[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🚩पंढरीची वारी🚩
खांद्यावर विणा,
विठ्ठल विठ्ठल म्हणा.
हातात टाळ,
गळा तुळशीमाळ.
तुळशी वृंदावन,
रमे विठ्ठल नामें मन
मुखी माऊली,
भोळ्या भक्तांना सावली.
नाचू वारी संगे,
अवघी पंढरी रंगे
चंद्रभागे तिरी,
विठू रायाची नगरी.
जमला भक्तमेळा,
भक्तीचा अपूर्व सोहळा.
लागो तुझेच ध्यान,
लावण्य रूप पाहून.
माझी विठ्ठल रखुमाई,
मीरा लिन तुझे पायी.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *पंढरीची वारी*
*आज आषाढी एकादशी* |
*करु पंढरीची वारी* ||
*विटेवरी उभी*,
*ती मूर्ती* |
*गाऊ किती*,
*त्याची कीर्ती* ||
*आज आषाढी एकादशी* |
*करू पंढरीची वारी* ||
*मूर्तीत दिसे*,
*मज माऊली* |
*कृपेची त्याच्या*,
*मजवर सावली* ||
*आज आषाढी एकादशी* |
*करू पंढरीची वारी* ||
*त्याच्या पुढे*,
*भक्तांचा मेळा* |
*भव्य दिसे*,
*हा सोहळा* ||
*आज आषाढी एकादशी* |
*करू पंढरीची वारी* ||
*नयन माझे*,
*होई तृप्त* |
*कामना सार्या*,
*होई लुप्त* ||
*आज आषाढी एकादशी* |
*करू पंढरीची वारी* ||
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*, *भंडारा*
[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: * पंढरीची वारी *
====================
बदलले जग
बदलली दुनिया सारी
बदलली नाही ती
पंढरीची वारी.......
तीच ती दिंडी
तीच ती भक्ती
पाऊले चालती
पंढरीच्या दारी.... बदलले जग....
मनी आस विठुची
नयनी त्याचीच मुर्ती
ऊन, पावसाची ना परवा
विठुची किमया सारी.... बदलले जग....
मुखी विठुचा गजर
हात टाळ वाजविती
कुठे दिसे तुळस
भगिनीच्या डोक्यावरी.... बदलले जग....
किती वर्णू महिमा
पंढरीच्या वारीचा
लोटे जन सागर
आषाढे पंढरपुरी....
बदलले जग
बदलली दुनिया सारी
बदलली नाही ती
पंढरीची वारी.....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सौ. शितल श्रीकांत ठवकर (तुमसर रोड देव्हाडी)YY
[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *पंढरीची वारी*
मनी हर्ष दाटला
रुप तुझे पाहन्या
देह भान विसरली
तुझ्या भेटी साठी
डोईवर तुळशी माय
गळ्यात विना
ओढ लागली रे तुझी
सावळ्या विठ्ठला
गाभाऱ्यात तुझ्या
अभीर बुक्क्याचा सुगंध
मन झाले रे दंग
भक्तित तुझ्या
तुझ्या भक्तित लीन
झाली रे देवा
मन कशात लागेना
तुझ्या विना
*नंदा भोयर*
[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🚩पंढरीची वारी🚩
टाळ मृदुंगाच्या गर्जनी
फुगड्या रंगे अंगणी
माऊलीच्या दर्शनी
पायी निघाले अनवाणी
अंतराचे नसे भान
दर्शनाची असे आस
माऊलीच्या कृपेने
सेवा घडे अपरंपार
ना कुणी मोठे नी लहान
सगळेच असे एकसमान
शिस्तीचे होई पालन
असो वारी वा रिंगण
जशी वारी पुढे पुढे जाई
स्वागत घडते प्रत्येक गावी
पालखीचे दर्शन घेई
वारकऱ्यांची गळाभेट होई
असा हा नयनरम्य सोहळा
प्रत्यक्ष हृदयी साठवावा
पंढरीच्या वारीचा
योग पुन्हा घडवा🙏🚩
सौ. रूपाली अमोल बोंद्रे
भंडारा
[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पंढरीची वारी---🌹
वारकरी पंढरीकडे पाहतो
आज असावे विठ्ठलाच्या दारात ।
जयघोष जल्लोष नसला तरी
माझे मन व्याप्त मनात ।
पंढरपूर सोडून विठुने
डॉक्टर पोलिसांना दिले हात ।
वारकऱ्यांचे अश्रु हे पुण्य देऊन गेले
व्याकुळ वारकरी मनात हळहळतो।
संकट टळण्याची वाट पाहतो
दोन्ही हात जोडून पंढरीकडे पाहतो।
व्यथित मनाने विठुरायाला आळवतो,
पुढल्या वारी एक भाग्य लाभु दे
तुझ्या चरणी मस्तक आमुचे टेकु दे।।।।🙏🏼🙏🏼🌹🌹
सौ.सुचेता कुकडे सार्वे
पनवेल नवी मुंबई...।।
[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पंढरीची वारी---अभंग
------
आषाढी कार्तिकीला
जाती वारकरी
देवाची पंढरी
गजरात ।।
भक्त गण सारे
टाळ ,चिपळ्या घेऊन
वाजे मृदुन्ग नाचून
भक्त गाती ।।
विठ्ठल, विठ्ठल हा
भक्तीचाच ठेवा
अंतरी साठवावा
हरी नाम ।।
विठ्ठल रुखमाई
उभे विटेवरी
हात कटेवरी
ठेऊनिया ।।
कपाळी लाविला
चंदनाचा टिळा
तुळसी माळ गळा
शोभुनिया ।।
विठ्ठल आहे हो
जगाची माऊली
चाले हो पाऊली
वाट तुझी ।।
सुखाची ही उक्ती
विठ्ठलाची भक्ती
मिळेल मुक्ती
नामस्मरुनिया ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पंढरीची वारी--2
काका जायचे एकादशीला
पंढरीच्या वारीला
विठ्ठल दर्शनाला
पायी पायी ।।
नेम कधी न चुकला
पंढरीची वारी
कोरोना महामारी
आली आता ।।
लॉक डाउन आहे
घरीच पूजती
तुलसी वाहती
वांदुनिया ।।
युगांपासून तू
विटेवरी उभा
पाही चंद्रभागा
हासुनिया ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मुखी तुझे नाम - अमृताचा ठेवा
अभंग मनोभावे देवा करीतो मी सेवा मुखी तुझे नाम अमृताचा ठेवा
साधुनी प्रपंच केला परमार्थ , रंगलो मी भजनी त्यागुनीया स्वार्थ मन निर्विकारी कुणाचा ना हेवा
सखा तुची माझा सर्व नाती गोती , देहाची ही पणती आत्म्याची ज्योती लाभे तव कृपेने पुण्याईचा मेवा
जरी गांजलो मी यातना या भारी , धरण धरीले देवा तुझ्या दारी तारू प्रपंचाचा - पैलतिरी न्यावा अशी आहे भक्ती असा आहे भाव , मिळेना अनंता तुझा कुणा ठाव तुझ्या चरणाशी देह हा झिजावा
0
सौ .वर्षा इलमे दारव्हा
[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बिग.के.सा.सं.प.
""पंढरीची वारी""
चाले वारकरी,वाट पंढरीची
मनाचा भाव,वारी संगे।।धृ।।
पावसाच्या सरी,आल्या हंगामात
तृष्णाही मृदेची,झाली असे शांत।।
शिवार पेरणी, केली कृपावंत
पंढरीची वारी, करीन निवांत।।
माफ कर देवा,वारी ही चुकली
विषाणुनं केली,दुर्दशा जगाची।।
वारीत चालीन,आनंदें गाईन
फुगड्या खेळीण, वैष्णवांचे संगे।।
चंद्रभागे तिरी,स्नान मी करीन
तुळशीची माळ,गळ्यात घालीन।।
आस लागीजिवा,पाहण्या श्रीमुख
झाले मन शांत,दर्शनाने तुझ्या।।
दशरथ अतकरी, नागपूर
दि.०१जुलै२०२०
[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पंढरीची वारी (१)
पंढरपुरात निघाली वैष्णवांची वारी ।
अवघा चैतन्य सोहळा,दिसे या भुवरी।।
देवशयनी एकादशीची लागे जीवाला या ओढी।
टाळ, विणा, मंजिरी, मृदंगासवे घोष,
विठ्ठल-विठ्ठल, पांडूरंग-हरी ।।
गोल अश्व रिंगण, खेळ फुगडया,पाऊल्या।
नाचती वैष्णव,भेद कुठला न राहिला।।
दरी घाटातून जाई माझी पंढरीची वारी ।
डोळे आसुसले खुप पाहण्या सुंदर विठाई।।
चंद्रभागे तिरी येई भक्तांची मांदियाळी।
अवघे पातक दुर करी माझी माय भागीरथी।।
गळा वैजयंतीमाळा, गोपीचंदनाचा टिळा।
कर कटी ठेवूनिया उभा दिसे ,
माझा सावळा विठूराया ।।
भाग जाई,शिण जाई,
देखूनिया विठ्ठल रखुमाई।
मनाचिया गाभारी उरी,
गजर विठ्ठल-विठ्ठल ,पांडूरंग-हरी.......
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव
दि. 01.07.2020
[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺पंढरीची वारी 🌺
एकादशी येता,
मना लागे ध्यास।
भेटण्याची आस,
पांडूरंगा ।।
वाट पाहे माझी,
जीव हा व्याकूळ।
मनी तळमळ,
भेटावया।।
भक्तासाठी उभा,
माझा विठूराया।
रूप पाहावया,
मी अभागी।।
सुनी सुनी वाट,
वाटे मनी धाक।
अटी त्या जाचक,
भेटण्याच्या।।
सुनी ती पंढरी,
नाही वारकरी।
भावभोळा हरी,
भेटू कसा।।
सौ. के.बी.सार्वे भंडारा.
[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चालली वारी पंढरीला
पाहण्या जगजेठीला.
चालली वारी पंढरीला.||
मुखी गजर हरिनामाचा
मेळावा वारकऱ्यांचा
महीमा हा पंढरीचा
भेटण्या विठू माउलीला ||
खांदी पताका, मृदंग वीणा
हरी मुखे म्हणा,हरी मुखे म्हणा
रिंगण सोहळा पाहू नयना
साद घाली रुखमाईला ||
चंद्रभागे वाळवंटी
भक्तांची झाली दाटी
आतुर मायबाप भेटी
भाव चरणी तुझे वाहीला ||
रूप तुझे लोभस
पाहण्याची मज हौस
भेटीची मना आस
दर्शन पंढरपूरा जाहला ||
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/18, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पंढरीची वारी (२)
काय करू रे विठ्ठला,
यंदा चुकली रे वारी.
सांग कशी करावी,
आम्ही पंढरीची वारी?
नवा उत्साह,चैतन्य,
घेऊन येतो रे आम्ही.
डोळा भरून रूप तुझे,
आम्हा देते जगण्याची उभारी.
पण काय करू देवा,
यंदा असे महामारी.
भेट तुझी अन् माझी,
होणार नाही रे बरी.
मनाच्या गाभाऱ्यातून,
आवाज एक आला.
"अरे!भेट आपुली घडते,
ह्रदयाच्या अंतरी.
दुःखीतांची कर सेवा,
त्यांच्या मी रे हुंकारी."
आठवे मज आता,
तुकोबाचा अभंग-
*"न लगती सायास जावे वनांतरा।
सुखे येतो घरा नारायण।।
ठायीच बैसोनी करा एकचित्त।
आवडी अनंत आवडी अनंत आळवावा।।"*
आता मन आनंदून म्हणे
घरी राहूनच यंदा,
करू रे वारी,पंढरीची.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव
दि. 01.07.2020
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ""प्रभातरस""
सरसरणार्या पावसातुन
झुळझुळणार्या झर्यातुन
शहनाई च्या सुरातुन उमलली
धरतीवर मंगल प्रभात
क्षण हे मांगल्याचे घ्या
हसतमुखाने सुवासिनींनो
दारातील अक्षय रांगौळीनं
ललणांच्या लावंण्यानं
सहज फुलावं अपुले जिवन.
द.ना.अ.नागपुर
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आयुष्याच्या रंगछटा*
जिवनाच्या वळणावर,
आयुष्य वेगळं असते.
बालपणात दंगा मस्ती,
तर लाडीगोडी असते.
आई देई धपाटे,
आजी घेई जवळी.
नको मारू धपाटे,
पोर माझी कोवळी.
तारुण्यात मस्त,
नोकरी करायची.
रात्री मित्रांसवे,
मैफिल जमवायची.
म्हातारपण तर,
वटवृक्ष असे.
नातवात माझ्या,
बालपण दिसे.
सौ स्वाती सेलोकर,
भंडारा
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आयुष्याच्या रंग छटा*
जिवनाच्या रंगांमध्ये
छटा असतात अनेक
जसे रंग भरू
तसे चित्र होईल एक
सुंदर आयुष्य
जगुन घेऊ मस्त
नवीन रंगांमध्ये
मिळून जाऊ मस्त
एकएका छटांमध्ये
असतो आनंद दडुन
तो वेचावा लागतो
पाहा कसं जीवन जातं खुलून
प्रत्येक क्षणाची
छटा असते वेगळी
आपल्याला ठरवावं लागतं
कुणाशी साधावी जवळीक
*नंदा भोयर*
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""आयुष्याच्या रंगछटा""
निर्मळ,कोमल तनु बालमनाची
आवाज देण्या" साधु"बोलती
मित्रांसंगे मैदानं हर्षाने गर्जती
भांडणतंटे,मारामारी भिती तयाची
ध्येय इमानदारी ,स्वावलंबनतेचे
करावे स्वकष्टाने सार्थक जिवनाचे
आयुष्य विवाह परांत एकनिष्ठेचे
म्हणुनच मिळाले जिवन प्रतिष्ठेचे
संसारात मिळाली पत्नीची संगत
यासच झाले मम जिवन उन्नत
मातापित्यासह पत्नीला सन्मान
सुधारत गेले माझे जिवनमान
संसार वेलीवर दोन मुले प्रसवली
संस्काराने शिक्षणांत हुशार झाली
मोठ्या शहरांत नोकरीस लागली
आयुष्य वळुनी बघले मनं हासली
काटकसर,तडजोडीत जिवन गेले
नाही मनमौजेचे जगणे झाले
नात " मुक्ताई"ने कुटुंब बहरले
दुःख जिवनाचे मायेत विरले
साठी होता बुध्दी नाठी ओटी
ठेवा आधारवडाचं नातं पोटी
आवडीनिवडी चे आयुष्य जगतो
सकाळी योगा दुपारी काव्य करतो
द.ना.अ.नागपूर
दि.०२जुलै २०२०
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आयुष्याच्या रंगछटा*
खेळणे, बागळणे, भांडणे
काश्यातही पटकन रमत बालमन
नसते काम फक्त अभ्यास
म्हणूनच सगळ्यांना आवडतं बालपण
उत्साह, उमेद, काहीशी बेधुंदी
तारुण्यात येतात नवनवीन अडचणी
लग्न, मुले, संसार, जबाबदारी,
असावा आदरभाव आचरणी
योग्य आहार, झोप, व्यायाम
याचाच असतो आधार
नातवंडांच्या सानिध्यात
एकटेपणा धेई माघार
ऊन पावसाचा खेळ
सुरूच असतो जीवनी
सप्तरंगच्या रंगछटा
जश्या दिसतात गगनी
सौ. रूपाली अमोल बोंद्रे
भंडारा
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आयुष्याच्या रंग छटा---
इंद्रधनूची कमान शोभे
आयुष्याची रंगछटा
सुख दुःखाच्या लहरींवरती
आभास चढवी मुखवटा ।।
बालपणी हे अभ्यास अन
सांस्कृतिक गाणे, नाचायचे
निरागस पणे भांडणे
मिसळणे, दिन हे बागड ण्याचे।।
फुलपाखरे जणू या
वेलीवरून त्या तरुवर
निर्णायक दिशा ती उमेदीची
शिक्षण अन नोकरी ठरावण्यावर।।
अक्षता पडती माथी
घेऊन जबाबदारी अंगावर
मुले खेळती अंगणी
विविध रंगछटा उमटती रंगोळीवर।।
बदलती वयपरत्वे
, नाती अन नांवे
मुलगी ,सून, वहिनी
काकू, आजी तिला म्हणावे ।।
विविध रंगानी सजते, कधी
उसळती दुःखाच्या लाटा
सावरावे त्यातूनही
मोरपिसारा फुलवी रंगछटा ।।
--------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आयुष्याच्या रंग छटा*
आयुष्यातील रंग छटा
खुप काही सांगुन जातात
रोज नविन कलाटणी
रोज नविन शिकवून जातात
सरड्याप्रमाणे रंग बदलत
असतं आयुष्य
कितीतरी अवस्थांमधून
घडत असतं आयुष्य
पेंटिंग प्रमाणे आयुष्य असतं
रंग आपण भरत जावे
जेवढं सजवता येईल
तेवढे आपण सजवत राहावे
आयुष्य असच असतं
आयुष्यतील रंगछटा कधी दिसतात
तर कधी दिसत नाही
कधी अनुभवता येतात
कधी अनुभवता येत नाही
सौ नंदा भोयर
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आयुष्याचा रंगछटा*
आयुष्याचा वळणावरचे रंग
आठवून आठवून झाले दंग
प्रथम रंग बालपणीचा
जणु वर्षावच प्रेमाचा
द्वितीय रंग कुमारपणीचा
आईबाबांच्या इच्छा आकांक्षा भविष्य घडविण्याचा
तृतीय रंग तारुण्यांचा
दोघांच्या मिलनातून तिसर बिज अंकुरण्याचा
चौथा रंग परिपक्वतेचा
फुलमाळी बनून नात्याला फुलविण्याचा
पाचवा रंग वृध्दावस्थेच्या वाटचालीचा
स्वातंत्रपूर्ण बिनधास्त जगण्याचा
सहावा रंग वृध्दावस्थेचा
आलेल्या वयाचा सुखद स्वप्नांचा
सातवा रंग वृध्दापकाळाचा
पावसाळा ऋतुतून निघालेला
सप्तरंगी इंद्रधनुषाचा
*- सौ. चंदा शेंडे*
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺आयुष्यातील रंगछटा🌺।।
मातेच्या उदरातील छटा,
माताच जाणे तिज मनाने।
प्रवेश करीता रंगमंचावर,
मजाच येई त्या रडण्याने।।
विविध रंगी ते आयुष्य,
मजाच न्यारी रंगछटेची।
बालपण ते हूंदडण्याचे,
ज्याने त्याने समजवण्याचे।।
बालपणी त्या मज वाटे,
केंव्हा केंव्हा होतो मोठे।
जो तो येई ज्ञानच वाटे,
आजी फक्त धरशी पोटे।।
तारुण्य ते सळसळणारे,
रंग सगळे इंद्रधनुचे।
बहरुन येई ते लावण्य,
नाव न घेई मिटण्याचे।।
प्रौढपणी त्या जबाबदार्या,
मस्तकावरती चढती आड्या।
संसारातील रुसवे फुगवे,
झेलीत जाता थंड पडती नाड्या।।
म्हातारपणाचे रंगच न्यारे
रोगांचे तर भारीच नखरे।
नातवांशी मौजमजा सर्व विसरे,
आयुसंधेला उडवी विविधरंगी धुमारे।।
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: लहानपणी शाळेत टिचरनी मारले की खुप राग यायचा वाटायचं टिचर ही चुकल्या पाहीजे आपण ही तयाचया हातावर छडीने मारावे पण मारताच आले नाही राहुनच गेलं😀 मोठ्या भावानै मुद्दाम खोडी काढली की त्याला ही मारावस वाटयच पण राहुनच गेल.मोठे झाल्या वर लहान मुलींसारखे वागावस वाटत.लहान बनुन आई समजुन सासूबाई च्या कुशीत शिरावस वाटत पण राहुनच गेल😋सासुबाई काय म्हण तील .साडीवर 2 वेण्या घालुन मिरवास वाटत कसे दिसेल असे वाटुन राहुनच गेल.😀 खुप काही राहील आहे स खी सांगा कशी पुर्ण करावी आपली ईच्छा🙏🙏🙏
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आयुष्याच्या रंगछटा
रंगछटा आयुष्याच्या,
हलक्या गडद रंगाने सजविणाऱ्या.
बालपणीच्या उदयावरती,
आयुष्य होई फुलपाखरू .
क्षणात इकडे, क्षणात तिकडे,
या फुलांवरुन, त्या फुलांवर
रंग फुलांचा वेचणारे.
तरुणपणाच्या मध्यावरती,
आयुष्यातले रंग जणू इंद्रधनू.
घेऊन कुंचला स्व-हाती,
मुक्तपणे रंग उधळणारे.
सप्तरंगाचा खेळ खुशाल,खेळती आनंदाने.
आयुष्याच्या वाटेवरती,
म्हातारपण ही जणू सांजवेळ.
जमवूनी सगळ्या रंगछटा,
साठवूनी ठेवी मनाच्या कुपीत.
आयुष्य असे सुखदुःखाचे मिश्रण,
कधी सावली,उन्हाचे चटके .
जसे येतील क्षण,तसे रंग भरू आपण.
वेगवेगळ्या रंगछटेविण
आयुष्याला नसे वेगळेपण.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि. 02.07.2020
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺आयुष्यात काही करायचे राहूनच गेले.🌺
नमस्कार सख्यांनो,
आयुष्याची संध्याकाळ होत आली. पण काही गोष्टी करायच्या राहूनच गेल्या.ती खंत अजून ही मनात सलते.
१.मला व्यवसायिक शिक्षणात मला नर्स व्हायचे होते.पण मार्गदर्शन न मिळाल्यामुळे शिक्षिका व्हावे लागले.पण समाधानी आहे.
२.कला क्षेत्रात मला नाट्य,एकांकीका,नाटक यात काम करायचे होते. पण तेही राहूनच गेले. तरी समाधानी आहे.
३.सर्वांत महत्वाचे म्हणजे आजची काळाची गरज गाडी शिकणे तेही राहूनच गेले.तरी समाधानी आहे.कारण यावाचून माझे काही अडलेच नाही.
बाकी सर्व ठीक आहे सख्यांनो तुमच्या आर्शिवादामुळे.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय ..आयुष्यात काही करायचे राहून गेले*
लहान असताना मला खूप वाटायचे की आपण नृत्य शिकावं. अभ्यासामुळे ते राहून गेलं होत पण या वर्षी मी नृत्य शिकले आणि १२०० महिलांनी भरलेल्या सभागृहात सादर केले. तश्या मनात आलेल्या गोष्टी लिहून काढाव्या असे वाटायचे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून ते सुध्दा होतंय. परदेशी जायची विशेष हौस नाही परंतु आपल्या भारत देशाची विविधता बघायची आहे ,ते अजुन राहूनच गेलंय. पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
सौ. रूपाली अमोल बोंद्रे.
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आयुष्यात काही करायचे राहून गेले------
संख्यानो प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातील एका कप्प्यात काही गोष्टी दडल्या असतात. बालपणीच्या त्या सुख सरी आपल्याला ओंजरून, गांजारून जातात. मायेची पाखर,
आईचा धाक, शिस्त सारं हवं हवं वाटते.
का की कुणास ठाऊक पण
जो आवडे सर्वाना तोचि आवडे देवाला. देवाने माझा वात्सल्याचा
पदर रिता केला, सार हरवलं, ते शोधण्याचा फुका प्रयत्न असतो, तो या कविता, लेख, साहित्यामधून.
कधी मोकळ्या सुरात गाणं नाही म्हंटल, ते गावं वाटते,
कोसळत्या धारा त चिंब चिंब भिजावस वाटते, नायनधारही गोड म्हणून ओठी स्फुरून आकंठ
गिलावस वाटते.कधी कधी जोरात
रडावस वाटते, एकट कुठेतरी हारावल्यागत बसावस वाटते.
मैत्रिणींसोबत खुप गप्पा माराव्यात, रस्त्यावरची पाणी पुरी
" अब हमारा नंबर है' म्हणत खावीशी वाटते,एकदा लहान होऊन सार उपभोगावस वाटते,
हे सारं आयुष्यात राहूनच गेलं.
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आयुष्याच्या रंगछटा
आयुष्याच्या चित्रात
इंद्रधनूचे रंग.
एकात एक मिसळता
होतो धवल रंग.
रंग आपण भरतो तरी
चित्रकार तो निराळा.
कधी आवडत्या रंगातही
रंग भरतो काळा.
कधी उमलते पहाट गुलाबी
कधी ढगाळ नभी.
कधी वसंत पालवी हासरी
कधी निराशा पसरी.
सहा ऋतूंचे सहा रंग
हर रंगी होई दंग.
गडद,फिके,कधी बेरंग
आयुष्याला सांज नवरंग.
तरी जगावे हसून क्षण हा
पुढच्या क्षणाची नको कामना.
अश्रू मधूनी पुसती वेदना
ओठांवरती हास्य स्पंदना.
रंगारंगीच्या अनुभवांची शिदोरी
भविष्याची वाट भारी
चव सगळ्यांची न्यारी न्यारी
त्या चित्रकाराचे आभारी.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अशी मी 🙏
हो अशीच आहे मी
नाव माझं ममता पण मुळात आहे कणखरता अशी मी
आई माझी दुर्गा तिचा घेतला राजकारणाचा वसा
हो अशी मी
दुर्गेच्या उदरात गिरवला राजकारणाचा धडा म्हुणुन
ममता मिराशी नावाचा चालवला वसा हो अशी मी
बिनधास्त राहून ट्रेन मध्ये केल्या मारामाऱ्या पण जरा
ही खन्त न करता थोपटलं स्वतःला अशी मी अशी मी
कॉलेज मध्ये गेले निवडून आले सी आर
आता म्हंटल लढायला हो तयार अशी मी बाई अशी. मी
लग्न करून झाले एकनाथ रावांची राणी
मग काय बघता राव अशी मी अशी मी
वयात वाढले अक्कल वाढली बघता बघता नगरसेविका झाली अशी मी
सर्व काही केले पण समाज मात्र ध्यानात होता त्याचा साठी त्पुढाकार घेतला अशी मी अशी मी
सामूहिक झालं कोजागिरी झाली समाजभूषण झालं
आता काय तर म्हणे महिला संघटना वाढवू अशी. मी
झालं मना जोग झाल्या 40महिला उडविला बार सोबत भिसीचा अशी मी
भिसी झाली ट्रिपा झाल्या चॅरिटी झाली आता काय तर
मते भाऊ सुभाष भाऊ म्हणे ऑल इंडिया महिला संघटना तयार करा मुंबई ला पोहचा
झाला ग्रुप तयार झाल्या महिला तयार अशी मी अशी मी
आज त्याच ग्रुप वर मी सांगते अशी अशी मी 🙏
समाजासाठी काम करील मी
अशी मी
अशी मी
सौ ममता भोयर
उपाध्यक्ष रामनगर नागपूर
उपाध्यक्ष केंद्रीय कार्यकारिणी
सहसचिव महिला मंडळ 🙏
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अशी मी*🤷♀️
नाव माझे स्वाती
आईबापाची मधली लेक
सर्व करतात माझ्यावर प्रेम
अशी मी आहे सुरेख
पाककलेत मी निपुण
नृत्यकलेसाठी काढते मी सवड
गाणं पण गाते मी
अशी मी जपते माझी आवड
भांडण कधी करीत नाही
खोड्या करण्यात मी पटाईत
थट्टा मस्करी नेहमी करते
अशी मी सगळ्यांच्या गळ्यातला ताईत
मंचावर जाण्यास सदा सज्ज
मेहंदी, रांगोळी, उखाणे बनविते
भाषण, कवितेची मला आवड
अशी मी माझ्यासाठी वेळ काढते
प्रत्येक काम करते
प्रामाणिकपणे मन लावून
प्रत्येक नाती जपते
सगळ्यांची मनं सांभाळून.
