[12/02, 05:46] Meera shebe (Mahila sakhi Manch): 🌅प्रभात चिंतन 🌅
क्र.214
उषेची भूपाळी
गाती द्विजगण
कुसुम सुवास
प्रसन्न वातावरण.
सौ.मीरा शेबे भंडारा
[12/02, 06:27] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): "" *संस्कारधारा* ""(२१२)
जवा चमकशील भारी
तवा पाहतील किर्ती
येतील दुजे निकटची
बघतील श्रमाची स्फुर्ती.
दनाअ, नागपूर
दि.१२/०२/२०२१
[12/02, 06:34] Anjali Bante Bhandara: 🕉️योगप्रभा🕉️
क्र-२
पहाटे ची वेळ, स्वच्छ
निरभ्र आकाश, चांदण्या ही लुप्त झालेल्या , पक्ष्यांच्या किलबिलाटासह रवि च्या आगमनाची तयारी.
🙏🙏🙏🙏🙏
सौ. अंजली बांते
भंडारा
[12/02, 07:16] Swati dayanand Shelokar: 🌹|| *अलगूज* ||🌹
*क्र.२२६*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*लहान असो की मोठा*
*प्रत्येकाचा ठेवावा मान*
*घालून पाडून बोलून*
*करू नये कुणाचा अपमान*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[12/02, 07:57] Nanda Bhoyar: नात्याच्याही नात्या पलीकडली
मैत्री खूप गोड असते
आंबट गोड चव त्याची
जशी संत्र्याची फोड असते
नंदा भोयर
[12/02, 08:11] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 226 वे
काळोख्या रात्रीत अवनी
चंदप्रकाशात लाजते
वृक्षवेली बहरलेली
दवबिंदूत पर्ण सजते ।।
मंगला डहाके ,भंडारा
[12/02, 09:48] महिला1 Rupali Bondre: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.२१८*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*निस्वार्थ करावी मदत*
*नको त्यात अपेक्षा*
*फोटो काढून दिखावा*
*होते गरजवंताची उपेक्षा*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[12/02, 10:12] Vina atkari: 🌻पहाटवारा🌻
सरकार दाखविती
आमिष मोठंमोठी
. शेतकरी आंदोलन
करती हक्कासाठी
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[12/02, 10:59] संपर्क-4 Prtibha Sopan Vatha: 🌹मंगल प्रभात🌹
पहाटेचा मंद वारा
गातो भूपाळीचा सूर
खगही देत सूर विहरती
हिरव्या रानी दूर
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ.प्रतिभा सोपान वाठ (गरबडे)
[12/02, 11:11] Swati dayanand Shelokar: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*अष्टाक्षरी कविता*
*चांदण्यात फिरताना*
हात तुझा हाती होता
चांदण्यात फिरताना
नेहमीच साथ तुझी
सुखस्वप्न बघताना
बावरले सख्या मी रे
तुझ्या मिठीत येताना
गालातच लाजले मी
भाळी चुंबन घेताना
मोरपीस फिरवला
माझ्या गोर्या गालावर
प्रेम बघत जागल्या
चांदण्याही रात्रभर
चांदण्यांच्या साक्षीनेच
झालो दोघे एकरूप
राणी तुझी मी बनले
माझा झालास तू नृप
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[12/02, 11:13] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: विषय-- चांदण्यात फिरताना
चांदण्यात फिरताना
हात तुझा हातात
वाऱ्याची झुळूक येई
गारवा या प्रेमात ।।
चांदण्या भिरभिरती
आकाश प्रांगणात
फेर धरून नाचती
चंद्राभोवती चमकत ।।
वृक्षवेलीं न्याहाळती
अवनीचे हे नटणे
वाराही झोके घेतो
पाचू ,मोत्यांचे लेणे ।।
चंद्राच्या शीतल प्रकाशात
तुझ्या नयनात दिसते मन
अधर टेकवता भाळी
जाते मी ओशाळून ।।
हवेतही थोडा गारवा
झोंबतो या अंगाला
पर्णाला दव स्पर्शता
लाजून बघतो शशीला ।।
मंगला डहाके ,भंडारा
[12/02, 12:22] +91 88550 02895: *किलबिल 68 वे*
रविराजाची तांबडी किरण
पसरले निळाशार नभात
दोन्ही करात ऊर्जा साठवून
मी प्रार्थना करते मनात ।।
----------–------------------
पुनम डहाके, भंडारा.
[12/02, 14:08] +91 88550 02895: *चांदण्यात फिरताना*
असावा सोबतीला
चांदण्यात फिरताना
काळोख्या नभातील
चंद्र चांदण्या बघतांना ।।
हातात हात घेऊन
सुंदर आंसमत बघावे
चमकत्या तार्यांनी
स्वागताला असावे ।।
नभात भरलेल्या
चांदण्यांच्या सभेत
बघत बसावे
तुझ्याच नयनात ।।
सख्या तु मला कधी
सोडून न जावे
मिठीत तुझ्या मी
अशी फुलत रहावे ।।
------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[12/02, 14:44] jhanjad tai: "" चांदण्यात फिरताना ""
शरदाचं लख्ख चांदणं
पडलं रात्रीला भुवरी
प्रकाशात चांदण्याच्या
न्हाऊन निघे सृष्टी सारी
हर्षोल्हास वाटे भारी
चांदण्यात फिरताना
सोबतीला सखा माझा
हातात हात घेताना
रातराणीचा सुगंध
आसमंत दरवळला
चांदण्याचा भाव सख्या
नयनात तुझ्या बिंबला
वार्याची येता झुळुक
बटांचा स्पर्श गालाला
तुझ्या न माझ्या प्रितीचा
वसंत मनी फुलला
चांदण्या बहरल्या
पाहून हसर्या चंद्राला
तुझी माझी साथ सदा
पाहून शशीही लाजला
सौ रेणूका झंझाड भंडारा बेला
[12/02, 16:00] Vina atkari: बी.के.सा.सं.प.
* *चांदण्यात फिरताना **
चांदण्यात फिरताना
जुन्या गोष्टी आठवल्या
हृदयाच्या कोंदणात
त्यांना मनी साठवल्या.
चंद्र ताऱ्यांची गट्टी
आहे फार जुजबी
एकमेकां सावरणं
हिच त्यांची खुबी.
अंगणी पडले चांदणे
जशी फुले प्राजक्ताची
चंद्र प्रकाशात भासते
आतिषबाजी सणाची.
चांदण्यांच्या बहरण्याने
चंद्र थोडासाच हासला
तूझी माझी साथ बघून
शशीधर हळूच लाजला.
चांदण्यात फिरताना
माझे विसरले भान
निसर्गाचे करा जतन
हेच मागते तूम्हां दान.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[12/02, 16:24] smj_Bhd_Kadav Sudhakar Baliramji, (Bhandara): कविता
★चांदण्यात फिरताना★
चांदण्यात फिरताना
असावा सख्याच्या हात हातात
नाचे मयुरेश होऊन बेधुंद
माझ्या मनाच्या गाभाऱ्यात
तुझ्या माझ्या प्रेमाचा गोडवा
दिवसेंदिवस बहरत जावे
चांदण्यात फिरताना
मन वाऱ्यासंगे हेलकावे
चांदण्या राती
बसली मी नटून
चांदणी ही लाजली
चंद्राला बघून
तू माझा चंद्र
मी तुझी चांदणी
तुझे लोभस प्रतिबिंब
भासे माझ्या नयनी
सौ. संगीता कढव, भंडारा
[12/02, 17:01] Anjali Bante Bhandara: कविता
*चांदण्यात फिरतांना*
चांदण्यात फिरतांना, विचार येतो मनी,
रोज चंद्राचा आकार बदलतो,
चांदण्यांचा का नाही?
रोज कलेकलेने वाढतो, कमी कमी होतो, पौर्णिमेला तर
जाम खूश असतो.
चांदण्या फेर धरतात सभोवताली.
अश्या चांदण्या रात्री
सख्या चा हात हातात मध्ये
चंद्राच्या शितल प्रकाशाने
अंग, अंग गारठले.
रातराणी चा सुवास ही
करतो भारी कहर,
दोघांचीही सरकत नाही एकमेकांवरुन नजर.
सौ अंजली बांते
भंडारा
[12/02, 17:10] +91 82754 71401: चांदण्यात फिरतांना
चांदण्यात फिरतांना
हात तुझा हातात
वात वारा झुळूक
पारवा प्रेमात ..
मधुर चांदणी देखणी
आकाशातील शाळेत
नाचती ठुमकती
चंद्राच्या शितल छायेत..
लतावृक्ष हे बघती
धरणीचे सजणे नटणे
वार्याचे झोके घेणे
हिर्यामोत्यांचे लेणे..
चंद्राच्या मृदू छायेत
डोळ्यात तुझ्या दिसे मन
हळूवार टेकवून मस्तक
जाई मी गारठून..
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[12/02, 19:25] Rajiv buddhe Mandhal: *चांदण्यात फिरतांना*
चांदण्यात फिरतांना विसरलो सारे देहभान
माझी मोहरली काया आले मनाला उधान ...‼️
तुला भेटतांना वाटे आले सारे आभाळ भेटाया
तुझे सौंदर्य पाहून लागे ...माझा तोलही सुटाया
सखे तुला भेटून मिळते साऱ्या विश्वाचे समाधान
चांदण्यात फिरतांना विसरलो साहे देहभान ...‼️
रोज रोजच साजणी तुझी ...माझी भेट व्हावी
सारी सृष्टी विधात्याची लख्ख चांदण्यात न्हावी
तुझ्या माझ्या सवे व्हावे अवघे विश्व हे बेभान
चांदण्यात फिरतांना विसरलो सारे देहभान‼️
हात घेता तुझा हाती ...मन माझे येई बहरुन
सखे तुही टाकते उसासे ...अन् येतेस शहारुन
प्रिये तुच माझी जिंदगाणी तुच माझे पंचप्राण
चांदण्यात फिरतांना विसरलो सारे देहभान‼️
पाहूनी भेट तुझी माझी ... सखे झुरते रान सारे
जिकडे तिकडे चोहिकडे वाहती प्रणयाचे वारे
दिसे चंद्र झुरतांना पृथ्वीचा सखा तो शिलवान
चांदण्यांत फिरतांना विसरलो सारे देहभान‼️
*राजीव शा . बुद्धे*
*मांढळ ( कुही*
[12/02, 19:35] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बी.के.सा.सं.प.
उपक्रम.. एक कविता(१९०)
*चांदण्यात फिरताना*
चांदण्यात फिरताना
सखे तुझा साथ होता
आपण दोघं विहरता
शशी ढगाआड नव्हता.
सखे हात मम हाती घेता
चांदण्या लाजू लागल्या
वाटते तयांना फिरायला
कशा एकमेक पहुडल्या.
