Thursday, June 9, 2022

दक्षिण नागपूरचे आमदार श्री मोहनजी मते यांनी पतंजली योग समितीच्या योग वर्गातील योगसाधकांना योग -मॅटस् चे नि:शुल्क वाटप केले

🕉️🌹👏

*स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देश अमृत महोत्सवचा* *आनंदोत्सव उल्हासात साजरा करीत आहे.या निमित्ताने यंदा 21 जून रोजी संपन्न होणारा* *अन्तर्राष्ट्रीय योग दिवस देशातील ऐतिहासिक अशा जागतिक कीर्तीच्या 75 स्थळावर आगळ्या वेगळ्या योग प्रात्यक्षिकाचे* *माध्यमातून आयोजित करण्याचा संकल्प पतंजली योगपीठ हरिद्वार तथा आयुष मंत्रालय भारत सरकार यांचे संयुक्त* *प्रयत्नाने साकार होणार आहे.*
*या 75 व्या ऐतिहासीक स्थळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर नागपूर शहराला अन्तर्राष्ट्रीय योग दिवस संपन्न करण्याचा बहूमान प्राप्त झालेला आहे.*
*याचाच एक भाग म्हणून दिनांक 08 जून पासून दक्षिण नागपूरातील सर्व बगिच्यातील पतंजली योग समितीच्या योग वर्गातील योगसाधकांना* *योग-मॅटस् नि:शुल्क वितरित करण्याचा संकल्प दक्षिण नागपूरचे आमदार श्री मोहनजी मते यांनी घोषित केला त्या कार्यक्रमाच्या श्रुखलेतआज जवाहर विद्यार्थी गृह नंदनवन येथे भा.स्वा. चे अध्यक्ष श्री दीपक जी येवले, प. यो. स. अध्यक्ष श्री डॉ. जिवेश पंचभाई,भा. स्वा.चे उपाध्यक्ष श्री शंकरराव जी जांभूळकर व दक्षिण विभाग चार चे अध्यक्ष श्री शंकरराव जी ढबाले, श्री जिभकाटे, श्री बोपचे, श्री काचोरे, श्री भारत जी मुंडले, श्री विजयराव खंते, श्री घनश्याम जी काचोरे, श्री बोपचे जी यांच्या हस्ते  61* *योगसाधकांना व योग साधिकाणा* *योग चटई चे वितरण करण्यात आले.*
*हा कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी सर्व साधकांनी  बहुमोल सहकार्य केले. व पतंजली योग समितीच्या 21 जून च्या कार्यक्रमास सर्व साधक उपस्थित राहील अशी ग्वाही दिली. आभार प्रदर्शन श्री विजय जी खंतें यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली .*
*श्री दिपकजीं येवले व डॉ जिवेश जी पंचभाई यांनी भारत सरकारच्या प्रोटोकाॅल नुसार योगप्रात्यक्षिके उपस्थित योगसाधकां कडून करवून घेतली.*
🌹🌹🌹🌹🌹
👏👏👏👏👏

No comments:

Post a Comment

पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                             मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे ल...