सौ.के.बी.सार्वे भंडारा
।।पणती।।
या ऊठा पणत्यांनो काळोख दूर सारा।
आवरा पसारा या अंधाराचा।
पोर्णिमेच्या प्रकाशातही पणतीची शान भारी।
तिच्या विणा सुनी पडती देवालय ही सारी।
चंद्र,सूर्यास ठावे तिचे ते तर्हाणे
काळोखातही ठाम राहुनी तिचे ते नहाणे।
अमावश्येला ही धाक पणतीचा भारी।
कोणत्या रूपाने भेटेल मजला तिची स्वारी।
पणतीचे ते मर्म जाणिले कुणी ।
स्वतः जळूनी प्रकाश देई सांजी तिन्ही।
पणतीस सावराया रूपडे अनेक आली।
पण शान पणतीची कुणा ही न आली।।
---------------------------/------------/-/---------------------------/
सौ.आर.बी.झंझाड
पणती
ईवली ईवलीशी ही पणती
रंगबिरंगी आकर्षक पणती
तेल तुपाची घेई साथ
सोबत कापसाची वात
सायंकाळी लावली पणती
मुले शुभम करोति म्हणती
शुभ अशुभ कार्यातही
पणती सदा तेवत राही
दिवाळीचा झगमगाट
तरीही पाहे पणतीची वाट
स्वतः मात्र जळत असते
सर्वाना प्रकाशमय करते
तमसो मा ज्योतिर्गमय
अशी सांगत असते पणती
पणतीचा हा वसा घेऊ
इतरांसाठी तेवत राहू
पर्यावरण पूरक पणती लावु
धरती माता स्वच्छ ठेवु
---------------------------------------------------------------------
सौ. नंदा भोयर, अमरावती
-सुभाष धांदे सर, यवतमाळ
सौ. मंगला झेड डहाके, भंडारा
------------/------------/-------------/-----------/-------/------
प्रा.डाँ जयश्री रेहपाडे.
स्वामी विवेकानंद समाजकार्य म.विद्यालय नागपुर.
पणती
पणतीच्या पोटी
असह्य वेदना
भोगल्या त्या वेणा
जिवंतपणी.....
कित्येक झेललं
दुःखाचे सल
सोसाट्याच्या वाऱ्यात
तेवत राहुनी.......
आता रितेपणी
आटले बळ
थरथरते वात
अजुनही.......
विझल्या वाती
पणती च्या पोटी
प्रकाशमान अवनी
करण्यासाठी.....
----------------------------------------------------------------
सौ.मीरा नरेंद्र शेबे, भंडारा.
सौ.मीरा नरेंद्र शेबे, भंडारा.
🪔🪔पणती
पणती गं पणती
तुझी प्रकाश्याशी नाती
टिम टिम करीत वाट दावी
काळोखाच्या राती.
. तुझा संदेश सकल जना
भयमुक्त बना
प्रकाशाचा एक किरण
घालवी नैराश्य जीवना.
पणती गं पणती
तू आहे जगी महान
तम सारुनी सारे
देई प्रकाशाचं महादान.
तेल अन् वात
. . पेटविती ज्योत
एक एकट्याने ते
नाही प्रकाशत.
पाच बोटांची जशी मूठ
तसे सारे व्हा एकजूट
अधर्म, अनिती चा
करू नायनाट.
पणती एक माता
तिला निज लेकरांची चिंता
देह जळो अन् जग उजळो
हीच तिची ममता.
झगमगाट करण्या
विजेची रोशनाई
पणती आशेचे किरण
तिची सर नाही.
देव्हाऱ्यातील इवलीशी पणती
पावित्र्य, मांगल्याचे व्रती
अखंड तेवत राहूनही
सत्य प्रकाश जगती.
पणती पणती पेटवूनी
बणतो दिपस्तंभ
माणूसकी अन् सहकार्याचा
दिप उजळू अखंड.२
-----------------------------------------------------------------
दिनांक ९ मे २०२०.
विषय- चित्रकाव्य

1️⃣
#12.48 am
♦️ सौ. मीरा शेबे, भंडारा.
🐂🐄 चित्रकाव्य 🌄🌌
माळरांनी चरावया गेली खिल्लारे
अस्तास निघाला दिनकर,परताया लागली सारे.
तिन्ही सांजा होतांना हंबरती धेनु वासरे
लगबग धावती चरण परताया घराकडे.
पिवळे-तांबूस ऊन कोवळे,
निलांबराचे ते रुप सावळे
गगणांतरी विचरण करीती
बलाकमाला विहंग मेळे.
पंख विहीन, फडफड करीती
अधिर सारे
दूर घरट्यात सोडूनी गेली
चरावयास पाखरे.
एकवटूनी बळ सारे घेती उंच भरारी
परताया लागली सांजवेळी माघारी.
दुडूदुडू धावती बाळे, झपझप पाऊले पडे
दिशा दिशांना गुलाल उधळीत गो-रज उडे.
सांज होता होता,रवी कलतो क्षितीजाकडे
काळोखाच्या गर्भात विसावे
चाहूल परत उदया कडे
गोरज मुहूर्ताला वाजे सन ई चौघडा
नव दांपत्याच्या जीवनात मांगल्याचा दरवडा..
-----------------------------------------------------------------
2️⃣
#6.20 am
♦️ सौ.के.बी.सार्वे भंडारा.
।।चित्रकाव्य।।🐄
झाली सांजवेळ ओढ लागली घराची।
पाऊले पडती झपझप त्या वाटेची।
जसजसा सूर्य अस्तास जाई।
तसतसे बेभान मन मायेचे होई।
दिसेनासे होई खाचखळगे वाटेची।
ओढ लागली भेटावया वासराची।
नजर एकटक ती त्या गोमातेची।
मनी एकच धुंदि भेटावया बाळाची।
सांभाळून न होई प्रेमाचा तो पान्हा।
गोठ्यात वाट पाही बाळ तो तान्हा।
हंबरून वासराला चाटे जेव्हा गाय।
ऊंबरठा तेव्हा माझा धन्य धन्य होय।
गायीत जेव्हा मला दिसते माझी माय।
प्रणाम त्या गोमातेला धन्य धन्य होय।
क्षितीजावरतीही ती आभा झळकून जाय। 🐄👏।
----------------------------------------------------------------
3️⃣
12.44 pm
सुभाष धांदे सर , यवतमाळ
🙏🏻ओढ .....💐💐
तांबूस ल्याली , पहाट झाली .
पूर्व दिशा उजळली.
गोठ्यामधील गाय -वासरु,
हंबरून जागी झाली ...
फुटता पान्हा तव मातेला,
वासरे त्रूप्त झाली.
माया -ममता पाझर डोळीं,
भल्या पहाटे न्याहाळीं ..
रानी -वनीं चरण्यासाठी,
गाय मुक्त ही झाली ..
मागे ठेऊन वासराला,
निरोप घेऊन निघाली ....
उन्हं तापता झाडाखाली,
गोहणाची गर्दी झाली.
रवन्थ करता -करता,
दुपार टळून गेली ..
पुन्हा चरुन सायंकाळी ,
ओढ घराची लागे,
चरैवेती , चरैवेती,
असे आयुष्याचे धागे ..🐄🐄
-------------------------------------------------------------------
4️⃣
1.01pm
-मंगला डहाके, भंडारा
चित्रकाव्य--
गाय
हिंदुधर्मात गायीला
महत्व अनन्य साधारण
गायीमुळे पृथ्वीवरील
सुधारते वातावरण ।।
गोमय गोमूत्र गायीचे
दूध, दही अन लोणी
यांच्या मिश्रणाने होते
पंचगव्य बहुगुणी ।।
गाय ही संपन्नतेची
सुबत्तेची आहे खाण
तिच्यामुळे देश झाला
आपला कृषिप्रधान ।।
गायच आहे देशात
एकमेव प्राणी
ऑक्सिजन घेतो
सोडतो आणि ।।
गाय ही मांगल्याचे,
पावित्र्याचे प्रतीक
अंगणी घाला
रांगोळी गोपदम स्वस्तिक ।।
गायीच्या दुधात
अन्य उपयुक्त घटक
खनिजे, प्रथिने
कर्बोदके,जीवनसत्वे घटक ।।
गायीचे महत्व सारे जाणूया
नको तिची प्रतारणा
तीच भारतीयांचे दैवत
नित्य करूया आराधना ।।
---------------------------------------------------------------
5️⃣
5.44pm
नंदा भोयर, अमरावती
-------------------------------------------------------------------
दिनांक -१० मे २०२०
विषय- निसर्ग
।। निसर्ग।।
अहो !
निसर्ग म्हणजे काय पुसता दाताळ वेगांळूनी।
निसर्गाचे आहात तुम्ही जीवनभराचे ऋणी।।
निसर्ग माझा बालपणीचा सखा।
सोबत करतो जिवनभराच्या सुखदुखा।।
ती आम्रवृक्षाची गडद साऊली विटीदांडू खेळाया l
वटवृक्षाच्या सूरपारंब्या झोका घ्यावया ll
चार,चारोळी,बोरे, जांभळे रानमेवा मिळतो खावया।
या वयात मी का विसरावे माझीया सखया।।
हिरवा श्रृतू तो शहरी न मिळे पाहावया।
या आमुच्या झाडीपट्टीत मन रमवावया।।
निसर्गाशी केली गद्बारी या नराधमाने।
स्व-स्वार्थासाठी तोडली रानेवने।।
जल,जमिन जंगलसाठी करीत बसले झगडे।
निसर्ग तो वगळा पंगू होतील सगळे।।
🌲 🌲 🌲 🌲 🌲
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
।। निसर्ग माझा सोबती।।
रानीवनीची ऊन्हसाऊली निसर्गातूनी मिळे,
माझे मन पावन होते,माझे मन पावन होते।। धृ।
रम्य, पहाटे पशुपक्षाची किलबिल मोहरे
माझे मन पावन होते।
आम्रतरुवर कोकीळ कुहूकुहू बोले,
रविकीरणांनी मोहक चाफा सुमधूर डोले।
माझे मन पावन होते।।
----------------------------------------------------------------------
प्रा.डाँ जयश्री रेहपाडे
नागपुर.
# निसर्ग #
किती युगानंतर आज.
मोकळी वसुंधरा झाली....
स्वच्छ धुतलेल्या काचे आडुन
बघ धरती ही लखलखली.....
लेवुनी साज हिरवा
सुष्टी गाते गाणे.....
पक्षांच्या कलकलाटात
वसुदेव गातो पहाट गाणे....
बेधूंद वाहतो वारा वनोरानी
धबधब्यांचा लेवुनी
साज न्यारा
नववधू सम भासते पृथ्वी
धन्य आम्ही ही आमची.
जन्मभुमी..
उधळोनी बंध सारे
सखी, घे हातात हात .
भिजू या आपणही
चिंब या निसर्गात
.
---------------------------------------------------------------------
-सुभाष धांदे सर,यवतमाळ
----------------------------------------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
निसर्ग
बहरलेल्या झाडावरती
पक्षी करती किलबिलाट
नयन उघडता होई
चैतन्याची पहाट ।।
दोन्ही बाजूला
जंगल गवसे दाट
मधोमध असे
ओली पायवाट ।।
रानफुले ही करती
पाखरांशी प्रेम गुज
डौलाने डोलती
बाग फुलांचा सुगंधी साज ।।
हिरवी धरती झेलून धारा
आसमंत आनंदे
शांत सरिता, झरझरतो वारा
मोरही नाचे स्वानंदे ।।
पशु पक्षासंगे ,इंद्रधनूच्या
रंगात सूर्यही न्हाले
सोनेरी किरणे लेऊन
वृक्षही मदमस्त झाले ।।
शेतकरी गाळून घाम
भिजवतो काली माती
ढवळ्या पवल्या संगे
पिकवतो शेतातून मोती ।।
झाडे लावा, झाडे जगवा
जगतो हा सारा जहान
निसर्गाशी नाते जोडा
आरोग्याचे मंत्र महान ।।
----------------------------------------------------------------------
-नंदा भोयर, अमरावती
-------------------------------------------------------------------
मंगेश बांते,पुणे
Iiनिसर्गII
निसर्ग नावाचं थाट किती
इथे पावसाची वाट किती
ग्रिष्माच्या काहीलीची लाट किती
गुलाबी थंडीची पहाट किती l
इंद्रधनुची किमया भारी
जश्या पडती श्रावण सरी
निळे मेघही तांडव करी
निसर्गाची ही किमयाच न्यारी ll
खळखळ वाहे झरे बापडे
मातीचा हा सुगंध दरवळे
मोरही नाचे थयथय गडे
कोकीळ ही सरगम छेडे lll
असा निसर्ग करी उधळण
करु त्याचे आपण संवर्धन...
🌲🌿🌱🌴🌳🍀
-------------------------------------------------------/-------------
सौ.मीरा नरेंद्र शेबे
जि.प.भंडारा.
🌲🌳🦚 निसर्ग 🦈🦒🐅
आमच्या पूर्वजांनी
राखीयली राने
इमारतीच्या जंगलानी
उजाडली वने
आता महामार्ग
लांब रुंद झाली
कित्येक महावृक्षांची
कत्तल केली.
कुणा नसे तमा
पशू पक्षांची
गावात येती श्वापदे
तक्रार त्यांची.
पूर्वीचा निसर्ग
राहीला नाही
ओरबडून घेण्याची
सर्वांना घाई.
विणा पंखा, कुलर होता
थंडगार वारा
पिझ्झा, बर्गर पेक्षा
रानबोर, चारा
नदीनाले स्वच्छ
डुंबण्यात मजा
सुख सारे हिरावले
प्रदुर्षणाची सजा.