आई बापाची शिकवण
पडली माझ्या कामी
अशी मी आहे
सदाचाराची धनी
सौ स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अशी मी*
आहे मी बिनधास्त
आहे मी हसरी
सहवासाने तुमच्या
अशी मी
मदमस्त मी
बेधुंद मी
खट्याळ मी
अशी मी
वाऱ्यासारखी भिरभिरणारी
किरणासारखी पसरणारी
चहूकडे हुंदडणारी
अशी मी
हातात लेखणी घेणारी
कविता सतत लिहणारी
मनातील भाव व्यक्त करणारी
अशी मी
मैत्रीण संगे रमणारी
आठवणीत त्या गुंतणारी
मनसोक्त आनंद घेणारी
अशी मी तशी ही मी
. सौ नंदा भोयर
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹अशी मी..🌹
अशी मी ,कशी मी
देवाघरची देण मी
बाबाची जयश्री
आईची निता
ताईची राणी
भावाची छकुली
नवरयाची सखी
मुलांची माता
मैत्री णीची मैत्रिण
काँलेजची प्राचारया
विद्यार्थ्यांचा दिलासा
मँनेजमेंटचा भरवसा
सदा हसता चेहरा
भारदस्तत व्यकतीमतव
अशी मी खवासची लेक
रेहपाडे ची सुन
मैत्री णीची जान
बीकेसची धमाल
परीचय छोटा
समाजकार्याचा घेतला
आहे वसा..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
" अशी मी "
ना मी गुलाबाची कळी
ना मी मोगऱ्याची कळी
मी तर आहे माझ्या आई ची कोमल कळी
अशी मी....
ना मी चाफ्याचे फुल
ना मी चमेलीचे फुल
मी तर आहे माझ्या बाबांच कोमल फुल
अशी मी....
ना मी वहीचा कागद
ना मी पेनातली
मी तर आहे माझ्या भावंडांची ताई
अशी मी....
ना मी मंदीरातला दीवा
ना मी तुळशी जवळची पणती
मी तर आहे माझ्या पतीच्या जीवन रुपी दीव्याची ज्योती
अशी मी....
ना मी जाई
ना मी जुई
मी तर आहे माझ्या मुलीची आई
अशी मी....
अशी मी
नेहमी नात्यात गुंतलेली
तर मी शांत
मी तर आहे शितल
अशी मी....
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
सौ. शितल श्रीकांत ठवकर (तुमसर रोड देव्हाडी)
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: #अशी मी🌹🙏
आई वडीलांच्या लाडाची
बहीणी,जाऊ,भाच्या,सर्वांची आवडती
प्रेमाची,मायेची,व्याख्या जपणारी
अशी मी
नित्य खरे व स्पष्ट बोलणारी
चिड आहे मला खोट्याची
अशी मी
कोणतेही काम हातात घेतले की,
जीवाचा आटापीटा करणारी
अशी मी
दगदग,धावपळ ही,शब्द तर
माझ्या जीवनाला लागलेली
अशी मी
दुसऱ्यांविषयी आदर,कुणाबद्दल
द्वेष भावना नसणारी
सुख दु:खात साथ देणारी
अशी मी
स्वछतेची आवड जपणारी,
पाककलेत वर्चस्व गाजविणारी,
सदैव मैत्रिणींच्या घोळक्यात वावरणारी...,
अशी मी
वचन,गायन,लेखन,बागकामाची
आवड जोपासणारी,साधे,पण सुरेख दिसण्याची आवड असलेली
अशी मी
समाजाविषयी आदर,प्रेम असणारी,प्रत्येक क्षेत्रात नव्या जोमाने,कार्य करण्याची आवड असणारी,
अशी मी कीर्ती
सौ.कीर्ती शेंडे
नागपूर🙏🙏
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अशी मी--
-----------
मंगला माझे नाव
भंडारा आहे गाव
मी बोन्द्रे ची लेक
सारे म्हणती, माझेच ऐक
आहे अशी मी ।।
मी डहाके ची सून
भरलं घर सुखाची खुण
सिद्ध, वरदची मी आजी
करते मी आवडीची करंजी
आहे अशी मी ।।
लोकमत मंच ची, वार्ड संयोजिका
गाणे,नाच, नाटक करण्याचा हेका
सर्वत्र घेते व्यंजन प्रशिक्षण
राव म्हणती, बायको माझी
पाककलेत निपुण
आहे अशी मी ।।
कुणबी महासंघ महाराष्ट्राची मी अध्यक्षा
मूक, बधीर, अंधांची सेवा हीच भाव भाषा
प्रगतिशील लेखक संघ हाताळते
मी
बऱ्याच अडचणीला तोंड देते मी
आहे अशी मी ।।
खिलेमुक्त झाड,अभियान
जिजा बटालियन ची अध्यक्षा मी
खुशी फाउंडेशनची आहे
उपाध्यक्षा मी
आहे अशी मी ।।
हळदी कुंकवाला अन कोजागिरीला
मैत्रिणींसोबत नाटकं करते
समाज प्रगती होण्या
प्रयत्न सदा करते
आहे अशी मी ।।
मैत्रिणींच्या घोळक्यात
सदा मी राहते
समाजाचे काम
प्रामाणिक,अन निष्ठेने करते
आहे अशी मी ।।
बी.के.महिला मंच
खूप चांगला लाभला
दादा, आणि ताईंचा
सहवास मस्त मिळाला
आहे अशी मी ।।
-----------------------
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अशी मी*
नवनवीन गोष्टी शिकण्यात मिळते मला खुशी
म्हणूनच नवरा म्हणातो मला हौशी
नीटनेटकेपणा चा घेतला आईकडून वसा
बाबांचा वक्तशीरपणा विसरेल कसा
सासूबाईंनी कडून आली स्वयंपाकात गोडी
म्हणून biotechnology विसरले थोडी
वाचनाचा मला भारीच छंद
खायला आवडते मला शिखंड
मित्र मैत्रिणी जुळवायला नाही लागत वेळ
आवडतो खेळायला क्रिकेट खेळ
नृत्य करण्याची मला फारच आवड
रांगोळी काढायला काढते सवड
राहायला आवडतं मला update
म्हणून नाही होत मी कधीच depress
सौ. रूपाली अमोल बोंद्रे
भंडारा.
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: इतिहासात लुप्त झालेले गित
"" तुमडी गित ""
लख लख लख लखा..
लख लख तुमडी भरून देना।।धृ।
तिबेट फस्त करून
पळविले लामांना
जिन पींग भाऊ तुमी
समजुन तर घ्याना।।१।।लख...
भारतावर नजर तिरपी
कधी नाही ठेवाना
मॅक लाईनचा करार
भाऊ तुमी आठवाणा।।२।।लख..
कडेकोट बंदोबस्त भारताला
युध्दसामग्री आहे ना
शिरजोरी कराल तर
भाऊ मार तुम्ही खावाना।।३।।...
बेडकं,कुत्रे, उंदीर ,मांजर
वुहान मध्ये भाजाना
कोरोनाच्या महामारीत
भाऊ जगाला वाचवाना।।४।।लख
महासत्तेच्या स्वप्नान
नाश तुमचा होवाना
आशियात नाही मागे
भाऊ चांगल्यानं. समजाना।५।ल
दशरथ अतकरी, नागपूर
दि.०२/०७/२०२०
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अशी मी
दोन भावांची बहीण धाकटी
सर्वांचीच खूप लाडकी.
लेक झाल्याचं हर्ष झालं घरा
आवडीचं बाबांनी नाव ठेवलं मीरा.
अशी मी
आई पाटलीन गोरी,उंचपुरी
बाबाही मिल्ट्रीमॅन बहुगुणी भारी
मी मात्र ठेंगणी काळी सावळी
स्वभाव शांत,मनमोकळी.
अशी मी
जो कोणी भेटतो,आपला होऊन जातो
सर्वांचा प्रेम, विश्र्वास सदैव असतो
.मोठ्यात मोठी,लहानात लहान
मुलांच्या घोळक्यात विसरून भूकतहान.
अशी मी
अभिनय,नृत्य,गायन आत्मा माझा
छंद भजन किर्तन,वसा आईचा.
सासर नि माहेर समान मला
कुणातही मी नाही दुजाभाव केला.
अशी मी
कपट निती नाही मना शिवली
सर्वांना देत मायेची सावली
कुणासाठी ही करते जीवाचं रान
म्हणून माझा नात्यांत आहे मान.
अशी मी
भरलं घर,नोकरी सांभाळून घेतलं शिक्षण
अभिमानानं फुलतं माझ्या पतीचं मन.
सासू सासऱ्यांची सेवा केली निष्ठेने
माझी मुलं घडली संस्काराने.
हेच संस्कार शाळेत देते
म्हणून सर्वांची लाडकी 'बाई' असते.
अशी मी.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अशी मी....
सासर माहेर घेऊन चालणारी
नंनद,भावजय, जाऊबाई
ह्यांच्याशी गप्पा गोष्टी भांडण
न करता जुळवून घेणारी अशी मी
मैत्रीणं सोबत फिरायला जाणे
Window Shopping करणे
पाणी पुरी शेव पुरी भेळपुरी
वर ताव मारणे.खाऊन झाल्यावर
भेळवाल्य भैय्या ला साधी शेव पुरी मागणारी अशी मी
गायन पाककृती थोडफार वाचन
फुले, पाने, पक्षी ह्याच्या सोबत रमणे.कुणालाही टोचून न बोलणे
प्रत्येक व्यक्ती च्या भावना दुखावल्या जाणार नाही ह्याचा भान ठेवते. अशी मी
माझ्या मुलांना वेळ देते
मुलांच्या पतीच्या आवडी निवडी कडे लक्ष देते.. नवरा एखाद्या विषयया वर चिडला तर तो विषय समजावून तो मान्य करायला भाग पाडते मग जरा नमतात..अशी आहे मी.....
सौ.सुचेता कुकडे सार्वे
पनवेल .....
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अशी मी
झाडाच्या पालवीत लपतीसअशी मी ।
दुःखाच्या डॉगरात जाशील का ग उपाशी।।
बाभूळ च्या झाडात माया शोधते अशी मी।
तू नाराज नको होऊ कोना पाशी।।
आनंदी राहा जगात अशी मी।
तुझ्यात शोधते साऱ्या जगाची खुशी।।
दुःखात का रडते ग अशी मी।
कश्यापाई पाहते दुसरी खुशी।।
तुझ्याशिवाय जगते अशी मी।
मला देशील का ग आधाराची उशी।।
झाडाच्या पालवीत लपतीस अशी मी।तुझ्यात जीव ओतून राहीन तुजपाशी।।
सौ श्वेता स. कानतोडे
अमरावती
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बिग.के.सा.सं.प.
""अशी. मी ""
अशी मी नार शिलेदार
जगी नाही माझा भ्रतार
हाती घेउन मी तलवार
करीन रयतेचा कारभार
अशी मी नार लिहिन इतिहास
शत्रुला करीन रणांगनी उदास
मला आहे जिंकण्याचा ध्यास
दुष्मन मनाला घोर उपहास
अशी मी नार चालविन घरदार
धन्याच्या खांदी न् ठेवता भार
काटकसर,कष्टात नाही माघार
सौभाग्याच्या दुष्मणांना देईन मार
अशी मी नार मुले शिकवणार
ज्योतिबासावित्री सम विचार
डोकीचा पदर कमरेस खोचणार
काळया मातीतं मोती पिकवणार
मराठी नार होईन कारखानदार
उत्पादन काढीन सुंदर दर्जेदार
खुश असतील सर्व नोकरदार
हप्ते पत पेढीचे नियमीत फेडणार
दनाअ, नागपूर
दि.०३जुलै२०२०
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अशी मी
थोडीशी अल्लड,थोडीशी नटखट
थोडी बालिश, थोडी शहाणी
सासर माहेरची लाडकी,प्रतिभा मी.
साधी राहणी,थोडी लाजरी,थोडी हट्टी,
पण सगळ्यांशी माझी जमते चांगलीच गट्टी
अशी मी.
स्वयंपाक, वाचन, संगीत, कवितेची आवड.
देवावर श्रद्धा, नात्यांवर विश्वास,
निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा घेते मी आस्वाद.
नवनवीनतेची जपते मी आवड,
अशी मी.
जे चांगले ते घ्यावे,बाकी सगळे सोडून द्यावे.
हसत खेळत जगावे,सुख दुःख समान मानावे.
हिच सकारात्मकता ठेवते अंगी,
अशी मी.
मैत्रीणींसाठी खास, नवऱ्याची मी जान.
मुलामुलीची सखी,आईबाबांची लाडकी.
सगळ्यांचे गुपित सांभाळते मी,
अशी मी.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि. 03.07.2020
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा उपक्रम-
।।🌺 मी अशी 🌺 ।।
मी अशी, कशी मला ,
उमगलेच नाही।
मी अशी जगावेगळी,
केले काहीतरी,परि सांगताच,
येत नाही मी अशी।।
स्पष्टवक्ती,निर्भिड मत मांडणारी,
कुणा रुचलेच नाही.मी अशी।
काल करायचे ते आज कर,
आज करायचे ते आता कर।
तत्व माझे करुनच ठेवी.मी अशी।।
शासकिय नौकरीच करावी,
ध्यास मनी खाजगी तीन ठिकाणी
राजीनामा देऊन निवड मंडळातून
स्पर्धा परीक्षेतून स्वबळावर नौकरी
मिळविली. मी अशी.
माहेर माझे कामठीचे वैदय मॅडम
ओळख न्यारी.विदयार्थि मजला
टायटल देती "हसना टाॅनिक"
मन आनंदे भरुन येई मी अशी।।
१९८४ पासुन नेहमीच नौकरी
सांभाळून समाजकार्यात सहभागी मी अशी।
संयुक्त परिवार झेलत नौकरी
सांभाळली मी अशी।
नौकरीतील संकटेआली पण
अधिकार्यानाही नाही घाबरले.
मी अशी
कर्तव्य म्हणूनी झाले.मी केले
म्हणताच आले नाही.मी अशी।
"नाही अपेक्षा,
नाही उपेक्षा "
तत्व माझे अशी मी।
सौ.के. बी.सार्वे भंडारा.
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺 *अशी मी* 🌺🌺
लेक आहे वनवेची
सुन झाले शेंडेची
गृप आमचा साहित्यलेखनांचा
सोबत अनेक कलाकृतींचा
विकास व्हावा सुप्तगुणांचा
प्रस्ताव मिळाला कवितेचा
प्रतिसाद देत कवि वर्णीते अशी मी.....
एक भाऊ बहिनी चार
कुटूंबातील सदस्य सात
सातही सदस्य गोरीगोमटी
कृष्णवर्णी अशी मी....
रंगरूपाने आहे बंदर
परिवारातील सर्वच सुंदर
खंत नाही सौदर्यांचा
अभिमान वाटतो अभ्यासू गुणांचा
आवड अति शिकविण्याची
म्हणून झाली शिक्षिका मुलांची
वर्तमान काळी संचलिका मुख्याध्यापिका दोन्ही अशी मी ....
चंदा माझ नाव
सुर्यकिरणांनी होते प्रकाशमान
मैत्रिणीनी माझ्या हजार
तरी वाढविण्याचा वेड फार
या वेडापाई बी के शी जुळली अशी मी .....
आई मी दोन मुलांची
सौरभ आणि वृषभची
इंजिनियर मोठा डॉक्टर छोटा
दोन्ही आहेत छान
अभिमान वाटे मला फार..
आयुष्याचा माझा साथीदार
प्रल्हाद त्यांचे नाव
मदत करतात पदोपदी
हिम्मत देतात भली मोठी
हिम्मतीला देते मी साथ
मुळात आहे जिद्दी फार फार
छोट्या मोठ्यांचा आर्शिवादाने
सक्सेस जीवनात झाली अशी मी...
- *सौ. चंदा शेंडे*
[7/18, 7:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: तो तसा अन् मी अशी ..
संसाराच्या गराड्यात
उरे नाही काही खुशी .
दोन टोके विचारांची
तो तसा अन् मी अशी .
प्रेमाने ह्या बांधलेल्या
घरात झाली नकोशी .
स्वप्नांच्या या दुनियेत
तो तसा अन् मी अशी .
सहनशीलतेचे ते
डोज राहिले उपाशी .
स्वातंत्र्याच्या आव्हानाला
तो तसा अन् मी अशी .
शिक्षणाच्या विचारांनी
घेतली भरारी कशी ?
वादाच्या भोवऱ्यात या
तो तसा अन् मी अशी .
सांभाळावें कुणी आता
सौजन्याची ऐसीतैसी .
अधिकाराच्या टोकाला
तो तसा अन् मी अशी .
संवादाचे जीणें सारे
मिटले या नशिबाशी .
' अंधाऱ्या ' या वाटेवरी
तो तसा अन् मी अशी .
सुभाष धांदे , यवतमाळ
दिनांक 03/07/2020
[7/18, 7:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझ्या समाज मंडळाचे कार्य--
निस्वार्थपणे जे परस्परांचा आदर करून कार्य करतात त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन🙏
भंडारा समाज मंडळाचा कणा असलेले सदानंद इलमे सर
मुख्य कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी, युवा कार्यकारिणी
उत्तमरीत्या सांभाळतात.माझ्या समाजाचा मला अभिमान आहे.
आमच्या समाजाचे वर्षभर काम सुरूच असतात. सावित्रीबाई फुले जयंती, शिवजयंती, तुकाराम बीज, जागतिक महिला दिन, गुणवंतांचा
सत्कार, सेवानिवृत्त, ज्येष्ठांचा सत्कार, वधु वर सूचक मेळावा, कोजागिरी, ज्ञान विकसित करणारे प्रशिक्षण, खास स्त्रियांसाठी आरोग्य शिबीर ,स्नेहमीलन घेत असतो.
या अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम
नाच, गाणे, नाटक ही घेतो.
सामूहिक विवाह सोहळा दरवर्षी घेत असतो.सध्या समाज वाड्याच्या बांधकामात लक्ष केंद्रित केले आहे.कारण लॉक डाउन मुळे कार्यक्रम होत नाहीत .
मला समाजाच्या शैक्षणीक, कृषी, व्यावसायिक दृष्टीने विकास निस्वार्थ पणे करायला हवा ,असे वाटते.
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 7:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *माझ्या समाज मंडळाची कामे*
समाज मंडळात थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करतात त्यामुळे त्यांच्या बद्दल बोलायची संधी मिळते. सामूहिक विवाह सोहळा करतात त्यामुळे लोकांची वेळेची व पैश्याची बचत होते. समाजातील लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. गुणवंतांचा सत्कार, जेष्ठ नागरिक सत्कार, सेवा निवृत्तांचा सत्कार इत्यादि कार्यक्रम घेतले जातात सर्वाना मंचावर जाण्यासाठी संधी देतात.
सौ स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[7/18, 7:17 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏
बावणे कुणवी समाज रामनगर नागपूर
सौ ममता भोयर
आमच्या मंडळातील महत्वाचं म्हणजे आमची कार्यकारणी आणि त्याची युनिटी ही खास महत्वाची , आज पर्यंत सामूहिक विवाह कोजागरी अंतर्गत गुणवंत विध्यार्थी सत्कार , हळदी कुंकू हें कार्यक्रम न चुकता झालेत पण त्या व्यतिरिक्त विद्यार्थी आणी त्याची पुढची वाटचाल याकरिता निशुल्क उच्च शिक्षण यांचा सराव परीक्षा सेमिनार आयोजित केले याशिवाय बाहेर गावाहून येणारा गरजू विध्यार्थी त्याला आमच्या सभागृहात राहण्याची व्यवस्था करून देतो बरेच लोक यांचा फायदा करून गेलेत या शिवाय 10वि 12वि पास मेरिट आलेली मुलं असतात त्यांना परस्थिती नसेल तर त्यांना पुढच्या शिक्षणा साठी सोय करून देणे
आणी खास म्हणजे सभागृह चालवताना तिथलं मॅनेजमेंट करणारा व्यक्ती आपला बा कु च असेल हा नियम त्या माध्यमातून आपलाच माणूस हा असल्याचे समाधान शिवाय त्याला कामधंदा मिळतो हा आनंद असा हा उपक्रम झाला
महिला मंडळ दर महिन्यात भिसी करते त्यात एक वेगळी अमाऊंट जमा करतो त्यातून आम्ही महिला उद्योजिका मेळावा दोनदा आयोजित केला मोठ्या प्रमाणात योगदिवस साजरा करतो
महिला जागतिक दिवस साजरा करतो त्यात महिला आणि आरोग्य याचे निराकरण करतो महत्वाचे असे कि कर्करोग सारखा दुर्धर आजार कसा टाळता येईल याकरिता जवळपास 30 महिलांचे कॅन्सर हॉस्पिटल जामठा इथे चेकअप करून घेतले तिथं सेमिनार देखील अटेंड केला
आमच्या चैरिटी च्या रकमेतून आदासा वृधाश्रम तिथे एल इ डी लाईट गिफ्ट दिलेले त्याचा सोबत जेवण केले यानंतर मूक बधिर मुलांना जेवण आणि एक हॅन्ड माईक गिफ्ट केला अशी बरीच उपक्रम आम्ही राबवित असतो आमच्यात मतभेद असतील पण मनभेद नाहीत म्हणून कार्य उत्तम होतात
अजून आमच्या कल्पना आहेत त्या पुढे साकार करू ही आमची सर्वांची मनस्वी इच्छा आहे ती पूर्ण करू
आभारी आहोत समाजाचं ज्यात जन्मलो त्याचा ऋण फेडायला 🙏
[7/18, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज मंडळाचे कामे-
भा. बा. कु. स.महिला मंडळ अमरावती
भा. बा. कु. समाज मंडळ अमरावती या समाजामध्ये अमरावती जिल्हा मधले जेष्ठ नागरिक, युवा मंच, महिला मंडळ, एकत्रित येऊन जणू काही कुटुंब तयार होत.
यामधलाच छोठोस आमचा समाज महिला मंडळअमरावती.त्यामध्ये आम्ही बचत गट, बी सी, या निमित्याने महिला दर महिन्याला एकत्र येऊन समाजाविषयी चर्चा करतात.व वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येते जसे महिला दिन, सावित्रीबाई फुले जयंती, संक्रातीचा कार्यक्रम इ.. व सगळ्यांना बोलण्याची संधी मिळते.
तसेच अमरावती समाज मंडळात दरवर्षी कार्यक्रम मधे जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, युवा पिढी, महिला मंडळ उपस्थित राहतात.
यामध्ये सुध्दा विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येते त्या मध्ये गुनवंत विद्यार्थ्यांनचा सत्कार, अनेक विषयांवर मार्गदर्शन, इ,,आम्ही पण त्या मध्ये पुढाकार करतो.
अशायप्रकारे समाजाचे बरेच कार्य सुरूच आहे.
धन्यवाद!
सौ श्वेता स.कानतोडे
अमरावती
[7/18, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आय.ए.एस किंवा तत्सम परीक्षा आपल्या पाल्याने पास केल्यास व आपले उत्पन्न जास्त असल्यास त्याला ओ.बी.सी.संवर्गातुन सेवेचा लाभ मिळत नाही. आपण सेवा करीत असलेले पद -क- संवर्गात येत असेल तर प्रमाणपत्र जोडावे.त्यात ही शासकिय सेवेत असल्यास मिळतो.एखाद्या खाजगी संस्थेत असल्यास लाभ मिळत नाही.सामाजिक बांधिलकी म्हणून सादर
सौ.रेणुका झंझाड
[7/18, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹 समाज. 🌹
समाजास माझे त्रीवार वंदन | प्रतिष्ठिताची पुण्याई ||
काय गुणगान गाऊ त्याचे | मन अभिमानी होई ||
समाज बांधवाच्या कष्टाने | बहरुनी समाज येई ||
रंजलया गांजल्या करण्या मदत | बांधिल समाज होई ||
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सौ जयश्री रेहपाडे.
नागपुर.
[7/18, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज
समाज तुमचा माझा
समाज आपला
समाज सर्वांचा
विचार करूया समाजाचा.
विकासाच्या वाटा
परोपकार गाठा
नाही कुणी लहान
नाही कुणी मोठा.
चालू साथ साथ
घालू हातात हात
जिद्ध धैर्याने करू
संकटावर मात.
नाना विचार जरी
कृती सर्वाहून भारी
विचारांचा स्विकार
एकतेचा अंगीकार.
समाजाची एकता
प्रेरणा देई जगता
कलागुणांना भर
समाजाचा उद्धार.
सगळ्यांना समान संधी
समाज विकासाची नांदी
समाजाचे शिल्लेदार
कर्तव्यपरायन दमदार.
धुरा त्यांच्या खांद्यावर
तटस्थ सदा कर्तव्यावर
समाजाची दशा अन् दिशा
बदल घडवू नवी आशा
सौ.मीरा शेबे भंडारा
[7/18, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *समाज*
समाज असे
एक व्यवस्था
जिथे जपतात
भावना आणि आस्था
समाजाशिवाय
नाही प्रगती
एकमेकांसोबत
सर्व चालती
गुणगौरव, कोजागिरी पौर्णिमा
मिळून करतात साजरी
थोर नेत्यांच्या भाषणात
लोकंही बोलतात लाजरी
समाजाशिवाय जगणेच
होते असह्य
माणुसकी जपून
आयुष्य बनविते सुसह्य
आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या
मजबूत बनवती
राजकिय, सांस्कृतिक
पाठबळ पुरवती
गरजांसाठी हक्कांसाठी
येती सर्व एकत्र
एकोप्याने राहती
सर्व भाऊबंद आणि मित्र
सौ स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[7/18, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *समाज*
समाज माझा एकदम झक्कास
करू त्याचा आपण विकास
नेऊ त्याला पुढे पुढे
गिरवू समाज परिवर्तनाचे धडे
समाज माझा एकच नंबर
विकासा करता खोचू कंबर
समाजाशिवाय काहीच नाही शक्य
एकजुटीने राहू हे एकच वाक्य पक्क
हेवे दावे सगळे विसरू
मतभेद सारे मागे सारू
विचारांना देऊ दिशा
समाज माझा प्रगती करेल
अशी ठेवू मनी आशा
नंदा भोयर
[7/18, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज
राहतो एकजुटीने, जपतो सगळ्यांच्या भावना
करतो एकमेका मदत, प्रोत्साहन देतो सगळ्यांना
ना कुणी गरीब श्रीमंत , सगळेच आहे एकसमान
स्त्रियांना आहे स्वातंत्र्य, ज्येष्ठांचा होतो सन्मान
तुकाराम महाराजांची शिकवण, बाळगतो मनी
अत्याचार होता एकीवर, धावून जातो सर्वजणी
आधार आम्हाला मोठ्यांचा, गुणगौरव विद्यार्थ्यांचा
युवा पिढी समोर ठेवतात आदर्श शिवाजी महाराजांचा
शिक्षण, साहित्य असो वा कुठलीही कला
अग्रस्थानी दिसतो माझा कुणबी मला
चला सगळे खारीचा वाटा उचलू या
बावणे कुणबी समाजाला आणखी मजबूत करूया.🙏
सौ. रूपाली अमोल बोंद्रे
[7/18, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज
होऊनिया संघटित सारे ,
करूया विकास समाजाचा.
नको कोणता भेदभाव,
शोधुया वाटा प्रगतीच्या.
झाडीपट्टा आणि वऱ्हाड,
यांच्या समन्वयातून करूया विकास.
बोली-भाषा, खाणे- पिणे,
सगळेच शिकू आनंदाने.
होईल असेच संस्कृतीचे जतन,
कला साहित्यातून घडवू दर्शन.
चांगले शिक्षण, चांगले विचार,
सोबत शिकूया विज्ञान तंत्रज्ञान .
थोरामोठ्यांचे आदर्श,
असेल आपल्याला मार्गदर्शन.
नवनवीन प्रांत करू सर,
समाजाच्या प्रगतीत पडेल भर.
समाज सेवेसाठी तत्पर राहू,
उद्याचा नवा प्रगत समाज पाहू.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि. 04.07.2020
[7/18, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *समाज*
देण लागत आपल्याला
ॠण फेडण्या समाजाचे
ज्यात जन्मोलो आपण
पालन करूया कर्तव्याचे
नाही पाहू या वाट
मान सन्मानाची
आपण सारे एक आहोत
धरू या खास उन्नतीची
प्रगती करूया समाजाची
नेवून ठेऊ या शिखरावर
दाखवू नव्या दिशा नव्या वाटा
घेऊन चलूया प्रगतीच्या वाटेवर
समाज माझा आणि मी समाजाची
करूया हा मंत्र खरा
तळा गाळातील बांधवांना
दाखवू उन्नतीचा झरा
नंदा भोयर
[7/18, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज---
सुविचाराने करावे
संघटन आपले
स्वार्थ नसावा कार्यात
ना मोठा, ना कुणी धाकले ।।
प्रामाणिक पना असावा मनी
थोर दाखवावी मानवता
वेळ द्यावा समाजाला
संपन्न करून दवावी एकता ।।
विश्वासाने जपावीत मन
कर्तव्य निष्ठ, संस्कारक्षम
यशस्वी वाटचालीसाठी
असावे सदा सक्षम ।।
शैक्षणिक, व्यावसायिक, कृषी
विकासासाठी झटावे आपण
समाजाच्या प्रगतीसाठी
कार्य मोलाचे स्थापन ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। समाजासाठी ।।
समाज असावा,
हलका फुलका
हसत खेळत
फुलवणारा।।
कर्तव्य म्हणूनी,
करावे सत्कार्य
करावी मदत
समाजकार्या।।
समाजाचा आहे,
आपणास गर्व
हक्काचे वाटे
मदतकार्य ।।
आपणास ठावे,
दुसर्याशी सांगावे।
शहाणे करावे,
सकलजन।।
करुया नमन,
त्या जेष्टांना।
जोपासला त्यांनी,
महावृक्ष।।
काढावा वेळ,
बसवावा मेळ।
अनुभवांचा खेळ,
करावा कथन।।
एकीने करावे,
नेकीने राबावे।
ओठी ऊमटते,
आपोआप नावे।।
समाजकार्या पाहू,नये मान,
हक्काचे माहेर सत्कार्या।
सौ. के.बी.सार्वे भंडारा.