चांदण्यांची मिलमील
रात्रीला सुटे गार वारा
चंद्राचे शितल प्रकाशी
सजे प्रितीचा रंग सारा.
सखे तुझे गोड स्मीत
असेच अखंडीत राहो
राणी कुठे न् उणे मला
भगवंतही यासच पाहो.
चांदण्यात टहलताना
निशा सहजही सरली
पहाटेचे शुक्र ता-याने
उषाकाल प्रसव झाली.
दनाअ, नागपूर
दि.१२/०२/२०२१
[12/02, 21:23] Nanda Bhoyar: चांदण्यात फिरताना
चांदण्यात फिरताना
सख्या तु सोबत होता
अन चंद्रालाही हेवा वाटावा
म्हणून तो ढगाआडून पहात होता
वृक्षवेली स्तब्ध होती
मीही तुझ्या कवेत होती
रात्रीच्या काळोखात
हातात हात घेत होती
चांदण्या होत्या सोबतीला
रात्र राणीचा मंद सुगंध
सोबत तुझी रे मला
ती चांदण्याची रात्र धुंद
मंद प्रकाशातली ती भेट
अशीच होत राहावी
तुझ्या प्रीतीत मी रे
सदा नाऊन जावी
नंदा भोयर
[12/02, 23:02] Meera shebe (Mahila sakhi Manch): *चांदण्यात फिरताना*
शितलता मनाला तनाला लाभते
चांदण्यात फिरताना भान हरपते.
रजनीस साथ रजनीकांत देतो
धवल चांदणे धरेस न्हाऊ घालतो.
काळोख गर्भात चांदणं बरसात
गार गार वा-यात प्रियाची सोबत.
रूपेरी वाळूच्या सागर किनारी
तुषार लाटांचे झेलीत अंगावरी.
चांदण्यात फिरताना करात कर
गुंफून चाललो प्रेमाचा आधार
तन वेगळं मन एकरूप होऊन
फुलले भाव ते रुजले मोहून.
मोह आवरेना तुला भेटण्याचा
सहवास मिलनाचा चांदण्याचा
मैफिलीत श्रृंगार रस गाण्याचा
तुजसवे चांदण्यात फिरण्याचा.
सौ.मीरा शेबे भंडारा
[13/02, 05:59] Meera shebe (Mahila sakhi Manch): 🌅प्रभात चिंतन 🌅
क्र.215
गारठली पहाट
धुक्यात रानवाट
डोकावती फुले
लपून पर्णाआड.
सौ.मीरा शेबे भंडारा
[13/02, 06:15] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): "" *संस्कारधारा* ""(११३)
मानवा जगी तू शहाणा
असाआहे तुझा रे बाणा
दोन हाताचे कर्मही जादु
बनशील जगात तू राणा.
दनाअ, नागपूर
दि.१३/०२/२०२१
[13/02, 06:30] +91 88550 02895: *किलबिल 69 वे*
दिवस उजळून निघे
सूर्याच्या लख्ख तेजाने
रात्री चंद्राचा प्रकाश
भूवर पसरतो शितलतेने ।।
-------------------–-------------
पुनम डहाके, भंडारा.
[13/02, 07:00] Vina atkari: 🌻पहाटवारा🌻
हिरव्या पानात
मोगरा बहरला
अंगणात माझ्या
सुगंध दरवळला..
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[13/02, 07:16] Swati dayanand Shelokar: 🌹|| *अलगूज* ||🌹
*क्र.२२७*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*संथ चालणारा कासवही*
*हरवू शकतो जलद सश्याला*
*जन्मजात मिळालेल्या गुणांचा*
*माणसास अहंकार कशाला*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[13/02, 07:30] Nanda Bhoyar: सखे सकाळी सकाळी
आठवण तुझी यावी
सुरुवात सकाळची
तुझ्या आठवणीने व्हावी
अशी तुझी न माझी
मैत्री घट्ट असावी
सख्यांनो सुप्रभात
सौ नंदा भोयर
[13/02, 09:03] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 227 वे
वृद्ध ,बालकात दिसतो
भगवंत आमचा महान
रंजल्या गांजल्याच्या सेवेत
दिसे हृदयी आनंद छान ।।
मंगला डहाके ,भंडारा
[13/02, 10:07] महिला1 Rupali Bondre: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.२१९*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*प्रत्येक घरात पोहचावी साक्षरता*
*तेव्हाच दूर होईल अंधश्रद्धा मनातून*
*शिक्षणाचे महत्व सर्वांना कळावे*
*तेव्हाच बदल दिसेल आचरणातून*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[13/02, 10:14] Anjali Bante Bhandara: 🕉️योगप्रभा🕉️
क्र-३
ओम् मित्राय नम: म्हणून करुया सुर्याला जल अर्पण,
उगवतांना त्राटक करून वाढ ऊ नेत्र ज्योती आपण.
सौ अंजली बांते
भंडारा
[13/02, 11:11] Swati dayanand Shelokar: *चारोळी*
*विषय - आव्हान*
****************************
राबणाऱ्या बळीराजाला
निसर्गही आव्हान देतो
डोळ्यात असलेले स्वप्न
एका क्षणात वाहून नेतो
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
[13/02, 11:27] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एक चारोळी उपक्रम
विषय-- आव्हान
आयुष्य ध्येय गाठण्यास
सदा आव्हान स्वीकारावे
संघर्ष फार करावा लागतो
सुखदुःख ही आनंदे झेलावे ।।
मंगला डहाके, भंडारा
[13/02, 11:34] jhanjad tai: चारोळी
विषय-आव्हान
थकलेले शरीर वार्धक्याकडे
जाळे विणू लागे सुरकुत्यांचे
आनंदाने स्वीकारून पेलवावे
आव्हान असे म्हातारपणाचे
सौ रेणूका झंझाड भंडारा बेला
[13/02, 11:40] Meera shebe (Mahila sakhi Manch): *चारोळी-- आव्हान*
जगण्याचा संघर्ष
सा-या सजीवसृष्टीवर
आव्हान स्विकारत
जगती आयुष्यभर.
सौ.मीरा शेबे भंडारा
[13/02, 11:47] Anjali Bante Bhandara: चारोळी
विषय- आव्हान
तारुण्यात आल्यावर लग्न हे ही एक आव्हानच असते,
थोडं सामंजस्य दाखवून नौका पार करायची असते.
सौ अंजली बांते भंडारा
[13/02, 12:29] +91 88550 02895: *विषय - आव्हान*
आलेल्या आव्हानाचा
हसून स्विकार करावे
पुन्हा पुन्हा जोमाने
आपल्या कामाला लागावे ।।
---------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[13/02, 13:15] +91 98503 02639: आव्हान
चारोळी
आव्हानांना आव्हान द्यावे
दे आव्हान नवप्रगतीचे
देशाच्या उत्तम उन्नतीचे
प्रत्येकाच्या सर्वांगीण विकासाचे
वैशाली टिचुकले यवतमाळ .
[13/02, 13:26] Vina atkari: बी.के.सा.सं.प.
उपक्रम.. एक चारोळी
प्रकाश आमटें कुटुंबाने
स्विकार करूनआव्हान
हेमलकसाआदिवासीस
दिले आरोग्याचे वरदान.
सौ.विणा द.अतकरी
नागपूर
[13/02, 13:35] संपर्क-5 Ranjana halamare: चारोळी
आव्हान
जीवनात आव्हान
स्वीकारावीच लागतात
करावा लागला जरी संघर्ष
तरी ती पेलवावीच लागतात.
रंजना हलमारे
साकोली.
[13/02, 14:05] +91 82754 71401: आव्हान
शासकीय सेवेत येऊ द्या
कितीही आव्हान
ती पेलवण्याची ताकद
मनगटात असावी छान.
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[13/02, 14:16] Nanda Bhoyar: चारोळी आव्हान
आव्हान स्वीकारू सारे मिळुनी
नाही तोडू या झाडे
जमिनीची धूप थांबूया
वृक्ष लावू या सगळीकडे
नंदा भोयर
[13/02, 15:00] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बी.के.सा.सं.प.
उपक्रम.. एक कविता (१९१)
"" *आव्हान* ""
जिवन नदीतील नौका
वादळवारे लाटा उठती
बाजुला सारे सारुनिया
नौकेस किनारी लावती.
आव्हान संसार सागराचे
नियती नियमाने चालावे
निसर्गाशी घातक प्रयोगा
जिवनी सत्त्यानाश पहावे.
धोक्यास ना घाबरता
हिमतीने सामना करा
आव्हान विपरीततेचे
सर्वांना बाजुला सारा.
आव्हानअसे नात्यात
सामंजस्य मनी ठेवा
अगतीकता ना कुठेही
सहज विचारानं वागा.
आव्हानांचा ससेमीरा
जीवनात सतत भासते
म्हणून कां कायरतेने
पाठ दाखवायचीअसते.
दनाअ, नागपूर
दि.१३/०२/२०२१
[13/02, 16:09] smj_Bhd_Kadav Sudhakar Baliramji, (Bhandara): चारोळी◆ आव्हान ◆
प्रत्येक दिवस उजाडतो
नवीन आव्हान घेऊन
माघार घेऊन नाही तर
माणूस मोठा होतो आव्हान पचवून
सौ. संगीता कढव, भंडारा
[13/02, 16:53] संपर्क-4 Prtibha Sopan Vatha: चारोळी उपक्रम
विषय आव्हान
देऊन झुंज परिस्थितीशी
जो आव्हान स्वीकारतो
तोचि खरा कर्मयोगी
जीवनात यशस्वी होतो
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि..13.02.2021
[13/02, 18:42] Chanda shende Nagpur: 🌹चारोळी🌹
।।आव्हान।।
जिद्दीने करावे काम
स्विकारावे आव्हान
न मानता हार
प्रयत्नाने मिळे यशाचा मान।
सौं.चंदा वनवे शेंडे नागपुर
[13/02, 19:14] महिला1 Rupali Bondre: कोरोना वरील लसीचे आव्हान
उभे ठाकले होते जगावर
अथक प्रयत्न केले शास्त्रज्ञांनी
प्रयोग यशस्वी झाले मानवावर
*रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[14/02, 05:59] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): "" *संस्कारधारा* ""(२१४)
वसंतातला खट्याळ वारा
मज अंग अंगास शहारतो
राव गेले कामाला परदेशी
असा मला कशाला छळतो.
दनाअ, नागपूर
दि.१४/०२/२०२१
[14/02, 06:56] +91 88550 02895: *किलबिल 70 वे*
निसर्गाच हे दिलेले देण
ठेवू आपण सांभाळून
पाणी वृक्षवेली हिरवळ
पर्यावरणाचा करू जतन ।।
---------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[14/02, 06:58] Meera shebe (Mahila sakhi Manch): 🌅प्रभात चिंतन 🌅
क्र.216
रविकिरणांचा घेऊन साज
पूर्वाईला आला रविराज
निलांबरी र॔ग उधळीत
अव॔तिकेच्या भाळी ताज.
