विषय- पाणी
[5/13, 1:59 PM] __Mangala Dahake Bhandara:
।। पाणी ।।
पाणी हे अमूल्य आहे
अमृततुल्य आहे
सारितेची धार आहे
सागराचा वार आहे ।।
पाण्याचे महत्व
फारच आहे थोर
प्यायला मिळाले नाही तर
जीवाला लागेल घोर ।।
प्यायला पाणी,
स्वच्छतेला पाणी,
कपडे धुवायला पाणी
हवं झाडांना पाणी
शेतीला पाणी ।।
शरीरात असते 65% पाणी
तरीही शरीराला अती गरज पाण्याची
24 तास मिळाले नाही तर
वेळ येईल मरनागती जाण्याची ।।
पाणी जपून वापरा
उगाच करू नका व्यय
देऊ पाणी पशु पक्षांना
पण नको व्याकुलतेचे भय ।।
नाभीच्या कोसळत्या
धारांचे संचय करूया
पाणी जीराऊन
शासनाला सहकार्य करूया ।।
पाणी जिरवा, पाणी वाचवा
हा एकच मंत्र महान
चिमण्या पाखरांना देऊन पाणी
भागवू त्यांची तहान ।।
-मंगला डहाके, भंडारा
-------------------------------------------------------------------
[5/13, 2:53 PM] K B Sarve (mahila Sakhi Manch):
।। पाणी ।।
पाण्याहून सुंदर जगी कोण आहे?
पाण्याहून निर्मळ जगी कोण आहे
विचारी मना तुझा रंग कसा आहे?
ज्यात मिसळा तसा मी आहे।
पाण्यात पहावे प्रतिबिंब।
पाण्यात न्हावे ओलेचिंब।
विचारी मना तुझे रुप कसे आहे?
अथांग सागर लाटा तसा मी आहे।
पाण्याचा घ्यावा आधार।
पाण्याचे मानावे आभार
विचारी मना,तुझे तम कसे आहे?
केदारनाथ,कोल्हापूर,त्सूनामी,
विध्वंश तसा मी आहे।
पाणी हे जीवन
पाणी हे मिलन
विचारी मना,तूझे स्नेह कसे आहे?
जिकडे,तिकडे हिरवेगार,मोतियाचे सडे
तसा मी आहे।
-सौ.के.बी.सार्वे. भंडारा.
---------------------------------------------------------------------
[5/13, 3:28 PM] :Jayshri Rehapade:
🌹पाणी महती🌹
ग्रीष्मकाली हळू हळू
आटती नदी नाल
कंठातून दाटतात
हलकेच हुंदके.......
दुर ताटकळत उभ्या वृक्षांना
पतझडीचा सोसवेना मार
पाहतो बिचारा पाण्यासाठी
मेघांची चातकासम वाट......
हिमनगरात बर्फ वितळे
टिपके पाणी भरभरूनी
उन्हांच्या उत्साहाचे सोहळे
ठरतात मात्र येथे जीवघेणी....
ओंजळभर पाण्यासाठी
आसुसली बघ वनराई
जाणुन महत्व पाण्याचे
मानवा हो आता तरी उतराई.....
प्रा.डाँ .जयश्री रेहपाडे
नागपुर.
--------------------------------------------------------------------
[5/13, 3:45 PM] Meera shebe (Mahila sakhi Manch): .
💧 पाणी 💧
थेंब पाण्याचा
अमृत जीवनाचा
वाचव रे मानवा
जीवन जीवनाचा
थेंब थेंब सरीचा
पृथ्वीच्या गर्भाचा
. साठव रे मानवा
खजाना जीवनाचा.
बचत पाण्याची
गरज जीवनाची
वृक्ष-वेली,पशू-पक्षी
जीवन जगविण्याची.
थेंब थेंब हा पाण्याचा
आहे बहुमोलाचा
आत्मा साऱ्या सृष्टीचा
मार्ग धर बचतीचा.
बंद कर फुटके पाईप
गळक्या साऱ्या तोट्या
ओसंडून वाहणाऱ्या
छतावरील टाक्या.
