Saturday, July 5, 2025

विविध जिल्हा स्तरावरील बावणे कुणबी समाज मंडळे व त्यांचे कार्य

 विविध जिल्हा स्तरावरील बावणे कुणबी समाज मंडळे  व  त्यांचे कार्य 

           महाराष्ट्रात कुणबी समाज हा बहुसंख्येने  असून साडेबारा पोटजाती मध्ये विभागला आहे त्यातील एक पोटजात  बावणे कुणबी समाज.  सदर पोटजात राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये  प्रगती करीत  आहे. जिल्हास्तरावरील मंडळाचे मेळावे, सामूहिक विवाह सोहळे, गुणवंत व्यक्ति व  विद्यार्थ्याचा सत्कार इ. कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो लोक एकत्र येऊन सामाजिक चळवळीचे दर्शन  घडवित आहेत .

महाराष्ट्रातील व मध्य प्रदेशातील  खालील मंडळे  सामाजिक उत्थापनाच्या  कार्यात सहभागी असून त्यांच्या  कार्याची 
सविस्तर माहिती  खालील प्रमाणे :-

 बावणे कुणबी समाज मंडळ रामनगर, नागपूर
रजि.नं. एफ- ४८० / सोसा- १५४-६२ (स्थापना १९६०)     
 ८९-बी, बाजीप्रभू चौक, रामनगर, नागपूर

*उन्नतीची वाटचाल*
         सन १९६० साली बावणे कुणबी समाज मंडळ या नावाने एका छोटयाशा रोपटयाचे बिजारोपण करण्यात आले. हे लावलेले छोटसे रोपटे आता मोठया वटवृक्षात रूपांतरीत झाले आहे. मागील ६४ वर्षाच्या कारकिर्दीत बावणे कुणबी समाज मंडळाने अनेक चढ- उतार पाहिले आणि अशाही परिस्थितीत मंडळ आपल्या सर्वाच्या सहकार्याने व सहभागाने विश्वासनीय रीत्या उभे राहून यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. एखादया
संस्थेच्या आयुष्यात ६४ वर्ष म्हणजे १ मैलाचा  दगडच. आज समाजात समाजाकरीता अनेक संस्था काम करतांना आपणास दिसतात परंतु त्यातही बावणे कुणबी समाज मंडळ ही संस्था आपल्या वैशीष्टयपूर्ण काम करण्याच्या शैलीमुळे आपले वेगळे स्थान कायम टिकवून आहे. हे कार्य समस्त समाजबंधू-भगिनींच्या आणि कार्यकारी मंडळाच्या सर्व पदाधिका-यामुळे यशस्वी होत आहे.
        समाज मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. जसे की, सामुहिक विवाह सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, महिलांकरीता हळदी कुंकू, आरोग्य शिबीर, सामाजिक व शैक्षणिक प्रबोधन, समाजातील गरीब व होतकरु मुलांसाठी अभ्यासक्रमाची व स्पर्धा परीक्षेची शिबीरे अशा बहुउद्देशिय कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने वेळोवेळी आयोजित केले जातात.
         आपणा सर्वांच्या सहकार्याने व आशिर्वादाने उपराजधानीच्या शहरात समाजाची पश्चिम नागपूरात बावणे कुणबी समाज मंडळाची स्वतःच्या मालकीची भव्य वास्तू आहे. ही समाजबांधव व संस्थेच्या कार्याची फलश्रुती आहे. या वास्तू उभारणीसाठी सर्व स्तरातील समाजबांधवांनी सामाजिक दातृत्व या कार्यासाठी दिले.        
    बंधु-भगिनींनो, मंडळाला २०११ ला ५० वर्ष झाल्याबद्दल मंडळाने सूवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. या आयोजनाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने व्दिदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विषयावर चर्चासत्र, आरोग्य शिबिर, आपले विचारपीठ, स्वयंरोजगार मार्गदर्शन अशा विविध सामाजिक व शैक्षणिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. भविष्यात मंडळाच्या स्थायी स्वरूपाच्या नियोजनात विद्यार्थी व युवक यांच्या शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकासासाठी मंडळाने नियोजित वस्तीगृह व वाचनालय उभारण्याचा मानस आहे हा उपक्रम केवळ वास्तुनिर्मितीचा नाही तर यातून भविष्यातील बावणे कुणबी समाजातील प्रतिभासंपन्न, गौरवशाली, आदर्शवादी विद्यार्थ्यांचे जिवंतमंदीर साकारण्यात मदत होईल म्हणून या उपक्रमाच्या उभारणीला समाज बांधव सहकार्य करतील असा कार्यकारी मंडळाचा ठाम विश्वास आहे. आपण सर्वांनी तनमनधनाने सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.
          समाज मंडळाच्या वाटचालीत ज्यांचे ज्यांचे योगदान होते मी त्या समस्त समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी मागील ६४ वर्षा अगोदर ज्या बावणे कुणबी समाज मंडळाचे बीजारोपण केले व ज्यांचे कार्यच अधोरेखित झाले आहे ते स्व. पुरूषोत्तम (दादा) बुराडे, स्व. शंकरराव बांते, स.ति. भोयर, स्व. रामाजी मते, स्व. शंकरराव भुते, स्व. मधुकरराव ठवकर, स्व. तुकारामजी शेंड, स्व. लक्ष्मणराव भोयर, स्व. . तुलशीरामजी रार्घोते, स्व.मारोतराव फेंडर, श्री. रायभानजी तिजारे, श्री. गोपालराव तुमसरे, अँड. बी. के. ठवकर, श्री. सूर्यभानजी गायधने, श्री. प्रभाकरराव ठवकर, श्री. भगवान कानतोडे आदी महानुभवांनी समाजप्रती केलेले कार्य आणि योगदान विसरता येणे शक्य नाही. या बावणे कुणबी समाजाच्या वाटचालीतील वेचलेले हे मोती आपणा सर्वांच्या कायम स्वरूपात नक्कीच राहतील.
*चहूदिशांनी उजळत फुलती, लक्ष लक्ष या ज्योती ।         
समृध्दीशी मैत्र जोडूनी, तशीच उजळे नाती ।*
                         धन्यवाद !



 बावणे कुणबी समाज सेवा, नागपूर मंडळ
     रजि नं. ६३१/९८ नाग. एफ १४९२८ 
स्थापना - १ऑगस्ट १९९८
७२१, सुदामपुरी, उमरेड रोड, नागपूर

    बावणे कुणबी समाज सेवा मंडळाची स्थापना दि. १ ऑगस्ट १९९८ ला झाली. मागील २४ वर्षात सेवा मंडळाव्दारे, समाजातील विविध घटकांसाठी उपक्रम देखील राबविण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास तथा स्मरणशक्ती वर्धन शिबीर, युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आदींचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना समाज बांधवाकडून प्रतिसाद देखील मिळाला. मागील २० वर्षापासून उपवर-वधू परिचय सम्मलेनाचे आयोजन करुन व या माध्यमातून नोंदणी करण्यात आलेल्या मुला-मुलींची माहिती पुस्तकारुपाने पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. सोबत ८० वर्ष व अधिक वयांच्या समाजातील वयोवृध्दांचा सार्वजनिक स्वरूपात सत्कार करुन त्यांचा यथोचित मानसन्मान समाजात व कुटुंबात व्हावा संदेश या कार्यक्रमाव्दारे देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
      दरवर्षी मकरसंक्रमण पर्वावर केवळ तीळगुळ, हळदीकुंकू एवढाच मर्यादित कार्यक्रम न ठेवता, समाजातील मुले-मुली आणि स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे होणारे आजारांची माहिती आणि त्यावरील उपाय यासंबधी मार्गदर्शन करण्यासाठी नागपुरातील ख्यातनाम पॅथालॉजिस्ट डॉ. विनोद जयस्वाल यांना बोलावण्यात आले. तसेच महिला दिनाच्या पर्वावर महिलांच्या समस्या व त्यावरील उपाय यावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ' तुकाराम बीज ' या कार्यक्रमातून संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचे कार्य आज देखील समाजाला किती प्रासंगिक आहे. या संबधी मार्गदर्शन करण्यात आले 
     *मंडळाने खरेदी केलेल्या प्लॉटसंबंधी माहिती आणि भविष्यतील योजना*
आमचे समाज सेवामंडळाने दि. मार्च २०१७ ला नागपूर शहरामध्ये रमणामारोती परिसरात १८०० चौ. फूट आकाराचा प्लॉट खरेदी केला आहे. प्लॉट घेण्यासाठी नागपूर शहरातील समाज बांधवांचे आम्ही आभारी आहोत.      
 *भविष्यतील योजना:-*
या प्लॉटवर वास्तू शक्य तितक्या लवकर तयार करुन खालील समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आम्ही संकल्प केला आहे.
*वास्तूची रचना :-*
१) वास्तुमध्ये खाली (तळमजला) पूर्णतः पॉकिंगची व्यवस्था करणे.
२) पहिल्या माळयावर - समाजसेव मंडळाचे कार्याजय व सभागृह ( बैठकीसाठी).
३) दुस-या माळयावर - स्पर्धा परिक्षा, रोजगारविषयक मार्गदर्शन विदयार्थी, युवक व महिलांसाठी विविध उपक्रम      
४) तिस-या माळयावर विदयार्थ्यांसाठी वस्तीगृहाची व्यवस्था.
समाज बांधवांना विनंती आहे की, समाज सेवा मंडळाव्दारे आयोजित कार्यक्रमानां आपण उपस्थित राहावे आणि समाज कार्यामध्ये विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. भविष्यात युवकांसाठी व महिलांसाठी रचनात्मक कार्य उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो.

