१५० वा योग दिवस
१५० वा योग दिवसश्रीराम स्वास्थ्य व योग वर्ग कुटुंबांतील सदस्यांना माझा नमस्कार 👋
तसे पाहिले असता 150 दिवस म्हणजे काही नाही परंतु आपण सकाळी साडेसहा वाजता, आतुरतेने साखर झोप मोडून योग वर्गात उपस्थित राहतात याचा मला खूप आदरयुक्त कुतूहल वाटतो.
खरे पाहता Online वर्ग ३,७ दिवस चालतात म्हणून हा वर्ग सुद्धा 30 दिवस चालेल असं मला वाटलं होतं.
परम दयाळू परमेश्वराच्या आशीर्वादाने, कै. दादासाहेबांची ऊर्जा व सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सातत्याने हे सहज शक्य झाले आहे. ते पहा---
श्री राहुल भोतमांगे दादा ज्यांच्या संकल्पना व रोजची तांत्रिक कसरत,
कुणबी सामाजिक संस्था, पुणे व यांचे तर्फे श्री लक्ष्मणराव शेलोकर दादा यांनी मूर्त स्वरूप दिले. त्यांच्यासोबत श्री रतिरामजी आस्वले दादा व श्री तिजारे दादा याचा भरपूर सहभाग आहे,
समाज भारती, मुंबईचे संपादक व जादूगार श्री देवरावजी मते यांची करामत म्हणजे मूर्तीमध्ये जीवदान देणे
श्री भालचंद्र कराळे सर हे तर सर्वांचे लाडके आहे त्यांचे शिवाय वर्ग अपुराच असतो
श्री मारुती पवार आमचे आधार स्तंभ आहेत
या वर्गात महादेव-पार्वतीच्या जोड्या (सर्वश्री) a) कराळे, पनवेल b) मने अमरावती, c) चेटुले पुसद, d) राजकुमार शेंडे नेरूळ, e) विभा दांडेकर नेरूळ,f) उर्मिला जूवरकर नागपूर, g) रवींद्र मते हैदराबाद, h) सुधीर मते नागपूर, I) शेलोकार पुणे, k) मते कल्याण, l) डॉ निंबर्ते बदलापूर, m) साहेबराव साखरकर, यवतमाळ, n) पवार, पनवेल, o) श्रीकृष्ण ढोरे, औरंगाबाद तर असंख्य व्यक्तिगत मग राजस्थान गुजरात महाराष्ट्रातील अन्य विभागातून अनेक साधक रोज उपस्थित असतात.
डॉ आशाताई ह्यांनी आहारात दोनदा खूप छान मार्गदर्शन केले, तर डॉ गणपतराव दादांनी अध्यात्मिक विषय छेडला ८) विभाताई तर एका गतीने आपल्या क्षेत्रात काय प्रगती करायची आणि महिलांनी योगा का करावा ?
डॉ नरेश चारमोडे सरांनी तर रेकी, होमिओपॅथी, अंतर्ज्ञान ध्यान विविध विषयावर मार्गदर्शन केले १०) श्री अंबिका योग कुटीर, ठाणे शाखा पनवेलचे संचालक श्री रामचंद्रजी बोरुडे सर, पाठक सर, कांडपिळे सर, उमेश गुल्हाने सर, भावनाताई, रेखाताई, स्वरालीताई, पवारताई, नेहाताई, सुजाताताई, आणि नमिताताई त्यांचे खूप मोठे मार्गदर्शन आम्हाला प्राप्त झाले. त्यांनी तर एक आठवड्याचा संपूर्ण योग वर्ग यशस्वी करून दाखवला. तसेच अंबिका योग कुटिरातील विविध शिक्षक गणांनी या वर्गात उपस्थित राहून बहुमोल मार्गदर्शन केले आणि भविष्यात उपस्थित राहण्याचे अभिवचन सुद्धा दिलेत
डॉ संध्याताई जोशी, अमरावती यांनी रोगप्रतिकारक शक्ति वर उत्कृष्ट मार्गदर्शन केले
डॉ प्राजक्ता ठवकर आणि मानसिक विकार व उपायावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले
प्राणायामाची गोडी चाखून देणारे संतोषजी बहिरा सर तर किमया करून गेलेत.
अजून योगाची रहस्य आपल्यासमोर उलगडण्यासाठी कितीतरी ज्ञानी परमेश्र्वर आपल्या वर्गात पाठवित आहेत. ◆ डॉ दिलीपराव निंबर्ते उद्या आगमन करीत आहेत. त्यानंतर , ◆ डॉ साहेबराव साखरे, यवतमाळ ◆डॉ केशवराव चेटुले, पुसद ◆डॉ मेघना, नागपूर, ◆डॉ अंकिता मते, डोंबिवली, ◆डॉ टिचकुले, रायपूर अशा अगणित प्रभुतीचे आपणास बहुमुल्य मार्गदर्शन प्राप्त होणार आहेच.
ह्याशिवाय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील आहारातील तज्ञ, रोगातील तज्ञ व योगातील तज्ञ अशा ज्ञानीयांचे प्रत्येक आठवड्याला ४ दिवस आपल्या वर्गात उपस्थित राहण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
म्हणून हा वर्ग 365 दिवस सुरळीतपणे निश्र्चित चालेल.
मी सर्वांचा खूप खूप ऋणी आहे
-रामकृष्ण ठावकर

योगाचार्य सन्माननीय रामकृष्णजी ठवकर साहेब,
ReplyDeleteनमस्कार. आपल्या योग वर्गांच्या निमित्ताने आपल्या सानिद्यात आलेल्या प्रत्येकालाच आपल्या चिवट निस्वार्थ समाज सेवेचा अनुभव आलाआहे.रोगमुक्त समाज निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करीत आहेत. आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा समाजाला होत आहे. पुढेही वर्ग नियमीत करावा ही विनंती.