शुद्ध ठेवा पाणवठे
नको रितेे पाण्याचे साठे
पाण्या वाचून जीवन
. आॅक्सिजन बिना पवन
निर वाहेना निरा
उदक नाही झरा
आटलेल्या विहीरी
तृष्णावली खेडे शहरी
. कोण भागवेल तृष्ण
. शुष्क मातीचा कण कण.
. अशी कशी झाली दैना
देवा सुबुद्धी दे मानवांना.
सौ.मीरा नरेंद्र शेबे
. भंडारा.
---------------------------------------------------------------------
[5/13, 5:37 PM] Nanda Bhoyar: .
पाणी
[5/13, 6:27 PM] subhash Dhande Sir: .
पाणी
---------------------------------------------------------------------
मन
[5/13, 11:14 PM] Smj_Ngp_Mamata Bhoyar Nagapur:
मन माझं मन
मन हे हरणाच्या हालचाली सारखं असत
क्षणात इथे क्षणात कुठे
धाव धाव धावत
परत येऊन स्थिरावत
देवाला हात जोडताना डोळ्यात देव असतात
मानत मात्र घरातली काम असतात
अशा या मनाला आवर कसा घालू
अशा या मनाला आवर कसा घालू
तेव्हा मन म्हणत थाम्ब जरा
जास्त नको डोलू
विचार येतो मनात बा कु स माझं पुढे कस वाढऊ
माझ्या भगिनींची भेट कशी करवू
मन सांगत तेव्हा समाजभारती आहे ना
घे त्यांच्याशी जुळवून
मनाच्या हिंदोळ्यावर सतत प्रतिबिंब असत जगतगुरु तुकारामचं 🙏
प्रेरणा घेऊनि त्यांची काम कर
समाजाचं
🙏
- सौ ममता भोयर, नागपूर
---------------------------------------------------------------------
[5/14, 10:11 AM] Jayashri Rehapade:
कुणास काय ठावे
कुठे,कसे मन असते?
नजरेस न पडता हा
का मन हे छळते?
प्रा.डाँ जयश्री रेहपाडे.
नागपुर..
----------------------------------------------------------------------
[5/14, 11:59 AM] smj_Yat_Dhande Subhash Chandrabhan:
💐🎷मन 🎷💐...
मन विषारी विषारी ... जसे निवडुंगी काटे .तळ पायाशी टोचता , अश्रू डोळ्यांतच दाटे ..💐बहिणाईच्या कविता , सांगे मनाची किमया .मनी झुरता झुरता , सारी डोलते दुनिया .💐मन अवखळ फार , जसं चपळ वासरू .आता होतं गोठ्यामंधी , गेलं गेलं रानी फिरू .💐ज्याचा मनावर ताबा , त्याच्या जिभेला बंधन , देई प्रेमाची फुंकर , घाली डोळ्यांत अंजन .💐मन जपते जपते , कडू गोड आठवणी .हृदयाच्या संगतीने , चाले मनी उजळणी .💐मन हेच आहे धन , बोल बोलावे तोलून .संगतीचे चार साथी , निघे आनंदी न्हाऊन ..💐💐💐🍀🌳🎷🎷
-सुभाष धांदे , यवतमाळ .
------------------------------------------------------------------------
[5/14, 12:33 PM] संपर्क-3_ K B Sarve (mahila Sakhi Manch):
।। मन ।।
मनाचे मनाशी तरंग जोडलेले।
ऊठूनी पहाते मन मोडलेले।।
मनाचा हिंदोळा ऊंच ऊंच जाई।
ऊठूनी पहाते धरा टेकलेले।।
मनाचे तरंग मनाचिया मांडे।
ऊठूनी पहाते मन सांडलेले।।
मनात सजती स्वर्गाच्या अप्सरा।
ऊठूनी पहाते मन तुटलेले।।
मनात फुलतो मोराचा पिसारा।
ऊठूनी पहाते भांड्याचा पसारा।।
-सौ.के.बी.सार्वे भंडारा.
---------------------------------------------------------------------
[5/14, 1:48 PM] Nanda Bhoyar: .