धन्यवाद !


बावणे कुणबी समाज उन्नती मंडळ, नागपूर (ग्रामीण)
रजि.नं. महा/ ८६२/१४ (नाग) स्थापना २०१४ 
ख.नं.५५/५६, तुकाराम नगर, विहिरगांव, नागपूर
    १५ जून २०१४ ला मौजा विहिरगांव ता. जि. नागपूर येथील खसरा नं. ५५ व ५६ येथे समाजसेवा डेव्हलपर्सच्या प्लॉट धारकांनी सभा बोलविण्यात आली होती.
सभेत असे ठरविण्यात आलेली आले की, स्व. श्री. काशीनाथ बांडेबुचे यांनी १० वर्षापूर्वी खरेदी केलेल्या जागेत प्लॉट पाडून ज्या समाज बांधवांना प्लॉट विकले होते. पण जागेची चतुःसीमा आणि ले-आऊट आखनी न झाल्याने जागा पडीत होती. याजागेची सरकारी मोजणी करून ले-आऊट टाकणे आणि प्लॉट धारकांना हस्तांतरीत करणे या करीता मंडळ स्थापण्याची आवश्यकता होती. याकरिता बावणे कुणबी समाज उन्नती मंडळ, नागपूर (ग्रामीण) ची श्री. प्रणय काशीनाथजी बांडेबुचे यांच्या सहमतीने स्थापना करण्यात आली. व या ले- आऊटला संत तुकाराम नगर ” असे नाव देण्यात आले.
    बावणे कुणबी समाज उन्नती मंडळ, नागपूर (ग्रामीण) च्या वतीने १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला संत तुकाराम नगर, विहिरगांव येथे झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेण्यात येतो. याकरीता मोठया संख्येने प्लॉट धारक समाज बांधव उपस्थित राहतात.
    संत तुकाराम नगर येथे समाजसेवा डेव्हलपर्सच्या सोडण्यात आलेल्या मोकळया जागेवर संत तुकाराम मंदिर उभारण्याचा मंडळाचा मानस आहे. याकरिता प्लॉट धारक समाज बांधवाच्या सहयोगाची नितांत आवश्यकता आहे.


बावणे कुणबी समाज मंडळ, पारडी
रजि नं. महा . ४५८ / १७ (नाग)
पत्ताः- विनोबा भावे नगर, पारडी, नागपूर
         नागपूर येथील पारडी परिसरात बहुसंख्य समाजबांधव वास्तव्यास असल्या कारणाने एकत्रीकरणाची अत्यंत गरज होती. येथील लोकसंख्या अंदाजे ७००० ते ८००० पर्यंत आहे. बाहेर राज्यातील मंडळी येथे येवून संघटीत होतात परंतु आपण संघटीत नसल्याकारणाने विविध समस्यांना तोंड दयावे लागते यामधूनच समाजातील मान्यवर मंडळींनी एकत्रीत होण्याचा विचार मांडला व मंडळ स्थापनेला मुर्त स्वरुप देण्यात आले, मंडळाव्दारे दरवर्षी विविध कार्यक्रम राबविण्यात येतात मंडळ जरी नवीन असले तरी भविष्यात समाजोपयोगी कार्य करण्याचा सर्व पदाधिका-यांचा संकल्प आहे.
          सर्व मंडळाशी सलोख्याचे संबंध असून पदाधिकारी इतर ठिकाणाच्या कार्यक्रमात सहभागी होतात.


 बावणे कुणबी समाज (मांढळ) कुही तालुका
रजि नं. ८८२ / २००० स्थापना २००० 
 पत्ता - मांढळ ( आंभोरा रोड), ता.कुही, जि. नागपूर
    नागपूरच्या पूर्व दिशेस असणा-या व प्रामुख्याने भंडारा, नागपूर जिल्हयात वास्तव्यास असणारा बावणे कुणबी समाज हा पिढीजात शेतीनिष्ठ शेतकरी आहे. वैनगंगेच्या खो-यात वास्तव्यास असणारा समाज बावणे कुणबी समाज म्हणून ओळखला जातो. अश्याच या मांढळ येथे कुही तालुका शाखेची स्थापना २००० मध्ये तालुक्यातील काही प्रतिष्ठित व्यक्तीच्या सहकार्याने सर्वश्री नामदेव ठवकर, बाबा पाटील तितरमारे,अमृतराव तुमसरे, डॉ. केवल तितरमारे, तुळशीरामजी खवास, भोजराज चारमोडे, स्व. वामनराव ढेंगे, श्रावण बुराडे, मुख्याध्यापक अंबादास तितरमारे, गंगाधर देशमुख, भुरले कुही, प्रा. अविनाश तितरमारे याच्या प्रयत्नांनी झाली. व पहिल्यांदा २००६ मध्ये श्री जागृत हनुमान मंदिर ब्राम्हणी आदर्श (मांढळ ) या ठिकाणी सहा जोडपे विवाहबध्द झालेत. तेव्हापासून सतत दरवर्षी समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात येते. 
२००७ मध्ये ३९, 
२००८ मध्ये ११, 
२००९ मध्ये २५, 
२०१० मध्ये १६, 
२०११ मध्ये १८
२०१२ मध्ये २२, 
२०१३ मध्ये १६ 
२०१४ मध्ये १८ ऐवढे जोडपे विवाहबध्द झालेत.
     दरवर्षी समाजाच्या वतीने प्रामुख्याने दोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. एक सामुहिक विवाह सोहळा व दुसरा कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेला समाजातील व कुही तालुक्यात जन्मजात असलेल्या गुणवंताचा व पी. एच. डी. धारकांचा सत्कार करण्यात येतो. या कार्यक्रमात समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला प्राप्त होतो. २०१४ च्या सामूहिक विवाह सोहळयाचे खास वैशिष्टये म्हणजे हिन्दी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका व “ मैने प्यार किया या चित्रपटातील नायिका भाग्यश्री व माक्षिका नागपाल यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून वधू-वरांना आशिर्वाद दिलेत. समाजाच्या वतीने दरवर्षीच्या आयोजनात अनेक मान्यवरांचे हातभार लागतात. त्यात प्रामुख्याने मा.रत्नाकर ठवकर, राजुभाऊ भोतमांगे, बालू ठवकर हे तर समाजाचे आर्थिक आधारस्तंभ, समाजाचे विद्यमान अध्यक्ष डॉ केवल तितरमारे यांच्या नेतृत्वात समाजाची उत्तरोत्तर प्रगतीच्सुरू आहे. सचिव प्रा. ओमदेव ठवकर, कोषाध्यक्ष श्री अशोकराव ढेंगे (गुरूजी) उपाध्यक्ष श्री. मोहन मते, पांडुरंग बुराडे, मनोज तितरमारे, प्रकाश पोटफोडे, सहसचिव हरिष कढव, भागेश्वर फेंडर, विलास राघोर्ते, अरुण खराबे, संघटक राजीव बुध्दे, सुरेश नखाते, अविनाश तितरमारे, पुरुषोत्तम कुथे ही कार्यकारीणी समाज हितासाठी व प्रगतीसाठी सतत कार्यरत आहे.
    *राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थी / व्यक्ति :-* कु. दिव्या तानषा नखाते (आंतरराष्ट्रीय धावपटू ३ कि.मी., ५ कि.मी.) श्री. संदेश फत्थु शेंबे (आंतरराष्ट्रीय धावपटू ५ कि.मी.)
    *राजकीय पद भूषविलेल्या व्यक्तिः-* श्री. मनोज अंबादासजी तितरमारे-सदस्य, जि. प. नागपूर, श्री. हरीष माणीकराव कडव-सदस्य पं.स.कुही, श्री. उपासराव सहादेव भुते - सदस्य जि. प. नागपूर, सौ. नंदा पुरूषोत्तम तिजारे - सदस्य पं.स.कुही, सौ.रेखा तिजारे - सदस्य पं. स. कुही, सौ. मोना बाळू बुढ्ढे - सदस्य, ग्रा.पं. मांढळ, सौ. कांता सुखदेव शेंडे- सदस्य, ग्रा.पं.मांढळ, श्री. मोहन डोमाजी मते - माजी सभापती कृ.उ.बा.स. मांढळ, श्री. पांडुरंग सिताराम बुराडे- माजी जिल्हा प्रमुख शिवसेना.


