श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयात योगा व मुद्रावर योगाचार्य रामकृष्णजी ठवकर ह्यांचे व्याख्यान --
पुसद येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयात दिनांक 22नोव्हेंबर 2022 रोजी 1-00 वाजता कॉन्फरन्स हॉलमध्ये शारीरिक शिक्षण व खेळ विभागाच्या वतीने योगाचार्य रामकृष्णजी ठवकर पनवेल ह्यांचे व्याख्यान योगा, मुद्रा ह्यावर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी टी पाटील सर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागप्रमुख डॉ अंजली पांडे, प्रमुख व्याख्याते योगाचार्य रामकृष्णजी ठवकर ह्यांचे पुष्पगुच्छ देवून प्राध्यापक डॉ वैशाली पांडे, डॉ अरुणा पवार, डॉ रंजना जीवने ह्यांनी स्वागत केले. माननीय प्राचार्य डॉ जी टी पाटील सर ह्यांनी योगाचार्य रामकृष्णजी ठवकर यांचा शाल, श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार करण्यात केला ,
त्यानंतर जवळपास दिड तास योगा मुद्रा वर प्रात्याशिकासह व्याख्यान झाले. योगाचार्य ह्यांची 14 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नुकतीच त्यांनी 4000 किलोमीटर ची नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. शरीरातील सांधे लवचिक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी, मन शांत व एकाग्र करण्यासाठी ताणतणाव पासुन मुक्ती, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, योगासणाचे फायदे विषद केले, रेकी मुद्रा वर देखील. भाष्य केले
त्यानंतर डॉ अंजली पांडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की फक्त रोग विरहित शरीर असण्याला स्वास्थ्य म्हणता येणार नाही तर आनंद प्रेम आणि उत्साह हे तुमच्या जीवनात उत्स्फूर्त पणे व्यक्त होत असतील तर त्याला खरी आरोग्य संपन्नता म्हणता येईल असे सांगितले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थीनी, महिला प्राध्यापक मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. रजनी भोयर यांनी केले,कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ वैशाली पांडे, डॉ साधना मोहोड डॉ अरुणा पवार डॉ रंजना जीवने डॉ असीम खापरे , प्रा सुपे ह्यांनी सहकार्य केले
No comments:
Post a Comment