मन
------------------------------------------------------------------------
[5/14, 2:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara:
।। मन ।।
मन हे राही,
कधी ओल्या मातीत
कधी वाऱ्या संगे
जाई निळ्या नभात ।।
मन वाऱ्या परी पाखरू
फुलावरी बसते
कधी हृदयात दडून
उगाच लपते ।।
मन शांत नदीसम
धारा वाहे किनारी ग
कधी उसळे लाटा
सखोल सागरी ग ।।
मन एका कप्प्यात
दुःखाचे गोल गरे
कधी डौलाने डूले
गाठोडे आनंदभरे ।।
मन नाते ग जपते
कधी सल ही खुपते
कधी कोसळत्या धारात
नयनी ग भरते ।।
मन हे पाखरू
अन वारा
मन क्षितिज दरु
अन शुभ्र गारा ।।
मन काळजात, हृदयात
निःशब्द ओठात
मन नयनात
प्रेमाच्या मिठीत ।।
-मंगला डहाके, भंडारा
---------------------------------------------------------------------
[5/14, 2:16 PM] Nanda Bhoyar: .
मन
सौ. नंदा भोयर
----------------------------------------------------
[5/14, 2:49 PM] Meera shebe (Mahila sakhi Manch): .
* मन *
मन एक कोडं, सोडवता सुटेना.
भल्या भल्याला त्याचं उत्तर भेटेना.
मन अशी घागर,भरता भरेना.
त्यात ओतला सागर तरी राहतो उना.
मनाची अशी तृप्ती तुळशीपत्रात सामावली.
तुला कृष्णाची तुळशीपत्रानं भरली.
मनं असं वारं, सुसाट पळतं
साखळदंड पायात तरी नाही आवरतं.
मनाचा निग्रह हिमालय जसा.
सत्याग्रह उपजला बापूंच्या मानसा.
मन कोमल मऊ जसा लोण्याचा गोळा
पर दुःखानेही मनी अतिव कळवळा.
मन आगळावेगळा सकलात हटके
हसत हसत सोसतो दुःखाचे चटके
मन हळवं असं फुंकरीनं उलगडले
पदर पदर सोडून होतसे मोकळे.
मन कणखर भारी पेले वज्राचा घाव
ढसढसा रडसी पण त्याला नाही कणव.
मनाचा स्वरजसा अंतरी विचार
मन रोगांवर नाही कोणताही उपचार.
सौ.मीरा शेबे
भंडारा.
--------------------------------------------------------------------
[5/14, 4:44 PM] Sneha Aditya Shelokar:
मन ...
"मन" किती छोटा शब्द आहे ना पण त्याचा अर्थ प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे आहे .माझ्या मते 'मन' हा आपल्या शरीराचा असा एक अदृश्य अवयव आहे जो कधीच निकामी होत नाही, म्हणजेच काय शरीराच्या काळोखात एक छोटीशी ज्योत जी नेहमी तेवत राहते ते म्हणजे मन पवित्र ज्योत जी प्रत्येक मार्गावर प्रकाश टाकते त्यावर त्यावर चालण्याची ताकत देते .बघाना लहान मुलांचं मन पवित्र असतं आहे बघाना सर्व म्हणतात लहान मुलांचं मन पवित्र असतं कारण गोष्टीची जाणीव नसते .जसे जसे आपण मोठे होत जातो तसतसा आपलं मन चंचल होत, पण जेव्हा सामंजस्य येतं तसंतसं मनावरती मेंदू आणि हृदयाचा ताबा येतो. पण जेव्हा एकांतात बसलो असताना आपल्याला आपल्या मनाची जाणीव होते ,पण त्यावर मेंदूचा ताबा सुटत नाही मला सांगा ना जेव्हा आपलं आपल्या प्रिय व्यक्ती सोबत वाहत होतो तेव्हा आपल्याला मेंदूत त्याच्या चांगल्या वाईट गोष्टी दाखवतो, आणि हृदय दुःखी आणि नाराज असतं, पण त्याच गोष्टीकडे आपण शांत मनाने जर पाहिलं तर मन आपल्याला ते वाईट गोष्टी मागचं कारण आणि त्याला समजण्याची इच्छा देतो चुकांना समजून पुढे जाण्यासाठी.म्हणून म्हणून नाती मनाने सांभाळावी. नाही की! हृदयाने क्षणात तुटुन जातील जे क्षणात तुटुन जातील. मनाचा प्रवाह जेव्हा संथ होतो ना मग त्याच्यावर किती आणि कशाचे पण आघात होऊ द्या नाही फरक पडणार, आणि चंचल मनावर जर तुम्ही ताबा ठवलात तर तुमच्या एवढा मोठ्या मनाचा कोणीच नाही. हे नक्की !.'मन समाधानी तर जगात तुमच्या एवढा श्रीमंत कोणीच नाही आणि मनाने कुणीच वाईट नसतं हो'!
