।। निसर्ग।।
अहो !
निसर्ग म्हणजे काय पुसता दाताळ वेगांळूनी।
निसर्गाचे आहात तुम्ही जीवनभराचे ऋणी।।
निसर्ग माझा बालपणीचा सखा।
सोबत करतो जिवनभराच्या सुखदुखा।।
ती आम्रवृक्षाची गडद साऊली विटीदांडू खेळाया l
वटवृक्षाच्या सूरपारंब्या झोका घ्यावया ll
चार,चारोळी,बोरे, जांभळे रानमेवा मिळतो खावया।
या वयात मी का विसरावे माझीया सखया।।
हिरवा श्रृतू तो शहरी न मिळे पाहावया।
या आमुच्या झाडीपट्टीत मन रमवावया।।
निसर्गाशी केली गद्बारी या नराधमाने।
स्व-स्वार्थासाठी तोडली रानेवने।।
जल,जमिन जंगलसाठी करीत बसले झगडे।
निसर्ग तो वगळा पंगू होतील सगळे।।
🌲 🌲 🌲 🌲 🌲
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
।। निसर्ग माझा सोबती।।
रानीवनीची ऊन्हसाऊली निसर्गातूनी मिळे,
माझे मन पावन होते,माझे मन पावन होते।। धृ।
रम्य, पहाटे पशुपक्षाची किलबिल मोहरे
माझे मन पावन होते।
आम्रतरुवर कोकीळ कुहूकुहू बोले,
रविकीरणांनी मोहक चाफा सुमधूर डोले।
माझे मन पावन होते।।
----------------------------------------------------------------------
प्रा.डाँ जयश्री रेहपाडे
नागपुर.
# निसर्ग #
किती युगानंतर आज.
मोकळी वसुंधरा झाली....
स्वच्छ धुतलेल्या काचे आडुन
बघ धरती ही लखलखली.....
लेवुनी साज हिरवा
सुष्टी गाते गाणे.....
पक्षांच्या कलकलाटात
वसुदेव गातो पहाट गाणे....
बेधूंद वाहतो वारा वनोरानी
धबधब्यांचा लेवुनी
साज न्यारा
नववधू सम भासते पृथ्वी
धन्य आम्ही ही आमची.
जन्मभुमी..
उधळोनी बंध सारे
सखी, घे हातात हात .
भिजू या आपणही
चिंब या निसर्गात
.
---------------------------------------------------------------------
-सुभाष धांदे सर,यवतमाळ
----------------------------------------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
निसर्ग
बहरलेल्या झाडावरती
पक्षी करती किलबिलाट
नयन उघडता होई
चैतन्याची पहाट ।।
दोन्ही बाजूला
जंगल गवसे दाट
मधोमध असे
ओली पायवाट ।।
रानफुले ही करती
पाखरांशी प्रेम गुज
डौलाने डोलती
बाग फुलांचा सुगंधी साज ।।
हिरवी धरती झेलून धारा
आसमंत आनंदे
शांत सरिता, झरझरतो वारा
मोरही नाचे स्वानंदे ।।
पशु पक्षासंगे ,इंद्रधनूच्या
रंगात सूर्यही न्हाले
सोनेरी किरणे लेऊन
वृक्षही मदमस्त झाले ।।
शेतकरी गाळून घाम
भिजवतो काली माती
ढवळ्या पवल्या संगे
पिकवतो शेतातून मोती ।।
झाडे लावा, झाडे जगवा
जगतो हा सारा जहान
निसर्गाशी नाते जोडा
आरोग्याचे मंत्र महान ।।
----------------------------------------------------------------------
-नंदा भोयर, अमरावती
-------------------------------------------------------------------
मंगेश बांते,पुणे
Iiनिसर्गII
निसर्ग नावाचं थाट किती
इथे पावसाची वाट किती
ग्रिष्माच्या काहीलीची लाट किती
गुलाबी थंडीची पहाट किती l
इंद्रधनुची किमया भारी
जश्या पडती श्रावण सरी
निळे मेघही तांडव करी
निसर्गाची ही किमयाच न्यारी ll
खळखळ वाहे झरे बापडे
मातीचा हा सुगंध दरवळे
मोरही नाचे थयथय गडे
कोकीळ ही सरगम छेडे lll
असा निसर्ग करी उधळण
करु त्याचे आपण संवर्धन...
🌲🌿🌱🌴🌳🍀
-------------------------------------------------------/-------------
सौ.मीरा नरेंद्र शेबे
जि.प.भंडारा.
🌲🌳🦚 निसर्ग 🦈🦒🐅
आमच्या पूर्वजांनी
राखीयली राने
इमारतीच्या जंगलानी
उजाडली वने
आता महामार्ग
लांब रुंद झाली
कित्येक महावृक्षांची
कत्तल केली.
कुणा नसे तमा
पशू पक्षांची
गावात येती श्वापदे
तक्रार त्यांची.
पूर्वीचा निसर्ग
राहीला नाही
ओरबडून घेण्याची
सर्वांना घाई.
विणा पंखा, कुलर होता
थंडगार वारा
पिझ्झा, बर्गर पेक्षा
रानबोर, चारा
नदीनाले स्वच्छ
डुंबण्यात मजा
सुख सारे हिरावले
प्रदुर्षणाची सजा.
आंब्याची आम्राई,
मामाची माडी
स्वप्नवत भासे
घुंगराची गाडी.
मानवाने केला कहर
निसर्गाला आली लहर
श्रेष्ठत्वाची स्पर्धा भारी
निपजली महामारी.
आम्हा झाली अमुच्या
चुकांची जाण
जेंव्हा पेटून सारे
उठले रान.
निसर्ग अमुचा दाता
तोच माता पिता
मातृदिनाचा मान
निसर्ग राखू छान.
ठेवू निसर्गाचा मान
वाढवू धरणीची शान
तेंव्हा वाचतील प्राण
जगू आणि जगवू
घेवूया प्रण. २
---------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment