Monday, August 10, 2020

■BK महिला सखी मंच व ◆ कविता दि.१ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत

[8/1, 6:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

            ""संस्कारधारा""(१७)

बापाची चप्पल घाली लेकरं
मित्रत्व एकमेका करा स्विकार
जपा नात्यात मर्यादा आदर
आहे भिस्त बापाची मुलावर.

दनाअ, नागपूर
[8/1, 6:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय - आपले शेजारी*

जिव्हाळ्या सोबत
असते गोष्टींची होड
शेजारी हे नातच
मुळात फार गोड

मृदू भाषिक असे
आपले शेजारी
साखर, बटाटा
नेताता उसनवारी

येणाऱ्या जाणाऱ्यांची
खबरबात ठेवतात
स्वयंपाक घरात
लक्ष ठेवून असतात

विचारपूस करतात 
जेव्हा असतो आजारी
वहिनी करा म्हणतात
खायला आज कचोरी

सणावाराला होई
पदार्थांची देवाणघेवाण
लग्न समारंभात
उत्साहाने सहभाग

नातेवाईकांची उणिव
काढतात भरून
गरजेला आपल्या
सदैव येतात धावून

नशीबच पाहिजे 
शेजारी मिळायला
आपणही असतोच
शेजारी कुणाला

*सौ. रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[8/1, 6:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.२५
सड्याचं अंगण
दारी रांगोळी
उभा राही तिथे
सखा वनमाळी.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/1, 6:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आपले शेजारी*
***********************
आपले शेजारी...... 
फार असतात भारी
कधी करती लबाडी 
कधी फार हुशारी 

दुसर्‍यांच्या घरची 
चौकशी करतात
आपल्या गोष्टी 
झाकून ठेवतात

रडू आल्यास 
अश्रू पुसतात
कधी आपल्या 
माघारी हसतात

संकट आल्यास 
मदत करतात 
विनोद सांगून 
कधी हसवतात 

छोट्या गोष्टींवर 
कधी भांडतात 
कधी आपल्याशी 
लाडीगोडी लावतात 

अति मैत्री यांच्याशी 
कधी पडते भारी 
गोड बोलून मागती
 दुसर्‍यास उसनवारी

*सौ स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/1, 6:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आपले  शेजारी 



असावेत  आपले शेजारी
त्यांच्या त प्रेमळ ता नि समजुतदारी
छोटया मोठ्या  गोष्टीवरुन भांडण  तर नाहीच
आपण आहोत  एकमेकांचे शेजारी .

तब्येतीशिरी धावुन येतात  वरचेवरी
हक्काने त्यांना  आम्ही  बोलावतो घरी 
शेजारी  नसावेत  चहाडखोर

नसावेत  ते चोरावर मोर.


तब्येत बिघडत  असे  सासुबाईंची
शेजारी  माझे धावुन येती
मूल लहान असताना शेजारी  आमचे सदा सोबती 
मूल  सदोदित त्यांच्या अंगाखांद्यावरती.
सगळं च असते  आपल्या  घरी 
मग कशाला वणवण फिरायच तरी
बंधुभाव मैत्री  टिकवून  सारी
शेजारधर्म पाळला पाहिजे  एकमेकांपरी.
[8/1, 6:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शेजारी---

आपले शेजारी असावेत
चांगले सक्खे
आपणही वागावे
सौख्याने पक्के ।।
    नसावा गैरसमज मनात
न जावे कुणाच्या जास्त खोलात
निंदेलाही स्वीकारावे तरच
नांदतो आपण जिव्हाळ्यात।।
       कुणा कमी लेखणे, 
नको उगाच भांडण
नको रुसवा, फुगवा
हसून करू आनंदी सारे क्षण।।
       नातलग सारेअसती दूरच 
शेजारीच धावून येती
सुख दुःखाच्या कामी सदा
भावनाही जपती ।।
       नवीन पदार्थ करता 
द्यावे परस्परांना
आनंदाने न्हावे
नयनी पाणी आणतांना।।
     भाव गोड अंतरीचे
सलोख्याने प्रेम जपावे
सुख दुःख वाटून घेऊन
आयुष्य सार्थक करावे ।।
     मंगला डहाके, भंडारा
[8/1, 6:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आपले शेजारी 

आमचे शेजारी आहेत खूप छान !
थोरा मोठयाचा नेहमीच ठेवतात मान !

सुखात आणि दुःखात असते त्यान्ची साथ !
देतो एकमेकांना मदतीचा हात !

नाही करीत कुणी कुणाचा मत्सर अन हेवा !
छोटया मोठया भांडणात नाही करीत दावा !

कुरड्या पापड, वड्या सांडगी करतो मिळून !
खातोही मस्त मग त्यानां तळून !

भजन मंडळीही आमची आहे फार गुणी !
गोड गोड भजन आणि गातो गाणी !

भिसी पार्टीचा असतो जोरदार बेत !
असे मस्त शेजारी आहेत आमच्या नशीबात !!

रंजना हलमारे साकोली
[8/1, 6:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आपले शेजारी

आपले शेजारी
आयुष्य भराचे साथी
सुख दुःखात देतात
 मदतीचा हात!!

मुलांना ठेवणं
चाबी सांभाळणं
घरा कडं लक्ष देणं
नेहमी देतात साथ!!

लग्न कार्य असो
मरण असो
आपलं घर
वापरायला देतात!!

नको भांडण तंटा
नको निंदा बिंदा
सलोख्याचे संबंध
असावं परस्परांचे!!

दिवाळी, दसरा
गोडधोड करती
नाश्तांचा आस्वाद
सर्वच घेती!!

प्रेम, जिव्हाळा
भावनाही जपतात
नयनी पाणी आलं तर
डोळे ही पुसतात!!

नातलग सारे दुरच राहतात
शेजारी आधी धावुनच येतात
कधी हास्य , कधी कौतुक
सगळ्यांना ते सामावून घेतात,!!

शेजारी, शेजारी दोघांनाही
परस्परांचा आधार!!

सौ.माधुरी देवेंद्र भूते.
[8/1, 6:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के सा.सं.प.  (७६)

    "" आपले शेजारी""

आपले शेजारी
जिवंभावं साथी
असता आजारी
धावतात सारी.

                    लग्नकार्य असो
                    वा सणासुदीला
                    जमताती सारे
                    धावी मदतीला.

परिक्षेत मुलींनी
बाजी मारली
कौतुक कराया
शेजारणीचं दारी.

                     गावतुरा जावा
                     शेजारां सांगावा
                     लक्षची ठेवावा
                     येतोयं म्हणावा.

निंदकाचे घर
असावे शेजारी
तयांचे बोलवे
समाज सुधारी.

                     पाळता शेजारधर्म
                     जाणावं तया वर्म
                     संबंधात तारतम्य
                     करावेत धर्मकर्म.

दनाअ, नागपूर
दि.०१आगस्ट२०२०
[8/1, 6:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आपले शेजारी*
शेजार्‍यांसोबत नेहमी
चांगले राहावे
एकमेकांच्या सुख दुःखात
सहभागी आपण व्हावे

इकडची भाजी तिकडे
तिकडची भाजी इकडे
नेहमी देत राहावी
आपुलकी इथे सदावाहू द्यावी

स्मित हास्य असावे ओठी
रोज घ्याव्या भेटीगाठी
 नातेवाईकां पेक्षा शेजारी मोठी

काका काकू मामा मावशी
असे नाते जुळवावे
नातेवाईकां पेक्षा
शेजार यांमध्ये मन मिळवावे

               नंदा भोयर
[8/1, 6:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आपले शेजारी

नोकरीनिमित्य फिरणे,
हेच आमचे काम.
प्रत्येकठिकाणी नव-नवीन,
मिळतात शेजारी छान.

गेल्याबरोबर जुळतात
आमची नाती.
काका,काकु,मावशी,ताई,
दादा,भाऊ म्हणतो आम्ही.

जाती धर्माचे आम्हा,
वावडे नसे,
आनंदाने जगतो आम्ही,
एका झाडावरचे पक्षी जसे.

जसा देश,तसा वेष,
मनात द्वेष ठेवत नाही.
सुखदुःखात एकमेकांची,
साथ कधी सोडत नाही.

दोनचार वर्षाच्या वास्तव्यात,
शेजारधर्म पाळतात शेजारी.
आपल्याही जवळच्या नातेवाईकांपेक्षा,
खरी नाती निभावतात शेजारी.

                  सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                   खामगाव.जि.बुलडाणा.
                    दि.1.8.2020
[8/1, 6:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ||  आपले शेजारी  ||

गरज भासे मदतिचि
झाली उत्पत्ति शेजाऱ्याचि
शेजारी म्हणती आपण भाऊ
सगळे मिळून मिसळून राहू

नातेवाईक,गनगोत
जेव्हा नसती जवळ
आपत्तिच्या वेळी शेजारी
करीत असे धावपळ

अध्ये मध्ये शेजाऱ्याशि 
चालत असती रुसवे फुगवे
कधि कधि आनंदाने
एकत्र येती सगळे

शहरातील शेजारी
दारातुनच पाहे ढूंकुन
खेड्यातिल शेजारी
मात्र पटकन जाई धावुन

असे आपला शेजारी
नातलगाहुन निराळा
तयासाठी आपण ही
शेजार धर्म पाळा

 सौ.रेणुका झंझाड भंडारा(बेल)
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.२६
चांदण्यांची शाळा संपत आली
दिनकराच्या स्वागताची तयारी
पुष्पसुगंधी ओंजळ दरवळली
पक्षांनी मंजूळ भूपाळी गायीली.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: धरनीं मातेच्या स्थळी
हक्क सारेशी लाभले।
पाहुणास्वरुपी आले
देह सोडत सोपवुन गेले।
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

           ""संस्कारधारा""(१८)

माझं माझं म्हणवशी
सारं नाशिवंत असती
नाम हरीचे घे फुकाचे
तुटावे भवपाश जिवाचे.

दनाअ, नागपूर
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सौ नंदा भोयर

कोकिळेच्या मंजुळ आवाज
सोनेरी किरणांनी सजली पहाट
आनंद देऊन जातो
तुमच्यासारख्या मैत्रिणींचा सहवास
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
माझी आवडती कविता. (७७)
        "" आत्मचिंतन""

जे जे न् भावे स्वत:ला
ते ते न् वदावे जणाला
तोलून शब्द विवेके बोला
सौहार्दाचं लेणं समाजाला.

चुगली चपाटी निंदा नालस्ती
मोहल्ल्यात दिसतात जास्ती
घरोघरी वस्ती मातिच्या चुलीची
तयांना गरज आत्मचिंतनाची.

हेव्यादाव्याने कुटुंब नासले
शिक्षण,कामधंदा,धनद्रव्याने
ना कधी भाव भावना समजले
नाते इथे कुटुबाचे गळाले.

प्रगती कुणाची न् देखवे डोळा
तव उडतो चारित्र्यावर शिंतोळा
दोष देण्यात आयुष्य घालवला
क्षणभर बसावे आत्मचिंतनाला.

घ्यावी अनुभुती आत्मचिंतनाची
प्रगटतील विचार चित्तशुध्दतेची
घडतील आचरणे तव सद्बुध्दीचे
तयांना मिळे स्वामीत्व प्रबोधनाचे.

दनाअ, नागपूर
दि.०२/०८/२०२०
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *तुझ्या माझ्या मैत्रीला आणि काय हवं.!*
*************************
 तुझी माझी मैत्री.... 
अशीच राहू दे सर्वदा 
दोघांपैकी कुणीही 
विसरू न ती कदा

अश्रू येता डोळ्यात... 
तुझा खांदा हवा 
नेहमी मला हसवायचा 
विनोद सांगून नवा 

एकमेकांवर राहू दे 
नेहमी असाच विश्वास 
आपल्या मैत्रीत राहू दे 
प्रेम रुपी श्वास......... 

दूर असलो म्हणून 
नाही करायची खंत
भेटल्यावर काढू पुन्हा 
जुन्या आठवणी निवांत 

थट्टा मस्करी करायला 
पुन्हा भेटू कट्ट्यावर 
दोघं मिळून ताव मारू 
 एकाच समोस्यावर

*तुझ्या माझ्या मैत्रीला* 
*आणि काय हवं......*
जुन्या आठवणींसोबत
पुन्हा नव्याने जगावं 

*सौ स्वाती सेलोकर* 
*भंडारा*
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.३१*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*मैत्री म्हणजे आनंद*
*नसे वयाचे बंधन*
*कल्पनाच करवत नाही*
*मैत्री शिवाय जीवन*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय - आवडती कविता*

 *तुझ्या माझ्या मैत्रीला आणखी काय हवं ..!*

खांद्यावरचा हात आहे 
एकमेकांचा आधार
तुझी- माझी साथ
सुख-दुःखाच्या जीवनात 

योग्य मार्ग दाखविणार 
सुखकर होण्या जीवन प्रवास
मला समजून तूच घेणार 
असा आहे मनी विश्वास

रुसवे-फुगवे वाढवती 
आपल्या मैत्रीचा गोडवा
काळजीही असे सदा तुझी
फूलतो आठवणींचा माळवा

म्हातारं झालो तरी
मैत्रीला टवटवीत ठेवावं
तुझ्या माझ्या मैत्रीला 
आणखी काय हवं..!

*सौ.रूपाली अमोल बोंद्रे*
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडती कविता
   ||  वरुण राजाला साकडे ||

पावसाने मारली दडी
धानपिक धोक्यामंधी
येणं माझ्या वरुण राजा
रोप जगतिल रे कशी

ज्यांची झाली रोवणी
पडल्या मोठाल्या भेगा
येणं माझ्या वरुण राजा
असा नको देवु दगा

कोरोनाच्या साथीनं
झालो पुरता बेजार
येणं माझ्या वरुण राजा
आहे तुझाच आधार

दहा दिसापासून कसा
आग ओकु लागे सूर्य
येणं माझ्या वरुण राजा
खचत आहे मनोधैर्य

वाट तुझी किती पाहु
पर्हे माझे कोमेजले
येणं माझ्या वरुण राजा
डोळया पाणी रे दाटले

जीव मुठीत धरुन
साकडे मी घालतो
येणं माझ्या वरुण राजा
अंत किती रे पाहतो

 सौ.रेणुका झंझाड.भंडारा(बेला)
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मुक व्यथा 

मनाची माझ्या मुक व्यथा 
उमजेल का तुला? 
जीवनातील माझी मौन कथा 
समजेल का तुला? 

ह्रदयांची माझी सल 
दिसणार का तुला? 
मनाची माझ्या घालमेल 
कळणार का तुला? 

अश्रूंची माझ्या मूक भाषा 
उमजेल का तुला? 
अंतरीचा आर्त स्वर 
ऐकू येइल का तुला? 

भावनांची माझ्या कदर 
असेल का तुला? 
निर्मळ आपुली प्रीत 
जपणार ना तिला? 

हळूच येउनी मजजवळ 
गोंजारायचे मला 
वेदनेवर फुंकर माझ्या 
घालावयाची तुला !

जीवनाच्या सागरात 
साथ तूझी हवी मला 
वादळाशी झुंज देणे 
पेलवेल का मला?? 

रंजना हलमारे साकोली
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मैत्री दिन विशेष उपक्रम

तुझी माझी मैत्री 
           मनात साजते.
या नितळ स्नेहाचं
           अलगुज सांगते.
तुझ्या सहवासाचा
        ‌‌. क्षण तो अनमोल
नातं अलवार प्रेमाचं 
          नाही जगी तोल.
तनाचा दुरावा जरी
          साता समुद्रापार
मनातल्या गाभाऱ्यात
          एकजीव धार.
मैत्रीचा वसंत 
          बहरून असतो.
गैरसमजाचा शिशीर
      ‌ ‌. नकळत संपतो.
अडीअडचणीला तू
          कसा जाणतो.
शब्दाविना व्यथा त्या
     ‌.    तूच सोसतो.
तुझ्या श्वासाची उब
      ‌.  विश्र्वास पेरतो
सारे जीवनचे डाव
       हरता तूच उरतो.
 तुझ्या माझ्या मैत्रीत
        चिंबचिंब भिजतो
जन्मोजन्मी सखा मी
  ‌‌ ‌‌.   तुलाचं मागतो.
चुकताचं शिक्षा देण्याचा
       हक्क तुलाच रे
सावरून उभारण्यात
       तू देव माझा रे.
नुरले शब्द व्यक्त हो
       भावबंध हृदयाचा
शुभेच्छा देते तुला
     ‌.   मैत्री दिनाच्या.

सौ.मीरा शेंडे भंडारा.
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडती कविता

क्षण एक प्रेमाचा
तुझ्या येण्याने बहरला
तुझ्या डोळ्यांतील चांदणे
बघण्यातचं वेळ सरला
किती वाट मी पाहिली
वाट पाहुन मी थकले
तुझ्या येण्यानेच सख्या
सर्व अंतरच मिटले...
......................................
  🌿मंगेश बांते, पूणे 🌿
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: तुझ्या माझ्या मैत्रिला आणि काय हवं ---

तुझ्या माझ्या मैत्रिला
आणि काय हवं
खळखळून हसण्याच
बांध सुटत जावं ।।

ओढ भेटण्याची
भडभडून सांगावं
गूढ मनीचे सांगता
नेत्री विश्वास दिसावं ।।

सुखदुःखाचे सलं
हृदय हेलावून जावं
परस्परांच्या नयनी 
पाणी ग दिसाव ।।

ओठातील हास्य
साऱ्यांना दावावं
मैत्रीचे  अश्रू
हळूच मैत्रीने टिपावं ।।

मन मोकळे करण्या
नातं हेच असावं
पारदर्शी काचा सारखं
निखळून बघावं ।।

तुझ्या माझ्या मैत्रिला
आणि काय हवं
उतरत्या वयातही
हात हाती घेऊन फिरावं ।।
----------------------------------
        मंगला डहाके, भंडारा
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडती कविता
       मैत्री 
(मैत्रीदिनानिमित्त)

मैत्री आपली असावी,
निखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी,
थोड्याश्याही उदकाने,
तृष्णा  शांत करणारी.

मैत्री आपली असावी,
फुल आणि फुलपाखरासारखी
सुंदर दिसणारी,आपल्यासवे,
इतरांनाही आनंद वाटणारी.

मैत्री आपली असावी,
अंतरमनाने जाणणारी,
जवळ असो वा दूर,
आठवणीत जपणारी.

मैत्री आपली असावी,
स्वच्छ,पारदर्शक काचेसारखी,
आतून बाहेरून एकच,
स्फटिकासमान दिसणारी.

मैत्री आपली असावी,
साथ कधीही न सोडणारी,
आयुष्याच्या प्रत्येक क्षणात,
अश्रू आणि हास्याचा समन्वय साधणारी.

मैत्री आपली असावी,
घट्ट प्रेमाने विणलेली,
गैरसमज वा चुकीने,
कधीही न तुटणारी.

(माझ्या सर्व मैत्रिणींना समर्पित)
                       
                           सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                            खामगाव.जि.बुलडाणा. 
                             दि.02.08.2020
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹मैत्री🌹

मैञी असते जिवलग मैत्रिणीचीं
दोन शब्द आपले बोलण्याची
सुख दुःख वाटण्यांची,
अंतर्मनातील भावना उमलण्याची
भविष्य काळाची वाट शोधण्याची
जीवनातील संघर्षांना तोंड देण्याची
सावरांयच असतं एकमेकांना दुःखात
दुःख झेलायला साथ हवी मैत्रीची
चंदना सारखी झिजायची तयारी असावी मैत्रीत
मेणबत्ती सारखी स्वत:ला जाळुन
नात्यांना पलीकडे ठेवून
मी,ला विसरून
स्वत:ला झिजवुन
सर्वस्व अर्पण करणारी
असावी मैत्री जीवनात!!

माधुरी भूते.
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रचियता साहित्य मंच   नागपूर 
मैत्रीदिन      विशेष   उपक्रम 

तुझ्या  माझ्या  मैत्रीला आणि काय हवं


तुझ्या  माझ्या  मैत्रीला आणि काय  हवं
जिव्हाळ्याचं प्रेमाचं गी त नवं हवं
आपसुखाच्या आठवणी नं मन आनंदुन जावं 
विश्वासाच मायेचं फुल नव व्हावं.


तुझ्या  मैत्री साठी दैवी  वरदान हवं
मैत्री च्या नात्यानं मन प्रफुल्लित व्हावं
रुप नसतं रंग  नसतं नसतं मैत्रीला आकार 
जीवनातल्या अंतरंगात आपोआप साकार.


जिथे तु तिथे मी असे तुझी वाणी
 तुझ्या हाताखाली  काम करीन गाई तु गाणी
सवलत दिली जरी  नाही केली  तु मनमानी
मैत्री  असुन देखील मान ठेवलसं मनी
सांगितलं काम तु प्रामाणीकपणे करी


तुझ्या  माझ्या मैत्रीला आणि काय हवं
आचार  विचार वागण्यातून प्राप्त  शिक्षण नवं
एकमेकींचा आधार आपण असू दोघीजणं
मैत्री नात्याचं हे पुष्प जपून सांभाळून ठेव.

सुषमा  सु पडोळे 
खात रोड भंडारा
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ये असा
           ---------

तुझ्यातल्या त्या उन्मादाला
थोडासा आवर म्हणालो, 
तू मात्र खूपच मनावर घेतलंस
अन् खूप दूर निघून गेलास 
सातासमुद्रापलिकडं
एखाद्या सन्यस्तासारखा
चारदोन महिन्यांसाठी. 
इकडे मात्र सगळेच दु:खी........ 

अरे,  तुझ्या विरहाने
कुणी पोळला, कुणी जळला, कुणी करपला, 
कुणी झडला, कुणी फासावर चढला
केवळ तुझ्यामुळे ---
तू  मात्र, अगदी निर्धास्त आणि
उन्मादात केरळ - आसामात..... 
कुठे भेगाळली,  कुठे फाटली
आईचं काळीज फाटावं तशी..... 
अरे,  तिच्यात ओलावाच नाही तुझ्यामुळं.... 

ये - ये असा  वाजत -गाजत ये, नाचत ये
सुट्टी झाल्यावर पाठीवर दप्तरांचं
ओझं घेऊन घराकडं पळत सुटणा-या 
मुलांसारखा.... 
गोठ्यातल्या वासरांसाठी
रानात पान्हा फुटणा-या गायींसारखा---

तुझं स्वागतच आहे
ये , आता परतून ये
बळीराजाला सुखावू दे
तू रुसणार नाहीस हे ध्यानात ठेवू
तुझ्यासाठी, 
तेहत्तीस कोटी झाडं लावू.... 
चुकलं माकलं माफ कर
निसर्ग, अन् बळीराजा जगवायला मदत कर --

ये असा, सरीसरींनी बरसत ये
वसुंधरेला न्हाऊ दे
तिची लेकरे पाहू दे
अन् - पावसा, 
तुझेच गीत गाऊ दे..... 
तुझेच गीत गाऊ दे..... 


                प्रा.  संजय द.  तिजारे
कुर्वेज न्यू माॅडेल हाय.  अॅन्ड ज्यूनि. काॅलेज
  नागपूर, 
मो. 9272120762
[8/2, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *मैत्री*

तुझ्या सहवासाने
मी मला विसरून जाते
माझेच मला कळत नाही
दुःख दूर पळून जाते मैत्री

तूच एक अशी गोळी
ज्याने होतं मनमोकळं
गप्पा गोष्टी चालतात मस्त
विसरून जातं तन-मन-धन

सहवास तुझा कधी 
बोर होत नाही
निवांत रंगतात गप्पा
जाण्याची नसते घाई

रोज रोज भेटावं
असं वाटतं मैत्रीमध्ये
मैत्री पलीकडचं नातं असतं
एकमेव जगामध्ये

               सौ नंदा अ भोयर
[8/2, 7:51 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🤝🌹मैत्री ☺️🌹

म्हणतात आज मैत्रीचा दिवस आहे 
हा तर सर्वांसाठीच अगदी खास आहे 
तुमच्यासारखी गाेड जिवलग पास आहेत
म्हणुनच आयुष्य अगदी दिलखुलास आहे 

रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असं नातं आहे 
रुसव्या, फुगव्यातही काही Special बात आहे 
अबाेला साेडुन मनवण्यात काही आैरच आहे 
हेच तर, आपल्या मैत्रीचं प्रतीक आहे. 


मिळावी मैत्री जन्माेजन्मी ही आस आहे
अतुट नात्यातला ताे दृढ़ विश्वास आहे 
नातं बहरण्याचा मनाेमनी ध्यास आहे
अशी मैत्री गमावणं सगळ्यात माेठा लाँस आहे 



प्रिया र गाेमाशे 
आकाशवाणी निवेदीका, चंद्रपूर.
[8/2, 7:51 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।माझी आवडती कविता।

।।मैत्री।।

मैत्री च नात
असते किती छान
संकट असो दुःख असो
पळुन जातो क्षणात।

तु आणि मी 
जेव्हा असतो सोबत
कोणत्याच नात्याची
गरज नसते पडत।

संकट येता
देत असतेस साथ
नातलगांनाही 
तुझ्या सहवासाचा आधार।

विश्वास आपलेपणा
नाती ही फक्त
निस्वार्थ भावनेनी 
जोडलेली गोष्ट।

मैत्री ही जीवनातील
अतुट एक नात
जात-पात समाज बंधन 
यात कदापि नसत।

कलियुगी मैत्री 
स्वार्थी फार असती
मालमत्तेसाठी
 मैत्रीची वाट लावती।

भारतीय संस्कृतीची
मैत्री कृष्ण सुदामाची
पाश्चात्य संस्कृतिची
मैत्री लबाड कोल्हासारखी।

जपावे सर्वांनी
मैत्रीच हे नात
स्वार्थ सोडुनी
वटवृक्षा बनाव।

सौ.चंदा वनवे शेंडे नागपुर.
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

         "" संस्कारधारा"". (१९)

नक्षत्र आश्लेषा डोकावला
घणनिळा मस्त बरसला
भेगाळल्या तृष्ण धरतीने
जणू अमृतच हो प्राशिला.

दनाअ, नागपूर
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: भाऊ बहिणीच्या नात्याला
रेशमी धाग्याची साथ
भाऊ पाठीशी उभा माझा
करीन संकटावर मात
            
       नंदा भोयर अमरावती
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.३२*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संकट काळी जमेल त्यांना*
*बहीण समजून मदत करावी*
*तुझ्या उत्तम आरोग्याची भेट*
*ओवाळणी म्हणून मिळावी*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹|| *अलगुज* ||🌹
*क्र.34*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*रक्षाबंधनाचा सण आज*
*राखी बांधण्या भाऊराया*
 *घाई करा गं सख्यांनो*
*चला माहेरा जाऊ या*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*सौ स्वाती सेलोकर* 
*भंडारा*
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *रक्षाबंधन*
***********************
सण रक्षाबंधनाचा आहे 
भावा बहीणीच्या प्रेमाचा
बांधून राखी भावास 
वर मागू दीर्घायुष्याचा 

राखी बांधण्याची प्रथा 
आहे खूप जुनी........ 
पदर फाडून द्रौपदीने 
बांधली कृष्णास चिंधी 

नुसता धागा नाही 
बंधन हे विश्वासाचं
भाऊ देतो बहिणीला 
वचन रक्षण करण्याचं

दूर आहेस भाऊराया....
घे काळजी आरोग्याची 
महागड्या वस्तू नको मला 
हीच ओवाळणी रक्षाबंधनाची 

 बालपणीच्या आठवणी... 
आहेत माझ्यासाठी अनमोल 
साडी-चोळीची नाही अपेक्षा 
प्रेमाचे दोन शब्द बोल...... 

*सौ स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *रक्षाबंधन*

या रेशमी बंधनात
बांधिते तुला मी
या अतूट नात्याची
सदा आठवण येई

नको मला काही
फक्त तुझीच माया
अशीच राहू दे
माझ्यावर दाट छाया

नयनी तुझ्या रे
प्रीत माझ्या परी राहूदे
निरंतर हृदयात तुझ्या
प्रेमाचा झरा वाहू दे

देवाकडे एकच मागते
भावाला माझ्या सदा
सुखात राहू दे

               नंदा भोयर अमरावती
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: भावा बहिणीचे नाते---

भावा बहिणीचे अतूट नाते
मनी उमट रेशमी बंधनाचे
रक्ताचे असो वा मानलेले
खोलवर अंतरी रुजायचे ।।

 कधी असे मस्ती 
 कधी खोडकरपणा
हृदयी फुलवून जाई
हा बालिशपणा ।।

मोठा भाऊ असे बाप
राही मनी आदरयुक्त धाक
छोट्याच्या नेत्री ,मायेचे पाणी
जणू भासे आईचा लेक ।।


नको भरजरी वस्त्रांचे लेणे
दादा नको पंचपक्वान्नांचे खाणे
अखंड तुम्ही सुखी राहा
हेच ईश्वरचरणी मागणे ।।

   मंगला डहाके,भंडारा
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रक्षाबंधन
रेशीम गाठी हृदयाच्या
भाऊ बहीणीच्या प्रेमाच्या.
एका धाग्यात बांधून
विश्वसाच्या जीवाभावाच्या.

बहीण राखी बांधते मनगटी
माझ्या भावाला येऊ दे भरभराटी.
सुखात आयुष्य वाट दिसावी.
अशुभ,अमंगलाची सावली नसावी.

राखी आज पाठविते तुला
साथ दे कोणत्याही दुःखी बहीणीला.
बळ दे देवा त्याच्या कार्याला
गर्व माझ्या भावाचा मम हृदयाला.

झरती नयन आठवणीत तुझ्या
पाच वर्षा पासून झाली राखी सजा
तुझ्याही वाट्याची धाकट्यास पाठविते.
पण तुझी जागा सुनीसुनीचं गमते.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: भावाबहिणीचे नाते


भावाबाहिणीचे नाते डोळ्यांत  अश्रू  माझ्या  दाटे.
रक्षाबंधनाच्या दिवशी 
बहिणी राखी बांधाया येतील तुम्हाला  वाटे



म्हणती गावातच असता तुम्ही
सतत वाट बघतो आम्ही
लक्षसारखं रस्त्याकडी
रेशमाची साधीसुधीच राखी हवी.


नको भरझरी त्या राख्या 
फक्त  रेशमाचे धागे 
भावाबहिणीचे प्रेम  हिच असे व्याख्या

आमचा ग आशिर्वाद तुम्हामागे,



घरची पुजा अर्चा करुनी
जात होतो आम्ही भावाघरी.
भावाबहिणीच्या गप्पा रंगती 
राखी बांधून झाल्यावरी.
मुक्काम करण्याचा  आग्रह  भारी.


रक्षाबंधन दिवशी अद्रुश्य रुपात
बंधु माझे घरी  येती
अश्रू  ओघळून येतीया तपात
आशिर्वादाचा हात ठेवून  जाती.

सुषमा एस पडोळे खात रोड  भंडारा
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी

दृढ बंधन हे रक्षणार्थ
हळुच बांधशी हाताला
मोजता येतील का कधी कुणास
बहीण भावाच्या अतूट नात्याला
........................................

        🌿मंगेश बांते, पूणे 🌿
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के हा.सं.प.   (७८)

       ""भावा बहिणीचे नाते""

आहे बहिणीचा विरा भाऊ
एकाच मायेचे आम्ही लेकरू
भावबंधन एकमेकांचे जपू
 सुपंथ मार्ग अवघेची धरू.

येता बहिणीवर संकट भारी
धावावे भावाने तिच्या दारी
तिच्या रक्षणा नाती भावाची
घेते बहिण बातमी माहेरची.

भाऊ बहिण नाते जिव्हाळ्याचे
दुष्काळ पडता गावा भावाचे
धनधान्य बहिणीने पुरवावे
यथावकाश मोल भावाने द्यावे.

लग्न होऊन सासरी निघाली
भावाने डोली हाती घेतली
सुख समृध्दिची कामना केली
डोळ्यात निरोपाची अश्रु दाटली.

सण राखी पौर्णिमेचा आला
भाऊ वाट पाहे बहिणीला
वहिनीने बेत बासुंदीचा केला
सातुचा पिठ बनवुन ठेवला.

दादा येईल मी भाऊबीजेला
आहे भाऊ नाजूक परिस्थितीचा
करिन कपडालत्ता भाऊवहिनीला
देजो प्रेम दादा अडीच अक्षरांचा.

दनाअ, नागपूर
दि.०३/०८/२०२०
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: || भावा बहिनीचे नाते ||

     (  अष्टाक्षरी  )

पवित्र प्रेमा प्रतिक
भावा बहिणीचे नाते
चिंधी बांधिली द्रोपदी
बोट कापले हरीचे

बहिन रक्षा कराया
येई भाऊ ग धावुन
अंगी वस्त्र पुरवुन
साक्ष दिली श्रीकृष्णान

रात्रि चंद्र पौर्णिमेला
तसा भाऊ बहिणीला
राखी पाठवुनी देवु
रक्षा बंधन सणाला

एका घरात वाढली
लहानाची मोठी झाली
मागे पुढे उभी राही
एकमेकाची सावली

साडी चोळी नसे आस
माया लावती बहिनी
प्रेमाचेच शब्द दोन
खाई भाकरी चटनी

दूर आहे भाऊराया
आठवण येई तुझी
सुखी राहो भाऊ माझा
हेचि मागणे देवाशी

 सौ.रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बहिणभावाच नात

बहीण भावाचे नाते,
अतूट बंधनाच्या,
 घट्ट,बंधाने
जन्मतःच बांधलेले.

बालपणी बहीण भावांची,
नाती असतात वेडी.
हसत,खेळत,रडत,भांडत,
घासातला घास,मिळून खाणारी.

लग्नानंतर बहीण भाऊ.
असले जरी दूर.
भेटीसाठी असते मनी,
त्यांच्या हुरहूर.

आईसारखी बहिणच,
भावाला लावते जीव.
माहेरी गेल्यावर बहिणीलाही,
दिसतो बाबांसारखा भाऊ.

बहीण भावाला ओवळताना,
करते एकच मागणी.
मरेपर्यंत माहेरपण दे,
हीच माझी ओवाळणी.

                             सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                               खामगाव.जिल्हा बुलडाणा
                                दि.03.08.2020
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।भावा बहीनीचे नात।।

बहीन भावाच नात
असत किती छान।
मारामारी मस्ती हेवादावा 
बरेच काही असलं जरी
 प्रेम असत महान।

मोठे झाले लग्न झाल
तरी थोड़ा असतो 
प्रेमाचा ओलावा त्यात।
पण जेव्हा येतो बरोबरीचा 
वाटा मालमत्तेचा
बहीन भाऊ नात्याचा होतो ठराव।

ठरावामध्ये साक्ष ठरतात
मायबाप  प्रेमाचे काही क्षण।
भाऊ म्हणतो बहीणीला
तुझ माझ नातं
 राहीलच कुठे काय सांग...

बहीण भावाच रक्ताचं नातं
असं कसं असेल ऐवढ  नाजुक।
ज्या रेशीम धाग्यामध्ये
संरक्षणाची ताकत असते
तो नसेल का मजबुत...

राखीसणाच्या निमित्तानं
सांगु सगळया मायबापाला।
मुलांना जन्म देताच
एकरेशीम धागा मालमत्तेचा
बांधुन टाका वृध्दाआश्रमाला।

सौ.चंदा वनवे शेंडे नागपुर
[8/3, 7:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय - भावा बहिणीचे नाते*

तुझं माझं जमेना 
तुझ्यावाचून करमेना
भावा बहिणीचे नाते
 असेच असते ना

प्रेमाच्या या बंधनात 
नेहमी असू दे साथ
असो थोडा रुसवा
असावा जरा धाक 

रक्षाबंधनाचा उत्साह 
दोघांचा सारखाच असतो
ताईच्या हातची मिठाई 
भावाला पाहुणचार वाटतो

बहिणीच्या अडचणीत
भाऊ पाठीराखा ठरते
उदंड आयुष्य लाभो
बहिण प्रार्थना करते

जड मनाने करतो भाऊ
बहिणीची लग्नात पाठवणी 
न बोलताच खूप काही असतं
बहीण घेऊन जाते आठवणी

भावा-बहिणीचे नाते 
आहे सागराहून खोल 
राखीच्या धाग्याने बांधलेले 
अतूट अनमोल जोड

*सौ. रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा.*
[8/4, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

       ""संस्कारधारा""(२०)

वाटा संपत्तीचा बहिणीने मागीला
बहिण नाही येणारं राखीला
भाऊच तिच्या घरी पोहचला
पाहुनी बहिणीचा मन गहिवरला.

दनाअ, नागपूर
दि.०४/०८/२०२०
[8/4, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पावसाची कसरत रात्रभर चालें
घामाचे लोट्यांनी धरनीं तुडुंब भरे
निसर्गसृष्टी रंग-बिरंगे वस्त्र घाले
बघताच तन-मन आनंदाने नाचे।

सौं.चंदा शेंडे नागपुर.
[8/4, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.३३*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*पावसात भिजावे*
*मीच मला विसरावे*
*मोहक निसर्ग सौंदर्य*
*शब्दात गुंफावे*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/4, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पावसाची कसरत रात्रभर चालें
घामाचे लोट्यांनी धरनीं तुडुंब भरे
निसर्गसृष्टी रंग-बिरंगे वस्त्र घाले
बघताच तन-मन आनंदीत डोले।

सौं.चंदा शेंडे नागपुर.
[8/4, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
विषय..बारा ज्योतिर्लिंग (०४) चारोळ्या (७९) 

(०३) श्री महाकांलेश्वर (मध्यप्रदेश उजैन)

श्री महाकालेश्वर मध्यप्रदेशा उजैननगरात
दक्षिणमुखी मंदीर क्षिप्रा नदीवर पौराणिक
पुष्पपुजा ,भस्मपुजेसाठी भाविक लावती रांग
चिलीम गांजाची दाखवी भस्म  स्मशाना आवक.

(०४).     ""ओंकारेश्वर"".    (मध्यप्रदेश)

मध्यप्रदेशात ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर
नर्मदेच्या मन्धाता 🕉️ बेटावर
धनतेरसला पुजा महालक्ष्मी कुबेर
अहिल्याबाईनी केला हेमाडपंथी जिर्णोद्धार.

(०५).  ""परळी वैजनाथ"".  ( महाराष्ट्र)

 महांकालेश्वर ते कन्याकुमारी मध्यरेषेवर
परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थापले
अमृतासम  औषध वनस्पती भरपुर
इ.स.१७०६अहिल्याबाईने जिर्णोद्धारीले.

(०६).    ""भिमाशंकर"" ((महाराष्ट्र)

निसर्गरम्य सह्याद्रीत भिमाशंकर वसले
अतिप्राचीन नंदिमंडप पेशवे जिर्णोद्धारीले
मंंदिरालगत उगम भिमेचा झाले भिमाशंकर
कोकणकडा,नागफणी डोंगरकडा लक्षवेधले.

दनाअ, नागपूर
दि.०४/०८/२०२०
[8/4, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *3) महाकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)*

*उज्जैन शहरात महाकालेश्वर स्थित*
*शिवाचे सर्वात पवित्र स्थान*
*महत्व असे यास फार*
*लिंगात स्वयंभू रुपात भगवान*

*************************

*4) ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)*

*तपश्चर्या करून राजा मान्धाताने*
*केले प्रसन्न शिव शंकरास.......*
*मध्यप्रदेश स्थित ओंकारेश्वर मंदिर*
*आहे हिंदूंचे तीर्थक्षेत्र खास......*

*********************

*5) वैजनाथ (महाराष्ट्र - परळी)*

*वैजनाथ मंदिराची पुनर्निर्मिती*
*केली राणी अहिल्या बाईंनी.....*
*चिरेबंदी भव्य स्वरुप याचे*
*लक्ष वेधती लांबलचक पायऱ्यांनी*

*********************

*6) भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर)*

*सह्याद्रीच्या मुख्य रांगेत*
*सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर*
*निसर्गाने मुख्य हस्ताने*
*केली  उधळण यावर.....*

*******************

*सौ स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/4, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बारा ज्योतिर्लिंग---   
3--महाकालेश्वर--मध्यप्रदेश उज्जैन
महाकालेश्वर  जागृत आहे
मंदिर शिवलिंगाचे
श्रद्धेने होते भस्मारती
आशिष मिळे आरोग्य सुखाचे ।।

4-- ओंकारेश्वर-- मध्यप्रदेश

चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर
   वसले नर्मदा नदीच्या काठावर
भोळ्या शिवशंकराचे जागृत
 स्थान भक्तांच्या श्रद्धेवर।।

5-- वैजनाथ---महाराष्ट्र --परळी

परळी वैजनाथ मंदिर
अति पुरातन काळाचे
तीन नद्यांचा संगम
तीर्थक्षेत्र आहे भाविकांचे ।।

6-- भीमाशंकर-- महाराष्ट्र 

स्थापित भीमाशंकर
 भीमा नदीच्या काठी
मनोकामना पूर्ण होता
हृदयी भक्तांची अतूट भक्ती।।
------------------------------------
        मंगला डहाके, भंडारा
[8/4, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *चारोळ्या ज्योतिर्लिंग*

*३.महाकालेश्र्वर ज्योतिर्लिंग (मध्य प्रदेश)*

स्वयंभू महाकालेश्र्वर ज्योतिर्लिंग
शिवाचे सर्वात पवित्र स्थान
मध्यप्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यात
अति प्राचीन आहे हे देवस्थान

*४.ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग (मध्यप्रदेश)*

नर्मदा नदी निर्मित शिवपुरी
ॐ आकाराचे बेट दिसते
नाजूक कलाकुसरीचे बांधकाम
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग वसते

*५.वैजनाथ (महाराष्ट्र)*

बीड जिल्ह्यातील परळी येथे
वैजनाथ ज्योतिर्लिंग संस्थान
महाशिवरात्रीला उत्सव मोठा
जागरूक आहे देवस्थान

*६.भीमाशंकर (महाराष्ट्र)*

सह्याद्रीच्या कुशीत वसले
ज्योतिर्लिंग भीमाशंकर
निसर्गाने मुक्त हस्ते
उधळून सजवले परिसर

*सौ. रूपाली अमोल बोंद्रे,भंडारा*
[8/4, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बारा ज्योतिर्लिंग
महाकालेश्वर
तिसरे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर.
वसले मध्यप्रदेशात उज्जैन क्षेत्री.
पाहता भव्यदिव् पिंडीअन् मंदिर 
मन आसुसते वाहण्या बेलपत्री.

ओंकारेश्वर
ओंकार स्वरूप पर्वत आकार
नर्मदेमध्ये स्वयंभू मूर्ती साकार
मध्यप्रदेशात अवतरले शंकर
हर हर महादेव नामाचा गजर.

परळी बैद्यनाथ
कन्याकुमारी स्थित परळी वैद्यनाथ
ब्रम्हा,वेणू सरस्वती संगम
हात लावून घेती दर्शन
अमृत धार वाहते,सागरमंथन.

भिमाशंकर
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात
सहावे ज्योतिर्लिंग भिमाशंकर
प्रतिबिंब भिमा नदीच्या पाण्यात
घनदाट अरण्यात हेमाडपंथी मंदिर.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/4, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळ्या ज्योतिर्लिंग
******************

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (मध्यप्रदेश)
शिप्रा किनारी उज्जैन नगर
तिसरे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर
प्रतिदिन करी नवा शृंगार
दिवसातुन होती आरत्या चार

ओंकारेश्वर (मध्यप्रदेश)
नर्मदानदी तिरी मांधाता     ओंकार
अहिल्यादेवीने केला जीर्णोद्धार
चवथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर
शिवरात्री पालखी शोभे फार

परळी बैधनाथ (महाराष्ट्र)

महाराष्ट्रातिल बीड परळीत
असे ज्योतिर्लिंग परळी बैधनाथ
मंदिर हेमाडपंथी चिरेबंदि
बाराव्या शतकातिल निर्मिति

भीमाशंकर (महाराष्ट्र)

पुणे जिल्हा खेड ठिकाणी
उल्लेख स्कंध व विष्णुपुराणी
देवराई जंगलात हेमाड पंथी
भीमशंकर ज्योतिर्लिंग निर्मिति

 सौ.रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/4, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बारा ज्योतिर्लिंग
महाकालेश्वर
तिसरे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर.
वसले मध्यप्रदेशात उज्जैन क्षेत्री.
पाहता भव्यदिव् पिंडीअन् मंदिर 
मन आसुसते वाहण्या बेलपत्री.

ओंकारेश्वर
ओंकार स्वरूप पर्वत आकार
नर्मदेमध्ये स्वयंभू मूर्ती साकार
मध्यप्रदेशात अवतरले शंकर
हर हर महादेव नामाचा गजर.

परळी बैद्यनाथ
आयुर्वेदिक औषधे,परळी वैद्यनाथ
ब्रम्हा,वेणू सरस्वती संगम
हात लावून घेती दर्शन
अमृत धार वाहते,सागरमंथन.

भिमाशंकर
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात
सहावे ज्योतिर्लिंग भिमाशंकर
प्रतिबिंब भिमा नदीच्या पाण्यात
घनदाट अरण्यात हेमाडपंथी मंदिर.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/4, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी-
४. ओंकारेश्वर 
५.बैजनाथ परळी
६.भीमाशंकर.