Sneha Aditya shelokar
------------------------------------------------------------------------
[5/14, 10:09 PM] Anushri Dhande Raghorte: .
मन
---------------------------------------------------------------------
परिवार
[5/15, 11:06 AM] _Kukade Veenatai Nagapur:
कुंटूब.
कुंटूबाला निसर्गासारखा
रंग हवा असतो.
कुंटूबाला फुलासारखा
गंध हवा असतो
कुटूंबात निसंकोच आत्मियतेने
हूरूदयातून आयुष्यभर जपण्यासाठी
जोडलेल नांत हव असत
कुंटूबाला हव असतो
विश्वास व मोठय़ाचा मान सन्मान
कुंटूब असतो तेव्हाच
सुखी समाधान
🙏
-वीणाताई कुकडे, नागपूर
---------------------------------------------------------------------
[5/15, 12:43 PM] K B Sarve (mahila Sakhi Manch):
।। परिवार ।।
जसा शरीराला पोषक चौरस आहार।
तसा मन,भावनेला पोषक परिवार।।
आचार,विचाराचे आदान,प्रदान
म्हणजे परिवार।
सुख,दु:खाचे वाटप म्हणजे परिवार।।
उन-उन खिचडी साजूकस तूप न
वेगळ व्हायच वेगळ सूख नव्हे ।
आजोबाचे रागावणे,आजीच्या गप्पा ।
आईची शिस्त,वडीलांची भिस्त
भावाचा आधार, बहिणीचे प्रेम
काकांची देखरेख,काकूचे वळण
सार्यांचा मान।
अंगत-पंगत छान।।
वाढवी परिवाराची शान।।
सौ. के. बी. सार्वे भंडारा.
--------------------------------------------------------------------
[5/15, 2:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara:
।। परिवार ।।
आई बाबा, आजी आजोबा
ज्यात नांदती सौख्याने मुले
असतो स्नेह मनात
सदा प्रेमाने नाती जपणार ,तो परिवार ।।
घर ,भिंतींचे सजणे नव्हे
सौजन्य, स्वतंत्र अस्तित्व
शब्दांना मान देत
सारे फुलांपरी फुलणार, तो परिवार
नात्यांचा आदर, सहकार्याचे
भाव, विश्वास असावा अपार
कोंदणात मैत्रीचे नाते
संस्काराची उंची गाठणार, तो
परिवार
पिठलं भात, पंगत मिळुनी
हसून खाती गोड माणुनी
अधिकाराचे करे, नसावे
कर्तव्य ओंजळ सांभाळणार, तो
परिवार
घराला गर्वाचा रंग, रूप नसावा
त्यागाचा साज असावा
समाजदारी चा ताज असावा
प्रत्येकाच्या डोळ्यात परासरांसाठी पाणी असणार तो
परिवार ।।
-मंगला डहाके, भंडारा
-----------------------------------------------------------------------
[5/15, 3:16 PM] Nanda Bhoyar: .
-सौ. नंदा भोयर, अमरावती
--------------------------------- --------------------------------------
[5/15, 3:20 PM] Nanda Bhoyar: .
-चारोळी-
-नंदा भोयर अमरावती
-------------------------------------------------------------------------
[5/15, 5:42 PM] Subhash Dhande Sir: .
कुटुंब
-सुभाष धांदे सर, यवतमाळ
---------------------------------------------------------------------------
जत्रा
[5/15, 11:04 PM] Meera shebe: .