आंब्याची आम्राई,
मामाची माडी
स्वप्नवत भासे
घुंगराची गाडी.
मानवाने केला कहर
निसर्गाला आली लहर
श्रेष्ठत्वाची स्पर्धा भारी
निपजली महामारी.
आम्हा झाली अमुच्या
चुकांची जाण
जेंव्हा पेटून सारे
उठले रान.
निसर्ग अमुचा दाता
तोच माता पिता
मातृदिनाचा मान
निसर्ग राखू छान.
ठेवू निसर्गाचा मान
वाढवू धरणीची शान
तेंव्हा वाचतील प्राण
जगू आणि जगवू
घेवूया प्रण. २
---------------------------------------------------------------------------
दिनांक ११ मे २०२०.
विषय- आई
-नंदा भोयर, अमरावती
------------------------------------------------------------------------
आभाळाची माया
।। आई ।।
तूच आई, माई, माय
अन मम्मी
नाव बदलले तरी
हृदयातील प्रेम झालं नाही कमी ।।
वर्षभराच घाई घाईच काम
वाळवणं चिलवन
पापड ,कुरोड्या अन
मसाले साठवण ।।
मुलांचे गुण
चार चौघात सांगणारी
मुलांच्या संस्कार सुखात
भरून पावणारी ।।
आई ,मुलांसाठी सदा झटणारी
तोंडातील घास देणारी
त्यांच्या प्रगतीसाठी
रात्रंदिवस एक करणारी ।।
मुलांचे 100 गुन्हे माफ करणारी
ती वात्सल्याची माऊली
तिच्याच पदरी लाभते
सुरक्षिततेची साउली ।।
तीच मूल्य जपून
विश्व सरकारी
आईविना मी
सदा भिकारी ।।
--------------------------------
-मंगला डहाके, भंडारा
---------------------------------------------------------------------
[11/5, 4:51 PM] K B Sarve (mahila Sakhi Manch):
।।आई।।
आई ती आईच असते.
तूझी माझी एक असते.
माहेरची ती लेक असते.
सासरची ती मेख असते.
सौ. के.बी. सार्वे. भंडारा.
---------------------------------------------------------------------------
दिनांक- १२ मे २०२०.
विषय- प्रेम कुणावर करावे.
।।प्रेम कुणावर करावे।।
प्रेम करावे,
सळसळणार्या नदिवर,
खळखळणार्या झर्यावर,
लखलखणार्या तार्यावर,
प्रकाशणार्या चंद्रावर,
प्रेम करावे,
तळपणार्या सूर्यावर,
किलबिलणार्या पक्ष्यावर,
प्रेम करावे,
जगाच्या पोशिंद्यावर,
आईविण पोरक्या बाळावर
-सौ.के.बी.सार्वे भंडारा.
--------------------------------------------------------------------
प्रेम कुणावर करावे?
प्रेम करावे--
जगाची दोरी ज्याच्या
हाती आहे ती शक्ती
स्वामी सद्गुरू रोमारोमात
ओथंबून वाहते ,ती भक्ती ।।
ज्याच्यामुळे जीवनाला
प्राप्त झाला अर्थ
जीवनसाथी तो ,त्याच्या
विना ,नसतो काही मतितार्थ ।।
प्रेम करावे--
हृदयातला परदर्शीपणा
मोकळा करावा जिथे
सुख दुःखाच्या वाटा
जपाव्या मैत्री तिथे ।।
प्रेम करावे--
कधी काळी कामात
येणारे शेजारी
कळत नकळत
प्रेमाचा ओल जपणारी ।।
प्रेम करावे--
आपल्या घरावर,खोलवर
रुजलेल्या नात्यांवर
अंगणातल्या रंगोळीवर
चिवचिवणार्या पक्षांवर ।।
प्रेम करावे--
पोटाची खळगी भरणाऱ्या
चिंब त्या घामावर
मातीतून मोती पिकवणाऱ्या
त्या बळी राजावर ।।
प्रेम करावे--
आनंद देणाऱ्या
उत्तुंग कार्यावर
आभाळाची उंची गाठणार्या
झंझावाती धैर्यावर ।।
प्रेम करावे--
छाया देणाऱ्या वृक्षांवर
फुलणार्या फुलांवर
आनंदाच्या लहरींवर
प्रगतीच्या चालींवर ।।
प्रेम करावे--
या मानवी जन्मावर
आपल्या थोर कर्तृत्वावर
वृक्ष, फुलांवर आणि
आपल्या प्रेमावरही ।।
मंगला डहाके, भंडारा
----------------------------------------------------------------------
।।चारोळी।।
प्रेम हे प्रेम असते
तूमचे आमचे सेम असते
जमले तर प्रेम असते
बिघडले तर लफडे असते.
सौ. के. बि.सार्वे. भंडारा.
------------------------------------------------------------------/
सौ मीरा शेबे भंडारा
-----------------------------------------------------------------
सौ नंदा भोयर अमरावती
------------------------------------------------------------------
-श्री मंगेश बांते पुणे
------------------------------------------------------------------
दिनांक १३ मे २०२०.
विषय- पाणि
[5/13, 1:59 PM] __Mangala Dahake Bhandara:
।। पाणी ।।
पाणी हे अमूल्य आहे
अमृततुल्य आहे
सारितेची धार आहे
सागराचा वार आहे ।।
पाण्याचे महत्व
फारच आहे थोर
प्यायला मिळाले नाही तर
जीवाला लागेल घोर ।।
प्यायला पाणी,
स्वच्छतेला पाणी,
कपडे धुवायला पाणी
हवं झाडांना पाणी
शेतीला पाणी ।।
शरीरात असते 65% पाणी
तरीही शरीराला अती गरज पाण्याची
24 तास मिळाले नाही तर
वेळ येईल मरनागती जाण्याची ।।
पाणी जपून वापरा
उगाच करू नका व्यय
देऊ पाणी पशु पक्षांना
पण नको व्याकुलतेचे भय ।।
नाभीच्या कोसळत्या
धारांचे संचय करूया
पाणी जीराऊन
शासनाला सहकार्य करूया ।।
पाणी जिरवा, पाणी वाचवा
हा एकच मंत्र महान
चिमण्या पाखरांना देऊन पाणी
भागवू त्यांची तहान ।।
-मंगला डहाके, भंडारा
-------------------------------------------------------------------
[5/13, 2:53 PM] K B Sarve (mahila Sakhi Manch):
।। पाणी ।।
पाण्याहून सुंदर जगी कोण आहे?
पाण्याहून निर्मळ जगी कोण आहे
विचारी मना तुझा रंग कसा आहे?
ज्यात मिसळा तसा मी आहे।
पाण्यात पहावे प्रतिबिंब।
पाण्यात न्हावे ओलेचिंब।
विचारी मना तुझे रुप कसे आहे?
अथांग सागर लाटा तसा मी आहे।
पाण्याचा घ्यावा आधार।
पाण्याचे मानावे आभार
विचारी मना,तुझे तम कसे आहे?
केदारनाथ,कोल्हापूर,त्सूनामी,
विध्वंश तसा मी आहे।
पाणी हे जीवन
पाणी हे मिलन
विचारी मना,तूझे स्नेह कसे आहे?
जिकडे,तिकडे हिरवेगार,मोतियाचे सडे
तसा मी आहे।
-सौ.के.बी.सार्वे. भंडारा.
---------------------------------------------------------------------
[5/13, 3:28 PM] :Jayshri Rehapade:
🌹पाणी महती🌹
ग्रीष्मकाली हळू हळू
आटती नदी नाल
कंठातून दाटतात
हलकेच हुंदके.......
दुर ताटकळत उभ्या वृक्षांना
पतझडीचा सोसवेना मार
पाहतो बिचारा पाण्यासाठी
मेघांची चातकासम वाट......
हिमनगरात बर्फ वितळे
टिपके पाणी भरभरूनी
उन्हांच्या उत्साहाचे सोहळे
ठरतात मात्र येथे जीवघेणी....
ओंजळभर पाण्यासाठी
आसुसली बघ वनराई
जाणुन महत्व पाण्याचे
मानवा हो आता तरी उतराई.....
प्रा.डाँ .जयश्री रेहपाडे
नागपुर.
--------------------------------------------------------------------
[5/13, 3:45 PM] Meera shebe (Mahila sakhi Manch): .
💧 पाणी 💧
थेंब पाण्याचा
अमृत जीवनाचा
वाचव रे मानवा
जीवन जीवनाचा
थेंब थेंब सरीचा
पृथ्वीच्या गर्भाचा
. साठव रे मानवा
खजाना जीवनाचा.
बचत पाण्याची
गरज जीवनाची
वृक्ष-वेली,पशू-पक्षी
जीवन जगविण्याची.
थेंब थेंब हा पाण्याचा
आहे बहुमोलाचा
आत्मा साऱ्या सृष्टीचा
मार्ग धर बचतीचा.
बंद कर फुटके पाईप
गळक्या साऱ्या तोट्या
ओसंडून वाहणाऱ्या
छतावरील टाक्या.
शुद्ध ठेवा पाणवठे
नको रितेे पाण्याचे साठे
पाण्या वाचून जीवन
. आॅक्सिजन बिना पवन
निर वाहेना निरा
उदक नाही झरा
आटलेल्या विहीरी
तृष्णावली खेडे शहरी
. कोण भागवेल तृष्ण
. शुष्क मातीचा कण कण.
. अशी कशी झाली दैना
देवा सुबुद्धी दे मानवांना.
सौ.मीरा नरेंद्र शेबे
. भंडारा.
---------------------------------------------------------------------
[5/13, 5:37 PM] Nanda Bhoyar: .
पाणी
[5/13, 6:27 PM] subhash Dhande Sir: .
पाणी
---------------------------------------------------------------------
दिनां १४ मे २०२०.
विषय- मन
[5/13, 11:14 PM] Smj_Ngp_Mamata Bhoyar Nagapur:
मन माझं मन
मन हे हरणाच्या हालचाली सारखं असत
क्षणात इथे क्षणात कुठे
धाव धाव धावत
परत येऊन स्थिरावत
देवाला हात जोडताना डोळ्यात देव असतात
मानत मात्र घरातली काम असतात
अशा या मनाला आवर कसा घालू
अशा या मनाला आवर कसा घालू
तेव्हा मन म्हणत थाम्ब जरा
जास्त नको डोलू
विचार येतो मनात बा कु स माझं पुढे कस वाढऊ
माझ्या भगिनींची भेट कशी करवू
मन सांगत तेव्हा समाजभारती आहे ना
घे त्यांच्याशी जुळवून
मनाच्या हिंदोळ्यावर सतत प्रतिबिंब असत जगतगुरु तुकारामचं 🙏
प्रेरणा घेऊनि त्यांची काम कर
समाजाचं
🙏
- सौ ममता भोयर, नागपूर
---------------------------------------------------------------------
[5/14, 10:11 AM] Jayashri Rehapade:
कुणास काय ठावे
कुठे,कसे मन असते?
नजरेस न पडता हा
का मन हे छळते?
प्रा.डाँ जयश्री रेहपाडे.
नागपुर..
----------------------------------------------------------------------
[5/14, 11:59 AM] smj_Yat_Dhande Subhash Chandrabhan:
💐🎷मन 🎷💐...
मन विषारी विषारी ... जसे निवडुंगी काटे .तळ पायाशी टोचता , अश्रू डोळ्यांतच दाटे ..💐बहिणाईच्या कविता , सांगे मनाची किमया .मनी झुरता झुरता , सारी डोलते दुनिया .💐मन अवखळ फार , जसं चपळ वासरू .आता होतं गोठ्यामंधी , गेलं गेलं रानी फिरू .💐ज्याचा मनावर ताबा , त्याच्या जिभेला बंधन , देई प्रेमाची फुंकर , घाली डोळ्यांत अंजन .💐मन जपते जपते , कडू गोड आठवणी .हृदयाच्या संगतीने , चाले मनी उजळणी .💐मन हेच आहे धन , बोल बोलावे तोलून .संगतीचे चार साथी , निघे आनंदी न्हाऊन ..💐💐💐🍀🌳🎷🎷
-सुभाष धांदे , यवतमाळ .
------------------------------------------------------------------------
[5/14, 12:33 PM] संपर्क-3_ K B Sarve (mahila Sakhi Manch):
।। मन ।।
मनाचे मनाशी तरंग जोडलेले।
ऊठूनी पहाते मन मोडलेले।।
मनाचा हिंदोळा ऊंच ऊंच जाई।
ऊठूनी पहाते धरा टेकलेले।।
मनाचे तरंग मनाचिया मांडे।
ऊठूनी पहाते मन सांडलेले।।
मनात सजती स्वर्गाच्या अप्सरा।
ऊठूनी पहाते मन तुटलेले।।
मनात फुलतो मोराचा पिसारा।
ऊठूनी पहाते भांड्याचा पसारा।।
-सौ.के.बी.सार्वे भंडारा.
---------------------------------------------------------------------
[5/14, 1:48 PM] Nanda Bhoyar: .