[7/18, 7:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🌺🌺 समाज* 🌺🌺
माणुस आणि समाज
दोघांचही नात खास
विकास होतो समाजाचा
वाटा त्यात मनुष्याचा
नियम बंधने शांतीचे हत्यार
उपयोगाने होतो सर्वांना लाभ
सुख दुःखात सर्वच सहभागी
नाही विचार उच्च निच्च गरीब श्रीमंती
मदत करीती एकमेकास
संकटावर मात करण्यास
सुप्तगुणांना मिळतो वाव
भारत देशाचाही होतो विकास
एकजुटीने राहावयास
देवाने दिले समाजाचे वरदान
असा रुप समाजाचा
जणु मानवरूपी एक नाण्याचा दोन बाजुचा
कोटी कोटी प्रणाम त्या देवाला
ज्याने समाज घटक लाभून दिला आम्हाला
- *सौ.चंदा शेंडे*
*नागपूर*
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
"" समाज""
असावा आरसा समाज माणसाचा
प्रतिबिंब दिसते प्रेम, प्रगतीचा
सदा वाहावा झरा आदर्शाचा
भुवैकुंठ दिसावा ग्रामस्वराज्याचा
कोणती वेळ कशी काय सांगावी
सदैव तत्परता समाजी दिसावी
करावे सांत्वन दुःखात माणसाची
फुंकर मारता परिणती सुखाची
आदर्श संघटन बावणे कुणबीचे
समाजकारणात वारे एकीचे
सदा गौरव उत्कृष्ठ कार्याचे
कौतुक व्हावे तव नियोजनाचे
ज्यांनी घडविले समाज एकसंघ
तयांना माझा साष्टांग दंडवत
कार्यभाग पाहुनी हर्षतो भगवंत
म्हणुनच झाले समाज किर्तीवंत
दनाअ, नागपूर
दि.०४जुलै २०२०
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏🏻💐समाज 💐
नात्या-नात्यांची पेरणी
समाजात पेरलेली
एकतेची एक भाषा
समाजाने धरलेली .
जन्म -मृत्यूचे सोहळे
समाजात ठरलेले .
लग्न बंधाचे बंधन
समाजाशी बांधलेले .
एकसंघ समाजाचे
जेव्हा दर्शन घडते
आपसूक पावलेही
वाट ' समाजे ' पडते .
कर्तव्याची कसरत
कार्यकर्ते करतात .
कसलेले , कणखर
कामे कोणी करतात .
हात हाताशी धरता
घेई समाज उत्थान .
प्रगतीच्या वाटेकडे
करे समाज प्रस्थान .
आशा -आकांक्षाचे कोडे
आता आहे वाढलेले .
समाजाच्या फुटीसाठी
फितूरही वाढलेले .
' आंतरजाती विवाह '
' सामाजिक क्रांती झाली
एकसंघ समाजाची
शांती आता भंग झाली .
शिकलेल्या श्रीमंतांनी
वाट वेगळी धरली .
' हित ' स्व:ताचे जपण्या
' दुही ' समाजे पेरली .
समाजाचे हितासाठी
समजावे कुणी कुणा ?
समाजाला सौजन्याचे
धागे कोण बांधे पुन्हा ?
जात पुसुनी टाकावी
की समाज मोडायचा ?
एकसंघ देशासाठी
की धर्मच ' सोडायचा ?
भविष्याचे वेध घ्यावे
प्रगतीचे न्यारे वारे .
समाजाच्या क्रांतीसाठी
देही ' ज्योत' पेटवा रे ।
सुभाष धांदे सर , यवतमाळ
दिनांक 04/07/2020
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏
गुरुर ब्रम्हा
गुरुर विष्णू
गुरुर देवो महेश्वरा 🙏
गुरु म्हणजे आई बाप
दर्शन करी जगाचे ते गुरु माय बाप प्रथम 🙏त्याना
जों संकट हरतो तो खरा
गुरु
🙏🙏
गुरु पौर्णिमेच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा 🙏
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गुरुपौर्णिमा🙏🌹
आई वडील सर्व प्रथम गुरु
त्यानंतर माझे अस्तित्व सुरू
आई बाबा माझा श्वास
आई बाबा माझा विश्वास
आई बाबा माझे विश्व
आई बाबा माझे सर्वस्व ||१||
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम
गुरु म्हणजे अखंड वाहणारा झरा
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
गुरु म्हणजे एक आदर्श
गुरु म्हणजे प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक
गुरु म्हणजे सद्गुणांची शिक्षा
गुरु म्हणजे प्रकाशाकडे नेण्याचे साधन
वर्षानुवर्ष पासून सुरू आहे
गुरु शिष्याचे हे अतूट नाते ||२||
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुविषयी
कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस
कृतकृत होण्याचा दिवस
म्हणूनच शिष्याविना गुरु अधुरा
गुरुविण शिष्य अपुरा||३||
मला आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी शिक्षा दिली,अशा माझ्या सर्व गुरूंना माझे वंदन🙏
ग्रुप मधील सर्वांना आजच्या दिनी माझे वंदन🙏🌹
सौ.कीर्ती शेंडे...नागपूर🙏
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आज गुरुपोर्णिमा
सर्वांना खुप खुप शुभेच्छा
आपले प्रथम गुरू आई बाबा
नंतर आपले शिक्षक
आपल्या सभोवती असणारे नातेवाईक आपले मित्र मैत्रिणी
या सर्वांना मी गुरुस्थानी मानते.....
या सर्वांना शतःशह नमन
गुरू म्हणजे आदर
गुरू म्हणजे विश्वास
गुरु म्हणजे ज्ञानाचा झरा
अधुरे हे ज्ञान गुरूविणा
गुरु म्हणजे देई जिवना आकार
करिती ऊध्दार जिवनाचा
गुरूचा महिमा अपरंपार
झुकतो माथा गुरूपायी🙏🙏
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गुरू---
----
आई माझी
पहिली गुरू
दाविला सृष्टीचा
कल्पतरू ।।
बाबा माझे
दुसरे गुरू
कधी वज्र्
मऊशारु ।।
शिक्षक माझे
तिसरे गुरू
ज्ञानाचे ते
घडे भरू ।।
मित्र मैत्रिणी माझ्या
सद्विचार ,प्रेमळू
मन मोकळे करण्या
ज्ञानाचे भांडारु ।।
श्रद्धा स्थान माझे
आहेत सद्गुरू
करुणा, माया, निर्मळ
सृष्टी दयेचे सागरु ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 गुरु गुण 🌺।।
गुरु मूर्ती,
पाया लागी।
पाही रुप,
जीव त्यागी।।
गुरु माय,
गुरु बाप।
घेई सुख,
गुरु तप।।
घेई शिक्षा,
गुरु कडे।
होई शिष्य,
श्रृण फेडे।।
गुरु रुप,
देई सुख।
मीच वेडी,
भोगी दु:ख।।
गुरु विण,
नाही मार्ग।
शोधी मना,
पाही स्वर्ग।।
सौ. के.बी. सार्वे भंडारा.
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🌷गुरु🌷*
गुरु म्हणजे माता
मायेचा सागर जसा
गुरु म्हणजे पिता
दूर ठेवी संकटा
गुरु म्हणजे शिक्षक
शिकवी ज्ञानाचे धडे
गुरु म्हणजे मित्र
देई यशाचा मंत्र
गुरु म्हणजे विश्वास
घेऊन जाई शिखरास
गुरु म्हणजे आरसा
देई गुणांचा वारसा
गुरु म्हणजे ज्ञान
दूर करी अज्ञान
आदरणीय गुरूजनां
करूया त्रिवार वंदना
🙏🙏🙏
सौ रुपाली अमोल बोंद्रे
भंडारा
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आवडती कविता*
*गुरु*
माझे गुरु माझी आई
ती तर साक्षात अन्नपूर्णा
तिनेच शिकविले मला
स्वादिष्ट स्वयंपाक करण्या
माझे गुरु माझे बाबा
रहायचे नेहमी हसतमुख
त्यांनीच शिकविले मानायला
लोकांच्या सुखात आपले सुख
माझे गुरु माझे आप्तेष्ट
संकट येता पाठीस उभी
संकटाचा सामना करण्यास
शिकले त्यांच्याकडून मी
स्पष्टीकरण देते प्रत्येक गोष्टीचे
मी आहे माझ्या विद्यार्थ्यांची गुरु
प्रत्येक गोष्ट समजून वाचा
नका रट्टा मारू
सौ स्वाती दयानंद सेलोकर.
भंडारा
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गुरु
प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो
माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो
आई वडील पहिले गुरु
ज्यांनी दिला संस्काराचा मेरू
शालेय शिक्षणात हात धरून रेखाटला
पहिला अक्षरु असे माझे गुरु
जीवनात जेव्हा समज आली
तेव्हा पासून मिळाले आजपर्यंतचे गुरू
जगतांना पदोपदी आलेले चांगले वाईट अनुभव तेही आहेत गुरू
ज्यांनी जीवनाचे केले कल्पतरू
असे माझे साक्षात सज्जन गुरु
सौ मंगला कानतोडे
अमरावती.
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कविता - गुरु
ना वायचे बंधन,,,,,
ना नात्याची जोड।
त्यास नाही कोणाची तोड।।
ज्यासी आहे अगाध ज्ञान।
तो करी निस्वार्थ प्रख्यान।।
त्याची सी गुरू मानावे।
देवास तेथेचि पावावे।।
माझी आई माझे आद्य गुरु।
दिलेसी मम जीवन करुनि सुरू।।
माझे पिता माझे द्वितीय गुरु।
कष्ट्येने केले पायावर उभं तरू।।
माझे मित्र झाले माझे गुरू।
शिकवले जीवनात कशी मैत्री करू।।
देते मज रोज नवीन ज्ञान, माझे लहान लेकरू।
आई जरी मी झाले,लेकरू माझे महान गुरू।।
माझं जीवन देखील मम् गुरू।
ज्याने शिकवले मजसी सर्व गुरूंना वंदन करू।।
👋👋👋
सौ श्वेता स. कानतोडे
अमरावती
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नमन करते गुरूवंरास
या सृष्टीतील प्रत्येक ज्ञानांस
आईबाबांच्या मुर्तीमंत रूपांस
प्रथम गुरू माझी आई
करूणा, वात्सल्याचे प्रतिक.
दुसरे गुरू माझी शाळा
गुरू माझे महामेरू
ज्ञानाचे भांडार, आदर्शाचा ठेवा
तिसरे गुरू माझे समाज
निष्टा कर्तव्याने करतात सुसंस्कृत
चवथे गुरू माझे ग्रंथ
अज्ञान तारुण करतात सज्ञान
पाचवे गुरू माझे निसर्ग
वक्तेशीरपणा , अखंड वाहणारा झरा
सहावे गुरू माझे, मित्र मैत्रिणी,नातलग
देतात मला प्रेमाचा धडा
सातवे गुरू माझे ईश्वर
श्रध्दा,भक्तीचे निर्गुण रूप
गुरूपौर्णिमा म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस
गुरूच्यां चरणी शत शत प्रणाम
.
सौ माधुरी देवेंद्र भूते
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गुरू-नमन
आई बाबा माझे गुरू,
त्यांची आभाळाएवढी माया।
त्यांच्या छत्रछायेत मला,
नसे कशाचीच तमा।
शिक्षणातील माझे गुरू,
ज्यांनी दिले मज ज्ञान।
अंधारातून प्रकाशाकडे,
मार्ग शोधण्याची वाट।
प्रपंचातील माझे गुरू,
आहे सगळे सोयरे-सोबती।
ज्याविण होत नसे,
माझी जीवन नौका पार।
अध्यात्मातील माझे गुरू,
सारे संत मुनीजन।
त्यांच्या अनुभवातून कळे,
जीवन जगण्याचे सार।
आज गुरुपौर्णिमेप्रसंगी,
त्यांचे चरणी माझे,
शतशः नमन।
माझे शतशः नमन।
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि. 05.07.2020
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गुरु ....
आई वडील
सासु सासरे गुरु....
तुम्ही मैत्रीणी
सुध्दा गुरु.....
कोणी हसायला शिकवले
कोणी जीवनात तडजोड
करायला शिकवले....
छान छान पदार्थ
बनवायला शिकवले
आनंदाने कसे जगावे
हे सांगितले....
अश्या माझ्या ग्रुपच्या
सखींना गुरू पोर्णिमेच्या
खुप खुप शुभेच्छा🌹🌹🌹🙏🏼🙏🏼
सौ.सुचेता सार्वे...
पनवेल. नवी मुंबई
[7/18, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गुरू
आई बाप गुरू ।
जीवनाचा ध्यास।
लाभो सहवास।
नित्य नेमे।।1।।
अनुभव गुरू।
साक्षात विठ्ठल।
वाढे आत्मबल।
नाम घेता।।2।।
गुरू परब्रह्म।
गुरू आत्मसखा।
गुरू पाठीराखा।
मित्र तोचि।।3।।
गुरू विना नाही।
मना ज्ञान बोध।
सदैव संवाद।
मनी व्हावा।।4।।
निसर्ग ही गुरू।
जपावे नेहेमी।
विध्वंस तयाचा।
काळ जीवा।।5।।
फुले मुले गुरू।
शिकावे हसणे।
चैतन्य पेरणे।
त्यांचे ठायी।।6।।
सकल गुरूंना।
माझा नमस्कार।
व्हावे सुसंस्कार।
जीवनात।।7।
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌸🌸🌸गुरू 🌸🌸🌸
गुरू आहे माय
गुरू आहे बाप
गुरू आहे मावशी
गुरू आहे मामा
गुरू आहे काका
गुरू आहे आत्या
गुरु आहे आजी
गुरू आहे आजोबा
गुरू म्हणजे शिक्षक
जे आहेत आपल्या जीवनाचे
शासक....
कधी देतात प्रेमने शिक्षण
कधी देतात मार
कधी घेतात जवळ
कधी होतात कठोर
कधी म्हणतात
"छडी लागे छम छम
विद्या येई घम घम."
गुरूंनी दीला जीवनाला
नवा अर्थ
म्हणून जीवन झाले
समर्थ....
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सौ. शितल श्रीकांत ठवकर (तुमसर रोड देव्हाडी)
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏🏻गुरुपौर्णिमा 🙏🏻
माझ्या आजपर्यतच्या आयुष्यात ज्यांनी मला घडवलं ते आई वडील, गुरुवर्य, मित्र यांच्यासह, जीवनात मला ज्यांनी जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे…
तसेच संकटात सदैव माझ्या पाठीशी उभे रहिलेत ते सर्व व्यक्ती माझ्यासाठी गुरु आहेत, मग तो लहान असो वा मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींचा मी सदैव आभारी आहे…!!!
🌹🌹 आपणास या गुरु पौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!🙏🏻
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ""गुरू स्मरण""
तिमीरातुन तेजाकडे नेतो,तो गुरु
अज्ञानातुन ज्ञानाकडे नेतो,तो गुरू
लोह परिसस्पर्शसोनं व्हाव,तो गुरू
असत्याला सत्याकडेनेतो,तो गुरू
जो सर्वांवर प्रेम करतो, तो गुरू
वर्षाव कृपेचा देणारा, तो गुरू
तिन्हीलोकी ज्याचा डंका, तो गुरू
भरकटल्यास लावी वाट, तो गुरू
दया,क्षमा,शांती वसे,तो गुरू
सहज हात वळती चरणा,तो गुरू
मन ,स्थिर,शांत करतो,तो गुरू
🙏🙏🙏🙏
दनाअ, नागपूर
दि.०५/०७/२०२०
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏गुरू पौर्णिमा विशेष🙏
गुरू
सदाचार संकल्पना
गुरू ची आराधना
ज्ञानाचा महिमा
गुरूच्या चरणी ||
वंदावे गुरू चरण
. नित्य नामस्मरण
. भवसागर तारण
उपदेश गुरूचे ||
गुरू ज्ञानसागर
अज्ञान अंधःकार
सारूनी विकार
किरण ज्ञानाचे ||
संसाराचा महामेरू
वाट दाखविल गुरू
पथिकास आधारू
शिकवण गुरूची ||
गुरूचे चिंतनी
क्लेश दुःखे हरूनी
श्रवण गुरूवाणी
नाश अधर्माचा ||
गुरू ज्ञानज्योती
सुजान करीजडमती
रथाचा सारथी
कृष्ण होऊन ||
गुरू नाम सिंधू
भक्ती एक बिंदू
अंत कसा वेधू
ज्ञानसागराचा ||
सौ.मीरा शेबे भंडारा
. . .
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺 *गुरु* 🌺🌺
मायबाप शिक्षक सखेसोयरे
हे सारे गुरुरूप....
मनुष्य जन्मास लाभताच सहवास
धन्य धन्य तो जीव...
हताश मनुष्यास मार्ग दाखविण्यास
तु खास येतोस वेगवेगळे रुप घेऊन ...
आयुष्याची वाट मोठी खडतड
तिला चालविण्यास सरसर
विसावा घेव्यास निर्माण केले तिर्थस्थान...
आम्हा सर्वांची काळजी तुला फार
मनी मोक्षाची ठेविती आस
म्हणून लावले भजन किर्तन ध्यान...
शांत स्वरुपा रुपा माझ्या गुरुराया
त्रिवंदन तुला नमिते गुरुपौर्णिमा निमित्त्यान...
- *सौ. चंदा शेंडे*
*नागपूर*
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *गुरू*
आई माझा गुरु
कानी दिला मंत्र
करावी मदत
कामी पडावे सदोदीत
बाबा माझे गुरू
जसा प्रेमाचा सागर
नेहमी पाठीवर थाप
निॅभीड जगावं जगात
गुरू माझे शिक्षक
विद्येची मोठी खान
जिवनात माझ्या
त्यांना म़ोठा मान
कुटूंब ही माझे गुरू
आहे माझा कल्पतरू
दिली मायेची सावली
त्या सावलीन मी झाकली
नंदा भोयर
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ताे खरेपणा शिकविणारा निर्मळ झरा
आत्मसन्मानाने जगण्याचे मंत्र देणारा खरा
दया, बुद्धि, अन् शांती शिकविणारा वारा
सत्कर्माची शिकवण लावणारा लळा
गुरुने शिष्यास द्यावी, सदैव निस्वार्थ दिक्षा
दिलेल्या दिक्षेप्रती नेहेमी राहावी एेकच निष्ठा
गुरुरुपी शिष्याने सन्मार्गावर चालावे हिच ईच्छा
गुरु शिष्य नाते वृद्धींगत व्हावे हिच सदिच्छा 🌹
प्रिया र गाेमाशे
आकाशवाणी निवेदीका, चंद्रपूर.
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ऑन लाईन कविसंमेलन आज झालं, सखी साहित्य संघटन तर्फे🌹🙏दादा🙏
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *चारोळी*
"माहेरची आई - उषा बाबरे"
माहेरची आई माझी उषा
सकारात्मक विचार देई सदा
शिक्षकी पेशा सांभाळत असता
घडविले प्रेमाने आम्हा तिघा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
"सासरची आई - मंदा बोंद्रे"
मंदा माझी सासरची आई
आहे साक्षात अन्नपूर्णा
स्वभाव आहे संयमी
मायेने बांधून ठेवते सर्वांना
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
✍️सौ. रूपाली अमोल बोंद्रे
भंडारा
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळ्या
माहेरची आई (सौ. शांता गरबडे)
दया,क्षमा,शांती,नित्यवसे जिच्या ठायी,
परोपकारी कणखर सहनशीलवृत्ती.
लाडकी आम्हांसर्वांची,खाऊ घाली आग्रहानी,
अशी माझी माहेरची,सोज्वळ 'शांता'आई.
सासरच्या आई (सरस्वती वाठ)
शिक्षणाचा गंध नाही,पण आवड भारी शिक्षणाची,
शेत,घरकाम,स्वच्छतेची त्यांना गोडी.
लगबग सदोदित कामाची,कधी कशाची नाही भीती,
अशा माझ्या सासरच्या ,आदरणीय 'सरस्वती'आई.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि. 06.07.2020
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🌹माहेरची आई 🌹
माहेराची आई माझी संधु
आई माझी मायेचा सागर
ती होती प्रेमाचा पाझर
ती होती नारळा परी
कठोर आणि कोमल......
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🌹सासरची आई 🌹
सासरची आई माझी सीता
सासूच्या रुपाने आई मला मिळाली
सुखी संसाराचे गुपीत मला कळले
त्यांना सासू म्हणण योग्य नाही
कारण
त्या तर आहेत माझी दुसरी आई....
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सौ. शितल श्रीकांत ठवकर.
(तुमसर रोड देव्हाडी).
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माहेरची आणि सासरची आई, चारोळी ---
माहेरची आई नाव मीराबाई
प्रेम, जिव्हाळ्यात नाते जपायची
वाचन, विणकाम सतत करून
मुलांना योग्य संस्कार द्यायची ।।
सासरची आई नाव कलुबाई
साधा ,भोळा स्वभाव त्यांचा
सारा गाव नमती त्यांना
संस्कार ते, गरिबांना मदत करण्याचा ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *माहेरची व सासरची आई*
आई माझी माहेरची
नाव आहे वेणु
कामातच सदा असे
त्यातच तीला राम दिसे
आई माझी सासरची
साधाभ़ोळा स्वभाव
देवार्धमाची भारी आवड
त्यातन मीळत नाही दिवसभर सवड
नंदा भोयर
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माया मंमतेची मूर्ती माझी अन्नपूर्णा आई लाड माझे
केले ठाई ठाई संस्कारा ची
खानती सोबत नेहमी राही.
सासर ची माझी ती चंद्रकला
आई............................
चूक सांभाळून मज पाठीशी घेई.
🙏नमन दोन्ही आई मी सदैव
त्यांची ऋणी राही.
सौ.भूमीका राजेश बोंद्रे🙏💐
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माहेरची आई_सासरची आई
आई माझी वात्सल्याची मुर्ती
जिने मला जगात आणलं
माझ्या जीवनांस आकार दिला
आई माझे प्रितीचे माहेर
केला मला सौभाग्याचा अहेर
तिचं नाव "त्रिवेणी"
सासरची आई मंजुळा बाई
त्या या जगात नाही
मी खूप आधी लिहिले
सासूबाई म्हणायची तहान मला लागली, तहान भागवायच्या आधी
तूम्ही देवाघरी निघून गेल्या
ती पुसटशी आकृती
मनात घर करुन आहे
जरीकाठाच्या पातळात
ती ठेंगनिशी मुर्ती
फार सुंदर दिसत होती
प्रेमळ व मायेचं वात्सल्य त्यांच्यात होते, बाबा गेले तेव्हा
धीर दिला मुलांना
शिक्षणाची उणीव भासू न देता
कणखर राहिल्या तूम्ही
स्वत: दु:ख झेलुन सहा मुलांचा
सांभाळ त्यांनीकेला मुलांचा
मुलांवर संस्कारांची जडण करून गेल्या
सासूबाई तुमच्याकडून
पूरवायचे होते हट्ट मला
सून म्हणून येण्याच्या आधी
तुम्ही निघून का गेल्या
आई म्हणण्याच्या आधी
ह्या प्रेमाला पारखं का केलं मला!!
सौ माधुरी देवेंद्र भूते
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *माहेरची आई सासरची आई*
माहेरची आई नर्स बाई
गावागावात जाऊन औषध देई
बाळंतपण करी लसीकरण करी
जन्म म्रुत्यु चा आराखडा ठेवी.
सासरची आई लक्ष्मीबाई
शांत सौज्वळ.भ़ल मोठ्ठ गोकुळ सांभळणारी
स्वच्छता निटनेटकेपणा तिच्या अंगी ..
सर्वांना मायेने कुरवाळणारी
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *चारोळी*
*आई*
माझी आई मंदा
स्वभावाने खूप मनमिळावू
स्वयंपाकात ती सुगरण
सगळ्यांसाठी बनवते नविन खाऊ.
*सासू*
माझी सासू वत्सला
खाल्ल्या खस्ता आयुष्यासाठी
जपते आम्हास मुलीसारखी
त्या जगल्याच नाही कधी स्वतःसाठी
सौ स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आई
🙏🙏🙏🙏🙏🙏☝🙏🙏🙏🙏.
सासर माहेरची आई म्हणजे आईच असते
इकडची तिकडची सारखी च असते
आईशी नाते तर प्रेमाचेच असते
हेवेदावे त्या त नसते.........
साता जन्माची पुण्याई आपली म्हणुन
आई मिळे दोन्ही कडे
धन्य तु ग बाई, अबला कशी तु सांग बरे
अंभगातुन देव गातो आईसाठी गीते ..........
आज ही आहेच ना रीता कुबेराचा तो धनी
स्वा मी तिन्ही जगाचा आईविणा भिकारी
साता जन्माची पुण्याई ,देवाआभार तुझे
आईची करता सेवा मिटव माझे पाप सारे.......
जन्मदात्री कौसल्या,शांताबाई सासुआई
एकीने जग दाखविले,एकीने जगरहाटी
जन्माचे झाले सार्थक,मिळाले सर्व काही
आईसारखं दुसरे नाते, सांगा असेल का जगी?......
सौ. जयश्री रेहपाडे
नागपुर.
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी
माहेरची आई-
घराची लक्ष्मी माझी आई स्वरस्वता।
सांभाळ केला सर्वांचा मना होते धन्यता।।
मायेची साऊली अशीच राहो या जन्मी।
प्रार्थना करते ईश्वरचरणी
हीच माय मिळो जन्मोजन्मी।।
सासरची आई-
माझ्या सासरच्या आईचे नाव धुरपता।
त्यांच्या स्वभावात होती खूप शांतता।।
गेल्या सोडून देवाच्या चरणी।
त्यांची कीर्ती राहिली आमुच्या मनी।।
सौ मंगला कानतोडे
अमरावती
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माहेरची आई,सासरची आई
शारदा माझी आई, संस्कारांचीग्वाही.
वात्सल्याचा पाझर
सदोदित वाही
भजनी किर्तनी
रमे तिचे मन
अशिक्षीत असूनही
शिकली लेखन वाचन.
सासरची आई चंद्रभागा
वाहे स्वच्छतेची गंगा
तिला मानपान भारी
बिना निमंत्रण कधीच
नाही गेली कुणा घरी.
सुगरण,सुगृहीणी
चारचौघात मानिनी.
सत्यवादी,नियमांची
धारदार वाणी.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आई
माहेरची आई चंद्रभागा
होती जणू सर्वांसाठी प्रेमाचा धागा
आवड तिला विणकाम,भरतकामाची
गोरी,गोमटी,स्वच्छतेची मूर्ती ती
सासरची आई सरस्वती
बोलकी आणि घासातला घास देणारी
सोज्वळ,वात्सल्य मूर्ती होती
आवड नाही तिला नटन्याची
दोन्ही आई आज जगात नाहीत
परंतु आठवणी आहेत गाठीशी😞😢
सौ.कीर्ती शेंडे...नागपूर🙏
[7/18, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी
माहेरची आई-
माहेरची आई माझी साधी सरळ।
नाव आहे वंदना तिचे।
शिवणकाम करायला फार आवडायचे।।
हजार जन्म घेतले तरी।
एका जन्माचे ऋण नाही फीटायचे।।
सासरची आई-
सासरची आई माझी आहे कर्तृत्ववान।
नाव आहे त्यांचे मंगला छान।।
मुलींसारखी माया, ममता देण्याचे काम त्यांचे।
लाख चूक होतील माझ्या तरी पदरात घायचे।।
सौ श्वेता कानतोडे
अमरावती
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माहेरची आई-
सुस्वरुप ,सुंदर, सोज्वळ,
अंबाबाई गृहीणी छान।
करी सर्वांचा मानपान,
मोठेपणाचा मिळे तिला मान।।
सासरची आई-
सार्वे परिवाराची मां,
देखणी,सुंदर ,कष्टाळू।
भुकेल्यांना देई अन्न,
सर्वांची ती कैवाळू।।
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माहेर व सासर ची आई
यमुना माझी आई महान
धैर्यशील व हिंमतवान
तिने केले काबाड कष्ट
आम्हाला मात्र ठेवले मस्त
मायेचा बंद पडला झरा
आकाशी झाला सितारा
सासु माझी राधाबाई
वात्सल्य ममतेची आई
आता तिला ऐकु ना येई
टि.व्ही.चा बसून आनंद घेई🙏🙏
सौ.रेणुका झंझाड
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺🌺 *चारोळी* 🌺🌺
*माहेरची आई..... सासरची आई*
माहेरची आई ....