सौ. मीरा शेबे, भंडारा
---------------------------------------------------------------------
[5/16, 9:00 AM] Ken_Kukade Veenatai Nagapur: 🙏
जत्रा
चल ग चल सखे जत्रेला
पंचमढी चौरागड ची जत्रा फीरवतो तुला
चल ग सखे जत्रेला
जत्रेतील दुकान ल्ई ल्ई भारी
हातातल्या बांगड्या गळ्यातील सरी
पायातले पैजन नऊवारी साडी
जत्रेतील मजाच भारी
जत्रेत खाण्याची मजाच मजा
गरम गरम जीलेबी कांदाभजी
शेवचिवडा बेसणाची पापडी
उंच पाळणे फीरवतो तूला
चल ग सखे चल ग सखे जत्रेला
🙏
-सौ. वीणाताई कुकडे, नागपूर
--------------------------------------------------------------------
[5/16, 9:48 PM] Subhash Dhande Sir: .
जत्रा
- सुभाष धांदे सर, यवतमाळ
------------------------------------------------------------------------
[5/16, 11:13 AM] +91 98811 46633:
🎃साहित्य जत्रा🎃
मते साहेबांच्या आशिर्वादाने
बी .के. स .वर भरली साहित्य जत्रा
जमले सारे कवी घेवुन त्याच्या
दर्जेदार कविता......
सुभाष भाऊंचा दरारा मोठा
जत्रेवर त्यांचा खडा पहारा
दिवसभरात एकदा हजेरी लावतात
मोत्याच्या अक्षरांत कविता सजवितात.....
मंगला ताईची बातच न्यारी
जिभेवर शब्द अन् हातात लेखणी...
गण गणात बोते म्हणत
गजाननभाऊ
येतात
अलगत समाजाच्या समस्या मांडुन
जातात.....
मिरा,मंगला,सारवेताईना
साहित्याची पारख भारी
कवितेतुन करतात
स्त्रीयांच्या वेदनांवर मलमपट्टी...
ओमप्रकाश भाऊंना मानाचा मुजरा
नामवंत कवी तुम्ही
समाजालाअभिमान तुमचा....
ममताताई, सुधाताई म्हणे
आम्ही नवशिक्या कवी
समाजाच्या विकासासाठी
आमचा आवाजच भारी....
साहित्य जत्रा पडलीपार
जयश्री म्हणे मैत्रीनीनो
खुप खुप आभार
आपणच राखु या
आपल्या संस्कृतीचा मान....
प्रा.डाँ. जयश्री रेहपाडे.
नागपुर.
-----------------------------------------------------------------------
[5/16, 1:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara:
।। जत्रा ।।
पूर्वी गावामध्ये जत्रेत
देवीची पूजा राहायची
कोंबड्यांची आपसात
पैज लागायची ।।
आता जत्रेच रूप
झालं प्रदर्शनी अन मेळ्यात
विविध रंगी दुकान
खरेदी करायची त्यात ।।
जत्रेत, मित्र मैत्रिणीसोबत गप्पा
विविध पदार्थ खाणे
घ्यायचे लोणचं, मुराब्बा
मजेत झुल्यावर झुलणे ।।
जत्रेत लहानमोठ्या
आरशात बघणे
आपलेच चेहरे विदूषकी
मग खूप खूप हसणे ।।
कौन अच्छा, कौन बुरा
गाढवाचे ओळखणे
आप्त स्वकीयांच्या भेटी
भरपूर मजा करणे ।।
लहान मुलांपरी
काही क्षण उपभोगावे आनंदात
जत्रेचीही मजा घ्यावी
आपल्या धकाधकीच्या जीवनात।।
-मंगला डहाके, भंडारा
-----------------------------------------------------------------------------
[5/16, 1:49 PM] K B Sarve (mahila Sakhi Manch):
।। जत्रा ।।
कुणी रानात भुलते ।
जत्रेत भुलले मी।।
मला कोणी न दिसे परका।
आपल्यातच भुलले मी।।
कित्येक वर्षे जत्रा भरलीच नाही।
जत्रेत या बेभान झाले मी ।।
जत्रेतील लोक रंग।
पाहून दंग झाले मी ।।
हौश्या, गौश्या ला खुशरंग करी जत्रा।
खुशरंग्याचे भाव पाहूनी बेधूंद झाले मी ।
डि.एम. चे सौजन्य,
बी.के.ची जत्रा।
पाहून धन्य झाले मी ।।
-सौ. के. बी. सार्वे. भंडारा.