मन
------------------------------------------------------------------------
[5/14, 2:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara:
।। मन ।।
मन हे राही,
कधी ओल्या मातीत
कधी वाऱ्या संगे
जाई निळ्या नभात ।।
मन वाऱ्या परी पाखरू
फुलावरी बसते
कधी हृदयात दडून
उगाच लपते ।।
मन शांत नदीसम
धारा वाहे किनारी ग
कधी उसळे लाटा
सखोल सागरी ग ।।
मन एका कप्प्यात
दुःखाचे गोल गरे
कधी डौलाने डूले
गाठोडे आनंदभरे ।।
मन नाते ग जपते
कधी सल ही खुपते
कधी कोसळत्या धारात
नयनी ग भरते ।।
मन हे पाखरू
अन वारा
मन क्षितिज दरु
अन शुभ्र गारा ।।
मन काळजात, हृदयात
निःशब्द ओठात
मन नयनात
प्रेमाच्या मिठीत ।।
-मंगला डहाके, भंडारा
---------------------------------------------------------------------
[5/14, 2:16 PM] Nanda Bhoyar: .
मन
सौ. नंदा भोयर
----------------------------------------------------
[5/14, 2:49 PM] Meera shebe (Mahila sakhi Manch): .
* मन *
मन एक कोडं, सोडवता सुटेना.
भल्या भल्याला त्याचं उत्तर भेटेना.
मन अशी घागर,भरता भरेना.
त्यात ओतला सागर तरी राहतो उना.
मनाची अशी तृप्ती तुळशीपत्रात सामावली.
तुला कृष्णाची तुळशीपत्रानं भरली.
मनं असं वारं, सुसाट पळतं
साखळदंड पायात तरी नाही आवरतं.
मनाचा निग्रह हिमालय जसा.
सत्याग्रह उपजला बापूंच्या मानसा.
मन कोमल मऊ जसा लोण्याचा गोळा
पर दुःखानेही मनी अतिव कळवळा.
मन आगळावेगळा सकलात हटके
हसत हसत सोसतो दुःखाचे चटके
मन हळवं असं फुंकरीनं उलगडले
पदर पदर सोडून होतसे मोकळे.
मन कणखर भारी पेले वज्राचा घाव
ढसढसा रडसी पण त्याला नाही कणव.
मनाचा स्वरजसा अंतरी विचार
मन रोगांवर नाही कोणताही उपचार.
सौ.मीरा शेबे
भंडारा.
--------------------------------------------------------------------
[5/14, 4:44 PM] Sneha Aditya Shelokar:
मन ...
"मन" किती छोटा शब्द आहे ना पण त्याचा अर्थ प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे आहे .माझ्या मते 'मन' हा आपल्या शरीराचा असा एक अदृश्य अवयव आहे जो कधीच निकामी होत नाही, म्हणजेच काय शरीराच्या काळोखात एक छोटीशी ज्योत जी नेहमी तेवत राहते ते म्हणजे मन पवित्र ज्योत जी प्रत्येक मार्गावर प्रकाश टाकते त्यावर त्यावर चालण्याची ताकत देते .बघाना लहान मुलांचं मन पवित्र असतं आहे बघाना सर्व म्हणतात लहान मुलांचं मन पवित्र असतं कारण गोष्टीची जाणीव नसते .जसे जसे आपण मोठे होत जातो तसतसा आपलं मन चंचल होत, पण जेव्हा सामंजस्य येतं तसंतसं मनावरती मेंदू आणि हृदयाचा ताबा येतो. पण जेव्हा एकांतात बसलो असताना आपल्याला आपल्या मनाची जाणीव होते ,पण त्यावर मेंदूचा ताबा सुटत नाही मला सांगा ना जेव्हा आपलं आपल्या प्रिय व्यक्ती सोबत वाहत होतो तेव्हा आपल्याला मेंदूत त्याच्या चांगल्या वाईट गोष्टी दाखवतो, आणि हृदय दुःखी आणि नाराज असतं, पण त्याच गोष्टीकडे आपण शांत मनाने जर पाहिलं तर मन आपल्याला ते वाईट गोष्टी मागचं कारण आणि त्याला समजण्याची इच्छा देतो चुकांना समजून पुढे जाण्यासाठी.म्हणून म्हणून नाती मनाने सांभाळावी. नाही की! हृदयाने क्षणात तुटुन जातील जे क्षणात तुटुन जातील. मनाचा प्रवाह जेव्हा संथ होतो ना मग त्याच्यावर किती आणि कशाचे पण आघात होऊ द्या नाही फरक पडणार, आणि चंचल मनावर जर तुम्ही ताबा ठवलात तर तुमच्या एवढा मोठ्या मनाचा कोणीच नाही. हे नक्की !.'मन समाधानी तर जगात तुमच्या एवढा श्रीमंत कोणीच नाही आणि मनाने कुणीच वाईट नसतं हो'!
Sneha Aditya shelokar
------------------------------------------------------------------------
[5/14, 10:09 PM] Anushri Dhande Raghorte: .
मन
---------------------------------------------------------------------
दिनांक १५ मे २०२०.
विषय- परिवार
[5/15, 11:06 AM] _Kukade Veenatai Nagapur:
कुंटूब.
कुंटूबाला निसर्गासारखा
रंग हवा असतो.
कुंटूबाला फुलासारखा
गंध हवा असतो
कुटूंबात निसंकोच आत्मियतेने
हूरूदयातून आयुष्यभर जपण्यासाठी
जोडलेल नांत हव असत
कुंटूबाला हव असतो
विश्वास व मोठय़ाचा मान सन्मान
कुंटूब असतो तेव्हाच
सुखी समाधान
🙏
-वीणाताई कुकडे, नागपूर
---------------------------------------------------------------------
[5/15, 12:43 PM] K B Sarve (mahila Sakhi Manch):
।। परिवार ।।
जसा शरीराला पोषक चौरस आहार।
तसा मन,भावनेला पोषक परिवार।।
आचार,विचाराचे आदान,प्रदान
म्हणजे परिवार।
सुख,दु:खाचे वाटप म्हणजे परिवार।।
उन-उन खिचडी साजूकस तूप न
वेगळ व्हायच वेगळ सूख नव्हे ।
आजोबाचे रागावणे,आजीच्या गप्पा ।
आईची शिस्त,वडीलांची भिस्त
भावाचा आधार, बहिणीचे प्रेम
काकांची देखरेख,काकूचे वळण
सार्यांचा मान।
अंगत-पंगत छान।।
वाढवी परिवाराची शान।।
सौ. के. बी. सार्वे भंडारा.
--------------------------------------------------------------------
[5/15, 2:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara:
।। परिवार ।।
आई बाबा, आजी आजोबा
ज्यात नांदती सौख्याने मुले
असतो स्नेह मनात
सदा प्रेमाने नाती जपणार ,तो परिवार ।।
घर ,भिंतींचे सजणे नव्हे
सौजन्य, स्वतंत्र अस्तित्व
शब्दांना मान देत
सारे फुलांपरी फुलणार, तो परिवार
नात्यांचा आदर, सहकार्याचे
भाव, विश्वास असावा अपार
कोंदणात मैत्रीचे नाते
संस्काराची उंची गाठणार, तो
परिवार
पिठलं भात, पंगत मिळुनी
हसून खाती गोड माणुनी
अधिकाराचे करे, नसावे
कर्तव्य ओंजळ सांभाळणार, तो
परिवार
घराला गर्वाचा रंग, रूप नसावा
त्यागाचा साज असावा
समाजदारी चा ताज असावा
प्रत्येकाच्या डोळ्यात परासरांसाठी पाणी असणार तो
परिवार ।।
-मंगला डहाके, भंडारा
-----------------------------------------------------------------------
[5/15, 3:16 PM] Nanda Bhoyar: .
-सौ. नंदा भोयर, अमरावती
--------------------------------- --------------------------------------
[5/15, 3:20 PM] Nanda Bhoyar: .
-चारोळी-
-नंदा भोयर अमरावती
-------------------------------------------------------------------------
[5/15, 5:42 PM] Subhash Dhande Sir: .
कुटुंब
-सुभाष धांदे सर, यवतमाळ
---------------------------------------------------------------------------
दिनांक १६ मे २०२०.
विषय- जत्रा
[5/15, 11:04 PM] Meera shebe: .
सौ. मीरा शेबे, भंडारा
---------------------------------------------------------------------
[5/16, 9:00 AM] Ken_Kukade Veenatai Nagapur: 🙏
जत्रा
चल ग चल सखे जत्रेला
पंचमढी चौरागड ची जत्रा फीरवतो तुला
चल ग सखे जत्रेला
जत्रेतील दुकान ल्ई ल्ई भारी
हातातल्या बांगड्या गळ्यातील सरी
पायातले पैजन नऊवारी साडी
जत्रेतील मजाच भारी
जत्रेत खाण्याची मजाच मजा
गरम गरम जीलेबी कांदाभजी
शेवचिवडा बेसणाची पापडी
उंच पाळणे फीरवतो तूला
चल ग सखे चल ग सखे जत्रेला
🙏
-सौ. वीणाताई कुकडे, नागपूर
--------------------------------------------------------------------
[5/16, 9:48 PM] Subhash Dhande Sir: .
जत्रा
- सुभाष धांदे सर, यवतमाळ
------------------------------------------------------------------------
[5/16, 11:13 AM] +91 98811 46633:
🎃साहित्य जत्रा🎃
मते साहेबांच्या आशिर्वादाने
बी .के. स .वर भरली साहित्य जत्रा
जमले सारे कवी घेवुन त्याच्या
दर्जेदार कविता......
सुभाष भाऊंचा दरारा मोठा
जत्रेवर त्यांचा खडा पहारा
दिवसभरात एकदा हजेरी लावतात
मोत्याच्या अक्षरांत कविता सजवितात.....
मंगला ताईची बातच न्यारी
जिभेवर शब्द अन् हातात लेखणी...
गण गणात बोते म्हणत
गजाननभाऊ
येतात
अलगत समाजाच्या समस्या मांडुन
जातात.....
मिरा,मंगला,सारवेताईना
साहित्याची पारख भारी
कवितेतुन करतात
स्त्रीयांच्या वेदनांवर मलमपट्टी...
ओमप्रकाश भाऊंना मानाचा मुजरा
नामवंत कवी तुम्ही
समाजालाअभिमान तुमचा....
ममताताई, सुधाताई म्हणे
आम्ही नवशिक्या कवी
समाजाच्या विकासासाठी
आमचा आवाजच भारी....
साहित्य जत्रा पडलीपार
जयश्री म्हणे मैत्रीनीनो
खुप खुप आभार
आपणच राखु या
आपल्या संस्कृतीचा मान....
प्रा.डाँ. जयश्री रेहपाडे.
नागपुर.
-----------------------------------------------------------------------
[5/16, 1:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara:
।। जत्रा ।।
पूर्वी गावामध्ये जत्रेत
देवीची पूजा राहायची
कोंबड्यांची आपसात
पैज लागायची ।।
आता जत्रेच रूप
झालं प्रदर्शनी अन मेळ्यात
विविध रंगी दुकान
खरेदी करायची त्यात ।।
जत्रेत, मित्र मैत्रिणीसोबत गप्पा
विविध पदार्थ खाणे
घ्यायचे लोणचं, मुराब्बा
मजेत झुल्यावर झुलणे ।।
जत्रेत लहानमोठ्या
आरशात बघणे
आपलेच चेहरे विदूषकी
मग खूप खूप हसणे ।।
कौन अच्छा, कौन बुरा
गाढवाचे ओळखणे
आप्त स्वकीयांच्या भेटी
भरपूर मजा करणे ।।
लहान मुलांपरी
काही क्षण उपभोगावे आनंदात
जत्रेचीही मजा घ्यावी
आपल्या धकाधकीच्या जीवनात।।
-मंगला डहाके, भंडारा
-----------------------------------------------------------------------------
[5/16, 1:49 PM] K B Sarve (mahila Sakhi Manch):
।। जत्रा ।।
कुणी रानात भुलते ।
जत्रेत भुलले मी।।
मला कोणी न दिसे परका।
आपल्यातच भुलले मी।।
कित्येक वर्षे जत्रा भरलीच नाही।
जत्रेत या बेभान झाले मी ।।
जत्रेतील लोक रंग।
पाहून दंग झाले मी ।।
हौश्या, गौश्या ला खुशरंग करी जत्रा।
खुशरंग्याचे भाव पाहूनी बेधूंद झाले मी ।
डि.एम. चे सौजन्य,
बी.के.ची जत्रा।
पाहून धन्य झाले मी ।।
-सौ. के. बी. सार्वे. भंडारा.
------------------------------------------------------------------------
[5/16, 2:37 PM] Nanda Bhoyar:
"जत्रा"
पडके पुडके घर अन कूडाच्या भिती
तरी आमच्या जत्रेची दुर दुर ख्याती
म्याह्या गावची जत्रा काही औरच असते
साऱ्या रस्त्यानं फद फद मातीच दिसते
मातीत मले लयच मस्त राजा वाटते
जुने पुराने दोस्त खुप दिवसान भेटते
जात घेऊ का पाट घेऊ असं मले वाटते
अन गर्दीत लोक राजेहो भलतेच खेटते
मंग दिसते अगसपायना जाव वाटते बसुन
भज्याचा वास माया नकात भरते ठासुन
लक्ष गेल भुटाण्यावर घेतला एक घास
चिवड्याचा सुगंध एकदम खास
मन जाते भज्यात दिसते कच्चा चिवडा
मंदातच येते माया घरा जवळचा बेवडा
देत का मनते दहा रुपये मले
संध्याकायी म्हणे तुले दाखवीन शोले
जत्रेतली टाकीज लय मस्त असते
भोगदाडातुन काणी पुरा सिनेमा दिसते
काय मज्या असते जत्रेची नाही ?
ते दिवस कवा येतीन काही सांगता येत नाही
-नंदा भोयर
--------------------------------------------------------------------
दिनांक १७ मे २०२०.