विमल माझी माहेरची आई
हिटलर पेक्षा कमी नाही
कामच जणु छंद तिचा
छंदातूनच मजबुत बनवलं आम्हा
सासरची आई ....
शांता नावाची सासरची आई
साधीभोळी शांतच लई
भजन गाण्यांची आवड भारी
नातवंडच तिची दुनिया सारी
*- सौ. चंदा शेंडे*
*नागपूर*
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
चारोळी. (१)
""माहेरची आई""
माहेर माझे"" यशोदा ""आई
प्रेमाचा झरा वात्सल्यमुर्ती
सुगरण आहे पाककलेची
सदा तिला कामाची स्फुर्ती.
"" सासरची आई"". (२)
सासरी माझी"" सुमित्रा ""आई
कुटुंबाला सांभाळुन घेई
कामात त्यांच्या कधी न् घाई
आतिथ्याला निभवुन नेई.
दनाअ, नागपूर
दि.०६जुलै२०२०
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🍀 *हिरवळ दाटे* 🍀
पाऊस आला पाऊस आला
चहुकडे हिरवळ दाटे
उन्हाच्या झळांनि तापलेल्या धरणी ला ओल चिंब भिजावं वाटे
पाऊस आला कि धरणी मातेची त्रुष्णा मिटे
तिच्या गर्भातले बिज ऊफाळुन निघे
धरणीला पालवी फुटुन चोहिकडे हिरवळ दाटे
जिकडे तिकडे हिरवळ पाहुन मनी ऊल्हास दाटे बळिराजाची चिंता मिटे
पक्षि पाखरे पावसात न्हाऊन
घरट्यात शिरे
जनावरे हि हिरवा चारा खाऊन
त्रुप्त होत असे
अशी ही धरणी माता सदोदित
नटुन रहावी असे मनाला वाटे
...अंजलि हेमंत बांते
...भंडारा
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हिरवळ दाटे*
************************
श्रावण मासाचे होता आगमन
हर्षुनि जाई माझे मन
आकाशी नभ येती दाटून
बळीराजा सुखावे मनापासून
कधी पाऊस कधी उन पडे
हिरवळ दाटे चोहीकडे
डोले गवतांचे तुरे मखमली
उडती त्यावर फुलपाखरे इवली
सुगंध मधुर तो मातीचा
स्पर्शूनि जाई वेड्या मनाला
कधी बघावे हिरवे रान
कधी बघावे मोहक फुलांना
हिरवा शालू लेवून नववधु
साजशृंगार करूनी सजली
बघावया हे मोहक दृश्य
पशु पक्षी, झाडे ही जमली
सौ स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हिरवळ दाटे*
हिरवळ दाटे चोहिकडे
आनंदुन जाई मन गडे
फुलांचे धरतीवर पडती सडे
स्वच्छंदी नाचती गवतांचे तूरे
नदी म्हणती झुळझुळ गाणी
मैनेची ती मंजुळ वाणी
मधेच फुलवितो मोर पिसारा
अंगी झोंबतो गार गार वारा
मातीचा तो मंद सुगंध
सुगंधाने मन झाले धुंद
निळ्या नभी उंच भरारी
पक्ष्यांची ती सैरावैरा स्वारी
धरती माय शालू नेसली
त्यावर नक्षीदार बुट्टेवेली
नववधू गत साज ती ल्याली
होता आगमन श्रावण सरीचे
चोहिकडे बहरली झाडे वेली
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हिरवळ दाटे----
पावसाच्या सरींमध्ये
धरती ग न्हाते
आनंदाच्या वेलीवर
हिरवळ दाटे ।।
वृक्षलता चिंब चिंब
सृष्टीचा मनोरा बघते
वाऱ्याच्या झुळुकीने
मन सुसाट पळते ।।
होई आभाळी गर्जन
चाले विजांचे नर्तन
हसून धरेचे गायन
रवी घेई गोड चुंबन ।।
इंद्रधनूचा अनोखा सोहळा
फांद्यांवरूनी झोके घेते
आभाळाची सनई वाजे
चोहीकडे हिरवळ दाटे ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हिरवळ दाटे
पहिल्या भेटीच्या ओढीने
मनि हिरवळ दाटे...
साक्षगंधाच्या क्षणाने
झणी हिरवळ दाटे...
भावि आयुष्याचे स्वप्न
डोळ्यांत हिरवळ दाटे...
हळदीच्या कणाकणात
पुल्लकित हिरवळ दाटे...
न कळतं होता स्पर्श
तनू झंकार हिरवळ....
पहिल्या स्पर्शाच्या अनुभूती
हिरवळ दाटे सुगंधी....
चाहूल लागता अंकुराची
आईपणाची दाटे हिरवळ...
तान्हुलं चंद्रमुख हसता
हृदयाची हिरवळ दाटे...
अशी हिरवळ क्षणोक्षणी
फिरूनी जिवनी दाटावी
सुखद स्वप्नांची हिरवळ
हवी हवीशी वाटावी.
(माफ करा.जरा वेगळा आशय घेतला.)
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कविता-
हिरवळ दाटे,,,,,
चोहीकडे रान हिरवळ दाटल।
काही क्षणातच बाभूळ सुखल।।
पडणारा पाऊस सारखाच वाटल।
प्रेमाचे पाणी जणू बर्फेतच साठल।।
मोराचा फुललेला पिसारा मोती लावून तो जातो।
राणाला लाल पांढरे करून हिरवा रंग देत तो जातो।।
नभाच्या छत्रशायेत खेळ खेळून जातो।
कुरणाचा आवाज देऊन गार वारा मन धुंद करून जातो।।
जिकडे तिकडे चोहीकडे।
आनंदी आनंद गडे।।
सौ श्वेता कानतोडे
अमरावती
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय - हिरवळ वाटे*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
शितल झाल्या सावन सरी
मधेच पडे पिवळी ऊन
हिरवी झाली शिवारे
हिरवे झाले पूर्ण रान
हिरवळ वाटे चोहीकडे
जणू हिरवे गालिचे हातरले
कधी इंद्रधनूचे होई दर्शन
पांढरे शुभ्र धबधबे अवतरले
अनंताची पांढरी फुले
वाऱ्यासंगे डोलत असती
मोगरा, जाई, जुई, चमेली
सर्वांना आपला सुगंध वाटती
बांधावा वाटे झोका
कडुलिंबाच्या उंच वृक्षाला
मौज करावी मिळून सख्यांनी
स्पर्श करून यावा गगनाला
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
सौ.रूपाली अमोल बोंद्रे
भंडारा
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। हिरवळ दाटे चोहीकडू।।
हिरवा शालू,
नेसुनी बसली।
वसुंधरा ती....
लाल,गुलाबी,
नक्षी फुलली,
पदरावरती...
गवत फुलांची,
किनार शोभे,
काठावरती....
मलमली ते अंतरंग,
चमके चंदेरी,
तनुवरती.....
पाहण्या शृंगार,
जमती फुलपाखरे,
गुंजारव करीती प्रेमाचे.।।
सौ. के.बी.सार्वे भंडारा.
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हिरवळ दाटे
आला,आला पावसाळा
बरसल्या आषाढ़ सरी
धरित्रीच्या अंगोअंगी
हिरवळ दाटूनी आली
हिरवळ दिसे अशी
अंथरला हिरवा गालिचा
तयावर उड्या मारी
बेडुक,हरणं आणि ससा
हिरवी पालवी चहुकडे
झाले हिरवे,हिरवे रान
झुलत होती गवतावरती
फुलपाखरं आनंदान
आल्हाद दायी वातावरणी
बी.के.च्या सख्या भेटे
ओळख,हितगुज होई
मनी हिरवळ दाटे
रेणुका झंझाड भंडारा
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हिरवळ दाटे....
ग्रिष्माची दाहकता शमवुन
मृग नक्षत्र आले
मेघ गरजले, वीजा चमकल्या
डोंगर द-यातुन धबधबे कोसळले
खळखळ वाहती नद्या
सळसळणारा वारा,गंध मातीचा
स्पर्शून गेला, बेभान मनाला
चिंबचिंब पावसाने धरणी झाली ओली, जणू तिचे गर्भारपण आले
रानोमाळी हिरव्या भाज्या
हरित तृणांचे अंथरले गालीछे
हिरवी झाली शिवारे
फुलां फुलांची रंगीत माळा
हिरवी साडी नेसून धरणी
तुषारांची खडी,श्रृंगार रसात
भिजली काळी आई.
हे बघुन हिरवळ दाटे मनी.
माधुरी भूते.
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बिग.के.सा.सं.प.
""हिरवळ दाटे""
उन्ह ग्रिष्माची धरती तापली
तृष्णेला शमण्या मृगसर बरसली
पाऊस सरीने मृदा ओथंबली
जिकडे तिकडे हिरवळ दाटली
दिसते माळरानावर पाणीच पाणी
खळखळ पाणी संगीत ओढ्याचे
भरल्या तलावात नृत्य माशांचे
पकडण्या भोई टाकने जाळांचे
वसुंधरा नेसली शालु हिरवा
प्रकाश पिवळा सांजवेळेला
सोनपरीला घाली सप्तरंगी माळा
गळा जलबिंदु मोतीहार वनराईला
वृक्षलता दाटली हिरवीगार
फुले बहरली सुंदर गुच्छेदार
तरूवर पक्षांचे गित गुंजार
वारूळात नागाचे पहा फुत्कार
हिरव्या शिवारा मोर नाचते
कोकीळ मैना सुर लावते
मामा लांडगा ऐटीत चालते
हरीण मावशी हिरवळ पाहते
दनाअ,नागपूर
दि.०७/०७/२०२०
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मोबाईल
मोबाईल येता हाती
झाली दूर नाती गोती
मुले दुरावली,आईबाबांपासून,
राहती नुसतेच,मोबाईल मध्ये तोंड खुपसून
वाचन,लेखन संवाद संपला
पुस्तकांपासून संपर्क सुटला
चांगले, वाईट बरेच काही शिकवले,
पण त्यातले चांगले घेणे,मात्र आपल्यावर सोपविले.
मोबाईलने केली कामे अगदी सोपी,
निमंत्रण,भेटीगाठी, मोबाईल वरच होती.
खरेदी साठी आता नाही जावे लागत दूर,
घरबसल्याच सर्व,मिळतो सुकून.
मोबाईलची कृपा अशी
आई,आत्या,मावशी स्मार्ट झाली जशी
एक गोष्ट मात्र खूप छान घडली,
व्हॉट्सअँप द्वारे मात्र पुन्हा नाती जुळली
आता मात्र चिंता नाही कशाची
गाणे,डान्स,रांगोळी,पाककृती,सर्वच काही मिळते बघावयाशी,
खुश आहोत आम्ही साऱ्या,
कारण मोबाईल ने दिली,लॉकडाऊन मधे साथ आम्हा🙏😃
सौ.कीर्ती शेंडे.....नागपूर🙏🌹
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *मोबाईल*
जय देवा जय देवा मोबाईल देवा
सकाळी उठल्या उठल्या घडते तुझी सेवा
थोड्या दिवसात भक्तगण जमले
मनोभावे तुझी सेवा करू लागले
सेवेत तुझ्या थोडाही खंड पडत नाही
तुझे दर्शन झालेल्या शिवाय
घास उतरत नाही
अगाध लीला तुझी मोबाईल देवा
अशीच आमच्या हातून तुझी घडो
अखंड सेवा
जय देवा जय देवा मोबाईल देवा
लहान मोठ्यासह तुझे भक्तगन
आहे
दिवस रात्र ते तुलाच पाहे
कुटुंबापेक्षाही महत्त्व तुला रे आहे
एक सारखे डोळे फाडून तुला रे पाहे
दर्शन तुझे झाले नाही तर कासाविस होते
मनात विचार येते भलतेसलते
तुझ्यामुळे आम्ही दुःख विसरून जातो
तु नाही दिसलास तर कासावीस होत़ो
अशी कृपा तुझी आमच्यावर राहो
रोजचे नविन मेसेज आमच्या घरी
घेऊन येवो
सौ नंदा भोयर
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 📱📱📱मोबाईल 📱📱📱
हा मोबाईल असाच धष्ट पूष्ट नाही बनला
खुप काही खालय यानी
यानी खाले हाताचे घड्याळ
खाले पत्र, चिठ्या
खाले रेडीओ, टेपरेकॉर्डर
हा असाच धष्ट पूष्ट नाही बनला
खुप काही खालय यानी
यानी खाले टॉर्च लाईट
खाली पुस्तके सारी
खाले कॅल्क्युलेटर
कॅलेंडर सारी
हा असाच धष्ट पूष्ट नाही बनला
खुप काही खालय यानी
यानी खाला कॅमेरा
खाले आलाराम घड्याळ
खाले आमचे शेजारी मित्र
हा असाच धष्ट पूष्ट नाही बनला
खुप काही खालय यानी
यानी खाला आमचा वेळ
खाले आमचे पैसे
खाले आमचे नातेवाईक
आमचे जिवलग मित्र
याने खाल्या आमच्या गाठी, भेटी
हा आसाच धष्ट पूष्ट नाही बनला
खुप काही खालय यानी
खाला आमचा खरेपणा
आमचा आवाजही खाला यानी
हा असाच धष्ट पूष्ट नाही बनला
खुप काही खालय यानी
खुप काही खावु सुध्दा बनला आहे हा स्मार्टफोन....
📱📱📱📱📱📱📱📱
सौ. शितल श्रीकांत ठवकर
(तुमसर रोड देव्हाडी)
📱📱📱📱📱📱📱📱
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 📱मोबाईल📱
मोबाईल आहे सखा
जिवाभावाचा पक्का
मोबाईल वाचून काही
करमत नाही क्षणभरही.
मोबाईल असता हातात
भर पडते ज्ञानात.
गप्पा,गाणी,गोष्टी सारे
सर्व क्षेत्रातील ज्ञानवारे.
मोबाईलने झाली प्रगती
चूकीच्या कृतीने अधोगती
सहज होती गाठीभेटी
जगा सोबत जुळती नाती.
तरुणाई स्वमग्न व्यसनी,
झाली संस्कारांची हानी
निद्रानाश,सुदृढतेला वार
मुले एकलकोंडी फार.
अतिवापर दृष्टीदोषास कारण
अस्थिर,चिडके, अशांत मन
मोबाईल एक आहे यंत्र
कमीत कमी वापर,शिका तंत्र.
घर हसरं बोलकं असूद्या.
एकमेकांशी संवाद होऊद्या.
वयस्कांशी हितगुज साधा
त्यांचे अनुभव जीवनधागा.
मोबाईल आहे जादूची छडी
जे हवं ते मिळतं हरघडी.
त्याचा वापर करावा जपून
वेळ अन् नाती सांभाळून.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: # मोबाईल #
इंग्रजीत मोबाईल
मराठीत भ्रमणध्वनि
त्याच्यामध्ये समाविष्ठ
कागद,शाई नी लेखणी
पत्र,रेडिओ,दूरदर्शन
तोचि फोटोचा कैमेरा
गेम,घड़ी,कैलक्यूलेटर
तोचि कैशियर झाला
सर्वांची कामे कशी
तत्परतेने करुन देई
वेळ आणि पैसा
वाचवितो ठाई ठाई
मित्र मैत्रीनिशी गप्पा
नातेवाईकांशी हित गुज
करीती सकाळ पासुनी
आहे मोबाईलचा राज
मोबाईलवर शिकती पोरं
आता कोविड च्या काळात
दृष्टिदोष येईल का,
त्यांच्या कोवळ्या डोळ्यात
रेणुका झंझाड भंडारा
[7/18, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मोबाईल ----
मोबाईल हे चैनीचे
साधन नव्हे
देवाण घेवाण विचारांचे
हे घनघोर भाव आहे ।।
खेद आहे तरी, मुलं गेले मोबाईलच्या आहारी
लक्ष नसते अभ्यासात
मोबाईल खेळती परोपरी ।।
चर्चा, संवाद माणसातला
आपसूकच झाला कमी
प्रत्येकाच्या हातात
मोबाईलचीच धुमी ।।
घरचेच झाले दूर
मोबाईल त्यांच्या हाती
बघावे तेंव्हा, गेम
मॅसेजच बघत राहती ।।
मोबाईलने च जुळती नाती
दुरदूरचे आपले होऊन जाती
खूप चांगल्या गोष्टीही घडती
B.k. च्या मैत्रिणीं माझ्या होती ।।
अभ्यासक्रम, मीटिंगही
होतात ऑन लाईन
क्षणात सगळी माहिती
मिळते, गुगलवरून ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *मोबाईल*
***********************
मोबाईल झाला जीवकी प्राण
असते त्याला बघण्या सवड
जवळची नाती गेली दूर
दूरचे जग भासे जवळ
तुळशीसमोर टिंब काढून
बायका सकाळी रांगोळी घालती
काय जादू केली मोबाईलने
सकाळी उठून नेटंच उघडती
पुस्तके वाचण्याची रुची गेली
जे हवे ते गूगल वर शोधती
कुणीच आपलं डोकं न चालवे
मिळेल ते कॉपी पेस्ट करती
वाढदिवस साजरी करती यावर
केक, फुलांच्या शुभेच्छाही यावर
लग्नाची लिंक असते यावर
वधू वर एकमेका शोधती त्यावर
सौ स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 😂 मोबाईल. 😂
मोबाईलचे लयी ऐकले पुराण.
म्हणटल आपणही सुनवावे गुणगान
मोबाईल माझा बोलका फार
नको तिथेच वाजतो लबाड
रिंग वाजताच होतो शांत
समोरच्याला वाटतं कोण मिसकाँल
देतो....😉
शहाण्या सारखे सारे ऐकतो
बटना दाबताच हवे ते देतो
विचारांची. आदानप्रदान
मुकाट्याने करतो
नको असलेला मजकुर
सहज डिलीट मारतो 🤪
दूरच्या व्यकतीना सहज
जवळ आणतो
या कानाच त्या कानाला
काहीच कळु देत नाही
मोबाईल मुळे लफडे
होतात भारी
म्हणुन म्हणते पोरी जरा जपुन
मोबाईलचा वापर कर सांभाळून. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मोबाईल
अन्न,वस्त्र,निवाऱ्यासारखी-
Mobile झाली मुलभूत गरज.
ह्याच्याशिवाय कुणाचे पान नाही हलत.
शुभप्रभातपासून-शुभरात्रीपर्यंत,
प्रवास सुरू याचा अविरत.
भक्तिगीते,सिनेमा-गीत,
खेळ-गप्पा आणखी बरेच.
छंद याचा खूप जडे.
Whatsapp अन् Facebook मुळे,
मित्र-मैत्रिणी,भेटती नवे.
Google Feature साऱ्यांचा बाप.
सगळे काही याला ज्ञात.
कडू ,गोड जुन्या आठवणी,
Share झाल्या की,डोळ्यात पाणी.
देश-विदेश,हिंडणे-फिरणे,
Surfing करते हवे तसे.
कोविडच्या काळात Mobile जिवलग,
घरीच बसून करी Work from home.
Video calling मुळे,एक झाले बरे,
दूर असले तरी,थकलेले आईबाबा,दिसती डोळ्यापुढे.
लग्नसमारंभ,भेटीगाठी,
मुलेही शाळा शिकती घरच्या घरी.
Mobile ने बदलले सारे चित्र,
Internetमुळे जग आले एकत्र.
Mobile आपला खूपच गुणी,
आपण सगळे त्याचे ऋणी.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि. 08.07.2020
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मोबाईल
मोबाईलचा नाद भारी
लय भारी, लय भारी
दु:खाचे व आनंदाचे
निरोप देई क्षणांत!!
घरबसल्या मिळते सर्वकाही
शापिंगची हाऊस भारी
मोबाईलचा नाद भारी
लय भारी लय भारी
घरातील माणसे दुर जाती
दुरची माणसे जवळ येती
मोबाईलचा नाद भारी
लय भारी लय भारी
मोबाईलने प्रगती झाली
तळागाळातल्या माणसांनाही
कळली
मोबाईलचा नाद भारी
लय भारी लय भारी
आहारी गेले तरूणाई
आजची स्थिती कोरोना पायी
आँनलाईन ही शाळा भरली
मोबाईलचा नाद भारी
लय भारी लय भारी
टिॢंग टिंग,टुक टुक
मोबाईल ची घंटा वाजली
हातात मोबाईल घेतला
मनाला चैन पडलं बाई
मोबाईलचा नाद भारी
लय भारी लय भारी!!
माधुरी देवेंद्र भूते
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मोबाईल
मोबाईल मूळे जग जवळ आले,परिवारातील नाते दुरावत चालले,,
मोबाईल यंत्रामुळे वाईट तर चांगले, लहान मुलांना वेढ लावणारा मोबाईल आले,,
पहिले शाळेमध्ये मोबाईल साठी शिक्षक रागावले,आता करोना मुळे शिक्षण मोबाईल वर आले,,
दूरचे माणसं व्हिडिओकॉल नि जवळ आले,मोबाईल रात्री उशीला अन आई वडील दूर गेले,,
मोबाईल मुळे आपण सखी एकत्रित झालो,घरबसल्या आपण एकमेकांना ओळखू लागलो,,
मोबाईल चा नाद भारी
सोडवतो कोडे
मी आहे श्वेता कानतोडे
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: . 📱मोबाईल📱
जेव्हा मी नविन होतो
तेव्हा माझं खुप कौतुक होई
श्रीमंत माणसाचं फक्त
माझा कडे लक्ष जाई
कॅलेंडर, कॅल्क्युलेटर, टॉर्च, कॅमेरा
यांचा सोडला पिच्छा सर्वांनी
माझी लोकप्रियता वाढू लागली जशी
हट्ट धरले माझ्यासाठी लहान मुलांनी
मग तर माझ्यावर चर्चा झाली
रोज बातम्या आणि वादविवाद रंगला
शाळा, कॉलेज, ऑफिस ने
मला घरचा रस्ता दाखवला
आली महामारी विश्वात
तशी माझी मागणीच वाढली
माणसे आता घरातच राहू लागली
माझ्या मदतीने संवाद साधू लागली
दुरावलेल्या लोकांनी मला जवळ केले
शिक्षणही सुरू झाले उपयोग माझा करून
वरदानच ठरतो मी जर
वापर केला माझा सांभाळून
🖋️ सौ.रूपाली अमोल बोंद्रे,भंडारा
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
"" भ्रमणध्वनी""
भ्रमणध्वनी झाला सोबती
गरज झाली काळाची
हवाहवासा घ्यावे हाती
उघडताच माहिती मोलाची
इच्छा जैशी ज्याची
कामे करावी त्यांची
संदेश वाहन सततची
लिहल्या क्रमांकावर पोहचवी
रिंग वाजता मध्यरात्रीची
मना धास्ती उचलण्याची
संदेश ऐकता धडधडावी
छाती खालीवर आमुची
भ्रमणध्वनीने वेळ वाचवा
टाळावा अपव्यव पैशाचा
असाध्य ते साध्य करने
उपकरण आहे मोलाचा
भ्रमणध्वनीचे कार्यच मोठे
कार्यालयीन,व्यापार कामे
क्षणात सोडविते गुंते त्यांची
अर्थकारण आंतर बॅंकांचे
भ्रमणध्वनी वर कविता केली
बि. के. प.ला पाठवुन दिली
कवी कवयत्रींच्या मनात रूजली
साहित्य संवर्धन समाज झाली
दनाअ , नागपूर
दि.०८/०७/२०२०
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: व्रत वैकल्य---
भारतीय संस्कृतीत
महत्व असे
व्रतवैकल्ल्यांना
विशेष मानतसे ।।
पूजा ,अर्चा, भक्ती
श्रद्धेनुसार चालती
मानस पूजा करुनी
समाज विकास राहे पथी ।।
रंजले, गांजलेल्याना
आपले करावे
हेच व्रत आपण
या युगी पाळावे ।।
गरिबांचा वाली होऊनी
अनाथांचे नाथ व्हावे
कपडे, औषधी अन
पोटासाठी अन्न द्यावे ।।
शिक्षणात सहकार्य
घडावेत होतकरू विद्यार्थी
सक्षम व्हावेत देशासाठी
समर्थ तेच मतीतार्थी ।।
सध्या महामारीचा प्रकोप
घरात राहा, हेच खरे आहे
लॉक डाउन सर्वत्र, सुरक्षित रहा
हेच वास्तव व्रत वैकल्ल्य आहे ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: . *🌺व्रत वैकल्ये🌺*
शब्दो शब्दी पूर्वी चालायचे थोतांड
शिक्षणाने स्त्रियांना दिले वरदान
विज्ञानाने प्रत्येक गोष्टीचे कारण समजाविले
व्रत वैकल्ये साजरे करण्याचे स्वरूप बदलले
वटपौर्णिमा करावी वडाचे झाड लावून
फळांचा नियमित आहार घ्यावा महत्त्व समजून
हरितालिका व्रताचा ठेवावा मान
हिरवळ वाढवावी सभोवताली छान
मंगळागौरी बाई पुजावी मिळून
व्यायामाचे खेळ खेळावे आवर्जून
कुपोषित बालकांना दुधाचे करू वाटप
शिवाची आराधना, करू ध्यान सोबत
संकष्ट चतुर्थीला करू गणेशाचे पूजन
बुध्दीची उपासना, करू पुस्तक वाचन
सदा घेवू आपण सात्विक आहार
नाही जमेल जेवायला तोच उपवास
व्रत वैकल्ये जोपासू नव्या पद्धतीने
मानवता धर्म पाळू मोठ्या मनाने
सौ. रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹*व्रतवैकल्ये*🌹
**************************
व्रतवैकल्ये करती स्त्रिया
गणेश, विष्णु, शिवास पुजती
पुत्रप्राप्ती, धनधान्य समृद्धी
कधी मागती जन्मोजन्मी हाच पती
गौरी, एकादशी, संकष्ट चतुर्थी
वटसावित्री, दीपदान करती
नाना जप, नाना मंत्र
नाना तंत्र यांची चलती
संकल्प करती पोथी वाचून
करती पूजा होमहवन
दान देती गरिबांसी
करूनी उपवास आणि जागरण
गंध, धूप, दीप, नैवेद्य
आरास आणि थाटमाट
प्रसाद, आरती, भजन पूजन
मन रमते सर्वांचे यात
होते दृढनिश्चयाची सवय
काटकपणाची होते जोपासना
लाभती कीर्ती, वैभव, आरोग्य
शिस्त लागते आचरणा
सौ. स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺व्रतवैकल्ये🌺
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
व्रतवैकल्ये परंपरा अमुची
शिदोरी बांधून समाधानाची.
धर्म जाती पंथ नाना विश्र्वाची
नाना विधी व्रतवैकल्यांची.
पूजाअर्चा,धूपदीप उपवास
श्रद्धा भक्ती भजन कीर्तनास.
गंध कुंकू शेंदूर अभिर गुलाल
फुले बेलपत्रं दुर्वा वाहू श्रीफल.
नैव्येद्यास फळे पेढे पक्वान्न
करती जागरण होमहवन.
गरीबांना दानधर्म अन्नदान
पूजाअर्चा ब्राम्हणांना मान.
जैसी ज्याची भावना
तैसे पूरवे नारायणा
भक्तीभाव त्यांची करुणा
पूर्ण करी मनोकामना.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *व्रतवैकल्ये*
भारतीय संस्कृती व्रतवैकल्यची खान
म्हणूनच तर आहे आम्हाला आमच्या
हिंदूधर्माचा अभिमान
पाश्र्चात्य लोक करतात
अनुकरण आमच्या संस्कृतीचे
अशी संस्कृती आमुची
आहे तीला स्थान मानाचे
व्रतवैकल्यामुळे कुटूंब टिकून
आहे आमचे
सगळे सण उत्सव साजरे
होतात एकत्र कुटुंबाचे
पुढील पीढीला आदर्श
पुजा अर्चा व्रतवैकल्याचा
समाजाला एकवटून ठेवने
हाच हेतू व्रतवैकल्याचा
नंदा भोयर
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: व्रतवैकल्ये -
१)आपल्या संस्कृतीत व्रत वैकल्ये यांना फार महत्त्व आहे.