------------------------------------------------------------------------
[5/16, 2:37 PM] Nanda Bhoyar:
"जत्रा"
पडके पुडके घर अन कूडाच्या भिती
तरी आमच्या जत्रेची दुर दुर ख्याती
म्याह्या गावची जत्रा काही औरच असते
साऱ्या रस्त्यानं फद फद मातीच दिसते
मातीत मले लयच मस्त राजा वाटते
जुने पुराने दोस्त खुप दिवसान भेटते
जात घेऊ का पाट घेऊ असं मले वाटते
अन गर्दीत लोक राजेहो भलतेच खेटते
मंग दिसते अगसपायना जाव वाटते बसुन
भज्याचा वास माया नकात भरते ठासुन
लक्ष गेल भुटाण्यावर घेतला एक घास
चिवड्याचा सुगंध एकदम खास
मन जाते भज्यात दिसते कच्चा चिवडा
मंदातच येते माया घरा जवळचा बेवडा
देत का मनते दहा रुपये मले
संध्याकायी म्हणे तुले दाखवीन शोले
जत्रेतली टाकीज लय मस्त असते
भोगदाडातुन काणी पुरा सिनेमा दिसते
काय मज्या असते जत्रेची नाही ?
ते दिवस कवा येतीन काही सांगता येत नाही
-नंदा भोयर
--------------------------------------------------------------------
-दुःख-
[5/16, 7:01 PM] संपर्क-3_ K B Sarve (mahila Sakhi Manch):
।। दु:ख ।।
दु:ख ठेवावे झाकून।
सुख पहावे लपून।।
दु:खाचा मांडू नये बाजार ।
सुखाचा करु नये प्रचार।।
जे जे लेणे ते ते कायाच बोलती।
जे जे पाहे ते ते वाचाच बोलती।।
दु:खाचे बोलणे समजेना कोणी ।
सुखाचे बोलणे ऊमजेना कोणी ।।
भूकेल्या पोटी भेटेना घास।
भरलेल्या पोटी पंचपक्वानाचा वास।।
नागव्याला भेटेना लक्तरे ।
झाकल्याला साभाळेना जरतारे।।
कुडाच्या झोपडीत फिरकेना कोणी।
महालात या लाईन लागोनी ।।
दु:ख ठेवावे मनात।
सुख सांगावे जनात।।
सौ. के .बी. सार्वे भंडारा.
----------------------------------------------------------------------
[5/16, 10:18 PM] Ken_Kukade Veenatai Nagapur:
दुःख
दुःख म्हणजे काय
मुलगी जन्माला आली ते दुःख
वंशाला दिवा लावणारा नाही ते दुःख
मुलीच आहेत म्हणून वारसा हक्क नाही ते दुःख
मुलीच आहे म्हणून घरातून बाहेर काढणे ते दुःख
मुलीचे लग्न करतानी जो त्रास होतो ते दुःख
मुलीच संसार सुरळीत नसला ते दुःख
घरच्यांनी कधीच साथ न दे ते दुःख
आपल्याला वाटतं काही तरी कराव बाहेर पडावं
म्हणून समाजात समाज कार्य व राजकारणात राजकारण करून तीथेपण यशस्वी नाही ते दुःख
समाजातील लोक महिलांन विषयी भेदभाव करतात ते दुःख
सौ. वीणाताई कुकडे, नागपूर
🙏🙏
----------------------------------------------------------------------
[5/16, 10:55 PM] Sneha shelokar:
दुःख
सुखाचा आस्वाद देणारं.
सुखाची जाणीव करून देणारं.
आयुष्यात कणखर बनवणारं.
नशिबाशी चार हात करण्याची ताकद देणारं.
