी
आई, माई, ताई, पत्नी,अन सुन
प्रेमाने निभव नाती सगळ्यांशी
पण विसरू नको मी एकस्त्री हे अस्तित्व माझे.......
विविध तुझे रूपे असती
सहनशीलतेची मूर्तिमंत तू प्रतिमा
जशी सावित्री,अन सीता
पण जगताना दिसतो जेव्हा धोका
अवतरशी इथे होऊनी, दुर्गा काली अन चंडिका
दाविसी अस्तित्व आपले जगा
.....
रंजना हलमारे( सेलोकर)
साकोली
[9/26, 2:17 PM] संपर्क-2: "तुझे अस्तित्व"
*********************
स्त्रीच्या अस्तित्वाची
काय विचारता महती,
ती तर आहे
पूर्ण विश्वाची जन्मदाती.
पुरुष प्रधान समाजात
नेहमीच तुला दुय्यम स्थान,
तरीही न डगमगता
मिळविला स्वतःचा मान.
सावित्रीबाई, कल्पना ,अवनी
असा तुझा खडतर प्रवास,
स्वतःला सिद्ध करायला
का घेशी त्रास.
नाजूक मन तु
व्याख्या सहनशक्तीची,
घायाळ कराल तर
दिसेल मूर्ती दुर्गेची.
काळ बदलला पण
नाही बदलली पद्धत,
पालक देतात मुलांनाच
अधिक सवलत.
ओळखा स्त्रीचं अस्तित्व
ती आहे समाजाचा कणा,
तीच टिकवेल आपल्या
संस्कृतीचा बाणा.
जखडू नका तिला
रूढी परंपरेच्या बंधनात,
घेऊ द्या उंच भरारी
स्वच्छंद आकाशात.
सौ.सीमा अ. निवर्ती 🙏
[9/26, 3:19 PM] Vina atkari: बि.के.सा.सं.प.
कविता.. ""तुझे अस्तित्व""
बरेच वर्षांनंतर घरा
हालला आहे पाळणा
वर्णन करु किती मी
आनंद गगनी मावेना.
तुझे अस्तित्व दारी दिसावं
माझे घरी आली जन्मानी
गोड गोंडस नात म्हणूनी
सार्थकता आमच्या जिवनी.
मुलगी असावी वाटे मजला
पण झाली दोन मुलांची आई
तुझ्या जन्माने झाली आजी
वाटते पुर्वजन्मीचीच पुण्याई.
छुमछुम वाजते पैंजण
दुडूदुडू धावतांना परी
कमी पडतंय अंगण गं
चालताती पावले तुरतुरी.
मुलांपेक्षा मुलगीच प्रेमळ
ती घेते सर्वांचीच काळजी
माया लावते आई-बाबांना
वाटते पूर्वजन्माची आजी.
सौ.विणा द.अतकरी
नागपूर
दि.२६/०९/२०२०
[9/26, 4:03 PM] +91 88550 02895: तुझे अस्तित्व
तुझी लेक बनून
आले तुझ्या जीवनात
तूच मला सांभाळले
माझ्या आयुष्यात
किती खस्ता खाऊन
लहानाचे केलेस मोठे
आई तुझे स्थान
माझ्या आयुष्यात मोठे
तुझ्या अस्तित्वानेच
पाहू शकले मी जग
नसतीस तू सोबत तर
काय झाले असते माझे ग
आई वंशाचा दिवा नाही
तर पणती बनून राहील
नाव मोठे करण्यास
नेहमी झटत राहील
कधी बदलेल आपली
पुरुष प्रधान संस्कृती
काही महान व्यक्तीने
केली बदलण्याची कृती
म्हटले जाते आम्हाला
आहेस जगत जननी
खरंच सांगू का तुम्हाला
स्त्रीची ही दुर्देवी कहाणी
पुनम डहाके, भंडारा.
*तुझे अस्तित्व*
तुझे अस्तित्व तुलाच
निर्माण करायचे आहेll
आईवडिलांची तू लाडली
दादाची ग सखी तू पहिली
तुला मात्र चार भिंतीच्या
बाहेर पडायचे आहे .. तुझे अस्तित्व..
बाहेरच्या जगात भेटतील तुला
अनेक लांडगे आजूबाजूला
त्यांना भीक न घालता
पुढे चालत राहायचे आहे..तुझे अस्तित्व..
कोणी म्हणतील तुला परी
करू पाहतील तुझ्याशी यारी
माणसाची योग्य ओळख मात्र
तुलाच करायची नीट आहे ..तुझे अस्तित्व..
जवळचे करतील कधी तुझा घात
खचून न जाता करावी लागेल मात
आयुष्यात तुला खंबीर बनवून
यश संपादन करायचे आहे ..तुझे अस्तित्व..
कधी दुर्गा तर कधी महाकाली
कधी समजदार नाजूक कळी
विविध रूपे घेऊन स्वकीयांच्या
मनावर राज्य करायचे आहे ..तुझे अस्तित्व..
मुलगी असण्याचा वाटे अभिमान
तूच आहेस मान'₹, शान आणि सन्मान
आपल्या कर्तुत्वाने तुला
हे सिद्ध करायचे आहे ..तुझे अस्तित्व..