२) ही संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी आपल्या माता भगिनींचे मोठे योगदान आहे.
3)आपल्या व्रतात खूप विविधता आहे, ऋतु नुसार व्रतातून आपले निसर्गाशी नाते जोडले गेले आहे.
४)या व्रत वैकल्येने महिला जवळ येतात व सर्वांचे मने मिळतात, यामुळे भेदभाव विसरून जातात.
5)वटसावित्री,हरतालिका, मंगळागौर ही महाराष्ट्रातील स्त्रियांची आवडती व्रते आहे. या व्रता मधे स्वतःचे सौभाग्य अखंड राहण्यासाठी प्रार्थना करायची असते.
6)धकाधकीच्या जीवनात आपण व्रत वैकल्ये विसरत चाललो,पण आपल्याला ही परंपरा काळानुसार टिकवायची आहे.
सौ श्वेता कानतोडे
अमरावती
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: विचारधारा कविता (५१)
""व्रत वैकल्ये""
धार्मिक अधिष्ठाने असे हिंदुस्थान
इथे अनेक व्रतवैकल्याचे बस्तान
त्यांना निभविण्या तिर्थ प्रस्थान
भोळे भाबळे लुटणे प्रतिष्ठान
व्रत वैकल्यास माणुस पाहीजे
माणसास व्रत वैकल्ये नाही
भरण्यास पोट अधिपतीचे
तन मन धन अर्थहिन वाही
गिता अंतर्भुत कर्मसिध्दांत
जैसेची कर्म तैसेची फळ
व्रत कोकिळ, वैभव आहे भ्रांत
कर्मशुध्दिच आहे जिवन कळ
घाम गाळुनी कमविशी पैसा
घे आहार शुध्द आचारविचार
भजावे गोविंदा चित्तशुध्दित
मना न् आणता कोणता विकार
ज्याचे ठायी पैसा अमाप
त्यांनी करावे व्रत मस्त
पोटाची भरने नाही शक्य
व्रत वैकल्ये झाली जास्त
दनाअ, नागपूर
दि.०९/०७/२०२०
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: व्रत वैकल्ये
भारतीय परंपरेत आहे व्रताला महत्व किती तरी व्रत वैकल्ये आहे अगदी वर्ष भर पुरेल एवढे व्रत आहेत.श्रावण ते भाद्रपद महिन्यात व्रतांनी तर कळस गाठला आहे.आपल्या संस्कृती मध्ये प्रत्येक सणाला धार्मिक महत्व आहे.या निमित्ताने घरातील सर्व सदस्य एकत्र येतात घरात पुजा अर्चा करतात गोडधोड करून एकत्र जेवण करतात.
सगळे एकत्र आले की आंनदीत होतात व त्या सणाला वेगळ्याच आनंद निर्माण होते.
देव हा भावभक्तीचा भुकेला आहे.
देवाला सर्व चालतं भावभक्तीचे तुप ओतलेले असलं म्हणजे झाले
त्यात हृदयाच्या ओलावा असला म्हणजे झाले.
आपण गरजवंताला मदत केली तर तेही व्रतच भारतीय परंपरेत दानाला महत्त्व आहे आता lockdown च्या काळात गरीबांचे जे हाल झाले आहे त्यांना
मदत करणारे अन्नधान्य वितरण करणारे तसेच डॉक्टर पोलीस हे मदत करणारे ते देवा सारखेच न
प्रत्येकाने आपली कर्म प्रामाणिक
पणाने करणे तेही व्रतच ना परिस्थिती ओळखून जो काम करतो तो देवाप्रेक्षा कमी नाही
असेच लोक देवाला प्रिय आहेत.
नको व्रत वैकल्ये फाफट पसारा
श्रध्दा,भक्ती, कर्म हेच व्रत वैकल्ये
माधुरी भूते
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: व्रतवैकल्य
व्रत, वैकल्ये ,अनुष्ठान
ही तर आपली संस्कृती महान
चातुर्मासाची झाली सुरुवात,
व्रत वैकल्याला येई उधाण.
सृष्टी बदलवि ऋतूनुसार चक्र,
वात,कफ,पित्त,प्रकृतीनुसार,
आयुर्वेद सांगे आहार विहार.
बेल, दुर्वा,पत्री,फुले,
देवपूजेला अर्पिती सारे
ओळख व्हावी पाना फुलांची,
हीच गंमत असे त्यातली.
नागपंचमी,बैलपोळा,
घास भरवती कावळ्या, पित्तरपाठा.
यातूनही साधतो निसर्गाशी मेळ,
हा तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा खेळ.
होण्या प्रकृतीचे रक्षण,
व्रत वैकल्यालाचे केले पूजन.
व्रत वैकल्य मानू नये थोतांड,
जुन्या शास्त्रासोबत विज्ञानाची ,
घालू सांगड छान.
सौ. प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव
दि.09/07/2020
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आई कुठे काय करते*👩👧
************************
नऊ महिने पोटात वाढवून
कळा सोसून जन्म देते
आई कुठे काय करते
रक्ताचं दूध बनवून
बाळास स्तनपान करते
आई कुठे काय करते
आपल्या इच्छा अपेक्षा मारून
बाळाला वेळ देते
आई कुठे काय करते
चांगले ग्रहण करून वाईट सोडून द्यावे
असे सांगून संस्कार करते
आई कुठे काय करते
आजारी असल्यास झोपमोड करून
सेवा शुश्रूषा करते
आई कुठे काय करते
आपली आवड बाजूला सारून
आवडीचे सगळे पदार्थ करुन देते
आई कुठे काय करते
प्रोत्साहन देऊन पुढे जायला सांगते
मी तुझ्या पाठीशी आहे म्हणते
आई कुठे काय करते
कितीही दुःख आयुष्यात असू दे
लेकरांच्या सुखात सुख मानते
आई कुठे काय करते
मुलगी जेव्हा आई होते
तेव्हा तिला कळते
आई कुठे काय करते
सौ स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 😳आई कुठे काय करते😳
आई कुठे काय करते
लवकर उठून राबते
गरम नाश्ता,गरम चहा
न मागता पुढ्यात देते
आई कुठे काय करते
श्वासातला श्वास देते
जिवातला जिव देते
अमृतधारांनी पोट भरते
आई कुठे काय करते
घरभर मागे फिरुन
घास तुला भरवते
डोळयातले पाणी पुसून
हसत घर सावरते
आई कुठे काय करते
कधी बाबांची ही आई होते
हातात सारया वस्तु देते
सुगरण बनुन चोचले पुरविते
आई कुठे काय करते
घरासाठी तलवार होते
ढाल बनून रक्षण करते
इतरांसीठी जगता जगता
एक दिवस अनंतात
विलीन होते.........
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
*आई कुठे काय करते?*
बाळाची चाहूल लागताच
ती स्वतःला जपत असते
होणाऱ्या वेदना सहन करत
बाळाला पोटाशी धरत असते
आजारी असल्यास घरातले कुणी
रात्रभर काळजी घेत जागत असते
लादी, केरवारा, भांडी, धुणी
सगळच तर ती करत असते
बाबांना कधी ती आधार देते
पिल्लांच्या काळजीने कासाविस होते
चार भिंतींना ती घर बनवते
मोबदल्यात तिला काय मिळते?
रागावणे चिडणे ती सहन करते
तरी सकाळी हातात डबा देते
मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवते
स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करते
आई कुठे काय करते?
असे कसे कुणी म्हणू शकते
सारेच तर ती करते
आम्हाला करायला कुठे काय उरते?
सौ. रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[7/18, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आई कुठे काय करते-
तिच्या हृदयात असतो प्रेमाचा जिव्हाळा, तिने पाहला असतो संसाराचा उन्हाळा
तरी आई कुठे काय करते
घराची आणि प्रत्येकाची नाळ तिच्याशी जोडलेली असते, नात्याची विन तिलाच घट्ट करता येते, तरी ही
आई कुठे काय करते
स्वतःच्या रक्ताचं दूध करून पाजते,राब राब राबून रात्र दिवस घडवते, तरी ही
आई कुठे काय करते
आपले दुःख मनात लपवून कुटुंबाला सुखी ठेवणारी ,मरण यातना सहन करून आपल्या बाळाची जीवनयात्रा सुरू करते, तरी
आई कुठे काय करते
लंगड्याची पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते,तरी
आई कुठे काय करते
शेवटी, एक ओळ आईसाठी
आई असते जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही,,
तरी आपण तिला अस का म्हणतो
आई कुठे काय करते
सौ श्वेता कानतोडे
अमरावती
[7/18, 7:23 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आई कुठे काय करते*
रात्र रात्र जागून काढते
डोळ्यातली झोप डोळ्यात ठेवते
आई कुठे काय करते
मला थोड जरी खरचटल तरी
पहीले वेदना तीला होते
तरी पण आई कुठे काय करते
मला परीक्षेत मध्ये जास्त गुण मिळाले तर पहिला आनंद तीला होत़ो तरीही आई कुठे काय करते
मी लहान असताना मांडीचा पाळणा करूण तासन् तास मला मांडीवर जोजविते
तरी देखील आई कुठे काय करते
मी सासरी जाताना डोळ्यातील अश्रू लपविते पण आई कुठे काय करते
माझ्या करता ती तीला विसरून जाते प्रत्येक सुख दुःखात माझ्या सहभागी होते आणि तरीही
आई कुठे काय करते
नंदा भोयर
[7/18, 7:23 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आई तू कुठे काय करते---
आई घरीच असते
तोंडातला घास मुलांना देते
मुलांसाठी वाट्टेल ते करते
आई कुठे काय करते ।।
1पोळी मागितली, तर 2देते
तब्येतीसाठी रात्र रात्र जागते
मुलगा आला नाही, उगाच पापणी
ओलावते
आई कुठं काय करते ।।
पहाटे चार वाजता अभ्यासासाठी ती उठवते
मुलांसोबत काहीतरी करते
जेवणासाठी वाट बघत असते
आई कुठे काय करते ।।
त्यांच्या सुखात सुख मानणारी
त्यांच्या आनंदात विश्व सामावलेली
मुलांच्या यशासाठी सतत झटत असते
आई कुठे काय करते
आई, सुखाचं चांदण पाडणारी
सतत तेवत राहणारी
जेंव्हा ती आई होते, तेंव्हाच तिला
आई कळते ,आई आईच असते
आई सारखी कुणीच नसते ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 7:23 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आई काय करते
लग्न होऊन घराचा उंबरठा ओलांडते.
चार भिंतींना घर ती बनविते
आई काय करते.
बाबांचा संसारवेल फुलविते
बाळंतपणा मध्ये कामे ती करते.
आई काय करते
पोरांचे ते जिभेचे चोचले पुरविते
मुलांना चांगल्या सवयी लागाव्या म्हणुन जीवाचा आटापिटा करते.
आई काय करते
बरं नसल्यास कुणाला रात्रभर जागतेस
मुलांचा अभ्यासातही काबाडकष्ट करते
आई काय करते
दिवसभर घरी राहून काम तु का करते.
दुपारी तू झोपाच काढते
आई काय करते
सासरी आल्यावर मात्र आईची किमंत कळते!!
स्वत: आई झाल्यावर मगच समजते!!
आई काय करते!!🦚🦚!!
माधुरी देवेंद्र भूते
[7/18, 7:23 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आई कुठे काय करते
जन्मघेण्याआधी जग जिच्या,
नयनातून बघशी.
नाळ तुझ्याशी जोडून,
अन्न तुला रे,जी भरवी.
तिलाच पुसशी,
आई कुठे काय करते?
करुनि हाताची झोळी,
संस्काराचे बीज ती रुजवी.
ठेच तुला लागता,
पाणी जिच्या डोळी येई.
तिलाच पुसशी,
आई कुठे काय करते?
होऊ दे कितीही बिकट स्थिती,
मार्ग त्यातून ती स्वतः काढी.
वाटेवरचे काटे वेचून,
फुले तुझ्यासाठी अंथरते.
तिलाच पुसशी,
आई कुठे काय करते?
अडाणी असो वा शिक्षित,
तिचेच तू रे सारे विश्व.
केलेल्या कर्तव्याचा,
हिशोब नसतो कधी पदरी.
कौतुक तुझेच जिच्या अधरि,
तिलाच पुसशी,
आई कुठे काय करते?
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि.10.07.2020
[7/18, 7:23 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""आई कुठे काय करते""
जिवामधुनी जिव करी वेगळे
सोसुन असह्य बाळंतकळा
जन्मता बाळा हर्षते मना
लावते वात्सल्यानं छाती बाळा
तरी आई कुठे काय करते!
असता बाळांस सर्दी ताप
सारी रात्र करते नेत्र जाप
थंड कापडपट्या ठेवी मस्तका
थकलेल्या शरिरा टाकी धाप
तरी आई कुठे काय करते!
करतो घाईने तयारी शाळेची
शिकवणीने नाही वेळ लेकरांस
आई पोळीभाजी घेऊन घास
फिरते मागे भविष्याचा ध्यास
तरी आई कुठे काय करते!
सुना नातवंडे घरी आले
आईचे काम कमी न् झाले
समोर सुनांच्या करते घाई
नातवांची शि..सु करते आई
तरी आई कुठे काय करते!
काम दिवसभर न् आरामाचे भान
कुणा मागु स्वत:ला मानपान
कलल्या वयातही समोर करते
कामानच् मिळते पोरंसुनाचा मान
तरी आई कुठे काय करते!
आपली सुगरणतेची चव देते
स्वत:ला विसरून लेकरां जपते
सुखी क्षणांना हरखुन हसते
सर्वां सुखा सदा धडपडते
दनाअ, नागपूर
दि१० जुलै२०२०
[7/18, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *समाजाचा शेतकरी*
समाजाचा कणा शेतकरी माझा
समजेना कुणीही त्याची व्यथा
सर्जा राजा सोबत दोस्ती याची
बळीराजाची तर आहे अजब कथा
ऊन, पाऊस, थंडी, वारा
तमा न बाळगता कशाची
दिन रात मेहनत करतो
भीती नाही रानटी जनावरांची
मरमर करून शेतात राबतो
घाम गाळून धान्य पिकवितो
कधी निसर्ग साथ सोडतो
कधी सरकार दुर्लक्ष करतो
भाव मिळत नाही शेतमालास
कर्ज काढतो पीक पिकवण्यास
कुठून कसे कर्ज फेडावे
प्रवृत्त होतो आत्महत्या करण्यास
सौ स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[7/18, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *समाजातील शेतकरी*
समाजातील शेतकरी आहे
पाठीचा कणा
आमच्या करता पीकवतो
दाना अन् दाना
त्यांच्या भरोशावर आहे
आम्ही आज
तो पीकवतो म्हणुन
खातो आम्ही पोटभर घास
सुर्यदया पासून ते सुर्यास्तापर्यत
असतो तो राबत
ऊन वारा पाऊस
झेलत असतो अंगावर
गाव नाही गाडा नाही
नाही करमणूक कोणती
सतत झिजत असतो
काळया अन् काळया मातीत
नव युग नवी शेती
भरपूर पीक आपल्या हाती
हा एकच नारा शेतकऱ्यांचा
एक दिवस मोबदला मीळेल
त्याला त्याच्या कष्टाचा
नंदा भोयर अमरावती
[7/18, 7:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🎋समाजातील शेतकरी 🎋
" जय जवान जय किसान" असे श्री लाल बहादूर शास्त्री यांनी म्हटले होते. पण आज परिस्थिती खूप बदली आहे.
शेतात दिवस रात्र जागून जो धाण्य पिकवतो, आपले पालनपोषण करतो तो म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना बळीराजा म्हणून सुद्धा संबोधले जाते. शेतकरी आपल्या समाजाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. तो आपल्या साठी धान्य पिकवतो. शेतात राबून पिकांची काळजी घेतो. शेतात पेरणीपासून कापणीपर्यंत सर्व काम स्वतः करून आपले पोट भरतो.
पण आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय. पिकांचे योग्य मूल्य ना मिळाल्यामुळे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे आज शेतकरी शेती विकून दुसरे काम करायला विवश झाला आहे. कोणी युवक शेती करायला बघत नाही.
शेतकरी खरंतर स्वतः चा मालक असतो, पण आजकाल त्याला कर्ज घेऊन सुध्दा फायदा होतो नाही. कृषी प्रधान मानल्या जाणाऱ्या देशाची ही दशा लज्यासपद आहे. शेतकऱ्याला मान व न्याय मिळाला पाहिजे कारण शेतकरी आपला अन्नदाता आहे. तर पुन्हा एकदा "जय जवान जय किसान".
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
सौ. शितल श्रीकांत ठवकर.
(तुमसर रोड देव्हाडी)
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजातील शेतकरी
शेतकरी हा स्वतः शेतमालक
नाही त्याच्या पिकाला इथे किंमत
मोत्यासारखे पीक उगवतो
तरी आत्महत्येला सामोरे जातो.
कृषिप्रधान या देशात,त्याची ही दयनीय अवस्था,
संबोधले जाते,त्याला इथे बळीराजा.
दिवसरात्र शेतात राब राब राबतो,
संपूर्ण बळ एकवटून शेतात पीक घेतो.
कधी दुष्काळ,तर कधी अतिवृष्टी,निसर्ग आपत्ती,
तरी सुद्धा संकटावर मात करून सामोरे जातो,
शेतकरी राबून आपले पालनपोषण करतो,
आपला अन्नदाता असून सुद्धा, आपण मोलभाव करतो.
शेतकऱ्यांना न्याय हा मिळायलाच हवा,
जगाच्या पोशिंद्याचा सन्मान व्हायलाच हवा.
सौ.कीर्ती शेंडे.,...नागपूर🙏
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजातील शेतकरी--
दिवस रात्र कष्ट करी
खातो कष्टाची भाकरी
पोसतो हे विश्व सारे
माझा दादा शेतकरी ।।
शेतकरी दादा तुझ्या
लई लई गती
कर्जापायी होते, तुझ्या
जीवनाची माती ।।
पेरणी झाली तरी
पाऊस ढगात गुडूप
मेघराजा रागावला
कसा येईल हुरूप ।।
दुबार पेरणी, धो धो
येई हा पाऊस
चला करू रोवणी
साऱ्यांना राही हौस ।।
धान कसे येते मग
ओलाऊन, निसावून
डोळे पाहते भरले पीक
मन जाते हरकून ।।
कधी रोग येई, कधी
पावसाचा अती जोर
मोत्याचे दाणे येता येता
होतो शेतकरी गार ।।
कधी येता वादळी
कधी फरफटतो वारा
भेगालल्या शेतात
कधी बरसाव्या धारा ।।
कर्जापायी कधी तू
होतो परेशान
कधी राग काढतो
जीवन यात्रा संपवून ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *समाजातील शेतकरी*
भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे जरी आपण म्हणत असलो तरी शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे. आपल्या समाजातील बहुतांशी लोकांचा प्रमुख व्यवसाय आताही शेतीच आहे, याचा अभिमान आहे परंतु प्रत्येक वर्षी होणार नुकसान शेती करिता पूरक नाही. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा संबोधतात. शेतकरी धान्य, फळे, भाजीपाला मेहनतीने पिकवतो आणि मोबदला पाहिजे तसा मिळत नाही.व्यापारी त्याचा फायदा घेतात. स्वस्त दरात माल विकत घेऊन जास्त दरात विकतात.
शेती सोबत जोड धंदा करणारे लोक जरा समाधानी आहेत.निसर्गाची साथ आणि शासनाचे बदलते नियम यांचा शेतीवर परिणाम होतो. रसायानमुक्त आधुनिक शेती कशी करायची हे आता आपण शिकलं पाहिजे. आणि व्यापाऱ्याला मध्ये न घेता आपला शेतमाल थेट ग्राहांपर्यंत कसा पोहचवता येईल याचा विचार केला पाहिजे.
सौ.रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजाचे शेतकरी
(चाल:तिफन चालते)
कृषक समाजाचे आम्ही, साधेभोळे शेतकरी
साधेभोळे शेतकरी,आम्ही गरीब शेतकरी.
घाम गाळून गाळून,
करितो आम्ही शेतीवाडी.
धनधान्य पिकवून,
आम्ही राहतो उपाशी. ....
समाजातील लोक आम्हा,
समजती दरिद्री,अडाणी.
समजती अडाणी,
आमची करिती हेटाळणी. ....
शेतकरी म्हणून आम्हा,
मिळेना जगामंदी मान.
मिळेना हो मान,
आम्हा मिळेना सन्मान. ........
शेती करून होते,
आमच्या जीवाची हो माती.
जितेपणी हो माती,
मेल्यावरही हो माती. ......
शेतमालाले भाव नाही,
कधी निसर्गाची साथ नाही.
लेकराच्या लगीन, शिक्षणाले
कर्ज काढितो आम्ही. .........
कर्ज फेडता फेडता,
रक्ताचे होई पाणी.
मग कंटाळुन जीवाले,
घेतो गळ्यामंदी फास. .......
अशी आमच्या जीवनाची,
असे थरारक कहाणी.
समाजाले वाटे,
याची नेहमीची रडगाणी. ......
सौ. प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव
दि.11/7/2020
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara:
🙏🙏 शेतकरी. 🙏🙏
सोपं नसतं शेतकरी होणं
मातीमध्ये रूतत जाण
एका एका रोपट्यासाठी
आभाळाचे ऋणी होणं.........
सोपं नसतं शेतकरी होणं
तापता सुर्य डोक्यावर घेणं
पिकांचा मळा पिकवित जाणं अन्नदाता स्वतला म्हणवुन घेणं.......
.
सोपं नसतं शेतकरी होणं
धान्याच्या राशीत भुक हरवणं
हिरव्या गालीच्यात निद्रा गमवणं
शेणाचा सुगंध अंगावर शिपडणं........
सोपं नसतं शेतकरी होणं
मागेल त्याला ते देत जाणं
कर्ज बाजारी होत जाणं
ओठ दाबून सार सोसणं .........
सोपं नसतं शेतकरी होणं
नव्या साठी जुन्याला डावलणं
ऋतु ऋतू जगवेल तसा
निमुट जीवन जगत जाणं ............
सोपं नसतं शेतकरी होणं
कुणबयासारखे जीवन जगणं
काळ्या मातीच्या तेजासाठी
स्वताला ही माती लावणं..............
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजाचा शेतकरी-
सारया जगाचा मी पोशिंदा देतो सर्वांना अन्न,
काबाड कष्ट करून हात पाय झाले खिन्न,,
राब राब राबून सुध्दा पोट काही भरत नाही,
माझं अस्तित्व या सरकारला सुद्धा कळत नाही,,
पांढऱ्या भातावरतीच झोपी जातो अर्धा भारत माझा,
चटणी बरोबर भाकर खातो इथला शेतकरी राजा,,
कोरडा दुष्काळ सुद्धा फोडतो शेतकरी छातीमदल्या दमावर,
पावसावर कुणी शेती करतो अंगामधल्या घामावर,,
नवीन नवीन घाव घेऊन पेरली होती कपाशी,
सायंकाळी घरी परतवून माझी लेकरू होती उपाशी,,
रात्र दिवस मेहनतीचा शेतावर करते पहारा,
तरी या शेतकऱ्याला
कुणाचा नाही सहारा,,
जय जवान, जय किसान
सौ श्वेता कानतोडे
अमरावती
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजातील शेतकरी
खेडोपाडी विखुरला
समाजातील शेतकरी
रात्रंदिवस राबतो
बांधावरी शेतावरी
कधी राही अर्धपोटी
कधी होई कुपोषण
मुलांसाठी धडपड त्याची
देई उच्च शिक्षण
अन्न ,धान्य ही त्याचे
दूध,तुप,ताक,दही
भाजीपाला आणि फळे
खाऊन लोक तृप्त होई
तरीही न मिळे त्याला
समाजात बहुमान
शहरातील बाबू येई
उभा होई चटकन
सुख,दुःख,कष्ट,व्यथा
अनुभवले जवळूनी
लिहिता समाजाचा शेतकरी
पड़े अपुरी लेखणी
रेणुका झंझाड भंडारा
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शेतकरी....🎋🌾🌾🎋
रात्रंदिवस शेतीत राबतो
मायाच नशिबी हे असं कसं जिणं
समाजाची प्रगती करायची असेल तर शेतकरी या वर्गाची प्रगती झाली पाहिजे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे
कृषी करणारा शेतकरी. शेती करणारा "कुणबी". प्राचीन काळापासून बलुतेदारी पध्दत होती.बलुतेदारीचाच एक भाग म्हणजे कुणबी आता कणबी शब्दाचा अर्थ.
कण म्हणजे मातीव,बी म्हणजे बियाणे, म्हणजे मातीत बी पेरणारा व अन्नधान्य पिकवणारा
म्हणजे "कुणबी"
बावणे कुणबी समाजातील लोकांना ही विनंती की महाराष्ट्रात शेतकरी बांधव असतील त्यांना मदत करा समाजात आपण काही कार्यक्रम घेतो त्यामध्ये सामुहिक विवाह, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , शिक्षणासाठी मदत करतो त्याप्रमाणे शेतकरयांना मदतही केली पाहिजे.निदान बी, बियाणे घ्यायला तरी, शेतकरयांचा सन्मान तसेच त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना वेळोवेळी मदत व मार्गदर्शन करावे.आपल्या समाजा
मध्ये एक ही शेतकरी आत्महत्या
करणार नाही याचे भान ठेवावे.
शासनाने शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केल्या आहेत त्या
कागदोपत्री च राहतात त्याचा उपयोग होत नाही त्यांची माहिती करून द्या.
शेतकरी जो माल पिकवितो त्यांना भाव मिळत नाही.बी पेरले तर
पाऊस येत नाही.पाऊस आला तर इतकं येतं जे पिकलं तेही घेऊन जाते.यामुळेच तो कर्जबाजारी होतो.व तो आत्महत्या करतो.
सर्वांना धान्यपुरविणारा शेतकरी हा नेहमीच दुर्लक्षित राहतो.🙏🙏🌾🌾🙏
सौ.माधुरी देवेंद्र भूते.
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *"समाजाचा शेतकरी"*
कृषीप्रधान देश आपला आपण आहोत कुणबी
मुठभर लोकं वगळता आपण सारे शेतकरी
शेतकरी अख्ख्या जगाचा पोशिंदा
ऊन वारा पाऊस झेलत पावसात उभा
पावसाच्या सरींची आतुरतेने वाट पाही
माती भिजली की पेरणीस तयार होई
निसर्गाने साथ दिली तर पिके शेती उत्तम
मनातल्या मनात शेतकरी भारावून जाई
जास्त पिके झाले तर बाजारभाव नाही
शेतकरी बिचारा चिंतातुर होई
शेतकरी बिचारा राबराब राबतो
महागाई पायी कर्जबाजारी होतो
नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत पिकपाणी काढतो
सावकाराच्या ओझ्याखाली दडपला जातो
शेतकऱ्याशी लग्न करायला मुली देतात नकार
चपराशी असेल तरी राहु म्हणतात शहरात
शहरात आली कोरोनाची महामारी
आता गोड वाटते घरचीच भाजीभाकरी
नविन पिढीने आधुनिक शेती शिकायला हवी
आपल्याच घरी राहुन आईवडिलांची चिंता मिटवायला हवी..!!
*सौ. अंजली बान्ते*
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 शेतकरी राजा 🌺।।
" जगाचा पोशिंदा " अस बिरुद
लावून ज्याला गौरविल्या जाते
असा माझा शेतकरी राजा.
आपला देश कृषिप्रधान म्हणून
ओळखला जातो.त्यातही आपला
समाज हा बहुसंख्येंने कृषिक्षेत्रात
काम करीत आहे.परंतू आज शेती
व शेतकर्यांची अवस्था खूप भयाण आहे.
पावसाचा अनियमितपणा,
बोगस बियाने,निसर्गाचा लहरी
पणा ,शेतीविषयक शासनाचे
उदासिन धोरण,शहराची ओढ
अशा अनेक कारणामुळे
शेतकरी नैराश्यात जगत आहे.
मनाचा समतोल ढासळून
आत्महत्येला जवळ करीत आहे.
तरीही,
आज अस वाटायला लागल
कि आपल्या या बळीराजाला
सांगाव कि "आत्महत्या" हा
उपाय यावर नाही.