विषय- दुःख
[5/16, 7:01 PM] संपर्क-3_ K B Sarve (mahila Sakhi Manch):
।। दु:ख ।।
दु:ख ठेवावे झाकून।
सुख पहावे लपून।।
दु:खाचा मांडू नये बाजार ।
सुखाचा करु नये प्रचार।।
जे जे लेणे ते ते कायाच बोलती।
जे जे पाहे ते ते वाचाच बोलती।।
दु:खाचे बोलणे समजेना कोणी ।
सुखाचे बोलणे ऊमजेना कोणी ।।
भूकेल्या पोटी भेटेना घास।
भरलेल्या पोटी पंचपक्वानाचा वास।।
नागव्याला भेटेना लक्तरे ।
झाकल्याला साभाळेना जरतारे।।
कुडाच्या झोपडीत फिरकेना कोणी।
महालात या लाईन लागोनी ।।
दु:ख ठेवावे मनात।
सुख सांगावे जनात।।
सौ. के .बी. सार्वे भंडारा.
----------------------------------------------------------------------
[5/16, 10:18 PM] Ken_Kukade Veenatai Nagapur:
दुःख
दुःख म्हणजे काय
मुलगी जन्माला आली ते दुःख
वंशाला दिवा लावणारा नाही ते दुःख
मुलीच आहेत म्हणून वारसा हक्क नाही ते दुःख
मुलीच आहे म्हणून घरातून बाहेर काढणे ते दुःख
मुलीचे लग्न करतानी जो त्रास होतो ते दुःख
मुलीच संसार सुरळीत नसला ते दुःख
घरच्यांनी कधीच साथ न दे ते दुःख
आपल्याला वाटतं काही तरी कराव बाहेर पडावं
म्हणून समाजात समाज कार्य व राजकारणात राजकारण करून तीथेपण यशस्वी नाही ते दुःख
समाजातील लोक महिलांन विषयी भेदभाव करतात ते दुःख
सौ. वीणाताई कुकडे, नागपूर
🙏🙏
----------------------------------------------------------------------
[5/16, 10:55 PM] Sneha shelokar:
दुःख
सुखाचा आस्वाद देणारं.
सुखाची जाणीव करून देणारं.
आयुष्यात कणखर बनवणारं.
नशिबाशी चार हात करण्याची ताकद देणारं.
आयुष्यात चार गोष्टी शिकवणारं.
स्वतःला स्थिर आणि स्तब्द बनवणारं.
दुःखाच्या उबे तून निघून सुखाच्या गारव्याचा आनंद घेण्याची शिकवण म्हणजे दुःख.....
-Sneha Aditya Shelokar
--------------------------------------------------
[5/17, 7:01 AM] Teena Titarmare:
💐।।दुःख।।💐
🙏🙏🙏
मित्र जीवनात दुःख खूप असेल
पण दुःखाच्या शेवटी सुख आहे
😭
दुःखात स्वतःला सांभाळून तर ठेव
सुख तुझी वाट पाहत आहे
😭
जगण्याचा हा नियमच वेगळा आहे
दुःखातही सुख शोधता आले पाहिजे
😭
सुख तर शेवटी तुझंच आहे
तुला दुःख सोसता आले पाहिजे
-टीना तितरमारे
------------------------------------------------
[5/17, 10:29 AM] Meera Sheb
🙏-असे का असावे.-🙏
असेच का दुःख सोसता
चेहराभर हासायचे
असेच हासता हासता.
हळूच दुःखात वि व्हळायचे
का पांधरायचे दुःखाचे पांघरुण
भळभळणाऱ्या या जखमांचे?
आभाळ फाटलेल्या या नभाला.
लागतिलच कधीतरी हसण्याचे
डोहाळे......
सौ .जयश्री रेहपाडे
नागपुर...
--- ----------- ---- ---- - --------------- -- ---------
[5/17, 11:12 AM] Subhash Dhande Sir
दुःख
---- - ------ - --------------------- -----------
[5/17, 12:13 PM] Meera shebe:
दुःख
-सौ. मीरा शेबे, भंडारा
--------------------------------------------------
।। दुःख ।।
दुःखच दुःखाला गर्तेत नेत असतो
सावरल्या दुःखावर
पुन्हा मीठ चोळून जातो ।।
पहाडासारखं दुःख
आम्ही भोगलं आहे
सोसलं आहे,
सोसत आहे ।।
कुणी घरासाठी, इस्टेटीसाठी
दुःखाची अनेक कारणं
एका शब्दानेही
विव्हळत कधी कधी मन ।।
माझ्या काळजाच्या तुकड्याला
जो सुर्यप्रभावी,केले देवाने अपहरण
दुःखाचे नाही का
आयुष्यातले मोठे कारण ।।
दुःखाचा डोंब उसळला
नायनातुनी धारा कोसळल्या
या विषयातच ,माझ्या
दुःखकला पुन्हा उभ्या राहिल्या ।।
नयनी दुःख वसते, काळीज थरथरते आहे
पांघरून घालून दुःखावर
ओठ हे हसते आहे ।।
कुणाच्या वाट्याला येऊ नये हे क्षण
साहित्याची झोळी पुढे करून
हसत हसत सोसते हे
दुःख आमचे मन ।।
ह्या दुःखाला नाही सीमा
कवतालीत बसले,आयुष्य होईल बिनकामा
काया मनाने मी मग्न सदा
दुःख विसारण्या यत्न कित्येकदा ।।
बोचरे दुःख समोर येई
आठवणीत चक्षुधारा घेऊन जाई
श्वास,कंठ दाटतो,त्या स्मृतीने
अंधारातही दीपस्तंभ दाविला,वरद आणि सिद्धने ।।
मंगला डहाके, भंडारा
---------------------------------- -----------------
।।माझ्या दु:खाच्या चारोळ्या ।।
१ दु:ख गोंजारत बसले,
कुणी ढुंकून पाहेना ।
आनंद ऊधळत बसले,
गर्दी पेलवेना।।
२ दान वाटाया बसले,
घेणारे ऊठेचिना ।
दु:ख वाटाया बसले,
घेणारे बसेचिना।।
३ दान वाटाया गेले,
घेणार्यांची रांग लागलेली।
दु:ख वाटाया गेले,
स्मशान शांतता पसरलेली।।
सौ. के. बी. सार्वे भंडारा.
---------------------------------- -----------------
दिनांक १८ मे २०२०.
विषय- भूक
🙏🏻🙏🏻भूक 🙏🏻🙏🏻
भूक क्षमविण्यासाठी मी मार्ग शोधतो आहे ।
जगण्याच्या खडतर मार्गी , मी घायाळ होत आहे ॥ धृ ॥
अस्तित्व जीवनाचे
टिकण्यास अर्थ आहे .
यशाच्या शिखरावरती ,
चढण्यात गर्व आहे .
भूक अशी शिक्षणाची ,
मी शोधण्यात व्यस्त आहे ॥ 1॥
कष्टाचे ओझे वाहता ,
सारे शरीर जीर्ण झाले .
या टीचभर पोटासाठी ,
काळीज चर्रर्र झाले .
पोटातली भूक माझी आता भाकर शोधते आहे ॥ 2॥
संसारी जीवनात ,
कुणी प्रेमास मुकले आहे
प्रेमाची भूक त्यांची ,
दास्यात फसली आहे .
त्या फसव्या प्रेम क्षणाला
मी हाक देत आहे .॥ 3॥
धुंदीत चाले कुणी ,
गर्वाचे सारे धनी .
पैशाच्या भुकेपायी ,
जिंदगी घाले कुणी .
मदमस्त त्या भुकेचा , मी गुलाम होत आहे ॥ 4॥
नेत्यांची फौज मोठी ,
सत्येची भूक मोठी .
खोट्या आश्वासनांची ,
खैरात वाटे मोठी .
' दळभद्री ' अशा नेत्यांची मी ' जात ' शोधतो आहे ॥ 5॥
शेतात बाप माझा ,
आटवतो रक्त त्याचे .
साऱ्याच भुकेल्यांच्या , पोटात अन्न त्याचे .
' अन्नदात्यास ' अशा मी , प्रणाम करतो आहे ॥ 6॥
भूक क्षमविण्यासाठी मी मार्ग शोधतो आहे .
जगण्याच्या खडतर मार्गी मी घायाळ होत आहे .....
$सुभाष धांदे , यवतमाळ
दिनांक 18/05/2020.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।। भूक ।।
दे, वो माय भाकर तुकडा,
पोरग उपासी हाय।
तैतिस कोटि पावन तुले,नवस बी पूर्ण होय।।
नवरा बी लंगडा,
सासू बी आंधळी पोरगी बयताड हाय।
दे वो माय भाकर तुकडा ।
पोरगा भूकेला हाय ।।
भांडे बी घासते,कपडे बी धुते,
थोडस खायला दे।
पाणी बी पेलो, चाय बी पेलो।
भूक च जात नाय ।।
दे वो माय भाकर तुकडा।
पोरगा भूकेला हाय ।।
शिळ बी चालन,
आंबल बी चालन,
इटल बी चालन ।
फेकू नको तू माय।।
दे वो माय भाकर तुकडा,
पोरग भूकेला हाय।।
सौ. के. बी. सार्वे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
माझी दुसरी कविता.
।। भूक ।।
भूक अन्नाची,भूक प्रेमाची,भूक वासनेची ।
भूक कोणती मला उमगलीच नाही ।।
अन्नाच्या भूकेला,
शिळे, उष्टे,आंबलेले,नासलेले,
उष्टया,पत्रावळीही चालते।
भूके समोर लाचार आहे मी ।।
प्रेमाच्या भूकेला,
आई,बहिण,बायको,
मूलबाळ,प्रेयशीही चालते।
प्रेमाच्या भूकेचा भिकारी आहे मी
वासनेच्या भूकेला,
येथे ही भूकेचा बाजार भरला आहे,
सहा महिण्याच्या तान्हूली पासून ,ऐंशी वर्षाच्या आजी पर्यंत
कोणीही चालते।।
येथे भूकेचा नराधम बनलो मी ।।
भूक कोणतीही असो लाचार बनविते मानवाला।।
मी।।
सौ. के. बी.सार्वे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
भूक
भूक पोटाची,भूक शेतीची
भूक कामाची, भूक नावाची
भूक धनाची, भूक मानाची
भूक प्रेमाची, भूक संसाराची
भूक सुंदरतेची, भूक समाज कार्याची
पण सर्वात मोठी अन
प्राथमिक भूक पोटाच्या खलगीची।।
मंगला डहाके, भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
दिनांक- १९ मे २०२०.
विषय- ऋणानुबंध
श्रृणानुबंधाचे श्रृणानुबंधाशी जुळली नाती ।
स्वर्गातच जुळतात श्रृणानुबंधाची नाती।।
श्रृणानुबंध मित्राचे,
श्रृणानुबंध नात्यांचे,
श्रृणानुबंध शेजार्यांचे,
श्रृणानुबंध समाजाचे,
समर्पित होऊन निभवित जावे,
श्रृणानुबंधाची नाती।।
फेडीत जावे पांग सारे ।
जपून श्रृणानुबंधाच्या नाती ।।
श्रृणानुबंधाच्या, श्रृणानुबंधाशी
जुळल्या नाती ।।
सौ. के .बी .सार्वे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
ऋणानुबंध💓💓
ऋणानुबंधाचे नकळत जुळले धागे
भेटण्यास मन धाव घेई वेगे.
पूर्व जन्मीचे असतील संचित
प्रेम लाभले अकल्पित अवचित.
असेच लाभो आशिष तुमचे
सार्थक होईल मम जन्माचे.
सेवेसाठी अर्पण जीवन
तुमचे जीवन माझे दर्पण.
अदृश्य भावना अदृश्य बंधन
न कसली आशा फक्त समर्पण.
न जोडता हे बंध जुळती
ना कुठली ओळख ना कसली नाती.
ऋणानुबंधाचे नकळत नाते
स्व अस्तीत्व हरवून जाते.
रक्तता पलीकडच्या विश्वासाचा
जपून ठेवा, ठेवा हा मोलाचा..२
सौ.मीरा शेबे
. भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।।ऋणानुबंध।।
काही ऋणानुबंध असतात पूर्वजन्मीचे।
काही असतात नव्या नवलाईचे।।
सुटता गुंतता गोड कोडी ऋणानुबंधाचे।
धागे,दोरे भेटत जातात मनामनाचे।।
अडकून पडतो माणूस ऋणानुबंधात।
अन मन अडकते कित्येक द्वंद्वात।।
साधू संत सांगतात भान असावे बंधनांत।
देहांतानंतर ऋण विसावते पांडुरंगात।।
जन्मदाते व विधात्यातून मिळालेला मुक्त होण्याचा अर्थ।
धन्यवाद देऊनी,क्षमा मागुनी, क्षमा मागुनी धन्य होऊन जाणे हेच ऋणानुबंधाचे सार्थ।।
-सौ. रेखा ढबाले
पुणे
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
ऋणानुबंध----
म्हणतात देवच पाडतो
लग्नाच्या गाठी
हाती नसतात आपुल्या
आयुष्याच्या काठी ।।
ग्रुप आधारे कुणी भेटे
परिचय पुन्हा मिळे देऊन
उपवर-वधूची महती घेऊन
घट्ट होती नाते बंधन ।।
हात हाती घेऊन
जीवनी फुले प्रेम गंध
जनमान्य विवाह सोहळा
इथेच जुळती ऋणानुबंध ।।
आहे आज वर्धापन दिन
B.K.विवाह संपर्क ग्रुपचा
पुढील वाटचाल यशस्वी होवो
ह्याच, खूप खूप खूप शुभेच्छा ।।
---------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
ऋणानुबंध
जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय
कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसतं
फक्त प्रेमळ नात्याच्या या रोपट्याला
विश्वास रूपी पाणी हवा असतं
निस्वार्थी नाती जपणं
ंहल्ली लोकांना जमत नाही
जे प्रामाणिक पणे निभावतात
त्यांच्या अश्रूंना बाध मात्र मिळत नाही
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
विषय- अस्तित्व
अस्तित्व 🌷🌷
जगण्याच्या लढाईत
अस्तित्व टिकवावे लागते
साऱ्या जखमी संकटाशी
मग लढावे लागते.