*✒️ सौ रुपाली अमोल बोंद्र, भंडारा*
[9/26, 4:40 PM] Nanda Bhoyar: *तुझे अस्तित्व*
सोनपरी चे पाऊल
पडले माझ्या अंगणी
गगना भिडेल असा
आनंद झाला मनी
मनाला म्हटले मिळाली मैत्रीण
गुजगोष्टी करू रात्रंदिन
सल्ले तर किती कच असतात मला
आई कळत कसं नाही गं तुला
साडी नको ना घालू
ड्रेस तुला छान दिसते
तिच्या अशा बोलण्याने
मी गालातल्या गालात हसते
कितीतरी बदल घडवत असते माझ्यात
छान माझी मैत्रीण
मी मला शोधत असते तिच्यात
अस्तित्व तीच माझ्यासाठी खूप मोठं
आनंद येवढा मनी आकाशही पटेल छोट
सौ नंदा अनिल भोयर
[9/26, 5:43 PM] संपर्क-4 Prtibha Sopan Vatha: कविता
"तिचे अस्तित्व"
ती जगदंबा, ती सावित्री,
ती शारदा,ती लक्ष्मी.
गौरवशाली इतिहासाची ओळख ती,
का तिचे अस्तित्व पुसता तुम्ही?
ती आई,ती ताई,
ती पत्नी,ती मुलगी.
का नकोशी झाली ती,
का तिचे अस्तित्व पुसता तुम्ही?
ती माया,ती ममता,
तिच्याच कुशीत निपजता तुम्ही
का अस्तित्वासाठी झुंजते ती,
का तिचे अस्तित्व पुसता तुम्ही?
ती दया,ती त्याग,
ती जीवन,ती ध्यास.
का पदोपदी तिचेच बलिदान,
का तिचे अस्तित्व पुसता तुम्ही?
सृष्टीची निर्मिती ती.
जीवनाचा अर्थ ती.
स्त्री म्हणून का उपेक्षित ती,
का तिचे अस्तित्व पुसता तुम्ही?
ती ही एक जीव ती.
तुमच्यासारखीच ती ही.
तुमच्यासारखीच सक्षम ती,
का कुठे कमी पडते ती?
तिलाही जगायचं,तिलाही फुलायच.
उंच आकाशात तिलाही उडायच.
'तिचे अस्तित्व' तुम्हालाच जपायचं,
'तुमचे अस्तित्व' जपण्यासाठी.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.26.09.2020
[9/26, 5:52 PM] smj_Bhd_Kadav Sudhakar Baliramji, (Bhandara): "तुझे अस्तित्व"
तुझ्या अस्तित्वच
महिमा गाऊ किती
नाजूक कोमल दिसते परी
तरी महान तुझी कीर्ती
समाजाच्या भ्याड परंपरेवर
केली तू मात
स्वतःला सिद्ध करून
सोडली तुझ्या अस्तित्वाची कात
कन्या नाही म्हणून
गर्भातच मारून टाकले
स्वतःला महान समजण्यात
पापाचे भागीदार बनले
अबला नाही सबला तू
राणीलक्ष्मी सारखी वीरांगना तू
दाखवून दे तुझे अस्तित्व
या जगाला आज तू
तुझ्या कार्याला
नाही कधीच अंत
तुझ्या अस्तित्वाची
बनव जगाला साक्ष
सौ. संगीता कढव, भंडारा
[9/26, 7:02 PM] Madhuri Devendra Bhute: तुझे अस्तित्व
अस्तित्व तुझ्या मुळे
मातृत्व मला मिळाले
तुझ्या जन्माने माझे
स्त्री जीवन पूर्ण झाले ll
घरात तू असण्याने
आनंद सदा राही
बाबांची लाडकी
भावाची बहिण तूच राही ll
माणसे ओळख त्यांना
कधी दुर्गा, रण चंडी
प्रेमाने तुझे अस्तित्व
आकार देशील जीवनाला ll
किर्ती तुझ्या यशाची
चहू दिशांत पसरवशिल
नात्यांची गुंफून माळ
पत्नी,सून,आई बनून
साकार शील नवीन भूमिका ll
माधुरी भुते
[9/27, 5:50 AM] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा". (७३)
कोरोणाचे संकट काही थांबेना
महामारीने ना सोडले दुकानदारांना
व्यवसायासोबत स्वत:ची काळजी
घेऊन अनेकांच्या जीवाला वाचवाना.
दनाअ, नागपूर
दि.२७/०९/२०२०
[9/27, 5:56 AM] Meera shebe (Mahila sakhi Manch): 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.८३
प्रभात झाली
सृष्टी हसली
चैतन्याची
लाट उसळली.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/27, 7:13 AM] Vina atkari: 🌺पहाटवारा🌺
सावळा हरी उभा विटेवरी
कधी सुरू होणार वारी
आज कमला एकादशी
वाट पाहतोय वारकरी.
सौ.विणा द.अतकरी.
. नागपूर.