 कुणबी समाज मंडळ मौदा तालुका (मारोडी)
रजि नं. २०५/२००९ एफ २४६६९ (नाग) 
स्थापना - २१ मार्च २००९ 
 मारोडी, ता. मौदा, जि. भंडारा
          कुणबी समाज संस्था, मौदा तालुका जि. नागपूर ही ग्रामीण भागात समाज सेवेचे कार्य करणारी संस्था आहे.या संस्थेने ग्रामीण भागातील शेतीव्यवस्था, राहणीमान, सांस्कृतिक जीवन, शैक्षणिक वातावरण यांच्या विकासासाठी कार्य करायचे ठरविले आहे. शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्यामुळे ग्रामीण जनतेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस कमजोर होत आहे. या सर्व बाबींचा विचार लक्षात घेवून समाज संस्थेने 'सामुहिक विवाह सोहळा' व असेच इतर समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन करुन नोकरी मिळविण्यासाठी सहकार्य केले जाते. १० वी, १२ वी परिक्षेमध्ये तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात येतो.
          कुणबी समाज संस्थेची स्थापना मा. खुशालराव सिंगनजुडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली असून यामध्ये कार्यकारी मंडळाचे १७ सदस्य आहेत. एकूण १३६ आजीव सदस्य आहेत. संस्थेच्या सर्व सदस्यांव्दारे संस्थेला सहकार्य मिळत असल्यामुळे संस्था दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. २१ मार्च २००९ ला संस्थेची स्थापना झाली. व पहिल्याच वर्षी ५ विवाह सर्वांच्या सहकार्याने यशस्वी पार पडले. त्यानंतर दरवर्षी सामुहिक विवाह सोहळयात लग्न करणा-याची संख्या वाढत आहे. हिंदु विवाह पध्दतीने विवाह होत असल्यामुळे फक्त कुणबी समाजातीलच नव्हे तर सर्व जाती धर्मातील विवाह संस्थेव्दारे केले जातात.  ख-या अर्थाने सर्वधर्मसमभाव संस्थेव्दारा पाळला जातो.
           समाजसेवी संस्था ही देणगीदारांच्या सहकार्याने कार्य करीत असते. आमच्या संस्थेला उद्योजक मा. रत्नाकरजी ठवकर (नागपूर) दरवर्षी अर्थिक मदत करीत असतात. तसेच परिसरातील समाजबांधवांकडून संस्था यशस्वितेकडे वाटचाल करीत आहे.


चंद्रपूर जिल्हा बावणे कुणबी समाज मंडळ, चंद्रपूर
स्थापना : ०६/०२/१९८५र.न.एम/३३८६ (चंद्रपूर)


    प्रथम सभा आझाद बगीचा हनुमान मंदीर, जाटपुरा वार्ड येथे घेण्यात आलीयेथे एकूण ३५ लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाली महादेवजी निबार्ते यांचे घरी कार्यकारिणीची बैठक ठरविण्यासाठी त्यात महादेवराव निबातें यांना अध्यक्ष व ज्ञानदेव गोमाशे यांना सचिव तर नानाजी हिंगे यांना सदस्य व इतर कार्यकारिणी सभासदांची निवड करण्यात आली. त्याच वर्षात कोजागिरी कार्यक्रम व ५ नवविवाहित जोडप्यांचा भेटवस्तु देवून सत्कार करण्यात आला व पहिला वार्षिक मेळावा  विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला व नंतर नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष महादेव निबार्ते, सचिव ज्ञानदेव गोमाशे, उपाध्यक्ष नानाजी हिंगे व बाकी कार्यकारिणी सदस्य तेच ठेवण्यात आले. वरील कालावधीत मंडळाच्या कार्यकारिणीने वर्धा, नागपूर व भंडारा मंडाळाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य केले. वर्धा मंडळाने चंद्रपूर मंडळाची सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल खूप प्रशंसा केली. चंद्रपूर मंडळाने वर्धा, नागपूर, भंडारा, मुंबई व इतर मंडळांना प्रत्येक कार्यक्रमास आमंत्रित केले. श्री. ज्ञानदेवरावजी गोमाशे, नानाजी हिंगे, विलासजी चौधरी, रामेश्वरजी आगासे, मदनजी बांडेबुचे, घनश्यामजी ठवकर, पांडुरंगजी खाटीक, शालीकजी कुकडे, सुदामजी गाढवे, मन्सारामजी मारवाडे, अरुणजी निबांर्ते, मधुकररावजी झलके इत्यादी समाज बांधवांना एकत्रित करून जोमाने कार्य करण्यास सुरूवात केली.
    वर्ष २००८ पासून जिल्हा मंडळाने जिल्हा समाजभूषण पुरस्काराची सुरूवात केली व १०वी १२वी उर्त्तीण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. उर्त्तीण विद्यार्थ्यांचा समाजाच्या वतीने स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. वर्ष २०१४ पासून पदवी पदविका व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समाजाच्या वतीने स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला व उद्योजक पुरस्कार कार्यक्रम सुध्दा नव्याने सुरूवात करण्यात आला. उद्योजक पुरस्कार श्री. नानाजी हिंगे, नरेंन्द्रजी लांजेवार ईश्वरजी लुटे, चि. जयंत तितिरमारे यांना देण्यात आला व वर्ष २०१५ चा जिल्हा समाजभूषण पुरस्कार श्री. विलासभाऊ चौधरी यांना देण्यात आला.


 बावणे कुणबी समाज सेवा मंडळ, भंडारा
रजि न. ४०७ / ८१ एफ ६५१, 
स्थापना १९८१
 सिमेंट रोड, पोलिस स्टेशनच मागे गांधी चौक भंडारा

    भंडारा जिल्हा हा बावणे कुणबी समाज बहुल क्षेत्र असल्यामुळे येथील सामाजिक व्याप व कार्य मोठया प्रमाणावर आहे. दरवर्षी नवीन नवीन आजीवन सभासद समाज मंडळात जुळत असतात. त्यामुळे आजीवन सभासदांची संख्या बरीच आहे. आजमितीस मंडळाचे १९०० आजीवन सभासद आहेत. दरवर्षी ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये मंडळाव्दारे उपवर-वधूंचा परिचय मेळावा आयोजित केला जातो. व त्यात १०० च्या जवळपास उपवर-वधूंची नोंदणी केली जाते.
    ऑगस्ट महिन्यामध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व ७५ वर्षावरील ज्येष्ठ समाजबांधवाचा सत्कार शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात येतो. तसेच समाजभूषणांनी व इतर देणगीदारांनी दिलेल्या रक्कमेचे फिक्स डिपॉझीट करुन त्यापासून मिळणा-या व्याजातून जिल्हयातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांस पुरस्कार निधीचे वाटप करण्यात येते.
    मे महिन्यात सामुहिक विवाह सोहळा मंडळातर्फे आयोजित करण्यात येऊन बरीचशी जोडपी विवाहबध्द केली जातात. हे सामुहिक सोहळयाचे कार्य या मंडळाने ब-याच वर्षापासून सुरू केलेले आहे. आणि आताही आहे. सामुहिक विवाहाच्या प्रसंगी एखादया देणगीदारांकडून पूर्ण भोजनाचा खर्च आणि इतर खर्चाची व्यवस्था करुन आर्थिक बाबतीत बचत करण्यात येते.
    माजी खासदार प्रफुलभाई पटेल यांच्याकडून भवन बांधकामासाठी १५ लाख रूपयाचा निधी प्राप्त झाल्यामुळे समाज भुखंडावरील बांधकाम प्रगतीपथावर आहे. माजी आमदार सेवकभाऊ वाघाये यांच्याकडून सभागृहाचे समोरील भागाचे बांधकामासाठी १ लाख रुपयांचे बांधकाम साहित्य प्राप्त होऊन त्याचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. त्याशिवाय मंडळातर्फे कोजागिरी, तिळगुळ, हळदीकुंकू, तुकाराम बीज, समाजबांधव व विद्यार्थ्यांसाठी उद्बोधपर (प्रश्नमंजूषा, नाटक) आदि कार्यक्रमाचे आयोजन करुन समाज जागरणाचे कार्य मंडळातर्फे केल्या जाते. भंडारा जिल्हयातील काही तालुका मंडळातर्फे जसे तुमसर, मोहाडी, लाखनी येथे संपन्न होणा-या भव्य सामुहिक विवाह सोहळयाचे प्रसंगी जिल्हा मंडळातर्फे योग्य ते मार्गदर्शन व अर्थसहाय्यही केले जाते. समाजभूषण मिळविलेल्या व्यक्तिंची नावे:- बाळासोहब रेहपाडे मु.खापरी, ता.पौनी, जि. भंडारा, नामदेवराव कातोरे देशबंधू वार्ड भंडारा, श्रीपतजी बाते - रुक्मिणीनगर, भंडारा, सुर्यकांत सेलोकर- मु. मांढळ, पो. मांढळ, ता.तुमसर, जि. भंडारा, शालिकजी कुकडे- मु.सकरला, पो. आंधळागांव, ता. मोहोडी, जि.भंडारा, श्रावणजी मते - मु.पो. वरठी, ता.मोहाडी, जि. भंडारा,