४. ओंकारेश्वर- 

* नर्मदेतीरी शिवपूरी बेट*
* स्थापिले ओंकारेश्वर*
* शुभ्र फुले, बेलपत्री अर्पूनी*
* जागृतसे ओंकारेश्वर *

५. बैजनाथ-परळी
* त्रिवेणी संगमाकाठी*
* जिर्णोद्धार केला बैजनाथा *
* सभोवताली पवित्र कुंडे *
* मनोभावे पुजून टेकावे माथा *

६. भीमाशंकर- 

* सह्यांद्री कड्यावर *
* ध्यानस्थ भिमाशंकर *
* भिमा नदीचा उगम *
*  स्वर्गाचे ऊघडे द्वार *
 सौ. के. बी. सार्वे भंडारा.
[8/5, 8:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.२९ 
बहरलेल्या लता वेली
सुगंधीत सृष्टी सारी
हरी नामस्मरण हीच
आयुष्याची खरी शिदोरी.
सौ.मीरा शेंडे भंडारा.
[8/5, 8:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: दिवस आजचा सोनेरी पहाट
अयोध्या नगरीचा नयनरम्य थाट
आयुष्याची सुवर्ण पहाट
मन आनंदल अयोध्या नगरीतील पहाता झगमगाट
        .               नंदा भोयर
[8/5, 8:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

       "" संस्कारधारा"". (२१)

सोनियाचा शुभ दिन उगवला
हिंदुस्थानाचा काळोख मिटला
श्रीराम मंदिराचा पाया रचला
अयोध्येत बघा इतिहास घडला.

दनाअ, नागपूर
दि.०५/०८/२०२०
[8/5, 8:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *स्वप्नातील सृष्टी*
*************************
 सुखी असावे सर्व लोकं
नको दुःखाचा लवलेश
प्रेमाने राहावे सर्व जण
नको ईर्षा नको क्लेश

पशुपक्ष्यांचेही वेगळे जग
त्यांनी करावे मोकळे भ्रमण
हिरवळ असावी चारारुपी तिथे
नित्य करावे कोकिळेने गुंजन

सभोवताली असावी हिरवी झाडं
फळे फुले लागावी नित्य त्यास
ओढे, नद्या ओसंडून वाहू दे
मोरांनी यावे नाचावयास खास

काळ्या मातीत धान्यांची उधळण
 बळीराजाही सुखावे दृश्य बघूनि
अशीच सृष्टी माझ्या स्वप्नातली 
सत्यात उतरू दे स्वप्न मनातली 

*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[8/5, 8:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*विष्णुचा सातवा अवतार*
*जन्म घेतला श्री राम नावाने*
*रामचरितमानस काव्यात*
*वर्णन केले कवी तुलसीदासने*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*सौ स्वाती सेलोकर* *
*भंडारा*
[8/5, 8:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.३४*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*मर्यादा पुरुषोत्तम*
*प्रभू श्री राम*
*अयोध्या आहे*
*हिंदूंचे पवित्र धाम*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/5, 8:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुख शांती असो सर्वत्र l
मनी प्रेमभाव नांदो अहोरात्र
निसरगसौंदर्य हिरवेगार 
फुले उमलवी. रंगतदार l
पशु पक्षlयाची रेलचेल l
मनाची हळुवार हालचाल lनदीनाले भरावी तुडुंब 
काळी माती करते रुंदन 
श्रमिक चाकर दिसो आनंदी
धन धान्य मुक्त उधळण l
गाई म्हशींच्या  भोवती चारा 
फुले हसावी झेलीत वारा l
भविष्याचे ठेऊन भान 
गीत गाती थोर सान l
पक्षी देती गोड तान 
निसर्गाचा ठेऊन. मान
चला गड्यांनो लावू शर्थ l
परिसराला  करू  पवित्र तीर्थ
न भटकावे दूर इतरत्र l
हिरवीगार सृष्टी सर्वत्र 
कमले डू लती सुंदर 
गार  वाऱ्याच्या झुळकीवर l
अश्या मंजुळ समयी l
काव्य स्फुरवे मजकिर्तीमन 
भवितव्यावर  उज्वल गाणं  l
[8/5, 8:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वप्नातली सृष्टी--
             पहाटे पहाटे
              स्वप्न मला
             भारी पडले
              मन हर्षला ।।
डोलू लागल्या
वृक्ष वेली
मायेची ती
पाखर गाली ।।
               पशुपक्षी
              हर्ष उल्हासात
                 आली न्हात
                   परसात ।।
स्वच्छ पाणी
नद्या तलावे
वाहू लागले
मुक्त भावे ।।
                आनंदात जाई
               ओथंबून अवनी
                बिलगून
                   पात तृणी ।।
चंद्र चांदण्या
इंद्रधनु सवे
सुगंधी फुलांचे
  प्रीत गीत गावे ।।
                    कोरोना गेला
                    हर्ष चोहीकडे
                    भेटलो परस्परां
                    आनंदात गडे ।।

      मंगला डहाके, भंडारा
[8/5, 8:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मनी वसे ते  
स्वप्नी दिसे
दिवस भरातील आढावा  असे 
भरुनभरुन आनंद   स्वप्नांचे कसे.


आणली  माझ्या साठी गाडी नवी
गाडी शिकण्याचा विचार  मनी
झाले प्रयत्न  खुप करुनी
यश मज न येती प्रात्यक्षिकातूनी.


वाटायची खंत  गाडी न शिकण्याची
उपयोग  उरला नसे खंत करण्याची 
हुरहुर सदा असे  आपयशाची
अपयश पहिली पायरी  असे  यशाची.



रात्र  गाढ झोप लागूनी
स्वप्न पडले मज गाडी चालविण्याचे

चालविली मी गाडी   वेगानी
पूर्णत्वास येती स्वप्नातील सृष्टी चे.


सौ.सुषमा एस पडोळे भंडारा
[8/5, 8:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

      ""स्वप्नातील सृष्टी""(८०)

गावालगत सुंदर टेकडी असावी
टेकडीलगत भरला तलाव दिसावा
त्यात कमळे फुलावी,पक्षी विहरावी
टेकडीवरील मंदिरातून निसर्ग पाहावा.

शेतीवाडी हिरवं शिवार दिसावं
गावात गोधन भरपूर रहावं
शेतीपूरक व्यवसाय चालवावं.         
 स्वप्नातील सृष्टीचं दर्शन व्हावं.

शिक्षणास शाळा महाविद्यालये
दवाखाने आरोग्य संवर्धनास
लोककला सादर मनोरंजनास
विकास सर्वांगीण होणे गावास.

सर्व जाती धर्म सुखाने नांदती
उपासना प्रत्येकाचीच व्हावी
गावात सर्वत्र स्वच्छता दिसावी
चर्चा स्वप्नातील सृष्टीची करावी.

दनाअ, नागपूर
दि.०५/०८/२०२०
[8/5, 8:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अर्पण
जे जे दिले अम्हाला,ते, ते तुलाच अर्पण
सत्यात रोज घडते....,रामा तुझेच दर्शन

तू दावला जगाला,..आदर्श कर्म कुठला
जगण्यास सोबतीला,असते तुझेच दर्पण

आदर्श एक राजा,.....शब्दास जागणारा
सत्या पुढे झुकावे....,,सत्यातले समर्पण

भावूक होत नाही,...आता कधीच ईच्छा
प्रत्येक काळजाला,.असते तुझेच कर्षण

हे भव्य दिव्य सारे,...काही क्षणा करीता
साधे पणात असते,....दडले खरे प्रदर्शन

            ओमप्रकाश ढोरे
           ५/आॕगस्ट/२०२०
[8/5, 8:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ||  स्वप्नातिल सृष्टि ||

चोहिकडे हिरवळ हिरवे माळ रान
नको वातावरनि हवेचे प्रदूषण
सर्वांना मिळे स्वच्छ ऑक्सिजन
स्वप्नातिल सृष्टि मला दिसे छान

पशुपक्षी,झाडेवेली फुले सुगंधित
नदी नाले तलाव भरती तुडूंब
सर्वांना स्वच्छ पाणी निर्मल
दिसे छान सृष्टि स्वप्नातिल

बळीराजा सुखी धनधान्य चहु कडे
कोणी ना उपाशी राही सगळी कडे
अन्न वस्त्र निवारा सर्वां समाधान
माझ्या स्वप्नातिल सृष्टि दिसे छान

ग्रह चंद्र तारे नभी विराजमान
सूर्यप्रकाश मिळे दैदिप्यमान
कुणी नाही अंधकारमय जीवन
मज स्वप्नातिल सृष्टि दिसे छान

उंच शिखरे टेकडया लहान
सान थोर सगळे नको भेदभाव
मिळून नांदती सर्व आनंदान
मज स्वप्नातिल सृष्टी दिसे छान

 सौ.रेणुका झंझाड.भंडारा(बेला)
[8/5, 8:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *स्वप्नातील सृष्टी माझ्या*
नसे कुणी दुःखी इथे
आनंद घरोघरी वसे
दाणा पाणी मुबलक मिळे
मी पण माझे गळून पडे

 शिक्षणापासून
नसे कुणी वंचित
तळागाळातील
व्हावे शिक्षित

शाळा दवाखाने खेडोपाडी
सर्वांना मिळावी गाडी घोडी
खंत मनी कशाचीच न राहावी
भावी पिढी ही ज्ञानी व्हावी

मुलींनाही मिळावे
मानाचे स्थान
शैक्षणिक प्रगती करून
त्या उंचावेल आपली मान
माझ्या स्वप्नातील हीच सृष्टी
जिथे विविध जाती धर्म सुखाने नांदती

                   सौ नंदा अ भोयर
[8/5, 8:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वप्नातील सृष्टी

रोज नवी पहाट व्हावी,
सूर्य तेजाने सृष्टी न्हावी.
पिंगा घालीत वारा यावा,
निळ्या आकाशी पाखरांचा थवा.
खळखळ वाहती नद्या नाले,
हिरव्या अवनी,
बहर फळ-फुलांचा.
धनधान्याच्या पडता राशी,
कळप  हरणांचा पळत सुटावा.
बालपणीचा सुखद अनुभव घ्यावा,
स्वछंद मुक्तपणे संचार व्हावा.
शांती नांदावी या भूतली,
अध्यात्मालाही जोड विज्ञानाची.
सृष्टीचा बघून देखावा,
कधी हुंदळावे,कधी गावे,
कधी रचावे गीत
कधी काढावी सुंदर चित्रे,
कधी साकारावे शिल्प नवे.
स्वप्नातील सृष्टी नजारा,
फुलवी मनी मोर पिसारा.

                             सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                               खामगाव.जिल्हा बुलडाणा
                                दि.05.08.2020
[8/6, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.स.प.
 
          ""संस्कारधारा"".   (२२)

टाळेबंदीनं शिक्षण आॅनलाईन झाले
गरीब विद्यार्थी मोबाईल नसल्याने
शिक्षण हक्का पासून वंचित राहीले
एवढे अनर्थ शिलेदारांस घोंगावले.

दनाअ ,नागपूर
दि.०६/०८/२०२०
[8/6, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रभात पुष्प

ओंजळ फुलांची
अर्पिते तव चरणी
सत् संग मिळो सदा
हीच आस असे मनी
                सौ. प्रतिभा सोपान वाठ.
[8/6, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.३५*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*निसर्गाचा खेळ आहे न्यारा*
*कुठे कहर पावसाचा*
*तर कुठे पावसाची प्रतिक्षा*
*नेहमीच पराभव माणसाचा*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/6, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌼🌼प्रभात वंदना - १🌼🌼
---------------------------------------
प्रभातकाळी मंगल समयी
ओंजळ भरु भक्ती फुलांनी
चला पुजा करु साईमाऊली
गणरायाच्या प्रथम वंदनी
सुप्रभात......
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
सौ. शितल श्रीकांत ठवकर.
(तुमसर रोड, देव्हाडी, तुमसर)
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
[8/6, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा उपक्रम---
संसार आणि परमार्थ--
--------------------------
संसारी साधावा स्वार्थ
ईश नामात घडे परमार्थ
मनी देव पहावा
उरतो जीवनाला अर्थ ।।

तुकाराम महाराजांनी
सांगितले जीवन ज्ञान
संसारी असे राहून सम
 बोरातली आठळी काढून ।।

आई, बाबापरत्वे
कर्तव्य अपुले जाण
पत्नी मुलांपरी
बघावा जबाबदारीत मान ।।

सकारात्मक ऊर्जा
साठवावी देही
प्रत्येकाच्या अंतरी
परमात्माच पाही ।।

संसारी राहुनी
प्रेम जाणे स्वार्थ
ऋण फेडूनी साऱ्यांचे
साधावा मनी परमार्थ ।।
---------------------------
      मंगला डहाके,  भंडारा
[8/6, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *संसार आणि परमार्थ*
*************************
संसार करता करता
साधावा परमार्थ
जीवनात जीवन मिसळणे
परमार्थाचा खरा अर्थ

संसार करताना
घ्या रामनाम
थोडी बंधने पाळून
नित्य करा सर्व काम

नाही होणार भले
दुसर्‍याचे वाईट चिंतूनी
रहा मिळून मिसळून
अहंकाराची भावना सोडूनी

लोभ, मोह, काम, क्रोध
शत्रू आपुले त्यागावे
विवेक, सुख, शांतीने
मिळून सर्वानी वागावे

आचरण ठेवा
सदैव पवित्र
संसार आणि परमार्थाचे
हेच मुख्य सूत्र

सौ स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[8/6, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *संसार आणि परमार्थ*

मुखी म्हणूया राम
करत राहावे काम
कामात दडलय परमार्थ
नाही बघूया आपुला स्वार्थ

भावना नसावी स्वार्थी
कर्म करावे निस्वार्थी
देऊया भुकेल्यांना अन्न
पहावे तिथे ब्रह्म

तिरस्कार मनी नसावा
वाणीत गोडवा तो असावा
कुणासही जीव लावावा
म्हणी दुष्ट विचार येऊ न द्यावा

मुक्तहस्ते करावे दान
समाजाचे ठेवुनी भान
जेथे संसार तेथे परमार्थ
हाच निघे सर्वतोपरी अर्थ

            .           सौ नंदा भोयर
[8/6, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संसार आणि परमार्थ
********************

करीता संसार साधावा परमार्थ
तेव्हाचि कळे जीवनाचा अर्थ

नको दुजाभाव नको हेवादावा
कर्तव्यामध्ये स्वार्थ ही नसावा

सर्वांच्या देहि सम ईश्वर
समान भक्ति चीत्ती निरंतर

लोभ मोह माया क्षणाचे सोबती
सोडुनिया देहा कर्तव्य राहती

संसार असावा म्हणोनि नेटका
परमार्थ साधुनि सुख दुःखा

कोरोना मध्ये दिसला सेवाभाव
त्या सर्वांना लाभो आत्मबळ


 सौ.रेणुका झंझाड.भंडारा(बेला)
[8/6, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.      (८१)

    ""   संसार आणि परमार्थ""

संसार आधी कि परमार्थ
निटनेटका करून संसार
कर्म कर्तव्य परिवार मानवा
परमार्थ नावे न् व्हावे पसार.

परमार्थ साधण्या कुठे न जावे
संसारी राहुन परमार्थ साधावे
शक्य तेवढे पुण्यंची कमवावे
घरा तुळशीपत्र कधी न् ठेवावे.

घ्यावे ऐकून अनुभव संतांचे
परमार्था करिता संसार भुलावे?
इमानदारी , परोपकार ,व्यवहार
होते संसारा परमार्थ जिवनाचे.

महामारीत कर्तव्य बजावले
कधी तयांचे जिवावर बेतले
दुजा सुखास शरीर झिजविले
त्याने जिवना परमार्थ साधिले.

दनाअ, नागपूर
दि.०६/०८/२०२०
[8/6, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संसार आणि परमार्थ

क्षणभंगुर असे जीवन,
विसरू नये क्षणभर.
संसार करता करता,
साधू या परमार्थ.

संसारातील ईच्छा,आकांक्षा,
संपता संपणार नाही.
परमार्थासाठी वेळ,
काढल्याशिवाय मिळणार नाही.

निष्काम कर्मे करीत,
आचरण ठेवावे शुद्ध.
मानवतेची करावी सेवा,
हेच 'गीता'रहस्य.

नको कोणते अवडंबर,
नको कोणते शास्त्र.
मनी स्मरूनी 'राम'नाम,
साधू या संसारात परमार्थ.

                                     सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                                     खामगाव,जि बुलडाणा
                                     दि.6.8.2020.
[8/6, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara:   🌹संसार परमार्थ🌹

अरे संसार संसार,कसा साधावा परमार्थ.
कसाराच्या दावनीला जशी बांधली मुकी गाय..

संसाराच्या नादी ,पडे फासावरी फास
परमार्थासाठी हारे द्रौपदी ला जुगारात...

माणसाच्या संसाराची देव फिरवितो चाके
परमार्थ साधण्यास , मुकी राहते गाय.....

नाही संसार एकलीचा,नाथ असावा सोबती
हेवेदावे,मोह मत्सर ,नसावा दोघांच्या अंतरी.....

संसारात असावा गोडवा,साह्य करावे एकमेका
तरीच साधता येईल ,परमार्थातुनी परमार्थ........

                सौ जयश्री रेहपाडे
                     नागपुर..
[8/6, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।संसार परमार्थ।।

डोई संसार ओझे
अंतर्मनी बम्हांड साजे
वरदान हा मनुष्यास लाभे
कार्य पुर्ती देहसाचे।

नित्यनियमी संसार कार्ये
मनुष्य कर्तव्यच असे
काम क्रोध मोह मद मत्सर
मनोविकार भर घालीत असे।

मनुष्य जन्माची परिक्षा राजे
विषय त्यावरी वेगळी असे
कधी रडावे कधी हसावे
जाणुन घ्यावे इथेच चाले।

संसार कार्य तुझ्या हाती
वेळ बहु कमी असे
खर्ची परोपकारासाठी
आंतरब्रम्हांड आनंदीत होत असे।

सदैव चिंतन हरीनामाचे 
मुक्याजनावर प्रेम करावे
कर्तव्याचे जाण असावे
दुखीकष्टांना प्रेम अर्पावे।

ध्यानसादना साधीत राहावे
परमार्थ चैत्यनरुप दिसे
स्वार्थाची परकाष्ठा करून 
मोक्ष प्राप्ती लाभत असे।


सौ.चंदा वनवे शेंडे
नागपुर
[8/6, 7:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: "संसार करूनी परमार्थ"

संसार करूनी परमार्थ साधावा
कर्मानेच साधावी, संसार परमार्थ.
मुखी परमेश्र्वराचे नाव असावे
अंतरी कर्म,भाव भक्तीचे.

राग द्वेष,मत्सर  सोडूनिया
प्रेम भरावे अंतरी
मोह माया दुर ठेवूनिया
कर्तव्य पार पाडावे

सावंतामाळी कांदा मुळा भाजी अवघी केली विठाई,
माती तुडवून,गोरा कुंभार विठ्ठल नामात दंग राही.

कृष्णाने संसार करूनी, अर्जुनाला गीतेचा उपदेश केला.धर्म, अधर्म सत्य, हेच कर्म मानावे परमार्थ,
परमार्थ करूनी प्रपंच करावा नेटका.

सौ.माधुरी भूते.
नागपूर.
[8/7, 8:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: इंधन विरहित पदार्थ
फायर लेस रेसिपी
बिस्कीट रोल, बिस्कीट बर्फी
हा पदार्थ बनवायलाही सोपा, स्वादिष्ट आहे, लहान मोठे कुणीही करू शकतात, अशी ही रेसिपी
[8/8, 5:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

       ""संस्कारधारा""   (२४)

कोरोणाचा कहर वाढतच चालला
हात मजुरीचा मोठा दुष्काळ झाला
परिस्थिती घरची पाहवेना डोळा
मायबाप बनून मोठा पापच केला.

दनाअ, नागपूर
दि.०८/०८/२०२०
[8/8, 5:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌷🌷प्रभात वंदना - ३🌷🌷
----------------------------------------
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

प्रभातकाळी मंगल समयी
सुर्यदेव उगवले गगनी
आज आहे शनिवार दिवसाची सुरुवात करू शनिदेवांना वंदुनी.
सुप्रभात......
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सौ. शितल श्रीकांत ठवकर.
(तुमसर रोड, देव्हाडी, तुमसर).
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
[8/8, 5:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के. सा.संघ प.

      🌻पहाटवारा 🌻(२) 


   सदा  हसरी माझी मुक्ताई
   गाते तिला मी गोड अंगाई
   मला म्हणते ती प्रेमाने माई
   तिच्यात दिसते माझी विठाई.

सौ. विणा द. अतकरी
नागपूर.
[8/8, 5:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र३२
ढगाळलेल्या आभाळात
सूर्यदेव झाकला.
तव दर्शनाला रे
सारा जग व्याकूळला.

भेट तुझी नसतांना
सृष्टीची जाते रया
मेघांना दूर सारूनी
तेजाळ रे तुझी माया.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/8, 5:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.३७*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*वाटते सानुले फुलपाखरु*
*मज व्हावे*
*या फुलावरू त्या फुलावर*
*स्वच्छंद फिरावे*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/8, 5:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

पहाटेचा शीतल वारा,
इकडून तिकडे करीत उनाड्या.
हाती न लागे कधी कुणाच्या,
हवा हवासा वाटे सर्वाना.

                सौ.प्रतिभा वाठ (गरबडे)
[8/8, 5:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.    (८३)

         ""प्रेम म्हणजे काय""

प्रेम म्हणजे काय
दुधावरची साय
लोण्याहुनं मऊ
अंतर्मनाची माय.

                   प्रेमात भावना
                   भावनेत प्रित
                   निर्मळ मिलन
                   गुंजारते गितं.

प्रेम भाऊबहिणिचे
प्रेम  मायबापाचे
प्रेम  पती-पत्नीचे
प्रेम  वात्सल्याचे.

                   अतर्मनाचे प्रेम
                   कधी न् मिटते
                   न् दर्शवताही
                   डोळ्यात दिसते.

प्रेमे मेणबत्ती
मेणा जळते
ज्योत तेवते
प्रकाशी प्रिते.

                    दुःख तुझ्यात 
                    अश्रृ माझ्यात
                    कळवळ मनात
                    अगतिक प्रेमात.

आसक्तीचे प्रेम
क्षणिक आसते
ह्रदयीची प्रितं
निरांजन भासते.