[9/27, 7:44 AM] संपर्क-1: 🌷पाकळी क्र.५🌷
उषःकाल होता होता
उमलल्या जाईजुई
सुगंध त्यांचा अंगणी
हा दरवळत राही।।
सौ.सरोज मते
दारव्हा🌷🌷
[9/27, 7:56 AM] संपर्क-4 Prtibha Sopan Vatha: मंगल प्रभात
**********
तुलसीप्रिया हरी सखी
बहरली माझ्या अंगणी
ओवीन माळ मंजुळाची
घालीन हार विठ्ठल रखुमाईसी
*************************
अधिक महिन्यातल्या पावन
कमला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
सौ.प्रतिभा सोपान वाठ( गरबडे)
*****************************
[9/27, 8:16 AM] Nanda Bhoyar: आज एकादशी
देवा मी येऊ कशी
दार तुझे लावलेले
तुला भेटण्या मन आसुसलेले
. नंदा भोयर
[9/27, 9:10 AM] महिला1 Rupali Bondre: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.८७*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*जीवनाच्या वाटेवर*
*अनेक वळणे येतात*
*मन जुळली एकमेकांची की*
*ऋणानुबंध घट्ट होतात*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/27, 10:27 AM] Swati dayanand Shelokar: क्रमांक ७६
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*अवघे विश्व माझे घर*
**************************
*अवघे विश्व माझे घर*
समजूनी वागू सर्वजण
राहू सारेच एकजुटीने
नको वाद नाही भांडण
काळा पांढरा भेद नको
नको जातीची जखडण
ऐक्याचे गीत गाऊ सारे
करूनी प्रेमाची उधळण
विश्वात नांदती नाना लोकं
प्रत्येकाचे स्वभाव निराळे
एकाच देवाची सारी लेकरं
मिळून राहू आपण सगळे
करूया मदत एकमेकांस..
हीच शिकवण माणूस धर्मात
देऊनी शांतीची शिकवण...
समाधानाचे बीज रोवू माणसात
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/27, 10:49 AM] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बि.के.सा.सं.प.
आवडीची कविता
(१२७)
""चांदण्यांची शाळा""
पूनवेच्या रात्री
शाळा चांदण्यांची
चंद्राचे उजेडात
भरली आकाशी.
चांदोबा प्रधान
तारेच शिक्षक
चांदण्यावर तोरा
प्रकाशाचा वचक.
धृव वर्गशिक्षक
फळा उत्तरेला
चांदण्या समजी
धडा शिकविला.
शुक्राचा शारीरिक
शिक्षणच बाका
पहाटे पुर्वेला
जमवी योगाला.
उत्तर मध्यातुन
सप्तर्षी आले
वेद उपनिषद
शिकवु लागले.
चांदण्यां सहलं
आकाश गंगेची
गर्दीने विद्यार्थ्यी
भिती चांदोबाची.
धोक्याचं ऐकावं
ढगांनी वहावं
विजांचा तांडवं
चादणं विझावं.
दिनांक, नागपूर
दि.२७सप्टें.२०२०
[9/27, 12:37 PM] +91 82754 71401: निसर्गकविता
हिरवळीचा निसर्ग
जिकडे तिकडे सर्व कडे
आनंदीआनंद गडे
पाऊस पडतो चोहीकडे
हिरवळ दाटे सर्वत्र
गडे . .... ..,,,
रानशेत भीजुन चिंब
झाली या पावसानंमनास माझ्या हुरळुन
टाकलं हिरवाळीच्या निसर्गाने,.....
समदं रानं हिरवगार
हिरव हिरवंगार सारं शिवार
आकर्षुण मनी भुल
वारा येई गारगार.......
सृष्टी समदी हिरवीशार
पडे पाऊस मुसळधार
चिंब झाली धरणीमाय
निसर्ग समदं गारगार
सौ,सुषमा पडोळे भंडारा
[9/27, 1:14 PM] महिला1 Rupali Bondre: *आवडती स्वरचित कविता*
*विषय - माझं हृदय*
कितीही समजावले तरी
माझं ह्रदय ऐकत नाही
तुझी आठवण आल्याशिवाय
एकही दिवस जात नाही
शब्द नी शब्द तुझे
माझ्या हृदयात कोरलेले
जणू ताजमहलात
सुंदर नक्षीकाम केलेले
तुझा तो हळुवार स्पर्श
अंगावर येतो शहारा
बागेतील फुलांमध्ये
हरवून बसते मीच मला
वेळ सरत नाही दिवसही
खुप मोठे वाटतात मला
वाट बघते तुझी सजना
ये लवकर भेटायला
*✍🏻 रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[9/27, 1:25 PM] संपर्क-5 Ranjana halamare: जहर करोनाचे
ध्यानीमनी नसताना पसरलेकसे जहर
इवल्याशा विषाणूने केला कहर
शरीराचे अंग बनले मास्क आणि सॅनिटायझर
माणसामाणसात मात्र वाढले अंतर------1
बरेज गले थोडे ज्यांच्या जवळ होता माल
ज्यांचे हातावर पोट, त्यांचे मात्र हाल हाल
नको वाटते आता, अतिथी देवो भव
डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी हेच आता आपले देव------2
समारंभात होत नसे माणसे गोळा
फालतू खर्चाला बसला आळा
नाही ध्वनिप्रदूषण
नाही वायुप्रदूषण-----3
शाळेतला चिवचिवाट बंद,
मोबाईलवर शिकविण्यात तच धुंद
डोळ्यांना होईल पुढे त्रास
नका ठेवू जास्त आस-----4
माणसातला माणूस आहे अजून जागा
नियम पाळू नी सगळे, वाचवूया जगा
पळून जाईल हा विषाणू होईल
त्याचा भुगा भुगा
लवकर येईल वॅक्सिंग करू नका त्रागा त्रागा
माणसातला माणूस आहे अजून जागा-------5
रंजना हलमारे साकोली.