सौ.मीरा शेबे भंडारा
[14/02, 07:14] Vina atkari: 🌻पहाटवारा🌻
सर्व धर्म समभावाची
ज्योत जागवू रे मनात
प्रेमाचा होईल वर्षाव
प्रत्येकांचे घरा घरात...
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[14/02, 07:29] Swati dayanand Shelokar: 🌹|| *अलगूज* ||🌹
*क्र.२२८*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*बांधले जरी श्वानाचे तोंड*
*प्रामाणिकपणा सोडणार नाही*
*भुंकता जरी आले नाही*
*तरीही कर्तव्य करीत राही*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[14/02, 11:07] +91 98503 02639: अभंग रचना
विषय- प्रेम
💐💐💐💐💐💐💐💐
आज जुळे लग्न |उद्या हो सोहळे|
परवा हो वेगळे| हे का प्रेम||१||
प्रेम केले सर्वा |अनेक संतांनी |
कर हो जोडोनी |एकनाथा||२||
थुंकणारी व्यक्ती |कंटाळून गेली|
ना थके माऊली| एकनाथ ||३||
वाईट बोलला| तरी देई आशिष |
असे हे ज्ञानेश |प्रेमनाथ||४||
प्रेमाने जेवण |एकनाथ देई|
देव साथ देई |अशा कर्मा||५||
प्रेम ते कशास |म्हणावे ते सांगी|
सर्वांशी समांगी |वागे त्यास||६||
अवडंबर ते |असे हो प्रेमाचे|
कृत्य नाटकाचे| वाटती हो||७||
रस्त्यावर दिसे |ओसंडून प्रेम |
भांडणाचे स्तोम |घरी दिसे||८||
सर्वांना माहिती| प्रेम परिभाषा|
मायबापा आशा |दाखवा हो||९||
फोडाप्रमाणे हो |वागवले ज्याने|
वर्षाव फुलाने |मायबापा ||१०||
वैशाली टिचुकले यवतमाळ .
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[14/02, 11:23] Nanda Bhoyar: *आई*
आई तुझ्या जाण्याने
सारे घर सुने झाले
कधी स्वप्नात माझ्या येउनी
सांग परत मी आले
मन कशात माझे लागेना
हसू खोटे ओठावर
आठवण तुझी ग येते
रडणे होते मज अनावर
सहवास तुझा मला
पाहिजे होता गं आणखी
का मध्येच गेली सोडूनी
तुझ्याविना झाले मी पोरखी
ठेच लागता मला
आई शब्द ओठी
तूच नसे जगात या
कुणास मारू मिठी
विनंती माझी तुला
परत जन्म घे ना
वचन दे मला आता
पुढल्या जन्मी माझीच आई होना
नंदा भोयर
[14/02, 11:43] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वरचित आवडती कविता
अभंग
विषय -- सुवर्ण सकाळ
सुवर्ण सकाळ । आलिया जीवनी
तेज चैतन्यानी । सुखाचिया ।। 1
आनंद घेऊन । रविराज पाही
ह्याच दिशा दाही । सुवर्णाच्या ।।2
वृक्ष-वेलीतही । ती सोन किरणे
फुलं न्याहाळणे । हर्षानेही ।।3
प्राजक्ताची फुले । अंगणी पडती
रांगोळी नक्षीती । पहाटेस ।।4
शुभ ह्या प्रभाती । जपू प्रभूनाम
प्रार्थनेचे काम । निरंतर ।।5
मंगल या दिनी । आरतीचा ताट
औक्षणाचा थाट । ओवाळुनी ।।6
असावे संपन्न । आयुष्य हर्षावे
आरोग्य लाभावे । जीवनात ।।7
मंगला डहाके, भंडारा
[14/02, 12:08] jhanjad tai: स्वरचित कविता
"" बाभळी ""
काळीशार अंगकांती
तिज पाहता गोडी ना वाटी
कुठे बांधाच्या काठावरती
झुकून जराशी उभी एकटी
इवली इवली नाजूक पाने
फांदोफांदी बोचरे काटे
पिवळीधम्मक फुले बहरता
मनोमनी उल्हास वाटे
हिलमिल हिलमिल लोंबत शेंगा
वेलांटीची वळणे वळणे
वार्याची झुळुक लागता
मध्येच दिसे नभ लोभसवाणे
आयुर्वेदा मनात ठसली
जाणियले तिचे मर्म
बाभळीच्या अवयवी असती
अनेक औषधीयुक्त गुणधर्म
सांधेदुखी अन गुढघेदुखीवर
खावे कोवळ्या शेंगांचे चूर्ण
दात चमकदार हिरड्या मजबूत
चावून खावीत कोवळी पर्ण
नागर,वखर,शेतीची अवजारे
शेतकर्याच्या बंडीला धिरा
मुळे आणि सालापासून
आयुर्वेदीक औषधी करा
सौ रेणूका झंझाड भंडारा बेला
[14/02, 12:09] +91 88550 02895: *कुणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर*
कोणाचे ओझे असते
कोणाच्या खांद्यावर
देऊन देतात कुण्या
साध्याभोळ्या माणसावर।।
काही काम चोर माणसं
ढकलतात काम दुसऱ्यावर
पैशासाठी काम करतो
गरीब बिचारा जिवापार ।।
स्वार्थी लोक विसरतात
कोणाचे केलेले उपकार
कामात कधी न पडला
देत असतात नकार ।।
मुलांन करिता ओझे
वाहतो आई-वडील
मुलं मोठे झाले की
ऋण विसरतील ।।
आजही काही लोकांन-
मध्ये आहे माणुसकी
दिसते त्यांच्या मनात
प्रेम जिव्हाळा आपुलकी
-----------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[14/02, 13:49] +91 82754 71401: प्रेम दिवस कविता
विषय...एक दिवसीय प्रेम दिवस
व्हॕलेंनटाईन दिन आज
असे एक दिवस
करावे प्रेम मात्र
तिनशेपासष्ट दिवस..
मातृप्रेम,पितृप्रेम
असे पतीप्रेम
सर्वात महत्त्वपूर्ण पुत्रप्रेम
प्रेम म्हणजे असतचं प्रेम.
प्रेम म्हणजे निरागस हास्य
प्रेमात असते रहस्य
रहस्य ते शोधून काढणं
असतं त्यात वास्तव्य ..,
एक दिवसीय प्रेमदिवस
दुसरा दिवस वादविवाद
नको नको प्रेमभंग
सर्व दिवस करु स्नेहसाद
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[14/02, 14:05] Rajiv buddhe Mandhal: *सखे तू फक्त हो म्हण ......*
*केली ...तुझ्याचसाठी हाणामारी*
*सोडली ...तुझाचसाठी दुनियादारी* *तू लावली ..... कशी बिमारी*
*तुझ्याचसाठी जगणे मरणे*
*तुलाच माझे जीवन अर्पण*
*सखे . . . तू फक्त हो म्हण ...*.‼️
*तू दिसली अन् सळसळलो होतो*
*तू न दिसता .....हळहळलो होतो*
*तुझ्याचसाठी ... . .. .रडलो होतो*
*तुझ्याचसाठी जिंकून .......हरलो*
*हरुन जिंकलो . . . .माझे मी पण*
*सखे ... . . . . तू फक्त हो म्हण ..*‼️
*चमचमणारे तारे आणिन तुझ्याचसाठी*
*घमघमणारे वारे आणिन तुझ्याचसाठी*
*दुनियेतील सुख सारे आणिन तुझ्याचसाठी*
*तुझिया हृदयातून येऊ दे ...*
*माझिया हृदयाचे ते स्पंदन*
*सखे . . . .तू फक्त हो म्हण .....*.‼️
*तू आली अन् मोहरले बन*
*तू आली अन् शहारले बन*
*तू हसली अन् हसले क्षण क्षण*
*तुझ्या असण्याने असेच होईल*
*मंगलमय ....... हे सारे जीवन*
*सखे ... .. .तू फक्त हो म्हण .......*‼️
*राजीव शा . बुद्धे*
*मांढळ (कुही )*
*जि. नागपूर*
[14/02, 14:15] संपर्क-5 Ranjana halamare: स्वरचित कविता
पेरमाचा दिवस ( झाडीबोली )
म्हणतेत आज व्हॅलेंटाईन डे
अजी धनी माल
एक गण तरी
न्या ना फिरावाल...
.
गाव सोडून जरा जाऊ वाट दूर
पर तुमी आपल्या कामा मधीच मगरूर
विच्छा माजी पुरी करा वाल
अजतरी न्या ना फिरावाल.....
वाटे करावा जीवाची मुंबई
पर तुमाले माह्यासाठी फुरसदच नाई
चला चला आग्र्याचा ताजमहाल पावलं
अजतरी न्या ना फिरावाल....
नाई पाहिलो पंढरपूर, नाई पाहिलो कासी
आता त माही उलटली पन्नासी
पहा, टोगरबी माहे लागले दुखावलं
अज तरी मले न्या ना फिरवाल...
साजरा करून दिवस पेरमाचा
हाटला मधी खाऊन करून मजा
घेऊन मले देजा पिजा
मोटर गाडीत बसा वाल
अज तरी न्या मले फिरवाल
....
रंजना हलमारे
साकोली.
[14/02, 14:27] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बी.के.सा.सं.प.
उपक्रम.. आवडती सामाजिक कविता (१९२)
*कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर*
ऐका संसार गाणे
कुणाचे ओझे गेले
कुणाचे खांद्यावर
तरी सहज वाहीले.
बालपणी छत्र गेले
यात दोष कुणाचा
नियतीस सर्व मान्य
प्रश्न स्विकारण्याचा.
सामाजिक दायित्व
आपण सारे निभवू
ना समजता ओझा
हास्य तयांचे फुलवू.
माणूसकीचे जगणे
समाजात बाणवावे
त्यांच्याच दायीत्वाने
नियती ऋण फेडावे.
राजाचा रंक झाला
रंकांचा राव दिसला
कालपरत्वे नियतीस
पाहून कर्मही हसला.
सांगावे कश्याचे पायी
कुणाचे ओझे वाहिले
आमच्या खांद्यावरचे
आम्हा ओझे ना झाले.
दनाअ, नागपूर
दि.१४/०२/२०२१
[14/02, 15:38] पुणे- Mangesh Bante: चारोळी
क्षण एक प्रेमाचा तुझ्या येण्याने बहरला
तुझ्या डोळ्यातील चंद्र बघण्यात वेळ सरला
किती वाट मी पाहिली, वाट पाहुनी डोळे थकले
तुझ्या येण्यानेच सखे सारे अंतरच मिटले.