दनाअ, नागपूर
दि.०८/०८/२०२०
[8/8, 5:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेम म्हणजे काय रे
दुधावरची साय रे
वासनेची ऊब देता
सहज ऊतू जाय रे.......
         राजीव बुध्दे...मांढळ
[8/8, 5:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ★ पाऊस ★
~~~~~~~~

ये रे पावसा
 असं कां वागतोस तू !
   कुठे बंजर जमीन
     तर कुठे थैमान घालतोस तू !!

 तुला नाही का रे पर्वा शेतकऱ्यांची
      जे बाजी लावतात  जिवांची !!

   तुला आहे वरून देवाचं स्वरूप !
      सोड तुझं रुद्र अवतार
आणी दाखव तुझं निर्मळ रूप !!

तुझ्या बरसण्याने 
  हिरवडते सारी श्रुष्टी !!
    पृथ्वीचं दाह होतो शांत
मनाला होतो आनंदाची तृप्ती !!

म्हणून म्हणते हे बळीराजा 
 सगळीकडे समान कर तुझी कृपा ! 
तुझ्या बरसण्याने होवो सर्वांचे कल्याण 
हीच आमची प्रार्थना !!
                
                          🙏🙏
           सौ. संगीता सुधाकर कढव
                       ( भंडारा )
[8/8, 5:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *प्रेम म्हणजे काय*

प्रेम म्हणजे सुगंध
नित्य चहूकडे पसरावे
आयुष्यातले ऋणानुबंध
असेच सर्वानी जपावे

प्रेम म्हणजे इंद्रधनुष्य
मनी सदैव उगवावे
सप्तरंगांची उधळण
निःस्वार्थी पणे करावे

प्रेम म्हणजे हिरवळ
बघून मन आनंदते
प्रेमाचा पाऊस पडता 
मनाचे मोर नाचते 

प्रेम म्हणजे पाऊस 
मुसळधार बरसावे 
अलगद त्यास झेलून 
तृप्त होऊन जावे

*सौ स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/8, 5:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मानवी वृत्ती 

जवळच्या हिऱ्याची किंमत नसते 
चकाकणारे खडेच मन मोहून टाकते !

दूरचे नेहमी प्रिय वाटते 
दुरून डोंगर छानचं दिसते !

म्हाताऱ्याची अडसर भासते 
मेल्यावर खिरीचा नेवेद्य चारते !

जित्या वर निंदा नालस्ती करते 
मेल्यावर स्तुतीसुमने उधळते !

माय बापाची सेवा न कधी करते 
हाडे मात्र काशीला घेऊन जाते !

मृगजलाच्या मागेच धावते 
असे मन हे स्वैर असते !

हातचे सोडून पळत्याच्या मागे लागते 
मानवी वृती अशीच असते !!

रंजना हलमारे साकोली
[8/8, 5:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *प्रेम म्हणजे काय*

प्रेम म्हणजे काय
ज्यात दिसते माय
भरवी बाळा घास
स्वतः करेन उपवास

प्रेम म्हणजे सुगंध
ज्याने मन होते धुंद
पसरतो मंद मंद
हवाहवासा वाटणारा गंध

प्रेम म्हणजे काय
बहीण भावाची
जोडलेली नाळ

प्रेम म्हणजे काय
एकमेकांची ओढ
दोन शब्द गोड
जशी संत्र्याची फोड
चव त्याचीआंबट गोड

                   सौ नंदा अ भोयर
[8/8, 5:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: * प्रेम म्हणजे काय *   

प्रेमा शिवाय,
   कल्पनाच नाही विश्वाची,
ही तर देणगी
   आहे परमेश्वराची।।

  प्रेमाला आहेत अनेक उपमा,
        कुणी म्हणे भावना,
  तर कुणी म्हणे साधना।।
 
   प्रेम म्हणजे जीवन,
       प्रेम म्हणजे समर्पण,
  जीवनाचं शेवट झालं तरी
       प्रेम असावं कायम।।
     
   
  सौ. संगीता सुधाकर कडवं 
          🌻  भंडारा🌻
[8/8, 5:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेम म्हणजे काय---

स्वतः ओल्या वर झोपून
बाळाला कोरड्या वर झोपवण
त्याच्या डोळ्यातला आनंद
आपल्या डोळ्यात साठवण
म्हणजे प्रेम ।।

सुखदुःखात तू नाही एकटा 
मी आहे सोबत 
हा अंतःकरणाचा
आहे विश्वास भाव
म्हणजे प्रेम ।।

अभ्यासा साठी शिक्षा
करून मुलाला मारणं
रात्री तेल लावून
मायेनी चोळून देणं 
म्हणजे प्रेम ।।

एकाच्या पापणीत
पाणी दाट साठलेलं
दुसऱ्याच्या गालावर
हळूच ओघळण
म्हणजे प्रेम ।।

वाढदिवसाला शुभेच्छांचा
झाला आभाळभर वर्षाव
पुन्हा मन घेतोय उंच
भरारी मारण्याची धाव
म्हणजे प्रेम ।।

देणाऱ्याने द्यावं
घेणाऱ्याने घ्यावं
परस्परांच्या डोळ्यात
परस्परांसाठी पाणी असावं
म्हणजे प्रेम

   मंगला डहाके, भंडारा
[8/8, 5:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: * " प्रेम म्हणजे काय"? *                                                                           इंद्रधनुष्याचे सप्तरंग जणु त्यातुन उमटतात  मनाचे भाव मंदमंद....                                                          प्रेम म्हणजे काय ?                                      आत्मीयता , ममता , विश्वास वात्सल्यतेची उब.....                                                ज्या सहवासा शिवाय मिटत नाही मनाची कधी भुक ....                                               प्रेम म्हणजे काय ?                    ईश्वर ,पालक, भावंड, जीवलग सखी,जीवन साथी, मुलं-बाळं,ज्यांच्या अस्तित्वाने मिळते सहानुभूती...                                                      प्रेम म्हणजे काय ?                                                              तुझं माझं त्यात नसतं हे सर्व विश्व आपलं असतं रुसवे-फुगवे  होतातच पण  क्षणात ते मिटतातच...                                                   प्रेम म्हणजे काय ?                                                          द्वेष यात मुळीच नसतो.                                                   तू घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे ही नेहमी साद देतो...                                          हेच तर खर प्रेम असतं....                                     ✍️प्रा सौ. स्वाती संजय शिंगणजुडे ( पिंगळे )अमरावती
[8/8, 5:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय - प्रेम म्हणजे काय असते*

प्रेम म्हणजे काय असते
शब्दात सांगणे कठीण असते
नजरेने कधी बोलत असते
नकळत प्रेम जडत असते

भरलेल्या मैफिलीत
त्याची आठवण येत असते
अनुपस्थिती त्याची वर्गातील
मनाला अस्वस्थ करत असते

त्याला आवडणाऱ्या रंगाची
ती साडी नेसत असते
आवडीची नसली भाजी तरी
तो चवीने खात असते

लहान सहान गोष्टीचा
हट्ट ती करत असते
रुसवा दूर करायला
नवीन भेट तो देत असते

नकळत येणाऱ्या आठवणीने
डोळ्यात पाणी येत असते
गुलाबाच्या फुलानेही
मन प्रफुल्लीत होत असते

प्रेम म्हणजे काय असते
शब्दात सांगणे कठीण असते
प्रेमा मध्ये समर्पण असते
प्रेम म्हणजे प्रेम असते

*सौ.रुपाली अमोल बोंद्रे,भंडारा*
[8/8, 5:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: " *दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची व्यथा*"                                दरवर्षीच दुष्काळाचं सावट                                       पर हिमतीनं बीज पेरल शेतात....                                                या वर्षी तरी येशील पावसा या मोठ्या आशेत....                                                  माया शेतात पिक डोलीन वाऱ्या सोबत....                                                                                       पर तु कुठे लपला ढगा आड सपन राहिलं तसच डोयात....                                                                     कर्ज घेऊन केला उटा नेटा तू येशील या आशेवर ....                                                                                                         पर तु बी केल मले पोरक सोडलं एकट वाटेवर....                                              पोटाच्या  खळगीले नाहि माया जवळ दाना पाणी....                                                 मग गुराढोराले कसा ठेवू बांधून दावणी....                       नाहि लेकराले पोटाले भाकर टूकडा....                        त्याले कसा दाखवू शिक्षणाचा उंबरठा....                                                          जमिनीच्या  भेगा पाहून मले दिसते त्यात माया दारिद्रया ची रेखा....                                                      कधी मिटणार देवा माया अभाग्याची दूरदशा...                                                        नको रे देवराया अंत असा पाहू  माया कष्टाचे मोल नको मातीमोल करु....                                        सरकार ची योजना कधी च नाहि भेटली....                                                गरिब शेतकऱ्यांची व्यथा कुणी  नाही समजली....                                                          ✍️प्रा. सौ.स्वाती संजय शिंगणजुडे ( पिंगळे) अमरावती
[8/8, 5:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेम  म्हणजे  काय?



प्रेम  म्हणजे  काय
लंगड्याचा पाय
वासराची गाय
दुधावरची साय.....


प्रेम  म्हणजे  जीव ओतणारी माय
बाळांसाठी करे हायहाय
प्रेम  म्हणजे  इंद्रधनु
पाखराची रुणुझुणु......



प्रेम  म्हणजे  सुवास
आई भरवी बाळा घास
म्हणती बाळा हास रे हास
कसा मी हसू हास रे हास....



प्रेम  असते  रागवण्यात
प्रेम  असते  बोलण्यात 
प्रेम  सुंदर  नात्यात
प्रेम  कणाकणात.....




प्रेम भावाबहिणींचे 
प्रेम  पतीपत्नीचे
प्रेम  आईबाबांचे
प्रेम आपल्या  सखींचे

सौ सुषमा पडोळे भंडारा
[8/8, 5:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: || प्रेम काय असते ||

वाळलेल्या झाडांना ओलावा
हिरमुसल्या जीवांना विसावा
लळा लाववि जे सर्वांना
निःस्वार्थ ठेवुनि भावना

भेदभाव नसे प्रेमाला
एकमेका विषयी कळवळा
अंतकरनी असीम लळा
त्यात दिसे जिव्हाळा

प्रेम असे सहनशक्ति
प्रेम असे करुणा भक्ति
चुकल्यास अडवुन सुधारती
त्यातच येई प्रेमाची प्रचिती

अडीच अक्षराचं प्रेम
जुळते अन्तःकरनान
जगावं आनंदान
मस्त राहाव प्रेमानं

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/8, 8:04 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेम म्हणजे कायॽ

प्रेम म्हणजे......
दोन जीवाची अचुक वाट
जिथे नसते दुसरा भाव
ती फक्त देण्याची रास
तिथे नसते घेण्याची आस।

प्रेम म्हणजे.....
हिरवे हिरवे नैसर्गिक रान
मन असते सदैव आनंदात
नटण्याछटण्याचा छंद फार
उडत जाव उघड्या आकाशात।

प्रेम म्हणजे.....
जगात तोच दिसे सुंदरवान
ज्यावर जडला प्रेमाचा गार
तोच दिसे धनवान गुणवान
तोच भासे बहु किर्तीवान।

प्रेम म्हणजे.....
देवाघरचे सुंदर बहुमुल्य वाण
जे मिळाल मनुष्य जन्मास
प्रेमाची परिभाषा नाही खास
प्रेमात पडल्यावरच कळेल हमखास।

सौ.चंदा वनवे शेंडे नागपुर.
8/8/2020
[8/8, 8:04 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: निसर्ग कविता
🌅सूर्योदय🌅

काळोख सरता
झुंजूमुंजू झाली.
बघता बघता पूर्वाई
गुलाबी छटा ल्याली.

तांबडं फुटलं
आभाळ उठलं
रवि किरणं झळाळी
सृष्टी सौंदर्य तेजाळी.

सडा रांगोळी 
करू सकाळी.
द्वीजगणांची भूपाळी
जलात उमलती कमळी.

सूर्योदय होता
आबालवृद्ध जागली.
प्रातर्विधी आटोपून
दूध,चहा,न्याहारी सकाळी.

सूर्योदय झाला
सूर्यनमस्कार घाला
रोमरोमी चैतन्य जागला
लगबग लागू नित्य कामाला.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/8, 8:04 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेम म्हणजे काय?

न बघताही बांधले जाती,
बंध प्रितीचे,असे हे प्रेम.

कळत नकळत भाव उमलती,
विश्वासाचे प्रतिक,असे हे प्रेम.

व्यक्त अव्यक्त भावनांचा,
खेळ अनामिक,असे हे प्रेम.

गुण दोषांसह स्वीकार,
दोन जीवांचा,असे हे प्रेम.

राग लोभाची पर्वा न करता,
गोड मानती,असे हे प्रेम.

निसर्गाची देणं अनमोल,
व्यापक स्वरूपी, असे हे प्रेम.

                                सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                                खामगाव.
                                 दि.08.08.2020
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

        --संस्कारधारा--(२५)

कोझीकोड तळा विमान लॅंड करून उडविले
इंधन खर्चुनी परत उतरवता बाजूला घसरले
"शहीद दिपकजींनी"अनुभव पणास लावले
थांबवुन इंजिन आग भडक्यातंन प्रवाशी वाचले.

दनाअ, नागपूर
दि.०९/०८/२०२०
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेम म्हणजे काय

प्रेम म्हणजे जिव्हाळा
प्रेम म्हणजे अतुट बंधन
प्रेम म्हणजे विश्वास
प्रेम म्हणजे सौजन्य
प्रेम म्हणजे सौज्वळता
प्रेम म्हणजे निरागसता
प्रेम म्हणजे कोमल भावना 
प्रेम म्हणजे समर्पण 
प्रेम म्हणजे सर्वस्व
जे शब्दात बांधता येत नाही.
माधुरी भूते
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी. के. सा. सं. प.

                   🌻पहाटवारा🌻

पहाट सरली
तांबड फुटलं
पक्षी किलबिल 
हंबरी वासर
रवी किरणांनी
उडती पाखरं

सौ. विणा द. अतकरी, नागपूर
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.३३
नव चैतन्य घेऊन
आली ही प्रभात
सूर्यनमस्काराने
करूया सुरुवात.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.३८*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*चातकाला आतूरता जशी*
*पावसाच्या पाण्याची*
*ओढ लागली जीवा*
*श्रीकृष्ण जन्म सोहळ्याची*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

शुभ्र मोगरा
सुगंध दरवळला
उरी साठवता
प्रसन्न शांती
देई चित्ताला

सौ.प्रतिभा वाठ (गरबडे)
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जंगलेल्या औजारांना..धार देऊ चल मित्रा हाती पून्हा तलवार घेऊ
 
खुप झाले शांतीचे संदेश आता
चहुबाजूंनी पेटला हा देश आता 
दुष्मनांच्या छाताडावर स्वार होऊ
चल मित्रा हाती पून्हा तलवार घेऊ
 
धूंद नेते बोलत सुटले गद्दारांची भाषा
भारत मातेच्या अब्रूचारे मांडला तमाशा
तमाम गद्दारांना त्यांची जागा दाऊ..
चल मित्रा हाती पून्हा तलवार घेऊ..                                         
                                              
भारत मातेच्या सुपूत्रांनो जागे व्हारे...
विसरून सारे देशासाठी एक व्हारे...
माँ भारतीच्या सेवेसाठी सरदार होऊ....
चल मित्रा हाती पून्हा तलवार घेऊ...              
           तर्फे:- राजीव बुद्धे,मांढळ
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *शुभ सकाळ*
मंद सुगंध
प्रसन्न सकाळ
माझा तुम्हाला प्रेमाचा नमस्कार

           नंदा भोयर
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जंगलेल्या औजारांना धार देऊ.
चल मित्रा हाती पून्हा तलवार घऊ
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *नोकरीवाला माणुस*
*************************
बारा तास नोकरी करून
मिळते तरी काय........ 
साहेबांची जी हुजूरी 
यातच आयुष्य जाय 

जाण्याची वेळ ठरलेली 
येण्याची यांना नसे घाई 
दारात गृहलक्ष्मीसवे
वाट पाही प्रेमळ आई 

महिन्याअखेर पगार होई 
महिनाभर त्यास पुरवितो 
काटकसर करूनच...... 
संसाराचा गाडा चालवितो 

साहेबांची करती चमचागीरी 
पगारवाढ ही मिळे त्यांना 
साहेबांसमोर मत मांडायचे 
नसे स्वातंत्र्य......... यांना 

एक दिवस सुट्टीचा..... 
मौज मजेत घालविती
इच्छा आपली पूर्ण करून
हौस सार्‍यांची पुरविती

*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
माझी आवडती कविता

.निसर्ग कविता. (८४)

        "" सुर्योदय""

निशा प्रसवी
पहाट सताड
पक्षी गुंजारव
फुटलं तांबड.

                     वृक्षवेली तून
                     सुर्योदय बघन
                     घेई  दिनकर
                     धरती  चुंबन.

रविकिरण पिवळे
चहुकडे पसरले
पशुपक्षी जणंही
कामा सरसावले.

                       निसर्ग पोशिंदा
                       आहे सुर्यभानं
                       त्याचे किरणांनी
                       अन्नाचे प्राशन.
 उगता न् रवी 
निशा भूवरं
थांबली धरा
चाले सुर्यावर.

                      अरूणाचं येण
                      मंगल ते क्षण
                      मंदिरी आरवं
                      नाद घंटाघण.

पहाटे  नभात
भानुदय झाला
आळस जगाचा
दुरच पळाला.

दनाअ, नागपूर
दि.०९/०८/२०२०
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता


आनंदी आनंद  गडे
पडतो  पाउस चोहिकडे
खाली वरती मोद भरे
वायुसंगे सुगंध  घडे....


आम्हा बी के गृप मंच मिळे
कविता सादरीकरणाला 
त्यातून वाव मिळे
कविता रसग्रहण माध्यम  ते.....




आनंदी आनंद  गडे
सर्व सख्यांसह मोद फिरे
भाग घेती उपक्रम  उत्साहाने 
सकारात्मक उर्जा प्रफुल्लविणे.....

सौ.सुषमा पडोळे भंडारा
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडीची कविता-

।। 🌺 द्रोणकाव्य 🌺 ।।

श्रावण धारा आल्या
सरीवर सरी
करुन गेल्या 
ओल्याचिंब
नाहल्या
वेली
त्या
🌺
श्रावणात बरसे
रिमझिम सरी
नभात दिसे
इंद्रधनू
छानसे
दिसे
ते
🌺
इंद्रधनू शोभते
नभात साजरा
नृत्य करते
मेघराज
सजते
विज
ती
🌺
श्रावण आला नभी
झळकली आभा
शृंगार शोभी
सप्तरंगी
प्रारंभी
गाते
मी
🌺
शोभे फुलपाखरु
गवत फुला रे
ते जाता धरु
पळतसे
भूर्ररु
छान
ते
🌺
सुहासिनी सजल्या
श्रावणमासात
हिरवे ल्याल्या
नवचुडा
खेळल्या
पिंगा
त्या
🌺
श्रावण मासी आली
सण मांदियाळी
गौराई आली
आनंदात
सजली
पुज्य
ती
🌺
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बेकारी 

विनविते तुला रे, परोपरी 
मिळू दे रे देवा, मला नौकरी 
शिक्षनाच्या उघड्या दारी 
मारिली आम्ही भरारी !

तरीही राखतो दिसभर टपरी 
नको वाटते आता ही डीग्री 
लाज वाटते कराया मजुरी 
बाप वसके अंगावरी !

पाऊल टाकता दारी 
माय म्हणे, फुकट्या गिळतोस भाकरी 
घे रे, समजून तूच हरी 
किती सोसावी ही बेकारी? 

देईल कोण आम्हा छोकरी? किती पत्करावी लाचारी नुसताच का उभा विटेवरी? 
दाखवी रे दया बेकारावरी !!

रंजना हलमारे साकोली
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *उपक्रम - आवडती कविता*
*विषय - कुलदैवत*

बोंद्रे कुटुंबीयांचे कुलदैवत
गायमुखचे शंकर भगवान
भंडारा जिल्ह्यातील गाव
निसर्गाच्या सानिध्यात देवस्थान

सभोवताली पर्वत रांगा
आंब्याच्या बागा छान
दूरदूर चे भक्त येती
घेऊन बेलाचे पान

गायीच्या मुखातून वाहतं
निर्मळ, स्वच्छ, जल निरंतर
तिर्थाचा लाभ घेतात भक्त
करतात अभिषेक लिंगावर

महाशिवरात्रीचा उत्सव
भव्य दिव्य जत्रा भरते
स्वयंपाक घेऊन जन येती
दर्शना मोठ्या रांगा लागते

शिवाची भव्य मूर्ति आहे
पारणे नजरेचे फिटते
नमन करून शिवाला
भय जीवनातील मिटते

*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हायकू  रचना--   
                     

         श्रावण आला

श्रावण आला
कोसळल्या त्या धारा
घेऊन वारा 

या पावसात
वसुंधरा हो न्हाली
हर्षात गाली

नील नभाचे
धारीत पावसाचे
मयूर नाचे

हर्ष मनाचे
सोनेरी किरणांचे
भाव तयांचे

श्रावण भोळा
सणांचा तो सोहळा
सुगंधी माळा

झाडा वरती
पक्षी सुरेल गाती
चिव चिवती

 मंगला डहाके, भंडारा
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता

       "--" गांगुली गाय""--

लाल काळया रंगात
दिसते गांगुलीगाय
राहते ती समुहात
असती सुक्ष्म पाय.

वर्षा ऋतू लागता
सरी पावसाच्या
लाल पुंज सर्वत्र
लिला निसर्गाच्या.

घोळक्याने दिसती
एकमेका अंगावर
पुंजकासम टोळका
चाले तो रस्त्यांवर.

ढिगात राहुण ही,ना
कोणासं  दुखविती
जसे माणसे गर्दीत
एकमेका तुडविती.

स्वावलंबी हे जिवन
कोणा न् बाधविती
मानवां दे शिकवण
शिस्तीत वागण्याची.

निसर्गात लुप्त होई
वर्षा ऋतू संपता
या गांगुलीगायचा
कुठे ना थांगपत्ता.

दनाअ, नागपूर
दि.०९/०८/२०२०
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: #वयाची ऐैसी का तैसी#        

वयाच्या शिडीवरून घसरला पाय
भिंतीला टांगले आयुष्याचे घड्याळ
लहान घराला अनेक कोपरे मनाच्या
 कोपरयात दडली तरुण सपने......

सुर्याचे   घर असेल   दूर
घरात आपल्याच यावे सुर्याचे दूत
आकाशातले तारे तोडता यावे
छतावर चढुन चंद्राला कवेत घ्यावे.....

पाहीजे असेल मित्र खास
शेजारपाजार जवळ असावा
कागदांच्या होडीत बसून मित्रांसवे
दुरवर फेरफटका मारून यावे.

आभाळ र-वच्छ असेल तेव्हा पतंगासोबत सैर करावी
पेच लावत पतंगाची
ओsssकाट् ची मजा घ्यावी......

अवचित आलेलया पावसातलया
सरींसोबत करावी जराशी मस्ती
गारा वेचुनिया हातात ,फुले समजुन
सखीवर हसत हसत उधळावी..........

घड्याळाची टिक् टिक् वाढते 
तेवढी वाढु द्या वाढत्या वयाच्या
सखींसोबत आनंद क्षण वेचु या
मनातिल तरुणर-वप्नांकडे पाहुया...
 
घड्याळाची काटे चालली जरी 
 सरकत ,जातात तशी जावु द्या
चेहरयावरच्या हसूला धबधबा बनुन
वाहतो तसे वाहु द्या...................

वयाची आता नको च भिती
वाटते तसे जगुन घ्या
कारण ,भय जिवनातील मिटवायला

वयाची आपल्या आता
एैसी का तैसी..............

    सौ जयश्री रेहपाडे
            नागपुर. 🙏🙏🙏
[8/9, 9:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌷जीवन🌷

        "ओढ" म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही..
       
       "विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही...
       
        "प्रेम" म्हणजे काय ते
स्वतः केल्याशिवाय समजत नाही...
   
      "पराजय" म्हणजे काय ते
शत्रूकडून हरल्याशिवाय समजत नाही..

       "दुःख" म्हणजे काय ते
अपेक्षा भंग झाल्याशिवाय समजत नाही..

       "सुख" म्हणजे काय ते
स्वतः मधे शोधल्याशिवाय समजत नाही...

सौ. संगीता सुधाकर कडवं
       ..भंडारा..
[8/9, 9:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *माझा ग्रुप*
कवितेचा छंद
लागला मना
लिहिल्या वाचून आता
मला काही करमेना

दिवसातनं कितीदा
मोबाईल येतो हाती
बी के ग्रुपशी आता
पक्की झाली नाती

ग्रुप मध्ये डोकावल्या शिवाय
चैन पडेना मना
खूप छान वाटतं
माझ्या अंतर्मना

ग्रुप मुळे या
लेखणीला आली धार
छान म्हटलं कवितेला की
आनंद होतो फार

खूप खूप छान
ग्रुप बाई माझा
दिवसभर कविता वाचून
खूप येते मजा

                 नंदा भोयर
[8/9, 9:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता

माझ्या इवल्याशा कवितेला,
पंख इवले इवले फुटावे.
रूपकात दाणा
शब्दांचा टिपता,
अंगणी नाचत फिरावे .

माझ्या इवल्याशा कवितेने,
शब्दांचेच बाळसे धरावे.
पंखात बळ येता 
उंच भरारी घेण्या,
सज्ज तिने व्हावे.

माझ्या इवल्याशा कवितेने,
शब्दांचेच अलंकार ल्यावे.
फेर धरुनी निळ्या,
गगनाला स्पर्शूनी यावे.

माझी इवलीशी कविता
झाली कितीही मोठी,
हृदयाशी कवटाळून धरता 
तिची इवलीशीच प्रतिमा दिसावी.

                                सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                                खामगाव.जि.बुलडाणा
                                 दि.09.08.2020
[8/9, 9:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडती कविता

I झूळूक I

पहाटेची गुलाबी थंडी
अनं आसमंत बहरलेला
तुझे ते नव्याने जळणारे आभास
आणि गुलमोहर फुललेला

वा‌ऱ्याची ती मंद झुळूक
आणि अंग अंग शहारलेला
तुझ्या दाटलेल्या मनात
पाऊस होऊन बसलेला

तुझ्या अश्रुंच्या सागरात
मी आकंठ बुडालेला
माझं मनही तुझ्यासमवेत
जगण्यासाठी आसुसलेला

मग येशील ना ती वाऱ्याची
मंद झुळूक बनून...

.......................................
        🌿 मंगेश बांते, पुणे 🌿
[8/9, 9:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: क्रांती
हाती घेतली मशाल
क्रांतीचे विचार ‌जहाल
प्राशूनी सारे हलाहल
उत्क्रांतीचे वाजे बिगुल.

शब्दा शब्दांत ललकार
स्वप्न करण्या साकार
अडथडे अगणित अपार
मनोधैर्य प्रबल निरंतर.

रक्ताचे करून पाणी
घरा तुळशीपत्र ठेवूनी
देशकार्या घेतले वाहूनी
समर्पण कर्तव्य जाणूनी.

त्याग भावना जागली
सशस्त्र क्रांती जाहली
अन्यायाला छाती भिडली
मुक्तता मातृभूची केली.

बलीदान करण्या तयार
झाले स्वातंत्र्य साकार
मातृभूचे शूर शिल्लेदार
अमर झाले क्रांतीवीर.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

    ""संस्कारधारा"" (२६)

कळंब झाडावर कान्हा वाजे बांसरी
नटखट कान्हा गोपीकेचे वस्त्र पळवी
लाजुन त्या गोपीका कृष्णा आळवी
दे रे कान्हा.. दे रे.. चोळी अन् लुगडी.

दनाअ, नागपूर
दि.१०/०८/२०२०
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी. के. सा. सं. प.

🌻पहाटवारा🌻४

बेलाच्या पानाची किमया न्यारी
सदाशिवाला नेहमीच प्यारी
चैतन्येश्वराचे मंदिर सजले भारी
असा तो माझा भोळा त्रिपुरारी

सौ. विणा द. अतकरी, नागपूर
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺प्रभात पुष्प 🌺।।५५.

*  नमामि शंकरा  *
*  गिरजा भ्रतारा  *
*  तुझ्या अवतारा  *
       *  रामेश्वरा  *

सौ.कमल सार्वे भंडारा.
१०|८|२०२०.
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🏵️🏵️प्रभात वंदना - ४🏵️🏵️
----------------------------------------

प्रभातकाळी मंगल समयी ओंजळ
फुलांची वाहते तुज गैरीशंकरा
स्वीकार करा माझी
पहीली प्रभात वंदना.
सुप्रभात......
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
सौ. शितल श्रीकांत ठवकर.
(तुमसर रोड, देव्हाडी, तुमसर)
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.३४
वाहूनी बेलपत्र शंकरा
शिवमूठ अन् धोतरा.
आज श्रावण सोमवार
आराधना करू गंगाधरा.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ""वृंदावना तील कृष्ण""

वृंदावनी वाजे बासरी
राधा सखी झाली बावरी
घागर डोई ची ती सावरी
घाई झाली कृष्ण मिलनाची
       स्वर मुरलीचे कानी पडले
       गवळणीला स्वप्नच वाटले
       झोपेमधूनी झाली जागी
       वृंदावनाची वाटच धरली
कळंब झाडावर वाजे बासरी 
गाईवासरे जमली सारी
गोप गोपीका धावत आली
पाहण्या तो सावळा मुरारी.

  सौ. विणा द. अतकरी
           नागपूर.
दि10/08/2020
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.३९*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*जटे मधून वाहते गंगा*
*गळ्यात विषाचा प्याला निळा*
*मनोभावे करावी प्रार्थना*
*शंकर माझा आहे भोळा*


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.  (८५)

 ----वृंदावनातील कृष्ण---

पैलतीरी वृंदावन नगरी
यमुने तीरी कान्हाची
ऐकुन मधुर बासरी
राधा होई बावरी.

वृंदावनी कृष्ण सखा
उभारी सुदामा नगरा
शिल्पकार विश्वकर्मा
स्वर्गसुखा पामरां.

धरी अधर मुरलीला
कुंडल शोभली काना
नेसुन पितांबर पिवळा
कस्तुरी गंध मस्तका.

राधेला पाहून भुलला
कान्हाने बैल दोहीला
कृष्णाला पाहून राधा
घुसळीला डेरा रिता.

मोरपीस मुकुटी शोभला
कौतुक वृंदावनी झाला
दर्शनाची अधिर राधा
कळल्या खुणा कृष्णाला.

दनाअ, नागपूर
दि.१०/०८/२०२०
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नटखट कृष्ण
कान्हा छेडू नको रे असा
तुजमुळे मन होई वेडापिसा.
नको वाजवू पावा तुझा
रमेना मन संसारी माझा.

डोई धरून दूध दही माठ 
अवघड चढता यमुना घाट
कंकर कां मारीसी नेटका
फुटलानं रे माझा मटका.

कां अडविशी वाट माझी
सांगेन यशोदेशी खोडी तुझी
नको धरू हट्ट सोड वाट
उशीर होई दूर‌ ते हाट.

नटखट  नंदलाला चित्तचोरा
जाऊ दे घराला सत्वरा
सासू सासरे बोलतील मला
तनमन मुलांचं रे वाहीला.

सौ.मीरा शेंडे भंडारा.
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *वृंदावनातील कृष्ण*

यमुने तीरी उभा
सावळा हरी
पायामध्ये आडी
ओठावरी बासरी

नटखट कान्हा
पावा वाजविताना
गोपिका धुंद
जळी स्थळी कान्हा कान्हा

रूप सावळे लोभस
भुरळ घातली मनाला
झाली गोपिका बावरी
शोधू कुठे कान्हाला

डोईवर घडा
कृष्ण मारतो खडा
अडवू नको वाट माझी
जाऊदे रे घरा

                ‌. नंदा भोयर
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वृंदावनातील श्रीकृष्ण---

मथुरेच्या कारागृही
जन्म तुझा झाला
गोकुळात नंदा घरी
लाडात तू  वाढला ।।

चावा घेऊन तू मारले
त्या पुतना राक्षसिनीला
घरभर पळवून तू
दमवले यशोदा मातेला ।।

खोड्या करीसी तू
वस्त्रे लपविसी
लोणी खाऊन
गोपिकांचे मडके फोडीसी ।।

निस्सीम प्रेम तुझ्यावर
असे गोड राधेचे
अंतकरणी प्रेमळ भक्ती
नयनी आतुर बांध तिचे ।।

हृदयात राधेच्या
अविरत प्रथम स्थान
रंगात रंगुनी,  प्रेमात
न्हाऊनी, देई कृष्णाला मान।।

राधेचे ते रूप सोज्वळ
लावण्यवती प्रेयसी
मिलनाला आतुर भाव
नयनी कृष्णाची  वाट पाहशी ।।

मधुर पावा वाजवून
झाला लाडका तो सर्वांचा  
राधेचा जळफळाट होई
वृंदावनी गोपिका भोवती कृष्णाच्या ।।

मित्रत्व निभावण्या खाल्ले
सुदाम्याचे पोहे खास 
अन्याय दूर करण्या
धरतीवर आला जन्मास ।।

केलास अत्याचारी कंसाचा वध
बघताच गोकुळ आनंदले
द्वारका ही फेर धरता, वृंदावनी चे
श्रीकृष्ण लाडके ईश्वर झाले ।।
---------------------------------------
          मंगला डहाके, डहाके
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *नटखट कृष्ण*

नटखट कृष्ण कन्हैया 
दाखवी बाललीला
चावा घेऊन मारले
पुतणा राक्षसीनला

गोपिकांच्या मटक्या
दगडाने फोडी.....
कपडे लपवून त्यांचे
खोड्याही काढी....

दही, दूध, लोण्याची
करत असे चोरी....
दोरीने बांधुन माता
यशोदा शिक्षा करी

यमुनातीरी वाजवे
मधुर बासरी ......
मिलनासाठी आतुर
राधा होई बावरी

सवंगडी घेऊन खेळी
यमुनेच्या तीरावर
थुई थुई नाचला.....
कालियाच्या शिरावर 

*सौ स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नटखट कृष्ण🦚
कान्हा छेडू नको रे असा
तुजमुळे मन होई वेडापिसा.
नको वाजवू पावा तुझा
रमेना मन संसारी माझा.

डोई धरून दूध दही माठ 
अवघड चढता यमुना घाट
कंकर कां मारीसी नेटका
फुटलानं रे माझा मटका.

कां अडविशी वाट माझी
सांगेन यशोदेशी खोडी तुझी
नको धरू हट्ट सोड वाट
उशीर होई दूर‌ ते हाट.

  नंदलाला चित्तचोरा
जाऊ दे घराला सत्वरा
सासू सासरे बोलतील मला
तनमन तुलांचं रे वाहीला.

सौ.मीरा शेंडे भंडारा.
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वृंदावना
तील श्रीकृष्ण 

वृंदावनातील श्रीकृष्ण  कन्हैय्या सर्वांचा आवडता हा
खर्या मनातून जळे राधिका
मोहन सर्वांच्या आवडीचा..,

श्रीकृष्ण  आध्यात्मिक  ज्ञानाचे  धेय
भगवतगीता त्याचे सार
त्यांचा श्रीविग्रह शाश्वत दिव्य 
तयाठायी श्रध्दा  अपार...


सूर्यापरीउगवणे ज्याचे
ज्ञानयज्ञ श्रेष्ठ ची ते
नष्ट न होती स्मरणशक्ती 
अर्जुन श्रीकृष्ण  अद्भुत भक्ती ....


खोडकर हा कृष्ण सावळा
केशसांभार तयाचा कुरळा
पायी पैंजण आणि वाळा
कान्हा म्हणून  भवती गोळा .

सौ.सुषमा पडोळे भंडारा
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वृंदावनातील कृष्ण

देवकीच्या पोटी आला
यशोदेने वाढविला
दुध दही आवडे तुला
वृंदावनच्या क्रिष्णा

मुकुटाला मोरपीस
पितांबर तुझा पिवळा
हाती बासरी,कुंडल कानात
हार तुझ्या सदा गळ्यात

राधेसंग ह्यसलिला
गोपीकेला दंग केले
दही, लोण्याची चोरी केली
नटखट कृष्णा

रुक्मिणीने कृष्णास
दुध गरम प्यावयास दिलं
राधेचे प्रेम निस्सीम
अंग तिचे पोळले

राक्षसाचा वध केला
नंदा घरच्या गायी हाकल्या
वृंदावनच्या क्रिष्णामुरारी
भक्तांना लावला लळा.
🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ.माधुरी देवेंद्र भूते.
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ◆ कृष्ण सावळा◆
     
रूप तुझे मनमोहक,
      बघूनी मन होई मुग्ध,
करितो तू रासलीला,
       गोपिकांना लागे तुझा छंद।

जन्म दिले देवकीने,
     लालन-पालन केले येशोदाने,
लाभले तुला प्रेम, 
      दोन मातेचे भाग्याने।

रूप तुझे अनेक,
    कुणी म्हणे नंदलाला,
कुणी म्हणे माखन चोर,
      पण तू तर आहे,
राधेच्या मनातील मोर।

रंग निळा, शोभे मोरपंख,
     वाजवुनी सुरेख बासुरी
गोकुळ होई धुंद

तू केले दृष्टांचे संहार,
     जन-मानवांचे 
केले उद्धार,
    म्हणुनी सगळे म्हणती
       तुला पालनहार🙏🙏

सौ. संगीता सुधाकर कडवं
         भंडारा
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *वृंदावनातील कृष्ण*

वृंदावनातील कृष्ण 
वाजवत असे बासुरी 
भान विसरून सगळी 
बसत असे  यमुनातीरी

नटखट कृष्णाला 
दहि दुध आवडे 
त्यासाठी मारी खडा 
फोडे गोपिकांचे मडके 

करंगळीवर उचली 
गोवर्धन पर्वत 
रासलीला खेळी 
गोपीकेसंग वृंदावनात

कालिया नागाला 
योग्य धडा शिकविला 
कंस मामाचा वध 
कृष्णाने केला

मुकुटी मोरपीस
करे विविध लीला
मुखी सदा हास्य
असा नंदलाला

*सौ०.रुपाली अमोल बोंद्रे, _भंडारा*
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺वृंदावनातील कृष्ण 🌺।।

       हायकू
कृष्ण सावळा
वृंदावनी नटला
साजे सोहळा।।

बाल गोपाल
वासुदेव नंदन
कन्हैया लाल।।

कृष्णाअष्टमी
पूजिते सर्वदूर
गोकुळष्टमी।।

राधा बावरी
शोधि कृष्णमुरारी
कळंबावरी ।।

गोकुळघरी
कृष्ण लिलया करी
यमुनेतीरी ।।

वृंदावनीचा
नटखट बालक
प्यारा सखींचा।।

चिंधि बांधण्या
द्रोपदी फाडी वस्र
धावा रक्षण्या।।

कौंत्यंयसखा
गिता सांगे अर्जुना
सारुनी दु:खा।।

महाभारत
नायक नंदलाला
करी सारत।।

सौ.के. बी.सार्वे. भंडारा.
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: लीलाधारी कृष्ण

गोकुळात नंदघरी,
कृष्ण अवतरे,
बघुनि लावण्यरुपडे,
मन मोहितो,
कृष्ण बघा कसा,वेड लावितो.

नटखट गिरधारी,
मोरपीस मुकुटावरी,
दहिदुध,लोण्याचा
माठ फोडीतो,
कृष्ण बघा कसा, वेड लावितो.

धरी गोवर्धन करंगळीवरी,
यमुनेत कालिया मारी.
लपलेल्या गाई शोधूनि
लीला दावितो,
कृष्ण बघा कसा, वेड लावितो.

वृन्दावनी मुरली वाजे,
गोपिकांचे भान सुटे.
प्राणप्रिय राधिकासवे,
रास खेळतो,
कृष्ण बघा कसा, वेड लावितो.

मथुरेत कंस मारी,
दुष्टांचा नाश करी.
कुरुक्षेत्री 'गीता' सांगे,
कृष्णसखा अर्जुन शोभे,
कृष्ण बघा, कसा वेड लावितो.

अवतार घेऊनि,धर्म रक्षितो.
कर्माचा पाठ 
आम्हा शिकवितो.
लीला त्याच्या, मार्ग दाविते,
कृष्ण  बघा कसा, वेड लावितो.

                               सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                खामगाव.जि.बुलडाणा
                                 दि.10.08.2020
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹 कृष्ण लिलाधारी🌹

कृष्ण सखा लिलाधरी
वाजवितो धेनु जादुभरी
गोपिकाही होती दंग
वस्त्र चोरीतो श्रीहरी........

 राधेसाठी वेडा मुरारी
 फोडीतो गोपिकांची मडकी
 दुध,दही,लोणी खातो चोरुनी
 सवे घेवुन बाळगोपाळांची टोळी.......

  कृष्ण रुक्मिणिचा पती
  प्राजक्ताचा सडा पडे दारी
  सुगंध फुलांचा दरवळतो
  राधाराणीच्या हृदयातुनी........

   कृष्ण जगाचा पोशिंदा
  उचलुनी गोवर्धन पर्वता
   रक्षिली गोकुळातील जनता
    इंद्राचा कोप सहज हरुनी या......

    असा कृष्ण सावळा
    जन्मला वासुदेवा घरी
    धन्य ती वृदांवन नगरी
    जिथे आजही दिसतो मुरारी..........

               सौ जयश्री रेहपाडे
                   नागपुर.
[8/10, 8:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वृंदावनातील कृष्ण
 
पिवळा पितांबर,निळा शेला,
वाजवी मुरली नंदगोपाला.
मुरलीचे सूर मधुर,
ऐकुनी होई मन आतुर.
कृष्णसख्या घेऊन मडकी,
धाव घेती यमुनेतीरी.
लटकत मुरडत राधा येई,
पायी नूपुर,मटकी डोई.
नजरेने शोधी कृष्णमुर्ती.
कृष्णाचा सहवास हवासा,
फेर धरुनी नाचती गोपबाला.
मध्ये उभी कृष्णासवे राधा
वृंदावनातील देखुनी लीला,
हरखुन जाई प्रियसखी राधा.
गोपिका म्हणती कृष्ण माझा,
कृष्णमुरली बोले राधा राधा.

                               सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                खामगाव.जि.बुलडाणा
                                 दि.10.08.2020


[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

    ""संस्कारधारा""   (२७)

बंदिगृहात कृष्ण जन्मले
साखळदंड सहज तुटले
टोपलीत वेगे वासुदेवाने
बाळकृष्णां गोकुळी सोडले.

दनाअ, नागपूर
दि.११/०८/२०२०
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आला जन्माष्टमी चा सण,
 साजरी करूया सर्वजण,
 होवो मनोकामना पूर्ण सर्वांच्या, 
 हीच माझ्या कडून तुम्हा सर्वांना,
 कृष्ण जयंती च्या शुभेच्छा
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
         🙏🙏🙏
सौ संगीता कडवं, भंडारा
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रभात समयी
रवी किरणांनी
चहु दिशा उजाडला
गोकुळ अष्टमीला
श्रीकृष्णांचा जन्म झाला 
रिमझिम पावसात
राधेसंग बासरी घेऊन
दशर्न देण्यास
भक्तांच्या घरी आला🌺🌺🌺
माधुरी
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.४०*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*राक्षसाचा विनाश करण्या*
*जन्म घेतला श्रीकृष्णने*
*बासरी वाजवून मने जिंकली*
*गोवर्धन पर्वत उचलले करंगळीने*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कान्हा हा सावळा
डोई मोर पिस तुरा
ओठावरी बासुरी
गोप गोपिका जमल्या यमुनातीरी

     ‌‌.            ‌नंदा भोयर
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
विषय.. ज्योतिर्लिंग चारोळ्या (तीन)

 (५३) रामेश्वरंम्                   (तामिळनाडू)

त्रिचिनापल्ली रामनाथं समुद्रतटावर
श्रीरामसिता जोडीनं स्थापीले रामेश्वरम्
पौरोहित्य रावणाने केले जातीनं
रामेश्वरम् पूजनाने काशी विश्वेश्वर दर्शन. 

(५४).     """नागनाथ""(महाराष्ट्र)

हिंगोली जिल्ह्यात औंढाला स्थापले नागनाथ
गाभाऱ्याच्या तळात पहावे ज्योतिर्लिंग
नक्षिदार काळ्या पाषाणात मंदिर,परकोट
अहिल्याबाईनं केला जिर्णोद्धार चिरेबंद.

(५५) "" विश्वेश्वर"" (उत्तरप्रदेश)

वाराणसी काशी क्षेत्रे स्थापण विश्वेश्वर
काशी विश्वेश्वर दर्शन आहे मोक्षप्रदायी
पुरातनापासुन जसाचा तसा गंगा तिरावर
येथे ब्रम्हा विष्णू उत्पत्तीची मान्यताही.

दनाअ, नागपूर
दि.११/०८/२०२०
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌻पहाटवारा🌻5

सावळा माझा वनमाळी
मोर मुकुट शोभे कपाळी
मीरा राधाची भक्ती भोळी 
अशी ही कृष्ण मूर्ती सावळी.
सौ. वीणा द. अतकरी,
            नागपूर.
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🕉️ *बारा ज्योतिर्लिंग* 🕉️
*१}रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)*

रामाचे ईश्वर रामेश्वर 
हिंदू धर्माची साक्ष 
दर्शन करता मंदिराचे 
होते प्राप्त मोक्ष 

*२}नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ)*

भगवान शिवशंकराने..... 
फिरवले मंदिराचे मुख..... 
आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ 
दर्शनाने याच्या प्राप्त होते सुख 

*३}विश्वेश्वर  (उत्तर प्रदेश - वाराणसी)*

काशी विश्वेश्वर मंदिरात 
संत एकनाथांचे आगमन
वारकरी ग्रंथ लिहून 
केले त्यास पावन 

*सौ. स्वाती सेलोकर* 
*भंडारा*
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बारा ज्योतिर्लिंग
               
7--- रामेश्वरम-- तामिळनाडू

शंकराचे सातवे ज्योतिर्लिंग
स्थित आहे रामेश्वरम
करून 22 कुंडांचे स्नान
घ्यावे रामनाथ स्वामींचे दर्शन ।।

8---औंढा नागनाथ-- महाराष्ट्र

औंढा नागनाथ क्षेत्र
आहे पुरातन काळातील
श्रद्धा हृदइ घेऊन भक्त
बेलपत्री, सुमने अर्पुनी नतमस्तक होतील ।।

9---विश्वेश्वर --उत्तरप्रदेश वाराणसी

वाराणसी काशी स्थापत्य
हे विश्वेश्वर मंदिर
तीन हार लागती पूजेस
भक्तीत दिसे महादेव सुंदर ।।
-----------------------------------
        मंगला डहाके,  भंडारा
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *बारा ज्योतिर्लिंग चारोळी उपक्रम*
*तिसरा श्रावण सोमवार*

*७. रामेश्वर (तामिळनाडू रामेश्वर)*

प्रभू रामचंद्र स्थापित
तामिळनाडूतील रामेश्वर
गंगा जलाचा होतो अभिषेक
चांदीच्या चौथऱ्यावर शिवलिंग सुंदर

*८.नागनाथ ( महाराष्ट्र औंढा नागनाथ)*

महाराष्ट्रातील औंढा नागनाथ
धर्मराजाने बांधले मंदिर
शिवलिलेच्या प्रसंगानी 
सजले आहे महाद्वार

*विश्वेश्वर् (उत्तर प्रदेश - वाराणसी)*

विश्वेश्वर म्हणजे ब्रह्मांडाचे शासक
वसले पवित्र गंगा नदिच्या तिरावर
तीन फुलांचे हार नेती भक्त दर्शना
पिंड दान करती जोडून दोन्ही कर

*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रामेश्वर-तामिलनाडु -७वे

लंकेतुन सीतेला आणावयास
रामाने पुजन केलं ज्योतिर्लिंगाचे
सागर,२२कुंडाचे पाणी,आंघोळ
करतात श्रध्देने, भव्य दिव्य मंदिर रामेश्वर.

औंढा नागनाथ-हिंगोली ८वे
नामदेव हा शुद्र जातीचा
पुजा केली मंदिराच्या मागे
२कुंड , पश्चिममुखी मंदिर
औंढा-मागे नाग-नाम, औंढा नागनाथ

काशी विश्वेश्वर-वाराणशी९वे

हिंदूची पावनभुमी देवाचं माहेरघर,शंकराचे आवडते स्थान
गंगा नदी तिरावर, विराजमान
काशी विश्वनाथ.मोक्षाचे द्वार.

माधुरी भूते
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ज्योर्तिलिंग चारोळी लेखन.

७. रामेश्वरम् - तामिळनाडू.

*  वाळूने स्थापिले रामाने  *
*  तेविस कुडांची आंघोळ *
*  होऊनी स्वच्छ निर्मळ  *
*  पुजिता होई दूर अमंगळ *

८.औंढा नागनाथ-( महाराष्र्ट)

*  औंढा नागनाथ महान  *
*  आठवे ज्योर्तिलिंगाचा मान *
*  हेमाडपंथी कोरीव शिल्प  *
*  होते नंदीचा स्वतंत्र सन्मान *

९. विश्वेश्वर- (काशी)उत्तर प्रदेश.

*  पिंडदान करण्या काशीनगरी*
*  काशीविश्वनाथ मंदिर प्रसिद्ध  *
*  समूळ पापांचा होई नाश *
*  बेल फुल अर्पुणी कामना सिद्ध*

सौ.के.बी.सार्वे भंडारा.
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बारा ज्योतिर्लिंग--

रामेश्वरम--
दक्षिण भारताच्या समुद्र किनाऱ्यावर रामेश्वरम
शंकर पार्वतीला करते
हात जोडून प्रणाम ।।

औंढा नागनाथ --

महाराष्ट्रातील मराठवाद्यात
आहे, ओंढा नागनाथ 
बेल फुल वाहून 
होऊ चरणी नतमस्तक।।

विश्वेश्वरम--

नववे ज्योतिर्लिंग 
विश्वेस्वराम अंधार
गंगा नदीत स्नान
केल्याने मोक्ष मिळते ।।

              पूनम डहाके, भंडारा
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सातवे ज्योतिर्लिंग रामेश्वरम तामिळनाडू

सीता राम मिळून स्थापिले
सातवे रामेश्वरातील लिंग
द्रविड वास्तुकलेचा नमुना अद्भुत
प्रख्यात असे रामसेतू पूल.

आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ महाराष्ट्र (हिंगोली)

पश्चिमद्वारी मंदिर प्रसिद्ध
औंढा नागनाथ नागेश्वर
नामदेवासाठी फिरे मंदिर
आख्यायिका असे सुंदर

नववे ज्योतिर्लिंग काशीविश्वेश्वर  वाराणसी

ज्ञानाची प्राचीन नगरी असे बनारस 
गंगातीरी वसे ज्योतिर्लिंग काशीविश्वेश्वर 
मोक्षप्राप्ती साठी येती भाविक
प्रलयकाळी धरी नगरी महादेव त्रिशूलावर

                               सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                खामगाव.जि.बुलडाणा
                                 दि.11.08.2020
[8/11, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बारा ज्योतिर्लिंग
**************

रामेश्वरम (तमिलनाडु)
रामेश्वरबेटावर ज्योतिर्लिंग रामेश्वरम
आकर असे श्रीकृष्ण शंखासम
उल्लेख स्कंध व शिव पुराण
गंगाजल अभिषेख पालखी हत्तीहुन

नागनाथ (महाराष्ट्र)
औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग नागेश्वर 
शिवलिला दिसे महा द्वारावर
पंचविस फुट उंच तटबंदी
विजयादशमीला निघे पालखी

विश्वेश्वर (उत्तरप्रदेश) वाराणसी
गंगा किनारी काशी विश्वेश्वर
अहिल्यादेविने केला जिर्णोद्धार
कनकपत्री कळस दैदिप्यमान
मोक्ष प्राप्ति पवित्र ठिकाण

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/12, 7:23 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺प्रभात पुष्प 🌺।।५६.

*  कान्हा रे तुझी यमुना  *
*  भरली रे काठोकाठ  *
*  येऊ तरी कशी  *
*  फिरवू नको पाठ *

सौ.कमल सार्वे भंडारा.
१२|८|२०२०.
[8/12, 7:23 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के. सा. सं. प.

           🌸पहाटवारा🌸 (०६)

आज आहे गोपाळकाला
दही पोहे लाह्या मिसळील्या
गोपालांनी गलका केला
दही हण्डीचा बेतच बनला

सौ. वीणा द.अतकरी, नागपूर.
[8/12, 7:23 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात
कृष्ण जन्माच्या सोहळ्यात 
रंगून गेली रात
दहीहंडी फोडण्या
सज्ज बालगोपाल

कृष्णजन्माष्टमीच्या आपण 
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
सौ.प्रतिभा वाठ(गरबडे)
[8/12, 7:23 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹|| *अलगुज* ||🌹
*क्र.43*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*आतुरता होती काल*
*कृष्ण जन्माष्टमीची* 
*गोविंदांना घाई आज*
*दही हंडी फोडण्याची*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*सौ स्वाती सेलोकर* 
*भंडारा*
[8/12, 7:23 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.४१*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*आज दहीहंडी गोपाळकाला*
*यंदा सण घरातच साजरा करायचा*
*आत्मविश्वासाचा मनोरा अबाधित ठेवायला*
*विश्वासाचा सामर्थ्यवान हात  द्यायचा*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/12, 7:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कृष्णाचा पाळणा  (स्वरचित)
**********************

बाळ जन्मला बंदिगृहात
माता देवकी झाली प्रसूत
आनंद झाला तिन्ही लोकात
जो बाळा जो जो रे जो

वासुदेवाला मिळाले बळ 
कंस मामाचा कर्दन काळ
लिला दाखवि कृष्ण दामोदर
जो बाळा जो जो रे जो

हाता पायाच्या तुटल्या बेडया
बंदीगृहाच्या कुलुप कड्या
बाळ निघाला गोकुळ गावा
जो बाळा जो जो रे जो

गुढया पताका तोरणे लावा
सनई चौघडा दारी वाजवा
आनंद झाला नंदाच्या गांवा
जो बाळा जो जो रे जो

गवळणी झाल्या एकत्र जमा
पाळण्यात बाळ श्रीकृष्ण कान्हा
माता यशोदा गाई ते गाणा
जो बाळा जो जो रे जो

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/12, 7:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के .हा.सं.प.  (८७)

        ""कृष्णाचा पाळणा""

जो..जो..रे.बाळा..जो..

मथुरेस बंदीगृहात
वद्यश्रावणअष्टमीला
देवकी  मातेला लागु
लागल्या बाळंतकळा..जो..जो

मध्यरात्रीला कृष्ण जन्मले
बंदीगृहाचे शिपाई झोपले
कुलुप सारे तुटून पडले
गोकुळा नेण्या विचार केले..जो..जो

पिता वासुदेवानं बाळास
टोपलीतं डोईवर घेतले
बाळावर छत्र शेषाचे
यमुनामाईचे पाणी फाकले..जो..जो

मित्रा नंदाघरी
वासुदेव गेले
कृष्णाला ठेवून
नंदकन्या आणीले..जो..जो

नंदवाड्यात आनंद झाला
गवळणींनी गलकाच केला
गोंडस गोजिरा बाळं
कृष्ण दृष्टीला आला..जो..जो

सार्या गवळणींनी
आंघोळ घातली
भरजरी वस्त्र
बाळास घातली..जो..जो

दिवसा मागे दिवस गेले
बाळकृष्ण नंदाघरी धावले
गोपाळांसह दह्यादुधाची
चोरी  करू  लागले..जो..जो

समजू लागल्यावर
बाळ मथुरेस आले
कंस मामास ठार करीले
मायबापास मुक्तच केले..जो..जो

यमुने तीरी गोप भरविला
कदंबवृक्षा पावा वाजीला
गवळणींना आनंद झाला
कृष्ण राधेसह रास खेळला..जो..जो

दनाअ, नागपूर
दि.१२/०८/२०२०
[8/12, 7:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कृष्णाचा पाळणा  (स्वरचित)
**********************

बाळ जन्मला बंदिगृहात
माता देवकी झाली प्रसूत
आनंद झाला तिन्ही लोकात
जो बाळा जो जो रे जो

वासुदेवाला मिळाले बळ 
कंस मामाचा कर्दन काळ
लिला दाखवि कृष्ण दामोदर
जो बाळा जो जो रे जो

हाता पायाच्या तुटल्या बेडया
बंदीगृहाच्या कुलुप कड्या
बाळ निघाला गोकुळ वाड्या
जो बाळा जो जो रे जो

गुढया पताका तोरणे लावा
सनई चौघडा दारी वाजवा
आनंद झाला नंदाच्या गांवा
जो बाळा जो जो रे जो

गवळणी झाल्या एकत्र जमा
पाळण्यात बाळ श्रीकृष्ण कान्हा
माता यशोदा गाई ते गाणा
जो बाळा जो जो रे जो

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/12, 7:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *कृष्ण पळणा*
**************************

बाळा जो जो रे.......
क्रूर कंसाच्या बंदीगृहात
पहारेकरी साखर झोपेत
झाली माता यशोदा प्रसूत
उघडली दारे घडले अवचित
बाळा जो जो रे.......

तान्हुल्या बाळाला ठेवले टोपलीत
निघाला वासुदेव भर पावसात
ठेवला पाय यमुना नदीत...... 
डोक्यावर बाळाच्या शेषनाग छत 
बाळा जो जो रे..... 

पोहोचला गोकुळी नंदाच्या घरी 
बाळास केले त्याच्या हवाली 
बाळाच्या रुपात देव अवतारी
प्रभूचीच लीला वाटते भारी 
बाळा जो जो रे...... 

माता यशोदेला आनंद झाला 
गोप गोपिकांचा मेळा जमला 
न्हाऊ घालती गोपिका बाळाला 
बघूनी हर्ष होई बाळंतिणीला 
बाळा जो जो रे......... 

रेशमी वस्त्र बाळाला घातले 
पाळण्याला  फुलांनी सजवले 
पळण्यात घालून कृष्ण नाव ठेवले 
गोप गोपिका धुंद होऊन नाचले 
बाळा जो जो रे........ 

लोण्याची चोरी करे खट्याळ 
तोंड उघडता दिसले ब्रह्मांड 
कालियाचा हा मर्दनकाळ 
आनंदी झाला सारा गोकुळ 
बाळा जो जो रे.......... 

कृष्णाने केल्या अद्भुत बाललीला 
गोपिकांसवे केल्या रासलीला 
बासरीने मोहून टाकले राधाला 
प्रेमाचे उदाहरण दिले जगाला
 बाळा जो जो रे....... 

*सौ स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/12, 7:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *कृष्णाचा पाळणा*

बंदी गृहात जन्म हा झाला
गोकुळात कान्हा राजा आला
देवकी मातेला आनंद झाला
जो जो रे बाळा जो

पुतणा राक्षसीण गेली मारण्याला
कान्हाला मारण्याचा डाव रचला
कान्हाच्या जीवावर मामा उठला
जो जो रे बाळा जो

गोकुळात आनंद झाला
वसुदेवाने कृष्ण टोपलीत नेला
यमुनेचे पाणी टेकले पायाला
जो जो रे बाळा जो

गोपगोपीका रांगोळ्या काढी
तोरण पताका दाराला लावी
नंद वाड्यात आनंद होई
जो जो रे बाळा जो

यमुने तीरी वाजवी बासरी
सावळ्या कानाची मूर्ती साजरी
पेंद्या संगे राहून खोड्या हा करी
जो जो रे बाळा जो

        ‌.            नंदा भोयर
[8/12, 7:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कृष्णाचा पाळणा

चांदणं चांदणं झाली रात
लोभस कृष्णाला घाला ग पाळण्यात ।।
गोकुळचा सोनार बोलवा ग 
कडे नी अंगठ्या घडवा ग
खेळेल खेळेल
घरभर धावत जाईल ग
माझ्या कृष्णाला घाला ग पाळण्यात ।।

मथुरेचा शिंपी बोलवा ग
अंगडे ,टोपरे शिवू या ग
मनोहर हा दिसेल
राजबिंडा कृष्ण हसेल
लोभस कृष्णाला घाला ग पाळण्यात ।।

यशोदेचा लाल तू शोभशील र
माठातलं लोणी खाशील र
गोपिकांच्या खोड्या करशील 
मडके त्यांचे फोडशील र
लोभस कृष्णाला घाला ग पाळण्यात ।।

मैत्रीच्या राज्यात वाढेल
गोपिकांच्या खोड्या करेल
प्रितं न्याहालित राहील
राधे वर प्रेम भारी करेल 
लोभस कृष्णाला घाला ग पाळण्यात ।।

अन्यायाचा अंधार काढशील र
सत्याचा प्रकाश पाडशील र
अधिपत्य तुझेच राहील
सारी सृष्टी तुझ्याचरणी नमेल
लोभस कृष्णाला घाला ग  पाळण्यात ।।
       मंगला डहाके, भंडारा
[8/12, 7:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कृष्णाचा पाळणा (स्वरचित)
******************************
मथुरेमध्ये बाळ जन्मला
रक्षक तो झोपी गेला
वसुदेव देवकीला आनंद झाला 
              जो बाळा जो जो रे जो
नंदा घरी नेण्याचा विचार केला
टोपलीमधे ठेवले त्याला
बाळाला घेऊन वसुदेव निघाला
               जो बाळा जो जो रे जो
यमुनेचा जलस्त्रोत वाढला
बाप मन तो भयभीत झाला
तेव्हा शेषाने चवरच धरिला
                जो बाळा जो जो रे जो
बाळाचा पाय जले स्पर्श केला
नदीचा प्रवाह क्षणात स्थिरला 
गोकुळामधे बाळकृष्ण आला
                 जो बाळा जो जो रे जो
नंदा घरी देव अवतरले
यशोदेचे मन बहरून आले
नाव तयाचे कृष्ण कन्हैया ठेवले
                जो बाळा जो जो रे जो

सौ. वीणा द. अतकरी, नागपूर
[8/12, 7:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कृष्णाचा पाळणा
मथुरेच्या बंदीगृहात
मध्यरात्रीस कृष्ण जन्मले
बंदीगृहाचे शिपाई गाढ झोपले
सारे कुलुप तुटुन पडले. जो बाळा जो जो रे जो

नंदाघरी नेण्याचा विचार केला
टोपलीमधे ठेविले त्याला
बाळाला घेऊन वासुदेव निघाला 
जो बाळा जोजो रे जो.


पाहुनी बाळा खुश ती होई
आनंदीआनंद चोहीकडे
गवळणी सार्या जमा भोवती
जो बाळा जो जो रे जो.


बासरीचा सुर आकाशी घुमला
फुलांनी बाळाचा पाळणा सजला
सृष्टी सारी आज हर्षित झाली
जो बाळा जोजो रे जो....

सौ.सुषमा पडोळे भंडारा
[8/12, 7:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कृष्ण पाळणा---

सावळा बाळ जनमाला आला
वासुदेव ने नदी पार नेले 
देवकी ला दुःख फार झाले 
जो बाळा जो जो रे जो ।।

गोकुळात आनंद झाला 
यशोदेने पालन केले 
नाव बाळा चे कृष्णा ठेवले
जो बाळा जो जो रे जो ।।

दही ,दूध कृष्णाला फार आवडे गोपिका संग खेळ रंगवे 
दाखवि लीला आपल्या अपार
जो बाळा जो जो रे जो ।।

बासरी ने सारे तल्लीन होई
राधा भेटण्या आतुर झाली
कृष्णयाच्या  प्रेमात वेडी ही झाली  
जो बाळा जो जो रे जो ।।

            पुनम डहाके
                 भंडारा
[8/12, 7:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कृष्णाचा पाळणा

देवकी माता प्रसुत झाली
क्रिष्णा बाळाचा जन्म झाला
आनंद आनंद चोहीकडे
देवांनी फुलांचा वर्षाव केला
जो जो बाळा,जो जो रे कृष्णा

कारागृहाच्या शृंखला तुटल्या
वासुदेवाने बाळास धरले
यमुना नदीच्या पात्रातून नेले
कालीयाने छत्र बाळावर धरलै
जो जो बाळा,जो जो रे कृष्णा

बाळ गोकुळात आला नंदाच्या घरी
नंदाने यशोदेच्या कुशीत दिला
गोकुळात आनंद भारी
सनया चौघडा वाजल्या दारी
जो जो बाळा,जो जो रे कृष्णा

हलवाई, शिंपी, लोहार, सोनार
गोकुळात जमले सारे
बाळाचं बारसाची तयारी झाली
फुले,तोरणांनी घर ग सजले
जो जो बाळा, जो जो रे कृष्णा

बाळ दिसते लोभस राजबिंड
यशोदेने टाकले पाळण्यात
घुगरा टाकुनी, कृष्ण नाव ठेवले
आनंद झाला त्रैलोक्यत भारी
जो जो बाळा,जो जो रे कृष्णा...
सौ.माधुरी भुते
[8/12, 7:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹कृष्णाचा पाळणा 🌹

पहिल्या दिवशी 
देवकीला कळा
तुरुंगात जन्मला कृष्ण सावळा
बाळा जो जो रे जो......

  दुसरया दिवशी
   नंदासी आनंद
कृष्ण झोपला पाळण्यात
बाळा जो जो रे जो............

    तिसरया दिवशी
   बाळाच्या खोड्या
 माता यशोदा करते शिक्षा
 बाळा जो जो रे जो...........

      चौथ्या  दिवशी
 बाळ मारीतो उड्या
 कालीया नागाचा तुटला फणा
 बाळा जो जो रे जो..............

     पाचव्या दिवशी 
    दुध,लोणी चोरीतो कृष्ण
   माता यशोदेचा लटका राग
    बाळा जो जो रे जो............

       सहाव्या दिवशी
   कृष्ण उचली गोर्वधन
 सारा गोकुळ पेली करंगळीवर
     बाळा जो जो रे जो.............

       सातव्या दिवशी
  कृष्ण वाजवितो बासुरी
  राधा होते कावरी बावरी
   बाळा जो जो रे जो............

      आठव्या दिवशी
कृष्ण रुक्मिणीसी हरी
र-वयंवर झाले ,आनंद भारी
बाळा जो जो रे जो..........

  नवव्या  दिवशी
 कृष्ण पुरवितो वस्त्र
दौपदीसाठी खेळले युद्ध
बाळा जो जो रे जो..............

दहाव्या दिवशी
 कृष्णलिलेचे गाणे
देहभान विसरून गाती सारे
 बाळा जो जो रे जो................

    अकराव्या  दिवशी
     सजविती आरास
     कृष्ण येईल घरा
    बाळा जो जो रे जो............

     बाराव्या दिवशी
दहीहंडी बांधली दारी
कृष्ण गोपालकाला करी
बाळा जो जो रे जो................

                   सौ जयश्री रेहपाडे
                        नागपुर.
[8/12, 7:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺पाळणा🌺।।

देवकी घरी जन्मला तान्हा
नाव ठेविले गोपाल कान्हा जो बाळा....जो... रे..जो..।।

आनंद झाला सार्‍या सखींना
करुन शृगांर हलवी पाळणा जो..बाळा...जो..रे.. जो..

नंदाच्या घरी बारस झाल
सार नगर धावून आल जो...बाळा..जो..रे..जो..

देवकामाई वाटे हो वान
वान तो घ्यावा पदर पसरुन जो..बाळा...जो..रे..जो..

पाचा वानाच्या घुगर्‍या केल्या
गौळणी सगळ्या धावून आल्या जो...बाळा...जो..रे..जो..

बाळ तान्हुला पाळण्यात साजे
नाव ठेविले मुरलिधर राजे जो..बाळा..जो..रे..जो..

माहीत होई कंस मामाला
चैन पडेना त्याच्या जिवाला जो.. बाळा.. जो..रे..जो...
🍬🍬🍬🍬🍬🌹🌹🌹🌹🌹🍭🍭🍭🍭🍭🍭🍭पाळण्याखालचे चाॅकलेट खा.
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
१२|८|२०२०.
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

      ""संस्कारधारा""  (२९)

भिती कोरोणाची नाही राहीली
रस्त्यानं चालता गर्दी दिसली
वाटते परिस्थितीला लोक कंटाळले
पोटाच्या आटापिटीनं धावत सुटले.

दनाअ, नागपूर
दि.१३/०८/२०२०
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.४२*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संत श्री गजानन महाराज*
*चमत्कार दावा घालवा महामारी*
*आपण कल्पतरू आणि चिंतामणी*
*आपण थोर सर्वदा कृपा करीं*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺प्रभात पुष्प 🌺।।५७.

*  रानमाळी फुलली फुले *
*  सुगंध दरवळला चौफेर *
*  करावी जंगल सफर *
*  पहावा डोळेभरुन हिरवामोहर*

सौ.कमल सार्वे भंडारा.
१३|८|२०२०.
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

गुरुपदीचे नित्य स्मरण
धाव घेते शेगावी हे मन
देखुनी मुर्ती गजाननाची
प्रचिती येई त्यांच्या असण्याची

सौ.प्रतिभा वाठ (गरबडे)
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.  (८८)

          ""माझे कुलदैवत"" 

कुलदैवत आमचे" माॅ जाखमाता"
तिचे प्रगट स्थळ आहे "श्रीक्षेत्र वग"
नागपूर जिल्हात कुही पंचक्रोशीत
बाल्यावस्थेच्या प्रचीतीची मोठी धग.

अतकरी कुटुंबात पुरातन काळी
जाखी नावाची बालिका आईचे
मागे बाजारास हट्टाने लागली
शेतकामाने हाटाला जाणे उशिराचे.

सायंकाळ समयी आई निघाली
नाही म्हणता ती परतली असावी
आई बाजारातुन घरी परतली
खाऊ खाण्यास जाखी नाही दिसली.

खुप शोधाशोध पंचक्रोशीत झाला
एके रात्री स्वप्न आईला पडला
आई, मी आता निमवृक्षा खाली
गुप्तकाळ झाली न् शोधावे मजला.

आई मी समस्तांची पुज्यनिय झाली
स्फटिकरूपी अवशेष जाखमातेची
दुर रस्त्यांवरून भारी चमकु लागली
तवपासुनी "कुलस्वामीनी"रूपे अवतरली.

दरवर्षी चैत्रपौर्णीमेला यात्रा भरते
दोन दिवस भाविकांची रिघ लागते
सांगती सुखदुःख,जावळ काढती
मुरमुरे फुटाण्याचा प्रसाद वाटती.

दनाअ, नागपूर
दि.१३/०८/२०२०
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के. सा.संघ प.

    🌹🌹पहाटवारा🌹🌹(०७)


श्री दत्तगुरु चे स्थान
गाणगापूर हे ठिकाण
भक्त येती आवर्जून
श्री गुरु दर्शन घेण्याशी.
  
   सौ.वीणा द.अतकरी. 
               नागपूर
दी.१३/०८/२०२०
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ||  माझे कुलदैवत  ||

झंझाड धांडे भुतेंचे कुलदैवत
श्रीभवानी माता तीर्थ देवमुंढरीत
नागपुरातिल मौदा तालुक्यात
मुर्तिचि स्थापना अठराशे दहात

चैत्र महिन्यात भरी यात्रा
घट दर्शना भक्त नवरात्रिला
नवरात्रीची आरास शोभे मातेला
नवमीला घटविसर्जन प्रसादकाला

महालक्ष्मी महाकाली महासरस्वती
मंदिरात भवानीच्या तीन मूर्ति
नवीन जोडपे दर्शना जाती
गोचि जावळ नवस फेडिति

तीन परिवाराच्या तीन मुली
भाऊ सागर जमुना,गंगा,काशी
खेळत जंगलात निघुन जाती
देवमुंढरीचा इतिहास सांगती

रात्र झाली पण घरी न आली
सर्वांची मग शोधाशोध सुरुझाली
लाकुड तोडयाला दिसला सांगाडा
विहिरीत वास तीन फुलांचा

माय बापांच्या येई सपना
तळयाच्या पाळीवर सुखी आहोना
गावकरी मंडळी सोबत घेऊन
वेळुच्या झुडुपात पाहति जावुन

रक्ताच्या धारा तीन ठिकाणी
तिथून आले कोम्बे फुटोनि
आम्ही इथेच आहो निघे ध्वनि
सेवा करा रक्षण करू म्हणोनि

झंझाड धांडे भुते परिवाराच्या पोरी
म्हणुन ते आपसी सोयरीक नकरी

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *माझे कुलदैवत*
*************************
 चार पांडवांचे थोरले बंधू 
*युधिष्ठिर* माझे कुलदैवत 
धर्माचे सदैव पालन करत 
धर्मराया त्यांना म्हणत.....

भंडारा जिल्ह्यात पिंपळगाव 
पवित्र वैनगंगा काठावरी.....
मंदिर धर्मरायाचे वसलेले..... 
दर्शन घ्यावे वर्षातून एकदातरी 

मुर्ती नसे मंदिरात....... 
झार्‍या, कमंडलूची वर्दी 
रामनवमीच्या पावन दिवशी 
यात्रेला भक्तांची दिसे गर्दी 

स्नान करून प्रात: संध्या
पुजा आरती करायची 
कष्ट न येती आयुष्यात 
स्तुती यांची गायची....... 

*सौ स्वाती सेलोकर* 
*भंडारा*
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझे कुलदैवत

माझ्या  सासरचे कुलदैवत
असे  गंगामाई देवी
तिचे प्रगटस्थळ जवराबोडी
नागपूर जिल्ह्यात  भिवापुर तालुक्यातमधी....

भरते तिथे यात्रा
नवरात्र चैत्रात
येणार्या जाणाऱ्याची गर्दी फार
भक्तगण आरती पुजा करतात आत.....

पूर्वी  होत स्थळ तिचं मोडकंतोडकं
छोट्याशा जागी
असे उघडबोडखं
आता झालं  तिथं मंदिर  नेटकं.....


जातात तिथे भार नवस काढाया
नवरात्रातील नवनविन देव्यारुप बघाया
लग्न  झाल्यावरी जोडपे जाती आशिर्वाद मागाया
कुणी जाती तिथे नवस फैडाया....

सौ.सुषमा एस पडोळे खात रोड भंडारा
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺सार्वेंचे कुलदैवत🌺।।

धनाबाई,साखराबाई,केतरपान
ठाकूरबान,खेळेखोळबान
पुजितो आम्ही लग्नात
कुलदैवतअसे आमुची शान।।

माही,शिमगा,रक्षाबंधन,
आषाढी,दिपपुजा करीतो पुजन
पुर्‍या, वडे,दिवे,करंज्या,तांदूळ
मूठपुजा मांडूनी देतो आमंत्रण।।

गुजेंपार(जाख)भंडारा येथे
सार्वे परिवाराचे देवस्थान
प्रथम लग्नकार्य पत्रिका
देऊन देतो पुजा निमंत्रण।।

साधे,भोळे कुलदैवत आमुचे
नाहीच रुसवे,फुगवे 
धन,धान्य,सुखसमृद्धी देई आम्हा
तया आर्शिवादे आहेच सगळे बरवे।।

सौ.के.बी.सार्वे भंडारा.
१३|८|२०२०.
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय -माझे कुलदैवत*

बोंद्रे कुटुंबीयांचे कुलदैवत
गायमुखचे शंकर भगवान
भंडारा जिल्ह्यातील गाव
निसर्गाच्या सानिध्यात देवस्थान

सभोवताली पर्वत रांगा
आंब्याच्या बागा छान
दूरदूर चे भक्त येती
घेऊन बेलाचे पान

गायीच्या मुखातून वाहतं
निर्मळ, स्वच्छ, जल निरंतर
तिर्थाचा लाभ घेतात भक्त
करतात अभिषेक लिंगावर

महाशिवरात्रीचा उत्सव
भव्य दिव्य जत्रा भरते
स्वयंपाक घेऊन जन येती
दर्शना मोठ्या रांगा लागते

शिवाची भव्य मूर्ति आहे
पारणे नजरेचे फिटते
नमन करून शिवाला
भय जीवनातील मिटते

*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 💐माझे कुलदैवत 💐
 
वैनगंगेतिरी असे गाव मांडवी
तेथे वसते माझी माय भवानी
रेहपाडे कुलाची स्वामिनी
नमन तुला माते भवानी............

चैत्र पौर्णिमेला भक्त येती मंदीरी
  घेवुन शिधा ,नवस सामुग्री
फुलतो परीसर तुझ्या भक्तीने
 भक्त नाचतो घेवुन दिवटी आनंदाने....

भरती महिला आईची ओटी
साडी चोळी ,नारळ अर्पुणी
आरती ,गोंधळ ,भजने गाती
मातेला प्रसन्न करण्या साठी.............

 घेऊन दिवटी हाती भक्त
 मागतो घरोघरी जोगवा
 उदोउदो करीत गर्जना
 देते आशिर्वाद प्रसन्न होवून माता.........

 सोडती उपवास भक्त आईच्या दारी
 पंगती वर पंगती पडती मंदिरापुढती
 तृप्त होई भक्त आईच्या अंगणी
 समाधानी वृती घेवुनी परते आपलया
  ग्रामी.....

                सौ जयश्री रेहपाडे
                       नागपुर.
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझे कुलदैवत---

माझे कुलदैवत
 आहे वाघोबा देव
आंभोरा तीर्थक्षेत्र जवळी
वसले हे अडेगाव ।।

वेलतूर वरुनी
5 की.मी.अंतरावर
अडेगाव छोटेसे गाव
वाघोबा वसले शिवारा बाहेर ।।

आडेगाव च्या बाहेर
स्थापत्य हे पवित्र मंदिर
डौलदार असे सभागृह
 दाद बाजी शोभे सुंदर ।।

माही मासात, जावळ काढण्या
मुलांचे,करून साष्टांग नमन
विवाह कार्यप्रसंगी प्रथम
पत्रिकेचा, वाघोबा यांचा मान ।।

भक्तिभावाने करतो पूजा
ओटी ,फुले,  आरती, नैवद्य,अर्पून
मनी आभाळाची श्रद्धा
येतो शांती, समाधानाची प्रत घेऊन।।
----------------------------------------
       मंगला डहाके, भंडारा
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *कुलदैवत माझे*

आमचे कुलदैवत
तुळजापूरची भवानी
काळीशार मूर्ती
दिसे कशी शोभूनी

हिरवी साडी
लाल चुडा
तोंडामध्ये
पानाचा विडा

नवसाला पावणारी आई
भवानी माझी माई
नेहमीच आमच्या हाकेला
धाव घेई

दृढ विश्वास तिच्या ठाई
मंगल प्रसंगी पूजा तिची होई
नवरात्रात नऊ दिवस
अखण्ड ज्योति संगे तिचा गजर होई
अशी आमची कुलस्वामिनी तुळजापूरची भवानी आई

                 सौ नंदा अनिल भोयर
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बा. कु. सा. सं. प.
---"माझे कुल दैवत"---

जाखमाता आमुचे कुल दैवत
श्रीक्षेत्र वग हे तिचे मुळगाव
कुही तालुका नागपूर जिल्ह्यात
प्रगट झाली बाल वयात.

अतकरी कुटुंबाची ती मुलगी
 मायच्या मागे बाजारा निघाली
 मागे मागे जातां गुप्त ती झाली
 आईला वाटले घरीच राहिली.

हाटावरून  ती घरी परतली
मुलगी तिला घरी न दिसली
इकडे तिकडे मग शोधू लागली
स्वप्नात दृष्टांत दिला येवूनी.

कडुनिंबा खाली माझे निवास स्थान
येऊन बघावे त्या स्थळी आपण
अशी आमची कुलदेवी छान
प्रसाद पावन मुरमुरे फुटाणं.

चैत्र पौर्णिमेला असे सोहळा छान
भक्त दर्शनाला येती लांबलांबून 
दोन दिस जाती विसरून भान
भक्त निघती गावा जड पवलान.

          🌺जय माॅ जाखमाता🌺

सौ.वीणा द.अतकरी,नागपूर.
दि.१३/०८/२०२०
[8/13, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कुलदैवत

कुही तालुक्यात
वाठ कुटुंबियांचे 
कुलदैवत असे वाघोबा
दरवर्षी पूजेसाठी 
एकदा तरी जावे दर्शना

होळी, गुरुपौर्णिमा, दिवाळी
कुलदैवतेचे पूजा संपन्न
होत असे कुटुंबी

कुलदैवत रक्षण करिते
कुळाचे आपुले
सुखसौख्य स्थैर्यासाठी 
कुळाचार अचूक ते पाळावे

                                      सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                      खामगाव.जि.बुलडाणा
                                      दि.13.08.2020
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺प्रभात पुष्प 🌺।।५८.

*  पक्षि किलबिल  *
*  मधूर आर्जव  *
*  करी गंधारव  *
*    आसमंती  *

सौ.कमल सार्वे भंडारा.
१४|८|२०२०.
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

      ""संस्कारधारा""   (३०)

महामारीनं लोक भयभीत झाले
दावे प्रतिदावे लस शोधल्याचे
पेटंट मिळविण्या भांडू लागले
तमा न् मरणाची,व्यापारास धजले.

दनाअ, नागपूर
दि.१४/०८/२०२०
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.३७
रवि किरणांची आरास
वाढे मनाचा उल्हास
सन्मार्ग,सदाचार,संयम
दे दयाघना सकलास.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌸 पहाटवारा 🌸(८)

दिवसाला साथ सूर्याची
रात्रीला साथ चंद्राची
समुद्राला साथ लाटांची
संसाराला साथ ईश्वराची.

   सौ. वीणा द. अतकरी, नागपूर.
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: झर झर बरसती धारा
अंगी झोंबे वारा
घरातच मी
मन माय सैरावैरा
             
              नंदा भोयर
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

मेघ दाटले
बरसल्या धारा
पक्षी ओले
शोधती निवारा

सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा .सं.प.
विषय..हास्य कविता. (८९)

     ---गेलो पोरगी पाहाले---

नोकरीत बाहेर गावी असतानी
मित्रासाठी गेलो पोरगी पाहाले
वरपोरासह आम्ही जिवाचे दोघं
मोटारसायकलनं पोरीचे गावाले.

पोरींचे बापानं स्वागत केलं
सर्व मंडळी जमली बैठकीलं
उपवर मुलीनं चहापाणी केला
प्रश्नोत्तराचा भाग सुरू झाला.

आम्ही एकाला अधिकार दिला
पोरीला नावगांव भाऊ बहिण
विचारलं "आहे किती वडिल "?
मुलगी म्हणाली एकच आहे जी.

तालासुरात दादा विचारून घेतलं
कुणाच्याही लक्षात नाही आलं
थोड्या वेळात आमच्या गड्याला
समजलं, तवा काढता पाय घेतलं.

बरं झालं राजेहो कसहीआटोपलं 
नाही तर बेइज्जती असती झाली
तरीही लग्न होऊन पोरगी आली
प्रसंग काढे तवा पोरगीही हसली.

दनाअ, नागपूर
दि.१४/०८/२०२०
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सामाजिक रचना
माझ्या भारत देशात

अनेक धर्म,जाती,पंथ
नांदती गुण्यागोविंदात
प्रेमभाव सर्वांठायी वसे
माझ्या भारत देशात.

हिरवी राने डोंगर,पर्वत
खळखळ निर्झर नद्यात
रंगीत सुमने, फुलपाखरे
माझ्या भारत देशात.

तिरंग्याची शान राखती
गोळ्या झेलीत छातीत
बलीदानस नित तत्पर
माझ्या भारत देशात.

एकता अभंग नांदते
येथे अगणित हृदयात
प्रेम‌ जिव्हाळा स्फुरतो
माझ्या भारत देशात.

थोर महात्म्यांचे बोल
मार्गदर्शन ते जीवनात
थोरामोठ्यांचे आदर
माझ्या भारत देशात.

हुतात्म्यांचे बलीदान
साठवून हृदयात
संस्कार रुजते नसानसांत
माझ्या भारत देशात

सौ.मीरा शेबे भंडारा
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
~~~~~~~~~~~~~~~
         *शाळेतील गंमत*
***********************
मस्त होती ती शाळा
आणि मस्त त्या मैत्रिणी
पुन्हा ते सोनेरी दिवस
आणून देतील का कुणी..