विकासाच्या पाऊलखुणा
आणायच्या असेल घरात
आत्मविश्वासाची शक्ती
रुजवायची असते मनात .
अस्तित्व हे जपण्यासाठी
निर्धार करावा लागते
मन , मस्तिष्क, मनगटाशी
दोस्ती करावी लागते .
येतील अनेक वादळे
होईल जीवन बेचिराख
पुन्हा नव्या उभारीने
करू साजरा सण ' बैसाख '
वणव्याचे डोंब उसळों
की उसळों भारी चक्रवात
' स्व' ला ' स्व'ची जाणीव होण्यास
ताकद भरू मनगटात .
काळे जरी मेघ आले
आच्छादुन जीवनात
मेघावर त्या स्वार होऊन
भिजू सुखाच्या पावसात.
💐💐सुभाष धांदे, यवतमाळ 💐💐
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।। अस्तीत्व ।।
अस्तीत्वाच्या या लढाईत,
कोण जिंकेल,कोण हरेल माहीत नाही।
पण अस्तीत्व टिकविण्याची ,
स्पर्धा मात्र जीवघेणी आहे।।
ब्रम्हाडांतील सारेच जिवजंतू,
अणूरेणू अस्तीत्व जपण्यासाठी
सरसावले आहेत।
कोण जिंकेल कोण हरेल माहीत नाही।।
अस्तीत्वासाठी लढते आहे
अस्तीत्वाची लढाई।
कोण जिंकेल,कोण हरेल माहीत नाही।।
अस्तीत्व टिकाया विश्र्व मोकळे,
परि कर्तुत्व कराया मन तोकडे।
कोण जिंकेल, कोण हरेल माहीत नाही।।
परि सद्य स्तीती जो घरी राहील
त्याचे अस्तीत्व टिकेल।
अस्तीत्वाच्या या लढाईत,
कोण जिंकेल, कोण हरेल माहीत नाही।।
सौ. के. बी. सार्वे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
🙏 अस्तित्व. 🙏
माझेच अस्तित्व तुडविता काअसे सारे ?
माझ्याच भावनांचे का घोटता गळे?
लिंगभेदाचे का सर्वानाच असे वावडे ;
आईच्या उदरात का गरभपरिक्षण व्हा वे?
वंशाच्या दिव्याने घर का सारे उजळावे?
पणतिनेच का गर्भातच जीव गमवावे ?
स्वतःच्या पायावर का मारता असे धोंडे?
मुलींच्या अस्तित्वाचे गातिल का पोवाडे?
सांगा ,आणाल कुठूनी दिवा तेवण्यास प्रकाश
देवा, मुलगी दे म्हणुनी मागाल भिक त्यास.
नारीशक्तीचा गाशील मानवा तू गाणे
नारीविण अस्तित्वच नसे म्हणशील कुणाचे!!
सौ जयश्री रेहपाडे.
नागपुर.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
अस्तित्वासाठी ....
अस्तित्वासाठी ही सारी धडपड... शब्दात मांडलेले हे प्रत्येकाचे अंतरंग.... आहेत आतिसुंदर.... प्रत्येकाचा विचार वेगळा ..... वेगळा बाज शब्दांचा ....पण फिरून प्रश्न अस्तित्वाचा .....अस्तित्व टिकवणे आपल्या हाती ....प्रत्येकाने करावे प्रयत्न त्यासाठी....कुणीही नाही सर्वगुणसंपन्न.... प्रत्येकाचे वेगळे अस्तित्व....नाही ही कविता सुबोध सुघड ....पण आहे माझे मनोगत उघड उघड .....आपल्या सर्वांसाठी 🙏🙏
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
अस्तीत्व
अदृश्य रुपातही असतो संचार
मन मनाला अस्तित्व साकार.
चैतन्याचे रुप पाही अंतःकरण
त्याच्या अस्तित्वाची त्यास असे जाण.
चंचल पवन न दिसे नयन
स्पर्शाचे अस्तित्व संवेदन.
वासाचे अस्तित्व जाणती नासिका
डोळीयासी त्याची जाणीव का?
डोळ्यांनी जाणवे साकार ते रुप
अदृश्य अस्तित्व पावती लोप.
अस्तित्वाचे रुप जाणवते मना
देवाची या भारती त्यासी कारणा.
प्रगटीले रुप पाही सारे लोक
अप्रगट अस्तित्व अंधाराचे सुख.
संकटे होती पार विश्र्वास अस्तित्वाचे
नामस्मरणे होती दर्शन हरीचे.
त्याचेच अस्तित्व आहे ठाई ठाई
पालटूनी रुप धाव घेई विठाई.
सौ.मीरा शेबे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
दिनांक- २१ मे २०२०.
विषय- श्वास
।। श्र्वास ।।
तूझ्या एका श्र्वासात सर्व आहे.।
म्हणूनी म्हणते गर्वात काय आहे.।।
श्र्वासाला गर्वाची गरज नाही ।
गर्वाला श्र्वासाची गरज आहे ।।
सुखदु:खाची किनार,तुझ्या श्र्वासात आहे।
जीवनातील हिरवळ,तुझ्या श्र्वासात आहे।
म्हणूनी म्हणते जप त्या हिरवळीला।।
ज्यात तुझा श्र्वास दडलाय.
तुझ्या प्रेमालाही श्र्वासाची,
गरज भासे।
पण श्र्वासाला किंमत नाही,।।
म्हणूनी म्हणते ,
जप त्या हिरवळीला,
ज्यात तुझा श्र्वास दडलाय.
श्र्वासावाचून जिणे ऊणे,
गर्वासवे जिणे सुने।
तुझ्या एका श्र्वासात सर्व आहे।
म्हणूनी म्हणते तूझ्या गर्वात काय आहे।।
जप त्या हिरवळीला ,ज्यात तुझा श्र्वास दडलाय।।
सौ. के.बी.सार्वे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।। श्र्वास ।।
या श्र्वासावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे,शतदा प्रेम करावे।
श्र्वासावाचून कुणी न ऊरला।
श्र्वाससोडूनी रिता परतला।
करिसी नमन त्या श्र्वासाला।।
या श्र्वासावर,या जगण्यावर
शतदा प्रेम करावे।।
फुका मारीती जगी बढाया ।
परि न चालती श्र्वासापुढती,
त्या लिलया।।
श्र्वास रोखूनी कर तू किमया.
या श्र्वासावर या जगण्यावर
शतदा प्रेम करावे,शतदा प्रेम करावे।।
सौ. के. बी. सार्वे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
"श्वास"
दोनच अक्षरी शब्द
किती त्यात दडलं आहे
श्वास निघून गेला तर
शरिर निकामी पडलं आहे
आभार आपण मानु श्वासाचे
ज्यामुळे जगतो आहे
संपूर्ण खेळ जिवनाचा
आयुष्य भर खेळतो आहे
पाण्याचा बुडबुडा तो
कधी फुटून जाईल
म्हणुन मी या दोन अक्षरी शब्दाची
आयुष्य भर ऋनी राहिल
- नंदा भोयर
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
🌹श्वास🌹
जीव कधीचा धडधडे
श्वास लयीत चाले
हलकेच मज जाग येई
तुझ्या मंद सुवासाने......
श्वासात लय वाढे
जीव होई वरखाली
रक्तांत उसंडी मारी
चैतन्याचे रुप सावळे.......
पेटून कशी उजळली
ही शुभ्र पहाट बेला
मनमोहक तुझ्या रुपात कृष्णा
प्राण माझा का गुंतला.......
श्वासाचे ओझे जीवाला
प्राणात भक्ती दाटली
दर्शनासाठी प्रभु तुझ्या
जीव कंठाशी आला........
कृष्णांचे हास्य श्वास माझा
कृष्णांचे चरण श्वास माझा
कृष्णांची बासरी श्वास माझा
कृष्ण भक्तीत जीव रंगला.......
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
दिनांक- २२ मे २०२०.
विषय- जीवनगाणे
🎻🎺जीवनगाणे सदा फुलू दे ! 🎻🎺💐
कधी सुखाला , कधी दुःखाचे ,
ओझे होई फार ।
आयुष्याच्या रडगाण्यांनी
दुःख दिसे अपार ।
हसऱ्या क्षणाची दुखरी नाती ,
भरून ठेवे उरात .
कसे सुटे मग कोडे त्याचे
उभ्या आयुष्यात ?
नको दुरावा , नकोच कष्टी ,
जीवन नसे आभासी
जीवनाच्या वाटेवरती
मंगलतेचे बनू प्रवासी .
आनंदाचे जग हे सारे
राहू आनंदात .
सदा कपाळी आठ्या नुसत्या ,
नकोच या मनात .
दारिद्र्याच्या वादळवारी
आस धरावी श्रीमंतीची
जीवन भासे सुंदर मग ते
वाट असे ही आनंदाची .
जीवनगाणे सदा फुलू दे
झुलू दे तुझ्या ओठात
मग पहावे क्षण आनंदी
कसे येते जीवनात ?
💐💐💐💐
सुभाष धांदे सर , यवतमाळ .
दिनांक 22/05/2020
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
जीवन गाणे-----
जीवन गाणे गातच राहावे
झाले गेले विसरुनी जावे
पुढे पुढे चालावे ।।
जीवनाच्या वाटेवरती
सुख दुःखाच्या वेली
कधी निथळते
हळूच पाणी गाली
तरी ओंजळ भरुनी, देवाला स्मरावे ।।
जीवन गाणे गातच राहावे ----
अचानक वादळ सुटले
धो धो पाऊस आला
संसार भिजला
चूल थोडी अन काड्यानचे पेर राहिले
पण न हरता , ताठ उभे राहावे ।।
जीवन गाणे गातच राहावे -----
पक्षी किलबिलती
पिलांसाठी चोचीत दाणे टिपती
ना तक्रार ,रुसवा कधी
फुगवा कधी
त्यांच्यापासून बरेच आम्ही शिकावे ।।
जीवन गाणे गातच राहावे ----
सूर्याचा ast होऊनी
नवी पहाट होते
चैतन्याची उषा नव्याने
जिणे शिकविते
राविकिरणांच्या तेजाने, पुन्हा प्रफुल्लित व्हावे ।।
जीवन गाणे गातच राहावे ----
या हातावर पोट हो त्यांचा
आज कमावले नाही
उद्या भुकेने व्याकुळ मुले
नयनी बांध फुटला राही
तरी ओठ सदा , हसरे दिसावे ।।
जीवन गाणे गातच राहावे
झाले गेले विसरून जावे
पुढे पुढे चालावे -----
मंगला डहाके, भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।। जीवनगाणे ।।
जन्मापासून सूरु होते जीवनाचे रडगाणे ।
तेच शेवटपर्यंत पूरते जीवनगाणे।।
बालपणीच्या त्या स्वरालाही असे रस।
मोठेपणी त्या रसाचा होतो बेरस।।
कधी वीर रस ललकारी सर्वांना ।
कधी करुण रस रडवी ईतरांना ।।
हास्य रसाने ते तारुण्य उसळून निघे।
शृगांर रसही त्याला सजवाया निघे।।
दर्दभरे ते म्हातारपण गेल्यानेही जात नसे।
जीवनाचे ते अंतिम सत्य हेची जीवणगाणे असे।।
सौ. के. बी. सार्वे. भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
माझी दुसरी कविता.
।। जीवनगाणे ।।
जीवणाच्या या रडगाण्याला ,
आनंदाने झेलत आले मी।
जगतानाही जीवनगाणे
आनंदाने गातच आले मी ।।
गाठत आली सर्व पायर्या,
परि सर्वांच्या मनात आहे मी।
भंयकर त्या दु:खातही ना
डगमगले मी।
खळखळ हसून, हसवत जगले मी।।
खळखळणार्या हसण्यालाही
दृष्ट लागावी असेच खळखळ हसत जगले मी।
नाही अपेक्षा,नाही उपेक्षा
नाही रुसणे नाही रुसविणे
हसत जगावे,हसत मरावे हेची
माझे जीवणगाणे।।😁😁😁
सौ. के. बी. सार्वे. भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
जीवणगाणे
असे गावे जीवनगाणे, पेलत अंगार हाती.
नजरेत असाव्या ज्वाला, अन् शब्द मृदु ओठी..
नको गुलामी जातीपातीची,डोळ्यांवरी पट्टी अंधाराची
आयुष्याला सामोरे जाताना मित्र, देतिल साथ आधाराची...
कडी कडी जोडत जावी, समाज करावा बलशाली.
मार्ग तयाला मिळतिल सत्तर,इच्छा असावी दांडगी
पाय असावे जमिनीवरती, ओठी पेरावी साखर
इतरांना हसविताना ,शब्दांना जागावे निरंतर
माज नसावा जाण असावी, दु:खाना सावरताना
मिळतील अनेक दगड धोंडे, आयुष्यातुन उठवताना
करावे असे काहीतरी; नाव असावे सर्वाच्या मुखी
निरोप देताना शेवटचा, हळहळतील सारी....