----------------------------------------
☘️मंगेश बांते, पूणे☘️
[14/02, 15:41] महिला1 Rupali Bondre: 💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*विषय- एक दिवसीय प्रेम दिवस*
******************************
एका दिवसापूरता गुलाब
फुलच ते शेवटी सुकणार
रोपटे लावूया मिळून दोघे
अनंत फुले त्यावर फुलणार
तुझ्या मिठीत असतांना
कश्याला हवाय मला टेडी
तुझ्या हळुवार स्पर्शाची
वेगळीच प्रेमळ गोडी
एक दिवसीय प्रेम दिवस
त्याचे इतके का महत्व वाटावे
तुझ्या रोजच्या काळजीतून
न सांगताच मला ते कळावे
प्रॉमिस डे चे वचन सख्या
निभवतात का रे आजन्म
आपण तर न सांगताच
जपतो एकमेकांचा धर्म
अनुकरण करतांना आजकाल
खाजगी गोष्टींचा उघडा पसारा
भारतीय संस्कृतीत नव्हते
आता दिखाव्याचा खेळ सारा
*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[14/02, 16:22] Vina atkari: बी.के.सा.सं.प.
**एक कविता**
**शेतकरी आंदोलन*
दिल्ली दरबारी होते
शेतकरी आंदोलन
सहभागी होण्यास
जमले शेतकरी गण.
व्यापारी लोक खाती
त्यांचे टाळूवरचे लोणी
शेतकऱ्यांची अवस्था
होई मग केविलवाणी.
शेतकरी जगी पोशिंदा
विचार करतो सर्वांचा
उन्हात घाम गाळूनही
हसतमुख चेहरा त्याचा.
पुढारी आमिष दावती
आपला फायदा पाहती
शेतकऱ्यांना फसवून ते
तोंडचा घास हिरावती.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[14/02, 16:31] Anjali Bante Bhandara: कविता
🌹वेलेंटाइन 🌹
प्रेम व्यक्त करायला हिम्मत लागते थोडी,
म्हणून च वेलेंटाइन डे ला फुल देण्याची पध्दत असेल पडली.
एकमेकांचे रूसवे फुगवे दुर करत संसार चालू असतो,
हे प्रेम असतं मुरलेलं
निमित्त मात्र फुल देण्याचं असतं.
सणासुदीला खर्च अधिक, नको असते भरजरी साडी,
केसात एक गजरा माळला,तरी खुष होते राणी.
नको विमानाची स्वारी
नको मोटार गाडी
पावलां सोबत पाऊल टाकता, खुष होते स्वारी.
प्रत्येकाला आयुष्यात एक जोडीदार हवा असतो,
सोबत घालवलेला प्रत्येक क्षण ऐन्जोय करायचा असतो.
प्रत्येकाने आयुष्यात ले हे गोड क्षण जगावे, हे गोड क्षण अलगद स्मरणातही ठेवावे.
प्रेम असतं मनात ते व्यक्त हि करावे,
डोळ्यात ली भाषा समजण्या सर्व थोडेच्
ना बसलेले.
सौ अंजली बांते भंडारा
[14/02, 16:54] smj_Bhd_Kadav Sudhakar Baliramji, (Bhandara): स्वरचित कविता
🌹एक दिवस प्रेमाचा🌹
सगळे म्हणतायेत
आज आहे प्रेम दिवस
सख्या सांग मज
आजच्या दिवशी काय नवस
तुझं माझं प्रेम तर
दिवसेंदिवस बहरत जाते
सख्या तुझ्या मिठीत
रोज नव्याने प्रेम झाल्यासारखं वाटते
जरी दूर आहोत
आपण एकमेकांपासून
जवळ भासे मज तू
बघते जेव्हा मी डोळे मिटून
तुझं प्रेम आहे
माझा श्वास
तूच माझं हास्य
तूच सर्वपरी खास
तुझे बोलणे, तुझे हसणे
हर्षुन जाई मन
तूच माझ्या जीवाचा जिवलग
एकरूप झाले आपुले अंतर्मन
का वर्षातून प्रेम दिन
एकच दिवस असावे
नाही मर्यादा प्रेमाला कशाची
गुलाबाप्रमाणे सदैव फुलत रहावे
सौ. संगीता कढव, भंडारा
[14/02, 19:37] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आज सर्व सारस्वतांच्या कविता खूप सुंदर आहेत, सर्वांचे खूप खूप अभिनंदन👌👌🌹👍👍
उद्याचा विषय -- अपुरे स्वप्न,
या विषयावर कविता करूया,
चला तर मग भेटूया उद्या बाय🌹🙏
[15/02, 05:29] Anjali Bante Bhandara: 🕉️योगप्रभा🕉️
क्र-५
मोदक, लाडू, दुर्वा, लाल फुल अर्पण गणराया ला🙏
ग्रहण कर विद्येच्या देवता, पावसी भक्तांना.
🙏🙏🙏🙏🙏
सौ अंजली बांते भंडारा
[15/02, 06:38] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): "" *संस्कारधारा* ""(२१५)
सांगा सत्याची महती
जनांनी घ्यावी प्रचिती
गुरुदेवाचे वचन जगी
सर्वांस मिळोअनुभुती.
दनाअ, नागपूर
दि.१५/०२/२०२१
[15/02, 06:43] Meera shebe (Mahila sakhi Manch): 🌅प्रभात चिंतन 🌅
क्र.217
प्रभात झाली
निशा सरली
फुले फुलली
सजीवसृष्टी
चलायमान झाली.
सौ.मीरा शेबे भंडारा
[15/02, 06:54] +91 88550 02895: *कीलबिल 71 वे*
प्रमाणिक पूजा करावी
आपल्या कामाची
वाट न बघावी कधी
देव दर्शन देण्याची ।।
--------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[15/02, 07:18] Vina atkari: 🌻पहाटवारा🌻
आठवण तुझी सखी
मजला रोजच यावी
खऱ्या मैत्रीची विण
अशीच घट्ट व्हावी.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[15/02, 07:51] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 229 वे
वाटते मला बघत रहावे
झऱ्याचे शुभ्र कंच पाणी
कुठे अडखळते अन
झरझरते मधुर गाणी ।।
मंगला डहाके ,भंडारा
[15/02, 09:49] महिला1 Rupali Bondre: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.२२१*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*सुंदर तुझे रूप ग*
*स्वभाव आहे खट्याळ*
*लाजून तुझे बघणे*
*करते मला घायाळ*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[15/02, 10:28] Swati dayanand Shelokar: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*अपुरे स्वप्न*
अपुरे स्वप्न पूर्ण करण्यास
दिन रात मी झटणार....
स्वप्न सत्यात उतरविण्यास
मी खूप मेहनत करणार..
वय झाले म्हणून स्वप्नाकडे
नाही करणार मी दुर्लक्ष
अपुरे स्वप्नं पूर्ण करायचे
हेच असणार माझे लक्ष्य
उघड्या डोळ्यांनी बघितले
मी स्वप्न देशाच्या उत्कर्षाचे
भ्रष्टाचाराचा नायनाट करून
दिवस यावेत आता हर्षाचे..
वावरतात अजूनही स्त्रिया
रुढी परंपरेच्या बंधनात...
बेडी तोडण्याचे स्वप्न पाहिले
न्याय मिळावा त्यांना समाजात
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[15/02, 12:00] Vina atkari: बु.के.सा.सं.प.
**अपूरे स्वप्न**
स्वप्न हे कधीच
अपुरे नसतात
ते साकारण्यास
प्रयत्न लागतात.
कुणाचे सहज
होतात हो पुर्ण
कुणाचे कष्टात
आयुष्य संपुर्ण.
सर्व बघती स्वप्न
उंच उडण्याची
गवसणी घालून
दृष्टीत भरण्याची.
मानवास बुद्धीवादी
प्राणी हो म्हणतात
सदा असावं तत्पर
स्वप्न पूर्ण करण्यात.
ठेवावे स्वप्नाला
आपले कह्यात
मनाचा हव्यास
पाडते जाळ्यात.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[15/02, 13:17] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अपुरे स्वप्न--
अपुरे स्वप्न माझे
नशिबानेच राहिले
कूस सुनी करून
निराशा पदरी आले ।।
कष्ट अपार करूनी
डॉक्टर होता झाला
उत्तम माणूस, डॉक्टर
होता भारतातून पहिला ।।
कुपोषित उपचाराचे
लंडनला केले नेतृत्व
गरिबांप्रति आस्था
हृदयी होते दातृत्व ।।
आदर्श व्यक्तिमत्व
डोळा भरुन पहावे
अपुरेच स्वप्न आमचे
क्षण अन क्षण आठवावे ।।
आहेत वरद अन सिद्ध
त्यांच्यात सुख बघतो
अपुरे स्वप्न सदा आम्ही
हृदयाशीच कवटाळतो ।।
मंगला डहाके, भंडारा
[15/02, 14:03] +91 82754 71401: अपुरे स्वप्न
अपुरे स्वप्न माझे
पूर्ण कर बाळा
चांगला शिक घे कष्ट
असू दे ऊनपावसाळा.
परुभाऊ सदा म्हणायचा
चिन्मय उत्तम होणार
माणूसकी तो जपणार
साधसुध नका समजू
तो खूप शिकणार...
आपुरे स्वप्न बाळा
पूर्ण कर भाऊचे
तब्येतीची घे काळजी
बघ निट खाण्यापिण्याचे.
घे नियमित व्यायामखेळ
यातून रक्षण आरोग्याचे
कर कसून अभ्यास
स्वप्न पूर्ण कर एमबीए होण्याचे.
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[15/02, 14:11] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बी.के.सा.सं.प.
उपक्रम.. एक कविता (१९३)
*अपुरे स्वप्न*
चंचलमनाचे धारेत
पाहतो स्वप्न अपार
जिवापाड कष्टानं
करतो तया साकार.
ठेवावे स्वप्न कधी
आपले कक्षेतील
उगीच अट्टाहासे
भरारी स्वप्नातील.
आठवा थोरांचे वचन
प्रयत्नांती परमेश्वर
कौशल्याचे सामर्थ्य
ना विसंबता परस्पर.
जरी सिद्धता अशक्य
मनात खंत ठेवू नका
अपूर्ण स्वप्न पूर्णत्वास
करावा प्रयत्न बाका.
अपू-या स्वप्नासाठी
सोबत सर्वांची हवी
काळ वेळेस साधता
उगवो नशीबाचा रवी.