शाळेत एकदा मजाच झाली
जीवशास्त्राचा तास सुरू झाला 
पुस्तकात होते कोंबडीचे चित्र
पाणी सुटले मैत्रिणीच्या तोंडाला

खाण्याच्या गोष्टी सुरू झाल्या
आमचे लक्ष होते खाण्यात...
मैत्रिणीने हळूच डबा उघडला
मी ही डोकावले हळूच डब्यात

बाई आल्या जवळ आमच्या... 
चष्म्यातून बघू लागल्या आम्हाला
डबा बंद करण्याच्या नादात 
दोघींचे डोके आपटले बाकाला 

डबा तिचा खाली पडला.... 
सांडली सगळी पोळी - भाजी 
अभ्यासाच्या वेळी डबा उघडला
फजिती झाली होती आमची 

*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पोरगी पावलं 

एक गण दादा, पोरगी पावले गेलो 
सूट बूट घालून किरीम थोबडयाले चोपडलो 

दोस्ताले माह्या संग घेऊन गेलो 
गुमान खुर्चीवर जाऊन बसलो 
पोरीच्या बापाच्या काकड मिशा 
पाहूनच दादा, थरार कापले लागलो !!1!! एक गण दादा 

तिकून आली पोरगी, घेऊन सन च्याया 
हळूच मनते कसी घे ना गा भय्या 
पाहूनच ठेवलो मी आधीच सैया 
ऐकून पार जागीच गारद झालॊ!!2!! एक गन दादा 

दोस्ताले मनलो चाल आता जाऊ 
ते मनते कसी पाणी तरी पे ना रे भाऊ 
राखीचा कार्यक्रम उरकूनच घेऊ
 मनातल्या मनात चरफडू लागलो !!3!! एक गन दादा 

दोस्त मने पावले गेलो वयनी 
पर झालोन आता भाऊ न बहिनी 
नाराज होऊ नोको दोस्ता सुरु ठेऊन पोरी पायनी 
सबद तोंडातुन फुटेना गुमान चालू लागलो !!4!! एक गन दादा 

रंजना हलमारे साकोली
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्यकविता---
  
पाचवीत मी गेली
शाळा भली मोठी
पाहून घाम फुटे
पोरी खेळे गोटी ।।

 मागची रमी
झोपूनच गेली
बाईन जवळ येऊन
छडीच वाजवली ।।

बाईंनी विचारलं
ताजमहाल कोणी बांधला
 रमी बोलली, नाव नाही मालूम 
पण बेलदारान बांधला ।।

कुतुब मिनार उंच
किती आहे सांगा
माझ्यापेक्षा तर उंच असल
रमिच बोलली बघा ।।

पेरू वाली बाई अन  मुलगा
शाळेबाहेर बसायचे
गर्दित पैसे न देताच
पेरू घेऊन पळायचे ।।

म्हंटल घेऊन पहाते मी
घेतला पेरू पळाली जोरात
मागे धावून पेरू वाली ने
केस पकडले घेरात ।।

आताही ती फजिती आठवली
तर खूप हसायला येते
एकटीच कधीकधी
गालातल्या गालात हसते ।।
-----------------------------------
      मंगला डहाके, भंडारा
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*

राधी संग मी बजारात गेली
सारा दिवस फिरून थकून बाई गेली
एक दुकान नाही सोडल सार घेतलं फिरून
भल्यामोठ्या झोऱ्यात बजार आणला भरून

धनी मने सकाय पासुन बाजारात तु गेली
संडले संडले वांगे घरी घेऊन आली
काय सांगू या राधीची गंमत
काहीच नाही घे ये नुसती ईचारे
 किंमत

एक दुकान नाही सोडलं पालथा घातला बजार
तिच्या मांग फिरून फिरून मी झाली बेजार
चोट्टी मोठी राधी झोरे भरले चार
म्या म्हणल राधे.खाऊ आपुण मार
मले म्हणे तू जास्त नको बोलू
उगे मुगे झोऱ्यात टाकत जाय आलू

मंग गेलो आम्ही चपलीच्या दुकानात
राधीच्या तीथ भलतच आलंन मनात
दादा म्हणेआम्हाले चपला दाखवा चांगल्या
अर्ध्या परर्ध्या राधीन झोर्‍यातच कोंबल्या
म्या म्हनलं राधे लय झाली बाई
घरी जायची आता कर बरं घाई
याच्यापुढ मी बजारात कवाच नाही गेली
या राधीन मले बाई अद्दलच घडवली

                  नंदा भोयर
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
*शाळेतील मज्जा*

कन्या शाळेमध्ये 
झाली माझे शिक्षण 
मौज-मजा अभ्यास 
रमत असे मस्त मन 

मुख्याध्यापिका आमच्या 
होत्या फारच कडक 
गणवेश नीट नसला 
की बदलायच्या तडक 

भूगोलाचा मला येई कंटाळा 
पुस्तक नाही म्हणून केला बहाना 
गुरुजींनी उभे केले वर्गाच्या बाहेर
मजा वाटली बाहेर असताना

 मुख्याध्यापिका आल्या 
घेऊन हातात छडी 
विचारपूस झाली 
आता कठीण घडी
 
गुरुजींची शिक्षा सोपी
बाईने दिला छडीने प्रसाद 
खोटं बोलण्याची शिक्षा 
पडली फार महाग

 सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्यकविता

पिक्चरमधला हिरो पाहून वाटते मले हेवा
मनाशीच मनतो माया नवरा,
असा काहून नाई देवा?
नवऱ्याले म्हणलं,
हिरो-हिरोईन सारख गुलुगुलु बोलावं,
गाडीवर बसून फिराले दूर-दूर जावाव.
नवरा माया कंजूस म्हणते कसा,
घरात बस उगी लाडावू नको जास्त,
फिराले जाले पेट्रोल नाही स्वस्त.
कधी वाटते नवऱ्यान,
 उचलून मले गोल-गोल फिरवाव,
नवरा म्हणे,तोल गेला तुया वजनान,
त का फ्रॅक्चर होऊन बसावं?
कधी म्हणावं,
हिरो सारख बायकोले आणावं सरप्राईज गिफ्ट
नवरा म्हंते ,करून आणतो दुसरी साजरी,देतो तुले गिफ्ट
सांगा बाई नवऱ्याला हौस-मौज नाई,
पिक्चरसारखा हिरो नवरा मले भेटला काऊन नाई.

                                      सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                      खामगाव.जि.बुलडाणा
                                      दि.14.08.2020
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता..
   नाद खुळा..
***************
हरपले माझे भान,
झाली मी बेभान, 
काय करावे सुचेना, 
फक्त लिहावंसं वाटतं छान छान।
लिहिण्याचं नादात राहून गेलं 
                       घरकाम।।

घड्याळात वाजले बारा,
सासू बाईचा चढला पारा,
बेडरूम मधून नवरा बघतो,डोळे 
                          वटारून,
मी हळूच बघितलं मागे वळून।
 

म्हणाले आज मिळेल काय खायला भाजी पोळी,
मी म्हणाले थांबा हो थोडं,
पूर्ण करू दया या दोन ओळी।


अशी आहे माझी लिहिण्याची,
   मज्जाच न्यारी,
राव म्हणतात खरच 
आहेस ग तू लय भारी।

म्हंटल काम घेतलं ,
लिहिण्याचं हाती,
छंद जोपासून सांभाडेन,
संसार आणि नाती।।

Sangita S. Jadhao
    Bhandara
[8/14, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
*************
एक दिस सखीनं बोलावलं जेवाले
पोराबारा सकट आवतन चुलिले
रातचे सात वाजले जाऊन पाहु
लागन मदत त तिले करून देऊ

आम्ही दोघी गेलो तिच्या घरी
जावुन पायतो कोणी नसे दारी
दार ढकल्ला सासू दिसलि सोफ्यात
आवतन देणारी दिसे ना घरात

गप्पा गोष्टी केल्या बसबस झालो
सयपाक घरात डोकावुन पायलो
आवाज देत गेलो बेडरूम मंधि
आरामात पांघरुन झोपलि होती

कावुन झोपलि इचारलं तिले
डोस्क दुखते मने पूरण ढिले
उलट्याचा सिदा आमी त्याले केला
तवा तिचा जिवात जीव आला

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏

     ""संस्कारधारा""   (३१)

ध्येय स्वतंत्र भारत देशाचे
विकासाची भरारी घेण्याचे
ना भेदभाव,भ्रष्टाचाराचे
लोकशाहीचे मुल्ये रूजवायचे.
 
दनाअ,ना
दि.१५/०८/२०२०
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🇮🇳  भारतमाता  🇮🇳
महान भारतमाता आमुची;गातो तीचेच गाणे
पुलकीत रोम होई...त्या एकेक आठवाने..!!                     
                                                     
धन्य झालो आम्ही; ही लाभली जन्मभूमी
गांधी-सुभाष-भगतसिंगाची; ही थोर कर्मभूमी
इंच-इंच भू लढविली;आमुच्या एकेक सैनिकाने
पुलकित रोम होई...त्या एकेक आठवाने..!!                      
                                    
स्थापीले हिंदवी राज्य; ते थोर शिवाजी राजे
ग्यानराया रचिला पाया; तुका क ळस साजे
सारथी होऊन धर्म पाळला; क्रुष्ण माधवाने
पुलकित रोम होई...त्या एकेक आठवाने...!!                             

"मेरी झाँशी नही दुँगी" गरजली लक्ष्मी राणी
जीजाई अन् अहिल्येची आगळी एक कहाणी
अशा कित्येक वीरबाला लढल्या प्राणपणाने
पुलकित रोम होई...त्या एकेक आठवाने...!!                   

    तर्फे:- राजीव बुध्दे मांढळ...🙏🙏🙏🙏🙏
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.४३*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*उगवली स्वातंत्र्यदिनाची पहाट*
*स्मरण होते स्वातंत्र्यलढ्याचे आज*
*करू अमर हुतात्म्यांचा सन्मान*
*फडकवू तिरंगा करू फुलांचा साज*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वातंत्र्याची नवी पहाट
आनंद मनी आज
ज्यांनी बलिदान दिले देशासाठी
त्यांना शतशः प्रणाम

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  
                  
               नंदा भोयर
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🇳🇪🇳🇪🇳🇪
स्वातंत्र्य भारताचे स्वप्न साकारले।स्वच्छ सुंदर भारत,जगी आकारले।
झेप घेतली आकाशात
चंद्र तारेही लाजले।
अस्ञशस्ञाने जगात गाजले।थनधान्याने
देशाची कोठार भरली।धनवान बलवान देश माझा आज करीतो
साजिरा स्वातंत्र्याचा सोहळा।त्या सोहळ्यास
करोनाचे ग्रहण लागले।
सोहळ्यासाठी न मुलेबाळे
ना किलबिल पक्ष्यांची,
सारेच कसे शांत शांत।
तिरंगा हा नभी फडकला,
डौलाने आजही लहरला।
डौलाने आजही लहरला।।
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹|| *अलगुज* ||🌹
*क्र.46*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*तिरंग्याला नमन करून*
*राष्ट्रगीत गाऊया सारे*
*१५ ऑगस्टच्या शुभ दिनी*
*वाहती स्वातंत्र्याचे वारे*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*सौ स्वाती सेलोकर* 
*भंडारा*
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: दाही दिशा ह्या काजळलेल्या 
बघा कश्या उजळल्या 
मंजुळ गुंजन पक्ष्याचे 
स्वातंत्र्याचा सूर नवा
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: किती शुरांनी त्रास घेतला देशा साठी
पहा हसूनी फास घेतला देशा साठी
स्वातंत्र्याची किंमत इतुकी साधी नाही
जगावया वनवास घेतला देशा साठी
       ओमप्रकाश ढोरे
आपणास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हे स्वातंत्र्या 

 हे स्वातंत्र्या तुझ्यासाठी, 
 गेले कितीक शूरवीर बळी
 छातीवर झेलून गोळी
 आयुष्याची केली होळी
 नेत्यांनी आमच्या मात्र
 आपुलीच भरली झोळी- हे स्वातंत्र्या 

हे स्वातंत्र्या, 
 कुठे गेले देश प्रेम
 अन कुठे गेली देशभक्ती
 मायेची सारी आसक्ती
 प्राशुन दीनांची रक्ती 
 मिळविली हो त्यांनी तृप्ती- हे स्वातंत्र्या 

 हे स्वातंत्रया, 
 तुझ्या वाढदिवशी
 का बळीराजा जातो अजून फाशी? 
 का तळमळती निरागस बालके उपाशी? 
 कुणी ओरडे पाणी पाणी
 लाटतो कोणी टाळूवरील लोणी- हे स्वातंत्रया 

 हे स्वातंत्र्यदेवते, 
 खरेच का मुक्त इथली नार
 दिसभर उपसे कष्टाचा डोंगर
 तेव्हाच मिळेल पोटाला भाकर
 तरीही होते वासनेची शिकार- हे स्वातंत्र्य दैवते

रंजना हलमारे साकोली
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🇮🇳आजचा स्वतंत्र भारत🇮🇳

अभिमान भारतीय असल्याचा
विविधतेने नटलेल्या देशाचा
सीमेवरील त्या शुर वीरांचा 
सुख समृद्धी आणि चैतन्याचा.

स्वतंत्र भारत आमचा
सह्याद्रीच्या पर्वत रांगांचा
वेगवेगळ्या वेशभूषेचा
शिवरायांच्या गडकिल्ल्यांचा.

गंगा यमुनेच्या मायेचा
करती वर्षाव अमृताचा
खळखळ प्रवाह तो उत्कर्षाचा
करती जल्लोष तो एकतेचा.

तिरंगा अमुचा तीन रंगांचा
केशरी तो शौर्याचा
पांढरा आहे शांतीचा
हिरवा रंग समृद्धीचा.

अश्या आमच्या भारत देशास
🌺🙏शत शत कोटी प्रणाम🙏🌺

सौ. वीणा द. अतकरी, नागपूर
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आजचा स्वतंत्र भारत*

स्वतंत्र भारत माझा
आहे आम्हा अभिमान त्याचा
सौंदर्याने नटलेला
आहे भारत देश माझा

बलिदान दिले
हुतात्म्यांनी
विसर न पडावा त्यांचा
लाखात एक भारत देश आमचा

स्वतंत्र झालो आम्ही
बलिदानाची दिली कुर्बानी
देशासाठी लढले
स्वातंत्र्य आम्हा मिळाले

बलिदान त्यांचे व्यर्थ न जावो
भारत मातेचा सदा अभिमान राहो
देश माझा बलशाली हो वो
सदैव तिरंगा आमचा फडकत राहो

                   नंदा भोयर
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: दिन आज स्वातंत्र्याचा,
हर्ष- उल्हासचा,
मिळुनी साजरी करूया,
मान ठेवुनी तिरंगेचा
🌸🌸🌸🌸🌸
आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खुप खुप शुभेच्छा🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏

सौ. संगीता कढव, भंडारा
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.  (९०)

  -- आजचा स्वतंत्र भारत--

आजचा स्वतंत्र भारत आहे
हक्काचा अन् समानतेचा
लोकशाहीच्या घट्ट विणीचा
उदयच सर्वांच्या विकासाचा.

स्वातंत्र्यानं संविधान रूजला
स्वातंत्र्य,समता, बंधुतेला
बिजे राज्य घटनेची बनवुन
मागासांना अधिकार मिळाला.

स्वातंत्र्योत्तर नियोजन झाले
पेरकी हमले तिथेच थांबले
उद्योग, व्यापार,निर्यात वाढले
विदेशी चलन मिळू लागले.

मिळाला अधिकार महिलांना
सामाजिक, मानसिक, आर्थिक
विकास होवून सुबता आल्यानं
महिलांचे झाले जिवन सार्थक.

शिक्षणात आले आरक्षण
थांबले इथे शिक्षण भक्षण
आदिवासींत यावी समानता
संविधानाने न्यायाचे रक्षण.

आज स्वतंत्र भारतानं दिलयं
बोलण्या, लिहण्याचा अधिकार
उघडे झाले शिक्षणाचे दार
आलीयं स्वतंत्र भारताला धार

दनाअ, नागपूर
दि.१५/०८/२०२०
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: तिरंगा शान है इसको 
कभी झुकने नहीं देंगे..
 जय हिंद..!
                 - गजानन मते
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गीत  गाऊ भारत मातेचे

मंगल  कार्य  या देशाचे
नाही  आम्ही  सान
आम्ही  तिचे वरदान
अमुचा भारत देश महान....


गुणगौरव भारत मातेचे
विरमरण आलेल्यांचे
गीत गाऊ शूरविरांचे
गाऊ गीत महापुरुषांचे.....


कितीतरी  अजरामर झाले
अनेकथोर रक्तरंजित झाले
गाऊ त्यांच्या  शौर्यगाथा
अनेक थोर विरगती गेले
सोसल्या त्यांनी  अतोनात  व्यथा.....



गीत गाऊ भारत मातेचे
ऐक्याचे नि समृद्धीचे
विविधतेतूनी एकात्मतेचे
सुस्ंकार आणि स्ंस्कृतीचे......


गाऊ गुण देशप्रेमाचे
गीत गाऊ मात्रुभुमीचे
तिरंगी ध्वज तीन रंगाचे 
वरी केशरी मधे पांढरा  खाली हिरवा  रंगाचे ......



केशरी रंग  प्रतिक त्यागाचे
पांढरा रंग  सत्य शांतीचे
प्रतिक हिरवा समृद्धीचे.....

सौ सुषमा एस पडोळे भंडारा
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आजचा स्वतंत्र भारत*
**************************
*आजचा स्वतंत्र भारत*
दिसतो आम्हास नटलेला 
बेड्या तुटल्या पारतंत्र्याच्या
तिरंगा झेंडा फडकला 

क्रांतिकारींनी दिली आहुती 
दिले प्राणांचे बलिदान 
श्रद्धांजली अर्पून त्यांसी 
सारे गाऊ त्यांचे गुणगान 

आजच्या स्वतंत्र भारतात 
शिक्षणात असू पुढे जरी 
विचार सदैव मनात येई 
कुणी बोलेल काहीतरी 

अमाप धन संपत्ती असूनही 
भ्रष्टाचार नसानसात आमच्या 
राजकारणी खातात लोणी 
टाळूवरचे भोळ्या जनतेच्या 

हक्क आमचे मिळाले आम्हास 
योजनाही भरपूर काढल्या...... 
अर्ध्या योजनांचा फायदा आम्हास 
अर्ध्या कागदोपत्री गिळल्या....... 

*सौ स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा स्वतंत्र भारत---

गीत गाऊ भारत मातेचे
संस्कृती देशाची आहे महान
श्रेष्ठ समृद्ध परंपरांना
माझा शतशः प्रणाम ।।

कित्येकांनी स्वातंत्र्यासाठी
पाडीला रक्ताचा सडा
तिरंगा ध्वज फडकवू
ओलावतील हर्षे नयन कडा ।।

सलाम माझा त्या वीरांना
ज्यांनी हा सुवर्ण दिन दाविला
भाग्यशाली माता जिच्यामुळे
सुजलाम सुफलाम देश राहिला ।।

नारी चा सन्मान करून
शिवबानी संबोधले माता
स्वतंत्र भारतात अत्याचार होऊनी
बळी जाती निर्भया, प्रियंका, अंकिता।।

अंधश्रद्धा, भ्रष्टाचाराचा
गंध दरवळत आहे
स्वैराचार अन् स्वार्थापायी
शिक्षण बाजार मांडला आहे ।।

कृषिप्रधान देश हा
शेतकऱ्याचे मुलं उपाशी निजते
स्वतंत्र भारतात लज्जास्पद
माणुसकीच्या बुरख्यात स्वैराचार दिसते ।।

----------------------------------
         मंगला डहाके, भंडारा
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🇮🇳 आजचा स्वतंत्र भारत....                                                    भारत देश अमुचा  दिसतो राष्ट्रीय एकात्मतेने शोभून....                                                  विविध धर्म,भाषा, रितीरिवाज उत्सवाणी नटून-थटून....                                         स्वातंत्र्यासाठी अनेक  हुतात्म्यांनी दिले बलिदान....                                          कधी न विसरू त्यांचे कर्तव्य हे महान.....                            दिला संविधानाने साक्षरता, समता, बंधुतेने जगण्याचा हा स्वाभिमान....                            कितीही परकीय, आतंकी हमले झाले पण त्यांची चिरडली मान....                            स्वातंत्र्याचा तिरंगा फडकत राहो त्याला पाहून वाटतो अभिमान.....                                        ✍️ प्रा. स्वाती सं शिंगणजुडे ( पिंगळे ) अमरावती
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय - आजचा स्वतंत्र भारत*

मी स्वतंत्र झालो इंग्रजांच्या गुलामगिरीतून 
मी स्वतंत्र झालो जातीयतेच्या बंधनातून 

देशातील नागरिक निवडतात आवडीचा व्यवसाय 
अन्यायाला आवाज उठवायला स्वातंत्र्य आज

भ्रष्टाचाराने मात्र ग्रासलेला वाटतो
महिलांचा आवाज दाबलेला दिसतो

अंधश्रद्धेचा वारा बुद्धीच्या वर डोके काढतो 
बाल रोजगार हृदय पिळवटून टाकतो

श्रीमंताचे राज्य गरिबाला कोण पुसणार 
प्रामाणिकपणाचा आज पडला विसर 

हुंडाबळी यांनी घेतला कित्येक बापाचा बळी 
कर्जबाजारी शेतकऱ्यांची दैना कुणा कळी 

माणुसकीला कुठे काळीमा फासला जातो 
कुठे रस्त्यावर महिलांचा अपमान होतो

तेव्हा मला वाटतं मी खरंच स्वतंत्र झालो का
की आज स्वकीयांच्या पारतंत्र्यात ग्रासला गेलो का


*सौ. रुपाली अमोल बोंद्रे,भंडारा*
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्य दिन भाग्याचा
करू साजरा आनंदाने,
स्वातंत्र्याचे वाहता वारे
मना मनात देशभक्ती संचारे.

भारत देश,माझी माता
जखडली होती पारतंत्र्यात,
बलिदानाची देता आहुती
उगवली पहाट स्वातंत्र्याची.

आज स्वातंत्र्याच्या दिनी
आकाशाला घालत गवसणी,
पादाक्रांत करते अवनी
सर्वांग सुंदर दिसे भारतभूमी.

शिक्षण,आरोग्य,विज्ञान
कुठेच कमी न आमचे ज्ञान,
सीमेवरही आमचे बांधव
रक्षण करी देऊन प्राण.

कृषी प्रधान देश माझा
विश्वात देऊ प्रथम स्थान,
स्त्री संस्कृतीची आब राखू
महान भारत आपण घडवू.

तेढ मिटवूया धर्माची
भ्रष्टाचार अन अन्यायाची,
आतंक,दहशतीला ठेचून काढू
स्वातंत्र्य आपले अबाधित राखू.

आत्मनिर्भरतेचा मंत्र नवा
स्वदेशीचा अवलंब हवा,
इतिहास रचण्या सज्ज होऊ
विजयी तिरंगा गगनी फडकवू.

                                      सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                      खामगाव.जि.बुलडाणा
                                      दि.15.08.2020
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वातंत्र्य दिनाचा उपक्रम
गीत गाऊ भारत मातेचे
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
स्वातंत्र्याच्या संग्रामात
    ‌.  किती रक्त सांडले
त्या स्वप्नांचे आज 
        बिभित्स रूप मांडले.
विसर पडले मानवतेचे
   ‌ ‌‌.    विरांच्या बलिदानाचे
मनापासून न उठती उमंग
          गित गाती वरवरचे.
भिडू द्या हृदयाला आकांत
           अन्याय अत्याचाराचे
हो पुढे वाचविण्या प्राण
            त्या लाचार अबलांचे.
ठेचून काढू नांगी 
          दुष्ट नराधमांची
भिती नको स्त्रीला 
        ‌बाहेर जाण्याची.
दे हात मदतीचा
  .  ‌‌  हिन दीन, अनाथांना
योग्य मोबदला मिळू दे
         शेतकरी, श्रमिकांना.
भेदून साऱ्या भिंती
         जातीपाती,धर्माच्या
भ्रष्टाचार,लाचलुचपत
         वाळवी मारू देशाच्या.
परचक्राचे व्यूव्ह भेदून
  ‌‌.       स्वागत केले स्वातंत्र्याचे
अंतर्मनातील किड घालवून
   ‌‌.      गीत गाऊ भारत मातेचे.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा स्वतंत्र भारत देश

प्रिय आमुचा भारत देश महान
तिरंगा फडकवून, राष्ट्रगीत गावून
करतो आम्ही प्रणाम.
पारतंत्र्याच्या  शुंखला तोडून
क्रांतिवीरानी बलीदान देवून
स्वतंत्र केले भारत मातेस
हुतत्मा श्रदधांजली,देवून
करतो आम्ही त्यांना सलाम
विविध धर्माचे,विविध पंथाचे
लोकं नांदती,भारत देशात
आजची स्थिती भारतातली
राजकीय अस्मितेला लागला
भ्रष्टाचाराचा किडा
पक्ष पक्षात,विरोधाभास
हिन दीन लोकांना न मिळती सेवा शेतकरीही तसाच राही,शासनाचा
योजना रहाती कागदो पत्री
शिक्षणक्षेत्र वंचित राही
मानवतेला लागला काळीमा
एकटी स्त्री न राहे सुरक्षित
वासनेला पडती बळी

माधुरी भुते
[8/15, 6:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा स्वतंत्र भारत
*******************

घडविला इतिहास देशाचा
रक्ताच्या प्रत्येक थेंबातुन
सर्व हुतातम्यांच्या बलिदानास
माझे कोटि कोटि नमन

स्वातंत्र्य समता बंधुता
बिजे लोकशाहिचि
आजचा स्वतंत्र भारत
शान आमुच्या देशाची

हक्क कर्तव्य समान संधि
मिळे सर्वांना समान अधिकार
जातपात भेदभाव सोडुनी
सर्व मिळून नांदति एकत्र

पंचवार्षिक योजना राबवुनी
विकास झाला देशाचा
विज्ञानाचि कास धरुनि
मार्ग सुखी समृद्धिचा

हरित क्रांतिचि लाट येवुनि
बहरुन गेली शेती
सुजलाम् सुफलाम् देश झाला
अन्नधान्या ची निर्मिति

क्षेपणास्रे सोडि अंतराळी
दाखवि देशाची शक्ति
मान सन्मान मिळे आता
जगाच्या पाठीवरती

नारीवरील अत्याचार
जेव्हा थांबतिल संपूर्ण
तेव्हा आपुला भारत होईल
विचारांनी महान परिपूर्ण

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ़़ वाफाळलेला चहा
सोबतीला खारी
बी के ग्रुप ची सोबत
लयच बाई भारी
शुभ सकाळ
                   
                      नंदा भोयर
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.पं.

        "" संस्कारधारा""  (३२)

मिळाले मज फुकटचे सल्ले
मनात तसेच दडवून ठेविले
पैका नाही खिशात एकही!
आपुलकीचे कुणी ना मिळाले.

दनाअ, नागपूर
दि.१६/०८/२०२०
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ""पहाटवारा"" (०९)

श्रावणसरी बरसती छान
शंकराला बेलापत्रचा मान
शेतशिवार झालं हिरवगार
मेघराजाचा मानू आभार.

सौ.वीणा द. अतकरी नागपूर
दी.१६/०८/२०२०
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.४४*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*गणेशाच्या आगमनाची तयारी जोरात*
*आता उरले फक्त दिवस  सात*
*गर्दी करायची नसली तरी उत्साह तोच आहे*
*मूषकासह गणपती बाप्पा येतील घरात*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सामाजिक कविता
   
माझ्या भारत देशात

माझ्या भारत देशात
वाहते गंगा एकोप्याची
विविध धर्मी, विविध पंथी
साद घालती बंधुत्वाची ।।

दुथडी भरून  इथे
निर्मळ नद्या वाहती
ओल्या मातीच्या कुशीतून
मोत्याचे दाणे निघती ।।

भ्रष्टाचार, अंधश्रद्धा काढून
बाजार नसावा शिक्षणाचा
सकारात्मक दृष्टी ठेवून
श्रेष्ठानचा आदर असावा ।।

परस्परांत प्रेम नांदते
अशी थोर संतांची भूमी
येथे सावित्री, शिवराय
वसले, रत्नांच्या खाणी ।।

आपली सृष्टी पाचू, हिरे
माणकांनी नटावी
सुजलाम, सुफलाम ही
माझ्या भारत देशात धरती व्हावी।।
----------------------------------------
          मंगला डहाके, भंडारा
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ~~~~~~~~~~~~~~~
      *सुसंगती सदा घडो*
*************************
 *सुसंगती सदा घडो*
जगात सदैव कीर्ती वाढो 
कुविचार मनात न येवो 
व्यसन कधीही न जडो 

पांडवांचा झाला उद्धार 
होती त्यांस संगत कृष्णाची 
दुर्योधन मातीत मिसळला 
त्यास संगत शकुनी मामाची 

सुसंगतीनेच होत असते 
जिवनाचे सार्थक...... 
वाईट संगतीने होत असे 
आयुष्य  सारे निरर्थक 

मदत करा दिन दुबळ्याची 
लोभ लालच सारे सोडून
आपोआप आपल्या हातून
सत्कार्य येईल नेहमी घडून

आई वडीलांचा नेहमी 
असो पाठीवर हात...... 
चांगल्या माणसांची कधीच 
सोडू नका साथ.......... 

*सौ. स्वाती सेलोकर* 
*भंडारा*
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता

छान किती छान

छान किती छान ग छान
गातांना वाटते छान....,

रंगीत माझी साडी नि
रंगीत माझी रांगोळी 
काढतांना वाटे कितीछान
छान किती छान बाई छान


रंगीत माझा जुडा
नि रंगीत फुलांचा  सडा
पाहताना वाटे किती छान
छान किती छान बाई .....


रंगीत माझी मेंदी नि रंगीत माझी  डिझाईन 
हातावर शोभे किती छान
छान  किती छान बाई छान....

रंगीत माझ्या सख्या
नि रंगीत आमुचा संवर्धन  गृप
जिव्हाळा प्रेमाचा वर्षाव
छान किती छानबाई छान.....

सौ.सुषमा एस पडोळे
खात रोड भंडारा
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
आवडती कविता (९१)

        ""नटखट कान्हा""

मथुरेला जाता बाई
कान्हाने अडविले
गोरसाचे  माठ
खड्याने फोडीले.

दही दुध चोरण्या
पेंद्याला घुसविले
शिंकेची तोडून
खावून ठेविले.

नवीकोरी साडी 
नवतीला नेसली
कृष्णाच्या रंगाने 
अंगअंग भिजली.

वृंदावनी होळीला
कृष्णासह खेळल्या
नवरंगात गौळणी
मर्दुनी लोळल्या.

चिंब या गवळणी
यमुने तिरी गेल्या
वस्त्रची ठेवून त्या
आंघोळीस गेल्या.

लाजल्या गोपिका
जळातून विनवती
नटखट कान्होबा
किती रे लाजविशी.

दनाअ, नागपूर
दि.१६/०८/२०२०
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उषेची लाली 

 हिरव्या हिरव्या पानांमधुनी, रवी किरणे डोकावती
 मिश्कील हसुनी काळोखाला, जणू ते चिडवी ती 
 मंजुळकिलबिल पक्षांची, 
 स्वागत गीते जणू गाती 
 साखर झोपेतही स्वर मधुर कानावर पडती!