स्वर होतिल कातर,काळही थांबेल क्षणभरी
नजरेत रोखुन नजर, गावे असे जीवनगाणे....
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
जीवन गाणे🦋🦋
जीवन गाणे
तेच तराणे
तोच संगीत
तेच स्वर.
तोच चंद्र
तोच सूर्य
तोच वारा
तिचं धारा.
सारे काही नित्याचेच.
जीवन अपुले यंत्राचेच.
काबाडकष्ट धावपळ
मनात एक सळसळ.
जीवन गाणे रोजचेच
तरी शब्द नव्या उमेदीचे.
धडपडायचे पडायचे
पडलेल्या नंतर उठायचे.
रोज शिकावा नवा पाठ
नविन वळणे नवे घाट
घाटा घाटात शोधू वाट
उजाडेल नवी पहाट.
. सौ.मीरा शेबे, भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।। *जीवन गाणे* ।।
जीवनाच गाण हे
एकट्याच नसतं
कुटुबा सोबत ते
म्हणायच असतं
नाही तीथे तबला
नाही तीथे पेटी
दोघांनीही गाण म्हणायचं
असतं सुखी संसारासाठी
एकाचा जरी सुरू
बिघडला तरी
होते संसाराची माती
म्हणून मृदूलता असावी वाणीमध्ये
तरच लयबद्ध स्वर येतील ओठी
थकलो आता मी
उलटून गेली साठी
जिवणाच गाण म्हणत म्हणत
हाती आली काठी
नंदा भोयर
अमरावती
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
दिनांक- २३ मे २०२०.
विषय- हास्य चारोळ्या
😂 ।। हास्य चाराेळ्या ।। 😂
1) जेव्हा तु निटतेस, छान छान दिसतेस,
एेकट्या नवर्याला टाकुन selfy काढत बसतेस.😂
2) काय सांगु बाई, कसा माझा नवरा,
बाटली दिसली कि हाेताे कावरा बावरा😂
3) माझी बायकाे लई भारी Shopping करते फार,
निदान एेकदिवस तरी पाेळी भाजी करुन चार 😂
4)पेमेंट झाल्यावर तिला देताे मी पैसा,
Shopping झाली सगळी आता बाेंबलत बसा 😂
5)राेज Social Media वर करते मी चाट
Bettry संपत पर्यंत लावते माेबाईल ची वाट. 😂
6) राेज दारु पिल्यावर हाेताे मी टुन,
चढली कि बाेला, झुम बराबर झूम😂
प्रिया र.गाेमाशे
आकाशवाणी नीवेदीका
चंद्रपूर.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
कैसे लिखे हास्य कविता
तिन मान्य वरों का आदेशभारी; बोले लिखो हास्य कविता कोई
डरते है सभी ,उबकर श्रोता गुरप छोडकर भाग ना जाये कहीं......
काला अक्षर भैस बराबर,सुना था कही
डालकर जाल भाई, लिखने लगी लुगाई...
हरएक डालीपर बुलबुल गाये नये तराने
वा वा बोले सभी, पता नही सही या झुठ....
हम भी लिखने लगे कविता नयी नयी
सोचकर कोई तो बोलेगा ,आपकी रचना है प्यारी....
ये कैसा मजाक है,कैसे लिखे हास्य कविता
हमे घरोंमे करके कैद,दुःख बहार दे रहा पहारा....
सौ. जयश्री रेहपाडे
नागपुर.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
काव्हुन ब्बा ?
बायकोच्या हाताचं भ्याव
लई वाटते 😱💪🏻
त्याले काय भाऊ करंट लई असते ? ☠️👊🏻प्रेयसीच्या हाताले लई चाटू लागते 🥵👩🏻
काव्हून ब्बा त्याले काय , साखर चिकटून रायते ? 😉😉😋😛😝
हास्य चारोळीच्या नादात
असं लिहून पायले 🤫
बायकोले समजले तर
घरी भेटण काय जेवाले ? 🤕👊🏻🤓
दात कायले काढून असे
फिदी फिदी हासून रायले ? 😃😃😆😁
घरी माही भाजणकशी ..
ठावं काय तुमाले ? 😫😩😩😩😭
म्हणून म्हणो ताईले
नको हास्य चारोळी 🙃
बायको समोर माही आता
उलन काय दातखीळी ? 😉😉😪
सुभाष धांदे सर , यवतमाळ
दिनांक 23/05/2020
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
हास्य कविता---
।। प्रेमाचा गुलकंद ।।
त्याला बघून ती
गालात हसली
तिला बघून
त्याची कळीच उमलली ।।
एक गुलाब तोडला
हळूच तिला दिला
मान मुरडत, लाजतच
तिने तो घेतला ।।
एकमेकांना बघण्याचा
बहाणा होता लाजण्याचा
त्याने गुलाब रोज देण्याचा
तिनेही लाजून घेण्याचा ।।
आता बिनधास्त तिला
भेटू लागला
हळूच स्पर्श करून
गुलाब देऊ लागला ।।
तीही गुपचूप
मुठीत घेऊन जायची
हसून तिरपी नजर
त्याला देऊन जायची ।।
आज तो गुलाब
घेऊन आला
तिच्या हातात बाटली
बघून ,चकितच झाला ।।
अरे ,हा गुलकंद
तुझ्या गुलाबांचा
प्रयत्न नको करू
पुन्हा मला भेटण्याचा ।।
त्याची हृदय गती
झाली होती मंद
झाला आता त्याच्या
प्रेमाचा गुलकंद ।।
---------------------------
मंगला डहाके, भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
😃।।हास्य चारोळ्या।।😃
मदिरालयात लाईन लागलेली
वैतागून गेलो प्रेयशीस भेटावयास
तेथेही लाईन लागलेली।😁
आॅनलाईन जमलेल लग्न
आॅनलाईन कराले सांगाव
वधुवराला सोसॅल डिस्टंन्स
पाळाले सांगाव।😃😃
😃लाॅकडाऊन काळात नवर्याची चोवीस तास चौकिदारी.😁😁
😂इन्कम टॅक्स च्या छाप्यात
टकल्याच्या घरात ब्रॅडेंड कंगवे
सापडले म्हणे।😆😆
सौ.के .बी. सार्वे भंडारा.
२. 😆😆
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
" हास्य कविता"
नवरा बाई माया काणी
काया चष्मा लावते
त्यातून तो शेजारच्या
शेवंतीले पायते
म्या म्हणलं काव आता
पावसाया सुरू हाय
काया चष्म्याच तुमाले
कामच काय ?
डोयाले आता कायी
ऊन नाही लागत
शेवंतीले पायल्या शिवाय
तुमचं नायी भागत
तीले हाय नवरा
तुमी कायले जाता मले म्हते तो
एकावर एक फ्री भेटली आता
हे संधी मी गमावू कायले
तिनच मले गुलाबाच
फुल देल पयले
आता बाई चष्म्यावर
भरोसा नाही रायला
उगाच चष्म्यावाला नवरा म्या पायला
- नंदा भोयर
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
हास्य कविता---
स्टेजवर कविता वाचनासाठी
म्हातारा उभा झाला
माईक त्यानं हातात घेतला ।।
तुमि हसाल आता
आयकवतो एक कविता ।।
असे म्हणताच
जोरदार ठसका लागला
खो खो खो ,
मस्तच खोकलला ।।
बावाजिले आता पानी द्या मने
पाणी देल, प्या मनल
पानी पिऊन मने,
तुमी हसाल आता
आयकवतो माई कविता ।।
पुन्हा खो, खो, खो
जोरातच खोकलला ।।
भरूनच ठेवला लोटा
त्याच्या पुढ्यात
घाल मनल ,लागल
तितकं ,आपल्या घशात ।।
पाणी पेये ,तीच ओळ मने
आणखीन जोरात खोकलून घेये।।
15 मिनिटं झाले
तो पुढं काही सरकेना
खोकला त्याचा
दम घेऊ देईना ।।
म्हातारा मने ,थांबतो
मी इथंच
लोक पोट धरून धरून
लागले हसाले
चष्मा वर करून
हसून तोही लागला पाहाले ।।
सगळ्याचे हस्याचे फवारे
सुटू लागले
म्हातारा ही तिथल्या तिथं
नाचायला लागले ।।
मंगला डहाके, भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
बोली भाषेतील शब्दांचा विनोद
(शहरातील शिक्षीका, खेड्यातील शाळा)
बाई गेल्या वर्गात
मुलांच्या गोंधळात.
एक पोट्टा बोंबलला
बाई, यानं माया लिचोळा घेतला.
बाई म्हणे ,लिचोळा दे वापस
दोन तिनदा म्हटलं
दुसरा पोट्टा होईना टसमस.
बाई म्हणे,लिचोळा तुझा कसा घेतला?
पोट्टयानं प्रात्यक्षिक केलं
बाईचा त्यानं चिमटा काढला
म्हणे अस्सा........
बाई समजल्या, वापस करायचा नसतो लिचोळा.
सौ.मीरा शेबे भंडारा.
(माफ करा. मला हास्य कविता नाही येत.प्रयत्न केला.पण ही घटना सत्य आहे.आमच्या एका भगिनी सोबत.)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
"हास्य कविता "
मले देते धमकी
माहेरी निगून जाय
तुया सारख्या छप्पन भेटते
तु पायतच राय
मले वाटेच पयले पासुन
हाये तुमी चालू
उगीचच नाही सांगे शेजारची शालु
येटायातल्या पोट्टया साय्रा गाडीवर फिरवे
अन सुट बूट घालून गल्ली बोळीत मिरवे
नशीब माय फुटक
मले तुमी भेटले
लडता लडता डोयातले
असु माया आटले
पोरायीकडे पावून मी
राहुन इथ रायली
नायीत मले बी काही कमी नायी
तुमच्या सारखे हीरो लय भेटते हल्ली
नंदा भोयर
दिनांक- २४ मे २०२०.
विषय- किनारा
किनारा---
आले कितीही वादळ
शमवून दाविला, स्वप्न मनोरा
खांद्यावर हात ठेवुनी
जीवनी दावतो किनारा ।।
पापण्यातील पावसाला
पूर आले, लाभला तुझा सहारा
कवटाळून मिठीत
जीवनी दावितो किनारा ।।
बसले तळपत्या उन्हाचे चटके
अलगद ठेविला प्रेमाचा नजारा
तुझ्या हळुवार स्पर्शानेच
जीवनी दावितो किनारा ।।
गालावरील थेंबाना
लाभला शब्दांचा गाभारा
मन भरे आज गाते
जीवनी लाभला किनारा ।।
पक्षी गाती सुस्वरे गाणी
खुले नभ त्यांचा देव्हारा
हृदयी स्वप्न क्षितिजाचे
कवटाळून, लाभला किनारा ।।
मंगला डहाके, भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
*किनारा*
अबाेल भावना, व्यक्त हाेऊ दे
प्रेमाची बात, आेठांवर येऊ दे
सांग, येशील का किनार्यावर ?
धुंद तु बेधुंद मी, माैज जरा करु दे
प्रतिला आज, जरा बहर येऊ दे
बाेल येशील का किनार्यावर ?
श्वास नात्यातला, जरा जगु दे
गंध माझ्या प्रेमाचा, दरवळु दे
बाेल येशील का किनार्यावर ?
एेकदाचे प्रेम माझे, व्यक्त हाेऊ दे
तुझ्या गुलाबी आेठांवर, हास्य येऊ दे
बाेल येतील का किनार्यावर ?
प्रितीचा धागा, मला गुंफु दे
जन्माेजन्मी, तुझी साथ लाभु दे
बाेल, येशील का किनार्यावर ?
प्रिया र. गाेमाशे
आकाशवाणी नीवेदीका
चंद्रपूर.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
*किनारा*
समाजाच्या प्रोत्साहनाने
गवसला किनारा
किती तरी दिवस गेले
लेखनी होती बेसाहारा
तीला मिळाला किनारा
भेटली आपुलकीची मानस
लेखनीला आली धार
मा. धांडे सरांचे लाख लाख आभार
समाजाच्या सागरात
लेखनी होती तरंगत
किनारा तीला गवसला
आता ती कधीच नाही थांबत
समाजाची मी ऋणी
त्यांच्या मुळेच भेटले नविन बंधु भगिनी
आणि त्याच्याच प्रोत्साहनाने
हाती आली लेखणी
नंदा भोयर
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।। किनारा ।।
काठावरती ऊभे राहूनी।
न्याहाळावा निसर्गाचा तो रम्य सोहळा,
मधूर पहाटे ऐकावातो,
पक्ष्यांचा श्र्वास मोकळा।।
काठावरती ऊभे राहूनी।
घ्यावे रविकिरणांचे दर्शन,
नितळ जल ते मनोभावे अर्पण।।
काठावरती ऊभे राहूनी,
सागराच्या अंथाग लाटांना घ्यावे बाहुत।
प्रेम भरे न्हाऊन निघावे आलिंगन देत।।
काठावरती ऊभे राहूनी,
या काठावरुन,त्या काठावरचे,
पहावे कौतुक नवल भरुन।
दोन काठ भेटत नसता,
भेटावे सागराला,प्रेमभराने
करावे हितगुज सागराशी।।
काठावरती ऊभे राहूनी पहावे
दुनियेचा नजारा।।
सौ.के. बी. सार्वे भंडारा.