दनाअ. नागपूर
दि.१५/०२/२०२१
[15/02, 15:47] +91 88550 02895: *अपुरे स्वप्न*
अपुरे स्वप्न पूर्ण करण्यास
मी नेहमी प्रयत्न करणार
कामातून वेळ काढून
माझ्या स्वप्नांना देणार ।।
स्वप्न माझे खूपच छोटे
पुन्हा शिक्षण घेण्याचे
नवे काहीतरी आपल्या
आयुष्यात करण्याचे ।।
शिक्षण कुठलेही असो
वाया जात नाही
शिक्षणानेच माणूस
मोठा होत राही ।।
जीवनातील सर्व स्वप्न
पूर्ण होणार असे नसते
प्रयत्न मात्र करणं
आपल्या हाती असते ।।
--------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[15/02, 16:37] jhanjad tai: "" अपुरे स्वप्न ""
आकाशी गवसणी घालता
स्वप्नांची राखरांगोळी होता
मध्येच येती अनेक विघ्ने
मज राहिली अपुरी स्वप्ने
मनात होते भलतेच काही
योग्य दिशा मिळेच नाही
नकोच वाटे ऐसे जीणे
मज राहिली अपुरी स्वप्ने
उंची उंची ध्येय गाठण्या
खाचखळग्यातून मार्ग काढण्या
ना जमले अलगद काटे उचलणे
मज राहिली अपुरी स्वप्ने
विचार ना करी कुवतीचा
ऐपतीचा अन सामर्थ्याचा
करीत बसले मग अनुकरणे
मज राहिली अपुरी स्वप्ने
सौ रेणुका झंझाड भंडारा बेला
[15/02, 18:02] smj_Yat_Dhande Subhash Chandrabhan: स्वप्ने पूर्ण होण्यासाठी अजून स्वप्ने पाहणे ...हिच तर खरी मानव जातीची ओळख असते ....
निराशेतून आशेची किरणे झळकत जावे असे जर वाटत असेल तरी काही अपुरी स्वप्ने नक्कीच राहिली पाहिजे कारण ' ' आयुष्यात पूर्णविराम ' ' नकोच ...
🙏🙏🙏सुंदर रचना ताई 👍
[15/02, 19:55] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आज दशरथ दादा आणि सर्व ताईंच्या अपुरे स्वप्न, या विषयांवरील कविता खूप सुंदर आहेत, सर्वांचे खूप खूप अभिनंदन👌👌🌹👍👍
उद्याचा विषय-- समर्पण,
या विषयावर चारोळी करूयात,
चला तर मग भेटूया उद्या बाय🙏🌹
[15/02, 22:35] Meera shebe (Mahila sakhi Manch): वेदनेच्या पानावर....
वेदनेच्या पानावर
लिहीले अश्रूंचे अक्षर
जखमांच्या शलाका
भावनांची झाल्लर.
ओंजळीत घेऊन
वेदनेचे तप्त निखारे
थिजली पाऊले
वादळी वारे सारे.
उष्ण उसासे सोडत
काळही धावतो पुढे
मावळतीच्या वाटेवर
प्रित वेदनेवर जडे.
भोग वेदनेचे कोरले
जन्माला घेऊन सोबत
श्वास ओळखीचा झाला
ह्याच गल्लीबोळात.
अंधार उजेडाचा नाही
भांडवल पाठीशी
काळोखचं दिसतो
हसत सोबत वेदनेशी.
नाळेशी बांधून वेदना
लढाया सज्ज रणी
भकास नजरेत वेचून
विकास रूजवू जीवनी.
सौ.मीरा शेबे भंडारा
[16/02, 05:17] Meera shebe (Mahila sakhi Manch): 🌅प्रभात चिंतन 🌅
क्र.217
मोग-याचा ताटवा
फुलला अंगणी
ऑजळीत फुले घेऊन
वाहू ईश्वर चरणी.
सौ.मीरा शेबे भंडारा
[16/02, 06:09] Swati dayanand Shelokar: 🌹|| *अलगूज* ||🌹
*क्र.२३०*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सागरकिनारी वादळ येता*
*उंच नारळाचे झाडही झुकते*
*वादळाच्या तडाख्यात मात्र*
*ठेंगणे गवत आनंदाने डोलते*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[16/02, 06:12] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): "" *संस्कारधारा* ""(२१६)
विषयाचा मोह आवरूनी
करा त्याग लोभ ममतेचा
धरा संगत सदा सृजनांची
तव उदय होईल वैभवाचा.
दनाअ, नागपूर
दि.१६/०२/२०२१
[16/02, 06:37] +91 88550 02895: *किलबिल 72 वे*
देशप्रेमी यांनी बलिदान
दिले आपल्या प्राणाचे
अभिमान वाटतो आम्हा
आपल्या भारत देशाचे ।।
------–-----------------------
पुनम डहाके, भंडारा.
[16/02, 07:12] Vina atkari: 🌺पहाटवारा🌺
जन्म दिला मातेने
प्रेम केलं पित्याने
वृध्दपणी द्याआधार
पुत्र या नात्याने.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[16/02, 07:15] Anjali Bante Bhandara: 🕉️योगप्रभा🕉️
क्र-६
पहाटे प्राजक्ता परि उमलून
निशीगंधा परि पसरावे,
अश्रु असावेत कुणाचेही
आपण विरघळून जावे.
🙏🙏🙏🙏🙏
सौ अंजली बांते भंडारा
[16/02, 07:43] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 230 वे
आयुष्य ध्येय गाठण्यास
सदा आव्हान स्वीकारावे
संघर्ष करुनिया अपार
सुखदुःख आनंदे झेलावें ।।
मंगला डहाके, भंडारा
[16/02, 07:46] Nanda Bhoyar: पंढरीच्या वाटेने
टाळांचानाद
सावळा विठू माझा
मला घालीतो साद
. नंदा भोयर
[16/02, 08:25] महिला1 Rupali Bondre: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.२२२*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*कळी उमळातच सुगंध*
*दरवळते संपूर्ण अंगण*
*गंध वेडे मन माझे*
*होते अलगद प्रसन्न*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[16/02, 10:21] Swati dayanand Shelokar: *चारोळी*
*समर्पण*
देशसेवेसाठी सैनिक
करतो आयुष्य समर्पण
तन मन धन सारे काही
करतो देशासाठी अर्पण
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[16/02, 11:17] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी
विषय-- समर्पण
आपल्या देशाचे सैनिक
समर्पण करतात आयुष्याचे
प्राणाची पर्वा न करता
रक्षण करतात भारताचे ।।
मंगला डहाके ,भंडारा
[16/02, 11:28] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बी.के.सा.सं.प.
उपक्रम.. एक चारोळी
*समर्पण*
वडिलांचे वज्र संघर्ष
आईच्या समर्पणात
मायेच्या पाखळणाने
कुटुंब दिसं संस्कारात.
दनाअ, नागपूर
दि.१६/०२/२०२१
[16/02, 11:34] Anjali Bante Bhandara: चारोळी
*समर्पण*
संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी अभंगा द्वारे समाज प्रबोधन करत केले आयुष्य समर्पण,
गाथा बुडविल्या तरि सर्व मुखपाठ म्हणून भक्तांनी केले भाव अर्पण. 🙏
सौ अंजली बांते भंडारा
[16/02, 12:21] Vina atkari: बी.के.सा.सं.प.
""एक चारोळी""
**समर्पण**
सिंधूताई सपकाळने घेतला
सामाजसेवेचा मनात ध्यास
जिवन समर्पण करून देशा
बनली अनाथाची माय खास.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[16/02, 13:29] +91 98503 02639: समर्पण
समर्पण असावेत हसमुख
काळीज हळुवार देतांना
ना कळावे अगदी कुणालाही
त्याग आपण निस्वार्थ करतांना
वैशाली टिचुकले यवतमाळ .
[16/02, 13:58] +91 88550 02895: *समर्पण*
देशप्रेमी यांनी समर्पण
दिले आपल्या प्राणाचे
अभिमान वाटतो आम्हा
आपल्या भारत देशाचे ।।
------–-----------------------
पुनम डहाके, भंडारा.
[16/02, 14:46] jhanjad tai: "" समर्पण ""
माप ओलांडून दारात
झाले नवीन सुनेचे पदार्पण
मायेच्या माणसांना सोडून
केले सासरच्या घरी समर्पण
सौ रेणुका झंझाड भंडारा बेला
[16/02, 15:04] संपर्क-5 Ranjana halamare: चारोळी
समर्पण
[16/02, 15:10] संपर्क-5 Ranjana halamare: चारोळी
समर्पण
समर्पित असावा भाव
करावे देशाचे रक्षण
अर्पून अपुले
तन, मन धन
रंजना हलमारे
साकोली.
[16/02, 17:12] +91 82754 71401: चारोळी
समर्पण
जे लढले देशासाठी
थोर पुरूष अपुले
समर्पूनी जीवन त्यांनी
म्हणून थोर झाले..
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[16/02, 20:51] Nanda Bhoyar: नव्या घरी नव्या दारी
सासरी केले मी पदार्पण
माहेरची माणसं सोडून
सासरी केले समर्पण
नंदा भोयर
[17/02, 06:01] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): *संस्कारधारा*(२१७)
नंदनवन फुलेल घरचा
बन प्रेमपुजारी त्याचा
देव फक्त भक्तीभावाचा
बोल ऐक रे गुरूदेवांचा.
दनाअ, नागपूर
दि.१७/०२/२०२१
[17/02, 06:07] Swati dayanand Shelokar: 🌹|| *अलगूज* ||🌹
*क्र.२३१*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*चंद्र आणि तार्यांनी*
*सजलेली दिसते रात्र*
*अवनीस हसविणारा रवी*
*रोज येतो दिवसा मात्र*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[17/02, 06:45] +91 88550 02895: *किलबिल 73 वे*
आलेल्या आव्हानाचा
हसून स्विकार करावे
पुन्हा पुन्हा जोमाने
आपल्या कामाला लागावे ।।
---------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[17/02, 07:06] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 231 वे
वृक्षवेलीं न्याहाळती
अवनीचे हे नटणे
वाराही झोके घेतो
पाचू ,मोत्यांचे लेणे ।।
मंगला डहाके ,भंडारा
[17/02, 07:50] Nanda Bhoyar: सुंदर हे जीवन
आनंद लुटूया
दिवस भरातनं थोडा वेळ
तरी ग्रुप वर भेटूया
. नंदा भोयर
[17/02, 07:59] Anjali Bante Bhandara: 🕉️योगप्रभा 🕉️
क्र-७
ढगाळ वातावरण, सरी
वाट बघताहे बरसायला, रवी ने मात्र ढगा आडुन सुरवात केली प्रकाश पसरवायला.
सौ अंजली बांते भंडारा
[17/02, 09:57] महिला1 Rupali Bondre: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.२२३*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मैत्रीत हवा पूर्ण विश्वास, सोबत
तयारी संकटात साथ देण्याची
काय मजाल अदृश्य शत्रूची
समोर येवून वार करण्याची
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[17/02, 10:02] Vina atkari: 🌻पहाटवारा🌻
जिवन संघर्षमय आहे
मला स्पर्धा जिंकायचं
स्वतः मनाशी ठरवलं
मगच समोर चालायच.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[17/02, 11:43] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उपक्रम-- चित्र चारोळी
ओंजळीतले स्वप्न घेऊन
प्रगतीच्या दिशेने बघती
गरुडझेप घेता आकाशी
खग स्वार पंखावरती ।।
मंगला डहाके, भंडारा
[17/02, 13:25] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बी.के.सा.सं.प.