 पानांवर चा हळूच दवबिंदू ओघळला
 खट्याळ बोचरा वारा, अंगास स्पर्शुनी गेला 
 पाणवठ्यावर हिरवी कंकणे ही किणकिनली 
 एककटेवर एक डोईवर घागर ही भरली!

 सोनेरी किरणांनी न्हाहुन, पूर्व दिशा हासली
 गालावरती उषेच्याही लाली ग चढली 
 मंद मंद सुगंध बकुळ फुलांच्या दरवळला
 उषेच्याया रूपावर गोड गुलाबी गुलाबही हरकला !!

रंजना हलमारे sakoli
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय -आवडती कविता*
*गीत गाऊ भारत मातेचे*

गीत गाऊ भारत मातेचे
आठवू पराक्रम स्वातंत्र्य सैनिकांचे
फडकवू आपला तिरंगा 
विकासाच्या दिशेने पाऊल सर्वांचे

स्वप्न आत्मनिर्भर भारत बनवण्याचे
स्वदेशी वस्तूचा वापर वाढवायचे
सर्व भारतीयांनी शिक्षित करायचे
देशाला स्वच्छ सुंदर बनवायचे

शेतकऱ्यांचे यावे सुगिचे दिवस
वाढावा त्यांचा मान सन्मान
भ्रष्टाचाराचा व्हावा नायनाट
न्याय दान व्हावे सर्वाना एकसमान

वैद्यकिय सुविधा व्हावी सुधरुढ
अंधश्रद्धा व्हावी कायमची दूर
जात धर्माचे तंटे नसावे देशात
भारत देशाचे नाव गुंजावे सर्वदूर

*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता..
          * दुःख *
---------------------------
दुःख हे सर्वांनाच असतं,
कुणाला कमी तर,
कुणाला जास्त असत,
बघण्याचं दृष्टिकोन वेगवेगळे असतं।
 
कोण म्हणतं मला दुःख नाही,
फरक एवढच मी ते दाखवत      नाही,
दुःख आणि माझे नाते पक्के झाले,
म्हणूनच दुःखाला सोबत घेऊन चालणे सोपे झाले।

बंधुनिया मनाला,
दुःख मी पांघरले,
बंधूनी गाठोडे सुखाचे,
उरी-उर कवटाळले।

कंबर कसून,
बांधली गाठ,
येवो कितीही दुःख,
लावीन त्याची वाट।

तस बघितलं तर,
दुःख एवढं पण वाईट नाही,
कारण दुःखा शिवाय,
सुखाची पण गोडी लागत नाही।।

सौ. संगीता कढव, भंडारा
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता*

देवळात गेलो मी
देव मला दिसला
मला पाहून कसा
खुदकन गालात हसला

आठवण कशी झाली माझी
काय संकट आलं
त्याच्याशिवाय तुझं
इकडे येण नसतं झालं

कोणतं ना कोणतं गार्‍हाणच
घेऊन तू येतो
संकट आलं 
तुझ्यावर की
मगच मी आठवतो

सुखात कशी रे तुला
आठवण माझी येत नाही 
दुःखात मात्र मला तू
थोडाही सोडत नाही
सुखातही कधीतरी माझी आठवण काढत जा
 एक पेढा खातो तू त्यातील अर्धा मला देत जा
     ‌.          
                    नंदा भोयर
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: लहानपण वेड असत 

खुळ्या गोष्टी मनात जपणार.
शौर्य कथेतील वीराप्रमाणे,
शुरांच्या दुनियेत रमणार असत.
लहानपण वेड असत.

पावसाच्या पाण्यात,
कागदाची होडी सोडून,
हेलकावे घेणार असत.
लहानपण वेड असत.

आकाशात चंद्र चांदण्यासवे
लुकलूकणार ,
लपाछपीचा डाव खेळणार असत.
लहानपण वेड असत.

जादुई परीप्रमाणे,
जादूच्या छडीन
हवं ते मिळणार असत.
लहानपण वेड असत.

उगाच आपण मोठे होतो,
स्वार्थी दुनियेत जगत.
आपला निरागसपणा विसरून जातो.
खरचं लहानपण वेड असत.

                                     सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                      खामगाव.जि.बुलडाणा
                                      दि.15.08.2020
[8/16, 8:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ||  गुलाब  ||

हसत राही गुलाब उभा
बोचऱ्या काट्यावरी
कुणी न जाने दुःख त्याचे
अफाट या धरुवरी

उद्याना शोभे गुलाब पुष्प
पाहता सर्वांचे वेधि लक्ष
प्रसन्न होई जाती भारावुन
जवळ जाति घेति खुडुन

जाई जूही चमेली फुले
सुगंधित असे कितीतरी
झाडा पासून होता वेगळे
दुःख होई त्यास भारी

सहनशिलता असे त्याच्यात
काट्यावरचा ताज असा
रंगरुपाने सुंदर सुगंधित
असे फुलांचा तो राजा

तरुनींच्या केसात बसतो
सौंदर्य तिचे वाढवुनि
कधी तो प्रेत सजवितो
कधी ईश्वर चरणी

संकटे वा दुःख असो
झेलुन घेई वरचेवरी
प्रसन्न मुद्रे हसत राहु
सदा गुलाब पुष्पापरी

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌼🌼प्रभात वंदना - ५🌼🌼
----------------------------------------
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

सन आहे बैलांचा
घरा मधली गृहिणी
पुजा बैलाची करते
भाव भरल्या हृदयी
पंचारती ओवळते
सांज वेळेला वंदुनी.......

सुप्रभात.....
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
सौ. शितल श्रीकांत ठवकर.
(तुमसर रोड, देव्हाडी, तुमसर)
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

        """संस्कारधारा""" (३४)

दुरूनच बोट देखणी गरिबाला
कोणी ना पुसती त्याच्या मनाला
गवसले त्याला आपणच आपला
करावा उध्दार,तोषवी स्व मनाला.

दनाअ, नागपूर
दि.१८/०८/२०२०
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌻 पहाटवारा 🌻(१२)
सखा शेतकऱ्याचा

मान सर्जा राजाचा 

दिवस  उत्साहाचा
                                                  
सण  बैल पोळयाचा.

सौ.वीणा द.अतकरी,नागपूर
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.४६*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*सण बैल पोळ्याचा*
*कृतज्ञता व्यक्त करण्याचा*
*कष्टाळू सर्जा-राजाचा*
*नैवेद्य करू पुरणपोळीचा*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पुरणपोळी चा घास
सर्जा राज्यासाठी आज
एक दिवस तर मिळते त्यांना
काही आरामाचे तास

         ‌ बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.      नंदा भोयर💐💐🙏🙏
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹|| *अलगुज* ||🌹
         *क्र.49*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*सर्जा- राजास पूजतो आम्ही*
*बळीराजाचा मित्र म्हणतो*
*पुरण पोळीचा नैवेद्य देऊन*
*पोळ्याचा सण साजरा करतो*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*सौ स्वाती सेलोकर* 
*भंडारा*
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

आला आला पोळा
बैल सजती डौलात
सर्जेराजा करी साजरा
सण हर्षाने डोलत
मान पुरणपोळीचा
मानू तयाचे आभार

आपल्या सर्वांना
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
सौ.प्रतिभा वाठ(गरबडे)
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.४०
पहाट झाली बळीराजा 
लाग कामाला.
आज राज्या,सर्ज्याचा
सण भारी आला.
सालभर त्यानं वाहीलं
स्वतःला  सेवेला.
आज कृतज्ञ व्हायची
संधी लाभली तुला.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।चारोळी।।
मुक्याटाने सार सहन करी 
सख्यास कष्टाची  साथ देई
एका दिवसांच्या पाऊनचाराची
पोळा सणाला आस पुरणपोळीची। 

सौं.चंदा वनवे शेंडे नागपुर.
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कृतज्ञता व्यक्त करण्या सर्जा राजा
 करितो तुझी पूजा
 शिव शंकराचा नंदी भोळा
 चारीतो तुला पुरणाचा गोळा

 रंजना हलमारे
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

        """संस्कारधारा""" (३४)

दुरूनच बोट देखती गरिबाला
कोणी ना पुसती त्याच्या मनाला
गवसले त्याला आपणच आपला
करावा उध्दार,तोषवी स्व मनाला.

दनाअ, नागपूर
दि.१८/०८/२०२०
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
विषय..ज्योतिर्लिंग विशेष. (९३)
            (तीन ज्योतिर्लिंग) चारोळ्या

(०१). त्र्यंबकेश्वर. (महाराष्ट्र)

त्र्यंबकेश्वर ब्रम्हगीरी पर्वत पायथ्याला
गौतम ऋषींचे तपस्येने प्रकटले
ब्रम्हा विष्णु महेश गर्भकुंडा ज्योतिर्लिंग स्थापीले
दर बारा वर्षांनी कुंभमेळा जाते भरविले.

(०२). केदारनाथ. (उत्तरांचल)

हिमालयाकुशीत मंदाकिनी,सरस्वती संगमी
निसर्गरम्य यात्रा कठीण ज्योतिर्लिंगाची
🕉️नमो शिवायं नामाने होतो आत्मा अंतर्मुख
आहे महती चार धामपैकी केदारनाथाची.

(०३). घृष्णेश्वर. (महाराष्ट्र)

वेरूळ ग्रामी अंतीम १२वा ज्योतिर्लिंग स्थापन
छ.शिवाजी पुर्वज मालोजी भोसले नी जिर्णोध्दार
०३ द्वार,२४खांबावर,१७बाय१७ फुटांचे गर्भगृह
मंदिर अप्रतिम शिल्पकारीने पुर्वाभिमुख द्वार.

दनाअ, नागपूर
दि.१८/०८/२०२०
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय- बारा ज्योतिर्लिंग चारोळी लेखन*

*१०.त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र त्रंबकेश्वर)*

ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी
श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे स्थान
सिंहस्थ कुंभमेळा भरतो बारा वर्षांनी
गोदावरी नदीचे  उगमस्थान

*११.केदारनाथ (उत्तरांचल केदारनाथ)*

मंदाकिनी नदीच्या काठावर
पांडव निर्मित केदारनाथ मंदिर
खडतर पायवाटेचा प्रवास
उंचावर वसले भगवान श्री शंकर

*१२.घृष्णेश्वर (महाराष्ट्र औरंगाबाद)*

वेरूळच्या लेण्यांजवळ वसले
ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर
राष्ट्रीय संरक्षक स्मारक असा मान
अतिप्राचीन आहे मंदिर

*सौ. रूपाली अमोल बोंद्रे भंडारा*
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: त्र्यम्बकेश्वर (महाराष्ट्र)

गोदावरी उगम ब्रम्हगिरी पर्वत
ज्योतिर्लिंग त्र्यम्बकेश्वर नाशिकात
सातवाहन काळात स्थापन
दगडी बांधकाम प्रवेश नंदिदर्शन

केदारनाथ  (उत्तरांचल)

हिमालयातिल बर्फाळ प्रदेशात
धाम,ज्योतिर्लिंग केदारनाथ
जमिनिवरी रेड्याचि पाठ
बांधकाम नवव्या शतकात

घृष्नेश्वर  (महाराष्ट्र)

औरंगाबादेतिल वेरुळात घृष्ने श्वर
शिल्पकलेचा उत्तम नमूना सुंदर
मुळ नाव त्याचे कुंकुमेश्वर
गौतमी कुलकर्णीने केला जिर्णोद्धार

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ~~~~~~~~~~~~~~~
           🕉️ *बारा ज्योतिर्लिंग* 🕉️
*त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)*

गोदावरी नदीचे उगम
ब्रम्हगिरी पर्वत पायथ्याशी
काळ्या दगडांचे त्र्यंबकेश्वर 
मंदिरात तीन लिंग छोटीशी

*केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)*

वसले आहे केदारनाथ
हिमालयाच्या पर्वत रांगेत
पाच नद्यांचा संगम येथे
सुंदर वर्णन स्कंद पुराणात

*घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद)*

शेवटचे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर
वेरुळ नजीक आहे वसले
शिवाजी महाराजांच्या आजोबांनी
शेतातील गुप्तधन यास दिले

*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावण सोमवार उपक्रम

1--- त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र
2--- केदारनाथ  --उत्तरांचल केदारनाथ--
3--- घृष्णेश्वर -- महाराष्ट्र औरंगाबाद---

10--  त्र्यंबकेश्वर
  उगमस्थान गोदावरीचे
ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर दहावे
नाशिक मधले पवित्र स्थळ
ब्रम्हा, विष्णू ,महेश यांचे दर्शन घ्यावे ।।

11 ---केदारनाथ
    हिमालय पर्वताच्या रांगेत
स्थापत्य हे केदारनाथ
मंदिर हे महान शिवाचे
भक्तांना सांभाळी हा विश्वनाथ।।

12-- घृष्णेश्वर
    बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर
वेरूळच्या लेण्या जवळ स्थापिले
मनोकामना पूर्ण होण्या शंकराला
भक्तगणांनी साष्टांग नमन घातले।।
----------------------------------------
        मंगला डहाके, भंडारा
[8/18, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (नाशिक महाराष्ट्र)

ब्रह्मा,विष्णू,शिव त्रिमुखपिंड
त्र्यंबकेश्वर दहावे ज्योतिर्लिंग
गोदावरीचा उगम येथे,प्रसिद्ध
 ब्रह्मगिरी,कुशावत कुंड.

केदारनाथ उत्तरांचल (हिमालय)

पाच नद्यांचा सुरेख संगम,
चारधाम पैकी एक केदारनाथ .
मंदाकिनी नदी स्थित,
हिमालयी शिव ज्योतिर्लिंग.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (वेरुळ महाराष्ट्र)

घृष्णेश्वर पूर्वाभिमुख लिंग बारावे,
कोणी म्हणती कुंकूमेश्वर.
हिंदू शिल्पकलेचा नमुना सुंदर,
पूर्ण होई ज्योतिर्लिंगाची यात्रा सफल.

                               सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                खामगाव.जि.बुलडाणा
                                 दि.18.08.2020
[8/18, 10:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: त्रंबकेश्र्वर महाराष्ट्र नाशिक.

दहावे ज्योतिर्लिंग,शिवशक्ती चे प्रतीक,ब्रह्मा विष्णु महेश,त्रिमुखी पिंड, ब्रम्ह गिरी पर्वत,एककुंड
१२ वर्षातून एकदा भरतो कुंभमेळा,कालसर्पाचे पूजा ,
गोदावरीचा उगम 🌺

केदारनाथ.

केदारनाथ ११ वे ज्योतिर्लिंग
पाच नद्यांचा संगम,चार धामामधले एक धाम
हिमालयाचा कुशीत बर्फाचा राशीत स्तिथ केदारनाथ.🌺

घृष्णेश्वर वेरुळ औरंगाबाद

१२ वें ज्योतिर्लिंग,
मंदिराचे शिल्प कोरलेले सुंदर
शिवाजी महाराजांनी दर्शन घेतले.
जीर्णोदधारा साठी धन दिले.

१२ज्योतिर्लिंग यात्रा करून तिथर्यात्रा पुण्य मिळते.
शिवाला प्रिय वस्तू अर्पून
शिवशक्ती ची पूजा करून
सकल मनोरथ पूर्ण होऊन
आशीर्वाद रुपी मिळती सौभाग्य चे लेणे.🌺🌺🌺🌺🌺
माधुरी भुते
[8/18, 10:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏🏻त्रंबकेश्वर🙏🏻
नाशिक समिप त्र्यंबकेश्वर ग्राम,महादेवाने जटा आपटली अन् गंगा अवतरली,महिमा महान।
गंगेत करीता स्नान,
मिळे मोक्ष आख्यान।
💐💐💐💐💐💐
      घृष्णेश्वर
वेरुळ गाव लहान
तयाची किर्ती महान।
कळस प्रथम साकारीला
पाया शेवटी आकारीला।
तेथेच स्थिरावला
देवाचा देव महादेव।
💐💐💐💐💐💐
      केदारनाथ
हिमालयाच्या कुशीत
शिवलिंग स्थापीले
अनाथाचा नाथ केदारनाथ
पावतो भक्ताला।
घेतो खडतर परीक्षा
फलतो नवसाला।।
💐💐💐💐💐
              सौ.सरोज मते
                      दारव्हा
[8/18, 10:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावण सोमवार उपक्रम
🕉️बारा ज्योतिर्लिंग🕉️
🔅🔅🔅🔅🔅🔅
१)त्र्यंबकेश्वर(महाराष्ट्र-त्र्यंबकेश्वर)
गोदावरी तिरावरी
त्र्यंबकेश्वर तिर्थक्षेत्र
ब्रम्हा,विष्णू महेश वसले
ज्योतिर्लिंग पवित्र.

२) केदारनाथ (उत्तरांचल-केदारनाथ)
अकरावा ज्योतिर्लिंग
हिमालयात केदारनाथ.
मंदाकिनी तिरावर
मंदिर पांडव स्थापित.

३) घृष्णेश्वर (महाराष्ट्र-औरंगाबाद)
देवी अहिल्याबाई होळकरांनी
उभारीले ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर.
मालोजीरावांनी केली नक्षी सुंदर
वेरूळ जवळ वसले शंभू विश्वंभर.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

         ""संस्कारधारा""   (३५)

बैलपोळ्याचा पाडवा नंदी पोळ्याला
सजवून लाकडी नंदी, वेशभूषा विविध
करुन तोरणा खाली  ठेवा रांगेत नंदी
पुजन,देती खाऊ, बक्षिसी एकोपा सावंध.

दनाअ, नागपूर
दि.१९/०८/२०२०
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌻पहाटवारा🌻१३

पोळा सण महाराष्ट्राचा
उत्सव काळ्या आईचा
मोठा सण तो शेतकऱ्याचा
मान त्या ढवळ्या पवळ्याचा.

सौ. वीणा द. अतकरी
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌻पहाटवारा🌻१४

आज आहे तान्हा पोळा
बाल गोपाळ झाले गोळा 
नंदी घेऊनी परिसर सगळा
फिरूनी करती पैंसा गोळा.

सौ. वीणा द. अतकरी
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.४१

श्रावण सरता 
आला तान्हापोळा
पण आज जमणार
 नाही बालमेळा.
तोच रवि तिचं प्रभा
किरणांची आरास नभा.
ईश्वरा एकच मागणे
पूर्वी सारखा होऊ दे सगळा.
सौ मीरा शेबे भंडारा.
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पावसाचा शिरवा
रान केले हिरवी
आज आहे तान्हा पोळा
नंदीबैलला सजवा!!
माधुरी भुते
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺प्रभात पुष्प🌺।।६३.

*  तान्हूल्यांचा सजला नंदी  *
*  निघाला तान्हया पोळ्यास *
*  लागली भाद्रपदाची चाहूल  *
*  करुया गौराईची आरास  *

सौ.कमल सार्वे भंडारा.
१९|८|२०२०.
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

तान्ह्या पोळ्याचा आनंद भारी
बालगोपाल सजविती लाकडी नंदी
पोळा फुटताच पसार होती
घेण्या बोजारा घरोघरी

सौ.प्रतिभा वाठ (गरबडे)
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.४७*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*आज आहे तान्हा पोळा*
*लाकडी नक्षीदार सुरेख नंदी*
*कुणाचे मातीचे सुंदर सजवलेले बैल*
*कोरोनामुळे आली या सणावर बंदी*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *ढवळ्या पवळ्याची जोडी*

ढवळ्या पवळ्याची जोडी
दिसते बघा खिल्लारी
रंगीत बेगडी शिंगांवर
मखमली झूल  पाठीवरी

*************************
          *माझा नंदी बैल*

माझा नंदी बैल
मोतीमाळांनी सजविला 
फुलांचे हार घालूनी 
तान्हा पोळ्यात नेला 

*सौ. स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि .के सा.सं.प.
विषय.. दोन चारोळ्या

  ०१)"" ढवळ्या पवळ्याची जोडी""

ढवळ्यापवळ्याची जोडी आहे सुंदर
नांगरणी,वखरणीला कधी ना अंतर
त्यांच्याच भिस्तीनं डोलतं हिरवं शिवार
बैल पोळ्याला कृतघ्नतेच पुजन सुंदर.

०२)  ""माझा नंदी बैल""

माझा डौलदार नंदीबैल आहे मानाचा
पुत्र जन्मानं झाला क्षण आनंदाचा
शृंगारुण नंदीला दोन मशाली लावुन
मिरवतं फिरते गावभर ढोल ताशानं.

दनाअ, नागपूर
दि.१९/०८/२०२०
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *ढवळ्या पवल्या ची जोडी,*

ढवळ्या पवल्या ची जोडी
सजला अंगावर झुला मखमली
आरती ओवाळते घरची लक्ष्मी
नैवेद्य पुरणपोळी दाखवूनी

*माझा नंदी बैल*

माझा नंदी बैल
हार फुलांनी सजवला
तान्हा पोळ्यात नेला 
पहिला नंबर आला

                 पूनम डहाके,
                         भंडारा.
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ढवळ्या पवळ्याची जोडी---

पोळा सण आनंदाचा
सजते ढवळ्या पवळ्या ची जोडी
पुरणपोळीचा नैवेद्य देऊन
वाढते शेतकऱ्याची ग गोडी ।।

माझा नंदी बैल---

तान्हा पोळा आला आज
बालगोपाल आनंदला
हार, माळ, विविध रंगांनी
नंदी हा सजवला ।।
------------------------------------
        मंगला डहाके, भंडारा
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ढवळ्या पवळ्या ची जोडी....

पोळा चा सण गावचा भारी
मखमली झुल, रंगीत शिंग
सजली ढवळ्या पवळ्याची जोडी
पुरणपोळीचा नैवैद्य ,खावून संतुष्ट झाली जोडी.

माझा नंदी बैल.....
लाकडी नंदी, सजला फुलांनी
वाजत गाजत पोळ्यात नेला
पूजन केले नंदीबैल चे, तोरण तोडून,पोळा सुटला,
लहान मुलांना बोजारा भेटला.

माधुरी भुते
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ढवळ्या पवळ्याची जोडी

ढवळ्या पवळ्याची जोडी
असे  एकमेकांप्रती गोडी
परस्परांशिवाय न राहती कधी
शेतात राबती कसुन दोन्ही  गडी



माझा नंदीबैल मी
सजविते प्रेमाने 
राखूनी त्यांचा  मान
पुजीते स्नेहाने.

सौ.सुषमा एस.पडोळे भंडारा
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी उपक्रम

ढवळया पवळयाची जोड़ी

वर्षभरीच्या कष्टातुन एकदिस सुट्टी
सांगत होती ढवळया पवळयाची जोड़ी
मालक माझा शेतकरी सदा कष्टकरी
पोळा सणाला आम्हा देई पुरनपोळी


माझा नंदी बैल

सकाळ पासून उत्साह भारी
लाकडी नंदिबैल सजविला
कोरोनाचे सावट भारी
माझा नंदिबैल हिरमुसला

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *चारोळी उपक्रम*

*ढवळ्या पवळ्याची जोडी*
शेतीच्या कामात सदा हजर 
ढवळ्या पवळ्याची जोडी 
प्रेमाने कुरवाळते त्यांना 
हिरव्या चाऱ्याची असे गोडी 

*माझा नंदी बैल*
नक्षीदार रेखीव
माझा नंदी बैल
तान्हया पोळ्यात नेते
घालून रेशमी झुल
🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂

*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळ्या-

* ढवळ्या पवळ्याची जोडी आमची *
* पोळा फुटता धावे घरा *
* प्रेम भरे न्याहाळे परीवारा *
* औक्षण होई प्रेमभरा *

        माझा नंदी

* तान्हूल्यांचे सजले नंदी *
* निघाले सारे पोळ्यामंदी *
* पाहतात तर सामसूम *
* कोरोनाने आणली त्यावर बंदी *

सौ.के.बी. सार्वे भंडारा.
१९|८|२०२०.
[8/19, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी

1. धावल्या पवळ्याची जोडी

ढवळ्या पवळ्याची गोड जोडी
शोभे सर्जेराजाचा खरा गडी
पोळा सणास सजवितो राजा
आनंद न मावे घरी-दारी

2. माझा नंदी बैल

तान्ह्या पोळ्याचा दिवशी
नंदी बैल माझा सजतो
वाजत गाजत पोळ्यात
माझ्यासवे दुडुदुडू पळतो

                              सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                खामगाव.जि.बुलडाणा
                                 दि.19.08.2020
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पहाटवारा🌺 (१५)

गजाननाचे करा पारायण
श्रध्दा भक्ती भाव ठेऊन
मनातील मरगळ जाई निघून
त्यांच्या विजय ग्रंथ पठणान.

सौ. वीणा द. अतकरी, नागपूर
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

        ""संस्कारधारा ""(३६)

आहे मी उपकारीत
पांग तुझे ना फेडले
थांग तुझ्या मनाचा
कधीना मला कळाले.

दशरथ अतकरी नागपुर
दि.२०/०८/२०२०
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺प्रभात वंदना - ६🌺🌺
----------------------------------------
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कर्मावर विश्र्वस राखा
आणि ईश्र्वरावर आस्था
परिस्थिती कितीही कठिण असो
शेवटी निघेलच रस्ता.....
ॐ साई राम.....
सुप्रभात.....
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
सौ. शितल श्रीकांत ठवकर. 
(तुमसर रोड,देव्हाडी, तुमसर) 
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.४८*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*रिमझिम पावसाची*
*निसर्ग सृष्टी बोलावते पहा*
*सोबतीला तुझे मधुर बोल*
*आणि वाफाळलेला चहा*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
(९४)
       "" सुसंगती सदा घडो""

सृजन वाक्ये सदा ऐकावे
सत् कार्या सतत वाहावे
प्रेमभाव दिनांना सर्वदे
इतुके सुसंगतीने घडावे.

विद्येची भूक सदा वाढावी
सुशिक्षिता कार्यात दर्शावी
आचार विचारांनी विहरावी
परोपकारा वृत्ती जडावी.

सुसंगती घडो सज्जनांची
थोर बुध्दिप्रामान्य व्यक्तीची
सप्रमाण दृष्टी आचरावी
नकोच भरती अंधश्रद्धेची.

स्वार्थच बहु बळावला
दुबळ्यां लक्ष न् पुरविला
हास्या चेहरां न् फुलला
दानधर्माला जिवनी मुकला.

सद् विचारे अवचित घडतं
ईश्वरी कार्या मन ओढतं
शोभिवंत अनाथांचा नाथं
जिवे नराचा नारायण बनतं.

सत् कर्मानं पुण्य लाभतं
अश्रृ दिनाघरी पुसावं
आंधळ्याची काठी व्हावं
सृजन वाक्य कानी धरावं.

दनाअ, नागपूर
दि.२०/०८/२०२०
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ~~~~~~~~~~~~~~~
      *सुसंगती सदा घडो*
*************************
 *सुसंगती सदा घडो*
जगात सदैव कीर्ती वाढो 
कुविचार मनात न येवो 
व्यसन कधीही न जडो 

पांडवांचा झाला उद्धार 
होती त्यांस संगत कृष्णाची 
दुर्योधन मातीत मिसळला 
त्यास संगत शकुनी मामाची 

सुसंगतीनेच होत असते 
जिवनाचे सार्थक...... 
वाईट संगतीने होत असे 
आयुष्य  सारे निरर्थक 

मदत करा दिन दुबळ्याची 
लोभ लालच सारे सोडून
आपोआप आपल्या हातून
सत्कार्य येईल नेहमी घडून

आई वडीलांचा नेहमी 
असो पाठीवर हात...... 
चांगल्या माणसांची कधीच 
सोडू नका साथ.......... 

*सौ. स्वाती सेलोकर* 
*भंडारा*
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अध्यात्मिक कविता

सुसंगती सदा घडो

सुसंगती सदा घडो
सुजन वाक्य कानी पडो
लयीत गोष्टी न घडो
परस्परा आनंद मिळो ।।

लोभलालसा नको जीवनी
राग, द्वेष कधी नसावा
माया ,प्रेम ठेवू हृदयी
मनी ईश्वर ध्यास असावा ।।

वृत्ती ठेवून सकारात्मक
बघावे सारखे सर्वांना
गरीब-श्रीमंत नसे कोणी
संस्कारखाण जपावी अंतःकरना।। 

अनाथ पंगुंचा विचार
करूनि, द्यावे काही दान
मोठ्यान प्रति आदर ठेऊनी
भर ओंजळी विश्वास धन ।।

समूहा वरून एका व्यक्तीचा
सदा होतो परिचय
सूर्या परी झळके ध्येय
तेच जीवन आशय ।।
-----------------------------
        मंगला डहाके, भंडारा
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आध्यात्मिक  कविता

सुसंगती सदा घडो

सुसंगती सदा घडो
सृजन वाक्ये  कानी पडो
सद्भावना जिव्हाळा वाढो
आपल्या  हातुन सत्कार्य   घडो....

नको संगत दुष्ट जनांची
हाव लोभ नको कदापी
हव्यास मनी पुण्यलाभाची
नकोच  संगत कुव्यसनी मद्यपी.... .


सुविचार मनी असावे
शब्दां धार नसावे
गरीब आनाथांचे आधार बनावे
एकमेकांप्रती प्रेम भरावे....


सुसंगती सदा घडो
सृजनशिलता अंगवळणी पडो
थोर महात्म्यांचा आदर्श मिळो
परस्परांप्रती प्रेम जडो.....



सुवाणीने जग जिंंकावे
आयुष्य असती सुंदर देणं
सोनं करावं आयुष्याचं
वागुन किर्तीरुप अपुलं घेणं.....

सौ.सुषमा पडोळे भंडारा
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *सुसंगती सदा घडो।*

सत्संग अंतर्मनाचा घडो,
भाव विचारांनी जीवन घडो,
चांगले विचार कानी पडो,
सुसंगती सदा घडो।

आपुलकीचा गंध दरवळो,
माणुसकी जपून राहो,
सहाय्य करत एकमेकांना,
सुसंगती सदा घडो।

बा. कु. स. च्या माध्यमातून,
सुविचारांचे लेखन होवो,
विश्वात समृद्धी घडो,
सुसंगती सदा घडो।

जमेल तसे दान देत राहो,
मदतीचा हात पुढे करत,
दिल्याचा अहंकार न राहो,
सुसंगती सदा घडो।

जाती - धर्माचा भेद सोडून,
नेहमीच संघटनाचा पाठिंबा देत,
हात धरून भेदभाव न करता,
सुसंगती सदा घडो।

आयुष्याची मूल्य जपत,
एकमेकांची तत्वे पाळत,
आरोग्य संपदा प्रसन्न राहो,
सुसंगती सदा घडो।

मित्र-मैत्रीणी, कुटुंबाची सोबत लाभो,
एकमेकांना समजून घेता,
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर,
सुसंगती सदा घडो।

- योगिनी ढबाले
२०/०८/२०२०
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुसंगती सदा घडो, 
सतजनांची सोबत मिळो।
सोबतीने सदविचार लाभो
मना नव आकार मिळो
रंजल्या गांजल्यांची सेवा घडो।सेवेतून मन उदात्त बनो।मना नित्य नव्या प्रेरणा मिळो।
सदाचरण सदैव घडो
सन्मार्गावर चित्त चालो।
सुसंगतीतून सदगती मिळो।मन शुद्ध, सात्विक, परिमळ भवो।
          सौ.सरोज मते
                दारव्हा
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुसंगती सदा घडो
***************

देऊनी मदतीचा हात,
सत्कर्म हातून घडो,
जण-कल्याणाचे करुनि काम,
सुसंगती सदा घडो।

मान मोठ्यांचा ठेवावे,
सद्-विवेक, बुद्धी जपावे,
शुद्ध आचरण असावे,
सुसंगती सदा घडावे।

पर्यावरणाशी घ्यावे जुडवून,
वृक्ष- वेलीचे करून जतन,
पशु-प्राण्यावर दया ठेवुनी,
सुसंगती सदा घडुनी।

मनी नसावे पापाचे वारे,
सदा वाहावे पुण्याचे झरे,
 परोपकाराची भावना जडो,
सुसंगती सदा घडो।।🙏

सौ. संगीता कढव, भंडारा
********************
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुसंगती सदा घडो

सुसंगती सदा घडो 
सृजन वाक्य कानी पडो

सुसंगतीचा महिमा अपार
वाल्याचा होई वाल्मिकी महान

कर्णाने कौरवांशी संगत केली
शक्ती सारी धुळीस मिळाली

अर्जुनास सुसंगत कृष्ण सहवास
दुर्जनांचा केला सर्वनाश

सुसंगत असे परिससमान
ज्यास मिळे तो भाग्यवान

सुसंगतीने होई आत्मोउद्धार
दिन दुबळ्यांचा होऊ आधार

सुसंगतीने जीवन घडे
सन्मार्गाचे पाऊल पडे
                              सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                खामगाव.जि.बुलडाणा
                                 दि.20.08.2020
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *सुसंगती सदा घडो*

सुसंगती सदा घडो
चांगले वाक्य कानी पडो,
होई तुझा उद्धार
एक चांगला माणूस घडो

नको राग ,लोभ, द्वेष
नको संगत कुसंगती चा,
होई आपलाच नाश
कुणास नाही फरक पडायचा।।

गरिबांना मदत करावी,
चांगल्या ची संगत धरावी,
मन आपले निर्मळ असावे,
चांगल्या विचारांची धुरा धरावी।।

संगतच आपल्यास 
वाल्याचा वाल्मिकी करेल,
वाईट कर्मास ,चांगले
कर्मच भारी पडेल।।

-पूनम डहाके, भंडारा
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।सुसंगती सदा घडो ।।

सुसंगती सदा घडो
हीच मागणी प्रभू
नकोच विकारी मन
तूच सर्वस्व स्वंयभू।।

लोभ वासना दूरच
देऊ नकोस सहारा
तुझीच मोह माया
सांभाळ तुझा पसारा।।

दरवळे सुगंध सुसंगतीत
दुर्जना घडवी कोण?
आनंदी अपेक्षा सर्वच करी
विकृत भावना येते कुठून?।।

बागेत फुले सर्वच
परि आवडे सुगंधित
तरी गवत फुले बिचारी
जातात पायी तुडवीत ।।

सुसंगती सदा घडू दे
कल्याण विश्वाचे होऊ दे
नांदोत सुखाने सर्व
भारता सुजलाम् सुफलाम् 
पाहू दे।।

सौ. के.बी.सार्वे भंडारा.
[8/20, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ||  सुसंगति सदा घडो  ||

सुसंगति सदा घडो
सुवचन कानी पडो
सद्बुद्धि नित्य लाभो
शुद्ध आचरण घडो

सद्कार्य सदा घडो
कुसंगति ना घडो
सद्विचार मनी असो
सुमधुर वाणी असो

राग लोभ द्वेष तिरस्कार
दूर ठेवुनि करा विचार
मनी नसावा अहंकार
सर्वांसोबत खरा व्यवहार

अमृताचे वेल जाई लिम्बावर
तिथं कडु होई संगतिमुळं
त्याने ना होई सुसंस्कार
होई ना प्रगतिचा आधार

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुसंगती सदा घडावी

सुसंगती सदा घडो सर्वांना
देह आणि मनाला देई सन्मार्ग
 व्यसन,आणि दुवर्तन दु र ठेवी
निरहांकर मन ठेवून 
आचरण शुद्ध ठेवी
संताची संगती घडल्यास
, द्वेष,  लोभ,मत्सर ष ड रिपु
विजय मिळवून,सन्मार्ग दाखवी
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌻पहाटवारा🌻    (१७)

पार्वतीने व्रत उपासना करुन
वाळूचे सुंदर शिवलिंग स्थपून
भ्रतार म्हणून वरले शंकराला
त्रीतीयेला हरितालिका व्रत करुन.

सौ. वीणा द. अतकरी
       नागपूर.
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌷🌷🌷🌷🌷🌷
मंगळागौरी चा आलं सण,
सुहासणी नटूनथटून,
मागणे सौभाग्याचे,
गौरी-शंकराला पुजून।।
🙏🙏🙏🙏🙏🙏
सौ. संगीता कढव, भंडारा
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.४९*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*श्री शंकराला पूजिती सख्या*
*आज आहे हरितालिका*
*विविध हिरवी पाने वाहती महादेवा*
*उत्तम वर मिळण्या कुमारिका*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

         ---संस्कारधारा-- (३७)

मोठ्या धैर्यानं सुरू केली लालपरी
आनंदाचा जल्लोस करती कर्मचारी
तिन महिन्यांचा पगार नाही हाती
लालपरीवर आली होती मोठी लाचारी.

दनाअ, नागपूर
दि.२१/०८/२०२०
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पूजा आणि उपवास

 सरावन सोमवारचा केलो मी उपास
 शंकराच्या पिंडी ले वायत होतो बेल
 नाकात माह्या घुसला साबुदाण्याच्या वड्या चा वास
 मित होतो पूजा करण्यात दंग
 भगर अनं खिचडीचा आला मोठा सुगंध!
 तिकून आली गीती, म्हणते चल जाऊ खुली झाली आता मंदिर
 नाही बाई आधीच माझ्या पोटात लवतेत उंदीर 

 बारा वाजले एक वाजला वाजले आता दोन, 
 मंग माह्या  बहिणीचा आला मले  फोन
मनते बाई केलीस का उपास
 मी म्हणलो हो कडकडीत
 च्याया बी  नाई घेतलंलो कडकडीत
 ते म्हणे तूहा, आहे बाई बरा 
मी खाल्लो आत्ता आ लू चा शिरा
 मी म्हणलो बाई नाईतुह्या वाणी 
 कायले माह्या तोंडा ले सोडतेस पाणी

 ते मनते कसी, कायले बाई करतेस उपास 
मनी नाई भाव !
न देवा मले पाव !!

रंजना हलमारे (सेलोकर )
साकोली
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: व्रत उपवास यावरील हास्य कविता----

आज मंगळागौर हरितालिका
माझा आहे उपवास
झाली थोडी चिडचिड
स्वयंपाक नाही केला आज ।।

पतीला म्हणाली तुमच्यासाठी
व्रत हो मी केला
उपवासापायी  माझा
जीवच की  हो गेला ।।

पिशवी घेऊन बाजारी हे गेले 
जिलेबी, फळ ,चिप्स घेऊनच आले
साबुदाण्याचे वडे, आलू चा शिरा
      खव्याची जिलेबी ,चिप्स,   फळ भरपूर मी खाल्ले।।

काय करता राजे हो,लागली मग झोप
पोटा उठवे त लागतच ये डोळे
पुनम म्हणे, आई पूजा करायला ऊठा 
उपासापायी हे दशा झाली माये।।

हे मध्येच बोलले, पोट
भरत वरी इन लय खाल्लं
सांगते आता कोणाले
खाण अंगात आलं ।।

        मंगला झेड.डहाके, भंडारा
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
        *पूजा आणि उपवास*
**************************

पूजा करून उपवास करायचा
रीत आहे ही फारच जुनी
पोटातली भूक मारू मी कशी
सांगेल का हे मला कुणी

पोटात ओरडती कावळे फार
पूजेत काही मन लागेना
कशी बशी पूजा आटोपली
स्वयंपाकघरात कुणी जाऊ देईना

नजर माझी भिरभिरत होती 
काहीतरी खाण्यास शोधत होती 
टेबलावर दिसलं एक पातेलं
खाण्याची वस्तू त्यात होती 

तोंडाला आता पाणी सुटलं 
साबुदाणा पापड दिसला दुरून 
झटपट गेली पातेल्याजवळ
पापड खाल्ला मी तोडून 

तिखट ना मीठ सपक सारं
चव त्याची वेगळीच लागे 
लक्षात आलं नंतर माझ्या 
थर्माकोल मी ठेवले होते मागे 

फजिती करण्यासाठी माझी 
सासू बाईनी केली ही करामत 
सगळे हसू लागले मला...... 
बिनपाण्याची झाली हजामत 

*सौ. स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ||  हास्य कविता  ||

  पुजा आणि उपवास
******************

काजळतिज सणाला सासुनं
उपास कराले लावलं
काहीच नाही खायचं म्हुन
चांगलं बजावुन सांगलं

सकाळीच उठली मी
सासुच्याच पहिलं
एक लीटर दूध होतं
गटागट पिऊन टाकलं

पूजा कर म्हणुन सासु
ओरडाले लागली
मन माझं खाण्यात
घाई घाईत आटोपली

सख्यायनं पाठोल्या उपासाच्या
खुप  छान छान रेसिपी
भगरी साबुदान्याचे वडे दोसे
ढोकळे इडली न चटनी

वरुण सांगलं यायले
केळी सेब पपई न जलेबी
जावुन बसली खात
आपल्या बेडरूम मंधी

खाऊन खाऊन दुसऱ्या दिसी
मले जसी उलटी आली
सासु माही म्हणते कशी
हिले काजळतिज माय पावली

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: व्रत उपवास यावरील हास्य

सोळा सोमवारचे व्रत केले
पूजा होती भली मोठी
१६ प्रकारचे पान पूजेस
बेल  वाहिला १००१
१६ प्रकारचे पान तोडतांना
आले माझे नाकी नऊ
मी म्हटले जावू बाई ला
१,१पान वाहिलं तरी होते
जाऊ बाई माझा कडं
मोठे मोठे डोळे करून पाहे
मग काही माझी गतच नाही
तोडले कसेंतरी नेऊन दिले  
पूजेस बसल्या असताना
फराळाचं वास च घुसला नाकात
बेलाचे पान वाहता,वाहता
हात दुखून आला 
आधीच पोटात कावळे बोंबले
पूजेत बसली मन नाही लागे
जाऊबाई राहुन,राहुन डोळे वटारून पाहे.
कशी बशी मी पूजा आटोपली
स्वयंाकघरातील वाट मी धरली
फराळ खाता खाता मी नवराल्या दिसली
नवरा म्हने मला हा कायचा उपवास,उपवास म्हणून दुपट खासी
मी मन्हे त्यांना तुमच्यासाठी उपवास केला
मग आल्या जावा पाहिलं मला खाताना
पाहून पाहून हसल्या,!!
शरमेने मी खाली मान घातली
माधुरी
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
उपक्रम-हरतालिका विशेष. (९५)

         ""पुजा आणि उपवास""

पुजा आहे म्हणून 
उपवास केला बाई
काही नाही खायला
फजिती झाली मायी.

                      
ऐकलं होतं एकादशी
आणि मस्तपैकी खाशी
म्हणून केला पुजा पाठ
राहीला माणूस उपवासी.

पुजा करी देवाची
पुजेला सर्व काही
किमया पहा जिवाची
माणसां किंमत नाही.

पुजेला भाव समर्पीत
चित्तशुध्द उपवासानं
चिंतन कराव देवाचं
शुध्दमनानं भगवंताचं.

व्यक्ती परत्वे होई पुजनं
नेत्रपूजन ,सेवाकार्यानं
नका करू पोट हरताळं
रहा खुश सर्वही काळ.

करतो म्हणाले उपवास
खोलीतून येता सुवास
खाण्याची लागली आसं
मस्त खायी घासावर घास.

दनाअ, नागपूर
दि.२१/०८/२०२०
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *व्रत उपवास हास्य कविता*

कायची बापा हरतालिका
थकून मी गेली
सकाय पासून
सासुबाई ची पूजा सुरू झाली

मले मने आज तू
काहीच नको खाऊ
फरायाचीत काही
वाटच नको पावू

म्या म्हणलं हे तुमाले
सांगतलं कोण
कोणत्याही उपासाले तुमचं
हेच असते रडगाणं

मले म्हणता फराय नाही
तुम्ही त खाता
मायाच काऊन
कोडड़ा जीव घेता

देव कायी मनत नाही
उपाशी राय
देव म्हणते मले तू
अंतकरणातून पाय

सासुबाई म्हणे मले
लयच शायनी झाली
बीके ग्रुप वर गेली
तवापासून पुरी कामातून गेली
जवा तवा हातात पेन घेत रायत
माया कड नुसती डोये वटारून पाहत

            नंदा भोयर
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ☘️पूजा आणि उपवास☘️
 ********************
आजचा उपवास रावांसाठी,
 बसले मी पूजेसाठी
राव ओरडले आतून,
जेवण बनवलं काय माझ्यासाठी।😡

मी पण खेकसूनच म्हणाले,
व्रत तुमच्यासाठीच केले,
सुट्टी आज सयंपाकला,
मदत करा घरकामाला।💪🏻

फराळाचा सुगंध,
दरवळला घरभर,
उसळ, जलेबी, भगर,
घेऊन बसली प्लेट भर।😋

कुणी बघू नये म्हणून,
खात बसली पट पट,
खिडकीच्या आडोश्यातून,
नवरा बघे मट -मट।😨

जवळ येऊन टपकले,
तुझं आज उपवास ना म्हणाले,
म्हंटल मला गरगरल्या सारखं वाटले
म्हणून थोडसच खाल्ले।😛

व्रत तू माझ्यासाठी केले,
स्वतः चटकदार,
फराळ खाऊन,
मलाच उपाशी ठेवले।😥

हळूच जवळ घेऊन,
म्हणाली लाडात,
फराळाचा घेऊ आस्वाद,
एक- मेकाच्या सहवासात।।👩‍❤️‍👨

सौ. संगीता कढव, भंडारा
    🌹🌹🌹🌹🌹
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏    पुजा आरती🙏
जस देवी ,जय देवी हरतालिके
उपवास केला सांभाळून घे माते ||धृ||
 पुजा केली माते. भर्तारा कारणे
 प्रसन्न होवुनी वर दे त्यासी माते
 रोज मिळु दे जेवण आयते
 चढविन नैवेद्य खिचडी ताकाचे
जय देवी,जय देवी हरतालिके
उपवास केला मी सांभाळून घे माते.....
 विवीध फळे ,मिठाई ठेविली नैवेद्यासी 
 तोंडा सुटले पाणी पुजा करतानाते
 जय देवी ,जय देवी हरतालिके
उपवास केला मी सांभाळून धे माते....
 संध्याकाळी शेव,खव्याची जिलेबी चढविन नैवेद्य्यासी
जागरण,खेळ खेळावे कसे?
 पोट गच्च भरले फराळाने
जय देवी जय देवी हरतालिके
उपवास केला मी सांभाळून घे माते
भर्तार माझा साधा भोळा
ठेवतो उपवास माझ्यासाठी
आशिवार्द दे त्या सनी
जन्मो जन्मी मिळो हीच बायको त्यां सी
जय देवी जय देवी हरतालिके
उपवास केला मी सांभाळून घे माते..
              🙏🙏🙏🙏🙏
           सौ जयश्री रेहपाडे
                 नागपुर.
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्यकविता
पुजा आणि उपवास
पुजेशिवाय मन रमत नाही
पुजा करुन उपवास करण्याची पध्दत आहे जुनी 
आज हरीतालिका व्रत  उपवास
काय खायचं बरं विचार आले मनी.....


