।।प्रेम कुणावर करावे।।
प्रेम करावे,
सळसळणार्या नदिवर,
खळखळणार्या झर्यावर,
लखलखणार्या तार्यावर,
प्रकाशणार्या चंद्रावर,
प्रेम करावे,
तळपणार्या सूर्यावर,
किलबिलणार्या पक्ष्यावर,
प्रेम करावे,
जगाच्या पोशिंद्यावर,
आईविण पोरक्या बाळावर
-सौ.के.बी.सार्वे भंडारा.
--------------------------------------------------------------------
प्रेम कुणावर करावे?
प्रेम करावे--
जगाची दोरी ज्याच्या
हाती आहे ती शक्ती
स्वामी सद्गुरू रोमारोमात
ओथंबून वाहते ,ती भक्ती ।।
ज्याच्यामुळे जीवनाला
प्राप्त झाला अर्थ
जीवनसाथी तो ,त्याच्या
विना ,नसतो काही मतितार्थ ।।
प्रेम करावे--
हृदयातला परदर्शीपणा
मोकळा करावा जिथे
सुख दुःखाच्या वाटा
जपाव्या मैत्री तिथे ।।
प्रेम करावे--
कधी काळी कामात
येणारे शेजारी
कळत नकळत
प्रेमाचा ओल जपणारी ।।
प्रेम करावे--
आपल्या घरावर,खोलवर
रुजलेल्या नात्यांवर
अंगणातल्या रंगोळीवर
चिवचिवणार्या पक्षांवर ।।
प्रेम करावे--
पोटाची खळगी भरणाऱ्या
चिंब त्या घामावर
मातीतून मोती पिकवणाऱ्या
त्या बळी राजावर ।।
प्रेम करावे--
आनंद देणाऱ्या
उत्तुंग कार्यावर
आभाळाची उंची गाठणार्या
झंझावाती धैर्यावर ।।
प्रेम करावे--
छाया देणाऱ्या वृक्षांवर
फुलणार्या फुलांवर
आनंदाच्या लहरींवर
प्रगतीच्या चालींवर ।।
प्रेम करावे--
या मानवी जन्मावर
आपल्या थोर कर्तृत्वावर
वृक्ष, फुलांवर आणि
आपल्या प्रेमावरही ।।
मंगला डहाके, भंडारा
----------------------------------------------------------------------
।।चारोळी।।
प्रेम हे प्रेम असते
तूमचे आमचे सेम असते
जमले तर प्रेम असते
बिघडले तर लफडे असते.
सौ. के. बि.सार्वे. भंडारा.
------------------------------------------------------------------/
सौ मीरा शेबे भंडारा
-----------------------------------------------------------------
सौ नंदा भोयर अमरावती
------------------------------------------------------------------
-श्री मंगेश बांते पुणे
No comments:
Post a Comment