[04/07, 10:16] Deorao Mate 810: *कुणबी समाज सेवा मंडळ, लाखणी*
रजि नं. २३९ / २००९                                                                                                                                                                     मु.पो.लाखणी, केसलवाडा, जि. भंडारा
          कुणबी समाज सेवा मंडळ,लाखणी या नावाने समाज मंडळाचे काम सुरू होते परंतु शासकीय योजनेत वधू पालकांना अनुदान यादीचा लाभ घेण्यासाठी मंडळ नोंदणीकृत असावा म्हणून आम्ही २३.०४.२००९ ला मंडळाचे श्री संत तुकाराम बहुउद्देशीय से. भा. संस्था लाखणी या नावाने नोंदणी केली आहे. वधू पालकांना २००९ पासून फायदा होत असून संस्थेन २०१७ पर्यंत १४८ लग्न लावले असून सर्वांना लाभ मिळाला आहे. आणि आता या रौप्य महोत्सवी वर्षी १०१ लग्न लावण्याचा संस्थेचा मानस आहे. तसेच समाजाच्या संख्येचा विचार करता समाज भवन अगदी लहान असून त्यांचे बांधकाम निधी अभावी धीम्या गतीने सुरु आहे. सर्व समाज बांधवाच्या मदतीने पुर्ण करायचे आहे.
*२००९ पासून मंडळाने पार पाडले लग्न-:* २००९-१८, २०१० -१५, २०११-३०, २०१२-१९, २०१३-१०, २०१४-२०, २०१५-१२, २०१६-६, २०१७-१८.              श्री संत तुकाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे अंतर्गत कुणबी समाज सेवा मंडळ लाखनी येथे सामुहिक विवाह सोहळयात सदर लग्न लावण्यात आली आहेत. सन १९९३ पासून सुरूवात झाली असून २०१७ पर्यंत मंडळाने ४०७ लग्न पार पाडलेले आहेत.
*राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पुरस्कार प्राप्त व्यक्ति* लाखनी आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार श्री. दसाराम गोंदुजी अतकरी व श्री. रसेस कुमार आत्मारामजी फटे                                                                                                                                                                                  *राजकीय पद भुषविलेल्या व्यक्ति* मा. सेवकभाऊ वाघाये पाटील माजी आमदार, मा. श्रीराम दादा टिचकुले, उपाध्यक्ष वैनगंगा सुगर कारखाना देव्हाडा, तथा माजी अध्यक्ष भूविकास बँक भंडारा.


[04/07, 10:25] Deorao Mate 810: बावणे कुणबी समाज विकास मंडळ, गोंदिया
रजि नं. एफ - २९२६ (भं) स्थापना - १६/३/१९९७
पत्ता:- मरार टोली- गोंदिया
समाज विकास व्हावा या प्रेरणेने सन १९९० ला बावणे कुणबी समाज विकास मंडळाची स्थापना झाली. मंडळाचे संस्थापक व प्रथम अध्यक्ष स्व. नारायणरावजी शेन्डे होते. यांचे शिक्षण स्वातंत्र्य पुर्व काळात ७ वी पर्यंत झाले. पण आपला शेती व्यवसाय, परिश्रमीवृत्ती नगर परिषद सदस्याचे पद भुषवून समाजाला गौरवान्वित केले होते.
अशा थोर समाजसेवी व्यक्तिकडून निर्माण झालेल्या या मंडळाचे बहुसंख्य आजीवन सभासद असून ३ लक्ष रूपयाची निधी जमा करून दिलेला आहे.
समाजसेवेच्या तळमळतेने स्व. नारायणरावजी शेन्डे यांनी १९९७ साली स्वतःच्या मालकीची बहुमूल्य अशी २५ हजार चौ. फुट जागा समाजाला दान केली.
मंडळाला सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व दिनांक १५/८/१९९८ ला काळाने हिरावले. परंतु त्यांची पत्नी गं.भा जमनाबाई, पुत्र गोविंदभाऊ, बबनभाऊ, खेमराजभाऊ शेन्डे या सर्वांनी वडिलाच्या वचनाशी प्रामाणि राहून दि. ३ / १० / २००० ला ही जागा समाजाला देऊन त्यांचे वचन पाळले.
या समाजसेवी व्यक्तिमत्त्वाच्या आदर्शाच्या स्मृतीत समाज विकासाचा रथ पुढे अविरत चालावा या भावनेने या जागेवर समाजभवन निर्माण करण्याचा संकल्प मंडळानी केला. व आपणा सर्वाच्या आशिर्वादाने सहकार्याने दानशूर मा.प्रफुलभाई पटेल यांचे हस्ते मा. नामदार नानाभाऊ पंचबुध्दे, मा. आमदार नानाभाऊ पटोळे, मा.आमदार मधुकर कुकडे, मा. आमदार सेवकभाऊ वाघाये, मा. सुनीलभाऊ फुंडे व अन्य उपस्थित गणमान्य यांच्या व आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न उद्घाटन सोहळा झाला.
समाजाची फक्त इमारतच उभी करणे हे आमचे ध्येय नसून होणा-या नवनिर्मित्त भवनातून समाज विकासाचे उपक्रम जसे गरीब व होतकरु मुलांसाठी वस्तीगृह, त्यांना शैक्षणिक मदत व मार्गदर्शन, पुस्तक पेढी, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार, तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शन, विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे ही आमची उद्दीष्टे आहेत.
कुणबी समाज विकास मंडळ भविष्यात समाजातील सर्व समाज घटकांचा विकास करील यात कोणताही शाखा भेद राहणार नाही. कुणबी समाजातील अनेक उपजाति किंवा पोटजातीचा विचार न करता सर्व कुणबी बांधवाची उन्नती करण्याकरीता प्रयत्नशील राहील. या समाज विकास मंडळात सर्व शाखेच्या कुणबी बांधवांचा समावेश करण्यात आलेला आहे व सर्वाचे सहकार्य मंडळाला सदैव मिळत आहे.
या पुनित कार्याकरिता सर्व समाज बांधवाकडून तन-मन-धनाची अपेक्षा आहे. या क्षेत्राचे दानशूर व कर्मवीर आदरणीय प्रफुलभाई पटेल समाजाच्या उत्थानाकरिता समाज भवनाचा संकल्प पुर्ण करण्यासाठी २० लाख रू विकास निधीतुन व स्वतःकडून ५ लाख दिलेले आहेत. त्याचप्रमाणे नानाभाऊ पंचबुध्दे यांनी १ लाख, सुनिल फंडे यांनी १ लाख व नरेश चौधरी ७३ हजार व संजय ओकते ५० हजार रूपयांची भरीव मदत करून सामाजिक कार्याकरिता आम्हांला प्रोत्साहन केले आहे.