मिठाचं आज चालत नाही
सर्व  आहे घरी  ईच्छा नाही मुळी
मुलगा म्हणतो खा ग  काहीतरी 
तु आहेस जगावेगळी....

सकाळ पासुन मी फक्त  पाणी प्याली
पुजाआर्चा झाल्यानंतर चहाची आठवण आली
चहा करते म्हंटलं मांजर  दुध प्याली
दुध आणल्यावरी चहा मी प्याली
ईच्छा झाली खाण्याची चहा घेतल्यावरी
बकाबका खाल्ले  मी केळसेफ तीनचार तरी
मग आली सुस्ती केळ खाल्लयावरी
काम कसे करावे विचार आले भारी.

सौसुषमा पडोळे भंडारा.
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता

पूजा आणि उपवास

पूजा आणि उपवास 
आहेत लयी भारी
पोटात कावळे ओरडती
गंमत येते खरी
 पाटलीनबाई पुजेला 
बसल्या देवापुढं
पेढ्याचं प्लेट ठेवलं 
 लपवून पदराआड.
एक मंत्र झाला
एक पेढा उचलला
नवरोजीनं पाहीलं
खाण्याचा बेत फसला.
आवडाव पाहूनच
पेढा तोंडाजवळ नेला
तेवढ्यात दीर 
देव्हाऱ्यात आला.
पूजा झाली,मंत्र झाला
आरतीसाठी पाटलीन
उभी झाली.
पदर वर गेला अन्
पेढ्याची प्लेट उघडी झाली.
मग काय राव 
दीर ओरडला पेढे
कुठून आले एवढे
नवरा आला धावत
सासू आली पळत
आम्ही नाही आणले
इथे कसे आले?
पाटलीनचे बारा गेले
अन् दोनच राहीले.
चोरून‌ ना खाता आले
ना पेढे राहीले. 
पाटलीनला सोडून 
सर्वांनी फस्त केले.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: व्रत उपवास यावर हास्य कविता.

 ।।व्रत उपवास ।।

आले गेले उपास,
बायाले धरा लागते
उपास धरल्यान मने
सौभाग्यच लाभते।।

सांगून ठेवल सुनेले
कडक उपास करु नको
कष्टाशिवाय पर्याय नाही
हे वाक्य विसरु नको।।

उदयाचा उपास,
आज पोटभर जेवजा
पुजा करतांनी येईल ढेकर
पावलाच देव समजा ।।

होळी अन् पोळ्याची
कशी सोय असते
तशीच सोय बायांनी
या सणात करायची असते ।।

खोव्याची जिलेबी
सात प्रकारची फळे
गाजराचा हलवा
यातूनच खरा आनंद मिळे ।।

बयताड बाया
कडक उपास करते
सार लक्ष मंग
खान्यामंदी ठेवते ।।

सासू पाहीन,नवरा येईन
कोठची पुजा न् कोठचा का?
पोटात कावळे,तोंडाले पाणी
सारी गंमतच नाही का?

सौ. के.बी.सार्वे भंडारा.
२१|८|२०२०.
[8/21, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हरतालिकेचा उपवास (हास्यकविता)

हरतालिकेच्या पूजेला खायचं नाही मीठ,
फोन करून सासूबाई म्हणे पूजा कर नीट.
मीठ नाही म्हंटल्यावर भगर आमटी डोळ्यांपुढून गेल,
गोड गोड नुसतंच कसतरी झाल.
शेंगदाणा गुळाचे लाडू रात्रीच केले,
नवऱ्यानही फळ फळावळ,आणून दिले.
दुधाची तर मस्त मेवा टाकून बासुंदीच केली,
थोड्या थोड्या वेळान लहान लेकरसारखी पिली.
तुमचा स्वयंपाक तूम्हीच करा ठणकावून सांगितलं,
पूजेसाठी बेलपत्री नवऱ्याकडूनच निवडलं.
पूजापाठ झाल्यावर मला चक्कर  आल्यासारखी वाटली,
नवऱ्यानच सारी आवरा सावर केली.
हाच नवरा मिळो म्हणून मागणं मागितलं,
माझ्याकडे बघून नवऱ्यानं तोंड कसनुस केलं.
असा बाई माझा हरतालिकेचा उपवास महिमा,
खरं सांगा तुमच्याही घरी असच आहे ना!!!

                              सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                खामगाव.जि.बुलडाणा
                                 दि.21.08.2020
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

       ""संस्कारधारा""  (३८)

भाद्र गणेश चतुर्थी दिन सोनीयाचा
गणपती बाप्पाला सजविला चौरंग
त्यावर लाविला मखर रंगीत सुंदर
बाप्पा आले नाचत नृत्या नटरंग.

दनाअ, नागपूर
दि.२२/०८/२०२०
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌼🌼प्रभात वंदना - ७🌼🌼
----------------------------------------
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

आनंदी आनंद गडे
जीकडे तीकडे चोहीकडे
गणपती बाप्पा आले
आमच्या कडे....
सुप्रभात.....
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
सौ. शितल श्रीकांत ठवकर.
(तुमसर रोड, देव्हाडी, तुमसर)
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌸पहाटवारा🌸

गणेश चतुर्थीचा दिवस आला
मखर बनवूनी घरा सजविला
पूजा अर्चनेणे स्थानापन्न झाला
नमस्कार करते माझ्या गणरायाला.

    सौ.वीणा द.अतकरी, नागपूर.
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺प्रभात पुष्प 🌺।।६६.

*  करु आरास बाप्पाची  *
*  २१मोदक करायची  *
*  घाई आहे आरतीची  *
*  दैवत येत आहे बुद्धीची  *

सौ. कमल सार्वे भंडारा.
२२|८|२०२०.
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.५०*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*वाजत गाजत आगमन झाले  गणेशाचे*
*सुंदर, मनमोहक, लोभस मूर्ती*
*गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने*
*आज फुलपाखराची अर्धशतक पूर्ती*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प-- 56 वे

ढोल ताशा च्या नादात

          गणराय आले

तांदळाची आरास करून

       श्रद्धेचे दीप उजळले ।।
---------------------------------------
         मंगला झेड. डहाके
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गौरीचे विसर्जन 🌺🌺
गणेशाचे आगमन
बुध्दीचा नायका
प्रथम वंदिते तुला!!🌺🌺 
माधुरी
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हरीतालिका विशेष ऊपक्रम
स्वरचित ऊखाणे


१--
सासरा माझा प्रेमळ सासु माझी  हौशी
सुकरामजींच नाव घेते
हरितालिका दिवशी 

२--साडीला लावते चांदीची  पीन
सुकरामजींच नाव घेते हरवली त्यांची  विहिन

३--भोळ्या शंकराला आवडते बेलाचे पान
सुकरामजी आहेत माझ्यासाठी सोन्याची  खान

४---गौरीपुजन मी आज भक्तीभावाने करते
सुकरामजीसारखा पती जन्मोजन्मी मिळावा हिच गौरीमातेला प्रार्थना  करते


५--हिरव्या कुरणात चरतात हरणी
सुकरामजी आहेत नयनी
सदा राहतील  जिवनी




सौ.सुषमा एस पडोळे भंडारा
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹|| *अलगूज* ||🌹
         *क्र.५३*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*आगमन झाले गणपती बाप्पाचे*
*ढोल ताशांच्या गजरात*
*वंदन करून गणेशाला*
*आरती म्हणूया तालासुरात*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*सौ स्वाती सेलोकर* 
*भंडारा*
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हरितालिका विशेष उपक्रम*
            *स्वरचित उखाणे*

१) परातीत होतं पातेलं
     पातेल्यात होती वाटी
    हरितालिकेची पूजा करते
    दयानंदरावांच्या दीर्घायुष्यासाठी

२)  बाप्पाच्या आगमनाने
       मन माझं भारावलं
      दयानंदरावांचे नाव
       खास तुमच्यासाठी घेतलं

३) प्राजक्ताचा सडा
     अंगणी पडला
     दयानंदरावांच्या नावाने
     हिरवा चुडा भरला

४) सगळ्याच गोष्टीत 
     आहे मी हौशी 
     दयानंदरावांचं नाव घेते 
      हरितालिकेच्या दिवशी 

५) आवडते मला  रांगोळी 
     आणि मेहंदी काढायला 
      नेहमीच तयार असते मी 
       दयानंदरावांचं नाव घ्यायला 

*सौ. स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
उपक्रम..पाच उखाणे

        ""मंगळागौरीचा सण""

(०१)
मंगळागौरीचे व्रत सांगे सुन सासुला
माझी "विणा" करते हा व्रत सौभाग्याला
याच व्रताने मिळाले जिवदान पतिला
सासरचे आणि माहेरचे बोलवा उद्दापनाला.

(०२)
नारायणरावांचा पुत्र आहे 
घेतला जन्म यशोदेपोटी
"विणा"बाईचं नाव घेतो
कमळासम उमलत्या ओठी.

(०३)
कारखाण्याचा भोंगा वाजला
निघालो बया मी कामाला
मिळतया वेतन  घामाचा
"विणा"ला नाद मोजण्याचा.

(०४)
नागपूरच्या वाटे लय पेरले चणे
"विणा"बाई सिनेमा दाखवा म्हणे
म्या म्हणलं बाई शहर नाही खरा
तुझा माझा संग घरीच आहे बरां.

(०५)
सर्वव्यापी आहे बि.के.सा.सं.परिषद
पाच उखाण्याचा म्या पाठवतो संच
टाळेबंदीत रचना लिहत आहे संथ
माझी "विणा"म्हणते राव तुम्ही झाले पंत.

दनाअ, नागपूर
दि.२२/०८/२०२०
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगळागौरी निमित्य स्वरचित उखाणे

श्रावण महिना आला
पूजा ठेवली मंगळागौरीची
भगवानरावां सोबत लग्न झालं
साथ मिळाली उभ्या आयुष्या ची

बी के च्या सख्या सर्व
घरी आल्या मंगळागौरीला
भगवानरावांना आनंद झाला
दोघांनी मिळून आम्ही
त्यांचा सन्मान केला

हृदयात आहे प्रेम
प्रेमात आहे त्याग
त्यागात आहे कला
भगवान रावांनी आणली 
साडी मंगळागौरीला

मंगळागौरीच्या दिवशी मी
नटले नऊवारी नेसून
भगवानराव म्हणतात माझी
राणी दिसते कशी
चारचौघीत खुलून

मंगळागौरीच्या दिवशी
असा चमत्कारच झाला
भगवानरावांनी माझ्यासाठी
कोल्हापुरी साज आणून दिला

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा विषय
        स्वरचित उखाणे--

1--
    नभ दाटले दाटले ,मोर पिसारा फुलला
झिंगरराव येताच दारी ,सिद्ध गाली ग हसला

2--
जीवनसत्व क ने परिपूर्ण आहे आवळा
 झिंगर राव आहेत माझे ,जसा श्रीकृष्ण सावळा ।।

3--
    दिव्य औषधी आहे अंगणातली तुळस
झिंगर रावांच्या सहकार्यांनी, चढवला माझ्या आयुष्याला कळस ।।

4--
  कलाकृती ही परमेश्वराची,
 सृष्टी हिरे ,मोत्यांनी  सजली
झिंगरराव मिश्कीलपणे हसले
मी उगाच लाजली ।।

5--
   हिरवे गालिचे मखमलीचे त्यावर पडते टप टप पाणी
झिंगरराव म्हणतात,खुश आहेस ना ग राणी ।।
----------------------------------------
           मंगला झेड.डहाके, भंडारा
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उखाणे

1
 मंगळागौरीच्या पूजेला जमलेल्या साऱ्या सुहासिनी, 
 भरत रावांचं नाव घेते
 त्यांची मी पट्टराणी.

2
 मंगळागौरीच्या दिवशी आणल्या नवीन कपबशा, 
 भरत रावांच्या माझ्या रुबाबदार मिश्या. 

3
 समईची तेवते वात जशी देवघरात, 
 भरतराव सदैव आहेत माझ्याह्रदयशिहासणात. 

4
 गौरी विसर्जन करताना पावसात भिजले मी पहा, 
 भरतराव करतात माझ्यासाठी गरमागरम चहा.
5
 मंगळागौरीच्या 
हळदीकुंकवाला फिरते मी घरोघरी, 
 भरतराव बघतात माझी वाट बसून गच्चीवर.

रंजना हलमारे (सेलोकर )साकोली
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उखाणे
१) पावसात भिजे काळी काळी माती गणेशरावांचे नाव घेते बसा मंगळागौरी भोवती
2)सुखदुःखाच्या मिश्र धाग्यांनी होते संसाराची निर्मिती गणेशरावांचा उत्कर्ष हीच मंगळागौरींची
माझ्यासाठी स्फूर्ती।
3) पान वाहते,फुल वाहते
गणेशरावांची अखंड साथ लाभो हे मंगळागौरी ला दान मागते।
४)ज्योतीला मिळेल ज्योत, आता पडेल प्रकाश मंगळागौरीच्या साक्षीने गणेशरावांचा जीवनात ठेंगणे होईल आकाश।
         सौ.सरोज मते
                दारव्हा
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा विषय
                   "स्वरचित उखाणे"

१. मंगळागौरीचे व्रत श्रावणात येते
दशरथ रावांच्या नावाचे मंगळसूत्र लेते

२. गौरिमध्ये गौर मंगळागौर
दशरथ रावांच्या नावाची भाळी चंद्रकोर

३. मंगळागौरी व्रत सुहासिनी धरतात
दशरथ राव माझी उगाच स्तुती करतात

४. मंगळागौर म्हणजे शंकराची  उपासना
दशरथ रावांचे नाव घेते सर्वजणी ऐकाना 

५. मंगळागौरी पूजेत मागते सौभाग्य दान
दशरथ रावांचे नाव घेते बी.के.ग्रुपच्या सर्व सदस्यांचा ठेऊन मान.

सौ. वीणा द. अतकरी, नागपूर
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *उखाणे*

१.सर्वात पहिले येतो क्रमांक *एक*
 टाळेबंदी च्या काळात अमोलरावांनी बनवला माझ्यासाठी केक.🎂

२.एका नाण्याच्या बाजू असतात *दोन* 
हरितालिके करता अमोलरावांनी आणला माझ्यासाठी मेहंदीचा कोन🍃

३. बेलाची पाने असतात *तीन*
 अमोलराव माळतात गजरा माझ्या केसात लावून पिन☘

४.तीन नंतर येतो क्रमांक *चार*
अमोलराव शिकवतच नाही मला  चालवायला कार🚗

५. *पंच* खाद्याचे मोदक ठेवते गणपती बाप्पाला,
अमोल- रुपालीची जोडी अशीच राहो सदा मागणे मागते विघ्नहर्त्याला 🙏

६.तीन अधिक तीन होतात *सहा*
 पावसांच्या सरीं बरोबर अमोलराव म्हणतात करना गं रुपाली गरम गरम चहा☕

७.सप्तऋषींचे तारे गगनात दिसतात *सात* 
'अर्णव' नावाचा तारा आला अमोल- रूपालीच्या जीवनात⭐

८.महाराष्ट्रात अष्टविनायकांचे स्थान आहेत *आठ* 
हरितालिके करिता  नेसते अमोलरावांची आवडती हिरवी पैठणी ज्याला आहेत भरजरी काठ🥻

९.देवीच्या नवरात्राचे असतात दिवस *नऊ* 
अमोलराव आणि मी दोघे मिळून सुरात भजन गाऊ🎶


१०.एक पासून केली सुरुवात आला आकडा *दहा* 
बघता बघता श्रावण संपला गणेशोत्सवाची तयारी करतात अमोलराव पहा.🚩

*सौ. रुपाली अमोल बोंद्रे*
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *
*हरितालिका उखाणे*

ओटी घेते पदरात नमस्कार करते वाकून अनिल रावांचं नाव घेते तुमचा मान राखून

हरितालिकेच्या दिवशी भरते मी ओटी अनिल रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहा पोटी

हरतालिकेच्या दिवशी खायचं नसतं काही अनिल राव नसले कि बोर होतं बाई

देवघरात माझ्या मंद तेवतो दिवा मंगळागौरीला मागण मागते अनिल रावांना सुखी ठेवा

महादेवाला आवडते बेलाचे पान अनिल राव म्हणतात तुमचा ग्रुप फारच छान

               नंदा भोयर
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वरचित उखाणे

इंदरधनुष्य च्या सात कमानी सात जन्माचा सात गाठी, देवेंद्र रावाचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.

शंकरा साठी गौरीने केले मंगळागौरीचे पूजन देवेंद्र रावांचे नाव घेते झाडांवर होते पक्षांचे कुंजण.

सती साठी केलं शिवाने तांडव देवेंद रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या अंगणात पडला मांडव

साजूक तुपात भाजला रवा देवेंद्र रावांचा सहवास मला नेहमीच हवा

घागर घेवून निघाली मी पाणी आणावयास  तळ्यावर देवेंद राव म्हणतात मला चल ग सखे माळ्यावर

माधुरी भुते
[8/22, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा उपक्रम

     उखाणे लेखन 

1-- श्रावणातील हिरवळ पाहुनी          
         भान माझे हरपले,
      उपवासाच्या दिवशी पंकज 
      रावांनी घास मला भरवले.

2-- मंगळागौरी साठी गौर मी 
      पेरली,
        पंकज रावांचं नाव घ्यायला
        मी थोडी लाजली.

3-- रोज सकाळी असते
      कामाची खूप घाई,
      पंकज रावांचं नाव घेते 
      वरद अन सिद्ध ची आई

4-- चंद्राची कोर दिसते किती 
      छान,
      पंकज रावांच्या मनात पहिलं 
      माझं स्थान.

5-- सागरात असतात शंख
     आणि शिंपले,
     पंकज रावांच्या प्रेमात
      मी गुंतले.

    -पुनम डहाके,भंडारा.
[8/22, 10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वरचित उखाणे
मंगळागौरीची वाचली कहाणी
नरेंद्रराव आहेत माझ्या सौभाग्याचं धनी

चंद्राची कोर लाविली भाळी
नरेंद्ररावांचे नाव घेते मंगळागौरीच्या वेळी.

हातभर चुडा घातला सौभाग्याचा
भाळी कुंकू लावते नरेंद्र रावांच्या नावाचा.

गौरी गणपती ला दुर्वा जास्वंदीच पुजन
नरेंद्र राव माझेच सजन.
सौमीरा शेबे भंडारा

सागरातील मोती शिंपील्यात भरले
नरेंद्र रावांच्या रुपात माझे मन हरले.
[8/23, 10:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मी पण माझे गळून जावे
सतत तुला स्मरावे
प्रभातकाळी मुखी
तुझे गोड नाम यावे
मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया
                   नंदा भोयर
[8/23, 10:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

       ""संस्कारधारा"" (३९)

धकाधकीतून काढावा वेळ
हरीनामाचा साधण्या मेळ
जपा मनी  रंगून  नामरंग
तया अंगणात नाचे पांडुरंग.

दनाअ, नागपूर
दि.२३/०८/२०२०
[8/23, 10:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌷🌷प्रभात वंदना - ८🌷🌷
----------------------------------------

आज आहे भाद्रपद शुध्द पंचमी
करूया सप्तऋषींचे स्मरण
व्रत, उपवास, पुजन करू
व्रत ऋषीपंमीचे आचरण.....
सुप्रभात.......
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ. शितल श्रीकांत ठवकर.
(तुमसर रोड, देव्हाडी, तुमसर)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (९७)

       "स्वरचीत गणपती आरती"

जयदेवा जयदेवा जय गौरीहरा
तुज ओवाळीतो हे विघ्नंहरा।।धृ।।

भाद्रपद मासी गणेश चतुर्थीला
मनोभावे पुजन स्थापुन घरा
दुर्वा,शेमपत्री,बिल्वपत्रासह
सेज लागली तुज सिंहासना(०१)जयदेवा....

रंगीबेरंगी दिव्यांची आरास
सजविला तुजला सुंदर मखर
हाती पंच आयुध मुषक वाहन
आळविती बालक तुज लंबोदरा(०२)जयदेवा....


नेत्राने तुझीया सुक्ष्म पाहशी
भक्ता आर्जव काना ऐकशी
दोष सर्वांचे उदरा ठेवशी
तुझ्या नामाने तरीणं भवसागरा(०३)जयदेवा....

तुझ्या उत्सवा भजन पूजन
लहानसान तुज कार्यात मगन
संकटाचे तुम्ही करावे हरणं
मज पामराला सांभाळ कृपाळा(०४) जयदेवा....

दशरथ अतकरी,नागपूर
दि.२३/०८/२०२०
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

ऋषीपंचमीला देह त्यागीला
पावन ती शेगाव नगरी
अनुभवती परब्रम्हस्वरूपी
गुरू गजानन माऊली
जय गजानन
सौ.प्रतिभा सोपान वाठ (गरबडे)
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹पहाटवारा🌹

नदीच्या पात्रात करावे  स्नान
सप्तर्षी अरुंधतीचे करा स्मरण
मुक्ती जन्मोजन्मी च्या पापातून
यासाठी ऋषिपंचमी व्रत आचरण.

     .  सौ.वीणा द. अतकरी. 
          नागपूर.
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आरती*


*आरती गणपतीबाप्पा*
आमचे रक्षण करता 
सुखकर्ता दुःखहर्ता 
तुम्ही बुद्धिदाता llध्रुll
आरती गणपती बाप्पा....

जास्वंदीचे फूल आवडे 
सोबत दुर्वा आणि शमीपत्रे 
नैवेद्य मोदकाचा
भक्त आतुर दर्शन मात्रे ll१ll

चंदनाचा टिळा भाळी 
शोभे पिवळे पितांबर 
माळ कंठी गळा
असे रूप सुंदर ll२ll

टाळ मृदुंग गजरात
ओवाळीते भक्तगण
कृपादृष्टी सदा ठेवा
हेच मागणे आता ll३ll

✍ सौ. रूपाली अमोल बोंद्रे ,भंडारा
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा उपक्रम 
आध्यात्मिक  कवीता
गणपती  आरती

जय देवा जय देवा
जय गणराया
आरती ओवाळीते तुज मोरया.....

तुझ्या भक्तीची आस इतुकी
गौरीपुत्रा गजानना
प्रथम वंदनीय श्रीगणेशा
लंबोदरा हे गौरीनंदना....


गणाधिशाय तु गौरीपुत्राय तु
सर्व  देवांचा देव तु
सुखकर्ता तु दुःखहर्ता तु
दिनदयाळा अष्टविनायका तु......


बारा नावे तुझी देवा
भावभक्तीने आम्ही करीतो वंदना
अडले नडलेले आम्ही
सर्व आम्ही करीतो तुझा धावा
हे सकल जनांच्या देवा.....


दयावंता कृपावंता कोरोनाला लाव पळवुन
विद्यार्थ्यांना येऊ दे नियमितता शाळा सुरु होऊन
भक्तगण एकविस मोदक तुझ्या  आवडीचे करीती
एकविस दुर्वांकुर फुले वाहती......

सौ.सुषमा एस.पडोळे भंडारा
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *स्वरचित गणपती आरती*
*************************
 आरती ओवाळू
 श्री गणराया |
संकट हर सार्‍यांचे
भक्त पडती पाया ||

लंबोदरा तुझे नाव किती रे
गजवक्र कुणी गणपती म्हणती रे
लाडू, मोदक आवडे तुजला 
संकटी धावून तार भक्ताला ||
आरती ओवाळू श्री गणराया....... 

दुधाचा अभिषेक तुला घालते 
जास्वंदाचे फुल चरणी वाहते 
दुर्वांची जुडी तुजला आवडे 
दृष्टी ठेव आम्हावर घालते साकडे ||
आरती ओवाळू श्री गणराया..... 

वाद्यांच्या गजरात आगमन झाले 
आनन बघून धन्य मी झाले 
बुद्धीचा देवता तुजला म्हणतो 
आरती करून गुणगान गातो ||
आरती ओवाळू श्री गणराया....... 

*सौ. स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अध्यात्मिक कविता*
पूजेत पहिला मान
श्री गणेशा तुला
प्रसादामध्ये मोदक
आवडती तुला

लाल फुले दूर्वा
पाहिजे पूजेला
गुलाल अक्षदा
वाहते तुला

विघ्नहर्ता म्हणून
तुझी आहे ख्याती
मोदक नेहमी
असतो हाती

श्रावण महिन्यात तुम्ही
घरी आमच्या येता
दहा दिवस राहून
लळा लावून जातात

                ‌‌नंदा भोयर
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गणपती स्वरचित आरती
 
जयदेव जयदेव जय गणपतीबाप्पा शरण तुला देवा आरती ओवाळी ते लंबोदर,विघ्नहर्ता जयदेव जयदेव.....

तूच सुखकर्ता,तूच दुखः हर्ता
सर्व जगाचा पालनकर्ता
सर्व पूजेत प्रथम मान
होती शुभकार्यासाठी सुरुवात
जय देवा जयदेव.....

घालून पितांबर,उपरणे शेला
गळ्या मध्ये मोती माळ
पाया मध्ये वाळा,सुफा एवढे कान
सोंड तुझी लांब,तूच एकदंत
जयदेव जयदेव......

अर्पून तुला लाल फुल,अक्षदा,दुर्वा
आवडतात तुला २१मोदक
वाहन तुझे मूषक
बुध्दीचा देवता, दे आशीर्वाद 
राहू दे कृपादृष्टी,गौरीपुत्रं शिवसुता.
जयदेव जयदेव...

माधुरी भुते
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गणेशोत्सव विशेष
 
स्वरचित गणपती आरती

जय देव, जय देव, 
जय श्री गणपती राया
आरती ओवाळीते
पडते मी पाया ।। जय देव---

प्रथम वंदन तुला करुनी
शुभकार्य होई आरंभ
आदी दैवत तुच बाप्पा
तुझ्या नावानेच  विद्यारंभ 
प्रेम ,कृपा असुदे , सत्यप्रकाश
 दावाया ।। जय देव---

पार्वतीचा सूत शोभे
मोती माळ,हार गळा
घुंगुरवाळा पायी
कपाळी चंदन टिळा
श्रद्धेने साष्टांग घालती, तू विशाल छाया।।जय देव---

विघ्नहर्ता, बुद्धिदाता
महान भावाने भक्तगण येती
वाहती जास्वंदी फुले, दुर्वा
भक्तिभावे आरती करती
संकट नाशवंता ,देसी तू आम्हा माया ।।जय देव--

आवडती तुला भारी
लाडू, मोदक अन मेवा
मूषक वाहन सांभाळी
सारे तुझे देवा
स्तोत्र, स्तवन म्हणुनी,भक्त येती
प्रसाद घ्याया ।। जय देव---
----------------------------------------
       मंगला डहाके, भंडारा
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: Il स्वरचित गणेश आरती ll

जयदेवा जयदेवा जय गजानना l
आरती ओवाळीते गौरीनंदना ll धृ ll
चंदनाची उटी तुज गणराजा
शेंदूर लाल चढवी तव गजमुखा
उंदरावर बसुनी येशी दुडदुडा
नैवध्य तुज मोदक लाडवाचा ll1ll

नेसविला तुज पितांबर पिवळा
भाळी लावीयला कुमकुम टिळा
कंठी शोभतसे मोत्यांच्या माळा
रुनझुन वाजती चरणीच्या वाळा ll2ll

भाद्रपद मासी तुझी स्थापना
संकटी पावावे मज गजवदना
पूर्ण करी माझी मनोकामना
विघ्नहर्ता तुझी प्रथम वंदना ll3ll

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: Il स्वरचित गणेश आरती ll

जयदेवा जयदेवा जय गजानना l
आरती ओवाळीते गौरीनंदना ll धृ ll
चंदनाची उटी तुज गणराजा
शेंदूर लाल चढवी तव गजमुखा
उंदरावर बसुनी येशी दुडदुडा
नैवध्य तुज मोदक लाडवाचा ll1ll

नेसविला तुज पितांबर पिवळा
भाळी लावीयला कुमकुम टिळा
कंठी शोभतसे मोत्यांच्या माळा
रुनझुन वाजती चरणीच्या वाळा ll2ll

भाद्रपद मासी तुझी स्थापना
संकटी पावावे मज गजवदना
पूर्ण करी माझी मनोकामना
विघ्नहर्ता तुझी प्रथम वंदना ll3ll

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गणपतीची आरती

जयदेव जयदेव जय गौरीतनया,
जय गणपती बाप्पा,
वंदन करीते तुज एकदंता,जयदेव जयदेव.

भाद्रपद चतुर्थीला तुझे आगमन,
ढोल ताशाच होतो मोठा गजर,
रूप तुझे पाहण्या आतुरले मन.
जयदेव जयदेव......

गौरीपुत्र तू सिद्धिविनायक,
विघनहर्ता तू मंगलदायक,
आळविती भक्त तुज  कार्य आरंभा.
जयदेव जयदेव......

एकवीस दुर्वा जास्वंदी फुलांचा हार,
पायी वाजती रूणझुण नुपूर,
मोदक लाडू प्रिय तूज हे गजवदना.
जयदेव जयदेव.......

चौदा विद्या चौसष्ट कलेचा अधिपती,
 रिद्धी सिद्धी तू गणाधिपती,
दे कृपेचा वरद हस्त आम्हा लेकरा.
जयदेव जयदेव......  
                              सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                खामगाव.जि.बुलडाणा
                                 दि.23.08.2020
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बा. कु. सा. सं. प.

        --बाप्पाची आरती--

जयदेव जयदेव जय गौरीसुता
तुझिया नावे चालते सत्ता!! - जयदेव जयदेव

भाद्र चतुर्थीला झाले आगमन
मखर सजवुनी केले स्थापन
आरती करुनी वाटला प्रसाद!! - जयदेव जयदेव 

कोरोना ने आले संकट भारी
सर्व भक्तांची झाली उपासमारी
सगळ्यांना काढ या त्रासातून!! - जयदेव जयदेव

बेरोजगारीचा गरिबांना मार
मुलाबाळांची झाली मोठी आबाळ
हास्य चेहऱ्याचे आण परतून!! - जयदेव जयदेव

लहानसाण जमली सारे जण
बेलपत्र, दुर्वा, शमीपत्री, जास्वंद
वाहूनि तया झाला आनंद!! - जयदेव जयदेव

सौ.विणा द.अतकरी, नागपूर
दि.२३/०८/२०२०
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वरचित
।।गणपती आरती।। 

जयदेव जयदेव जय जय शिवशक्तीपुत्रा....
तुझ आधी वंदन समस्त देवा..जय देव जय देव...

चरनी तुझ्या जास्वंदाचा राज
गळ्यात तुझ्या दुर्वांची माळ।।
मोदक तुझा आवडीचा फार
लाडवाच्या नैवेद्याला तेवढाच मान।।
जयदेव जयदेव जय जय शिवशक्तीपुत्रा...

मानवी देव आवडता तु
बालमंडळी सखा आवडता तु।।
कर्माचे भोग भोगण्यास तु
सुख आणि दुःख देतोस तु।।
जयदेव जयदेव जय जय शिवशक्तीपुत्रा...

बारा रूपी तुझे अवतार
मस्तकी तुझ्या सिन्दुर ललाट।।
मुषक तुझा सदैव वाहक
दुःखी संदेश पोहचवितो तुझवर।।
जयदेव जयदेव जय जय शिवशक्तीपुत्रा....

गरीब श्रीमंत सर्वच तुझे भक्त
ज्ञानाचा विश्वास तुझवरच  फक्त।।
ईच्छाआकांक्षा करतोस पुर्ण
धरतीचा रक्षक तुच आहेस मस्त।।
जयदेव जयदेव जय जय शिवशक्तीपुत्रा...

सौ.चंदा वनवे शेंडे नागपुर.
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वरचित आरती.

  ।। 🌺बाप्पा🌺।।

आरती गौरी सूता
कृपावंत भगवंता
मनोभावे ओवाळीतो
सकल भक्तांच्या दासा ।।धृ।।

सेंदूरासूर वधिला
नाम जगी धन्य झाला
असा तू बलशाली
दिली दृष्टांना सजा।।आरती गौरी...१

मूशक वाहन धारी
पितांबर भरजारी
शोभतसे तनूवरी
तेजोमय तूझी गाथा।।आरती गौरी..२

तू ग्यानिवंत भारी
कार्तिके पृथ्वी प्रदक्षिणा मारी
फेर्‍या मारुनी गौरीला
क्षणात शर्त पूर्ण करी।।आरती गौरी....३

भाद्रपद मासात येशी
घरघरात आनंद सर्वदिशा
करती शान थोर पूजा
आरती गौरीसूता .......

सौ. के.बी.सार्वे भंडारा.
२३|८|२०२०.
[8/23, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वरचित गणपती आरती
जयदेव जयदेव जय श्री गणेशा,स्वामी गणेशा,
आरती ओवाळीता हरली भवचिंता जयदेव जयदेव....
भाद्रपद चतुर्थीला आगमन तुझे होते,
तुझ्या आगमने मन हर्षीते।।१।।
तुझ्याचसाठी केल्या आरक्त पुष्पाच्या माळा
माळा घालूनी तु दिसशी साजिरा।।२।।
उंदरावरी बैसुनी गणपती आला,लाडू मोदकाचा प्रसाद अर्पिते त्याला।।३।
तु विद्येचा स्वामी,
तु भाग्यविधाता,
जिव्हाही न थको तुझे गुणगाता।।४।।
संकटी भक्तांच्या ये
धावुनी आता,
तुच विघ्नहर्ता तुच      स्फुर्ती दाता।।५।।
          सौ.सरोज मते
                दारव्हा
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌸🌸प्रभात वंदना - ९🌸🌸
----------------------------------------
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

मंगलमूर्ती गजाननाची आपल्या 
सर्व कुटुंबियांवर कृपा राहो
दररोज सकाळ संध्याकाळ 
आरति, नैवेद्य तयार राहो..... 
सुप्रभात.... 
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सौ. शितल श्रीकांत ठवकर. 
(तुमसर रोड, देव्हाडी, तुमसर) 
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹|| *अलगूज* ||🌹
         *क्र.५५*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
 
*गणेशोत्सव सुरू झाला*
*आसमंतात चैतन्य पसरले*
*दहा दिवसांसाठी पर्वतीला सोडून*
*गणपती बाप्पा माझ्या घरी  आले*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*सौ स्वाती सेलोकर* 
*भंडारा*
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

         ""संस्कारधारा"". (४०)

कोरोणानं बाकी बिमा-यांचे काय झाले?
रूग्नाअभावी दवाखाने ओस पडले
वैद्यक कर्मचा-यांचे पगार किती रखडले
शिलेदारानं कोरोणा रूग्न घेण्यास दटावले.

दनाअ, नागपूर
दि.२४/०८/२०२०
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.५२*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*सुमनांचा गंध जेव्हा*
*सर्वत्र पसरू लागतो*
*सृष्टी वरचा जिवंत*
*नजाराही व्यक्त होतो*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌷🌷पहाटवारा🌷🌷(१९)

पार्वती पुतळा बनवी मळाचा
सुंदर नक्षीदार आकाराचा
नाव त्याचे ठेवले श्रीगणेशा
विद्यावान पुत्र शंकर पार्वतीचा. 

 सौ. वीणा द. अतकरी.
            नागपूर.
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

हिरव्या दुर्वांकुरावर
जास्वंदी फुल
बाप्पांच्या मुर्तीची
मनास भूल

सौ. प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि .के.सा.सं.प. (९८)

       ""मयुरेश्वर""  ( मोरगाव)

अष्टविनायकात मान
पहिला मयुरेश्वराचा
उंच गढीवर स्थापीले
रक्षण त्या गडकोटाचा.

बहामनी  राजवटी  काळी
मध्यभागी काळ्या दगडात
मजबूत मंदिर बांधकामानं
वाचविले परकी  हल्ल्यात.

मयुरेश्वराची बैठकी मुर्ती 
डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख
डोळा,बेंबीत हिरे माठवले
डोक्यावर नागफणी प्रमुख.

माजला उत्पात नाशच केला
सिंधुसुराला करण्यास ठार
मयुरावरती झाले आरूढ
म्हणुन नाव मयुरेश्वर थोर.

मोरांचे वस्तीनं झाले मोरगाव
थोर उपासक मोरया गोसावीनं
रथातून नेतांना मुर्ती नंदीची
तुटले चाकं नंदी पुढेच स्थापन.

दनाअ, नागपूर
दि.२४/०८/२०२०
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक
पहिला गणपती
मोरगावचा मयुरेश्वर

बहामनी काळात बांधलेलं
गावाच्या  मध्यभागी असलेलंं 
मशिदीसारखं आकारलेलं
मयुरेश्वर मंदिर मोरगावी वसलेलं.......



प्रशस्त गढी जणु हे मंदिर 
काळ्या  दगडापासुन तयार केलेलं
तिथं बघण्या जाऊ देतात अंदर
मशिदीसारखा आकार  दिलेलं......


मयुरेश्वराची मुर्ती बैठी गाभाऱ्यातील
डाव्या  सोंडेची पूर्वाभिमुख
सुबक मनमोहक बाजु आतील 
ते पाहताक्षणीच प्राप्त नेत्र सुख......


डाव्या उजव्या बाजूला  मुर्तीच्या
पितळी मुर्ती रिध्दी सिध्दीच्या
मुर्ती त्यांच्यापुढे मुषक आणि मयुर यांच्या 
उन्मत्त असुर त्रस्त करीती सिंधू नावाच्या .,...,..


त्याचा नाश करणेप्रित्यर्थ देवांनी 
केली आराधना गणपतीची
गणपतीबाप्पा प्रसन्न होऊनी
वध करुनी खोड मोडली सिंधू असुराची........


तेंव्हापासुन मयुरेश्वर नाव
पडले गणपतीबाप्पाला
मोरांची संख्या भरपुर म्हणुनमोरगाव
सापडली गणेशमुर्ती कर्हा  नदीला .......

जय गणपती बाप्पा

सौ.सुषमा एस पडोळे भंडारा
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अष्टविनायक  पहिले -मोरगावचा मयुरेश्वर*

अष्टविनायक पहिला मान 
मोरगावचा तू मोरेश्वर 
मोरावर सवार होऊनी 
केला सिंधू दैत्याचा संहार

बहामनी काळातील 
काळ्या दगडाचे देऊळ
चारही बाजूंनी मनोरे 
मशिदीचा सारखे दुर्मिळ

डाव्या सोंडेची बैठी मूर्ती 
पूर्वाभिमुख अत्यंत आकर्षक 
नयन, बेंबी आहे हिरेजडित 
नमन तुझं तूच मार्गदर्शक

वरती असे नागराजाचा फणा 
दोन्हीकडे रिद्धी - सिद्धीचा पहारा
मूषक आणि मयूर समोर छान
आशीर्वाद द्या आम्हा मयुरेश्वरा

*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
           _पहिला गणपती_
       *मोरगावचा मयुरेश्वर*
*************************
   
अष्टविनायक मंदिर
वसले आठ गावी
गणपती बाप्पाची कृपा
 सदैव आम्हावर असावी

मोरगावचा मोरेश्वर 
आहे पहिला गणपती 
काळ्या दगडांचे मंदिर 
आहे दुर्लभ अति..... 

५० फूट उंच संरक्षण भिंत
मशिदीसारखा आकार 
गाभार्‍यात मयुरेश्वराची 
सुंदर मूर्ती साकार..... 

सोंड डाव्या बाजूची याची 
नयनी मढविला हिरा 
मस्तकी नागराजाचा फणा 
मूषक, मयूर दिसती समोरा

माजविला सिंधू असुराने 
भयानक उत्पात धरेवरी
आळविले बाप्पाला देवांनी 
स्वारी आली मयूरावरी

*सौ. स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏🌹 *श्री गणेश*🌹🙏

वाट पहाता श्री गणेशाची
उजाड़ला तो दिवस आनंदाचा
ढोल ताशा च्या गजरात वाजत गाजत आले गजानन 
गजानन आले अमुच्या घरी 
आरूढ़ झाले आसनावरी
नव चैतन्याचा प्रकाश चोहीकडे
 फुलुन गेले चेहरे अमुचे 
अशी ही महीमा गणेशाची 

🙏🍁 *गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया*🍁🙏

*सौ.मनोरमा गजानन तिजारे पुणे*
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक
      मोरगावचा मयुरेश्वर

आठ मंदिर गणपतीची
वसले आठ ठिकाणी
प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील
हे अष्टविनायक म्हणूनी ।।

पहिला गणपती 
मोरगावचा मयुरेश्वर
वसले तीर्थक्षेत्र कर्हा
 नदीच्या काठावर ।।

पुणे जिल्ह्यातील ,बारामती
तालुक्यातील गाव आहे सुंदर
पुरातन काळचे आहे
उत्तराभिमुख मंदिर ।।

सोंड गणपतीची
आहे डावीकडे
गणपतीच्या डोळ्यात अन
नाभीत हिऱ्याचे खडे ।।

पार्वतीपुत्र गणेशाने
सिंधू राक्षसाला मारले
मोरावर आरूढ होऊन
पृथ्वीवर अवतरले ।।

दर्शन घेण्या भक्तांची
अलोट गर्दी असते
श्रद्धा ,भक्ति अर्पून
मांगल्याचे गीत गाते ।।
-----------------------------
    मंगला डहाके, भंडारा
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अष्टविनायक  विशेष काव्यलेखन*
    ~~~~~~~~~~~~~
           _पहिला गणपती_
       *मोरगावचा मयुरेश्वर*
*************************

पुणे जिल्ह्यातील बारामती
 तालुक्यात वसले 
आमचे मोरगावचे मयुरेश्वर 
बाप्पा लाडले

काळ्या दगडापासून बनले
आहे मंदिर पुरातन 
मंदिर आहे सुसज्ज 
होऊद्या कुठलेही आक्रमण

बाप्पाच्या डोळ्यात आणि
नाभीत बसलेला हिरा
मयुरेश्वरा च्या मस्तकावर
नागराजाचा फना 

मशिदी सारखं तोंड आणि
पन्नास फूट उंच संरक्षण भिंत 
देवानी केली आराधना 
सिंधू असुराचा करण्या अंत 

अनंत चतुर्थीला 
भक्तांची गर्दी असते दर्शनाला 
ठेव सगळ्यांच्या मस्तकी हात
सर्वांना आशीर्वाद द्यायला

- पूनम डहाके
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मोरगावचा मयूरेश्वर
🌺🌺🌺
मोरगावच्या मयुरेश्वर
अष्टविनायक तील प्रथम स्थान तुझे
सिंधू राक्षसास वधावयास
मयुरावर आरूढ होऊन
केला द्दैताचा संहार!!

मुर्ती मनोहर,उदर तुझे मोठे
नयनी ,नाभि हिरेजडित
डोक्यावरती नागाचा फणा
सोंड डावीकडे, रिद्धी सिद्धी बाजुला!!

मंदिर प्रशस्त भारी,चांदीचा मूषक
नंदी मंदिरा समोर, नंदी शिवाचे वाहन
कार्तिकाचे वाहन मयुर
आशीर्वाद,तुला दिले जणू पिता, बंधूने!!

देवांनी केली आराधना
तु आलास मोरगांवी
नवसाला पावणारा
करतो सकल जनाचे मनोरथ पूर्ण!!🌺🌺🌺🌺🌺

सौ.माधुरी देवेंद्र भुते
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺मोरगावचा मोरेश्वर🌺🌺
अष्टविनायकांना आहे जगात स्थान,
त्यात मोरगावच्या मोरेश्वराचा प्रथम मान।
मंदिर खुप मोठे त्याला
अकरा पायऱ्यांची सान।
सभामंडपी नंदी झालासे
विराजमान।
रिद्धी सिद्धी मंदिराची
वाढवितात शान।
असे हे मोरेश्वराचे
मंदिर महान।।
सिंधुसुराने उत्पात मांडीला,देवगणांनी विनविले गणेशाला।
मोरावरी बसुनी
असुरांचा विनाश तो केला
मयुरेश्वर म्हणुनी 
प्रसिद्ध झाला।
मोरया गोसाव्याने
 उध्दार केला।।
           सौ.सरोज मते
                 दारव्हा🌺
[8/24, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: Il मोरगावचा मयुरेश्वर ll

पुणे जिल्हा मोरगावी
बैसला मयुरेश्वर
अष्टविनायका मध्यें
त्याचा पहिला नंबर

सभा मंडपी नंदी कासव
आत चांदीचा मूषक
उंच चौथरा दगडी पायऱ्या
रेखीव दरवाजा मोठे मंदिर

रत्नजडीत प्रतिमा
तेजपुंज मूर्ती
बैठी डाव्या सोंडेची
नागराज फणा वरती

आद्यपीठ मृदग पुराण
बविसव्या अध्यायात वर्णन
आधी घेतला वसा
मोरया गोसाव्यानं

मोरावर बसुनी केला
दैत्याचा संहार
अष्टविनायका तुझे
पहिले नाव मोरेश्वर

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/24, 10:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायकातील पहिला गणपती
मोरगावचा मोरेश्वर

अष्टविनायकाचे आद्यस्थान,
मोरगावच्या मोरेश्वरा पहिला मान.
प्राचीन दगडी बुरुज, मंदिर नक्षीदार.
सभामंडपी नंदी कासव,
दीपमाळ शोभे भव्य विशाल

दैत्य सिंधुचा करण्या वध,
मोरेश्वर स्वार होई मोरावर.
मोरेश्वराची मूर्ती मोहक,
डोळे,नाभीत चमके
हिरे रत्नजडित.

