-नंदा भोयर, अमरावती
------------------------------------------------------------------------
आईचे रागावणे, मारणे
असते वात्सल्यपोटी
हृदयात प्रेम सागराचे
कठोर शब्द दिसते ओठी ।।
आईभोवती गराडा
साऱ्या नातलगांचा
आदरातिथ्य हसत
खेळत गप्पांचा ।।
आई ही आई असते
तिच्या सम कुणी नसते
आईच्याच चरणी सदा
सारे विश्व वसते ।।
----------------------------------
मंगला डहाके, भंडारा
।। आई ।।
तूच आई, माई, माय
अन मम्मी
नाव बदलले तरी
हृदयातील प्रेम झालं नाही कमी ।।
वर्षभराच घाई घाईच काम
वाळवणं चिलवन
पापड ,कुरोड्या अन
मसाले साठवण ।।
मुलांचे गुण
चार चौघात सांगणारी
मुलांच्या संस्कार सुखात
भरून पावणारी ।।
आई ,मुलांसाठी सदा झटणारी
तोंडातील घास देणारी
त्यांच्या प्रगतीसाठी
रात्रंदिवस एक करणारी ।।
मुलांचे 100 गुन्हे माफ करणारी
ती वात्सल्याची माऊली
तिच्याच पदरी लाभते
सुरक्षिततेची साउली ।।
तीच मूल्य जपून
विश्व सरकारी
आईविना मी
सदा भिकारी ।।
--------------------------------
-मंगला डहाके, भंडारा
---------------------------------------------------------------------
[11/5, 4:51 PM] K B Sarve (mahila Sakhi Manch):
।।आई।।
आई ती आईच असते.
तूझी माझी एक असते.
माहेरची ती लेक असते.
सासरची ती मेख असते.
सौ. के.बी. सार्वे. भंडारा.
No comments:
Post a Comment