[04/07, 10:33] Deorao Mate 810: बावणे कुणबी समाज बहुउद्देशीय विकास मंडळ, आरमोरी
रजि महा/३५/२००९ ( गड) स्थापना २००९
आरमोरी, जि. गडचिरोली
बावणे कुणबी समाज बहुउद्देशिय विकास मंडळ, आरमोरीची स्थापना २००९ ला झाली आहे. मंडळाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने असून दरवर्षी उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन व सोबतच गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो. दरवर्षी महिला कार्यकारिणी मकर संक्रांतीच्या पर्वावर हळदी कुंकवाचा व वाणाचा कार्यक्रम आयोजित करीत असते.
सामूहिक विवाह मेळावा, इत्यादीचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. परंतु मध्यतंरी कार्यकारिणीला काही अडचणी आल्यामुळे सामूहिक विवाह मेळावे साजरे करता आले नाही. परंतु सामूहिक विवाह मेळाव्यासाठी कार्यकारिणी मंडळ प्रयत्नशील असून असे सोहळे पार पाडण्यासाठी उत्सुक आहे.
समाजातील गुणवंत व्यक्तिं वा, त्यांचा गुणगौरव त्यांच्या उल्लेखनीय कार्यांचा मागोवा घेऊन सत्कार सुध्दा केला जातो. आरमोरी येथील कवी श्रीमान गणपतराव सेलोकर (से.नि.मं. अधिकारी) यांचा केंद्रीय कार्यकारिणी मंडळ, नागपूर यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. तसेच कृषीभूषण पुरस्कार मा. महादेवराव टिचकुले यांना प्रदान करून गुणगौरव करण्यात आले. हा सुध्दा पुरस्कार केंद्रीय कार्यकारिणी मंडळ, नागपूर यांच्या वतीने देण्यात आला.
मंडळ समाजाच्या प्रगतीसाठी कटीबध्द असुन निरनिराळया कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. समाज भूषण मिळविलेल्या व्यक्ति:- श्री. गणपतराव सेलोकर, समाजभूषण, श्री. सचिन दिलीप सपाटे - कृषि भुषण
राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पुरस्कार प्राप्त विद्यार्थी / व्यक्ति :- श्री. गुलाब कवडुजी मते, संपर्क प्रमुख राजकीय पद भूषविलेल्या व्यक्तिः- श्री. हरिषजी मने - जि. प. अध्यक्ष, सौ. लक्ष्मी मने - जि.प. सदस्य / सरपंच ग्रा.प., शेखर मने पंचायत समिती सभापती / सरपंच, श्री. कल्याणदास कानतोडे, संचालक, जि.म. सह. बँक, गडचिरोली.


[04/07, 17:46] Deorao Mate 810: *बावणे कुणबी समाज बहुउद्देशीय सेवा मंडळ संचालित कुणबी समाज सेवा मंडळ, तुमसर*
रजि नं. २०४/०९ स्थापना २००४
        स्थानिक कार्यक्रमात सहभागी होवून, समाज संगठणास मजबूत करण्यासाठी जिल्हयात भेटी दिलेल्या आहेत. विदर्भात सामुहिक विवाह सोहळयात उपस्थिती दर्शविली आहे.
        संस्थेचे एकूण सभासद संख्या ३०० असून तुमसर येथे भव्य कुणबी समाज भवनांचे बांधकाम सुरू आहे. सदर समाजभवनाकरिता श्री. सूर्यकांत शेलोकर यांनी एक एकर जागा दान दिली आहे. सदर समाज भवन बांधकामाला माजी खासदार मा.श्री. प्रफुलभाई पटेल, आमदार मा. श्री. अनिलभाऊ बावनकर, माजी आमदार, मा. श्री मधुकररावजी कुकडे, समाजभूषण श्री. सूर्यकांत सेलोकर, माजी राज्यमंत्री श्री. नानाभाऊ पंचबुध्दे, मा. श्री. नानाभाऊ इलमे, मा. श्री. नारायणराव तितिरमारे, मा. श्री. भाऊरावजी तुमसरे, माजी आमदार सेवकभाऊ वाघाये, मा. श्री. नामदेवजी भूते, मनोहरराव सिंगनजुडे. श्री. मधुकरजी सांबारे, श्री. राजाभाऊ सेलोकर, कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर, सहयोग सहकारी पतसंस्था तुमसर यांनी मदत केलेली आहे. दरवर्षी कोजागिरीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.                                                                                                                            *समाजभूषण मिळविलेल्या व्यक्तिः-* श्री. सूर्यकांतजी टिकारामजी सेलोकर                                                                                                      *राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त विद्यार्थी / व्यक्ति :-* श्री. सूर्यकांत सेलोकर (कृषी भूषण) राज्य, श्री. रमेश गाढवे - (शिक्षण विभाग) राज्य पुरस्कार,
*राजकीय पद भूषविलेल्या व्यक्तिः-* श्री. मधुकरजी कुकडे (माजी आमदार ), श्री. के.के.पंचबुध्दे (जि.प.सदस्य) श्रीमती गिताताई रा. माटे (जि.प.सदस्य), श्री. सुधाकर वहालकर (माजी पं.स.सदस्य), श्री. योगेश सिंगनजुडे (माजी जि.प.सदस्य), नामदेवभाऊ भूते (माजी जि.प.सदस्य), श्री.अशोक भाऊ कुकडे (माजी जि.प.सदस्य), श्री. प्रमोद तितीरमारे (माजी जि.प.सदस्य), श्रीमती मीना सं. गाढवे (माजी जि.प.सदस्य), श्रीमती लक्ष्मीबाई अ. कहालकर (माजी जि.प.सदस्य) श्रीमती चंदाबाई आ. धार्मिक ( माजी जि.प.सदस्य), श्रीमती गिताताई बुराडे (माजी जि.प.सदस्य), श्रीमती कुंदाताई इलमे (माजी जि.प.सदस्य), श्रीमती शिदाबाई धार्मीक (माजी जि.प.सदस्य), श्रीमती शिला मनोज डोये ( जि.प.सदस्य),
श्री. मधूकर फत्तूजी ढबाले (सरपंच तामसवाडी), श्रीमती निशाताई सारवे (सरपंच मांढळी), श्री. लक्ष्मीकांत सेलोकर (सरपंच मांढळ), श्री. राजू अंबादास ढबाले (पं.स.सदस्य), श्रीमती मालिनी सुरेंद्र वहिले (पं.स.सदस्य मांढळ )


[04/07, 17:58] Deorao Mate 810: *भा.बा. कुणबी (कृषक) विकास मंडळ, अमरावती वाटचाल*
रजि.नं. ५९९
पत्ता: संत तुकाराम भवन, गाडगेनगर, अमरावती
          अमरावती जिल्हयात बहुसंख्य समाज हा ग्रामीण विभागात असला तरी या ठिकाणी निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज /फळी समाजमंडळाने तयार केली
आहे. मंडळाच्या पदाधिका-यांनी जिल्हयात  ठिकठिकाणी जावून ५० वर  शाखा, समाजमंडळ स्थापीत केलेले आहे. समाजमंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी जिल्हयात ठिकठिकाणी जाऊन स्थानिय  कार्यक्रमात सहभागी होऊन  मार्गदर्शन व समाज जागृती  करतात. येथील बहुतेक समाजबांधव समाजमंडळाशी
जुडलेले असून सभासदाची संख्या ४५० च्यावर आहे. जानेवारी मध्ये हळदी कुंकू, तिळगुळ कार्यक्रम, महिला मेळावा आयोजित करण्यात येतो. त्यात महिला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांव्दारे मार्गदर्शन करण्यात येते. सप्टेंबर महिन्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व जिल्हा समाजभूषण कार्यक्रम संपन्न होतो. व त्यातच उपवर-वधू परिचय पुस्तिकेचे प्रकाशन केले जाते.
         या समाज मंडळाने रूख्मीणी नगर भागात २६५० चौ. फु. चा भुखंड घेतला असून त्यावर दोन खोल्या व हॉल बांधलेला आहे. त्याला तुकाराम भवन नाव देण्यात आले आहे. मंडळाचे कार्यालय तिथेच आहे. व त्या ठिकाणी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध परीक्षेचे क्लासेस सुरु आहे. गरजू कुटुंबाला राहायला खोल्या दिल्या आहेत. महाराष्ट्रात होणा-या समाज मंडळाच्या कार्यक्रमात तेथील पदाधिकारी उपस्थित राहून विचारांची देवाण - घेवाण करतात.