मोरेश्वर पावी नवसाला,
यात्रा माघ भाद्रपदाला.
मोरया गोसावीचा वसा,
दर्शन मिळाले साक्षात.
आद्य अनादी सिद्ध मयुरेश्वर,
पहिले मंदिर वसे भुवर.
                              सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                खामगाव.जि.बुलडाणा
                                 दि.24.08.2020
[8/24, 10:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उपक्रम
अष्टविनायक
   पहीला गणपती
मोरगावचा मयूरेश्वर

पुणे जिल्ह्यातील बरामती तालुक्यात
विराजले मयूरेश्वर मोरगावात.
मूर्ती सापडली क-हा नदीपात्रात.
वाळूकण लोहकण हिरा असे मूर्तीत.

लोचणी,नाभी स्थानी जडले हिरे
नागराज फणा शिरावरी धरे
डाव्या सोंडेची मूर्ती पूर्वाभिमुख
आपल्या भक्तांना दाविते सुख.

डावी उजवीकडे रिद्धी सिद्धी उभ्या
मूषक पुढ्यात राखी नैवेद्ध्या
शंकराचे नंदी देऊळाच्या पुढेच
जागचा हलेना रथाचे तुटले चाकं

सिंधू असूराने मांडला उत्पात
देव सारे हरले त्याला देण्या मात
गणेश आले मोरावर आरूढ
सिंधू दैत्याचा केला बिमोड.

काळ्या दगडात बांधले देऊळ
पन्नास फूटाचा परकोट सबळ.
मशिदी सम आकार देऊन
मुघलांपासून संरक्षण कारण.

मोर विपुल असती परिसरात
मोरगावची प्रसिद्धी असे नावात
अष्टविनायकामध्ये प्रथम स्थान
मोरगावच्या मयूरेश्वरास माझे नमन.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/24, 10:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ""मयुरेश्वर""  (मोरगाव)

मयूरेश्वराचा मान आहे
अष्टविनायकातील पहिला
उंच गढीवर मंदिर पारकोट
काळ्या पाषाणात बांधिला.

मोरगावचा मोरेश्वर 
भव्य दिव्य  मंदिर
मोरीया गोसव्याने
केला  जीर्णोद्धार.

मोरावर बसुन बाप्पाने
सिंधू सूराला केले ठार
उत्पातातून जणा रक्षीले
म्हणूनच नाव  मयुरेश्वर.

नंदी मूर्ती नेतांना तुटले
रथाचे चाक पुढे मंदिराचे
तिथंच नंदी मूर्ती स्थापले
यावे दर्शनास मयुरेश्वराचे.

   सौ. वीणा द. अतकरी.  
            नागपूर.
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

     ---संस्कारधारा-- (४१)

बाप्पा तुमच्या आगमनाने
कुठेही ना उत्साह दिसते
भितीने सर्व घरातच दडते
दरवर्षी किती जल्लोष असते.

दनाअ, नागपूर
दि.२५/०८/२०२०
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌼प्रभात वंदना - १०🌼
----------------------------------------
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

भगवंत श्री गणेशांची कृपा
असो आपल्यावर सदा
प्रत्येक कार्यंत यश मिळो
जीवनात सुख, शांती राहो सदा.... 
सुप्रभात...... 
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
सौ. शितल श्रीकांत ठवकर. 
(तुमसर रोड, देव्हाडी, तुमसर) 
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹|| *अलगूज* ||🌹
         *क्र.५६*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
 
*भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर*
*गौरीचं आगमन झालं घरोघरी*
*जेष्ठा नक्षत्रावर करती पूजन*
*म्हणून म्हणती हिला जेष्ठागौरी*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*सौ स्वाती सेलोकर* 
*भंडारा*
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺पहाटवारा🌺🌺

भाद्रपद शुद्ध सप्तमीला
ज्येष्ठा गौरींचे आगमन
देती पंच पक्वान्न भोजन
दोन दिवसांचे माहेरपण.

सौ. वीणा द. अतकरी. 
             नागपूर.
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

गौरीचे आगमन
सोनपावली पदार्पण
दारी तोरण,फुलांच्या माळी
सवाष्णी उभी दारी.

गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.५३*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*गर्दी करत नसलो दर्शनाला*
*तरी मनी भाव तोच आहे*
*डोळे मिटून जोडले दोन्ही हात*
*समोर गणराया दिसतो आहे*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शुभ प्रभात

गणेशाचे पूजन सुरू
ज्येष्ठ गौरीचे आगमन
सोन पाऊलानीं घरी आली
तोरण बांधून फुलांनी करूया स्वागत!!🌹🌹

माधुरी भुते
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आज ज्येष्ठा गौरींचे आगमन
करू प्रेमभावना वंदन 
धन धान्य समृध्दी उधळण
रोगराई करोनाचे उच्चाटन 

सौ, विद्या सार्व नागपूर
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
अष्टविनायक विशेष काव्यलेखन(९९)

        ""सिध्दटेकचा सिध्देश्वर""

सिद्धटेकचा सिध्देश्वर उजव्या सोंडेचा
अष्टविनायकात कडक सोवळ्याला
भिमेच्या किनारी वसले स्वयंभू
मुर्तीत सिध्दिविनायकच शोभला.

उत्तरमुखी बैठकीची मुर्ती  
एका मांडीवर रिध्दिसिध्दी
पाण्यातून नावेनं भक्त जाती
गजमुखी विशाल तीन फुटी.

इथेच झाली  श्रीविष्णुला
सिध्दी प्राप्तीची अनुभुती
कार्याला सिध्दीस नेणारा
म्हणून सिध्देश्वराची प्रचीती.

पितळेच्या प्रभावळीवर शोभे
आकृती चंद्र,सुर्य,गरूडाची
मध्यभागी शोभला नागराज
प्रदक्षिणा होती लांब अंतराची.

अहिल्याबाई होळकरांनी
केला मंदिराचा जिर्णोद्धार
भिमा नदीला बांधून पुल
केला भक्तांचा सहज संचार.

दनाअ, नागपूर
दि.२५/०८/२०२०
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
            दुसरा गणपती 
    *सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर*

*************************
  
सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर
आहे दुसरा गणपती
अहमदनगर जिल्ह्यात
वसले नायक अधिपती

तीन फूट उंच मूर्ती
उजवीकडे याची सोंड
स्वयंभू गजमुखी मूर्ती
उत्तरेकडे याचे तोंड

मांडी घालून विराजमान
त्यावर रिद्धी सिद्धी बसती
प्रभावळीवर चंद्र ,सूर्य गरुड
मध्यभागी नागराज दिसती

मंदिराचे आवार प्रशस्त
गाभाऱ्यात सिद्धेश्वर मूर्ती
विष्णुस लाभला आशिर्वाद
झाली त्याची कार्यपूर्ती

*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक-२

।।🌺सिद्धटेकचा सिद्धेश्वर🌺।।

सर्व कार्य सिद्धीस 
नेई सिद्धटेकचा सिद्धेश्वर
अष्टविनायकातील मानाचा
दुसरा असे तो लंबोदर ।।

विष्णूला सिद्धी प्राप्त
करुन देणारा तो सिद्धेश्वर
उत्तराभिमुख गजमुखी
स्वंयभू मूर्ती चमत्कार ।।

उजव्या सोंडे गणपती
सोवळे कडक पाळती
रिद्धी सिद्धी मांडीवरती
मधे नागराज लक्षवेधी ।।

चंद्र,सूर्य,गरुड सर्वांची
विरासत आहेच येथे
एक किमी ची एक
प्रदक्षिणा  होऊन जाते ।।

गाठण्या निश्चित ध्येय
असावे सदा कटिबद्ध
नमामि सिद्धेश्वरा
कार्य होतेच सिद्धबद्ध ।।

सौ.के.बी.सार्वे भंडारा.
२५|८|२०२०.
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक विशेष काव्यलेखन
दुसरा गणपती
सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर--

अहमदनगर जिल्ह्यातील
सिद्धटेकचा सिद्धेश्वर
3 फूट उंच, अडीच फूट रुंद
उजवी कडल्या सोंडेचे बाप्पा हे अवतार।।

अष्टविनायकातील दुसरे
आहे सिद्धेश्वर मंदिर
भीमा नदीच्या किनारी वसले
कडक सोहळ्याचे गणेश सुंदर ।।

उत्तर मुखी आहे कडक गणपती
एका मांडीवर रिद्धी सिद्धी
कार्य सिद्धीस नेणारा तू
स्वयंभू तुझी गोड मूर्ती ।।

चंद्र-सूर्य-गरूड आकृत्या
प्रभावळी वर आहे यांच्या
मध्यभागी नागराज
पावतो श्रद्धेला भक्तांच्या ।।
-----------------------------------
      मंगला डहाके, भंडारा
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺
अष्टविनायक दुसरा गणपती सिध्दटेकचा सिद्धविनायक
सिद्धटेकचा सिद्धेश्वर
मुर्ती गणाची स्वयंभू साकार।
सदाशिवाने उपदेशुन
भगवान विष्णूच्या करी स्थापिली गणेशाची मूर्ती 
करुन गणाची आराधना
विष्णूने संहारीले असुरांना
ऐसी याची महती महान
उजव्या सोंडेचा गजानन
पाहतसे उत्तरेस
ठान मांडुनी बैसला गण
रिद्धी सिद्धी त्याही मांडीवर
प्रभावळी चंद्र, सुर्य, गरुड
मधोमध वसला नागराज
असे गणाचे रुप गोरस
पितळी देवाचे मखर
बसण्या पाषाणाचे आसन
असा हा सिद्धविनायक
व्रत याचे महा कठीण
नित्य दुर्वा जास्वंदाचा मान,सिद्ध करितसे मनीचा पण।।
          सौ.सरोज मते              
                  दारव्हा🙏🏻🙏🏻
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    ~~~~~~~~~~~~~~~
     *अष्टविनायक  विशेष काव्यलेखन*
    ~~~~~~~~~~~~~
            दुसरा गणपती
*************************
   *सिद्धटेकचे सिद्धेश्वर (सिद्धिविनायक)*

पहिले जावे लागे होडीने 
आता झाला भीमा नदीवर पूल 
कार्य सिद्धीस नेणारा सिद्धिविनायक
दर्शनाला जावे घेऊन जास्वंदीचे फुल

सिद्धटेकचा सिद्धिविनायक 
उजव्या सोंडेची एकमेव मूर्ती 
आहे अष्टविनायकांपैकी एक 
सोहळे असे कडक सर्वदूर कीर्ती

तीन फूट उंच व अडीच फूट रुंद 
अशी स्वयंभू मूर्ती डोंगराला जोडलेली
रिद्धी सिद्धी मांडीवर बसलेल्या 
अशी एक मांडी गणेशानी घातलेली

प्रभावळी चंद्र-सूर्य-गरूड 
मध्यभागी असे नागराज 
मूर्ती दिसे फार शांत, सुंदर
अष्टविनायकांमधील दुसरे गणराज

*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
*************************
💢💢💢💢💢💢💢💢💢💢
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रचियता साहित्य मंच,नागपूर
*************************
     *अष्टविनायक  विशेष काव्यलेखन*
    ~~~~~~~~~~~~~
           _दुसरा  गणपती_
             *सिद्धेश्वर*
*************************

सिद्धटेकचा सिद्धिविनायक
आहेस तू अहमदनगरची शान
कार्य सिद्धीस नेणारा
भक्तगण देतात तुला मान।।

उजव्या सोंडेचा तू
एकुलता गणपती
मूर्ती तीन फुटाची
सर्वत्र तुझी कीर्ती।।

उजवीकडे सोंड तुझे
सोवळे ही कडक
भक्तांना होईल थोडा त्रास
पण तूच करी सार्थक।।

रिद्धी सिद्धी बसल्या 
गणपतीच्या मांडीवर
एक प्रदक्षिणा साठी
चालावे एक किलोमीटर।।

- पूनम डहाके,भडांरा.
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक काव्यलेखन
दुसरा गणपती
सिध्दटेकचा श्री सिध्देश्वर

अहमदनगर जिल्ह्यातील 
सिध्दटेक याचेच दुसरे नाव सिध्दिविनायक
आहे  हा सिध्दटेक येथील 
देऊळ असे हे अष्टविनायकांपैकी एक..,,.


सिध्दि प्राप्तकर्ता श्री विष्णुला
नेणारा हा कार्यसिध्दिला
एकमेव गणपती उजव्या  बाजु सोंड असलेला 
दुसरा गणपती हा अष्टविनायकांमधला.....

मूर्ती स्वयंभू सिध्दिविनायकाची
तीन फुट उंच व अडीच फुट रुंदीची
तोंड मुर्तीचे उत्तरेकडे सोंड गजमुखीची
सोवळे कडक सोंड उजवीकडची.......

गणपती हा भक्तांसाठी कडक
बाप्पाने एक मांडी घातली
त्यावरी रिध्दिसिध्दि बसलेली 
प्रभावळीवर चंद्र सुर्य गरुड आकृत्या असलेली.......

सौ.सुषमा एस पडोळे भंडारा
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सिद्धटेक,श्री सिधदेश्वर अहमदनगर जिल्हा.
    🌺🌺 सिद्देश्र्वर🌺🌺

सिद्धटेक िचा सिद्धेश्र्वर
अष्टविनायकातील दुसरे स्थान
भीमा नदीच्या काठी
मंदिर बांधले,अहिल्याबाईंनी

३फुटाची मुर्ती,उजव्या सोंडेची
महणून, सोवळे अतिकडक
मांडी घालुन, बसलेली रिद्धी ,सिद्धी, एका मांडीवर

चंद्र सूर्य गरुड प्रभवली
मध्यभागी नागराज शोभे
शिवाने सांगितले मुळे विष्णुने आराधना केली गणेशाची.

विष्णुला सिद्धी प्राप्त झाली
म्हणून सिध्देश्वर, लाल फुल,दुर्वा वाहून
गणेशाची पूजा करता भवभक्तिने
सर्व कार्य सर्वांचे सिद्धीस नेते.🌺
माधुरी भुते

माधुरी भुते

गणेशाची पूजा करता
सर्व कार्य सर्वांचे सिद्धिस नेते.
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: Il सिद्धटेकचा सिद्धेश्वर ll

अहमदनगरी कर्जत तालुक्यात
दुसरे अष्टविनायक सिद्धेशवर
भिमानदीच्या वसे तीरावर
विशाल असे सुंदर मंदिर

गणेशा कृपे विष्णूला मिळे सिद्धी
नाव पडले सिद्धेश्वर गणपती
नदी काठी पवित्र टेकडी
कणकी शिलेची स्थापिली मूर्ती

गुराख्यास झाला साक्षात्कार
अहिल्यादेवीने केला जिर्णोद्धार
गाभारा मोठा प्रशस्त सुंदर
उत्तराभिमुख मूर्ती सुंदर

अभिषेक भिमानदीच्या पाण्याने
पूजा होई लाल जास्वंदाने
नदी ओलांडून जावे दर्शने
अष्टविनायकाची पूजा श्रद्धेने

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/25, 6:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *सिद्धटेकचा सिद्धेश्वर*

भीमा नदीच्या काठी
अष्टविनायकातील दुसरे स्थान
पुजेत आहे तुला
देवा श्री गणेशा पहिला मान

भीमा नदीच्या पाण्याने
अभिषेक होई प्रभात काळी
लाल फुल दुर्वा वाहुन
भक्तगण जाती भारावून

उजव्या सोंडेचा तु गणपती
अफाट आहे तव कीर्ती
काय वर्णावी तुझी ख्याती
नजर असावी आम्हा वरती

                    नंदा भोयर


[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹प्रभात वंदना -१२🌹
----------------------------------------
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रभातकाळी मंगल समयी
मोहरला गुलाब अंगणात..... 
गणपती बाप्पा
आमच्या सर्वांच्या मनात.....
सुप्रभात.....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सौ. शितल श्रीकांत ठवकर.
(तुमसर रोड, देव्हाडी, तुमसर)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

        ""संस्कारधारा"" (४३)

श्रावणानंतर  सुर्यकिरण अवतरले
सृष्टीचे निखळ सौंदर्य बघीतले
होते मन कोंबले पावसाने घरात
रवितेजाने आरोग्य सहज सुधारले.

दनाअ, नागपूर
दि.२७/०८/२०२०
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प -- 61 वे

गौराई माते तुजला
लाख लाख प्रणाम
आदी, अर्थ ,अन्न
लक्ष्मी त्वं  पालयमाम।।
------------------------------
     मंगला डहाके, भंडारा
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌻पहाटवारा🌻 (१६)

ललाटी शोभे मळवट कुंकवाचा
हाती चुडा हिरव्या कांकणांचा
गळा शोभे सर मंगळसूत्राचा
गौराईला मागते दान सौभाग्याचा.

सौ. वीणा द. अतकरी, नागपूर
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.५५*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*गौरी-गणपतीला झालीये सुंदर फुलांची उधळण*
*फुलांचे कोमेजणे असे  गुणधर्म त्यांचा*
*निर्माल्याचे विसर्जन नका करू नदीमध्ये*
*चला समतोल राखूया आपल्याच निसर्गाचा*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पहाट वारा

हिरवा चुडा,हिरवी साडी
महालक्ष्मी अलंकारांनी सजली
पंच्पक्वणानी मेजवानी घेवून
अडीच दिवसाची माहेरवाशीण
माहेराला सुख शांतीचे समृध्दी देवून
हळदीकुंकू लावून सासरी निघाली.
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

अडीच दिवसाचे माहेरपण
धनधान्याची उधळण
सुखसमृद्धी सौभाग्य दान
 गौराईचा आशीर्वाद
हळव्या मने घेती निरोप आज

सौ.प्रतिभा सोपान वाठ (गरबडे)
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏श्री गणेशा🙏
🌺🌺🌺🌺🌺

हे गजानना गणराया,
प्रथम पूजनाचे स्थान तुला,
आरती ओवाळीते तुझी,
स्मरूनी गौरी शंकराला।

        ढोल ताशांच्या गजरात,
         होई तुझे आगमन,
        दहा दिवसांच्या पूजनाने,
         प्रसन्न होई तन-मन।

हे रिद्धी सिद्धी चे दाता,
तूच सुखकर्ता, 
तूच दुखहर्ता,
तूच बुद्धीचा दाता

         वाहन तुझे मुशक,
         आवडती लाडू, मोदक,
         चढती तुला दुर्वा आणि
          जास्वंद लाल पुष्पक
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

सौ. संगीता कढव, भंडारा
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गौराईचे पुजन

भाद्रपद  शुद्ध चतुर्थीला
गणपती बाप्पा आले की
वाट बघती सारे  गौराईची
असे गौराई सर्वांची लाडकी....


महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण
शिवाच्या शक्तीचे गणेशाच्या आईचेरुप मानती गौरीला
भंडारा  जिल्ह्यात  मानती सर्व महालक्ष्मी पुजन.....


येती सोनपाऊले दिड दिवस
दिड दिवसात सर्वांना आकर्षून घेती
गौरीपुजनाच्या विविध असती पध्दती 
धातुची मातीची अथवा सेंच्युरीपेपरवर काढती.....

नविन झाडांची पालवी फुलांची गौरी 
काही ठिकाणी धातुंच्या कोठ्यावरी
मुखवटा बसवुनी सजविती नवरी
नटवुनसजवुन घालून विविध अलंकारी.....


पुरणपोळी गौराईसाठी करीती
सुंदर साड्या  घालती
करीती स्त्रीया गौराईसाठी पंचपक्वान्ने
सर्वत्र गौराई आकर्षकता आणे.......

सौ.सुषमा पडोळे भंडारा
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 
    
          *कविता*
             *गौरी पूजन*

************************
भाद्रपद महिन्यात
गौरीचे झाले आगमन
सुंदर रूप पाहून तिचे 
प्रसन्न झाले माझे मन

साडी शोभे भरजरी
नाकात नथ पुण्यशाही
केसात माळला गजरा 
सोज्वळ रूप  मनमोही

सोळा भाज्या, पुरणपोळी 
चटण्या, लिंबू, कोशिंबिरी 
पंचामृत अन् रुचकर डाळ 
ताट सजविले लई भारी 

रास ठेवली धान्याची 
पंचारती ओवाळली
हळदीकुंकू सवाष्णीला
ओटी त्यांची भरली 

*सौ. स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गौराईचे पूजन--

अंगणात सडा
रांगोळीत नक्षी काढली
सुख-समृद्धी घेऊन
सोनपावले महालक्ष्मी आली ।।

मखर सजवून
तोरण फुलांनी गुंफले
मांगल्याचे प्रतीक
मखमली  शालू नेसवले ।।

आली माहेरवाशीण
हसत आपुल्या माहेरा
साडी चोळी ची ओटी
खणा-नारळाने भरा ।।

बघे उत्साहात गौराई
आनंदात सारे न्हाती
पुरणपोळी, आंबील अन
पंचपक्वान्नांचा नैवेद्य करती ।।

मनोभावे पूजन करून
चैतन्याची बाग फुलवू या
आरती, स्तवनात तल्लीन
आरोग्य ,सदाचरनाचे आशिष घेऊया ।।

लक्ष्मी माते तुजला
लाख लाख प्रणाम
आदी, अन्न, अर्थ लक्ष्मी
 त्वं पालयमम ।।

       मंगला डहाके, भंडारा
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गौराई पूजन

सोनपावलांनी आली।                               माझ्या घरी गौराई
सुख समृद्धी आनंद
घेऊनी येई।।

लाल हिरव्या चोळीत
दिसे तू गोड गोजिरी
गळ्यात मोत्यांचे हार
सजली तू भूवरी।।

ज्येष्ठ कनिष्ठ गौराई पूजनाने
मन आमचे प्रफुल्लित झाले
पुरणपोळी पंचपक्वान्नाचे
नैवेद्य तुला दाखविले।।

भक्त येती नवस
मागण्या तुझ्यापाशी
खना नारळाची ओटी
भरून तू त्यांना पावशी।।

            पुनम डहाके,भंडारा.
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (१०१)

       -::गौराई चे पूजन::-

भाद्रपद शुद्ध सप्तमीला
जेष्ठा गौराई चे आगमन
तीन दिवसांचे माहेरपण
श्रृंगारुण तया करा पूजनं.

घर सारवुन सजवा आसन
नदीतून आणा गोटे दोन
दोन तबकात घ्यावं तांदुळ
त्यावर जेष्ठा,कनिष्ठा स्थापन.

सेज फुलांची दारी तोरणं
रोषणाई विद्युत दिव्यांची
सोळा प्रकारे पान जुड्या
प्रसादा आंबील ज्वारीची.

दुसरे दिवशी पंचपक्वान्न
षोडशोपचारे करा पूजनं
नैवद्य शिजलेल्या अन्नाचं
करा सुख सौभाग्य मागनं.

तिसरे दिनी खणानारळं ओटी
सौभाग्यवतीस हळदीकुंक मान
करुन आरती करावी बोळवणं
सुखा समाधाना व्हावी पाठवणं.

दनाअ, नागपूर
दि.२७/०८/२०२०
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गौराई चे पूजन

 आली आली ग गौराई
 तिला पुजू सारे बाई

 तिचं आहे मोठा थाट
 बसायला द्या ग चौरंग पाट 

 तिच्या नैवेद्याच्या ग भारी सोहळा
 भाज्या चटण्या कोशिंबीर सोळा 

 करंजी पुरी चकली अन पुरण पोळी 
 ताट सजविले ग घालुनी रांगोळी

 साडी घ्या ग भरजरी
 पाऊले तिचे लागले दारी

 खणा-नारळाने बाई भरू ग ओटी
 धनधान्याची रास ठेऊ मोठी 

 तीही भरेल मग आपुली कोठी 


 आशीर्वाद असू दे माते सदा आमचे पाठी 

रंजना हलमारे (सेलोकर )
साकोली
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गौराई पूजन

भाद्रपद सप्तमी मुहूर्ती,
पायघड्या घालू मखमाली.
सोनपावली पैंजण घुंगरू,
आगमन जेष्ठकनिष्ठ  गौराई.

दारी तोरण माळ फुलांची,
अंगणी रांगोळी नक्षीची.
मखर आरासही सजली,
दीपमाळ सुंदर पणत्यांची.

गौराईला पैठणी साड्या,
साजही घातला मोत्यांचा.
डोक्यावरी दुर्वा,आगाडा केना,
गळ्यात हार गुलाबाचा.

शेवचकल्या,लाडूपेढे 
अनरस्यांचे भरले ताट.
फुलोराही सजला पात्या-करंज्याचा,
गौराईसंगे बसले बाळ.

नेवैद्यासाठी पंचपक्वान्न,
आंबील,पुरणपोळीचा थाट.
सवाष्णी भरती ओटी, रास,
आरती प्रसादाची गर्दी दाट.

रात्री जागरण,भजन कीर्तन
गौराई रमती माहेरा.
पाहुणपन होता गौराईचे,
सासरची धरते वाट.

धनधान्याने समृद्ध जीवन,
सौभाग्याचा आशीर्वाद.
हळव्या मनाचा निरोप गौराई,
या पुढल्यावर्षी आनंदात.

                                 सौ प्रतिभा वाठ (गरबडे).
                                 खामगाव.जि.बुलडाणा
                                 दि.27.08.2020
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गौराई पूजन

भाद्रपद सप्तमीला
गौराई च आगमन
घराचं करा सारवण
सजवावे मखरासन.

दोन पायल्यावर 
मुखवटे ठेऊन
तया पेठणी नेसवून
सजविले श्रृंगारून.

सोळा पत्री जुड्या
तबकात धान्य ठेवा
फुलांची करा आरास
आंबिल प्रसाद द्यावा.

दुसरे दिवशी पुरणपोळी
सोळाप्रकारे पंच पक्वान्न
भाज्या,चटण्या, कोशिंबिरी
षोडशोपचार करावे पूजन.

विसर्जनी दिवसाला
खणा नारळ ओटीनं
हळदीकुंकवाचा मान
मनभावे करा बोळवणं.

   सौ. वीणा द. अतकरी. 
           नागपूर.
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय -माझी गौराई*

आली गौराई माझ्या घरी
रांगोळी घालून मी स्वागत करी

गौराई माझी माहेरवाशिन पाहुनी
हळदी कुंकू लावा ग सर्वजणी

सोळा भाज्यां चटण्या आणि पक्वान्न
फळे, फराळ करूया गौराईला प्रसन्न

ज्वारीची आंबील असे त्यांची आवडती
पुरणपोळी आणि कोहळ्याची भाजी सोबतीला असती

कोहळ्याचे पिवळे फुल आवडे गौराईला
सुंदर आभूषणांनी सजवीतो पाहुणीला

खणानारळाची ओटी नवीन साडीची भेट
आशीर्वाद मागते माझ्या गौराईला मनापासून थेट

तीन दिवस उत्साहाचे पटकन सरतात 
परतीच्या दिवसाला डोळे पाणावतात

जड अंतकरणाने निरोप द्यावा लागतो
प्रत्येक वर्षी असाच अनुभव असतो

*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺गौराई🌺।।

माझी गौराई
आली सोनपावली
हसून घेई🌺

नाकात नथ
हाती हिरवा चुडा
चालती संथ🌺

माळी गजरा
परिधान पैठणी
मुख हसरा🌺

उजळ कांती
धन,धान्य,समृद्धी
करते शांती🌺

महालक्ष्मीचे
मनोभावे पुजन
लाभ सर्वांचे🌺

जेष्ठा गौरीला
करु या आवाहन
पावे सर्वाला🌺

करु आरास
नतमस्तक होऊ
देई आशिष🌺

सौ.के.बी.सार्वे भंडारा.
२७|८|२०२०.
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺महालक्ष्मी गौराईपुजन🌺

गणपती असे विराजमान
भाद्रपद सप्तमीला,गौराईचे आगमन
अडीच दिवसाचा माहेराला
सोन पाऊललांनी आली

आगंनी सडा,रांगोळी नक्षीची
 दारी तोरण मखर  कमळाचे
उजळल्या ज्योती समई ने
फुलांची आरास,दिवे झगमगट

नाकी नथ,कानी कुंडल,  
हिरवी साडी,हिरवा चुडा
गळयात सौभाग्य अलंकार
हाती बुगडी,पायी पैजण

सोळा पत्र्या,गळयात हार
डोक्याला शेवंती वेणी 
असा तुझा साज चढवून
मुलांना घेवून सोबत आली.

पहिल्या दिवशी ,साधेच जेवण
अंबाडी भाजी, भाकर
घर समृध्दी संपत्तीने , विद्येने भरलेले 
मायेची विचारणा,केली आईला

दुसऱ्या दिवशी पंच्पक्वणाचे ताट
अनारसे चकल्या,पुरणपोळीचा थाट
१६ भाज्या,१६चटण्या,आंबील
प्रसादाला येथी भक्तगण ग

तिसऱ्या दिवशी भजन पूजन
हळदी कुंकू लावून,ओटी भरून
गा टी पाडून घेई निरोप
देत असे अक्षय सौभाग्य सुख..

माधुरी भुते
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *गौराई पूजन*
गौराई माझ्या घरी
सोनपावली आली
आसनावर बैसूनी
मूर्ती हसरी दिसली

प्रसन्न चेहरा रुप साजेशे
पाहात राहावे तिच्याकडे
अंगणी पाऊल पडता
पडती प्राजक्ताचे सडे

घरात सुगंध प्रसन्नतेचा
दरवळला भारी
नवचैतन्य फुलले
तिच्या आगमनाने माझ्या अंतरी

सोळा भाज्या सोळा चटण्या
अंबिली चा थाट
महालक्ष्मीच्या प्रसादाचा
वेगळाच असतो थाट

             .  नंदा भोयर
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 💐गौराई पूजन💐💐

माझी गौराई साजरी
आली ग माहेरवाशिणी
अडीच दिवसाचे तिचे माहेर,या ग साऱ्याजणी
साडीचोळीने ओटी भरु
तिला सजवु ग आभुषनी
सायंकाळी पूजन करू
धूपदिप लावूनी
गौराईचे रुप पाहूनी
मन  होई समाधानी।।
तिच्यासाठी ग सवाष्णींनी
आणील्या धान्याच्या राशी
करुनी दिव्यांची आरस
पार भरीला सामोरी
आंबीलकथली,सोळा भाज्या  नैवेद्याचाथाट
डोक्यावरी तिच्या ग मी
फुलोरा टांगीला
तिच्यासाठी आवडीने
आघाडाकेना आणिला
लाडू करंज्या अनारसे
पान केले ग पुरणपोळी
काय वर्णू तिचा थाट
हसतमुख ती गौराई
पाहूनी तिचे रुप
मन होई समाधानी
महालक्ष्मी  माझी आई
देई आशिष भरुनी।।
           सौ.सरोज मते
                दारव्हा🙏🏻
[8/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।गौराई पुजन।।

ज्येष्ठगौरी आवाहन तिथ
भाद्रपद शुक्र सप्तमी दिन
गणपती गौरी महालक्ष्मीपुजन
अमुक्तामरण व्रत संबोधन।।

 थाठामाठात गौरी स्वागत
आंगण घर भासे फुलवन
मखमलीचे  चौंरंग आसन
विराजमान होता प्रसन्न भवन।।

रूप तिजवर शोभे तेजस्वी
नाकात नथ असे पुण्यशाही
हातात बांगड्या चुडा शोभती
माथी कूंकवाचा टिळा लखलखती।।

साड़ी नेसवी भरजरीची
भासे जशी जगाची राणी
दर्शन होता वाटे मनी
मागावे सुख पदर पसरवुनी।।

विवीध पक्वान भोजन सार
नवैद्य अर्पन धान्यांची रास
ओटी भरी सवाष्णीनी लाख
सुख समाधान धन-संपत्ति लाभ।।

गौराई पुजन ज्याच्या नशीबी
तो सैदैव भाग्यवान अती
ज्वारी आंबील प्रसाद लाभार्थी
तोच जगात धनवान होती।

सौ.चंदा वनवे शेंडे नागपुर.
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

बुद्धीसागरा
मंगलमूर्ती
तव गुण गाया
मिळावी काव्यस्फूर्ती
सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

          ""संस्कारधारा"" (४४)

स्पर्धा परीक्षांचा हट्ट कोणा अन् कशाला
टक्केवारीनं द्यावा प्रवेश विद्यार्थ्यांला
आयोजनात पोहोचणे धोका रोगाचा
समजून घ्यावं फक्त या दुष्कर वर्षाला.

दनाअ, नागपूर
दि.२८/०८/२०२०
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.५६*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संघर्ष जीवनाचे सत्य आहे*
*जीवन वाटेवर शूल सर्वांच्या आहे*
*आंतरिक शक्तीला आठवून*
 *संयमाने पुढे जायचे आहे*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सिद्धिविनायका एकदंता
दिवस निघून गेले तुझे गुण गाता
मनात दुःख होते
विसर्जन तुझे करता

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
                      नंदा भोयर
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
            चौथा गणपती 
    *महाडचा श्री वरदविनायक*

*************************

 केली घोर तपश्चर्या
 गुत्समद नामक ऋषिंनी
ओम गं गणपतये नमः..
या मंगल मंत्र जपानी

प्रसन्न होऊनी आशिर्वाद 
दिला त्यांना बाप्पांनी
भक्तांची मनोकामना 
करीन पूर्ण येथिची राहूनी

प्राणप्रतिष्ठा  बाप्पाची
केली ऋषि गुत्समदांनी
चौथा गणपती प्रसिद्ध 
 वरदविनायक नावानी 

धोंडू पौढकरास सापडली 
तलावात स्वयंभू मूर्ती 
जवळी जाऊन मूर्तीच्या 
भक्त यास पूजती 

*सौ स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक

महडचा वरदविनायक

रायगड किल्ला  शिवाजी महाराजांचा
चौथा गणपती वरदविनायक महडचा
गुत्समद रुषींनी मणीभद्र अरण्यात केली घोर तपश्चर्या 
ओम गंगणपतये नमः या मंत्र जपाचा.....

त्याकारणे गणपती प्रसन्न झाले
विनंती केली त्यांनी गणपतीला भक्तांची मनोकामना पूर्ण करण्याला
गुत्समद रुषी लागले गणपती स्थापनेला......

वरदविनायक गणपती पुरातन कालीन 
वरदविनायकम्हणजे समृद्धी व यश देणारा
गणेश येथेवरदविनायक या रुपात राहणारा 
येथील मुर्ती स्वयंभू असणारा..,...


ही मुर्ती धोंडु पौढकर यांना 
येथील तलावात सापडली 
देऊळ बांधियले सुभेदार रामजी भिवळकरांनी
महड गावही येथे वसविली......

सौ,सुषमा पडोळे
भंडारा ,
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
      अष्टविनायक विशेष
          चौथे स्थान
  
      -::महडचा वरदविनायक::-

गुत्समद ऋषी मुनी नी
मनभद्र वनात तपस्येनं
🕉️गण गणपतये नमः
जपानं गणपती प्रसन्न.

१६९०साली धोंडु पौडकराला
तलावात ही मुर्ती मिळाली
समृध्दी व यश प्रतीक म्हणून
'श्रीवरद विनायक 'स्थापन केली.

कल्यानंचे सुभेदार
रामजी भिवळकर
मोठ्या सभागृहासह
जिर्णोध्दारले मंदिर.

मंदिर ते पुर्वाभिमुख
पुजा होते मुर्तीजवळ
डाव्या सोंडेचा शोभे
जळते दिवा सर्वकाळ.

अष्टविनायकात चौथे स्थान
करी भक्तांचे दुःख निवारण
जिल्हा रायगड महड ग्राम
चतुर्थीला यावे दर्शन घेऊन.

दनाअ, नागपूर
दि.२८/०८/२०२०
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    ~~~~~~~~~~~~~~~
     *अष्टविनायक  विशेष काव्यलेखन*
    ~~~~~~~~~~~~~
            चौथा गणपती 
    *महडचा श्री वरदविनायक*

*************************
अष्टविनायकांपैकी एक 
महडचा वरदविनायक
पेशवेकालीन गाभारा
रूप सुंदर मनमोहक

ओम गण गणपतये नमः
मंत्र जप केला गुत्समद ऋषींनी
गणपती बाप्पा झाले प्रसन्न
अरण्यातील तपश्चर्या बघूनी

रहावे इथेच भक्तां करिता
केली ऋषींनी विनवणी
भक्तांची मनोकामना पूर्ण करावी
हीच प्रार्थना गुरुचरणी

समृद्धी व यश देणारे दैवत 
असे श्री वरदविनायक 
भक्त घेती दर्शन मनोभावे
चढवीती प्रसाद मोदक


*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*   
*************************
💢💢💢💢💢💢💢💢💢💢
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक
 चौथा गणपती
          महाडचा वरदविनायक

अष्टविनायकातील
चौथा गणपती
महाडचा वरदविनायक
भक्त श्रद्धेने येती ।।

ओम गं गणपतये नमः
या जपाने तपश्चर्या केली
मणिभद्र ऋषींनी गणपतीची
महाडलाच स्थापना केली ।।

पुरातन काळाचे हे
आहे जुने मंदिर
समृद्धी, यश देणारा
स्वयंभू गणेश सुंदर ।।

कल्याणचे सुभेदार
शिवळकर यांनी बांधले
महाडला मंदिर ,वरद
विनायक दर्शना भक्त आले ।।

लाल फुल, दुर्वा वाहून
फक्त जवळून दर्शन घेती
मोदकाचा प्रसाद देऊन
सुख आशिष घेऊन जाती ।।
-------------------------------------
       मंगला डहाके, भंडारा
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक विशेष
        चवथे स्थान

      ""वरद विनायक""

राजा भीम होता दानशूर
राणीसह गेला अरण्यात
विश्र्वमित्रानं दिला एकाक्षरी 
मंत्र साधने झाला पुत्र.

रुक्मांगद नावच ठेवला
एकाक्षरी मंत्र जप करून
गेला रुक्मांगद वनगमना
तेथे झाले गणपती प्रसन्न

वनात शिकार करताना
गेला वाचक्णवी मठात
ऋषी पत्नीचे मुकुंदावर
जीव जडला रुकमंगदात.

प्रेमाचा केला अस्विकार
दिला कुष्ठरोगचा  शाप
शापाने तव शरीर विद्रूप
राहिला अरण्या भटकत.

भ्रमंती करता नारद भेटला
रुकमंदला उपदेश केला
कळंब तीर्था विनायक पुजला 
आराधनेनं रोगमुक्त झाला.

इंद्राने रुक्मांगदचे रूप घेऊन
मुकुंदा ची केली इच्छा पूर्ण
झाला पुत्र नाव ते गृत्समद
आईचे कुकर्म मुला भोवले.

पुष्पक वनात पाप खंडण्या
विनायकाची केली उपासना
भक्त इच्छपूर्तीचा दिला वर
म्हणून नाव वरद विनायक.

पेशवेकालीन हेमांडपंथी मंदीर
भव्य मंडप कौलारु घुंमडदार
गणेशमूर्ती सिंहासनारूढ
कळस सोनेरी नाग नक्षीदार.

धोंडोपंत मिळाली मूर्ती तळ्यात
सोंड तिचे होते डाव्या बाजूस
कल्याण सुभेदार बांधले मंदिर
महड गाव तिथेच वसविलं.

   सौ.वीणा द. अतकरी
           नागपूर.
दि.२८/०८/२०२०
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺महडचा वरदविनायक🌺

महडचा वरद विनायक
चवथा मानाचा गणेश
गृत्समद श्रृषि तपश्चर्येत
पावन देई सर्वांना आशिष।।

🕉️गणगणपतेय नम:
मंत्र जपाचा प्रभाव
समृद्धी व यशाची देवता
स्वंयभू मुर्तीचा ठाव ।।

१७२५ सालात सुभेदार रामजी
यांनी बांधिले देऊळ
मनोकामना पूर्तीसाठी
चतुर्थीस जमे भक्तांचा मेळ ।।

वर देणारा तो वरद विनायक
समिप जाऊन पुजन करणे
महडच्या राजाचे विशेष
जाता दर्शना अभिषेक योजणे ।।

सौ.के.बी. सार्वे भंडारा.
२८|८|२०२०.
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक विशेष
             काव्यलेखन

          चौथा गणपती

           वरद विनायक

अष्टविनायकातील रायगड
जिल्ह्यात चौथा गणपती
महडचा वरदविनायक 
भक्तगण दर्शन घेती   ।।

ओम गण गणपतये नमः
चा मंत्र जपून
गुत्समद ऋषीनी घोर
तपश्चर्या करून।।

प्रसन्न केले गणपतीस
आशीर्वाद मिळवले
मूर्तीची स्थापना करून
नाव वरद विनायक ठेवले।।

वरद विनायक मंदिर
आहे पुरातन कालीन
भक्तास यश समृद्धी देतील
दुर्वा, फुले वाहून ।।

धोंडू पौढकर ला तलावात
सापडली स्वयंभू मूर्ती
अष्टविनायकातला गणपती
म्हणून झाली तुझी कीर्ती।।

              पुनम डहाके, भडांरा.
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺अष्टविनायकांपैकी चौथा गणपती🌺
🙏🏻महडचा वरदविनायक
महडचा तो वरदविनायक
भिमराज्याने पुत्रासाठी
केली तपश्चर्या कठीण
पुत्ररत्न मिळे त्याला
असे हे मंदिर प्राचीन।।

पेशव्यांनी केला उध्दार
हेमाडपंथी मंदिर सुंदर
मुर्ती तलावी सापडे धोंडूस
स्वयंभू मुर्ती ती
यश सम्रुद्धी देई भक्तास
चार हत्तीचे शिल्प मंदिरी
पंचवीस फुटी कळस
त्यावरी सोनीयाचा मखर
भोवती नक्षी नागाची।।

पुर्वाभिमुखी मुर्ती अशी
डाव्या सोंडेची
तेवतसे नंदादीप सदैव
भक्त पूजती विनायका
गाभारी जावून
वर देई भक्ता,देई
पुत्ररुपी प्रसाद।।
          सौ.सरोज मते
                दारव्हा🙏🏻
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *महाडचा वरदविनायक*

रायगड जिल्हा महाड
या गावी
वसले वरद विनायक
मूर्ती छान मनमोहक

जवळ जाऊन दर्शन घेई त्यांचे
कोरीव सुरेख मंदिर
नवसाला पावणारा श्री गणेश
वाहन त्यांचे उंदीर

लाल फुल दुर्वा
अतिप्रिय गणेशाला
देवाधिदेव गणपती
पुजतो सर्व आधी त्याला

मंदिरावर सोन्याचा कळस
रूप गणेशाचे लोभस
जवळ जाऊन पूजा करती
भक्तगण आशीर्वाद मागती

                    नंदा भोयर
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺महाड गणपती🌺

अष्टविनायकंपैकी ४ थे गणपती
रायगड जिल्ह्यातील महड
महड च वरद विनायक
इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा!!

गुत्समद ऋषीनीं घोर तपश्चर्या
🕉️ गण गणपतये नम: या
मंत्राचा जप करून प्रसन्न
केले वरदविनायकास !!

मूर्ती सुंदर लोभस रूप
रिद्धी सिद्धी खांबावरी
बाहेर मूषक,मूर्ती जवळ दर्शन
घुमटा वर सोनेरी कळस!!

धोंडू पौडकर मूर्ती सापडली
मूर्तीची प्राप्रतिष्ठापना केली नवसाला पावणारी
गणेशाची स्वयंभू मूर्ती अशी तुझी कीर्ती!!

माधुरी भुते
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🛕महडचा वरद विनायक🛕

रायगड जिल्ह्यातील महड गावात
नवसाला पावणारा वरद विनायक
घुमटावर शोभे सोनेरी कळस
बाजूने हत्ती दोन सिंहासना आरूढ

कोरीव हेमाडपंथी एका दगडातून
नंदादीप तेवे 107 वर्षापासून
पूर्वा भिमुख मंदिर असे छान
लोभस मूर्ती वरद विनायक आसन

पूजा करावी बाप्पा जवळ जाऊन
ओम गण गणपते नमः करून
भक्त येति दर्शना देशविदेशातुन
लाभे सुख शांती आत्मिक समाधान

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक काव्यलेखन
      चौथा गणपती
महाडचा वरदविनायक

अष्टविनायकात चौथा गणपती
वरदविनायक,महाड गावात.
पुर्वाभिमुख मंदिर डौलात
प्रसिद्ध रायगड जिल्ह्यात.

ॐगण गणपतये नमः मंत्र्यांनी
गुत्समद ऋषींच्या तपस्येनी
मनभद्र वनात प्रसन्न करोनी
श्रीनां संबोधले वरदविनायक नावानी.

स्वयंभू मूर्ती सापडली
धोंडू पौढकरास तलावात.
प्रतिक समृद्धी यशाचे
स्थापन केले १६९०सालात.

डाव्या सोंडेची मूर्ती
दर्शने भक्तांस स्फुर्ती
जळतो दिवा सर्वकाळ
पूजा होते मुर्ती जवळ.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/28, 10:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चौथा अष्टविनायक
महडचा वरदविनायक

पापक्षालना करी जप
एकक्षरी मंत्र गणाचा,
वनी खडतर तप
 आचरती ऋषी गृत्समद.

प्रसन्न होऊन विनायक 
आशिष देती त्यास,
वरदविनायक महडगावी
चौथे अष्टविनायक.