[9/27, 2:33 PM] +91 88550 02895: प्रेम कविता
तुझा स्पर्श
तुझ्या स्पर्शाने
अंग शहारले
तुझ्या प्रेमात
दंग मी झाले ।।
तुझ्या स्पर्शाने
प्रीत फुलायची
जणू वाटे
झुळूक वाऱ्याची ।।
तुझ्या स्पर्शाने
कळी उमलली
पदरात माझ्या
सुख आली ।।
इवल्या हाताच्या
तुझ्या स्पर्शानी
काळीज निघाले
भरून ममतेनी
--------------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[9/27, 3:19 PM] संपर्क-1: 🌷आवडती कविता🌷
जीवन गाने
......................................
जीवन गाने एक तराने
कधी हसणे कधी रडने
मखमली वर चालतांना
मध्येच पाया काटा रुतने।
जीवन गाने...........
संघर्षमय जीवन अपुले
कधी फुलांचा पायघड्या
कधी धगधगते निखारे
हसत हसत सारे सहने।
जीवन गाने............
भुतकाळाशी स्मरुनीया
वर्तमानाकाळी जगतांना
भविष्याचे सुंदर स्वप्न पहाने
नित नव जोमाने पुढेच जाने।
जीवन गाने................
जीवनाचा वसंत फुलवितांना
मायेच्या हळव्या स्पर्शाने
नात्यांची सुंदर वेली गुंफून
सुखदुःखी समरस होने।
जीवन गाने............
जीवनवेली वरती फुलती
नाजूक निरागस सुंदर फुले
त्या फुला गोजरतांना
दुःखे सारी दूर पळती।
जीवन गाने.............
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/27, 3:31 PM] Vina atkari: ""माझी आवडती कविता""
🌱परसबागेतील झाड 🌱
मम अंगणी आहे
परसबाग छान
बागेत संत्र्याचे
झाडच महान.
संत्री लागली
त्याला फार
खाली गळती
सदा अपार
संत्री उचलून
रस काढतात
गाळून रोज
सकाळी पितात.
जिवनसत्व क
त्यातून मिळते
सुर्रकन पिऊन
प्रतिकारकता वाढते.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[9/27, 3:41 PM] पुणे- Mangesh Bante: आवडती कविता
II तू II
तू श्वास
तू आस
तूच ध्यास
जिवनाचा..
दुरही तू
तूच जवळीही
जटील जशी
सहजही तूच..
रात्रही तू
गुलाबी पहाट जशी
उष्ण लाटही तू
शितल छाया जशी..
केवढ्याचा सुगंध तू
प्राजक्ताची रासही तूच
अंत:र्मनातल्या ओढ्यातील
शेवटचा श्वास ही तूच..
संथ नदीची सुरुवातही तू
फेसाळलेल्या समुद्रातील अंतही तूच
गालावरची खोल खळीही तू
गुलाबाची एक अबोल कळीही तूच
तू सुरूवात
शेवटही तुच...
........................................
🌿 मंगेश बांते, पूणे 🌿
[9/27, 3:44 PM] +91 98503 02639: मुलगा मुलगी करा तुम्ही भेद
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
ज्यांना वाटे सायकलची
दोन चाके आहेत कमी जास्त
त्यांनी धरा कास भेदभावाची
करा मुलामुलीत भेदभाव मस्त
मुलगी वाटे ज्यांना कमजोर
त्यांनी ना सांगावे काम तिज काहीही
करावे मग तुम्ही सर्वकाम भरभर
स्वंयपाकघर सांभाळून सांभाळा सर्वकाही
मुलगी पण मग बनवेल शरीरयष्टी
घेईल मग ती धडे नवे कराटे कुस्ती
ना पाहणार ती व्यसनांची सृष्टी
करा घरची सर्व कामे नका करू गोष्टी
घर संसार सांभाळून पहा जरा
मग कळेल कशी ही नार वाटे अबला
नका डिवचू तिला ती आहेच सबला
सर्व सांभाळता आनंद येई तिजला
करा मुलामुलीत तुम्ही भेदाभेद
वाचून काढा जुने पुराण वेद
वाचून अंगाला येईल मग स्वेद
ना करे पुराणातही मुलामुलीत भेद
माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी
करविली होती नवनवीन नियमावली
त्यात भरडून टाकली समानतेची बिरुदावली
म्हणूनी ही भेदभावाची प्रथा फोफावली
वैशाली टिचुकले
यवतमाळ.