[04/07, 18:09] Deorao Mate 810: *बावणे कुणबी समाज मंडळ, यवतमाळ*
यवतमाळ बावणे कुणबी समाजव्दारा, युवा बावणे कुणबी समाज बहुउद्देशीय संस्थेची स्थापना सन २००० साली यवतमाळ आणी यवतमाळ परिसरातील समाज बांधव भगिनी व्दारा करण्यात आली. संस्थेव्दारा विविध समाजपयोगी आणि शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात. त्याव्दारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शैक्षणिक, मार्गदर्शन, होतकरु आणि अर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत, रक्तदान, समाजातील कोणत्या घटकांवर होणा-या
अन्यायाला वाचा फोडणे, प्रसंगी,आंदोलने करणे. युवकांना मुख्य समा प्रवाहात आणणे. विवाह जुळविणेस मदत/ मार्गदर्शन करणे. इत्यादी कार्य राबविले जातात. मंडळाचे अध्यक्ष अमोल काशिनाथ सारवे, सचिव गजाननराव किसनराव भडके, सुदाम बोंद्रे, संजय शंकरराव चोले, नितिन बांते, रविंद्र काळे, अजय चोले, सौ. मिनाक्षी सारवे, सौ. ठवकर, सौ. मुटकुरे, देविदासजी खोकले, राजेशजी खोकले, उमेशराव नखाते, विलास चेटुले, वेणुताई मोहतुरे, डॉ.मुलुंड, बेहरे मामा इत्यादी सतत कार्यरत असतात.


[04/07, 18:25] Deorao Mate 810: *बावणे कुणबी समाज बहुउद्देशिय समिती, दारव्हा*
रजि न. एफ १२२८४
कुणबी पुरा गांधीनगर, श्रीकृष्ण नगर, ता. दारव्हा, जि. यवतमाळ
             सन २००२ पासून  समाजाप्रती जागृत होऊन काळाची गरज ओळखून समाजाची आर्थिक कुचंबना न करता वेळेची बचत होऊन समाजातील रूढी व परंपरा जोपासून समाजाचे दरवर्षी समाज मेळावे, समाज विवाह मेळावे असे समाज उपयोगी उपक्रम घेवून यशस्वीपणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आयोजन करीत आला आहोत.                                                                                                                                                                                 समाजात पुढील भविष्याची  गरज म्हणून स्वतःच्या समाजाची जागा खरेदी करण्याचा जो आमचा मानस होता. तो आराध्य दैवत गोपालकृष्ण परमेश्वराच्या कृपाप्रसादाने व समाजामधील आश्रयदाते, देणगीदाते, यांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेऊन कार्यक्षम समितीने सत्तावीस हजार दोनशे पंचविस चौ. फुट (२७११५) जागा खरेदी केली आहे. या अश्या जागेवर समाज भवनाचे विशाल बांधकाम नभूतो न भविष्यती करण्याचे युध्द स्तरावर कर्तव्यदक्ष समिती प्रयत्न करीत आहे.
समाजाची संघटनात्मक बाजू मजबूत असून राजकीय क्षेत्रात सुध्दा समाजाची मंडळी नेतृत्त्व करून आपले योगदान देत आहेत. युवा वर्ग सामाजिक कामात हीरहीरीने भाग घेत सामुहिक मेळावे यशस्वी करतात. मंडळातर्फे खालील मान्यवरांना समाजभूषण म्हणून गौरविण्यात आले.                                               *→* *१९७०* - स्व.गणपत गोदाजी चेटुले,                                                                                                                                                     *→ २००९-२०१०* स्व.नामदेराव तुकारामजी कडव, स्व. वामनराव वायलुजी उरकुडे, स्व. मनिरामजी नारायणराव भोयर, स्व. एकनाथ मनिरामजी मते
*- क्रीडा* राम नामदेवराव मते- आतंर विद्यापीठ - कलर कोट *१९९७-९८* गोपाल सुरेशराव भोयर राष्ट्रीय फुटबॉल -                                        *२००९-२०१०* दिपक गजानन फेंडर - राज्यस्तर फुटबॉल -                                                                                                                               *२०१३ - २०१४* मनिरामजी भोयर - क्रिडा प्रशिक्षक पुरस्कार,
*राजकीय* श्री. एकनाथ मनिरामजी मते - नगरपरिषद अध्यक्ष- *सन १९६५ ते १९८५* श्री. ज्ञानेश्वर सितारामजी बुंदे - नगर सेवक- *सन १९८५ ते १९९०* श्री गणेश मनिरामजी भोयर - विद्यार्थी सेना तालुका प्रमुख  *१९८६ ते १९९४* सौ. शोभाताई नामदेवराव कडव नगरसेविका - *१९९५ ते २०००* सौ.गंगाबाई महादेवराव मोहतुरे नगरसेविका  *१९९५ ते २०००* स्व. सुरेश मनिरामजी भोयर - न.प. सदस्य,   *सन २००१ ते २००५* श्रीमती रंजनाताई सुरेशराव भोयर - न. प. सदस्य   *सन २००१ ते २००५* श्री. सुरेश नामदेवराव तिरमारे *२००५ - २०१०*  श्री. प्रकाशराव वामनराव उरकुडे *२०११ - १६* विविध कार्य. उपाध्यक्ष, सौ. गिताबाई प्रकाशराव उरकुडे नगरसेविका *२०११-१६,* सौ. वैशाली सुभाषराव खाटीक, नगरसेविका उपसभापती महिला बाल कल्याण सभापती) *२०१६* ते चालु श्री. अरविंद तुकारामजी निंबर्ते नगरसेवक (माजी गटनेता, शिवसेना बांधकाम सभापती ) श्री. धनजंय महादेवराव सारवे- विद्यार्थी सेना शहर प्रमुख श्री. विजय विष्णुजी वैद्य उपशहर प्रमुख शिवसेना.


[04/07, 19:01] Deorao Mate 810: *बावणे कुणबी समाज मंडळ कोराडी - खापरखेडा परिसर*
बावणे कुणबी समाज मंडळ कोराडीची स्थापना १९९२ मध्ये कोराडी येथे झाली. समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न येथे सुध्दा झाले. हळूहळू आपल्या समाजबांधवांची संख्या या परिसरात वाढली. कोरडी व खापरखेडा परिसरातील पांजरा, कोराडी, महादुला, नांदा, लोणखैरी, दहेगांव, वलनी, सिलेवाडा, पोटा, खापरखेडा, बीना, भानेगांव, सुरादेवी, पाटणसावंगी, पिपला व इतर लगतच्या गावातील समाजबांधवांना एकत्र करुन पुढे येणा-या काळातील प्रगती साधण्याचा विचार पुढे आला. मुख्यत्वे तरूण वर्गांनी पुढाकार घेऊन निरनिराळया योजना राबविण्याचे ठरविले. कोणत्याही वसाहतीत राहतांना गाळे क्रमांक
किंवा घर शोधताना फार त्रास होतो. समाजबांधवांना एकमेकांचे पत्ते व नातेसंबंध यांची माहिती मिळावी या उद्देशाने ही माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. दरवर्षी वार्षिक कार्यक्रमाचे केले जाते.


[04/07, 19:28] Deorao Mate 810: *कुणबी मराठा सेवा संघ, तिरोडा तालुका*
कार्यवृत्त
         कुणबी मराठा सेवा संघाची स्थापना तिरोडा तालुक्यात दि. २६/८/२००१ रोजी करण्यात आली. त्यापूर्वी येथे बावणे कुणबी समाज ता. तिरोडा या नावाने, बावणे कुणबी समाज सेवामंडळ, भंडारा यांचे अधिनस्थ व त्याचे रजिस्ट्रेशन खाली समाजकार्य चालत होते.
कुणबी मराठा सेवा संघ हे नाव जरी थोडे वेगळे वाटत असले तरी सर्व पोटजातींना यात त्यांच्या इच्छेनुसार सामावून घेण्यात आले. व संघाचे ध्येय हे एकच म्हणजे प्रचलित नसल्यामुळे गोंदिया व संगठन हेच आहे. आणि कार्यकर्तेही जुनेच आहेत. मराठा हा शब्द आपलेकडे प्रचलित नसल्यामुळे गोंदिया येथील जिल्हा मेळाव्यात मराठा या शब्दाच्या अगोदर कुणबी हे नाव जोडण्यात आले.
२००८ पासून आम्ही दोनदा शेतकरी मेळावे व चर्चासत्र, २०१० मध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर, केसलवाडा व परसवाडा येथे घेतले. २०११ मध्ये वर- वधु परिचय मेळावा केसलवाडा व परसवाडा येथे घेतला आणि २०१२ मध्ये गावोगावी जाऊन १९ व २१ ऑक्टोंबरला गावातील ज्येष्ठ नागरीक (स्त्री-पुरूष) यांचा सत्कार करण्यात आला.