धोंडू पौंढकरा सापडे 
तळ्यात मुर्ती श्रीगणेशाची,
रामजी भिवळकरांनी,बांधिले मंदिर
सनद दिली शाहू पेशव्यांनी.

हेमाडपंथी पूर्वाभिमुख मंदिर
घुमटावरी सोनेरी कळस,
सिंहासनी प्रसन्न मंगलमूर्ती
अखंड दिप तेवत.

माघी भाद्रपद अंगारकी चतुर्थी
यात्रा वरदविनायकाची,
मूषकाच्या कानी सांगता इच्छा
नवसास पावे गणपती.

जास्वंदी फुले,हार दुर्वांचा
स्वहस्ते पूजा समर्पित,
आत्मिक शांती सुख  देतसे
महडचा वरदविनायक.

                             सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                खामगाव.जि.बुलडाणा
                                 दि.28.08.2020
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रभातपुष्प १८वे

गणपती बापाच्या स्वागतार्थ पडती पाऊस
हासरी जास्वंदी फुले
वाहुनी बाप्पाला होतसे सर्वांची हौस.

सौ.सुषमा पडोळे भंडारा
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पहाटवारा🌺

 गणेश मूर्तीवर
वाहू दुर्वा जास्वंद
सतत कृपादृष्टी ठेवी
आम्हा लेकरावर.

  सौ.वीणा द.अतकरी. 
        नागपूर.
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

         ""संस्कारधारा ""(४५)

बाप्पा चालले चतुर्दशीविसर्जना
आम्ही दु:ख  सांगितले  काना
विघ्नहरा दूर करा मम दुर्गुणा
सुखी करावे आम्हा सकळजणा.

दनाअ, नागपूर
दि.२९/०८/२०२०
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नवी पहाट
नव्या आशा
बीके ग्रुप नी दाखविली
नवी दिशा
शुभ सकाळ.     नंदा भोयर
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.५७*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*गणपतीला आवडतो मोदक नी लाडू*
*जीवन सत्य नेहमीच असता कडू*
*आशेचा किरण कधीच नका सोडू*
 *सर्व व्यथा विनायका पुढे मांडू*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

सकल गुणांचा      देवाधिदेव
   अधिपती         महागणपती
              नमन तुज नमन
               सर्वसिद्धीपती
 
सौ.प्रतिभा सोपान वाठ (गरबडे)
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्री चरणी अर्पण करते
भक्ती ची फुले
शिक्षणाचा खेळखंडोबा झाला
भरकटली रे देवा आमची मुले
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.  (१०३)

      ""थेऊर गावचा चिंतामणी""

धरानीधर महाराजानी मंदिर
स्थापले पाचवे अष्टविनायक
पेशवे लाकडी जिर्णोध्दारला
घंटा मोठी शोभेते मंदिराला.

अगं,थेऊर गावचा चिंतामणी
मुर्ती स्वयंभू डाव्या सोंडेची
आसनी बसली पूर्वाभिमुखी
हिरे,लालमणी साज डोळ्यांची.

राजा अभिजीत गुणवतीचा
पत्र गुणा कपीलमुनी घरा
रत्ना चिंतामणीस मोहला
गुणाने रत्नाला हळुच चोरला.

मुनीने विनवले गणपतीला
गणेशाने गुणाचा वध केला
रत्न कपीलमुनीस परतीला
त्यांनी गणपती गळा घातला.

कपीलमुनीची चिंता मिटली
यांसच नाव ठेवले चिंतामणी 
चतुर्थी,अंगारकी यात्रा मोठी
चिंता दुरीते भक्तांच्या मनी.

दनाअ, नागपूर
दि.२९/०८/२०२०
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    ~~~~~~~~~~~~~~~
     *अष्टविनायक  विशेष काव्यलेखन*
    ~~~~~~~~~~~~~
            पाचवा गणपती 
    *थेऊरचा श्री चिंतामणी*

*************************
पुणे जिल्ह्यात वसले
थेऊर चे श्री चिंतामणी 
चिंता हरण करणारे दैवत 
नतमस्तक व्हावे चरणी

स्वयंभू डाव्या सोंडेची 
पूर्वाभिमुख गणेश मुर्ती 
डोळ्यात लाल मणी व हिरे
अष्टविनायकांची सर्वत्र कीर्ती

कपिल मुनी कडून गुणाने 
चिंतामणी रत्न चोरले 
गुणाचा वध करून 
गणपतीने परत आणले

कपिल मुनींनी तेच रत्न 
गणपतीला अर्पण केले 
त्यांच्या चिंता दूर झाल्या 
म्हणून चिंतामणी नाव आले

रमा -माधव पेशवे यांचे 
आवडते भक्ती स्थान 
आठवणीत यांच्या आहे बाग
माधवरावांचे श्री चरणी गेले प्राण 

*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
*************************
💢💢💢💢💢💢💢💢💢💢
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक 
पाचवा गणपती
 
थेऊरगावचा श्री चिंतामणी 

थेऊरगावचा श्री चिंतामणी
मंदिर  तयाचे भव्य 
एक मोठी घंटा मंदिराच्या  आवारात
नावातच दडले सारे दिव्य .....


मुर्ती स्वयंभू मंदिरातील
डाव्या  सोंडेची आसन घातलेली 
लाल मणी व हिरे डोळ्यातील
आजही असे हे मंदिर सुस्थितीतील
यासंदर्भात आणखी कथा असतील........


राजा अभिजित व राणीगुणावतीचा मुलगा गुणाने कपीलमुनींकडे
असलेला चिंतामणी  हे रत्न चोरले
कपीलमुनींच लक्ष सतत गुणाकडे.....



त्यांनी ते रत्नगुणाकडून
परत आणण्याची केली  विनंती 
गणपती गुणाचा वध करती
ते रत्त्न कपीलमुनींना देती......


हे रत्न कपीलमुनींनी गणपतीला अर्पूनी
गणपतीला अर्पुनी
गणपतीच्या  ते गळ्यात  घालुनी
त्यांची चिंतामुक्ती होऊनी......


सौ.सुषमा पडोळे भंडारा
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺अष्टविनायकांपैकी पाचवा गणपती🌺
थेऊरचा चिंतामणी🌺
🌺🌺🌺🌺🌺🌺
चिंता हरी मनाची तो चिंतामणी
वसलासे थेऊर गावी
ब्रम्हदेवाने स्थापिले यासी
केले स्थिर चित्त
कपिलमुनीने दिधले
चिंतामणी रत्न
शोभतसे गंडकी
मोरया गोसाव्यासी
जहाली सिद्धी प्राप्त
डाव्या सोंडेची गणेश मूर्ती
असे पुर्वाभिमुखी
लाल मणी नयनी
खुलवी मुखकमली
असे हे मंदिर प्राचीन
मोठी घंटा एक
निनादतसे आवारी
दर्शन याचे लाभता
चिंता सर्व दूर होई।।
          सौ.सरोज मते
                  दारव्हा🙏🏻🙏🏻
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक --   काव्य लेखन
पाचवा गणपती
थेऊरचा श्री चिंतामणी

पाचवा गणपती आहे
थेऊरचा श्री चिंतामणी
भव्य मंदिर स्थापिले
मोठी घंटा त्याठिकाणी ।।

मूर्ती आहे मंदिरातील
स्वयंभू, डाव्या सोंडेची
 आसन घालून छान
पूर्वाभिमुख तोंडाची ।।

मंदिर हे पुरातन
तरीही मजबूत आहे
दोन्ही डोळ्यात त्याच्या
लाल मणी, हिरे आहे ।।

कपिलमुनी कडला रत्न
चिंतामणी गुणाने चोरले
गुणाकडून रत्न आणण्या
त्यांनी गणेशाला विनवले ।।

वध करून गुणाचा
रत्न परत दिले
कपिल मुनींनी गणेशाला
ते अर्पण केले ।।

चिंता सर्वांची झाली दूर
कपिलमुनी फार हर्षले
थेऊरचा चिंतामणी हे
कायम नाव दिले ।।
-------------------------------
        मंगला झेड डहाके, भंडारा
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

            पाचवा गणपती 
    *थेऊरचा श्री चिंतामणी*

*************************
  
  थेऊर गावी वसले
  मंदिर चिंतामणीचे
अष्टविनायक मध्ये
गणपती हे पाचवे

स्वयंभू आसनस्थ मूर्ती.. 
पूर्वाभिमुख डाव्या सोंडेची
लाल मणी अन् दोन हिरे
शोभा वाढवी नयनांची.... 

दानव गुणासूराने चोरले... 
कपिलमूनींचे चिंतामणी रत्न
गणपती बाप्पास आळविले
रत्न वापसी केला प्रयत्न.. 

संहार करून गुणासूराचा
बाप्पाने रत्न परतविले
तेची रत्न कपिलमूनींनी
गणपती बाप्पास अर्पिले

गळ्यात  बाप्पाच्याशोभे
मौल्यवान रत्न चिंतामणी
नाव म्हणूनी  गणपतीचे
पडले  चिंतामणी........

*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक विशेष काव्यलेखन
   पाचवा गणेश

🌺थेऊरचा श्रीचिंतामणी🌺

थेऊरचा तो चिंतामणी
भक्ताची करी चिंता दूर
पाचव्या मानाचा बाप्पा
पहावे भव्य थेऊरचे मंदिर ।।

स्वंयभू मूर्ती डाव्या सोंडेची
पूर्वाभिमुख आसन घातलेली
डोळ्यात दिसे लाल मणीहिरे
मूर्ती चिंतामणी रत्न घातलेली।।

गूणासुराचा करुनी वध
मिळविला चिंतामणी रत्न
कपिलश्रृषींनी गळा घालूनी
"चिंतामनी"नाव देण्याचे केले यत्न

सौ.के.बी.सार्वे भंडारा.
२९|८|२०२०.
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक विशेष
              काव्यलेखन 

          पाचवा गणपती

         थेऊरचा चिंतामणी

थेऊरचा चिंतामणी आहे
स्वयंभू डाव्या सोंडेचा
आसन घातलेली
व पूर्वाभिमुख तोंडाचा।।

दोन्ही डोळ्यात लाल मणि
व हिरे बसवलेले
आजही मजबूत आहे
मंदिर घडवलेले।।

अभिजीत गुणवंती चा मुलगा
गुणाने रत्न चोरले चिंतामणी
गुणाकडून रत्न आणण्यास
कपिल मुनींनी केली बाप्पाला विनवणी।।

गणपतीने गुणाचा वध
करून आणले रत्न चिंतामणी
कपिल मुनी ने हे रत्न
गणपतीला दिले अर्पुनी।।

          .    पुनम डहाके ,भंडारा.
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक काव्यलेखन
     पाचवा गणपती
थेऊरचा श्री चिंतामणी
 🍀🍀🍀🍀🍀
पुणे जिल्ह्यातील थेऊर
श्री चिंतामणीचे मंदिर.
घंटा आवारात मोठी
गर्दी झाली दर्शनासाठी.

विनायक स्वयंभू पाचवे
गणेश मूर्ती आसनस्थ.
डाव्या सोंडेच्या रूपात
लाल मणी व हिरे डोळ्यात.

कपिलमुनींचे रत्न 
चोरीले असूर गुणाने.
राजा अभिजीत व 
राणी गुणवतीच्या मुलाने.

वध करून गुणाचा
रत्न परत मिळविला.
कपिलमुनींची विनंती
रक्षणार्थ केले गणपती.

गणेशा रत्न अर्पूणी
मुनी झाले चिंतामुक्त
नाम श्रींचे चिंतामणी
भक्तांच्या भक्तीत लुप्त.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🛕 थेऊरचा चिंतामनी 🛕
अष्टविनायका तील पाचवा

राजा अभिजित पत्नी गुणवंती
वनी बसुनी तपश्चर्या करती
गणाच्या रूपाने झाली पुत्रप्राप्ती
हुशार,पराक्रमी ओळख त्याची

गण जाई कपिलमुनी कडे
रत्नाच्या बळे सर्वच मिळे
गणाच्या मनी ठसला चिंतामणी
बळजबरीने घेतला हिसकावूनि

बाप्पाचा धावा केला कपिलमुनीने
गणाशी युद्ध केला बाप्पाने
आणला परत चिंतामणी रत्न
बाप्पाजवळच ठेवला कपिलमुनीन

तेव्हापासून बाप्पा होई चिंतामणी
कदंबाच्या खाली घोर तपश्चर्येनि
ब्रम्हदेवाची होई चंचलता कमी
स्थावरचा थेऊर अपभ्रंश होऊनि

उपासना केली मोरया गोसायान
मंदिर बांधिला बाळ चिंतामनीन
पेशवे माधवरावांची भक्ती अपार
त्यांनी थेऊरचा केला विस्तार

दोन्ही बाजूने मूळा मुठा वेढली
उत्तराभिमुख सभामंडपी मूर्ती
चिंता दूर करी बाप्पा सर्वांची
डाव्या सोंडेचा थेऊरचा चिंतामणी

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायकात पाचवा गणपती

                  "थेऊरचा चिंतामणी"

अभिषेक व गुणवती पोटी गणा
कपिल ऋषीच्या गेला आश्रमात
मुनीने दाखविले चिंतामणी रत्न
गणाने केला चोरण्याचा प्रयत्न.

चिंतामणीचे मोहात पडला
बळजबरीने मणी हिरावला
मुनी करी गणेशाची आराधना
कदंबाखाली गणासुर मारला.

गणेशाने रत्न परत ऋषिला दिले
मुनीन तो गणेशाच्या गळा घातले
म्हणून नाव चिंतामणी ठेवले
रमा माधव यांना ते पावन झाले.

मुळा मुठा नदी किनारी गाव थेऊर
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख सुंदर
मौल्यवान लाल मणी डोळा शोभती
सोंड डाव्याबाजूला दर्शन देती.

  सौ. वीणा द. अतकरी, नागपूर.
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: -- गणेश वंदना  --

तूचि गणेशू तूच मोरया
वंदन तुजला श्री गणराया
संकटकाळी धावुनी येशी 
भक्त पडती तुझिया पाया.....

कुणी म्हणे तुज गणनायका
कुणी म्हणे तुज विघ्नहर्ता 
भल्याबु-यांचा तू रे दाता
माथा अमुचा चरणी तुझिया.....

जनसागर हा चरणी तुझिया 
दुर्वांकुर वाही तुज गणराया
पारवतीच्या तू रे सुता
संकटातूनी येशी तराया.....

वंदन तुजला श्री गणराया.....


                   संजय तिजारे
                          नागपूर 
                     9272120762
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गणेशा!
सकल कलांचा तूअधिनायक
तूच स्वामी हा जगद्दोधारक
आलो तूज शरण गणेशा!!धृ!!

तुझ्या मुळे आरंभ जगाचा
तूच सूर्य अन् चंद्र युगाचा
तुझ्या कृपेने इथे जाहले
पापीही साधक गणेशा!....

विघ्नहारी तू,तू भगवंता
लंबोदर तू,  ....एकदंता
क्षणात हरतो दुःख आमुचे
होऊनी मोदक गणेशा!....
         ओमप्रकाश ढोरे
            चांदुरबाजार
           जि.अमरावती
             ४४४७०४
[8/29, 6:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺थेऊर चिंतामणी🌺

अष्टविनायक पाचवे गणपती
मुळा नदीच्या तीरावर
पुणे जिल्ह्यातील थेऊरचे चिंतामणी
चिंता दूर करी सकल जनाचे!!

गुणाने चोरले चिंतामणी रत्न
कपिल मुनिनी गणेशाला प्राथीलें
गणेशाने वधीले गुणाला चिंतामणी घेतले ततशनी!!

स्वयंभुं मूर्ती ब्रह्म देवाने स्थापिली
डाव्या सोंडेची मूर्ती पूर्वाभिमुखं
डोळयातअसे लाल मणी हिरे
 कपिल मुनीनी बांधला गणेशाचा गळयात चिंतामणी!!

गणेशा काय वर्णावा तुझा महिमा
तुच आदि तूच अनंत तू चिंतामनी
चौसष्ट कलेचा आदिनायक गौरीपुत्र
सकल देवतात तुझा मान विघ्नहर्ता
वंदन तुजला सर्वांचा श्री गणराया!!

माधुरी भुते
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹प्रभात वंदना - १३🌹
----------------------------------------
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रभातकाळी मंगल समयी 
ओंजळ भरली भक्ती फुलांनी..... 
गजमुख गजानन 
आहेत प्रर्थम वंदनीय...... 
सुप्रभात..... 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सौ. शितल श्रीकांत ठवकर. 
(तुमसर रोड, देव्हाडी, तुमसर). 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

          ""संस्कारधारा""   (४६)

सज्जनांना ,सुधारकांना गोळ्या घाला
प्रेमविर मेल्याची शिघ्र चौकशी करा
यांचीच राहिलं दादा समाजात सरशी
इतिहास गातो पोवाडा,म्हशी..कुठ गं नेशी.

दनाअ, नागपूर
दि.३०/०८/२०२०
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प-- 64 वे

तू देवता विद्येची अन कलेची
आम्हा सद्बुद्धीची दे श्रीमंती
महामारी काढून देशातील
साऱ्यांना दे आरोग्यदायी मती ।।
---------------------------------------
       मंगला डहाके, भंडारा
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹|| *अलगूज* ||🌹
         *क्र.६१*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
 
*जास्वंदाचे फुल वाहूनी*
*श्रद्धा ठेवूनी मनी*
*दुर्वांकूर वाहते*
*गणरायाच्या चरणी*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*सौ स्वाती सेलोकर* 
*भंडारा*
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹पहाटवारा🌹

नात असावं आपुलकीचं
एकमेकांना समजण्याचं
गणेशाला घालू साकड
सर्वांना सुखी ठेवण्याचं.

  सौ. वीणा  द. अतकरी, नागपूर
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

निर्गुण निराकार
गणेशाचे स्वरूप
हरतील विघ्ने
स्मरता तयाचे नाम

सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: तू सुखकर्ता तू दुःख हरता
विद्येची देवता
श्री गणेशा आता
लेखणीला धार येऊ दे चांगली आता
मंगल मूर्ती मोरया
                          नंदा भोयर
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
     *अष्टविनायक  विशेष काव्यलेखन*
    ~~~~~~~~~~~~~
            सहावा गणपती 
    *लेण्याद्री श्री गिरिजात्मज*

*************************
कुकडी नदीच्या तीरावर 
लेण्याद्री चे गिरिजात्मक 
वसले डोंगरातील गुहेत 
सहावे अष्टविनायक

अखंड दगडात बनले 
 गुहेमध्ये आहे देऊळ 
३०७ पायऱ्या चढाव्या 
अशी १८ गुहांची आहे माळ

पुत्रा करिता आदिशक्ती
बारा वर्ष बसल्या तपस्येला  
गणपती बटू रूपी प्रगटले
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला

निसर्गाच्या सानिध्यात 
विनायकाचे दर्शन होते 
भक्तीमध्ये एकरूप होऊन 
दुःखाचा विसर पडते

    
*✒️सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
*************************
💢💢💢💢💢💢💢💢💢💢
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.५८*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*पाहुनी गोजिरवाने*
*रम्य सुंदर रूप*
*मोद जाहला* 
*गणराया मनी खूप*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (१०४)
अष्टविनायक विशेष काव्यलेखन 

     ""लेण्याद्री श्रीगिरिजात्मज""

जुन्नर तालुका शिवनेरी किल्ला
शेजारी सुलेमान पहाडी श्रृंखला
कुकडी किनारी वसले लेण्याद्री
तिनशे सात पाय-या मंदिराला

 गुहा अठरा आहेत पहाडाला
आठव्या गुहेत सभामंडप भव्य
डावी उजवीला हनुमंत, शंकर
होई  गिरिजात्मज दर्शन दिव्य.

पुत्रप्राप्तीसं पार्वतीनं केला तप
तब्बल बारा वर्षांनी बटुरूपात
गिरिजेच्या  आत्मज  पुत्राचा
"गिरिजात्मज"जन्म लेण्याद्रीत.

अष्टविनायकात सहावा स्थान
लेण्याद्री  निसर्गरम्य  ठिकाण
पाय-या चढतांना लागते दम
गणेश चतुर्थीला घ्यावे दर्शन.

दनाअ, नागपूर
दि.३०/०८/२०२०
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के.सा.सं.प.
(१०९)
अष्टविनायक विशेष काव्यलेखन.

    ।। सहावा गणेश।।
🌺लेण्यांद्रिचा गिरीजात्मज🌺

लेण्यांद्रिचा बाप्पा सहावा
असे पार्वतीच्या नवसाचा
नाव तयाचे गिरीजात्मजा
पहिला गणेशा डोंगरावरचा।।

दक्षिणाभिमुख मंदिरात
उत्तराभिमुख आहे मुर्ती
अखंड पाषाणाचे मंदिर
आहे त्याची अद्भूत किर्ती।।

शिवनेरीच्या पायथ्याशी
कुकडी नदिच्या तिरावरी
लेण्यांद्रिच्या आठव्या गुहेत
बाप्पा बसले डोंगरावरी ।।

अखंड दगडाचे मंदिर एक
अठरा गुहा असे त्यात
आठव्या गुहेत बाप्पा विराजे
जावे तिनशे सात पायर्‍या चढून आत।।

डावीकडे हनुमान गदाधारी
उजवीकडे भोले जटाधारी
अष्टविनायक दर्शन पूर्ण
होई गिरीजात्मज दर्शन घेतल्यावरी ।।

सौ.के.बी.सार्वे भंडारा.
३०|८|२०२०.
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
क्र. ५४
    ~~~~~~~~~~~~~
            सहावा गणपती 
    *लेण्याद्री श्री गिरिजात्मज*

*************************
 
डोंगराळ गुहेत वसला
एकमेव हा गणपती
पुत्रप्राप्तीसाठी डोंगरी
तपश्चर्या करती पार्वती

भाद्रपद शुद्ध चतुर्थीस
बटू रुपात बाप्पा प्रकटले
पर्वतीचा आत्मज पुत्र
गिरिजात्मक प्रसिद्ध झाले 

वसले लेण्याद्री गाव 
कुकडी नदीतीरावरी 
उत्तराभिमुख मूर्ती 
दक्षिणमुखी मंदिरी 

डोंगरात अठरा गुहा 
आठव्या गुहेत देऊळ 
तीनशे सात पायर्‍या 
आहेत चढावया राऊळ 

*सौ. स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक विशेष काव्यलेखन

         सहावा गणपती

           गिरीजात्मज

अष्टविनायकातला सहावा
गणपती गिरीजात्मज लेण्याद्रीचा
असा हा एकमेव गणपती
जो डोंगरातील गुहेत राहायचा।।

पुत्रप्राप्तीसाठी पार्वतीने
बारा वर्षे तपश्चर्या केली डोंगरात
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला
श्री गजानन प्रकटले बटू रूपात।।

पार्वतीचा आत्मज म्हणून
गिरीजात्मज नाव मिळाले
कुकडी नदीच्या तीरावर
लेण्याद्री गाव वसले।।

मंदिर बनले आहे
अखंड दगडापासून
दर्शनासाठी जावे लागते
307 पायऱ्या चढून।।

अठरा गुहा मधून आठव्या
गुहेत बसले गणराया
भक्त येती दर्शनासाठी
पडती देवाच्या पाया।।

               पुनम डहाके, भंडारा.
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कविता"अष्टविनायकात सहावा"
  
""लेण्याद्रीचे गिरिजात्मज""

जुन्नर तालुक्यात
सुलेमान पहाडीत
लेण्याद्री वसलेथ
आठव्या लेणीत

                     विस्तीर्ण सभामंडप 
                     डावीकडे हनुमंत
                     उजवीकडे शंकर
                     मध्ये गिरिजात्मक.

पार्वतीला ध्यास
पुत्र यावा पोटास
बसली ती तपास
प्रगटला गणेश.

          ‌            लेणीचे कोरीव काम
                      अफलातून ते मंदीर
                      पाय-या तिनशे सात
                      लेण्यांद्री दिसं सुंदर.

बनवी पुतळा मातीचा
आनंद गौरी मातेचा
उभा देह गणपतीचा
शिवाने शिरच्छेदिला.

                    सामना अश्रृ अन् क्रोधाचा
                ‌    विलाप ऐकून गिरजेचा
                    गजमुख धडा जोडला
                    जयकारा गिरिजात्मजाचा.

सौ.विणा  अतकरी, नागपूर
दि.३०/०८/२०२०
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक
काव्यलेखन--- सहावा गणपती                       लेण्याद्रीचा गिरिजात्मज--

अष्टविनायकातला
असा गणपती एकमेव
डोंगराच्या गुहेत
स्थापित झाला देव ।।

सहावा लेण्याद्रीचा
आहे गिरीजात्मज
तपश्चर्येनी बटू रूपात
प्रगट पार्वतीचा आत्मज ।।

कुकडी नदीतीरी
लेण्याद्री हे गाव
जवळच्या डोंगरात
अठरा गुहा वसे भाव।।

गिरीजात्मजाचे मंदिर
आहे आठव्या गुहेत
गणेश लेणी म्हणती
श्रद्धेने येती भक्त।।

307 पायऱ्या चढून
यावे लागते मंदिरी
अखंड दगडाचे
गणपती या भूवरी ।।

नमोस्तुते नमो नमः
हे पार्वती सुत गणराया
आयुष्य तार आमचे, मी
साष्टांग नमुनी पडते पाया ।।
------------------------------------
        मंगला डहाके, भंडारा
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक काव्यलेखन
      सहावा गणपती
लेण्याद्रीचा गिरीजात्मज
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
अष्टविनायकात सहावा गणपती
लेण्याद्रीचा गिरीजात्मज म्हणती
अखंड शिलेत कोरले भव्यमंदिर
मंदिराचे दक्षिणमुखी प्रवेशद्वार.

अठरा गुहा साकारल्या पर्वती
आठव्या गुहेत मुर्ती उत्तरमुख
गणेश लेणी तयास संबोधती
बारा वर्षे तप साधनेत पार्वती

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरुपात
प्रगटला गिरीजेचा आत्मज मळात
कुकडी सरीता तिरी लेण्याद्री गाव
लेण्याद्री गिरी गिरिजात्मज देव.

तिनशेसात पायऱ्या चढावे दर्शनास
पूर्ण भक्तीने पावतो साधकास
सभामंडपात राहतो सूर्य प्रकाश
छान बैलगाडीची शर्यत उत्सवास

डावीकडे भिम हनुमान लेणी
उजवीकडे जटाधारी शंकर
मुर्त्या दगडातच कोरीव सुंदर
मातेचा मनोरथ सिद्ध साकार.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: --माझी आवडती कविता--

       "🌹"भावापेक्षा आव जास्त"🌹"

घणनिळा तुझा पसारा
जगावेगळा दिसं नजारा
अंदाजाला खोटं ठरवी
हवामानच देते गुंगारा.

                     सांगतो असतो वर्षाला 
                     येईल टक्क्यावर पाऊस
                     फुवारा देते आचमनाला
                     दुराव्यानं नको रे जाऊस.

सारे बघती नक्षत्राला
ऐकते करावे मेघाला
शुध्दता तर केव्हाची
प्रसवण्या  धरतीला.

                     ढगां मांदियाळी अंबरा
                     सरसरत्या पाऊसधारा
                     हिरवा शालु पांघरून
                     तृप्त झालीय ही धरा.

सजधजली वसुंधरा
नको रे येऊ पावसा
विध्वंस होते पूराचा
जाती जण गावकुसा

                     निमंत्रण एका लबाडाचं
                     जेवन,भात अन् रस्स्याचं
                     पोट भरल्यावर मटणाचं
                     वाढणं करते आग्रहाच.

भरल्या पोटात खाईना
वाढणारा हट्ट सोडीना
भावापेक्षा आव जास्त
अतिवृष्टीनं सुख फस्त.

दनाअ, नागपूर
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺अष्टविनायकांतील सहावा गणपती🌺
🌺🙏🏻लेण्यांद्रीचा गिरीजात्मज🙏🏻🌺
आदिमायेने केली पुत्रासाठी तपश्चर्या
सह्याद्री पर्वतात।
प्रगटीला श्री गणेश
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला
बटुरुपात ।
गिरजेचा तो आत्मज
म्हणुनी जन म्हणती
गिरीजात्मज।।
तिनशे सात पायऱ्या चढोनी भेटी विनायक।
दृश्य ते मोहक
चहोबाजुनी टेकड्या
टेकडीत गुहा
गुहेत राहीला गणेश।
स्थान असे अतिप्राचीन
सातवाहन कालीन।
लेण्यांचे ते गाव
त्यात गणेशलेणी पावन
अधांतरी तरंगतसे,
नाही खांबाचा आधार
वाघ,सिंह ,हत्ती दगडी कोरीले।वर फिरती
लाकडी कमान।
जन दर्शनी येती
पाहोनी ही किमया 
धन्य होती।।
            सौ.सरोज मते
                 दारव्हा🌺🙏🏻
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🛕 लेण्यांद्रीचा गिरिजात्मक 🛕

पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात
लेण्यांद्रीचा गिरिजात्मक
सहावा गणपती अष्टविनायक
टेकडीच्या लेण्यातील गुहेत

तिनशे सात पायऱ्या चढून
घडे तेव्हा बाप्पाचे दर्शन
सभामंडप मोठे कोरीव काम
चित्रात बालपण विवाहाचे दर्शन

आहे पौराणिक कथा एक
टेकडीवर पार्वतीने केला तप
बारा वर्षाचे तपाचे फलित
वत्स गिरिजेचा गिरिजात्मक

गणपती कोरीव भिंतीवर
डावीकडे हनुमंत उजविला शंकर
चतुर्थीला असे फुलाची आरास
प्रसाद द्यावा तिथं माकडांस


सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/30, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सहावा अष्टविनायक
लेण्याद्री गिरिजात्मज

कुकडी तीरावर लेण्याद्री पर्वत 
तीनशे सात पायऱ्या चढून,
अखंड पाषाण मूर्ती
घेती दर्शन भाविक.


नसे खांब, कमानी मंडप
नसे शिखर,गुहा हेचि मंदिर.
अठराव्या गुहेपैकी गुहा आठवी
वसे पाचवा अष्टविनायक.

बारावर्षं तप गिरजेचे 
पुत्र प्राप्तीची तळमळ असे,
बटूरुपात पुत्र प्रगटे
तोचि हा गिरिजा-आत्मज असे.
 
पुत्र लाडका गिरिजेचा
दर्शन घेता प्रसन्न होतो,
भवतापे दुःख हरतो
आशिष देतो समृद्धीचा.

                                सौ. प्रतिभा वाठ (गरबडे)
                                खामगाव.जि.बुलडाणा
                                 दि.30.08.2020
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.

       ""संस्कारधारा"" (४७)

पदवी घेण्यास परिक्षा नाही
प्रवेशा करीता होतेयं स्पर्धा
न्याय कुणाला द्यावा आम्ही
सामाजिक संधीला ग्लानी मर्दा.

दनाअ, नागपूर
दि.३१/०८/२०२०
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प -- 65 वे
सकल जणांचा तू गणराय
लाल फुले अन दुर्वा वाहती
आरती, स्तोत्र, पुष्पांजली म्हणुनी
प्रसादाला लाडू, मोदक करती।।
---------------------------------------
        मंगला डहाके, भंडारा
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हे गणराया
वेळ आली तुझ निरोप द्याया
तुझ आशिष मागते
कोरोनाचे संकट घेऊन जाया
                   नंदा भोयर
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पहाटवारा🌺

  मनोभावे करून आरती
  माथा ठेवते पायावरती
  बाप्पाचा डोळा सर्वांवरी
  महामारीतूनी जगा तारी

सौ. वीणा द. अतकरी, नागपूर.
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगल प्रभात

हे विघ्नहर्ता विघ्नेश्वरा
हरावे आपत्ती,प्रलयासी
रक्षावे सर्व जीविता
हीच आर्त विनंती,तुज मोरया

सौ.प्रतिभा सोपान वाठ(गरबडे)
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
           *क्र.५९*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*दहा दिवस मोदकांचा*
*बाप्पाला केला भोग*
*बाप्पा माझे जिथे*
*तिथे नित्य शुभयोग*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
क्रमांक ५५
    ~~~~~~~~~~~~~
            सातवा गणपती 
    *ओझरचा श्री विघ्नेश्वर*

*************************
   
ओझर नामक गाव.... 
वसले कुकडी नदीकाठी
आठवा गणपती विघ्नेश्वर
आहे विघ्न दूर करण्यासाठी 

त्रिलोकाधीश होण्यासाठी 
यज्ञ केले राजा अभिनंदनने
विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती 
केली भयभीत देवराज इंद्राने 

एक पायरी पुढे जाऊन 
विघ्नासूरने विघ्न आणले 
बंदोबस्त करण्यास त्याचा 
मुनींनी बाप्पास आळवले 

विघ्नासूर शरण गेला..... 
वदती बाप्पा विघ्नासूरास
जेथे पुजती भक्त मज.... 
तेथे नको तुझा वास..... 

तुमच्या आधी माझे नाव 
सार्‍या भक्तगणांनी घ्यावे 
विघ्नेसूर विनवती बाप्पास
येथिची वास्तव्य करावे 

*सौ. स्वाती दयानंद सेलोकर* 
*भंडारा*
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    ~~~~~~~~~~~~~~~
     *अष्टविनायक  विशेष काव्यलेखन*
    ~~~~~~~~~~~~~
            सातवा गणपती 
    *ओझरचा श्री विघ्नेश्वर*

*************************
अष्टविनायकातील सातवे स्थान
ओझरचे विघ्नेश्वर 
कुकडी नदीकिनारी वसले 
छोटेसे गाव ओझर

विघ्नासुराचा केला 
गणेशाने पराभव
जिथे गणेशाचे पूजन
विघ्नांचा नाही लागणार निभाव

पूर्वाभिमुख बैठी मूर्ती 
नयनी मौल्यवान माणिके 
कपाळी हिरा शोभते 
नाभी रत्न चमके

रिद्धी सिद्धी दोन्ही बाजूस 
संगमरवरी मूषक समोर
घुमटाला सोन्याचे आवरण
मूर्ती रूप सुंदर मनमोहक

*सौ. रुपाली अमोल बोंद्रे, भंडारा*

*************************
💢💢💢💢💢💢💢💢💢💢
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
अष्टविनायक विशेष काव्यलेखन. (१०५)

    ---ओझरचे विघ्नेश्वर---

ओझरचा आहे विघ्नेहरं
अष्टविनायकात सातवा
कुकडी नदीवर वसला
भक्तांवरचे विघ्न हरावा.

पुर्वाभिमुख मुर्तीला
सोंड आहे डावीकडं
नाभीला रत्न शोभलं
जय विजय दोन्हीकडं.

त्रिलोक्याधिश बनावे
अभिनंदनास वाटले
इंद्रदेवा घाली साकडे
विघ्नासुरला निर्मीले.

विघ्नासुर उपद्रवाने
गणेशास आराधिले
विघ्नासुर शरणाला
इथे राहण्या बजावले.

तुझ्या आधी नाव माझे
विघ्नेश्वर मुर्ती स्थापले
डोळ्या,कपाळीला हिरे
दिपमाळ दोन बांधियले.

चिम्मा आप्पा जिर्णोध्दारीले
शिखरावरती सोनं माळीले
"विघ्नेश्र्वरा" श्रीमंत शोभले
भक्तांवरचे विघ्नं दुर हरिले.

दनाअ, नागपूर
दि.३१/०८/२०२०
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक-  
          विशेष काव्यलेखन 
सातवा गणपती---
 ओझरचा श्री विघ्नेश्वर--

नारायण गावापासून
आठ किलोमीटर अंतरावर 
वसले हे  ओझर गाव
कुकडी नदीच्या काठावर ।।

 अष्टविनायकातील सातवा गणपती
ओझर चा हा विघ्नहर्ता
भक्तांचा विघ्न हरण करणारा
तुच करता आणि करविता ।।

गणपतीच्या पराभवानंतर
विघ्नासूर राक्षस गेला शरण
तिथे न येण्याच्या अटीवर
गणेशाच्या पूजेला येती भक्तगण।।

गणपतीने केले वास्तव्य
विघ्नासुरांची मान्य केली मागणी
विघ्नहर्ता म्हणून प्रचिती
दर्शना भक्तांसी बोलावणी ।।

लाल जास्वंदी फुले, दुर्वा
वाहून भक्तिभावे पूजा करती
श्रद्धेने श्री विघ्नेश्वराला
साष्टांग प्रणाम घालून ,आशिष मागती ।।
---------------------------------------
         मंगला डहाके, भंडारा
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक काव्यलेखन
७वा गणपती ओझरचा विघ्नेश्वर 
ओझरचा विघ्नेश्वर हे देवस्थान 
कुकडी नदीच्या आठ किमी आंतरावरनारायणगावपासुनी
ओझरचा विघ्नहर्ता असे 
आष्टविनायकातला सातवा गणपती ......


विघ्नेश्वर म्हणून ओळखती
सारे या गणपतीला

विघ्न म्हणजे कार्यात बाधा आणणारी बाधा
हर म्हणजे दुर करणारा .....


शरण गेला विघ्नासुर राक्षस गणपतीला
जेथे माझी पुजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवरगणपतीने त्याला सोडुन दिले
विघ्नासुराने गणपतीला विनंती केली.,.,...



भक्तगणांनी तुमचे नाव घेण्याआधी 
माझे नाव घ्यावे 
तुम्ही  येथेच वास्तव्य करावे
विघ्नासुराची विनंती केली मान्य गणपतीने...,,,


सौ,.,,.सुषमा पडोळे भंडारा
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *ओझर चे श्री विघ्नेश्वर*

ओझरचा सातवा गणपती
विघ्नहर्ता म्हणून तुझी ख्याती
सर्वात श्रीमंत गणपती
प्रसादाचा मोदक आहे तुझा हाती

कुकडी नदीच्या तीरावर
जागृत तुझे मंदिर
चिमाजीअप्पांनी
केला तुझा जीर्णोद्धार

नाभीला रत्न
सोंड डावीकडे
भक्त घालती साकडे
धावून जाशी संकटाला

दूरवर तुझी महती
अष्टविनायकातील सातवा गणपती
मोठ्या श्रद्धेने फक्त तुला पुजती
तुझ्या नावाने ओझरला मिळाली प्रसिद्धी
                    नंदा भोयर
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺🌺🌺🌺🌺
अष्टविनायकातील सातवा गणपती ओझरचा विघ्नेश्वर
🌺🌺🌺🌺🌺🌺
भुतली अभिनंदन नामे नुप थोर,त्याने इन्द्रपदासाठी केलासे यज्ञ
इन्द्र होवुनी भयभीत
पाठविला विघ्नासुर।
विघ्नासुरे मांडीला उत्पाद
ऋषीमुनी भजती श्री गणेश।
गणेशाने हरविले विघ्नासुर
शरण तो आला
विनवी गणेशा रहावे येथे
नाम माझे जुळावे
तुझ्या नामाआधी
हाची तो विघ्नेश्र्वर
कुकडी नदीकाठी
ओझर गावी स्थिरावला
पेशव्याने केला उध्दार
सुवर्ण कळस चढविला
मंदिराबाहेर दगडी दिपमाला दोन
करी घेवोनी शिवलिंग
रक्षी द्वारपाल
सांगितसे गणेशभक्ता
करावा मातापितांचा आदर,करु त्याला नमन
असा हा सातवा विनायक
विघ्न हरि भक्ताचे
तोची विघ्नेश्र्वर।।
          सौ.सरोज मते
               दारव्हा🌺🙏🏻
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹ओझारचे विघ्नेश्वर🌹

अष्टविनायक सातवा गणपती
ओझरचे विघ्नेश्वर,विनायक
कुकडी नदीपासून,८किमी
विघ्नहर्ता म्हणून तुझी किर्ती!!

विग्णसुरणे त्रस्त केले जणास
गणेशाने वचक दिली विघ्णसुर
विघ्नेश सुराने प्रार्थिले गणेशाला
पूजन केले विघ्नहर्ता म्हणून !!

मूर्ती सुंदर,जास्वंद फुल दुर्वा सजली
डोळे कपाळी हिरे, नाभिला रत्न
सोंड डावीकडे,पूर्वाभिमुख मूर्ती
प्रसादाला मोदक हातात !!

दोन दीपमाळ मंदिरात तेवत
शिखरावर सोन्याचे कळस
मूषक संगमवरी दगडाचा
रिद्धी सिद्धी,जय विजय आहेत मंदिरात!!

विघ्नेशवर पूजा करून
भाव भक्तीचा ठेवून
विघ्ने दूर करी सकल जनाचे
आशिर्वाद घेऊन!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
माधुरी देवेंद्र भुते
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🛕ओझरचा विघ्नेश्वर 🛕
    सातवा अष्टविनायक

अष्टविनायका पैकी सातवा
देवांनी मिळून केली स्थापना
कुकडी नदीच्या तीरावर
बैसला ओझरचा विघ्नेश्वर

विघ्न हारणारा जीवन तारणारा
त्रास विघ्नेश्वराचा साकडे गणेशाला
गणेश हरवि विघ्नासुराला
विघ्नेश्वर नावे प्रसिद्ध झाला

चिमाजी आप्पा करी जिर्णोद्धार
सोन्याचा कळस मंदिरावर
दोन बाजूनी दिपमाला सुंदर
लेण्यांद्रीहुन सतरा किलोमीटर

डाव्या सोंडेचा महागणपती
भक्तगण श्रद्धेने पूजन्या येती
लाल फुले दुर्वा घेऊन हाती
विघ्नेश्वराला साकडे घालती

सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक विशेष                                         
            काव्यलेखन

        सातवा गणपती

           विघ्नहर्ता

नारायण गावापासून आठ किमी
अंतरावर कुकडी नदीच्या काठी
ओझरचा विघ्नहर्ता सातवा
अष्टविनायकातला  गणपती

सर्वांच्या शुभकार्यात येणारे
कष्ट दूर करणारा
आहे तुला खूप मान
सर्वांना सुखी ठेवणारा।।

पराभव होताच विघ्नासूरा चा
शरण गेला गणपतीला
भक्तांच्या पूजेत न येण्याच्या
अटीवर तो मान्य झाला।।

केली विनंती विघ्नासूराने  तुमच्या आधी घ्यावे माझे नाव भक्तांनी
विघ्नहर्ता नावाचे  मंदीर
स्थापित झाले या ठिकाणी।।

             पुनम डहाके ,भंडारा,
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बी.के.सा.स.प.
अष्टविनायक विशेष काव्यलेखन.
(११०)

    ।।सातवे गणेश।।
🌺ओझरचा विघ्नेश्वर🌺

सातव्या गणाचा मान मिळे
ओझरच्य त्या विघ्नेश्वराला
कुकडी नदीच्या काठावरती
सोन्याचे कळस मंदिराला ।।

त्रिलोकाधिस होण्या लोभाने
अभिनंदाने उत्पिले विघ्नासुरे
मांडीला उच्छाद विघ्नासुराने
भयभित झाले देवांगण सारे।।

विनंती केली गणेशाला
धावून आले गजानन
पराभव केला विघ्नासूराचा
आनंदीले सर्व देवांगण ।।

शरण येता विघ्नासूर
तंबी दिली गणेशाने
माझे पूजन असता
येऊ नयेच विघ्नाने ।।

डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख मुर्ती
दुर्वा,फुले,पत्री अर्पिती भक्त
प्रसन्न होई बाप्पा भक्ताला
सर्व विघ्नातून होई मुक्त ।।

सौ.के.बी.सार्वे भंडारा.
३१|८|२०२०.
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक विशेष काव्य लेखन
       सातवा गणपती
  ""ओझरचा श्री विघ्नेश्वर""

राजा अभिनंदन लोभसं
त्याला राजपदाची आस 
करण्या यज्ञाचा विध्वंस
इंद्रानं प्रगटवला विघ्नासुर.

विघ्नासुराने उत्पाद घातला
बंदोबस्ताला गणेश याचना
श्रीगणेशाने पराभव केला
विघ्नासुर शरण आला.

गणेशाने तव गळ घातली
माझी पूजा जेथे तू न यावं
विघ्नासुराने केली विनंती
तेव्हापासून विघ्नेश्वर नाव.

ओझरचे मंदिर सुंदर
कुकडी नदी काठावर
मंदिरा सोनेरी कळस
असा तो रम्य परिसर.

स्वयंभू मूर्ती मनोहर हिरा
शोभते नाभी, भाळात
भादव गणेश जयंती दिनी
उत्सव असतो तेथे भारी.

सौ.विणा अतकरी
नागपूर
दि.३१/०८/२०२०
[8/31, 8:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अष्टविनायक काव्यलेखन
        सातवा गणपती
  ओझरचा  श्री  विघ्नेश्र्वर
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
पुणे जिल्ह्यातील ओझर 
वसतो तिथं विघ्नेश्वर.
नारायण गावापासून
आठ कि.मी.अंतर.

अभिनंदनची लालसा
त्रिलोकाधिश ही मनसा.
विघ्नासूर उत्पत्ती यज्ञा
आतंकित केले देवांना.

वाचविण्या अत्याचार
प्रार्थीले गणेशा सूर,मुनी
आम्ही जाहलो लाचार
यावे झडकरी धावूनी.

माजला होता विघ्नासूर
विनायकाने हरविले असूर.
बाप्पाने सोडले अटीवर
नको मम पुजेच्या स्थानावर.

विघ्नासूराच्या विनंतीनं
तिथेच वास्तव्याचं वचन
गणपती नावाआधी नाव
विघ्नेश्र्वर केले धारण.

विघ्नहर्ता नावाचा अर्थ
संकटे सारणारा हा सार्थ
कुकडी नदीचे घ्या तिर्थ
गणेश कृपेने साधा परमार्थ.

सौ.मीरा शेंडे भंडारा.

पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                             मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे ल...