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[9/27, 4:32 PM] smj_Bhd_Kadav Sudhakar Baliramji, (Bhandara): आवडती कविता
( आठवण )
रोजच आठवण तुझी
होई माझ्या मनाला
भिजलेले माझे डोळे
समजावू कशी मी स्वतःला
तुझे चिडणे, रागावणे
मग हळूच मिठीत घेणे
क्षणभर सुखावते मी
तुझ्या या प्रेमळ आठवणीने
माझ्या हृदयात आहे
तुझ्या आठवणीचा पसारा
मनी उर भरून येतो
सोबतीला तुझ्या आठवणींचा सहारा
माझं प्रेम तुझ्यावर
अफाट आहे
माझ्या निर्मळ, निस्वार्थ प्रेमाचा
तूच तर साक्षीदार आहे
तुझ्यावरच माझं प्रेम
कधीच कमी होणार नाही
तुझी आठवण येत नाही
असा एकही क्षण जाणार नाही
सौ. संगीता कढव
[9/27, 5:28 PM] +91 96739 01225: ♦️आजार आणि बाजार♦️
आज माझ्या देशास हाय ! कैसा आजार झाला
चोर गुंडे मवाल्यांचा खुल्ला बाजार झाला ...॥
गल्लीपासून दिल्लीपर्यंत चोरांचाच राज आहे
गुन्हेगारांच्या डोक्यावरती मंत्रीपदाचा ताज आहे
चोरांच्या हाती सत्ता देऊन मतदार लाचार झाला
आज माझ्या देशास हाय! कैसा आजार झाला....॥
सरकारी नौकरांना नेहमी पगार वाढ पाहिजे
कामाच्या नावाने बोंबाबोंब अन् खायला भाड पाहिजे
दरवर्षीच्या महागाईने बिचारा गरिब गार झाला
आज माझ्या देशास हाय ! कैसा आजार झाला.....॥
आजकालच्या नारी स्वतःला बलवान म्हणू लागल्या
अर्धनग्न होऊन आता विश्वसुंदरी बनू लागल्या
पाश्चात्य संस्कृतीचा आम्हावरी सफल वार झाला
आज माझ्या देशास हाय ! कैसा आजार झाला....॥
पारस
राजीव शा. बुध्दे
मु.मांढळ ( कुही ). नागपूर
[9/27, 6:05 PM] Nanda Bhoyar: *बाबा*
का हो बाबा
तुम्ही सोडून आम्हा गेले
आधार होता आमचा
पोरके आम्हा केले
आईला सहवास
हवा होता तुमचा
एकही मिनिट जात नाही
तुमच्या आठवणीने आमचा
कसे हो बाबा तुम्ही
माझे लाडही नाही केले
मला न पाहताच
तुम्ही निघून गेले
खूप गप्पा करायच्या होत्या
तुमच्याशी मला
माझे हट्ट पुरवायला
आता मी सांगू कुणाला
बाबा तुम्ही परत
याल ना लवकर
वाट पाहीन मी तुमची
आयुष्यभर
सौ नंदा भोयर
[9/27, 6:42 PM] जयश्री रेहपाडे: 🙂 हास्य होवुनी ये पुन्हा..🙂
मी व्यथांना आता अंतरीच जपते
आसवांना ही पावसाचे नाव देते..
सारेच येथे दिखावे उरली न भावना
हृदय शुन्य सारे ह्रदयात भाव नाही.
बासुरीने ही सुरांना येथे कैद केले
कृष्णाला ही आता राधेचे का वावगे.?
जो तो मागतो येथे फुले ताजीतवानी
कोण निर्माल्यास येथे भाव देतो?..
खेळुन झाले पुरे आताआयुष्य माझे आता खेळांना जरासे आठवुन पहाते
हासले आजन्म घेवुन तुझ्या वेदनेला
ये पुन्हा तु, हास्य होवुनी माझे एकदा...
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
[9/27, 7:28 PM] jhanjad tai: Il आवडती कविता ll
शेतीवर ची मजा
*************
शेतीवर जायची घाई बालपणी
सुरू राही धानाची चुरणी
पेरुवाला यायचा शेतावर
टोपला भर पेरू आजोबाज वळ
धावून फिरायचो दावणी मागे
तनशिवर लवतांना खूप मजा वाटे
कधी येई लाडूवाली बाई
टोपलाभर लाडू मुर्मुर्याचे देई
आजो बांची होती झोपडी
पाणी गरम सदा शेतावरती
कधीही जा चुलीत विस्तव राही
चीलिमसाठी निवा आजोबा पाही
तुरीच्या शेंगा तिथच उकळी
शेतावरच खाऊ जांभळी
एकत्र राहात सर्व नातू नाती
शेतीवर जावून मजा खायची
सौ रेणुका झंझाड भंडारा बेला
[9/27, 9:01 PM] Meera shebe (Mahila sakhi Manch): कन्या
लेक लाडकी बापाची
सरीता असे प्रेमाची
उपमा तिला दुहीताची
खाण असे गुणांची.
लाभे मुलीच्या रुपात
आई,बहीण, मैत्रीण
माया ममता जिव्हाळा
देत असे भरभरून.