[04/07, 19:47] Deorao Mate 810: *बावणे कुणबी समाज उन्नती मंडळ,*
*वर्धा*
नोंदणी क्र. महा. / ३५/२०१२ एफ - ७१४७
         बावणे कुणबी समाज सेवा मंडळ, वर्धा, ब-याच वर्षापासून कार्यरत आहे . हया कालावधीत अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जसे वधुवर परिचय मेळावे, समाज भुषण सोहळा, कोजागिरी तसेच महिला मंडळाचा हळदीकुंकू व तिळगुळ कार्यक्रम इत्यादी आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमाने समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नती कशी होईल या विषयावर चर्चा करण्यात येते.
         आर्थिक शैक्षणिक व इतर दृष्टया समाज बांधवांना लाभ घेता यावा या उद्देशाने आपल्या मदतीच्या अपेक्षेने मौजा इंजापूर, ता. जि. वर्धा सर्व्हे क्र. १६८ मधिल प्लॉट नं.९३, उत्तम पार्क (अमीनिटी प्लॉट) लांबी ४८ मी. रुंदी ४८.७५ एकूण क्षेत्रफळ २०८७.९० चौ. मिटर, एकूण चौ. फूट २२४६५.८० चा २० लाखात सौदा केलेला आहे. सदर प्लॉट पूर्वेस ले - आऊट मधिल ९ मी. रोड, पश्चिमेस ९ मी. रोड, उत्तरेस ओपन स्पेस व दक्षिणेस १२ मी. रोड आहे.
        सदर प्लॉटकरिता इसारापोटी ६ लाख दिलेले आहे. सदर प्लॉट हा मे २०१८ पर्यंत ताब्यात घ्यावयाचे आहे व पुढील कार्यक्रम हे आपल्या स्वतःच्या हक्काच्या जागेत करावयाचे आहे.


[04/07, 20:06] Deorao Mate 810: *बावणे कुणबी समाज मंडळ, पुणे*
सन १९८४ पुर्वीपासून श्री. निबांतें, श्री गोमाशे, श्री. लाकडे, श्री. बुराडे, श्री. पंचबुध्दे इत्यादी मंडळी कार्यरत होती व आपण सर्व एकत्रीत आलो पाहिजे ही संकल्पना पुढे आली तेव्हापासून आम्ही सर्वच दरवर्षी एकत्रीत वनभोजनाचा व हळदी कुंकुवाचा कार्यक्रम लहान प्रमाणात घेत गेलो.
मध्यतंरी थोडा कालावधी गेला व म्हणतात ना “ पुणे तेथे काय उणे,” विद्येचे माहेर घर पुणे, आय.टी पार्क पुणे, उदयोग धंदे पुणे, हळूहळू समाज बांधवाची संख्या वाढत गेली व नव्या जोमाने सर्व एकत्रीत होवून पाच वर्षापासून आम्ही मोठया प्रमाणात समाज मेळावा घेत आहोत.
         मुल-मुली लहानाची मोठी झाली. नोकरी निमित्त समाज पुण्याला येवू लागल्यामुळे उपवर-वधू परिचय मेळावा एकत्रित घेण्यासाठी आम्ही कुठेही मागेपुढे पाहिले नाही. मेळावा आज चांगल्या पध्दतीचे यशस्वी होतो. दरवर्षी आम्ही नविन वर्षाचे कॅलेडर (बावणे कुणबी समाज, पुणे परिसर दिनदर्शीका) व उपवर वरवधू पुस्तिका सुध्दा प्रसारित करतो आहे. दिनदर्शीका समाज बांधवाला भेट म्हणून देतो.
        या कामी समाज बांधवाची खूप मोठया प्रमाणात आम्हाला मदत मिळते आमचा उत्साह अजुन वाढतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आमची कार्यकारीणी खूप मेहनत घेत असते. खरोखर मी त्यांना धन्यवाद देतो. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये महिलांचा हळदी- कुंकू, खेळ व सामुहिक जेवणाचा कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते याकरिता चांगला प्रतिसाद मिळतो.
       पुणे या ठिकाणी समाजाची एक छोटीशी वास्तु उभी राहावी व त्याचा लाभ आपण सर्वांना व्हावा हा कार्यकर्त्यांचा मानस आहे त्याकरिता आपणा सर्वाची मदत हवी आहे ती आपण कराल अशी आशा आहे.


[04/07, 20:20] Deorao Mate 810: *बावणे कुणबी समाज उन्नती मंडळ, औरंगाबाद*
रजि. नं. एफ- १६७०२
पत्ताः- गजानन कॉलनी, आर एच. ४५/२, दक्षिणमुख हनुमान मंदिर, वाळूज, एम.आय.डी.सी., बजाजनगर, औरंगाबाद- ४३१३३६
        २६ जानेवारी २०१० मध्ये नविन मंडळाची सर्वाच्या संमतीनुसार स्थापना झाली. श्री. पांडुरंग मुटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकरिणीची स्थापना करण्यात आली त्यात उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, संघटक, असे नवीन कमेटी तयार केली सर्वाच्या सहकार्याने मंडळ हळूहळू प्रगती करीत आहे. दरवर्षी मंडळाचा वर्धापनदिन उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होतो. त्यामध्ये चांगल्या प्रकारे उपक्रम राबविल्या जातात. १) सेवानिवृत्त समाज बांधवाचा सत्कार,
२) महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेले समाज बांधवाचा सत्कार, ३) समितीमध्ये विशिष्ट काम करणा-या समाज बांधवाचा सत्कार, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ४) तुकाराम महाराज बीज ५ ) वृक्षारोपण ६) महिलांचा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम, महिलांना दरवर्षी वेगवेगळया प्रकारे हळदी कुंकूवाचा गिफ्ट देणे. मंडळ हे छोटसं रोपट आहे पण कार्यक्रम मात्र चांगल्या प्रकारे राबवित आहे. त्याकरिता सर्वाचे अनमोल सहकार्य आहे म्हणूनच हे घडते. मंडळ प्रगतीच्या पथावर वाटचाल करीत आहे येथे ५० कुटूंब स्थायिक आहे. मंडळाव्दारे भाजीपोळी केंद्र चालू करण्याचा मनोरथ आहे.
        गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मानकरी (पांडुरंग मारोतीराव मुटकरे ) सेवानिवृत्त सत्कार :- १) श्रीकृष्ण ढोरे २) परशराम शेलोकर ३) श्रीराम लुटे ४) मनोहर कातोरे ५) दुर्योधन पंचबुध्दे व शेलोकर मंडळाला साऊंड व माईक देणगी स्वरूपात चंद्रकांत देशमुख हे यांचे कडून प्राप्त झाले आहे.