आयुष्यात चार गोष्टी शिकवणारं.
स्वतःला स्थिर आणि स्तब्द बनवणारं.
दुःखाच्या उबे तून निघून सुखाच्या गारव्याचा आनंद घेण्याची शिकवण म्हणजे दुःख.....
-Sneha Aditya Shelokar
--------------------------------------------------
[5/17, 7:01 AM] Teena Titarmare:
💐।।दुःख।।💐
🙏🙏🙏
मित्र जीवनात दुःख खूप असेल
पण दुःखाच्या शेवटी सुख आहे
😭
दुःखात स्वतःला सांभाळून तर ठेव
सुख तुझी वाट पाहत आहे
😭
जगण्याचा हा नियमच वेगळा आहे
दुःखातही सुख शोधता आले पाहिजे
😭
सुख तर शेवटी तुझंच आहे
तुला दुःख सोसता आले पाहिजे
-टीना तितरमारे
------------------------------------------------
[5/17, 10:29 AM] Meera Sheb
🙏-असे का असावे.-🙏
असेच का दुःख सोसता
चेहराभर हासायचे
असेच हासता हासता.
हळूच दुःखात वि व्हळायचे
का पांधरायचे दुःखाचे पांघरुण
भळभळणाऱ्या या जखमांचे?
आभाळ फाटलेल्या या नभाला.
लागतिलच कधीतरी हसण्याचे
डोहाळे......
सौ .जयश्री रेहपाडे
नागपुर...
--- ----------- ---- ---- - --------------- -- ---------
[5/17, 11:12 AM] Subhash Dhande Sir
दुःख
---- - ------ - --------------------- -----------
[5/17, 12:13 PM] Meera shebe:
दुःख
-सौ. मीरा शेबे, भंडारा
--------------------------------------------------
।। दुःख ।।
दुःखच दुःखाला गर्तेत नेत असतो
सावरल्या दुःखावर
पुन्हा मीठ चोळून जातो ।।
पहाडासारखं दुःख
आम्ही भोगलं आहे
सोसलं आहे,
सोसत आहे ।।
कुणी घरासाठी, इस्टेटीसाठी
दुःखाची अनेक कारणं
एका शब्दानेही
विव्हळत कधी कधी मन ।।
माझ्या काळजाच्या तुकड्याला
जो सुर्यप्रभावी,केले देवाने अपहरण
दुःखाचे नाही का
आयुष्यातले मोठे कारण ।।
दुःखाचा डोंब उसळला
नायनातुनी धारा कोसळल्या
या विषयातच ,माझ्या
दुःखकला पुन्हा उभ्या राहिल्या ।।
नयनी दुःख वसते, काळीज थरथरते आहे
पांघरून घालून दुःखावर
ओठ हे हसते आहे ।।
कुणाच्या वाट्याला येऊ नये हे क्षण
साहित्याची झोळी पुढे करून
हसत हसत सोसते हे
दुःख आमचे मन ।।
ह्या दुःखाला नाही सीमा
कवतालीत बसले,आयुष्य होईल बिनकामा
काया मनाने मी मग्न सदा
दुःख विसारण्या यत्न कित्येकदा ।।
बोचरे दुःख समोर येई
आठवणीत चक्षुधारा घेऊन जाई
श्वास,कंठ दाटतो,त्या स्मृतीने
अंधारातही दीपस्तंभ दाविला,वरद आणि सिद्धने ।।
मंगला डहाके, भंडारा
---------------------------------- -----------------
।।माझ्या दु:खाच्या चारोळ्या ।।
१ दु:ख गोंजारत बसले,
कुणी ढुंकून पाहेना ।
आनंद ऊधळत बसले,
गर्दी पेलवेना।।
२ दान वाटाया बसले,
घेणारे ऊठेचिना ।
दु:ख वाटाया बसले,
घेणारे बसेचिना।।
३ दान वाटाया गेले,
घेणार्यांची रांग लागलेली।
दु:ख वाटाया गेले,
स्मशान शांतता पसरलेली।।
सौ. के. बी. सार्वे भंडारा.
No comments:
Post a Comment