लाडाकोडात वाढत
जातो बालपण सरत
उपवर कधी नकळत
मन माहेरच्या अंगणात.
एक घर करी सुन
दुसरं जाई भरून
पायी पैंजण रुणझुण
सुख येई बहरून.
नाही ऐकू शकत उणे
माहेर,सासरचे दुषणे
समसम भाव दाटून
कन्या दुहीताच जाण.
सासरी असली मोठी
तरी आईबापांना लहान
तिचे आठवता गुण
चक्षू वाहती ओथंबून.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/27, 9:53 PM] Madhuri Devendra Bhute: मामाचा गाव
मामाचा गावं भारी
दिवाळी उन्हाळा त
गावाला जायचो
सुट्टीचा आनंद घ्यायचो ll
खाण्याची चंगळ मोठी
बच्चेकंपनी होती १५
मामीची होई तारांबळ
तीन वेळा रांधी अन्न ll
पाणी नव्हते गावात तेव्हा
आंगोळीला शेता वर जायचे
शेतातील विहीर मोठी
पंप मोटर सुरू करायचो ll
शेत २,३ कोस दूर
पायी पायी शेतावर जायचो
मध्ये,आंबाची बाग, पेरूची बाग ,
लागायची
आंबे,पेरू चोरून तोडायचे ll
पाणी भरण्यास विहिरीवर जायचो
धुणे धुण्यास तळ्यावर जायचो
तळ्यातील,शिंगाडे तोडायचे
खावून खावून मजा करायची ll
मंगळवारी बाजार भरायचा
बाजारातून खाऊ आणायचा
दिवसरात्र चंगळ करायचो
पाहुण्यांची मजाच असायची ll
आठवणीत सदैव स्मुर्ती
मामा चं गाव दूरच राहिले
दिवस आता विरून गेले
लहानपणीचे आठवण झाली ll
भुते माधुरी
Q[9/28, 5:33 AM] Meera shebe (Mahila sakhi Manch): 🌅प्रभात चिंतन🌅
क्र,८४
वृक्षलतांनी नटलेली
वसुंधरा दिसते छान
अबाधित ऋंगार ठेवू
फेडू भूमातेचे ऋण.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[9/28, 7:33 AM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 90 वे
आईसारखे प्रेम
जगी कुणाचंच नाही
बाळाच्या सुखासाठी
सतत झटत राही ।।
-----------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[9/28, 7:37 AM] संपर्क-1: 🌷पाकळी क्र.६🌷
देशावरी संकट कोरोनाचे
राखुनी भान जनसेवेचे
रक्षण करी स्वतःचे
सकला आधार द्या रे।
सौ.सरोज मते
दारव्हा🌷🌷
[9/28, 7:47 AM] संपर्क-4 Prtibha Sopan Vatha: मंगल प्रभात
**********
चांदरात होऊन गेली
संपली राती
जगराहटी सुरू झाली
सूर्यकिरण पडता धरणी
*******************
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[9/28, 9:27 AM] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बि.के.सा.सं .प.
""संस्कारधारा" (७४)
काही भलं करावं जिवनात
राहील नाव तुमचं हयात
मेल्यानंतरही आठवतील
तुमच्याच किर्तीला जगात.
दनाअ, नागपूर
दि.२८/०९/२०२०
[9/28, 9:28 AM] Vina atkari: 🌻पहाटवारा 🌻
घनदाट माळरानावर
सुर्य किरण पडे पिवळे
मृगजळाच्या कस्तुरीचा
वास सगळीकडे दरवळे.
सौ.विणा द.अतकरी.नागपूर.
[9/28, 9:52 AM] महिला1 Rupali Bondre: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.८८*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*यशोदेचा नंदलाला*
*वाजवितो मधुर बासुरी*
*वनमाळी धावत येते*
*गोरी राधा बावरी*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[9/28, 10:54 AM] Swati dayanand Shelokar: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
क्रमांक ७७
*अंधश्रद्धा*
झपाटले लोकांस अंधश्रध्देने
श्रद्धा असावी सर्वांच्या मनी
विज्ञानाची कास धरूनी....
*अंधश्रद्धा* बाळगू नये कुणी
होत नाही प्रसन्न ईश्वर
कोंबळे, बकरे बळी देऊन
पिंडीवर दूध ओतूनी...
भुकेल्यास उपाशी ठेवून
कडक कालसर्प योग
म्हणे कुंडलीत तुमच्या
लग्न न जमल्यास कुणाचे
दोष सांगती ग्रह ताऱ्यांचा
शनी मंदिरात प्रवेश निषिद्ध
केला सार्याच स्त्रियांना...
जिवंतपणी उपाशी ठेवून
श्राद्धास बोलावले कावळ्यांना
दान करती कितीतरी पैसे....
दानपेटीत मंदिराच्या.........
रुग्णांची गरज ओळखून ठेवा
दानपेटी बाहेर दवाखान्याच्या
पावन झालास रे मानवा
पवित्र स्नान गंगेत करून
पाणी केलेस अस्वच्छ मात्र
निर्माल्य नदीत वाहून......
