[08/03, 09:20] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): जागतिक महिला दिनानिमित्त
संकल्पना..जागर स्त्री शक्तीचा
(माता,भगिनी,सखी,अर्धांगिनी,कन्या )पाच स्त्री व्यक्तिरेखांवर पाच कडवे
शिर्षक
"" *रूपं स्त्रीशक्तीची*""
कोरडा हात जरी मातेचा
नाही तिला तुल्य कोणी
गरिबीतही माता बाळाला
उष्टे अन्न नी पाजते पाणी.-१-
भगिनी असावी पाठीशी
दादा म्हणून हाक देई
सदा गोंजारते भावा,हि
कळ फक्त बहिणस येई.-२-
सखी माझी आहे शेजारीण
अडल्या पडल्या साथ देते
नातेवाईक परगावी राहती
शेजारीण माझ्या कामात येते.-३-
अर्धांगिनी धिट मनाची
स्वाभिमानी कर्तुत्वाची
तिची साथ असता मला
हरएक घटिका आनंदाची.-४-
मोबाईलवर कन्येशी बोलता
आवाज माझा दाटून येते
बाबा तुम्ही कसेआहात!बरं
बोलता नेत्रात पाणी भरते.-५-
************************
दशरथ नारायणराव अतकरी
महाकाली नगर, नागपूर
मो.७५८८७६७९४९
दि.०८/०३/२०२१
[08/03, 10:25] Swati dayanand Shelokar: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*महिलांचा सन्मान*
महिला दिनाचे औचित्य साधून
करूया सारे महिलांचा सन्मान
निरनिराळ्या भूमिकेतील स्त्रीला
द्यावा प्रथम घरच्यांनीच मान
मनमोकळे जगण्याचा हक्क
का नको निर्णय घेण्यास मुभा?
तिच्याचमुळे राजकारणातही
गाजल्या कितीतरी सभा....
अबला नाही सबला आहे ती
नेहमी ठेवावे सार्यांनी लक्षात
म्हणूनच तर हस्तक्षेप तिचा..
दिसून येतो प्रत्येक पक्षात....
नोकरी करून घर सांभाळणे
प्रत्येक स्त्री दिसते कर्तव्यनिष्ठ
राधेश्याम, सीताराम लिहिताना
स्त्रीच असते त्यातही इष्ट....
नका पुजू तिला देवी समान
मान द्या तिला स्त्री समजून
अत्याचार अन् अन्यायामुळे
नाजूक स्त्री जाईल कोमेजून
*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[08/03, 12:12] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: विषय --महिलांचा सन्मान
आज आहे महिला दिन
का एकच दिवस सन्मान
घराघरात व्हावा तिचा
रोजच माया,प्रेमाने मान ।।
रूप तिचे आगळे
बहिण ,पत्नी, आई
घर सांभाळते प्रेमाने
असते कामाची घाई ।।
मुलांचे शिक्षण घेताही
अस्तित्व आपले जपते
मने सार्यांची जपता
मना मनात घर करते ।।
सावित्रीने उजळली
स्त्री शिक्षणाची ज्योत
नभी उंच उडण्याचे बळ
आले आता तिच्यात ।।
सर्व क्षेत्रात अग्रेसर
आहे देशाचा अभिमान
रोजच व्हावा सर्वत्र
महिलांचा सन्मान ।।
मंगला डहाके ,भंडारा
[08/03, 13:46] +91 88550 02895: *स्त्री सन्मान*
आजच्याच दिवसाला
नको, हा स्त्री सन्मान
तर द्यावा तिला
रोज घरातही मान ।।
स्त्री मध्ये आहे
अपरंपार शक्ती
कुटुंबासाठी करत
असते देवाची भक्ती।।
मोकळीक द्यावी
घरात बोलण्याला
समजू नका तिला
दुय्यम स्थानाला ।।
घरात राहून ती
कुटुंबासाठी झटते
नातीगोती आपली
मनापासून सांभाळते।।
------------------------------
पुनम डहाके, भंडारा.
[08/03, 14:34] संपर्क-5 Ranjana halamare: *भरारी *
नच राहिलो आम्ही अबला
झालोत आता सबला
सदैव वाढलो धाकात
परी घेतली भरारी आता उंच गगनात......
आम्हीच प्रसविले शूरवीर
आम्हीच प्रसविल्या रणांगना
धाडले तयांना रणांगणावर
न मागुती आता पाहणे पुन्हा.....
झाले आजवर बहुत शोषण
आम्हीही करू देशाचे रक्षण
स्मरूनी झाशीची महाराणी
शत्रूलाही पाजू पाणी.....
सहनशीलतेची मूर्तिमंत प्रतिमा
आमच्याच माता सावित्री अन सीता
परी जगताना दिसतो जेव्हा धोका
अवतरती इथे होऊनी दुर्गा,काली, अन चंडिका......
रंजना हलमारे
साकोली.
[08/03, 14:59] smj_Ngp_Atkari Dasharath Narayan, (Nagpur): बी.के.सा.सं.प.(२०७)
जागतिक महिला दिनानिमित्त
*महिलांचा सन्मान*
पुरूषांनी मी पणा सोडून
महिलांचा सन्मान करावा
रात्रंदिवस सेवाव्रत तिचा
कधीतरी समजून घ्यावा.
त्रागा होत असतांनाही
आदरातिथ्य तिने करावे
सुहास्य वदना स्वागतास
नाही कुठले ताण दिसावे.
महिलेस नोकरी लागली
विश्वास तिचेवर ठेवावा
तिच्या अंतर्मनातील भाव
पुरूषांनी समजून घ्यावा.
आयुष्य फार सुंदर आहे
मारू नये शब्दांचे बाण
फक्त तीआदराची भूकेली
ठेवावा महिलांचा सन्मान.
नटने सजणे धर्म तिचा
नाही कधी हिरस करावे
सदा तिच्या भाळी कुंकू
तुमच्या नावाचेच दिसावे.
दनाअ, नागपूर
दि.०८/०३/२०२१
No comments:
Post a Comment