उपक्रम.. एक चित्र काव्य (१९४)
*शक्तिशाली गरूड*
गरूड आहे शक्तिशाली
पायाची नखे टोकदार
भक्षाच्या अंगात खोचून
बघा उडतांनाचा थरार.
सर्प गरूडाचा आवडता
भक्षास अलगद उचलतो
अवघ्या काही क्षणातच
उंच आकाशात झेपावतो.
पायात सर्पभक्ष पकडून
गरूड आकाशी उडाला
एक छोटा पक्षी पाठीवर
बसून उडाणा विसंबला.
भक्ष काहीही करता
पायातून सुटत नाही
इच्छीत जागी बसून
दूर दुष्मनांना पाही.
बलवान गरूड पक्षी
इतर पक्षांस सावरतो
इवले पाठीवर बसवून
आकाशाची मजा देतो.
दनाअ, नागपूर
दि.१७/०२/२०२१
[17/02, 14:24] संपर्क-5 Ranjana halamare: चारोळी
गरुड उडे आकाशी
सवे घेवुनी भक्ष
ख ग ही बसला पाठीवर
चहूकडे त्याचे लक्ष
रंजना हलमारे
साकोली.
[17/02, 14:31] +91 88550 02895: चित्र चारोळी
भक्ष शोधण्यास गरुड
उंच गगनात झेप घेतो
पिल्लाला पाठीवर बसवून
उडण्याचे शिक्षण देतो ।।
--------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[17/02, 15:49] +91 70206 05767: चित्र चारोळी
निघाली गरूड स्वारी
घेवुन अपुले भक्ष्य
सोबतीला असे खग
करी स्वछंद विहार
सौ. नंदा चेटुले भंडारा
[17/02, 16:18] संपर्क-4 Prtibha Sopan Vatha: चारोळी उपक्रम
पकडून सर्प भक्ष्य पायात
पाठीवर खगास घेत
पक्षीराज गरुड उडे
उंच निळ्या आकाशात
सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
खामगाव.जि.बुलडाणा
दि..17.02.2021
[17/02, 16:22] +91 98503 02639: चित्रचारोळी
गरुडाला पाहूनी वाटे
पिलाला कसे पेलवी
उंचावरुन ना वाटे भिती
भक्ष्याच्या शोधात फिरवी
वैशाली टिचुकले यवतमाळ.
[17/02, 16:35] Nanda Bhoyar: पाठीवर पिलाला बसविले
भक्ष शोधण्या गरुड निघाले
उंच आकाशात झेपावले
पायात सर्पाला घेतले
नंदा भोयर
[17/02, 17:06] +91 82754 71401: चित्रचारोळी
शोधाया भक्ष्य गरुड
उंच गगनभरारी
उडण्याचे शिक्षण देऊन
बसवून पिल्लू पाठीवरी.
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[17/02, 17:07] Anjali Bante Bhandara: चित्र चारोळी
पक्षी राज गरूड, तीक्ष्ण नखे, चोच भारी, डोळे तेजस्वी,
पाठीवर ती पीला सवे लांबूनच भक्ष शोधी. सोबतीला सर्प शिदोरी.
सौ अंजली बांते भंडारा
[17/02, 18:52] Vina atkari: बी के सा.सं.प.
उपक्रम..एक चित्र कविता
"" *गरूड राज* ""
गरूड घेतो रोज भरारी
सोबत पक्षी राज स्वारी
सतत नजर ठेवी खाली
पिल्लांवरती प्रेमच भारी.
गरूडराज घेऊन झेप
गवसणी घाली नभास
बारीक नजर ठेवतोय
शत्रुंचा डाव शोधण्यास.
गरूड अन्न शोधण्यास
उड्डाण भरतो आकाशी
इकडे तिकडे भटकून
भक्ष बनवितो सापाशी.
प्रारब्धाचा लेखा जोखा
विठ्ठल भक्त झाला खास
अशी तयाची थोर पुण्याई
दाराशी उभा विठूमंदीरास.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर
[18/02, 06:13] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): "" *संस्कारधारा* ""(२१८)
हो सावध जीवनी
या सकळ मैदानी
जागा कर्तव्याला
गावाला सुधारुनी.
दनाअ, नागपूर
दि.१८/०२/२०२१
[18/02, 06:41] Meera shebe (Mahila sakhi Manch): 🌅प्रभात चिंतन 🌅
क्र.218
पूर्व क्षितिजावर भानू
पसरवी किरणांची जादू
तेजाळली वसुंधरा सारी
त्याच्या दातृत्वाला वंदू.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[18/02, 07:10] Vina atkari: 🌺पहाटवारा🌺
सद्गुरुंच्या चरणी लाभे
आम्हा सौख्य समाधान
असावी मनात दृढ श्रद्धा
अन्ओठी श्रीचे गुणगान.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[18/02, 07:15] Swati dayanand Shelokar: 🌹|| *अलगूज* ||🌹
*क्र.२३२*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*दाटून येतील ढग आकाशी*
*पोशिंद्याला सदा ही आशा*
*जमीनदोस्त पिके बघताना*
*होते त्याची किती रे निराशा*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[18/02, 07:40] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 232 वे
स्वामी अंतर्ज्ञानी देवा
वाहते तन मन धन
श्रद्धा स्वीकारा पामराची
दर्शनाची मज तहान ।।
मंगला डहाके ,भंडारा
[18/02, 08:02] संपर्क-4 Prtibha Sopan Vatha: 🌹मंगल प्रभात🌹
दृढ विश्वास संयमाची
परीक्षा असे जीवनाची
सदगुरू असता पाठीशी
तमा नसावी कशाची
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ.प्रतिभा सोपान वाठ (गरबडे)
[18/02, 08:03] Nanda Bhoyar: नमत घेतलं तर
लहान होत नाही
उर्मट पणाने
महान होत नाही
नंदा भोयर
[18/02, 09:22] Anjali Bante Bhandara: 🕉️योगप्रभा🕉️
क्र-७
नदीचे विहंगम दृश्य
काठावर मंदिर साईनाथांचे,
नाथ माझे सद्गुरू
स्थान श्रध्दे चे.
🙏🙏🙏🙏🙏
सौ अंजली बांते भंडारा
[18/02, 10:00] महिला1 Rupali Bondre: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.२२४*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*शेगांव ची गुरू माऊली*
*भक्तांची ती सावली*
*दुःखाचा कैवारी*
*संकटाते रक्षण करी*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[18/02, 11:02] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बी.के.सा.सं.प.
उपक्रम.. एक कविता (१९५)
*तुझे नाम स्मरता देवा*
तुझे नाम स्मरता देवा
पळून जाई क्षिण सारा
देवघरातला निरांजन
प्रकाशीअवघ्या मंदिरा.
तुजविण नाही रे दुजा
नातीगोती सर्व पसारा
नाही कुणीच कुणाचे
ईश्वरनामं जीवनतारा.
तुझे नाम स्मरता देवा
अधिक मज काय हवे
शेवट क्षणी तुझे नाम
मुखात चिंतनी रहावे.
या परी ना पुण्य दुजे
लाभो माझे भाग्याला
आसक्ती विरून गेली
विरक्त जीवन पावला.
मानवा असु दे जाणीव
करावं स्वकर्म परिक्षण
आपण आपलाची गुरू
ओळखून घ्यावे लक्षण.
दशरथ अतकरी
नागपूर
दि.१८/०२/२०२१
[18/02, 11:43] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नाम तुझे स्मरता देवा --
नाम तुझे स्मरता
देवा मिळे समाधान
चरणी टेकता माथा
क्षणी दिसतो तू छान ।।
गळा हार ,फुले,नैवद्य
चढवून अर्पिते भक्ती
तू जगाचा शिलेदार
दे जगण्याची शक्ती ।।
माझ्या हातून घडु दे
सेवा दीन दुबळ्यांची
अनाथ न राहो कुणी
पोट भरी भुकेल्यांची ।।
दुःख देशी तू रे देवा
बळ दे सोसण्याचे
जळी ,तळी, पाषाणी
बालकात तू दिसण्याचे ।।
स्वामी अंतर्ज्ञानी देवा
वाहते तन, मन ,धन
श्रद्धा स्वीकारा पामराची
दर्शनाची मज तहान ।।
मंगला डहाके ,भंडारा
[18/02, 12:31] Nanda Bhoyar: नाम तुझे स्मरता देवा
नाम तुझे स्मरता देवा
दुःख माझे हरते
येणारे विध्न माझ्यावर
क्षणात मागे सरते
अवतीभवती माझ्या
सहवास तुझाच असते
तुझ्या मुर्ती विना
मंदिर सुने दिसते
तुच करता आणि करविता
हा खेळ सारा तुझा
देवा तुझ्या विना
नाही जीवनात मजा
माझे काहीच नसुनी
तुझेच सर्व आहे
कुणी सांगावे या मानवाला
तुझं विन सर्व व्यर्थ आहे
नंदा भोयर
[18/02, 14:18] jhanjad tai: "" तुझे नाम स्मरता देवा ""
तुझे नाम स्मरता देवा
मन होई शांत
तुझ्याच ठाई वसे
विश्व हा अनंत
वेदना मज होती तेव्हा
ओठांवर तुझेच नाव
भक्तिरसात तल्लीन
चरणांवर माझा देह
आठविता तुझी स्मृति
मम पूर्ण कार्यसिद्धी
आशिर्वाद राही सदा
आम्हावरी कृपादृष्टी
रचियता अन निर्माता
तुच असे दृष्टिदाता
सत्कर्म घडो मज हस्ते
हेच मागणे भगवंता
सौ रेणुका झंझाड भंडारा बेला
[18/02, 14:36] jhanjad tai: "" तुझे नाम स्मरता देवा ""
तुझे नाम स्मरता देवा
मन होई शांत
तुझ्याच ठाई वसे
विश्व हा अनंत
वेदना मजला होता
ओठांवर तुझेच नाव
भक्तिरसात तल्लीन
चरणांवर माझा देह
आठविता तुझी स्मृति
मम पूर्ण कार्यसिद्धी
आशिर्वाद राही सदा
आम्हावरी कृपादृष्टी
रचियता अन निर्माता
तुच असे दृष्टिदाता
सत्कर्म घडो मज हस्ते
हेच मागणे भगवंता
सौ रेणुका झंझाड भंडारा बेला
[18/02, 14:51] Vina atkari: बी.के.सा.सं.प.