" जगाला भरवी घास
नाही कशाची आस
घामातून पिकवी मोती
माझा बळीराजा "
तू मागे फिर नाव ही घेऊ
नको मरणाचे.
सौ.के.बी. सार्वे भंडारा.
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: . 💧 पाणी 💧
थेंब पाण्याचा
अमृत जीवनाचा
वाचव रे मानवा
जीवन जीवनाचा
थेंब थेंब सरीचा
पृथ्वीच्या गर्भाचा
. साठव रे मानवा
खजाना जीवनाचा.
बचत पाण्याची
गरज जीवनाची
वृक्ष-वेली,पशू-पक्षी
जीवन जगविण्याची.
थेंब थेंब हा पाण्याचा
आहे बहुमोलाचा
आत्मा साऱ्या सृष्टीचा
मार्ग धर बचतीचा.
बंद कर फुटके पाईप
गळक्या साऱ्या तोट्या
ओसंडून वाहणाऱ्या
छतावरील टाक्या.
शुद्ध ठेवा पाणवठे
नको रितेे पाण्याचे साठे
पाण्या वाचून जीवन
. आॅक्सिजन बिना पवन
निर वाहेना निरा
उदक नाही झरा
आटलेल्या विहीरी
तृष्णावली खेडे शहरी
. कोण भागवेल तृष्ण
. शुष्क मातीचा कण कण.
. अशी कशी झाली दैना
देवा सुबुद्धी दे मानवांना.
सौ.मीरा नरेंद्र शेबे
. भंडारा.
कण
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
"" समाजातील शेतकरी""
समाज आपला शेतीनिष्ठ
यावर आहे आपली भिस्त
लहानाचे मोठे शेतीत झालो
पुर्वजांमध्ये मोठी शिस्त.
कुणबी शेतकरी मोठा दानशुर
शुरात आहे ममतेला महापुर
गाळल्या घामाला मोलं नाही
दान करण्यात झोल नाही.
भाऊबंदकी कुटुंब वाढले
शेतीशिवार हिश्यात वाटले
परवडत नाही शेतं विकले
शहरा येऊन हालच झाले.
समाज सज्जन सांगुन गेले
अरे,"कराल शेती खालं माती"
लेका,शिक्षणाविन विकास नाही
सुधारून जातील आपुल्या जाती.
टपरी वरती वेळ घालवी
शेती आपली मक्त्याने देई
सफेद कपडे खिशे खाली
पाहुनचारास कर्ज घेई.
दनाअ, नागपूर
दि.११/०७/२०२०
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडती कविता-
आई बाबा
आई बाबा सोडून या जगात काही मिळत नाही ,आणि
मिळालेल्या गोष्टीचे मोल आयुष्यभर कळत नाही,,
जगातील प्रत्येक घर ही एक शाळा असते, आणि घरातील आई बाबा हे त्या शाळेचे शिक्षक असते,,
आपले दुःख मनात लपवून कुटुंबाला सुखी ठेवणारे बाबा असते, आणि मरण यातना सहन करून आपली जीवनयात्रा सुरु करणारी आई असते,,
आपल्या मनातलं जाणणारी आई असते, आणि भविष्य ओळ्खणारे बाबा असते,,
मेहनत करायला शिकवणारे बाबा असते, आणि संस्काराचे धडे देणारी आई असते,,
आपण जींकन्यासाठी स्वतः आयुष्यभर हारणारे बाबा असते, आपण हरण्यात जींकन मानणारी आई असते,,
अशाप्रकारे आयुष्यात दोन वक्तीची काळजी आपण घेऊ,,
आपल्या आयुष्यतले दोन डोळे म्हणजे हे आपले आई बाबा आहे.
सौ श्वेता कानतोडे
अमरावती
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: . *विषय - आवडती कविता*
*"पेरणी"*
घाम गाळून शेतात
तयार केले शिवार
आस पावसाची आता
सारे भिजावे आवार
कर्ज काढून बळीराजाने
आणले नवे बियाणे
सज्ज ठेवले तिफण
कृपा करावी वरुणाने
येता पावसाच्या सरी
झाली पेरणी शेतात
एक एक बीज समावे
धरणीच्या कुशीत
बीज अंकुरे अंकुरे
आनंद होई मनात
बीजाचे होई रोप
रोपाचे सुंदर झाड
काळया मातीचीच सेवा
करतो मनोभावे
कृपा राहावी विठ्ठला
विनवितो आदराने
*सौ.रूपाली अमोल बोंद्रे ,भंडारा*
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🔥सल. 🔥
गळतीच्या पानी
सुसाट वेदना
भोगलया त्या वेणा
जितेपणी..........
कित्येक भोगले
जखमांचे सल
कुकंवाचे मोल
देवुन ही.............
आता रीतेपणी
सागराच्या पोटी
रिकामी घागर
नदीकाठी...........
विझल्या समिधा
राखेच्या महाली
कोशाच्या कपाळी
सुरवंट..........
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
..
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *नियंत्रण रागावर*
*************************
असू द्या सदैव ,
नियंत्रण रागावर.
त्यानेच तर राहील,
ताबा सर्व रोगांवर.
थोड्या थोड्या गोष्टींवर,
नका रागावू कधी.
हास्याचे फवारे,
उधळा कधी मधी.
दुसर्यांच्या भावनांचा,
जरा करा विचार.
शांतपणे समस्या सोडवा,
लोकांस द्या तुमचा आधार.
चिडचिड करून,
नका वाढवू रक्तदाब.
मोकळेपणाने बोला,
प्रश्न सुटतील आपोआप.
सौ स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: तीनचे माहात्म्य
माणूस आहे का खरेच वेडा
तीन मानतो अशुभ आकडा
तिनातच सारे विश्व
स्वर्ग मत्यू आणि पातळ
जगाचा सांभाळी तोल !
तीनच असती आमुचे दैवत
ब्रह्मा विष्णू आणि महेश
हाती ज्यांच्या जगताची कास !
तीनच आमुचे असती पूज्य
माता पिता आणि गुरु
वंदन त्यांना आम्ही करू !
तीनच ग्रह आमुचे असती
सूर्य चंद्र आणि पुर्थ्वी
त्याविण नसे जीवनाला गती !तीन पानांचा बेल शंकराला
त्रिदल दुर्वा आवडे गणेशाला
तिन्मूख दत्त पुजू तयाला !
नभी फडके ध्वज तिरंगा
केसरी शुभ्र हिरवा या रंगानी
देशाची शान उंचावुनी !
रेस लावता म्हणतो वन टू थ्री
दोन वस्तू घेतली तर
तिसरी फ्री !
विचार करा आपुल्या मनी
असा असे तीन आकडा गुणी म्हणू नका त्यास अपशकुनी !!
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वाटे मज----
वाटे मज आज
लहान व्हावे
आईच्या कुशीत
हळूच शिरावे ।।
मऊ मऊ वरण भात
मुखी भरवावे
आईच्या पदराला
तोंड पुसावे ।।
हट्ट करावा
नको जेवण मला
उपमा आज
हवा खायला ।।
दादाशी लावावी
लाडीगोडी
बहिणीशी
भांडावे खोटे थोडी ।।
अंगणात जाउनी
चिंब भिजावे
पाऊस धारात
केसातुनी थेंब गळावे ।।
लपाछपी चे
खेळ खेळावे
आईच्या पदरात
लपून बसावे ।।
वाटे मज आज
लहान व्हावे
मोठ्या जगातून
जरा वेळ मुक्त व्हावे ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजातील शेतकरी
नकाे श्रीमंतीचा थाट, नकाे बसावयास पाट
नकाे झाेपावयास खाट, नकाे तंटा ना वैरास गाठ
नकाे उगाच आश्वासनं, नकाे फुकटचा रुबाब
नकाे सावकारी पिळवणुक, नकाे सरकारी जबाब
नकाे खाेटी किटकनाशकं, दाम जरा कमी करा
बियाणं निघालं सडकं, धमकी देताे कर्ज भरा
नकाे खाेटे चेहेरे, नकाे झाेपेतली खाेटी स्वप्न
पै-पै कष्टाच्या कमाईनं, पाेरीचं लावताे लग्न
दुर जातं पिकं माझं, अनाेळखीच्याही वाट्याला
अन्नाची गरज काय? ते कळतं या अड्याण्याला.
प्रिया र. गाेमाशे
(आकाशवाणी निवेदीका) चंद्रपूर
कालची कविता आज सेंड केली नेटवर्क नसल्यामुळे 😊🙏
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺 डाॅक्टर दिना निमित्त🌺।।
ईश्र्वरीय देणगी ती,
देवदूत बनूनी आले।
स्वर्गातूनी भूवरी,
मातृहृदय ते पावन झाले।।
तो श्वेत वस्रधारी,
देवदूत आला स्वप्नी।
मन शांत,निस्सिम सेवा,
मी दंडवत केला मनोमनी।।
चोवीस तास सेवेत,
करी प्रार्थना यमास।
यश दे मज सेवेस,
वाचवी दु:खी जीवास।।
ना जीवाची पर्वा,
ना भिती मरणाची।
ना आसक्ती कशाची,
निरंतर चिंता सेवेची ।।
मी प्रणाम करते,
त्या देवदूतास।
दिनरात्र झटूनी,
तत्पर असतो सेवेस।।
धन्य ते मातापिता,
देवदूत ते आले पोटी।
शतश: प्रणाम,
काय भरावे त्यांच्या ओटी।।
सौ. के. बी. सार्वे भंडारा.
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जीवन:-
जीवन म्हणजे आयुष्य काय असते
जन्म ते मृत्यू पर्यंत प्रवास असते
स्वप्नाच्या मागे धावायचे असते
पन नेहमी चि ट्रेन सोडायचि नसते
मनातल्या मनात रडाय चे असते
चेहर्यावर हास्य दाखवायचे असते
कधी कधी आयुष्य क्षणात संपते
कधी एक क्षण जीवनभर संपत नसते
जीवन हे आपले स्वताचे असते
पन जगतो दुसऱ्या साठी का असते
मरण आपल्या हातात नसते
पन जगणे तरी हातात नसते
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सखा सोबती
मित्रत्वाची आण मी टाकते
तु मला विसरु नकोस
या विश्र्वातल्या सौंदर्यात
तु मला हरवु नकोस
जीवनातल्या काटेरी प्रश्नांना
तु मला अहेरू नकोस
संकटाची नाव आली तरीही
तु माझे धेर्य खचवु नकोस
कल्पनेच्या विश्वात गुंतलेले स्वप्नै
त्याच्या आहारी मला नेऊ नकोस
ॠणानूंबंधाच्या नात्यांच्यात
तु मला विसरु नकोस
समाजातील वास्तव्यात
माझं स्थान विसरु नकोस
विसरशील जरी तु मला
पुन्हा स्वीकार करायला
नकार देऊ नकोस.🌹🌹
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺माझी आवडती कविता🌺
माझ मन माझा भाव
गुंफुन होईल शब्दांची माळ
खारट तिखट कडू गोड
जी चाखेल माझे बोल
प्रतिसाद मिळेल उत्तम कविचा
तिच माझी आवडती कविता...
इच्छाआकांक्षाच गाठोड मनात
सोडून देताच पुर्तीस चाल
उघड्या डोळ्यातील स्वप्नांचा़घरात
रेखाटून पूर्ण होईल कवितेच्यारूपात
तिच माझी आवडती कविता फार...
स्त्रीजातीला बंधणे फार
उडता न येईल तीला लांब
फडफडणार्या भावनावरील जाळ..
कात्री लावुन उडवेल जी आज
तीच माझी आवडती कविता महान ..
मन भावना साथ साथ
निघाल्या कल्पनेच्या जगात
नाही बंधन नाही नितीनियम
तिच्या सानिध्यात जगेन स्वतः साठी फक्त
तिच असेन माझी आवडती कविता....
सौ.चंदा शेन्डे नागपुर
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *गरीबी*
गवताची झोपडी मायी
जागो जागी गयते
कुठं कुठ सांदु तीले
गंगा घरात खेळते
उभ आयुष्य माय
सांदु सांदुच गेलं
पोरांच्या नशीबी माया
सारं सांदवनच आलं
चूल माहेरच्या घरची
कवा कवाच पेटते
मायी बुढी माह्याकड
मोठ्या आशेने पायते
हाती नाही खडकू
तीले कसा मी सांगू
आता कोणाकडे जावू
कर्ज कोणाले गा मांगू
नंदा भोयर
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उपक्रम..आवडती कविता
(अष्टाक्षरी)
""दया,क्षमा,शांती ""
गर्जावे एक मुखाने
दया,क्षमा, शांती नारा
जना साभार सौजन्य
लाभावि विचारधारा.
भूतदया बाणवावी
लक्षणं अंगी दिसावी
कर्म तशीच करावी
बोलता न् ये जाणावी
चुकल्यास करा क्षमा
क्षमा विरांचे भूषणं
पुनरावृत्ती न् व्हावी
दिसता द्यावी दुषणं
शांती कोणा ना आवडे
मनःशांती एकचित्त
जगी मानव आरोग्य
स्वास्थ राहे तंदुरूस्त.
कोलाहल दाटे मना
मंत्र दया, शांती,क्षमा
तिथे देवाचे चिंतना
ध्यानाला ना ठेवी तमा.
दनाअ, नागपूर
दि.१२/०७/२०२०
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🦜🦚रागोंळी🦚🦜
निर्मिती माझी संगमरवरी 'रेत'
ओळख माझी रांगोळी...
पहाटवेळी सडासंमर्जन करूनी
अंगणात घातले थेंब थेंब
रेखाटली नक्षी रेषांची
आकाशातल्या चांदण्या, सागरातील शंख शिंपले
गोपद्म अन पाऊलखुणा देवीची
स्वतिक, तुळशी वृंदावन
मुक्त उधळण करीत फुलपाखरू
फुलेपांनाची,वेलांची साकारली रांगोळी.
रंगबिरंगी रंग घालून श्रुंगारली रांगोळी, जणू वाटते नवतरूनी
शुभ्र धवल ती रांगोळी निर्मल असे पाण्यासारखी,
ज्या रंगांनी रंगवावि,तीच तिची रंगछटा,
स्वागत करते,नवदिनाला
येणा-या पाहुणे मंडळीला
प्रतिक असे हे मांगल्याचे
घराअंगणाची, शोभा.
🌷🍃🐚🍀🦚🦜🌞⭐
सौ. माधुरी देवेंद्र भूते.
नागपूर
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: || अंगणातील रांगोळी ||
प्रातः काळी उठून
करावे सडा सम्मार्जन
अंगण प्रसन्न वाटे
दारी रांगोळी काढून
रांगोळी काढ़ती
रेषा,ठिपके जोडून
कधी संस्कारभारती
वेलबुटी डिझाईन
कोणत्याही शुभकार्यात
दिसे प्रथम रांगोळी
तिला पाहुन खुश होती
सर्व पाहुणे मंडळी
स्वागत करी सर्वांचे
नसे भेदभाव मनी
सर्व कौतुक करती
असे प्रसंशेची धनी
रेणुका झंझाड.भंडारा
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अंगणातील रांगोळी
निशदिन सकाळी,मंगलप्रभाती,
करुनी सडासंमार्जन दारापुढती,
शोभा वाढवी माझ्या घराची,
अंगणात साजे माझ्या
सुंदर-सुबक रंगीत रांगोळी.
मांगल्याचे प्रतिक सुंदर,
ऊँ,गोपद्म,स्वस्तिक,कमल पुष्प,
रेखाटून वृन्दावनी.
घेते वळण लकब मनोहर,
अंगणात साजे माझ्या
सुंदर-सुबक रंगीत रांगोळी.
कधी फुलांची,वेळ बुट्यांची,
कधी नक्षीदार,मोर नाचऱ्या तुऱ्याची,
हवे तसे ते रंग भरुनी,
कमान शोभे इंद्रधनुची.
अंगणात साजे माझ्या
सुंदर-सुबक रंगीत रांगोळी.
सण-उत्सव करिता साजरे,
अंतरंग होई बावरे,
स्त्रीमनाची आवड जपे,
रंग उधळीत,मन प्रफुल्लित,
नटून खुदकन गाली हसे.
अंगणात साजे माझ्या
सुंदर-सुबक रंगीत रांगोळी.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि.13.07.2020
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के .सा.सं प.
(५५)
""अंगणातील रांगोळी""
प्रात: काळी उठावे झडकरी
सडासमार्जन अंगणात रांगोळी
कधी ठिपक्यांची,मुक्तहस्ताची
यावी घरा मांगल्यं मांदियाळी.
घरी शुभकार्याच्या दिवशी
काढा छान रांगोळी रंगीत
दारा अतिथी स्वागताला उभी
वाजे मधुर शहनाई संगीत.
आडवे उभे ठिपके मांडुन
उभ्या, तिरप्या रेषा जोडुन
विविध रंगांच्या छटा टाकून
शेजारीन रांगोळी पाहे वाकुन.
मुक्तहस्त संस्कार भारतीची
अंगणात रांगोळी विस्तीर्ण काढली
विविध रंगांनी नक्षीदार रंगली
वार्ताहराने वृत पत्रात पाठवली.
सणासुदीला नित्य नवनविन
दिवाळीत रांगोळी उत्सवाला
गाव शहरातुन अतिथी येण्याला
रांगोळी रंगीत अंगणी स्वागताला.
दनाअ, नागपूर
दि.१३जुलै२०२०
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺 रांगोळी 🌺।।
थेंबे थेंबे
रेषे रेषे
जोडूनीया
होई नक्षे।।
सजवे ती
मज दारी
वृंदावन
रंगा परी।।
वळण दे
हाता वळे
चौकभर
होई गडे।।
भर रंग
तया शोभे
अंगणास
शांती लाभे।।
चौक,म्हणा,
रंगावली
मान तिचा
दिपावली।।
सौ. के.बी.सार्वे भंडारा.
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अंगणातील रांगोळी*
होता रम्य पहाट
करूनी सडासंमार्जन
समोरी तुळशीवृंदावन
काढते रांगोळी मुग्ध होऊन
सुबक, नक्षीदार
रांगोळी अंगणात
मांगल्याचे प्रतिक
दिसे सुंदर दारात
ठिपके ठिपके जोडूनी
काढली मी रांगोळी
कधी सरळ तर
कधी वाकड्या ओळी
रंगही भरले त्यात
काही फिके काही गडद
बघूनि सुंदर ते चित्र
वाटे उचलून घ्यावे अलगद
बघूनि ते रेखाटन
विचार येई माझ्या मनी
आहे आपुल्याही आयुष्यात
सुखदुःखांची रंग भरणी
*सौ स्वाती सेलोकर*
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अंगणातील रांगोळी---
चैतन्याची पहाट होता
अंगण स्वच्छ करावे
सडा शिंपडून मनातील
मळभ दूर करावे ।।
मोत्यांच्या त्या थेंबानी
काढावी रांगोळी
रांगोळीत नक्षी फुलांची
नटवावे धरा भाळी ।।
प्रतीक असे हे मांगल्याचे
दृष्टीस आभाळ प्रेम दिसावे
अंगण असे पवित्रतेचे
रंगोळीतील रंग इंद्रधनू भासावे ।।
शुभ्र रांगोळी असते
उपमा निरागस बाळाची
रंग त्यात भरुनी वाटे
शृंगारीका लावण्याची ।।
एकदा रांगोळी लाजून
म्हणाली मला
वाढलं ऊन फार
चटके बसतात मला ।।
बरसला जोरदार पाऊस
रांगोळी भिजून चिंब चिंब झाली
अंगणासवे रंगोळीही
चौफेर नाचू लागली ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।रांगोळी।।
अरे रांगोळी रांगोळी
सुगरिनीची कला
तिच्या कलेने कसा
आंगन सजला ।।
सजलेल्या अंगणात
चिमणी पाखराचा थवा
जणु खुणवती रांगोळीला
पिढ्यानु पिढयांचा हा ठेवा ।।
रांगोळी टाकली टाकली
जशी चालती बोलती बाहुली
तिला बघुन सार्यांचा
मन कसं आनंदहर्षिंती ।।
हिंदुसंस्कृतीच्या ठाई
रांगोळी मोठी मानादानाची बाई
तिला मिळे प्रथम आदराच स्थान
मग सारच कार्य पुजापाठ ।।
सौ.चंदा शेंडे नागपुर
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *रांगोळी अंगणातील*
अंगणी सड्यावर घातली
मी रेखीव रांगोळी
अनेक छटा अनेक रंग
दिसे ती वेगळी
प्रसन्न वाटे मनाला
तीज पाहून
परत परत पाहावे
तीला वाकून
खुणविते मला
सांग कशी मी दिसते
जशी अंगणी माझ्या
नटलेली नवरी बसते
प्रसन्न वाटे मनी
आनंदाच्या लहरी उठे अंगणी
नकारात्मक उर्जा जाई तीला पाहूनी
रोज पहाटे सुबक रांगोळी घालू या अंगणी
नंदा भोयर
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: "फुलपाखरू बनावे वाटते"🌹
उंच भरारी घेऊनी
गगनात फिरावे वाटते
विविध,रंगबिरंगी छटा लेवूनी
फुलपाखरू बनावे वाटते..||१||
तरुवर फिरुनी परागकण प्यावे वाटते
कधी तृणावरचे,दवबिंदू घ्यावे वाटते
फुलपाखरू बनावे वाटते ||२||
विविध फुलांचा आस्वाद घेऊनी
त्यांच्यातच मिसळुनी जावे वाटते
या तरुवरूनी,त्या तरूवर
भ्रमण करावे वाटते
फुलपाखरू बनावे वाटते
सौ.कीर्ती शेंडे..,नागपूर🙏
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: फुलपाखरू व्हावे वाटते---
मनापासूनी वाटते मज
फुलपाखरू व्हावे
इवल्याश्या पंखानी
उंच उंच उडावे ।।
बारीक डोळे करुनी लुकलूक
गोल मणी ते भासावे
विविध रंगी छटा लेऊनी
सुंदर ते किती दिसावे ।।
फिरता पान फुलांमध्ये
पराग रस प्राशन करावे
लाल ,गुलाबी ठिपके बघूनी
दव सरात खुलुनी दिसावे ।।
इवली इवली फुलपाखरे
नभात रंग बहरती
पंख चिमुकले झुलवून
निळ्या मखमली अंगावरती ।।
मुले धावती माझ्या मागे
कुणाच्याच मी हाती न लागे
क्षितिजा पलीकडले जग बघण्या
कमी असते आयुष्य धागे ।।
सुरवंटातून हलकेच निघुनी
मोहक फुलपाखरू बनावे
नयनरम्य रंगात ,ठिपक्यांच्या संगात
अल्प आयुष्य सार्थ करावे
वाटते फुलपाखरू व्हावे ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋फुलपाखरू व्हावे वाटते🦋*
वाटते मज व्हावे
सुंदर फुलपाखरू
फुलांवर उडण्याची
इच्छा कशी मी मारू
नक्षीदार वेलबुट्टी
माझ्या पंखांवर दिसे
मीच वारंवार त्यास
न्याहाळत बसे
वेलींवर कधी फुलांवर
स्वच्छंदी भ्रमण करावे
पंख पसरून फुलांवरचे
मध प्राशन करावे
पकडण्यास आले कुणी
दूर दूर उडून जावे
नाजूक नाजूक फुलांमध्ये
हळूच लपून बसावे
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *फुलपाखरू व्हावे वाटते*
विविध रंगी विविध नक्षी
लाल पीवळे ते ल्यावे
उंच भरारी वेलीवरती
झुलत मस्त रहावे
फुलांतील रसरशीत गोडवे
अलगद ते चाखावे
मी ही एक दिवस
फुलपाखरू व्हावे
दवबिंदूचे थेंब अंगावरती घ्यावे
लहान मुले पळती मागे
त्यांच्या हाती न लागावे
अन् एक दिवस मी फुलपाखरू व्हावे
भुरळ घालतो सर्वांना मी
नजर वळवूनी पहावे
अलगद ओंजळीत उचलूनी मला घ्यावे
फुलपाखरू व्हावे मी फुलपाखरू व्हावे
नंदा भोयर
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🦋फुलपाखरु व्हावे वाटे🦋
असे मनी ते दिसे सपनी
पंख फुटावे गोजिरवाणी
डुलत जावे तृणावरती
कुणी गवतफुला म्हणती
ऊन सकाळचे ते कोवडे
फुलांचा सुगंध दरवड़े
मुक्त विहार सगळीकडे
लेवुनि वस्त्र मखमलीचे
सान,थोर लावतील लळा
पाहुनी माझ्या त्या रंगकळा
हात लावण्या मुले धावती
फुलपाखरु धरू म्हणती
खेळ चालला लपाछुपीचा
या फांदीवर त्या फांदीहुनी
पवनसंगे गाणे गाऊनी
पानामध्ये बसेन दडुनी
रेणुका झंझाड.भंडारा
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। *फुलपाखरू* ।।
वाटते मज फुलपाखरु व्हावे
ईवल्याशा या पंखासोबत मुक्त संचार करावे।।
रंगबिरंगी फुलांवर बसुन
गोड गोड ते रस प्यावे...
उंच भरारी मारत कधी
वेलींवर बसावे
टपोरया या डोळ्यांनी
बाग बगिचे प्हावे ।।
लाल निळे पिवळे ठिपके
पंखावरती असावे
लहान मुले धरु पहाता
हळुच् निसटुन जावे ।।
वाटे मज दर्या खोर्या अन्
क्षितिजापलिकडेहि जावे
ईवलेशे हे आयुष्य
दंग होऊनी जगावे ।।
वाटते मज फुलपाखरु व्हावे ।।
*सौ अंजलि बांते * *भंडारा*
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🦋🌸फुलपाखरू व्हावे वाटे🌸🦋
मज फुलपाखरू वाटे व्हावे
रंगबिरंगी पंख असावे
हिरव्या हिरव्या धरणीवर
रंगीत फुलांना छळावे
ह्या फुलावरून त्या फुलावर जावे
गोड मकरंद चाखून पहावे
मन नेईल तिकडे वळावे
कुठलेही बंधन मज नसावे
कुणाच्याही हाती न यावे
सर्वांना मोहून टाकावे
दुःख सारे विसरून जावे
मनसोक्त जग निरखून बघावे
चित्रकारांनी माझे चित्र रेखाटावे
मी आपल्याच दुनियेत मस्त राहावे
एकदा तरी फुलपाखरू वाटे व्हावे
जीवनाचा मोद घेऊन पहावे
✒️सौ. रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: फुलपाखरू व्हावे वाटे
झरझर,झिरमिर,पंख पसरूनी,
बागडती फुलांवर फुलपाखरे.
मनात येई आपणही,
फुलपाखरू व्हावे.
इवले- इवले, पंख चिमुकले,
सोनेरी,लाल,आकाशी,निळे.
डोळे लूक-लूक शोधीत फिरती,
सुगंधित ताटवे फुलांचे.
रंगीत-गंधित, फुला-फुलांवरून
पराग तयाचा प्राशन करुनी,
पानोपानी,हरित तृणावर,
झोके घेत झुलावे.
छंद तयाचा जनास लागे,
रूप तयाचे मनात साठे,
पकडू जाता जाते उडून,
मुले नाचती आनंदून.
विसरून सारे पाश आपुले,
हवे सुंदर ते घ्यावे,
स्वच्छंदी,मनमुराद जगणे,
फुलपाखरासम आपणही वेचावे.
मनात येई आपणही,
फुलपाखरू व्हावे. .............
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि.14.07.2020
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के हा.सं.प. (५६)
"" फुलपाखरू व्हावे वाटते""
ग्रिष्म संपता ऋतू वर्षा लागते
पाऊस सरीनी धरती चिंबते
जिकडे तिकडे हिरवळ दाटते
मला फुलपाखरू व्हाव वाटते
फुलपाखरं हिरवळीवर मुक्त विहरे
बागबगीच्यात फुलाफुलांवर सुंदर
रंगीबेरंगी मित्रांसंगे उडत राहणे
जणू स्वर्गातुनअप्सरांचे अवतरणे.
मृदुल तनु किती फुलपाखरांची
बघत राहावे विविध रंगछटांची
क्षणात बसणे क्षणात उडणे
खेळांत रंगुन जाणे फुलपाखरांचु
फुलपाखरांसम मम पंख फुटावा
मुक्त मनाने विहार करावा
विविध फुलांचा सुगंध घ्यावा
मना वाटते निष्पाप 🦋 व्हावा.