🌹🌹अभंग🌹🌹
गोड तुझे रूप ,गोड तुझे नाम
भेट कधी देशील पांडुरंगा ।
भेटीसाठी जीव कासावीस झाला
आतातरी दया दाखवावी ।।
आषाढीची वारी चुको न द्यावी देवा
डोळयात प्राण आणोनी वाट पाहे ।
तुळशीमाळ गळा, कपाळी चंदनाचा टिळा
हाती घेते देवा, झेंडा भगवा ।।
भक्तांचा मेळा, भरतसे वाळवंटी
खेळ खेळती बघ पाऊली ,फुगडी ।
दिंड्या पताकासवे, नाचती वैष्णव
घालती रिंगण चन्द्रभागेतिरी ।।
तुझ्या रुपावरी ,भाळले माझे मन
गोड न लागे मज ,अन्नपाणी ।
'प्रतिभा' म्हणे देवा, चित्त तुझ्या चरणी ।
स्मरावे तुझे नाम ,रात्रंदिनी ।।
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
अकोला.
दि.२५.५.२०२०
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
अभंग
देवा गजानना भेटीची तुझ्या आस
लागला मज ध्यास तुझा देवा
मुखी तुझे नाम रात्र दिनी
जप असो मुखी तुझा देवा
शेगावी च्या द्वारी उभा क्षणभरी
नाम तुझे हरी गजानना
रूपं तुझे अनेक परी तु एक
तुझा होतो भास विट्ठलाचा
तुझ्या नगरीत आनंदते मन
विसरतो देह भान आम्ही देवा
काय तुझा महिमा वर्णावा किती
नाही मला भीती कुणाची रे
तूच माझा सखा तूच माझा सोयरा
नको मला कुणी तुझ्या विना
अगाध महिमा तुझा डोळ्यानी पाहुनी
फिटते पारणे डोळ्याचे रे
नंदा भोयर
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।। अभंग ।।
सदा माझे नेत्री दिसो तुझे वदन,
रुखमिनी नंदन सोयरिया।।
सुंदर ते रूप,सुंदर ते नाम,
देई मज प्रेम सर्व काळ।।
सर्वांग सुंदर हेचि रूप पाही ,
येऊनीया राही चित्ती माझ्या।।
मनाचे आनंद मनाचे तरंग ।
असो पाडुरंग चित्ती माझ्या ।।
चंद्रभागेच्या पाण्यात,अंग,अंग न्हाऊ।
नाचुनीया गाऊ नाम तुझे ।।
नामदेव,तुका,पंढरीला आले,
जगी धन्य झाले नामे तुझ्या।।
सौ. के.बी. सार्वे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
अभंग
सुंदर तुझे रुप, लोचना ते सुख|
सुंदर तुझे रुप, लोचना ते सुख|
दर्शनाची भूक, पुरवी देवा ||
गोड तुझे नाम,माधव हरी शाम|
यावे तुज धाम,वाटे मज||
मंजूळ तुझा पावा, ऐकवी मज देवा|
ब्रम्हरुप दावा, मज लागी||
तुझी मनी भाक्ती,दुःखातूनी मुक्ती|
नाही कुणी जगती,तुज विण||
ऐसे करी राया,शितल तुझी छाया|
मलीन ही काया,शुद्ध करी||
गजर हरिनामाचा,लाभ किर्तनाचा|
राहो माझी वाचा,तव नामी||
आलो मी शरण,देई हेची दान|
मीरा होई लीन, तुझे ठायी||
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
स्वरचित अभंग -----
संसाराचे ठाई ,भक्तीचा श्रीरंग
चिपळ्या, टाळ, घेई हाती हो ।।
पहाटे मनी भाव, तुळशी माळ गळा
उत्साहाचे तेज ,अंतरी होई ।।
वास्तवाचे जाण, ठेव गा तू राया
साधू ,भोंद्यात , दवडू नको वेळ ।।
मनी चांगला भाव, ठेवशील राव
भेटेल तुला, पांडुरंग ।।
हेवा, देवा सोड , खाण सद्गुणांची
अंतरी तुझ्याच, वसे विठूमाई ।।
विटेवरी उभा, विठ्ठल आपला
पाही भक्तांकडे, दर्शन हो देण्या।।
जाणा वृक्ष-वेली, थोर कार्य त्यांचे
ऑक्सिजन देण्या, तत्पर सदा ते।।
नको देवराया ,अंत आता पाहू
कोरोनाला तू रे, लाव पळवून ।।
मंगला डहाके, भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
अभंग वाणी..
ज्याने समाजाशी जोडले नाते|
त्याचे अंगी. मोठेपण |
त्यांची. वंदावी पावले|
होईल जिवन सफल ||
त्या साठी लागे समाज निष्ठा |
समाजनियमाची अनु ग्रररहता. |
सर्वाच्या विषयी. प्रेम |
नित्य आदरभावना ||
घ्या रे,मित आहार विहार. |
बुध्दी. ठेवा सात्विक|
सदा तत्परता अंगी|
असावी चालता बोलता ||
ना कोणी छोटा ना मोठा. |
सन्मान देण्या शिका |
आदराने वाढतो आदर |
शिकवण नवी शिका ||
असे वागलयास होईल |
समाज विकसित |
बंधूप्रेम जपावे. |
समाजहित साधण्या ||
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
अभंग
पुण्य करावे कर्म
व्हावे सद्गुण
हेची सर्वसुख
विठु म्हणे ।।
नित्य करावे जप
व्हावे तल्लीन
मन हाेई प्रसन्न
विठु म्हणे ।।
पंढरीच्या वारी
इंद्रायणी काठी
हाेऊनी पवित्र
विठु म्हणे ।।
सेवा करावी दिनास
प्रेम द्यावे तयास
हेची आनंद
विठु म्हणे ।।
प्रिया र. गाेमाशे
आकाशवाणी नीवेदीका
चंद्रपूर.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
दिनांक- २६ मे २०२०.
विषय- स्वरचित चुटकुले
बघा हसायला येेतं का?
अढावु गुरूजी वर्गात हजेरी घेत होते.तयाचया वर्गात एक माधुरी दांडे नावाची मुलगी होती.अढावु गुरूजी माधुरी दिक्षित चे खुप फँन होते. हजेरी घेताना माधुरी दांडे ऐवजी
माधुरी दिक्षित नाव घेतल सारा वर्ग हसायला लागला.
गण्या उठून उभा राहीला म्हणा ला सर माधुरी दिक्षितला
बोलावुन आणु का.? माधुरी म्हणे कायले मी हु ना.
सगळा वर्ग हसत होता अढावु गुरूजी मात्र मान खाली घालून होते.
2. आज सकाळ पासुनच यशोदा बाई त्या च्या 20 वर्षा च्या
मुलावर चिडल्या होत्या. बाथरूमचया दाराशी येऊन त्या ला
म्हहणालया मेल्या दार उघड अंघोळ करून देते.रंग बघ कसा
काळवंडला त्याच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता.आतमधये
यशवंतराव होते त्यांनी हळूच दार उघडले.यशोदाबाईला
म्हहणाले .बर या. बरेच दिवसानी योग आला या आत.
म्हहणाले .बर या. बरेच दिवसानी योग आला या आत.
इशय म्हणत यशोदाबाई आत पळालया.
3. सासुबाईनी सुनेला विचारले पिल्लुुची शी थांबली का?
सुन बाई म्हणा लया हो. सासुबाईंनी विचारले कशी काय.
सुनबाई म्हणा लया लाल लगोंट नेसवली त्याला.काही
दिसले नाही. तेव्हापासुुन...
आपल्याला स्वरचित चुटकले काही जमले नाही.पण प्रत्यक्ष प्रसंग सांगते पहा.
१. भूगोलाचा तास होता.बी.ओ.
साहेब वर्गावर आले.
मूलांना विचारल भारत कोणत्या
खंडात आहे?
मधेच एक मुलगा ऊठून म्हणाला
सर भारत संडासात हाये जी.
(भारत नावाचा मूलगा संडासला गेला होता.)
२. बायको आपल्या माहेरच्या खूप बढाया सांगते.माझ्या बापाच्या घरी वाघिणच दूध सोडून
सर्वच आहे.
नवरा म्हणते माझ्या घरी त तुझ्यासारखी वाघिण बी हाय न दूध बी हाय.
(बायको दात,ओठ खाते बोट मोडते )
३ टूर्नामेंटच्या काळात चर्चा रंगतात.सर्वात मोठ समाधान,सुख
कशात आहे.
सार्वे मॅडम म्हणतात संडास साफ
झाल्यावर ,
चण्याची ऊसळ, पोपटची ऊसळ
खाऊन शौचालय नाही तेथे राहुन पहा.
४. आमच्या लहाणपणी डालडा भेटायचा.
आमच्या शेजारच्या आजी तोतड्या होत्या.
त्या किराणादुकानात गेल्या मी पण होती दूकानात आजी दुकानदाराला दादला दे म्हणाली
दुकान दाराला समजलेच नाही.
मग मी सांगातले आजीचा दादला
म्हणजे तूप होय जी.
५. एक तरुण नौकरीच्या मुलाखतीला जातो.
सर्व कागदपत्रे नेतो.पण झेराक्स नेत नाही.
तेथे एक तरूणी असते,ती त्याला म्हणते हुशार असुन काय फायदा
तुला जनरल नाॅलेज नाही.
सौ.के. बी. सार्वे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
चुटकुले
१)मन्या-डाॅक्टर साहेब,माह्या पोटात दुखतं.
डाॅ.-काय खाल्ल?
मन्या-कायबी नाय.
डॉ.-केंव्हा पासून दुखणं पोटात?
मन्या-जवा पासून त्या राम्याचा बोकूड पायलं.तगडा हाय. मन
डॉ.-अरे त्याचा बोकड तगडा आहे तं तुझ्या पोटात कां दुखत?
मन्या-साहेब खरं सांगू का!घरी सत्यनारायणाची कथा झाली तं माझी माय मनते,सव्वा मयना खाता येत नाय.
२)सरपंच-कुठं गेले गाववाले,कुत्रा बी नावाले दिसत नाय.
ोमाणूस-हाय न कुत्रं.
सरपंच- कोणाचा?
माणूस-काल पोरीनं झोडपलं ,ते आपले सुपुत्र.
दोन तीन पोट्टे एका पोरीला शिट्या मारत होते.ती म्हणाली,फक्त शिट्ट्या चं काय मारता. यानं माझ्या जवळ ,या,या.
पोट्टे धिटाईनं गेली तशी मुलगी ओरडली ,मले कोरोना झाला हाय.
मुले पसार झाली .ती पुन्हा न दिसण्यासाठी.
( चुटकुले लिहीता येत नाही.छोटासा प्रयत्न.🙏🙏🙏🙏
१) रिमझिम पडते पावसाची सर
नरेंद्र रावांचं नाव घेते BK महिला सखी मंचाच्या गृप वर.
२)शिवाची पार्वती, कृष्णाची राधा,रामाची सिता
नरेंद्र रावांचं नाव घेते,सख्यांनो आपल्या करीता.
३) सरस्वतीच्या विणेचा मधूर झंकार,BKगृप वर झाले स्वप्न साकार.
नरेंद्र राव हे माझे पावित्र्य अलंकार.
४)घुंगरांची बैलगाडी गुडूगुडू चाले.
नरेंद्र रावां सोबत मी BKगृप वर आले.
५) कुंकू लावलं ठसठशीत, हळद लावली किंचित,
नरेंद्र राव माझे पूर्व जन्माचं संचित,
आतापर्यंत BKगृप पासून होते मी वंचित.
आपल्या समाजातच्या गृप चा लाभ मिळाला फक्त सुभाष दादांमुळे. धन्यवाद दादा आपले अनंत उपकार.🙏🙏🙏🙏🙏
सौ.मीरा नरेंद्र शेबे भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
उखाणे----
1-- जीवनसत्व क युक्त असतो आवळा
झिंगरराव जसे ,कृष्णच सावळा।।
2-- माहेरची तुळस ,सासरच्या अंगणी रुजते
झिंगरराव यांच्या मुले मी अलंकारात सजते ।।
3-- उसळतात उंच उंच सागरी लाटा
झिंगररावांमुळे मिळाल्या ,यशाच्या वाटा ।।
4-- सासू सासर्यानी काम केले एक पुण्याचे
झिंगररावाना दान दिले, मला सात जन्माचे ।।
5-- आता लागतात ,उन्हाच्या तप्त झळा
त्यातही झिंगरराव फुलवतात, गारव्याचा मळा ।।
मंगला डहाके, भंडारा
[5/31, 2:24 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। ऊखाणे ।।
1. विठ्ठलाला तुळशी ,गणपतीला दुर्वा ,सोपानराव
आहे सोबत ,तर मला नाही कशाची पर्वा .
2. सुसंगती सदा घडो , सऋजन वाक्य कानी पडो ,
सोपानरावांच्या साथीने थोऱ्या मोठ्यांची सेवा घडो .
3. सोपानराव कधीच घेत नाही जाम ,
पण दिसले गुलाबजाम कि राहत नाही भान .
4. 2 गुणिले 2 बरोबर होतात 4
विज्ञान तंत्रज्ञानाबरोबर ,सोपानरावांना आवड शेतीची फार .
5. काचेच्या वाटित गोड गोड दहि ,
सारेच म्हणतात सोपान प्रतिभाची जोडी ,
एकदम सही रे सही .
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
अकोला.