*तुझे नाम स्मरता देवा**
तुझे नाम स्मरता देवा
मना वाटते समाधान
प्रपंच भार वाहताना
ओठी हरीचे गुणगान.
तुझे रुप चित्ती राहो
मुखी तुझे गोड नाम
होता तव चरण स्पर्श
पुर्ण होई अपुलं काम
कामधंदा करतांना
परमार्थ तो साधावा
हरीचे स्मरण करता
चरणी लीन व्हावा.
रामकृष्ण हरी विठ्ठल
केशवा जपतोय मंत्र
सर्व चिंता होतील दुर
सुखाचा तो येईल पुर.
अमृता समान आहे
भजन श्री विठ्ठलांची
मरगळ जाता निघून
आस ईश्वर दर्शनाची.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[18/02, 15:37] smj_Bhd_Kadav Sudhakar Baliramji, (Bhandara): कविता
🙏तुझे नाम स्मरता देवा🙏
नाम स्मरता देवा तुझे
होई दुःखाचे हरण
दोन्ही कर जोडून तुला
करते मनापासून नमन
नाम असावे मुखी तुझे
घडो सत्कर्म सदा या हाताने
अनाथांचा नाथा कर कल्याण
सर्वांचे तुझ्या कृपादृष्टीने
नाम स्मरता देवा तुझे
कमी होई मनातील भीती
तुझ्या आशीर्वादाने सुखी आहोत
आभार मानू तुझे किती
जेव्हा जेव्हा दिली तुला हाक
प्रत्येक हाकेला आला तू धाऊन
केली माझ्यावर प्रेमळ कृपा
संकटातून तारून
तूच करता तूच करविता
तरी मानवा किती घमंड
विसर पडलाय सत्यतेचा
कवडीमोल सारा पाखंड
खाली हात आलो
खाली हातानेच जायचे
शेवटच्या क्षणी मुखात
असावे देवा नाम तुमचे
सौ. संगीता कढव, भंडारा
[18/02, 15:40] Anjali Bante Bhandara: कविता
*नाम तुझे स्मरता देवा*
नाम तुझे स्मरता देवा
चित्त शांत होई,
मनी दुख्ख आले असता
तुझेच नाव घेई.
नाम तुझे स्मरता देवा
घरी सुख शांती लाभे,
हळुच डोळे मिटता देवा
सामोरे तुच उभा राहे.
सुखातही तुच कर्ता देवा
दुखातही तुझीच आस
जरी नाते अनेक असता
तुच माझा मायबाप.
तुझ्या चरणी अर्पिते मी
अल्पशी ही सेवा
भाव माझ्या मनीचा हा
ग्रहण करा देवा🙏
सौ अंजली बांते भंडारा
[18/02, 17:01] +91 98503 02639: नाम तुझे स्मरता देवा
नाम तुझे स्मरता देवा
चैतन्य हृद्यात वाही
मुखावर समाधानाचे
चैतन्य खुलत राही
नाम तुझे स्मरता देवा
कठीण मार्ग सोपा होई
मार्गातील काटेगोटे
सहज दूर पळून जाई
नाम तुझे स्मरता देवा
सुगंध पसरे आसमंती
ज्ञानसाधना करुनी
करु संतांची संगती
नाम तुझे स्मरता देवा
धन्यता वाटे ध्यानीमनी
ध्यान सदैव राहता तुझे
तल्लीन आनंदानी भजनी
वैशाली टिचुकले यवतमाळ .
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[18/02, 17:03] +91 82754 71401: नाम तुझे स्मरता देवा
नाम तुझे स्मरता देवा
प्राप्त समाधान
नतमस्तक चरणी तुझ्या
आशिर्वाद छान..
हळदकुंकू बुक्का शेंदूर
लावूनी देवा तुजला
जग्दाता अमुचा तू रे
सद्बुद्धी दे मजला..
सुविचार खाण बनू दे
हातून माझ्या
दीनांची सेवा घडू दे
पाया पडते मी तुझ्या ..
शाळा आणि घरदार
सांभाळण्याचे बळ तू दे
शासनाचे आव्हाने रे
पेलवण्याची हिंमत दे..
सकारात्मक उर्जा मला
खूप दे बा गजानना
तुझी भक्त भोळी रे मी
मला थोडं आवर ना.
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[19/02, 06:24] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): "" *संस्कारधारा* ""(२१९)
यवनांच्या बेडीमधून
सोडविण्या जन्मला
शिवनेरीचा आसमंत
ढोल नगारेंनी गर्जला.
दशरथ नारायणराव अतकरी
नागपूर
दि.१९/०२/२०२१
रयतेचे राजे क्षत्रीय कुलभूषन *शिवछत्रपती शिवाजी महाराज* यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🙏🙏🙏
[19/02, 07:23] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 233 वे
रवी राजाची तेजस्वी किरणे
नदीच्या अंतरी सुंदर प्रतिबिंब
प्रकाशाचा तप्त तांबडा गोळा
प्रेमभरे पाण्याला घेतसे चुंब ।।
मंगला डहाके, भंडारा
[19/02, 08:11] Anjali Bante Bhandara: 🕉️योगप्रभा🕉️
क्र-८
अवकाळी पावसाने
स्रुष्टि हि न्हावुन निघाली,
रविराजा च्या आगमनाने
अवनी ला उब मिळाली.
🙏🙏🙏🙏🙏
सौ अंजली बांते भंडारा
[19/02, 08:54] Vina atkari: 🌺पहाटवारा🌺
एकादशी सोहळा
रंगला पंढरपुरात
वैष्णव टाळमृदंगा
झाले दंग भजनात.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[19/02, 09:29] Nanda Bhoyar: जय शिवाजी
आई भवानीचा आशिर्वाद घेऊनी
झाले शिवबा घोड्यावर स्वार
शत्रु दिसता तलवार काढूनी
केला चातुर्याने वार
नंदा भोयर
[19/02, 12:52] +91 98503 02639: छत्रपती शिवाजी महाराज
💐💐💐💐💐💐💐💐
शिवाजीची असे | फार मोठी कीर्ती |
महान ही मूर्ती |कीर्तीवंत ||१||
मराठेशाहीची |आण बाण शान|
मराठ्यांचा मान | महाराज ||२||
सकल धर्माचा| पालनपोषक|
होईल पालक |प्रजादक्ष ||३||
छत्रपती म्हणे |या शिवरायास|
नमन कार्यास |असे त्यांच्या||४||
गुणवंत असे |राजा शिवराय|
स्त्रीला मानी |माय जगताच्या ||५||
गुण शोधक हो| असा राज्यकर्ता |
येईल हेरता |राजास हो||५||
शत्रू थरथर |कापती राजास|
प्रचिती सर्वांस| राजाची हो||६||
लहानथोरांची |असे शुध्द जाण|
न्याय करी छान| पाही जन||७||
गड किल्यांची हो |विशेष माहिती |
कुणी ना जाणती |सर्वज्ञ हे||८||
चापल्याची नसे |काही कुठे कमी|
संस्काराची हमी |राजामध्ये||९||
गनिमी काव्यात |अग्रेसर राजा
करु गाजावाजा |कर्तृत्वाचा||१०||
संत महंतास| मनातुन मानी |
थोतांड ना ध्यानी |राजाच्या हो||११||
जाणता तो राजा| प्रजाहितदक्ष |
प्रजेवरी लक्ष |पुरविशी||१२||
जिजाऊने दिला| पुत्र महाराष्ट्रा|
सौभाग्य हे राष्ट्रा |कीर्तीमान ||१३||
वैशाली टिचुकले यवतमाळ .
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[19/02, 13:26] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बी के.सा.सं.प.
उपक्रम.. *छत्रपती शिवाजी महाराज*
जयंतीनिमित्त
विषय.. स्वाभिमान
शिर्षक
.. *जाणता राजा* ..
रयतेच्या सुखास
स्वराज्य काजास
वंदन शिवाजींना
जाणता राजास.
परकिय सत्तेस
जेरीस आणले
मराठीचे भूमीत
त्यांनाच गाडले.
महिलांची अब्रु
शेतातील पिक
ना हात लावणे
ही सैन्यास शिक.
कडक शिस्तीचे
दिलेल्या शब्दांचे
गद्दारांना शिक्षा
राज्य ते न्यायाचे.
प्रसंगास पाहता
तहास बोलायचा
गाफील असता
हल्ला ठोकायचा.
दशरथ अतकरी
नागपूर
दि.१९/०२/२०२१
[19/02, 14:15] +91 82754 71401: स्वाभिमान
शूर शिवबा होऊन गेले
महाराष्ट्राची आन,बाण
शान
सिंहासमान निधडी छाती
वृत्ती बाणेदार जागृत स्वाभिमान.
सौ.सुषमा .पडोळे
[19/02, 14:46] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शिवजयंतीनिमित्त
विषय-- शिवाजी महाराज
19 फेब्रू.ला सुवर्ण दिन उगवला
वाघापरी शिवाजी जन्मला
माता जिजाऊंना गुरु मानून
त्यांच्या पावलावर चालला ।।
मातेचे लाभले थोर संस्कार
लाचारीने नाही झुकला
शूर-वीर शिवबा राष्ट्राचा
स्वराज्य मातीसाठी लढला ।।
शिवाजीवर विश्वास फार
रयतेचा अन शत्रुंचा ही
चारित्र्य सूर्यप्रकाशासारखे
स्वच्छ अन तेजस्वी ही ।।
संघटित करूनी मावळे
गडावर गड जिंकले
गुलामगिरी मोडून काढता
परस्त्रीला आई म्हंटले ।।
शिवरायांची प्रेरणा आहे
देशासाठी चारही धाम
छत्रपतीं शिवाजी महाराजांना
माझा कोटी कोटी प्रणाम ।।
मंगला डहाके, भंडारा
[19/02, 14:54] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चित्र चारोळी
विषय-- शिवाजी महाराज
19 फेब्रुवारी या सुवर्ण दिनी
वाघापरी शिवाजी जन्मला
मावळे सारे संघटित करून
स्वराज्य मातीसाठी लढला ।।
मंगला डहाके, भंडारा
[19/02, 15:25] Mate Gajanan (T): *पुन्हा एकदा..या भूमीवर छत्रपतिंनी यावे*
मातृभूमिच्या कणाकणाने
नाव शिवाजी घ्यावे..
पुन्हा एकदा या भूमीवर
छत्रपतिंनी यावे..!
शेतशिवारी ऐकू येते
पिकांची करूण कहाणी..
बांधधु-याच्या डोळ्यांमध्ये
झरते आहे पाणी..
आनंदाची पेरुन बिजे
त्यातून हसू उगवावे..!
पुन्हा एकदा या भूमीवर
छत्रपतिंनी यावे..
हतबल होतो 'राम' येथे
अब्रु सितेची जाताना..