दनाअ, नागपूर
दि.१४जुलै२०२०
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: फुलपाखरू व्हावे वाटते
रंगीबेरंगी पंख पसरूनी उडते
छान किती दिसते,फुलपाखरू व्हावे वाटते,,
एकदा तुझी नजर माझ्या नजरेकडे वळाली,
अन माझ्या डोळ्यांची भाषा तुझ्या डोळ्यांना कळाली,,
दिसायला दिसतात तुझे कोवळे डोळे,
पण त्या डोळ्यांनी केले माझे मन वेडे,,
रंगीबेरंगी फुलांवर फुलपाखरू बसले,
तुझाच स्पर्श होवून फ़ुले हसले,,
दुर दूर उडून जाऊन बसते,
क्षणात हसूनि क्षणात रुसुनी
मधाचा गोडवा टिपून जाते,,
रंगीबेरंगी पंख पसरूनि उडते
छान किती दिसते,फुलपाखरू व्हावे वाटते,,
सौ श्वेता कानतोडे
अमरावती
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏
मन माझे जणू फुलपाखरू
रंग रंगानी सजलेला प्राणपाखरू
विविध रंगानी नटलेली
माझी छटा
बघताक्षणी जीव होतो वेडापिसा
उंच आकाशी घेऊन झेप
फुलावरी होते माझी खेप
फुलातील पराग कण अति
मला भावी भुंगा ही त्यात
साथ मला साथ देई
अशा माझ्या रुपाला लहान संगे मोठे करी प्रेम
मी आहे कमी वेळात दिसणारा सुरेख जीव
नका करू माझी कीव 🙏
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺फुलपाखरु व्हावे वाटते🌺
फुलपाखरु होऊनी,
ऊंच ऊडावे गगणी।
भुंग्यासवे करु मजा,
फुलासवे गाऊ गाणी।।
विविध रंगी करु वेश,
ऐटित दाऊ आम्ही शान।
पळापळीची पैज लावू,
फुलांचे गाऊ गुणगाण।।
हात लावता मला कुणी,
मजाच घेईन मी त्याची।
खेळीन मी लपाछपी,
चोरुन पाहीण मजाच याची।।
सौ.के. बी. सार्वे भंडारा.
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: फुलपाखरू
रंगबिरंगी विविध ठिपक्यांची
नक्षी असते पंखावरती
छान किती दिसते फुलपाखरू...
मारून उड्या तृणातृणावर
मुक्त विहार करी आकाशी
छान किती दिसते फुलपाखरू...
फुलांफुलातुन रस प्यावे
वेलीवर झोके घ्यावे
छान किती दिसते फुलपाखरू...
आकषिर्त करते लहान मुलांना
हिरव्या हिरव्या रानोमाळी
छान किती दिसते फुलपाखरू...
स्वैर भरारी घेऊन गगनी
मनी वाटे फुलपाखरू व्हावे
छान किती दिसते फुलपाखरू....🦋🦋🦋....
माधुरी भूते
[7/18, 7:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गजल..
माणसे आहे बरे की पाखरे..
पाहतो मी बंद दाराची घरे..
आरसे होते मुखवट्यावर फिदा
चेह-यामागे..बदलते चेहरे..
कोणत्या नात्यास मानू आपले
हे खरे की, ते खरे की,ते खरे..
मी भरवसा का करू श्वासांवरी
काळजाला दे मुलायम हादरे..
काल प्रश्नांनी उठवला गलबला
अन् अचानक मौन झाली उत्तरे..
मारतो मी लाथ पाणी काढतो
मग उगा झिजवू कशाला उंबरे..
- गजानन मते
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माहेर
मुंढरी माझे माहेर
वैनगंगेच्या काठावर
शिक्षणाचं माहेरघर
नयनरम्य परिसर.
सदाचार, शिस्त
बाबांची विरासत
आईच्या प्रेमळपणाने
माधुर्य जीवनात.
सासर
माझं सासर तुमसर
तांदळाच्या पेठेचं शहर.
सासू सासऱ्यांनी दिलं
प्रेम, जिव्हाळा सारं.
कोसळो संकट,कर्तव्य कठीण,
मनानं निर्मळ राहीण मी.
दिली शिकवण सासूबाईंनी.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माहेर-
* माहेर माझे कामठी *
* रोजगाराचे शहर *
* करी सर्वांचे स्वागत *
* नाही कशाचा कहर *
सासर-
* सासर माझे बेला *
*बेलदारांचा बेला *
* स्थापत्यकलेचे शिल्पकार *
* मस्त धूंद अलबेला *
सौ. के.बी. सार्वे भंडारा.
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *माहेर*
माझे माहेर साक्षात गोकुळ
तिथे नांदती सगळे एकत्र
नाती समजण्यास कठिण
जेव्हा येती घरात मित्र
*सासर*
माझे सासर मायेचं पाखर
एकमेकांस विचारती मायेने
आदर करती एकमेकांचा
राहती सगळे गुण्यागोविंदाने
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माहेर
माहेरला मिळते मला
आई बाबा ची माया,
आपुलकीच्या अंगणात खेळून
मिळते सुखाची प्रेमळ छाया,,
पाणावलेल्या डोळ्यांमध्ये
आई बाबा सुखाचे क्षन आठवते,
दूर राहून जवळ असणे
ते माहेरचं भासवते,,
सासर
सुख दुःखाच्या वाटेवर सांभाळ करणारे माझे सासर,
आयुष्याच्या वळणावर मे घेते
प्रेमाने सौभाग्याचा आहेर,,
सासू सासरे मोठ्यांच्या समोर
मानाने करा लागते आदर,
जुनी परंपरा चालवून
डोक्यावर घ्यावा लागते पदर,
माहेर सासर
माहेरच्या अंगणात मिळाले
संस्कार आणि शिक्षणाचे धडे,
सासरच्या अंगणात राहून आई बाबाची शिकवण उपयोगी पडे,,
सौ श्वेता कानतोडे
अमरावती
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सासर -माहेर.....
भोयर ची मी लेकं
माहेर माझं बिडीपेठ
आई , बाबा भाऊ वहिनी
गुण्या गोविंदाने नांदतात
देतात मला प्रेमाची छत्रछाया.
भुते ची मी सुन
सासर माझं रेशीमबाग.
संसार सुखाचा करतात
पाच भावाचा गोतावळा
जणू भरलं गोकुळ.
सौ .माधुरी देवेंद्र भूते.
नागपूर.
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माहेर-
कशाला करू बाई माहेरी
जाण्याची ग घाई *
न उरला विठोबा न उरली
विठाई *
प्रेमळ असे माझा बंधुराया *
मायाळू ग भावजई *
सासर
माझं सासर सासर जसा सुखाचा सागर *
सासू सासऱ्याची प्रेमळ छत्र छाया *
धाकला दीर करी बन्धु वाणी माया *
माझ्या कुंकवाचा टिळा
धनी माझा सांब भोळा *
****
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझं माहेर---
कौतुकाच माझं माहेर
प्रेम, वात्सल्याचे वाहते पाट
गुण्या गोविंद्याने नांदतात
वहिनी, भाच्यांचा वेगळा थाट ।।
माझं सासर---
सासर माझं मानाचं
परस्परांच्या सुखात सुख मानणारे
प्रेम, शांती,समाधान, आदर
काळजात ठेऊन वागणारे ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *माहेर*
माहेर माझं वात्सल्याची खान
दादा वहिनी खुप छान
भाचे माझे खट्याळ खुप
एक मिनिट बसत नाही चुप
*सासर*
सासर माझं लय भारी
दरवर्षी करतात पंढरीची वारी
पुजा पाठाला देतात मान
घरात वाटे प्रसन्न छान
नंदा भोयर अमरावती
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माहेर
माहेरची काय सांगू आठवण
मयमाऊली माझी,खूप सुगरण
आई,बाबा माझे प्रेमळ,वात्सल्यमूर्ती,
आता राहिली माझ्यासाठी,केवळ स्वप्नपूर्ती,
भावाची तर गंमत न्यारी
आवडे त्याला सदा मस्करी,
जिवाभावाची ही माझी माणसे,
नाही दिसणार कधीच ही पाखरे,
माहेर माझे संपुष्टात आले,
मीच एवढी अभागी राहिले.
सासर
सासरच्या गोकुळात रममाण झाले,
सासर हेच आता माहेर माझे,
जावा,नंदा,दिर,प्रेमळ माझे,
लावतात जीव एकमेकांना सारे,
दूर,असूनही जवळ सारे
प्रेमाने राहून नांदा सौख्य भरे
सौ.कीर्ती शेंडे...
नागपूर
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळ्या
माहेर
माझे माहेर,नागपूर.
सौख्याचा वाहे,सदैव पूर.
आठवणी असे,अमृताचा ठेवा.
माझ्या जीवलगांना,सुखी ठेव देवा.
सासर
माझे सासर सासर.
सुख दिले मज फार.
प्रेम,जिव्हाळा,आपुलकीचा
मज गवसला भांडार.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि.15.07.2020
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझं सासर...
सासर माझं झाडीपट्टी
भाताच्या असतात राशी
संयुक्त कुटुंबाची मजा
मैफिली रंगतात रात्री
माझं माहेर...
माहेर माझं वऱ्हाड
कापसाचे माहेर घर
भाऊ बहीण आई बाबा
शिक्षणाचे वेड फार
सौ. रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।माहेर।।
अंकुरला बीज जीच्या गर्भातुन...
ख़त पाणी घरच्या संस्कारातुन..
रोपटयाला आकार मुळाच्या सौंदर्यातुन..
आणि आजीआजोबांच्या प्रेमातुन...हा माहेर
।।सासर।।
कन्यारुपी वृक्षाला जणु दानेतुन..
लाभले संसार नवीन नात्यातुन..
जीवनसाथीदार यांच्या सहवासातुन...
स्त्रीजातीचा जन्म जणू धरतीमातेच्या वृक्षरोपणातून...हा सासर
सौ.चंदा शेंडे
नागपुर.
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: || माहेर ||
माहेर माझं खुर्द सालई
एकत्र कुटुंबाची नवलाई
सर्व काका,बाबा मिळून राही
संस्कार करीत होती आजीबाई
|| सासर ||
सासर माझं गोपीवाडा
तिथे कशाचा ना तुटवडा
नंदा,दीर सर्व मंडळी
आंबे खायची मांदीयाळी
रेणुका झंझाड,भंडारा
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सासर माहेर
माहेरी पुरवितो तो हट्ट
प्रेमानं अस्त एकमेकांना जपनार
जवळ असो किवा लांब
नेहमी आठवणी राहते ते माहेर...
सासरी पूर्ण व्ह्यावा त्या इच्छा
जिथे नेहमी प्रेम असाव
कोणत्याच नात्यात गैरसमज नसाव
खदखडणारा झरा फक्तं सुखाचा
असच हवं प्रतेक मुलीला ते सासर...
🙏🏻. सौ.भूमिका राजेश बोंद्रे
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ===माहेर====
माझे माहेर पंढरी
आत विठ्ठल रूकमाई
ठेवियला चरणी माथा
तिथे दिसे विठ्ठल सावळा.....
==== सासर ====
माझे सासर द्वारका
मायबाप वृदांवन
साथ कृष्ण सख्याची
सासरी नादते गोकुळ...
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर..........
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शिदोरी
घेऊन सासरी जा, ...माहेरची शिदोरी
सांभाळ आसवांना,आता जपून पोरी
भेटावयास ये तू, पण पाहुनी बनूनी
हा जन्म गे मुलीचा,असते मुली चकोरी
पत्नी क्षणा करीता,माता अनंत काळी
शोभे तुझ्याच हाती,ही पाळण्यास दोरी
संसार लाभला आहे तुला सुखाचा
हा खेळ येथला, असतो खरा बिलोरी
तू नाव काढ गे अभिमान वाटणारे
विसरून जा अता तू माहेरची लगोरी
ओमप्रकाश ढोरे
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
उपक्रम.. चारोळी
"" माहेर""
प्रेम जिव्हाळ्याचे माहेर "वेलतुर"
वडिलांच्या शब्दां मान समाजात
सर्वधर्मसमभाव साथ सुखदुःखात
जननांदती गुणगोविंदाने आनंदात
"" सासर""
सासर माझं "गणेशपेठ, नागपूर". आग्यारामदेवी यात्रा भक्तां महापूर
रमणविज्ञान ,गुरूदेव ,गांधीसागर
मंडळी सासरच्या आदरातिथ्यांपूर
दनाअ, नागपूर
दि.१५जुलै२०२०
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
बम्बइलं गेलो येक डाव
दोस्तासंग फायुश्टार हाटलात
चक्करच आला मलं
पाउन तो झगमगाट
पांढर्या पांढर्या बाया
अन् सुटाबुटातले मानसं
चमकत होते सारे
जशे वावरातले कनसं
समजंच ना कोटं बसू
कुडचीवर का सोप्यावर
वर वर पायत गेलो
अन् बसलो येकाच्या मांडीवर
दोस्तानं मनलं स्वारी अन्
घेऊन गेला येका कुडचीवर
येटरलं मनलं शेवड्या आन
त्यानं आनले गेंडरं वाटिभर
हेकडा वाकडा तोंड करून
शेवड्या बुकावं मनला
शेवड्या रायल्या कडालं
काटाचम्मच तोंडात घुसला
तवापासून हाटलाचा इचारच सोडला
सयरातला झगमगाट मनातून काडला
गावच आपला बरा हाय भाऊ
गावातच राऊन चटनी भाकर खाऊ
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता--
गावचा रोवना
धोधो पाऊस आला
गावात रोवना सुरू झाला
आम्ही गेलो गावाला
रोवना पाहायला ।।
जाऊ बाई म्हणे
चाल बाई शेतामंदी
घरी राहून का करते
पायजो रोवतांना बांधी ।।
गेलो बाई उतरलो
बांधीत कराले रोवना
टोंगला टोंगला चिखल
माई सटरलीच मना ।।
मोठे किडे, अन गांडूळ
चढू लागले पायावर
खूपच भीती वाटली
चढलो मी धुर्यावर ।।
राहुद्या मनल रोवना
मी करत नाही काही
घरी जातो मी
अंगाला चिखलच लागला बाई।।
सगळ्या मले पावून
खो खो लागल्या हसाले
हा का शहर हो का
आयता खावाले ।।
मी नाही येवाची
पुन्हा चिखलात मराले
धान्य विकतच घेऊ
सांगीन मी नवऱ्याले ।।
लोकायसमोर माही
अशी फजिती झाली
डोळ्यासमोर आताही
हास्य जत्राच दिसून रायली ।।
----------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय - हास्य कविता*
पायटी सडा टाकता टाकता भल्ली मोटी गाडी आली
दाट्ट्यातून वाकून पायता पायता जवळच थांबली
लय मोट्ट समान घेऊन बाल्या उतरला गाडीतून
बायको लेकरं सारेच्या सारेच आले शहरातून
मिन माह्या बॉ ले जोरात आवाज दिला
पोट्ट माह्य कुचिन धावतच बाहिर आला
गाडी कड पाहता पाहता त्याच्या टोंगयाले लागलं
भोकना आहे का म्हणून मीनच त्याले दपटलं
पारावर मंजन घेऊन बसले होते लोकं
कायची गाडी व्हय म्हणून घातलं मधातच डोकं
मीनच तिले विचारलं गावाकडं कशी काय आली
शहरात जातानी त लय तवरत गेली
थे म्हणे पिंट्याची मा काय सांगू तुले
कारोना महामारीन घाईस आणलं मले
काम नाही धंदा नाही कशी राहू तिथं
तुमी लोक सांबाळून घ्यालं म्हणून आली इथं
तीले पाहून मले कश्यान कसचं वाटे
सगळ्याजणी पदरानं आपले डोये पुशे
समजदारी दाखवत साऱ्यांनी ठेवलं त्यातले वेगळं
खा प्या च समान मग दुरूनच पुरवलं
आमच्या गावाचं बाई मन हाये लय मोठं
सारेच एकत्र लढतो कितीही संकट असल मोठं
*सौ. रूपाली अमोल बोंद्रे*
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझ्या दोस्ताच लगीन
माह्या दोस्ताचं लगीन
दादा मह्या दोस्ताचं लगीन
तेति खाल्लो मी दहा लाडु
पोट लागे माजा गुडू गुडू !
गेलो धावत दादा मंगा
तेति बी होत्या रांगांच्या रांगा
धावत मंग घराले आलो
सिदाच दादा परालो !
घरा मंगा पटाची दान परसाखाल्या बसलो गुमान
बिन पाण्याने दादा भागला
परसाच्या पानांन सारा निभला !
माजा जीव लागला मोठा बाका
घरी आलो त हसावा लागली
ताई, माई, आक्का
मंते बंडयारे गेला होतास कोणत्या कामा काहून भरला कोरा पैजामा !
मी गेलो मंग सरमुन
माह्या दोस्ताचं दादा लगीन !!
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
माझ्या बायकोचा बाप
म्हणजे माया सासरा
त्याचा पैसा अन् पोरी
याचाच मले आसरा
त्याची पोरगी होती कालाजामुन
पैशासाठी च घेतली गोड मानून
एकदा मीन तीले गाताना पायल
अन् तिथंच माय घोड मारलं
अप्पा,जप्पा,टप्पा शिवाय
तिले काहीच येत नव्हतं
जिले गाताना पायल व्हत
सासू होती ते मायी
कशी रे देवा तून माई
अशी फसगत केली
जाऊ तरी कुठं देवा
तून माई वाचाच बंद केली
सौ.कीर्ती शेंडे..,नागपूर
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
पहिल्यादाच मी बाई कालेजात गेली
कालेजातला ताल पावून
मले चक्करच आली
झिपर्या झापर्या पोरी बाई
कपडे त्याईचे अलग
पोराइच्या खांद्यावर हात
ठेवून रस्त्यावर चालत
माया साठी हे सारं
नविनच व्हत
काॅलेजमंदी असंही असते
हे माहीतच नोत
सर ये ये क्लासमंदी
विद्यार्थीच नसतं
काॅलेजच्या आवारात
पोर घोयक्या घोयक्यान बसत
हे सारं पाहून मी दगंच झाली
म्या म्हणल आपली गावचीच शाळा भली
नंदा भोयर
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
माया घरा समोर एक पोरगा राहे
माया वर लाईनच मारे
डोळ्याने हेकना
तोंडाने वाकडा
पायाने लंगडा
होता शेंबड्या
तो म्हणे मले
माया रुपाने तुले भुरळच पडे.
मी म्हणे त्याले
छंद काय तुले!!
जुआ खेळतो
दारु पितो
गाव भर मग टपोरी करतो.
आणखी काय पाहिजे!!
मी म्हणे त्याले
शिक्षण काय घेतलं!!
शाळेत जातो
उनाडक्या करतो
पेपरात मी कापीच करतो
वरचेवर नापास होतो
आणखी काय पाहिजे तूले!!
मी म्हणे त्याले
हे तुयं रुप मले पचनी पडेना!!
माधुरी भूते.
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता...
काल जरा विपरीतच घडले
दोन वेण्या घालून मले शाळेत जावे वाटे..
साडी ऐवजी स्करट बलाऊज घातला
दप्तराचा बोजा खांदयावर घेतला.......
लाजत मुरडत शाळेत पोहचली.
दारातच उभी माही मास्तरीन होती......
नमस्कार करून बेंचावर बसली
मास्तरीनची छडी रपपकन बसली......
भितीने थरथरत हात चोळत उठली
मास्तरीन म्हणे, गृहपाठाची दाखव वही.....
शोध शोध शोध ली काही केल्या सापडेना
मास्तरीन म्हणे वर्गाबाहेर उभे रहा.........
बाहेर होते उभे गणिताचे मास्तर
त्या यच्या समोर गेली आपली ईज्जत....
ईचार केला नको शाळाबिळा
आपल्या साठी आपला शेतमळा बरा......
कलेक्टर होण्याचे सपन गेल विरून
मास्तरीनो ,छडीचा वापर करा जपुन.......
बरे झाले सारी हौस सपनात पुरी केली
शाळेच्या नादात मी आपले वय असती .
विसरली......
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
. ग्रामीण जीवन
साधी भोळी माणसं
साध सुध जीवन
मनानं निर्मळ नितळ
असती ग्रामीण.
अंधाराचं हरीदास
लोटा घेऊन गेला.
पडक्या वाड्या मागं
. जाऊन बसला.
ऐकलं होतं. असतं
भूताचं वावरं
बसलेल्या जागी इकडं
तिकडं नजर फिरं
पांढरें पांढरे हाले काहीतरी
. पाणी फेकून तसाचं
. . धूम ठोकली घरी.
घामाघूम झाला,बसली दातखिळी
बायको म्हणे, कायले जाता
. . भलत्याचं वेळी.
सकाळी बायको,शेण
फेकायला गेली.
दिसली तिला पांढरी फाटकी
. साडी लटकली.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
माह्या बापासंग गेली
मी शयरात शिकाले
माह्या कडं पाहून
पोट्टया लागल्या हासाले
माह्या वाकड्या येन्या
त्यायले रिबना लावल्या
एक दिवस त मास्तरीन न
येन्याच हालवल्या
मले आला राग
येन्या टाकल्या कापून
अर्धे केस लंबे त
अर्धे झाले आखूड
रेणुका झंझाड.भंडारा
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
गणपतीचे दिवसात नवदांपत्य नागपूरात फिरायला आलं
बायको म्हणे त्याले
गणपतीला एकच दात हाय
नवरा म्हणे हळू बोल बाय
गणपतीला एकच दात राहतं
म्हणुनच त्याले एकदंत म्हणते....
फिरता फिरता बर्डी वर आले
बायको म्हणे त्याले
केवढा मोठा लिंबू!!
नवरा म्हणे हळू बोल बाय
अव तो लिंबू नव्हे
नागपूरचा संत्रा होय
आपण काही तरी खावू
नवरा म्हणे बायकोले
आपण "गुपचूप" खावू!!
बायको म्हणे त्याले
आपण गुपचूप काऊन खावू
आपण सर्वा समोर खावू!!
सौ. माधुरी देवेंद्र भूते.
😂😂😂👩❤️👩😂😂😂
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
*गुजरातमधील सत्य घटनेवर आधारित
मुलाचं लग्न करायचं म्हणून,
गेले मुलगी बघायला.
मुलीची आई बघून,
मुलाचा बाप अवाकच झाला.
मुलीची आई निघाली,
त्यांची जुनी प्रेयसी.
मग काय,जुने दिवस,
लगेच आले त्यांच्या स्मरणी.
प्रेमाच्या आणाभाका,चिठ्ठ्या चपाट्या,
सगळे डोळ्यापुढे तरळले.
मुलाचं सोडून त्यांचे,
आईवडिलच प्रेमात पडले.
मोबाईलवरून यांचं,
बोलण झाल सुरू.
मुलगा,मुलगी राहिले दूर,
हेच लागले फिरू.
एक दिवस तोडून सारे बंधन,
पळून जाऊन यांनी केले गठबंधन.
मुलगा,मुलगी आता लागले रडु,
नवराबायको होता होता म्हणे,
झालो ना रे बहीण भाऊ.
असा हा प्रेमरोग,
असे हे आंधळे प्रेम.
प्रेमात आंधळ झाल्यावर दिसत काही नसते,
वय झालं म्हणून काय प्रेमाची आग विझते!
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि.16.07.2020
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।।।।गचाटी।।।।।
लहानपणची गंमत बाई सांगु काव तुले
माय घरी चार बहीनी एक भाऊ मले..
बाप जाय सकाळी बजावयास ड्युटी
माय जाय आम्हची शेतीवर नुसती..
मग आम्हची लय मजा रायची
गावातील सारे लेकर आमच्याच घरी यायची..
घर राही आमच, मग कुस्तीच मैदान
त्यात उतरे दोन दोन कुस्तीचे पेहलवान..
आता बाई माय अन लाईनीचा डाव आला
कुस्ती लढा जोरात मंग मिळन नाना..
असं माय भाऊ सारख आम्हले सांगत होता
ते ऐकुन दोघीले मोठा जोर येत होता..
रंगली लई कुस्ती टाळ्यांच्या गजरात
मी पाय पाय केल ढकलुन दिल कोपरात ..
कोपरात होता लोखंडाचा घमीला मोठा
आदळली लहान फुटला तिचा डोका..
कुस्ती जितली मी पन जीव होता धोकात
नाणा पाहिजे म्हणुन रडत होती ढोरात..
भाऊ म्हणे..
एक नाणा जितली बदल्यात घे दोन नाणे
पण दुकानातुन गचाटी घेऊन ये पहिले..
झाली मी लय खुश धावत गेली दुकानात
दुकानदार म्हणे ...
काय पाहीजे तूले बोल लवकर माय..
मी म्हणल ..मले दोन गचाटी दे....
दूकानदार मायाकड आश्चर्यान पाही
जा पोटे घरी मिळत नाही गचाटी इथी..
गचाटीसाठी दहा दूकान फिरली
बयाडावाणी थकुन परतली घरी...
भाऊन माया तो अवतार पाहीला
घेतला नाणा फटाफट गचाटया दिल्या....
सौ.चंदा शेंडे
नागपुर
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 😂 *हास्य चाराेळ्या* 😂
एेक नाही दाेन नाही झाल्या चार बायका
नेमकं कुणाचं एेकु, आता फजीती एेका 😜😂
गाेरी झाली बायकाे, फेअर लव्हली लावुन
जेव्हा गेली ते उन्हात तिले भिऊन गेलाे पाहुन 😜😂
हे, ते, खाऊन खाऊन झाली बायकाे लठ्ठ
मरताे कि काय ? जेव्हा पकडते मिठीत घट्ट 😜😂
नवरा माझा फार गुणाचा, बडबड करताे फार
सगळच घेऊन देताे म्हणुन, देताे पिशव्यांचा भार 😜😂
खिशातुन काढते पैसे, म्हणुन मी लपवुन ठेवताे,
Shopping साठी पैसे नाही म्हणुन फाटली नाेट दाखवताे 😜
अतरंगी पदार्थ बनवले,बायकाेनं लाँकडाऊन मधी,
सांगते अमेरीकन डिश, करते इकडं कळी-भजी 😜
प्रिया र गाेमाशे
आकाशवाणी निवेदीका चंद्रपूर.
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
कोरोनाच्या पायी
हाल झाले खराब
नवरा माया घरात बसून
पीवुन रायला शराब
म्या म्हणल कावून
पेत रायता दिवसभर
काय करू मंग
बसून बसून आता
मले झालं बोर
म्या म्हणल बापा
कामाचे अन् धामाचे
घरातल्या पोट्याईले
पाहत नाही जराशे
पोट्याईच्या कल्याण
डोकस माह्य उठल
फुटल माह्य नशीब
मले हे दारूड्याच भेटल
किती साजरे मले
येत होते पाहाले
त्याईले देल स़ोडून
याईंच्या घरी आली मराले
😁नंदा भोयर
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺 शाळा 🌺 ।।
शाळेचा पहीला
दिवस भारी
दप्तर हरवून
आली घरी।।
शाळेत जाण्याची,
घाई मोठी
शाळा झाडायची
सवय पाठी।।
पटले बाईचा,
मोठा मार
तिचा अभ्यास
पहीलंपार।।
अक्षर सुंदर,
कौतुक फार
चुक होता
मिळे मार।।
रविवार दिवस,
पाटी घासण्याचा
कोळसे पाहुन
हळूच खाण्याचा।।
मुलींची शाळा,
नावलौकिक मोठा
मार खाण्याचा
नाही तोटा।।
सौ.के.बी. सार्वे भंडारा.
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: .बि.के.सा.सं.प.
"" हास्यकविता""
लाकडाउमुळं काम झाले बंद
गड्या शहरातुन गेलो गावाकडं
होळीची धुडवळ सण झालं बरं
पोटाचा पैसा मित्रा जुव्वादारूकडं
होळीच्यासणां गेलो सासुरवाडीला
साळ्यानंभांग घोटलीगेली गळ्यात
नशेतभांगेच्या दिसे बायको रंगात
गडबडीतमित्रा सासुआली हातात
शपथसांगतो भांगेपेक्षादारूच बरी
देशीघ्या विदेशी तांगडत नेते घरी
दारी आवाज करावं बायको भिते
मुकुट मनानं पाहिजेल ते मिळते
नव्या नवतिलं मित्रचं लयभारी
बेंगती आल्यावर तोंड पाहे न्यारी
बायको म्हणे राव वेळ नाही बरी
पैश्याविणं भागतनाही करा तयारी
बायकोपोरांसह बसथांब्यातआलो
गर्दीपाहुन बाप रे घामाघुम झालो. पडली चप्पल उचलण्यास वाकलो
खिसाकापल्यामुळं पैशानं धाकलो
.