रुढी परंपराना सारे जण
जरा डोळसपणे पाहू या
सगळे जण एक होऊन
अंधश्रध्देला मिटवू या
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[9/28, 12:50 PM] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बि.के.सा.सं.प.
कविता..(१२८)
"" अंधश्रध्दा ""
व्यक्ती समाजाला लागते
अंधश्रद्धेची किडं जेव्हा
विवेक बुध्दिला हरवुन
डोकं गहाण ठेवती तेव्हा.
सुख दुःख असे जिवनाला
खेळ वाटतो उनसावलीचा
सुखाची आसक्ती ठेवताना
व्हावा विचारही दुःखाचा.
दुःख जातील सुख येतील
विश्र्वास स्वकर्मावर ठेवा
भटकू न् देता मनचक्षूला
खातील तेअंधश्रद्धेचा मेवा.
क्षणांत एका ना सुखी कुणी
झाला, तो अथक परिश्रमानं
जगी रंकाचे राव बहु जाहले
नाही अंधश्रद्धेच्या थोतांडानं.
कधी ना वळावे अंधश्रद्धेला
इथे केव्हाचा विचार खुंटला
भला माणूस परावलंबी झाला
सारा अनर्थ अंधश्रद्धेने केला.
दनाअ.नागपूर
दि.२८/०९/२०२०
[9/28, 2:24 PM] संपर्क-5 Ranjana halamare: अंधश्रद्धा
अंधश्रद्धा हा समाजाला एक श्राप
फसले जग हे अंधश्रद्धेच्या विळख्यात
मानसिक असतो आजार
म्हणतात याला भुताटकीचा अवतार!!1!!
अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड
समूळ नष्ट करा ही अमानवीय कीड
उध्वस्त होती कितीक घरे
बळी पडती अडाणी विचारे!!2!!
येत नसते देवी अंगात
नुसतेच हे थोटांड
एक असते ती विकृती
देवीच्या नावावर धन हे लाटती
मोठे मोठे संत स्वतःला मानती
फसगत करती भोळ्या जीवांची
श्रद्धा नसावी अंध
असावा त्याला शास्त्राच्या गंध!!4!!
देव नसतो बळीच्या भुकेला
देव असतो भाव भक्तीचा भुकेला
घालू नका अंधश्रद्धेला खतपाणी
विज्ञानाची धरा कास, हात जोडुनी सर्वांना करते मी विनवणी!!5!!
रंजना हलमारे( सेलोकर)
साकोली.
[9/28, 3:56 PM] Vina atkari: ""अंधश्रध्दा""
जिथं श्रध्देला जास्त
नसते मिळत वाव
तिथेच अंधश्रध्दा
. घालतसे घाव.
देवांच्या नावावर
कोंबड्याचा बळी
नवसाच्या नावे
खाण्याची नव्हाळी.
मोठं मोठें साधु
कथा प्रवचन देती
भक्ताशी भुलं पाडून
आया बायांना नाडती.
डोकं कमी असतं
बाया बापड्यांना
साधु गोड बोलुन
फसवी सगळ्यांना.
अंधश्रध्दा आपल्या
मनाचा आहे भ्रम
धरा विज्ञानाची कास
मिटती सर्व संभ्रम.
सौ.विणा द. अतकरी.
नागपूर.
[9/28, 3:56 PM] jhanjad tai: Il अंधश्रद्धा ll
धर्माच्या गारुड्यांनी
दाखविली भीती
आम्हा शिकविली
कर्मकांड निती
थांबविली आमच्या
शिक्षणाची गती
तिथूनच झाली
अंधश्रध्देची निर्मिती
रूढी,परंपरा, रीती
सर्व दिल्या लावून
अशिक्षित म्हणून
घेतल्या पाळून
बुवाबाजी ला लवकर
पडती बळी
शिकल्या सवरल्या
अडाणी नारी
विज्ञानाची कास धरून
सत्य पहावे जरा तपासून
सुरुवात करावी अपुल्या घरातून
अंधश्रद्धा जाईल समूळ निघून
सौ रेणुका झंझाड भंडारा बेला
[9/28, 4:59 PM] संपर्क-1: अंधश्रद्धा
......................................
रस्त्याने जाई मांजर आडवे
येथेच कार्य थांबलेसे वाटे
पुढे न जाई मागे परतून येई
अशी ही जनरीत पडलीसे।
बिचारे मांजर पाहून उंदरासी
खाद्य आपुले भक्षणा धावतसे
अशी ही अंधश्रद्धा ठायीठायी
कशी होईदूर जानती न कोणी
विज्ञानयुगात जग जाई पुढे
यत्न माणसाचे संपती सारे
तेव्हा मन वळे अंधश्रद्धेकडे
वाटे काही तरी चुकले आपुले
उत येतसे मग भोंदूगिरी ला
राहु केतू च्या चक्रात फसला
मग घालूनी महापूजेला
समाधान मनीचे शोधतसे।
देवा पूजती, नवस करती
देतीकोंबड्या बकऱ्यांचा बळी
कार्यभाग आपला साधन्यासी
श्रध्दा की अंधश्रद्धा
समजेना काही।
सौ.सरोज मते
दारव्हा🙏🏻🙏🏻
[9/28, 5:01 PM] संपर्क-1 Yat -sagar-2: मागे जी हिंगणघाट येथे अतिशय अमानवीय घटना घडली सकाळच्या सुमारास एका तरण्या शिक्षीकेला पेटवलं.......😔😔😔
तेव्हा त्या प्रसंगावर माझ्या लेखणीतून अवतरलेली ही कविता....