न्यायाचा गुदमरतो श्वास
शपथ गीतेची देताना ..
कडेलोट हो अन्यायाचा
न्यायाचे बुरुजं बांधावे..
पुन्हा एकदा या भूमीवर
छत्रपतिंनी यावे..!
केविलवाणी प्रजा बिचारी
बघते 'राजे'..'शाही'..
दिल्लीचेही तख्त बोलके
रस्ते देतील ग्वाही..
लोकशाहीच्या दरबाराने
गीत समतेचे गावे...
पुन्हा एकदा या भूमीवर
छत्रपतिंनी यावे..!
वचननामा,जाहीरनामा
साऱ्या हवेत बाता..?
भुलथापीच्या तेलाने का
उजळून येती वाता..?
विश्वासाचा उजेड आता
शिवतेजाने द्यावे..
पुन्हा एकदा या भूमीवर
छत्रपतिंनी यावे..!
जाती-धर्म,पंथ-पक्षाच्या
तोडून अवघ्या बेड्या..
मानवतेची मोट बांधू
मावळ्यांस घेऊन वेड्या..
जल,जमीन, जंगलांमध्ये
शिवराज्य हे नांदावे..
पुन्हा एकदा या भूमीवर
छत्रपतिंनी यावे..!
- गजानन मते
[19/02, 15:44] Vina atkari: बी.के.सा.सं.प.
*शिवाजी महाराज*
स्वाभिमानी बाणा
माझ्या शिवबाचा
वसा घेतला त्यानं
स्वराज्य स्थापनेचा
जाणता तो राजा
असा महाराष्ट्राचा
थोर महिमा त्यांचा
मुलगा जिजाऊचा.
शिवराय करत असे
भवानी देवीची भक्ती
प्रसन्न होऊन मातेनी
दिधली तलवार हाती.
शिवरायांच्या नावाने
शत्रूस सुटे थरकाप
फिरवी चौफेर नजर
सदा दुष्मनावर छाप.
बघता ते तेजस्वी रूप
झुकताती सर्व नजरा
तुम्हां जन्मदीनी राजे
करतेय मानाचा मुजरा.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[19/02, 19:01] jhanjad tai: "" शिवाजी महाराज ""
रयतेचा राजा शिवाजी महाराज
हालवून सोडले मोगल साम्राज्य
भारी निपुण गनिमी काव्यात
स्थापून दाविले हिंदवी स्वराज्य
कर्तव्यकठोर कुशाग्र बुध्दीमत्ता
जातपात भेदभाव ना धर्माचा
मन कनवाळू अंगी शालीनता
जाणता राजा सर्व लोकांचा
शक्तीपेक्षा श्रेष्ठ युक्तिन
पलायन केले आगर्याहून
पोटात वाघनखे घालून
वधला कपटी अफझलखान
कुणा भिक ना याचना
स्वाभिमानी कणखर बाणा
सन्मानाची वागणूक स्त्रियांना
परत केल्या मुस्लिम सुना
स्वाभिमान त्यांचा असे मजला
ऐसा नृप कुठे ना दिसला
अशा थोर महान राजाला
त्रिवार वंदन जयंतीला
सौ रेणुका झंझाड भंडारा बेला
[19/02, 20:05] +91 98503 02639: पोवाडा
धन्य धन्य जिजाऊ माता हाऽऽऽऽऽऽ
शिवजन्माने धन्य कूस होता
असा पराक्रम शिवबाने हो केला
कीर्ती काय गाऊ जिजामातेची हो जी रं
देशात माजला होता हाहाकार
जिजामाता विद्युल्लता होती प्रखर
पुत्रासी घडविले तिने कणखर
म्हणूनच जिजाऊस कोटी कोटी वंदन हो जी रं
मातेवत घडले शिवबा उच्च कोटीचे
आयुष्याचे दान वाहिले भूमातेस
कार्य केले त्यांनी निष्ठेने सरस
कार्याची प्रेरणा मिळो आपणास हो जी रं
काय होते त्यांचे सखे सोबती मावळे
त्यांच्या करिता दिली प्राणाची आहुती
सर्व धर्माच्या सोबत्यास असे स्वीकृती
सोबती होते त्यांचे कर्तबगार हो जी रं
वैभव दिले महाराष्ट्रास परत मिळवूनी
प्रजेस सुख दिले काढूनी काळोखातुनी
अन्यायी राजांचे राज्य संपुष्टात आणुनी
तेजमय प्रकाश टाकला उजोळोनी हो जी रं
वैशाली टिचुकले यवतमाळ .
----------------
support@prodatadoctor.com
----------------
[19/02, 20:18] +91 88550 02895: *शिवाजी राजा*
शिवाजीराजा चे पस्तीस वर्षात
कर्तृत्व खासच अलौकीक
धर्म रक्षक होता जनतेचा
इतिहासात झाल नावलौकिक ।।
-------------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[20/02, 05:40] Meera shebe (Mahila sakhi Manch): 🌅प्रभात चिंतन 🌅
क्र.220
आली थंडीची लाट
गारठली ओली पहाट
सारी दडून बैसली
पशू पक्षी घरट्यात.
.सौ मीरा शेबे भंडारा.
[20/02, 06:14] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): "" *संस्कारधारा* ""(२२०)
मार्गी लावाया
दुष्ट दुर्जनांना
हृदयास धरतो
नेक सज्जनांना.
दनाअ, नागपूर
दि.२०/०२/२०२१
[20/02, 06:34] +91 88550 02895: *किलबिल 74 वे*
पंढरीच्या सावळ्या विठ्ठला
तुळशीपत्र वाहते तुला
निस्वार्थ सेवा करायला
दोन्ही हातात बळ द्या मला ।।
------------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[20/02, 07:16] Anjali Bante Bhandara: 🕉️योगप्रभा🕉️
क्र-९
दर्याखोर्या पर्वत रांगां
वनराई ही फुलली,
शिवरायांच्या जन्मोत्सवात शिवनेरी दुमदुमली.
सौ. अंजली बांते भंडारा
[20/02, 07:23] +91 82754 71401: *प्रभातपुष्प १९५वे*
प्रभातसमयी
जावे फिरावयास
शुद्ध हवा
मिळे तयास
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[20/02, 07:33] महिला1 Rupali Bondre: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.२२५*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*मर्द मावळे शिवबाचे धीट*
*मरण आले तरी बेहत्तर*
*जबाबदारी टाकून न पळता*
*शत्रूला देई थेट उत्तर*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[20/02, 07:37] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 234 वे
स्पर्धा नको कुणाशी
अस्तित्व स्वतः निर्मावे
जीवनात कष्ट करता
यशाचे फळ पहावे ।।
मंगला डहाके ,भंडारा
[20/02, 07:40] Vina atkari: 🌻पहाटवारा🌻
हिमालय पर्वतावरून
गंगेचा झालाय उगम
स्वच्छंद पळत निघाली
जशी शांत संथ निर्गम.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[20/02, 08:02] Swati dayanand Shelokar: 🌹|| *अलगूज* ||🌹
*क्र.२३४*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*लुकलुकत्या चांदण्यांच्या गर्दीत*
*आकाश चमकताना दिसते*
*चमचम करणारी चादरच*
*जणू पांघरलेली मज भासते*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[20/02, 08:14] Nanda Bhoyar: निळ्या निळ्या आकाशात
लुकलुकणारे तारे
वाहू द्या ग्रुप वर
लिखाणाचे वारे
नंदा भोयर
[20/02, 10:25] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बी.के.सा.सं.प.
उपक्रम.. एक चारोळी
*स्वाभिमान*
स्वाभिमान वाटतो मला
मराठी काव्य करण्याचा
झटपट शब्दांना जुळवून
बी.के.मंचात टाकण्याचा.
दनाअ, नागपुर
दि.२०/०२/२०२१
[20/02, 11:28] Swati dayanand Shelokar: *चारोळी*
*स्वाभिमान*
छत्रपती शिवरायांनी शिकविले
आम्हा काय असतो स्वाभिमान?
मराठी मातीत जन्म घेतला
याचा आहे आम्हा अभिमान
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[20/02, 12:01] +91 98503 02639: चारोळी
शुरवीरांमध्ये नसे कमी
धाडस अन् स्वाभिमानाची
देशापुढे ना कळे काहीही
केवळ काळजी देशाभिमानाची
वैशाली टिचुकले यवतमाळ .
[20/02, 12:02] महिला1 Rupali Bondre: *स्वाभिमान...*
*मातृभाषा आपला स्वाभिमान*
*मराठी मध्ये बोलून वाढवा मान*
*साहित्य निर्मितीतून होई सन्मान*
*बाळगतो आम्ही सार्थ अभिमान*
*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[20/02, 13:39] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी
विषय-- स्वाभिमान
स्वाभिमान भारत देशाचा
प्रत्येक व्यक्तीला असावा
समृद्ध आणि संपन्न अशा
भारतात एकोपा जपावा ।।
मंगला डहाके ,भंडारा
[20/02, 14:25] +91 82754 71401: *स्वाभिमान*
स्वाभिमान वाटे मज
माझ्या मराठीचा
साजशृंगार अलंकार
छंद जडलाय तिचा.
सौ.सुषमा पडोळे भंडारा
[20/02, 15:22] Nanda Bhoyar: स्वाभिमान
स्वाभिमान मला
माझ्या ग्रुपचा
त्यांच्यामुळेच मीळतो
मान लिहिण्याचा
नंदा भोयर
[20/02, 16:16] संपर्क-5 Ranjana halamare: चित्र चारोळी
स्वाभिमान
स्वाभिमान भारत देशाचा
स्वाभिमान मज महाराष्ट्राचा
स्वाभिमान मज मराठीचा
स्वाभिमान मज मराठी साहित्याचा
रंजना हलमारे
साकोली.
[20/02, 17:17] Madhuri Devendra Bhute: चारोळी
स्वाभिमान
लाचलुचपत न घेता
स्वाभिमानाने जगणे
नोकरी करताना अपेक्षा
न ठेवता प्रामाणिक वागणे.
माधुरी
[20/02, 17:32] Vina atkari: बी.के.सा.सं.प.
""एक चारोळी""
**स्वाभिमान**
जगणं म्हणजे जगणं नसावं
गंध दरवळावा स्वाभिमानाचा
सुगंधीत होईल जिवन अपुलं
कळस चढावा स्वकर्तृत्वाचा.
सौ.विणा द.अतकरी.
नागपूर.
[20/02, 23:40] smj_Bhd_Kadav Sudhakar Baliramji, (Bhandara): एक चारोळी==स्वाभिमान
स्वाभिमानाने जगतो आम्ही
नाही कशाचीच भीती
आहे विश्वास स्वकर्तृत्वावर
साफ असावी आपुली नीती
सौ. संगीता कढव, भंडारा