दि.27/5/2020
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
सौ.निशा केशवराव चेटुले ,पुसद
जि. यवतमाळ
*उखाणे*
1) *रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणते हास*
*केशवरावांचे नाव घेते आज बिके सखी करिता खास*
2) *एका वाफ्यातली तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजवली*
*केशवरावांची सारी नाती मी आपली मानली*
3) *सप्तपदीच्या सात पावलांनी केली संसाराची नांदि*
*केशवरावांच्या संसारात मी निशा राहते आनंदी*
4) *असंख्य तारे नभात पहावे निरखून*
*केशव रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून*
5) *उत्तम कुळी जन्मले उच्च कुळी आले*
*केशव रावांचे नाव घेऊन भाग्यशाली झाले*
🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
दिनांक- २८ मे २०२०.
जीवनरूपी सागरात या
दिनांक- २८ मे २०२०.
विषय- सागर
जीवनरूपी सागरात या
हळूच तरंगायच
कधी भरतीच्या लाटेत
आपणही धूंद व्हायचं
जीवनरूपी मार्गावर
अनेक संकटांना पार करायचं
अडथळे बाजूला भारत
ध्येय निश्चित करायचं
नंदा भोयर
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
सागर 🛶⛵
मनातल्या सागरात
काव्यांच्या लहरी.
उत्कंठेने भरून येती
शब्दांच्या किनारी.
भावनांचे हिंदोळे
चंचल पवन जुळे.
हेलावती जीवन नौका
जगण्यास बळ मिळे.
अथांग सागराची
खोली मोजावी कशी.
गर्भात रत्नाकराच्या
अनमोल गुढ राशी.
दिव्यत्वाची प्रचिती
देती भरती ओहोटी.
चंद्राच्या चंद्रकलेने
जलधिश येतो भेटी.
खिन्न हृदयाची आर्तता
त्सुनामी, झंझावात प्रगटता
विक्राल विनाश जीविता
आक्रमक होत रक्षीता.
जलद वरुण वर्षता
तुडुंब सलील सरीता
तारीणी मिळता सागरा
तोष पावेल जलधरा.
सौ.मीरा शेबे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
सागर -----
अथांग सागर खोल किती
दडले त्यात माणिक मोती
शंख, शिंपले अन खारे पाणी
नावरत्नांची खाण ती ।।
सागरात उसळती लाटा
वाटा ह्या सुख दुःखाच्या
मिठीत घेऊन सारितेला
निळ्या लहरी आनंदाच्या ।।
इंद्रधनूचे तोरण बांधून
सागर पाण्यावर झुले
क्षितिजाचे डौल घेऊन
हर्षाने लाट ही फुले ।।
भरारी घेऊन सागर लाट
अति प्रफुल्लित होई
गगनचुंबी शिंपल्यात घेऊन
हृदयी हर्षुन जाई ।।
-------------------------------
मंगला डहाके, भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।। सागर ।।
नद्या मिळती सागरा
लाटा घालती थैमान
भरती आले ऊधान
सावरु कशी मनान.
सौंदर्य लाटेत आहे
सागर बेभान होतो
लाटेला कवेत घेतो
चंद्र नजारा पहातो.
सौ. के. बी.सार्वे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
🎻💐सागरासाठी 💐
सागराच्या भेटीसाठी
उधाणल्या नद्या साऱ्या .
वाटे प्रियकरासाठी
जणू आसुसल्या पऱ्या .
पावसाचे आले दिस
चाले विजांचे तांडव .
धरतीच्या डोक्यावर
मेघ घालती मांडव .
पावसाने धरतीला
बाहूपाशात ओढले .
नदी -नाले एक होता
भारी संकट वाढले .
नदी काठची जमीन
पाणी ' चिरत ' चालली .
माणसांच्या उरामध्ये
भीती वाढत चालली .
' सख्या ' साठी रौद्ररुप
नद्या करती कशाला ?
' शांत ' अशा सागराची
निद्रा भंगावी कशाला ?
यौवनाचा खेळ भारी
जीव जनतेचा जाई .
नको करू नदी बाई
अशी भेटण्यास घाई .
शांतचित्तें धरी आस
ओढ सागरा भेटीची .
मनी अंकुर फुटू दे
साता जन्माच्या गाठीची .
🌹🎸🎻💐सुभाष धांदे , यवतमाळ .
दिनांक -28/05/2020
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
दिनांक २९ मे २०२०.
विषय- आपल्या आवाजातील गीत-भावगीताचा ऑडिओ
सदर ऑडीओचा व्हिडिओ वेगळा बनविला आहे
(लिंक ग्रुप वर लवकरच)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
दिनांक- ३० मे २०२०.
विषय-म्हणी
🌹म्हणी🌹
१अडला हरी गाढवाचे पाय धरी.
२ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये.
३ आयत्या बिळात नागोबा.
४आधी पोटोबा मग विठोबा.
५नाचता येईना अंगण वाकडे.🙏🙏
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।। प्रचलित म्हणी ।।
१ अग अग म्हशी, मला कुठ नेशी.
२. आपला तो बाब्या,दुसर्याच ते कारट.
३.शेळी जाते जिवानिशी ,खाणारा म्हणतो वातळ कशी.
४.घरची करते देवा,देवा बाहेरचीले चोळी शीवा.
५.मुलापेक्षा मुलगी बरी,प्रकाश देते दोन्ही घरी.
सौ. के. बी. सार्वे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
म्हणी-----
घरचे झाले थोडे, व्याहया ने धाडले घोडे ।।
2--घर ना दार, देवळी बिऱ्हाड ।।
3-- रात्र थोडी, सोंग फार ।।
4--दोन्ही घरचा पाहुणा उपाशी ।।
5-- पैशाचा घेतला पारा, कितीही घासला तरी काळा च काळा ।।
मंगला डहाके, भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
नाचता येईना अंगण वाकडे
Nachata yeina Angan vakade
If one can not do any work then he blames other people or the circumstances for that.
2 वासरात लंगडी गाय शहाणी
Vasarat langadi Gaay Shahani
One with little knowledge is known to be very wise amongst illiterates.
3. नावडतीचे मीठ अळणी
Navadatiche meeth alani
If we don't like a person then we can't praise him for his good deeds, in fact, we find many flaws in it.
4. काखेत कळसा गावाला वळसा
Kakhet kalasa gavala valasa
We search a lot for a thing which is actually very near and easy to get.
5. पी हळद हो गोरी
Pee halad ho gori
We show hastiness in getting results.
6. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
Melyashivay Swarg disat nahi
We learn from our own experiences.
7.आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे
Aandhala magato ek dola ani Dev deto doan dole
We get much more than our expectation
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।। म्हणी।।
1.हातभर काकडी नऊ हात बि.
2.एका माळेचे मणी ओवाले नाहि कोणी .
3.घेन न देण फुकट कंदिल लाऊन येण .
4.माय लेकी लोकाच्या आतो भाच्या एकाच्या .
5. कानामगुन आली न् शायनी झाली .
सौ.प्रतिभा सोपान वाठ .
अकोला .
दि. 30/ 5/2020
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
🦋म्हणी🦋
१) यथा राजा तथा प्रजा.
२) पळसाला पाने तीनच.
३) खान तशी माती.
४) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
५)घरोघरी मातीच्या चुली.
[5/31, 2:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: म्हणी
काखेत कळसा न गावाला वळसा
नळी फुंकलि सोनारे इकडुन तिकडे गेले वारे
ज्या गावच्या बोरी त्याच गाव च्या
बाभली
गाढवाला दिली ओसरी न हात पाय पसरी
अंथरुन पाहुन पाय पसरावे
सौ रेणुका झंझाड
🍁 झुळूक वाऱ्याची🍁
एक झुळूक...
थंडगार वारा
जसा मोर पिसारा
धगधगत्या मनाला
शितल निर फव्वारा.
झुळूक वाऱ्याची....
लाही लाही झालेली
कायली उन्हाची
शांत करी देहाला
जशी धार पाण्याची.
थंडगार झुळूक....
तप्त वाळवंटी
नाही झाडी नाही ताटी
प्राण येता कंठी
नकळत अलगद मारी मिठी.
झुळूक वाऱ्याची....
तन मनाची
निराशेची राख
तिव्र वेदनेची झाक
उडवित रानी,
देई मज सुख.
गार गार वारा....
शांती सुखाचा झरा
डबडबलेल्या घामात
श्रमीकास निवारा
थकेलेल्या जीवास
क्षणीक आसरा.
झुळूक वाऱ्याची....
गातेे अंगाई
जोजविते बाळाला
कुशीत घेई आई.
गोंजारतं कुरवाळतं
लाड करुन जाई.
सौ.मीरा शेबे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।। झुळूक वार्याची।।
तू झुळूक होऊनी ये,
मी काजवा होऊनी येतो ।
माझ्या प्रकाशात तुला न्याहाळून घेतो ।
तुला पाही न कोणी,ना भिती कुणाची ।
मंद सुगंधात दरवळून ये,
तू झुळूक होऊनी ये,
मी काजवा होऊनी......
तू अबोल, माझी चकाकी ।
दे आलिंगण माझ्या मिठीत,
सुगंध पसरत हळूवार ये ।।
तू झुळूक होऊनी ये,
मी काजवा होऊनी......
स्पर्शून मज लाविते लळा,
मंद स्मित फुलवी मळा ।
मी प्रकाशित होऊनी येतो ।।
तू झुळूक होऊनी ये,
मी काजवा होऊनी.....
तुझ्या आगमने मन प्रसन्र होई,
देहभान सारे विसरुन जाई।
संथ तालात सुरात ये।।
तु झुळूक होऊनी ये,
मी काजवा होऊनी येतो ।।
सौ. के.बी. सार्वे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
वाऱ्याची झुळूक---
वाऱ्याची झुळूक---
वाऱ्याची झुळूक येता
मोरपीस फुले गाली
नयनी तुझ्याच बघता
अंतरात दिसे लाली ।।
वाऱ्याची झुळूक येता
पक्षी फांद्यांवर झोके घेई
हर्षाने चोचीत पिलांना
हळूच दाणे देई ।।
वाऱ्याची झुळूक येता
सरिता दुथडी वाहते
राविकिरने ही लाजून
पाणी तरंगात पाहते ।।
वाऱ्याची झुळूक येता
ढग हे धावू लागती
आभाळी नयन भरे
धरतीवर बरसू लागती ।।
वाऱ्याची झुळूक येता
आनंदाने मुले नाचती
गोल गिरकी घेत
अंगणी चिंब होती ।।
--------------------------------
मंगला डहाके, भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।। झुळूक वाऱ्याची ।।
झुळूक वाऱ्याची हळूच
पहाटेच्या गारव्यात ,अंग शहारून गेली,
जाता जाता कळीचे
फुल ,फुलवून
गोड सुगंध देऊन गेली.
झुळूक वाऱ्याची हळूच,
मंदिरात श्रीहरीच्या,
मुरली स्वरात ,स्वर होऊन गेली .
जाता जाता चरणफुलास ,
हलकेच स्पर्शुन गेली .
झुळूक वाऱ्याची हळुच,
आठवण माहेरची करवुन गेली.
जाता जाता स्पर्श मायेचा,
मनास ओढ लाऊन गेली.
झुळूक वाऱ्याची हळूच
चांदण्या अंगणात ,तान्हुल्याला
कवेत माझ्या जोजवुन गेली,
जाता जाता गोड गीत ,अंगाई गाऊन गेली.
सौ. प्रतिभा सोपान वाठ.
अकोला.
दि. 31/5/2020
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
वाऱ्याची झुळूक---
वाऱ्याची झुळूक येता
मोरपीस फुले गाली
नयनी तुझ्याच बघता
अंतरात दिसे लाली ।।
वाऱ्याची झुळूक येता
पक्षी फांद्यांवर झोके घेई
हर्षाने चोचीत पिलांना
हळूच दाणे देई ।।
वाऱ्याची झुळूक येता
सरिता दुथडी वाहते
राविकिरने ही लाजून
पाणी तरंगात पाहते ।।
वाऱ्याची झुळूक येता
ढग हे धावू लागती
आभाळी नयन भरे
धरतीवर बरसू लागती ।।
वाऱ्याची झुळूक येता
आनंदाने मुले नाचती
गोल गिरकी घेत
अंगणी चिंब होती ।।
--------------------------------
मंगला डहाके, भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
🌹झुळूक वाऱ्याची 🌹
🌹झुळूक वाऱ्याची 🌹
झुळूक वाऱ्याची
अंगास लागता
मनात कविता
स्फुरे तेव्हा ।
मनाच्या कोंदणी
झुळूकीचे नाव
मनातले भाव
सांगतो मी ।
तापत्या जीवाला
थंडीगार आस
झुळूकीचा भास
वाटे जिवा ।
वादळ वाऱ्याची
भीती असे फार
झुळूकीचा वार
शांत भासे ।
अलगद आली
तनास छेदली
उराने गाईली
गाणी तिची ।
झुळूकीची गाणी
वाऱ्याशी झुलते
जीवन फुलते
तिच्या सवे ।
वाऱ्याची झुळूक
येऊन सांगते
कानाशी गुंगते
काही तरी ।
मनाशी हर्षावे
नात्यांशी जपावे
जगात उरावे
किर्ती रूपे ।
अशी ही झुळूक
सर्वांनाच मिळो
दुःख त्यांचे पळो
सर्व दूर ।
💐💐💐🎸🎻सुभाष धांदे , यवतमाळ
दिनांक -31/05/2020
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
| samajbharti.blogspot.comवर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. samajbharti.blogspot.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही.
| आमचे सर्व लेख/व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक/व्हाट्सअप्प/युट्युब
| Copyright © samajbharti.blogspot.com
| All rights reserved.
👉----------------------------------------------👈