Friday, November 25, 2022

पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                     
     मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे लेआउट पुसद येथील संकट मोचन  मंदिर परिसरात पनवेल येथील  योगाचार्य रामकृष्णजी ठवकर  यांचा आरोग्य विषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये त्यांनी योग मुद्रा व्याधी व उपचार याविषयी प्रात्यक्षिकासह त्यांनी  मार्गदर्शन केले या कार्यक्रमांचा असंख्य  महिला व पुरुषांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या सुरवातीला योगाचार्य रामकृष्णजी ठवकर यांचा  सामाजिक व आरोग्यदायी  सेवेबद्दल व योगातील योगदानाबद्दल  नेताजी सुभाषचंद्र बोस बचतगट, एकता महिला मंडळ व जयहिंद क्रीडा मंडळ व गुडमाॅर्नींग सोशल ग्रुप पुसद च्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार  करण्यात आला.   
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा.डाॅ. केशव चेटुले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अनिल वीरखेडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री प्रकाश  चौधरी साहेब, प्रा.प्रदिप  जयस्वाल,श्री.गजानन ईंगोले,  श्री ए. के.देशमुख, प्रा.  मांगलेकर , श्री नामदेवरावजी इंगळे, श्री उत्तमराव जाधव सर यांनी मोलाचे कार्य केले.

















No comments:

Post a Comment

samajotsav 2017

समाजोत्सव कार्यक्रम २३-२४ डिसेंबर २०१७ समाजोत्सव कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर संगीताने