[04/07, 20:27] Deorao Mate 810: *बावणे कुणबी समाज मंडळ, अकोला*
रजि.नं. अकोला / ००७/२०१८
पत्ता:- अकोला
 *अकोला बावणे कुणबी समाज कार्यकारीणी*
श्री. प्रमोदजी रामभाऊ बांडाबुचे (अध्यक्ष) श्री.संजय वैद्य (उपाध्यक्ष), श्री. शशिकांत सदाशिव झंझाळ (सचिव) श्री. प्रशांत विष्णु नागलवाडे (सहसचिव), श्री.प्रविण कुमार मोहन रेहपाडे (कार्याध्यक्षा), श्री. अरूण श्रीरामजी मने (सदस्य), श्री. श्रीकांत झंझाळ (सदस्य), श्री. संतोष रूपराव घुमनखेडे (सदस्य)
       त्या अनुषंगाने अकोला परिसरातील मान्यवरांनी अकोला कुणबी समाज मंडळ स्थापन  करण्याचे ठरविले, त्यानुसार विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत समाजातील जेष्ठ व नामवंत व्यक्ति प्रामुख्याने उपस्थित होते. जसे संजय वैद्य, श्रीकृष्णजी फेंडर, बबनराव निंबर्ते, विजय पंचबुध्दे, विजय नागलवाडे, मारोतराव बांडाबुचे, डॉ.लाकडे, दिवाकर नांदगाये, सार्वे काका, दादाराव ढोरे, विजय ईश्वरकर हे उपस्थित होते. सदर वरिष्ठांनी समाजाचे एकत्रिकरण कसे होईल व समाज प्रगत कसा होईल यावर मोलाचे मार्गदर्शन केले व सदर बैठकीत वरिष्ठांचे सल्ल्यानुसार व संमतीने अकोला बावणे कुणबी समाज मंडळाची स्थापना करण्यात आली. *कार्यकारी मंडळ* पुढील प्रमाणे:-
श्री. प्रमोद बांडाबुचे - जिल्हाध्यक्ष तथा शहराध्यक्ष, श्री. संजय वैद्य, श्री. विजय पंचबुध्दे - उपाध्यक्ष श्री. शशिकांत झंझाळ- सचिव, श्री. सचिन निंबर्ते कोषाध्यक्ष, सदस्य - श्री. रामेश्वरावजी सार्वे, श्री. नागोराव निंबर्ते, श्री. मधुकरजी ईश्वरकर, श्री. श्रीकांत झंझाळ, श्री. संतोष धुनमखेडे, श्री. प्रविणकुमार रेहपाडे, श्री. प्रशांत नागलवाडे, श्री. सुमित शेलोकर, सहसचिव, प्रसिध्दी प्रमुख, सल्लागार समिती ठरविण्यात आले. कार्यकर्ते - सर्वश्री वैभव निंबर्ते, राहुल नागलवाडे, ऋषीकेश शेंडे, गणेश गथडे, अमेय ईश्वरकर, अनुप जौजांरे, विशाल भोयर .                                                                                                                   समाजाचा उध्दार व्हावा या उद्देशाने आम्ही युवा व समाजातील वरिष्ठांनी ठरविल्याप्रमाणे प्रत्येक समाजातील कुटुंबाची व कुटंबातील प्रत्येक व्यक्तिची नोंद समाज मंडळात व्हावी या अनुषंगाने आम्ही आपणास भेटत आहोत. यातील प्रामुख्याने पुढील वर्षी घेण्यात येणारे विविध कार्यक्रमांची माहिती देत आहोत.
१) समाजातील प्रत्येक कुंटुबांची व्यक्तिसह नोंदणी.
२) तालुकास्तरीय कार्यकारिणीची नेमणुक करणे.
३) अकोला जिल्हास्तरीय समाजाचा कौटुंबिक व सत्कार सोहळयाचे आयोजन करणे.
४) महिला वर्गासाठी विशेष हळदी-कुंकाचे कार्यक्रमाचे आयोजन करणे.
५) समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करणे.
६) गरजवंताना वैद्यकीय कामासाठी रक्त पुरवठा करण्याचे नियोजन करणे.
७) १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट खेळाडू यांचा सत्कार करणे.
८) संत तुकाराम महाराजांवर आधारित “ तुकाराम बिज ” कार्यक्रमाचे आयोजन करणे.
९) महिन्यातून एकदा किंवा गरज असेल त्यावेळी विशेष बैठकीचे आयोजन करणे व त्यामध्ये नविन संकल्पना तथा समाजातील कौटुंबिक समस्या तक्रारींचे नियोजन करण्याचा प्रयत्न करणे.


[04/07, 20:34] Deorao Mate 810: *बावणे कुणबी समाज सेवा मंडळ, उमरेड*
रजि न. ६५५/०३ (नाग) स्थापना १९९५
कार्यालयः- प्रकाश वहिले, प्लॉट नं. १२२, राहाटे ले-आऊट, उमरेड, जि. नागपूर
          उपरोक्त मंडळाची स्थापना स्वर्गिय शामरावजी मने, स्वर्गीय ओमप्रकाश भोयर व श्री. माधवराव मोहतुरे यांच्या सहकार्यातून व स्वर्गीय विश्वनाथजी बान्ते यांच्या मृत्यूप्रसंगीनिमित्याने १ जानेवारी १९९५ साली श्री. बा यांचे घरी समाजाची प्रथम बैठक घेऊन मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यात अध्यक्ष स्व. शामरावजी मने, उपाध्यक्ष श्री. वसंतरावजी रार्घोते सचिव माधवरावजी मोहतुरे, स्व. मानिकरावजी रार्घोते सहसचिव होते. व कार्यकारणीचे अध्यक्षासह ११ लोकांची कार्यकारिणी स्थापना करण्यात आली. यात मंडळाचा एकमेव उद्देश म्हणजे उमरेड शहरातील बावणे कुणबी समाजाच्या बांधवांची एकजुट करुन परिचय घडवून आणणे व लहान मोठया सुखदुःखात सहभागी करून घेणे या दृष्टीने समाजाने सदस्याकरीता १००० लोकांच्या स्वयंपाकाकरिता देणगीच्या स्वरूपात भांडे घेण्यात आले, जेणे करुन सदस्य बांधव समाजाच्या संपर्कात राहतील या दृष्टीने पाऊल उचलण्यात आले.
        त्यानंतर १९९५ पासून मकर संक्राती निमित्य हळदीकुंकू, सामुहिक मेळावा जनसंर्पकाच्या दृष्टीने सुरू करण्यात आले. तसेच सभासदाचे सहकार्याने सदस्य वाढवून २००४ पासून गुणवंत विद्यार्थी सत्कार, ज्येष्ठ सभासदाचे सत्कार, राष्ट्रीय क्रिडात भाग घेणा-या खेळाडूचे सत्कार, सामान्य ज्ञान परिक्षा, चित्रकला परिक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धा. आरोग्याच्या दृष्टिने समाजातील सुशिक्षित लोकांचे मार्गदर्शन, डॉक्टर यांचे मार्गदर्शन दरवर्षी घेण्यात येते. सहल आणि सहभोजनाचे कार्यक्रम घेण्यात सुरूवात आली.
         नंतर युवा कार्यकारिणी महिला कार्यकारिणी यांची स्थापना करण्यात येऊन आज कार्यरत असलेली कार्यकरिणी मंडळ अध्यक्ष श्री. दौलतरावजी लुटे, उपाध्यक्ष श्री. रामदासजी शेंडे, सचिव श्री. भाऊरावजी कातोरे, सहसचिव श्री. सुरेशराव आंबोणे, इतर पदाधिकारी सदस्यगण यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कार्याची वाटचाल सुरू आहे. विशेष माजी नगराध्यक्ष सौ. शिलाताई मने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विजयराव खवास व लक्ष्मणराव मारोडे यांच्याकडून पुढे वाटचाल करीत आहे.


[04/07, 20:48] Deorao Mate 810: *मध्यप्रदेश विभाग*
बावणे कुणबी समाज मंडळ, इन्दौर
बावणे कुणबी समाज मंडळ इन्दौर ची स्थापना वर्ष १९६२ मध्ये झाली | मंडळाचा एकमेव उद्देश म्हणजे इन्दौर शहरातील बावणे कुणबी समाजाच्या बांधवाना एकजुट करणे आणि लहान मोठया सुखदुःखात सहभागी करुन घेणे. समाजाचे सदस्यांची बैठक घेऊन सर्वसहमतीने कार्यकारिणी स्थापना करण्यात आली आहे. मंडळातर्फे वेगवेगळी समाज हितार्थ कार्य करण्यात येतात आणि त्यात सर्वसाधारण सदस्यांचा ही सहभाग असतो. समाज कार्याकरिता प्रत्येक कुटुंबाकडून समाज सेवानिधि एकत्र केल्या जाते । मंडळाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने असून महिला कार्यकारिणी दरवर्षी मकरसंक्रांतीच्या पर्वावर हळदी कुंकुवाचा व वाणाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात. तसेच समाज बांधवांच्या इच्छेनुसार वेळीवेळी समाजाकडून विविध कार्यक्रम करण्यात येतात. समाजातील वरीष्ठ समाज बांधवांचा सत्कार, गुणवंत व्यक्तिंचा गुणगौरव, त्यांच्या उल्लेखनीय कार्यांचा मागोवा घेऊन सत्कार सुध्दा करण्यासाठी कार्यकारिणी मंडळ प्रयत्नशील आहे. मंडळाजवळ उपलब्ध पैशांनी समाज बांधवांना कठीण परिस्थितीत आर्थित मदत मिळावी या उद्देशाने समाजाव्दारे पतपेढीची सुरूवात करण्यात आली. समाजाच्या गरजू बांधवांना त्वरीत अर्थसहाय्य देण्याचे कार्य पेढीतून अगदी कमी व्याजावर केले जाते. इन्दौर हा बावणे कुणबी समाज अल्प क्षेत्र असूनही समाजाच्या पतपेढीत चार लाख रूपयांची निधी आहे.
         बावणे कुणबी समाज मंडळ इन्दौरच्या प्रत्येक सदस्याची पारिवारीक माहिती उपलब्ध करुन देण्याकरीता एक ‘परिवार विवरणिका' प्रकाशित करण्यात आली आहे. त्यात दरवर्षी माहिती अपडेट केल्या जाते.



































































   

विविध जिल्हा स्तरावरील बावणे कुणबी समाज मंडळे व त्यांचे कार्य

  विविध जिल्हा स्तरावरील  बावणे कुणबी समाज  मंडळे  व  त्यांचे कार्य               महाराष्ट्रात कुणबी समाज हा बहुसंख्येने  असून साडेबारा  पोट...