नराधमांचे चौरंग
तिन ठरवल समाजासाठी
पणती होऊन जळायच
सुगंध होऊन फुलांमधला
वार्यासंग पळायचं !!
येता जाता तिला सुद्धा
खुप नजरा ताडायच्या
देहावर फिरून थेट
तिच्या नजरे लाही भिडायच्या !!
शेवटी आयुष्यात तिच्या
ति काळी सकाळ ऊगवली
समाजातिल विक्रुतिने तिला
पेट्रोल टाकुन पेटवली !!
धक्का बसला मानवतेला
माणुसकी ही लाज ली
ऊसळलेल्या आगडोंबात ती
चाळीस टक्के भाजली !!
माफ करा राजे तुमच्या महाराष्ट्राचा बदलतोय आता रंग
कारण आता होत नाही इथे
नराधमांचे चौरंग !!!!
रचना:-हेमंत गाढवे,दाभा
[9/28, 5:55 PM] +91 88550 02895: अंधश्रद्धा
बाळगू नका अंधश्रद्धा
आपल्या या मनात
करी तोच आपल्या
जीवनाचा घात ।।
अति जास्त खर्च
नका करू मंदिरासाठी
तेच अन्नदान करा
अनाथ गोरगरिबांसाठी ।।
गंगेत स्नान करून वाटते
झाले आपण शुद्ध
मनात नको अंधश्रद्धा
हेच असू द्या आपले युद्ध ।।
विधवा करी औक्षवंत
तर नका करू तिरस्कार
आहे ही एक अंधश्रद्धा
त्याचाच करूया पुरस्कार ।।
फसवेगिरी करणाऱ्या साधू
संतांच्या नका लागू नादी
देवाचे नाम जप करूनच
देव पावतो आधी ।।
पुनम डहाके. भंडारा
[9/28, 6:10 PM] Madhuri Devendra Bhute: अंधश्रद्धा......
समाजमनाला लागली कीड
अंधश्रध्दा पायी वाया गेली
गरीब अज्ञानी जनता
अंधश्र्धेला नडली !!
नरबळीचा घटना झाल्या
जीव गेला मुलाबाळांच्या
भूत उठविले भोंदूबाबानीं
पैसाअडका मिळविण्यासाठी !!
भोंदुसाधुंचे वाढलें बळ
स्त्रियांचे शोषणासाठी
मठ उभारून संपत्ती वाढविली
राजकारणही केले काही !!
अंधश्रध्दा ला बळी पडतात
कर्मकांडाचा भितीपायी
श्रद्धा असावी देवावर सकारात्मक
ऊर्जा साठी नाम घेवून करा जप !!
विज्ञानाची धरा कास
सत्यनिष्ठ ता परताडा खास
नको कोंबड्या बकरांचे मासं
अंधश्रद्धा आहे भास !!
माधुरी देवेंद्र भुते.
[9/28, 7:55 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अंधश्रद्धा
अंधश्रद्धा नको मनात
पसरवू नका जना जनात
ईश्वर चिंतन करुनी
आरोग्य मिळवू समाजमनात।।
नको ते नरबळी
नको कालसर्पयोग
इथे आहेत सारे
नशिबाचेच भोग ।।
विधवांचा करू सन्मान
हक्क त्यांना लाभू देऊ
जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन
सकारात्मक राहू देऊ ।।
प्रबोधनकार सांगून गेले
भोंदू बाबांना दूर सारा
गरीब अनाथांच्या पोटासाठी
एक भाकर खाऊ घाला ।।
अंधश्रद्धेला सारून दूर
विज्ञानाची कास धरा
प्रयत्नानेच होईल प्रगती
आयुष्याचा मंत्र खरा ।।
स्वच्छता राखून सध्या
घरातच राहू या
कोरोना महामारी ला
देशातून हटवू या ।।
मंगला डहाके, भंडारा
[9/28, 8:27 PM] संपर्क-4 Prtibha Sopan Vatha: कविता
अंधश्रद्धा
अंधश्रद्धा वाईट कुप्रथा,
का व्यर्थ बळी पडता?
काळ न राहिला जुना तरीही,
अंधश्रद्धेच्या विळख्यात नर नारी.
भूतखेत न झोंबती कुणा,
वाईट विचार खेळ मनाचा.
बुवाबाजी थोतांड सारे,
हवे कशाला लागणे मागे.
लोभी वृत्ती घातक असती,
भानामती,नरबळी जीवही घेती.
कशास हवा नवस फेडण्या,
उगाच जीव मूक प्राण्यांचा.
श्रद्धा असावी डोळस उघडी,
पानमूळ अंधश्रद्धेची उपटी.
विज्ञानाची कास धरू,
अंधश्रद्धेस थारा न देऊ.
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि.28.09.2020
No comments:
Post a Comment