दनाअ, नागपूर
दि.१६/०७/२०२०
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा""(०१)
गणाधिश आहे मम लेखनीचा
वक्रतुंडासम फिरत्या विषयाचा
काव्य निर्मिती एकात अनेका
विविधांगी संवर्धनआहे ब.के.चा
दनाअ, नागपूर
दि.१६/०७/२०२०
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कल्लोळ
😀😆😂🤣
विनोदी कविता
दारुड्या निघाला गुत्यावर
गालावर मारताच मी मला
तिने हंबरडा फोडला..
नका करू हो त्रागा
नाही रागावणार आता..
मी झालो एकदम थक्क
मारला होता मच्छर फक्त
तुझ्या मुळे डोक्यात राग गेला
बिच्चारा तो असा उगाच 'मेला'
'मेला' ऐकताच टाहो दुरून
शेजा-यानी प्रश्न केला वरून
बरा होता हो,गेला असा कसा
ऐकुन दुस-यानी घेतला वसा
व्हाट्सप,मोबाईल, इंटरनेटने
पसरली बातमी वा-या वर..
तोंडी,मनी,ध्यानी सगळ्यांच्या
दिसली हळहळ चेह-यावर
तिरडी लवकर पाठवा
बिच्चारा गेला जीवा..
बघून तिरडी तयांच्या दारी
आकांतकांची रांग सारी
मुर्दा लेटावया तिरडीवर
शोधाशोध झाली ओसरीभर
आंघोळीस नेला असावा
करून कयास, घेतला विसावा
कराया दु:ख जनांचे कमी
मदीरेने भरला रंग नामी
रिकाम्या करून बाटलीवर बाटली
डोळ्यात आता चांगली दाटली
बघुनी एवढा गलका
धावला आप्तांचा घोळका
नवरा बायकोचा उडाला भडका
कोण मेला अवेळी परका?..
रडारडीच्या कल्लोळात बसून
लागला डोळा दारूड्याचा चुकून
मुर्दा समजून तिरडीवर निजवून
रामनाम सत्य निघाला बडवून
शांत झुलत गाढ झोपत
निघाला जिवंतमुर्दा लोकांसोबत
निजवता तयास गवतावर
चटका बसता लाकडावर
उघडून डोळे लोकांवर
मारून पाणी तोंडावर
भूतभूत् मारत बोंबा मरणावर
मुर्दा उठून बसला सरणावर
पाहताच तो प्रकार सारा
दु:खक-यांचा उतरला पारा
गटांगळ्या खाऊन उठून बसला
सैरावैरा जो तो पळाला
भूताटकीतून वाचलो बाप्पा
धूम पळाले आजोबा,आप्पा
जनता वळली रस्त्यावर
दारूड्या निघाला गुत्यावर
विनोद तीरमारे
९४२२९१५७८६
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गजल...
कोणतेही काम नाही..
पण तरी आराम नाही..
फक्त टोले घेत जातो
पावसाला घाम नाही..
भंगलेले खानदानी
खास नाही आम नाही..
हे करा किंवा करा ते
तो जराही ठाम नाही..
लाॅकडाउन हाय मित्रा
भेट तू पण 'जाम' नाही..
भेटलेकी चुगलखोरी
काम नाही धाम नाही..
ती सदा कुरकुरत असते
रातच्याला 'बाम' नाही..
तू कशाला बरळतो रे
काम नाही, दाम नाही..
- गजानन मते
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रुती संजय डहाके, भंडारा
12 वी ला 92 टक्के मिळाले
श्रुती खूप खूप अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा🌹🌹👍
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अविस्मरणीय क्षण
आई झाले तो क्षण कधीच विसरणार नाही,तसेच माझी दोन्ही मुले १०,१२ वीला मेरिट आलीत ते क्षण पण विसरणार नाही कधी,हे झाले आनंदाचे क्षण.
आई माझ्या कडेच राहत होती तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिची सेवा केली,ज्या दिवशी ती गेली तो दिवस होता गौरीपुजनाचा म्हणजेच काजळती..तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय राहील🙏🙏
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आयुष्यातील अविस्मरणिय क्षण
1989 ला शैक्षणिक सहल घेवून गेले.रात्री 1-00 वाजता रेल्वेच्या लेडीज ड़ब्यात एक मुलगी दिसली नाही.शिक्षक दुसरीकडे.मोबाईल ची सोय नाही.तेव्हा बडनेरा स्टेशनवर सुरवाति पासून शेवट पर्यंत डब्यावर थाप मारीत धावले.परत धावतानी एकाने दुरुन हात हालविला.गाडीची सिट्टी वाजली कशिबशी जावुन डब्यात घुसली व मुलगी मिळाली.हा अविस्मरणीय क्षण
रेणुका झंझाड.भंडारा
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग--
माझा मुलगा पराग जेंव्हा
एम.बी.बी.एस.नंतर डी.एन.बी.तसेच एम.आर.सि.पी.सि. एच. ह्या परीक्षांमध्ये भारतातून पहिला आला, त्यानंतर कुपोषित बालकांवर जागतिक संमेलन लंडनमध्ये झाले त्यात संपूर्ण भारताचे नेतृत्व पराग नी केले,
ते क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय
आणि मोलाचे होते.
दुःखाची बाब ही की आज तो नाही😢😢
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अविस्मरणीय
1999 ला आम्ही अष्ट्मीला बम्लेश्वरी गेलो होतो गर्दी खूप होती माझी मुलगी हरविली होती आम्ही उडानकुटूला ची तिकीट घेण्यासाठी गेलो होतो अचानक गर्दी झाल्यामुळे आम्ही तिला दिसलो नाही ती चार वर्ष ची होती ती रडत रडत पुढे निघून गेली आम्ही खूप शोधत होतो ती दिसत तिला कोणीतरी चैकशी केंदात तिला नेऊन ठेवले होते आम्ही खूप शोध हेत होतो अचानक अलाऊड तिचे नाव झाले, तेव्हा आम्हाला खूप खुशी झाली ती आमच्या जीवना तील अविस्मणीय क्षण
Shobha khokale
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *विषय - अविस्मरणीय क्षण*
२७ जुलै २०१४, माझा बाळाचा जन्म. कसा विसरेल मी हा दिवस. इवलेशे हातपाय आणि त्याच ते रडणं. आई म्हणायला कुणीतरी याच दिवशी माझ्या जीवनात आले आणि माझे जीवनच बदलून गेले. प्रत्येक गोष्टी मध्ये माझ्या आधी मी त्याचा विचार करू लागले. आनंदाचा अविस्मरणीय क्षण....
सौ.रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण
सकाळ पासुन ते संध्याकाळ पर्यंत न थकता जाे मनमुरादपणे आनंद देताे, छान-छान गाणी एेकवताे ताे म्हणजे, माझा आवडता रेडिआे.
कुतुहल वाटायचं कि, रेडिआे वर बाेलणार्या लाेकांचं बाेलणं रेकॉर्डेड असतं का ? मग वडिलांनी सांगितलं नाही, प्रत्यक्षात Live प्रसारण करत असतात ते निवेदक. मग भरपुर प्रश्न निर्माण झाले, ते रेडिआे वर बाेलतांना चुकत का नाहीत ? कधी शिंका किंवा खाेकला आला तर कसं करतात ? मी माेठ्या कुतुहलाने माहीती काढली. मी पदव्युत्तर चं शिक्षण घेत असतांना चंद्रपूर आकाशवाणी मध्ये जागा निघाल्या. पण मला चंद्रपूर जिल्ह्यात नेमकी आकाशवाणी कुठे आहे ? हेच माहीत नव्हतं, मग काय? माझ्या साेबत पहिल्यांदा आई बाबा आले आणी आयुष्यात पहिल्यांदाच आकाशवाणीचं दर्शन घडलं. तेथील माहीती काढुन रितसर सगळ्या अटी पुर्ण केल्या, पेपर आकाशवाणीतच झाला, तिथे गेले तेव्हा तिथली रचना बघुन भितीच वाटली काही कळेना कुठुन जायचं नि परत कसं यायचं ते, सगळं पाहुन भारावुन गेले बिनधास्त पणे माझी मुलाखत झाली जवळपास 13 प्रश्न विचारुन माझा आवाज चेक करण्यात आला अन् तिथुन निघाल्यावर विश्वास हाेता कि आपण Select हाेणार, लिस्ट लागली लिस्ट मध्ये 30 जणांपैकी फक्त 7 जणांना Select केलं हाेतं, आणी त्यात पहीलच नाव माझं हाेतं. बापरे, खुप लांब श्वास घेतला. काहीतरी मिळवल्यासारखं वाटलं. पहीला फाेन प्रणय दादाला केला, अन् भराभर बातमी वार्यासारखी पसरली. घरची सगळी मंडळी जाम खुश, गाेड -धाेड आणी खुप सारं प्रेम मिळत हाेतं. बापाची मान ताठ झाली. आज माझा आवाज Newsonair या रेडिआे app वर जगात कुठेही एेकता येताे,
सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्या लाेकांना झालेला आनंद. ताेच हाेता अविस्मरणीय क्षण.....
प्रिया र. गाेमाशे
(आकाशवाणी निवेदीका) चंद्रपूर.
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अविस्मरणीय क्षण.
माझं अविस्मरणीय क्षण म्हणजे मी आई झाल्याचा.पण परिस्थिती फारच बिकट होती ती म्हणजे माझ्या मुलीची तब्येत ती आठव्या
महिन्यात झाली.तिचे lungs ची
वाढ झाली नव्हती.वजनही 1kg800gm होते.तिची वाढ न झाल्यामुळे खूप tension होते.
तिच्या सर्व test करण्यातआल्या त्या Normal आल्या.तिचं वजन आणखी कमी झालं त्यामुळे आणखी भिती ती अंगावरचं दुध ओढू शकत नव्हती.त्यामुळे तिला वाटी चम्मच ने दुध द्यायचे.ती दवाखाना तुन २१ दिवसांनंतर घरी आली.आम्ही वेगवेगळ्या दवाखानान्यात होतं मला सुट्टी झाली .मी घरी आली माझ्या जवळ बाळ नव्हते मला खूप रडायला आलं तो क्षण मी विसरली नाही .मग मी माझ्या बाळाला ८ दिवसा नंतर बघितलं तेव्हा डाक्टर मला स्पर्श करायला सांगितले तर मी तर्जनी ने तिच्या गालाला स्पर्श केला आणि ती ईंतक छोटी होती की मांजरींच पिल्लु तरी बरं जेव्हा मी तो पहिला स्पर्श माझ्या साठी अविस्मरणीय आहे.
आज देवाच्या कृपेने अगदी बरी आहे.आम्ही ते दिवस विसरू शकत नाही.१वर्ष तिलासांभाळावे
लागलं पहिला स्पर्श मी विसरू शकत नाही.
माधुरी भूते
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"" (०२)
पाऊस सततधार जोरात
घर इमारतीचा घ्यावा अंदाज
पत्त्याच्या बंगल्यासम कोसळती
घ्यावा न् धोका थोडासा नाराज.
दनाअ.नागपूर
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara:
आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग
मी प्राध्यापक पदावर कार्यरत असताना महाराष्ट्र. शासनाने महिला व बाल कलयाण विभागा मार्फत माझी
बाल कलयाण समितीवर निवड केली .या समितीचे काम
समाजातील अनाथ मुलांच्या समस्या सोडविने असे होते.शासनाने या समितीला न्यायाधिशासारखे अधिकार दिलेले होते.
समितीवरचा माझा तो पहिला दिवस आजही आठवतो त्या दिवशी समितीवर मी व समितीचे अध्यक्ष,डाँकटर मँडम हजर होतो.पोलीस एका लहान
नवजात शिशुला घेवुन आले .पोलीस दादानी कडक सेलेयुट ठोकला.लय भारी वाटल.तो क्षण मी विसरू
शकत नाही.पण मैत्री नीनो खरी कथा समोर आहे
पोलीसांनी सांगितले ,'मँडम,हे बाळ रेल्वे र-टेशनजवळचया. चहाच्या टपरीवर बंद सुटकेसमध्ये
सापडले.बाळाला टाकुन त्याची आई पळून गेली.
त्या निरागस बालकाची किव आली.शांत झोपले होते बिचारे.कापड बाजुला करून पाहीले तर त्या बाळाच्या
हाताला बँडेज होते.पोलीसांना विचारले असता त्यानी सांगितले. कुत्रयांनी बाळाचा हात खाल्ला त्या चे मेडीकल
करून इथे आणले.हा दिवस माझ्या साठी अविस्मरणीय आहे.
अश्या अनेक समस्या समितीच्या माध्यमातुन सोडविण्याचे काम केले.यातुन मिळालेले आशिर्वाद आजही पाठीशी आहेत.
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 प्रभात पुष्प 🌺।।
"देणारा तो दाता
त्रिलोकीचे नाथा
पाहूनी औदार्य
ठेवीते मी माथा."
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
१७|७|२०२०.
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रभातरंग _भुपाळी
प्रात:काळी रवीकिरणांनी
कमळ चरणस्पर्श केला
आगमनार्थ परिसर सजला
दवबिंदुची ओस निरवली
मंदिरातील घंटा निनादली
दर्शनार्थ भक्तही जमले
ऊठा भवानी,ऊठा श्री लक्ष्मी
अरुणोदय झाला.
माधुरी भूते
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग
ऐका भंडारा बसस्थानकावरची कहानी
एकदा मी नांदेडला जाण्यास निघालो
बसस्थानकावर अफाट प्रवासी गर्दी
सामान बससिटवर ठेऊन खाली उतरलो.
माझ्याच खात्याचा एक दिव्यांग व्यक्ती
कुबड्यांनी बायको पोरांसह चढु लागला
अचानक बसच्या विद्युत यंत्रनेत बिघाड झाला
सारा काळाधुव्वा बसमध्ये पसरला.
प्रवासी जिव आकांताने उतरू लागले
दिव्यांग मित्र बाहेर फेकला गेला
अंगावरुन त्याच्या प्रवासी चालले
लक्षात येताच,दोन्ही हातानं ओढला.
माझ्या ओढण्यानं मित्राचा प्रयाण वाचला
मित्र शब्दानं मन आनंद, पुण्यकर्म झाला
माझ्या "आयुष्यात अविस्मरणीय प्रसंग"
राज्य परिवहन महामंडळ नोकरीत आला.
दनाअ, नागपूर
दि१७/०७/२०२०
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आयुष्यातील अविस्मरणीय क्षण*
एकदा *मंगला* आत्या
आली माझ्या घरी
विचारे मजला भाषण
देणार का ग पोरी
O. B. C. मागण्यांवर
बोलावं लागेल तुला
O. B.C. च्या हक्कासाठी
लढावं लागेल आपल्याला
आपलेच हक्क
आपणास न मिळे
आपलेच भाऊबंद
मुकाट्याने अश्रू गिळे
लोकांच्या गर्दीत वाटले
मी हरवून जाईन
मुद्देसूद भाषण झटक्यात
विसरून जाईन
भाषणात काढली
सरकारची मी वरात
सर्व मागण्या मांडल्या
मी वरच्या सुरात
कळकळाट झाला
श्रोत्यांच्या टाळ्यांचा
अविस्मरणीय क्षण
हाच माझ्या आयुष्याचा
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आयुष्यातील अविस्मरणीय क्षण
जेव्हा होते मी
माझ्या आईची आई
तो क्षण माझ्या करता
अविस्मरणीय होई
जेव्हा होते मी आई
मन माझे आनंदानें
हरवून जाईल
तो क्षण अविस्मरणीय क्षण होई
कधी कुणाच्या दुःखात
धावून मी जाई
ते क्षण माझ्या करता
अविस्मरणीय होई
खुप जवळची व्यक्ती
एकदम माझ्या पासुन
दूर निघून जाई
ते क्षण माझ्या करता
अविस्मरणीय होई
असे किती तरी क्षण येतात जे नेहमीच आपल्या सदैव अविरत
स्मरणात टीकून राहतात
नंदा भोयर
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझ्या आयुष्यातील अविस्मरणिय प्रसंग.
नविन नविन नौकरी
उत्साह होता ताजा
कामठी ते भंडारा
दररोज होई ये जा।।
शिस्तही होती कडक
राहणही होत कडक
बोलणेही करारी
चालणे ही बेधडक।।
असेच एके दिवसी
घडले भयानक
ट्रेन होती पकडायची
धावले बेधडक।।
एक पाय ठेवताच
चप्पल गेली पडून
रेल्वे लागली चालू
ऊडी घेतली मारुन।।
लोक लागले ओरडू
मर गई,मर गई
मी मात्र नि:शब्द
रेल्वे जाण्याची वाट पाही
रेल्वे गेली सुटून
चप्पल घेतली उचलून
देवाचा धावा करत
चालली खाली मान घालून।।
बरे झाले देवा वाचली
नाहीत आज कोठ असती
राम नाम सत्य करत
वरुन पाहत असती।।
सौ. के.बी.सार्वे भंडारा.
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग
चांगले वाईट
आयुष्यात
अविस्मरणीय प्रसंग
कितीतरी घडतात ।।
पहिलं बाळ होतं
ईवले ईवले हात पाय
त्यातच आपलं मन
बघते ती आई ।।
थोडे मोठे झाल्यावर
त्यांच्या शिक्षणात
स्वतःचं ज्ञान
बघते ती आई ।।
शिक्षण पूर्ण झाल्यावर
सार्थकी जीवन
म्हणून मान
उंच होई ।।
सारं निसटून
गेल्यावर
रित्या पदराची
अगदी लहान होते आई ।।
आठवत असते
तेच सदा
आयुष्यातील
अविस्मरणीय प्रसंग
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🌹कविता - अविस्मरणीय क्षण🌹*
आठवणीत आहे मला
तुझी माझी पहिली भेट
शब्द अबोल असतांना
नजरेचे बोलणे थेट
सर्वांसोबत सोफ्यावर
शांत जरी बसून असलास
नजरेने मात्र चोरुन
मलाच शोधतांना दिसलास
हातात देताना चहा
हळूच कटाक्ष टाकला
नजरा नजर होता
मोर्चा समोर वळवला
प्रश्नांची उत्तर देतांना
तुझ्याच प्रश्नाची होती वाट
PHD करायला आवडेल का?
भावलं मनाला सरळ आंत
सर्वांनी दिलेले आशीर्वाद
कसे विसरेल मन
कधीच विसरू शकणार नाही
हा अविस्मरणीय क्षण.....
सौ.रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा
[7/18, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अविस्मरणीय क्षण
1989 ला काढली होती
शैक्षणिक सहल
आठवते अजुनि ते
अविस्मरणीय क्षण
येतांनी घेवून मुलींना
लेडीज डब्यात बसली
अर्ध्यात आल्यावर पाहिलं
एक पोरगी नाही दिसली
तेव्हा रात्रीचे वाजले
होते साडे बारा
माझ्या मनाचे तर
झालेच तीन तेरा
बडनेरा स्टेशनवर गाडीचा
एकेक डबा शेवटी धावली
पेल्लोराचे शिक्षक आहेत का
अशी थाप मारू लागली
दुरुन एक हात लागे हालवु
गाडीची शिट्टी गेली वाजुन
धावत पळत चढ़ली
त्यांच्या डब्यात येवुन
पोरीच्या कानाखालि
एक दिली ठेवून
अविस्मरणीय क्षण ते
आठवते अजुन
रेणुका झंझाड.भंडारा
[7/18, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सामाजिक घडामोडी---
सामाजिक प्रगतीसाठी
प्रबोधनाची कामे घ्यावी हाती
सामाजिक घडामोडी
तरच इथे घडती ।।
10 वी, 12 वी चा
नुकताच निकाल लागला
अभिनंदन, शुभेच्छा देऊन
विद्यार्थ्यांचा गौरव केला ।।
कमी मार्क्स मिळाले त्यांनी
अभ्यास सखोल करावा
कर्तव्य अपुले त्यांच्याकरिता
कार्यशाळेचा प्रबंध करावा ।।
गरीब, होतकरू 90 टक्के घेऊनी
पुढचे शिक्षण कसे, हा प्रश्नच
आपण 50- 100 रु.महिन्याला
संस्थेत सहाय करू देऊनच ।।
शेतकऱ्यांच्या मालाला
भाव आपण द्यावे
त्यांच्या घोर कष्टाचे
सार्थ त्यांना वाटावे ।।
शिक्षण, क्रीडा, कृषी व्यवसायात
प्रगती साऱ्यांची व्हावी
प्रयत्न असे बा.कु. समाजाचे
ऋण फेडून करावी ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/18, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: # सामाजिक घडामोडी #
होत असती सतत
सामाजिक घडामोडी
आवश्यक आहे सर्वांनी
कार्य करने समाजासाठी
भाजीवाली,दहिवाली
आपलेच दुकान किराना
निवडावा प्रत्येकाने कापड,मेडिकल,दवाखाना
कुणी पैशाने करावी मदत
कुणी करावी श्रमाने
जसे जमेल तसे हातभार
लावावा प्रत्येकाने
होतकरु मुले मुली
जेव्हा पुढे जाती
होईल तेव्हा प्रगती
आपल्या समाजाची
यासाठी तरुण मंडळीने
जुन्यांसोबत व्हावे पुढे
आम्ही खंबीरपणे राहू
सतत त्यांच्या पाठीमागे
रेणुका झंझाड,भंडारा
[7/18, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सामाजिक घडामोडी
समाज आपला
आपण समाजाचे घटक
समाजाकरिता झटणे हे
कर्तव्य आपुले।
जे जे काम येईल हाती
ते ते करुन दाखवावे
मिळता संधी लगेचच्
त्यात जीव ओतुन द्यावे।
मिळता कमि अधिक मार्कस् भरभरुन कौतुक करावे
हि परिक्षा नव्हे शेवटची
हे पटवुनी द्यावे।
प्रत्येक क्षेत्रात आपलिच् मजा .मग नौकरी असो कि व्यवसाय
शेति क्रिडा राजकारण असो सर्वांचा सहभाग हवा।
सर्व समाजबांधवांना एकत्रित करण्याचा
घेत्लाय् आपण वसा
अन्यायाविरुध्द बोलण्याकरिता आपण देऊ लढा।
महिलांना वाव मिळावा म्हणुन केलाय् ग्रुप तयार
सर्वांनी स्वस्थ रहावे म्हणुन होतोय् रोज प्रयत्न।
सर्व गुणिजनांचा मिळतोय्.आपना् सहवास्
ते साध्य करण्याचा
असावा मनी ध्यास।🙏।
सौ अंजलि बांते .. .भंडारा.
[7/18, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सामाजिक घडामोडी
समाजासाठी काहीतरी करणे हे आपले कर्तव्य आहे,समाज हा एका दोघांचा नसून आपणा सर्वांचा आहे,हे नेहमी लक्षात असू देणे गरजेचे आहे.म्हणूनच प्रत्येकाने जमेल तसे आर्थिक वा शारीरिक श्रम हे समाजासाठी घेतलेच पाहिजे.आम्ही दर महिन्याला कीटी पार्टीच्या माध्यमातून १००/रू. जास्तीचे प्रत्येकी जास्तीचे गोळा करून,वृद्धाश्रम,अनाथाश्रम,वेगवेगळ्या सस्थांना,च्यारिटी मार्फत मदत करीत असतो.आपण आपल्या घरच्या कामवाली बाई पासून सुद्धा सुरुवात करू शकतो.यासाठी तरुण पिढीने आपले योगदान देणे गरजेचे आहे.उद्योजिका मेळावा मार्फत आपल्या समाजातील गरीब,होतकरू लोकांना मदत होईल,यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. समाजातील मुली,मुले कसे समोर जातील,त्यांची प्रगती कशी होईल याकडे सुद्धा आपण सेमिनार च्या माध्यमातून बरेच काही मार्गदर्शन करू शकतो, व ते कार्य सुरू पण आहे.ओ. बी. सी च्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहेत,सर्व समाजबांधव यासाठी झटत आहेत,असे अविरत प्रयत्न समाजाचे सुरू आहेत,आपण सर्वांनी मिळून हातभार लावणे गरजेचे आहे,तेंव्हाच कार्य उद्दिष्टास जाईल असे मला वाटते.
जय कुणबी🙏
सौ.कीर्ती शेंडे....नागपूर.
[7/18, 8:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺 प्रभात पुष्प 🌺।। ३१.
* आई विण पोर ते *
* दुडूदुडू खेळे ते *
* निरागस मन ते *
* इतरांना "अनाथ"ते*
सौ.कमल सार्वे भंडारा.
१८|७|२०२०.
[7/18, 8:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.१२
जाई जुई ची झुलती कमान
पानोपानी फुलला मोगरा छान
सुमनांची उधळण सुगंधी दान
प्रभात चिंतनाने करू ईशगुणगान.
सौ.मीरा शेबे भंडारा..
[7/18, 8:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प---21 वे
रिमझिम रिमझिम पाऊस आला
वसुंधरा ही खळखळ हसली
आम्रतरु पानामधुनी डोकावला
धरेवरी जलबिंदू तुषार माखली ।।
मंगला डहाके , भंडारा
[7/18, 8:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के हा.सं.प. (५९)
""सामाजिक घडामोडी""
समाजाचे संघटन फार बहुमोलाचे
सामाजिक घडामोडी समाज विकासाचे
सर्वांच्या सहभागाने समाज बळ वाढते
जे कधी ना शक्य ते शक्य होते.
सामाजीक घडामोडीचे विषय अनेक
बा.कु.साहित्य संवर्धन परिषद एक
साहित्य काव्य लेखनाचे उपक्रम स्तुत्य
यानेच समाजाचा दर्जा जाणतात अनेक.
वाचाल तर वाचाल उक्तीला आठवा
रचना लिहण्यास सुरवात करावा
लेखन असावं सर्वांगीण विषयाचे
शेती,उद्योग, व्यवसाय , शिक्षणानाचे.
सुशिक्षिताची गरज समाजाला आहे
कृषीतज्ञ, शिक्षणतज्ञ,व्यवसायतज्ञ
महोदयांनी, तरुणांना प्रबोधन करावे
सामाजिक घडामोडीने जण होतील सुज्ञ.
दनाअ, नागपूर
दि.१८जुलै२०२०
[7/18, 8:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: "" संस्कारधारा”" (०३)
अंगणी रविकिरण जागवी तरुणाला
झेपावले थवे पक्षांचे बघं अंबराला
सोड बिछाना झटकुन आळसाला
प्रात:काळी उत्साहाने लाग कामाला.
दनाअ, नागपूर
[7/19, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रागावर नियंत्रण--
माणसाचा स्वभाव तो
राग, लोभ, क्रोध आहे
जगायचे चांगले तर
रागावर नियंत्रण जरुरी आहे ।।
रागापायी मोठे मोठे
नुकसान होतात
वागूया जरा जपून
नाते तुटती क्षणात ।।
राग आल्यास जरा
मिश्कीलपणे हसावे
सकारात्मक दृष्टी ठेऊन
वास्तवातच जगावे ।।
हा जन्म रागापायी
वाया घालवायचा नाही
थोडे हसून, कविता करून
मस्त जगायचे काही ।।
----------------------------
मंगला डहाके, भंडारा
[7/19, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *संसार आणि परमार्थ*
*************************
संसार करता करता
साधावा परमार्थ
जीवनात जीवन मिसळणे
परमार्थाचा खरा अर्थ
संसार करताना
घ्या रामनाम
थोडी बंधने पाळून
नित्य करा सर्व काम
नाही होणार भले
दुसर्याचे वाईट चिंतूनी
रहा मिळून मिसळून
अहंकाराची भावना सोडूनी
लोभ, मोह, काम, क्रोध
शत्रू आपुले त्यागावे
विवेक, सुख, शांतीने
मिळून सर्वानी वागावे
आचरण ठेवा
सदैव पवित्र
संसार आणि परमार्थाचे
हेच मुख्य सूत्र
सौ स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[7/19, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*विषय - आवडती कविता*
*🚩सुनी सुनी वाटे तुझी पंढरी*🚩🚩
ओस पडल्या पंढरीच्या वाटा
वृक्षही विचारे भटकंती पक्षा
कुठे आहेत रे वारकरी?
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
ना रंगला विठ्ठल नामाचा अभंग चंद्रभागेच्या पाण्यात अभ्यंग
कशी दुमदुमणार ही नगरी?
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
ना खेळणी ना प्रसाद
बाजारपेठ झाली उदास
कश्या असतील रांगा दर्शनास?
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
तूच दाखव महामारीचे औषध
होऊ दे देवा सर्व पूर्ववत
धडू दे आम्हाला साष्टांग दंडवत
तेव्हा सुनी सुनी नाही राहणार तुझी पंढरी
सौ. रूपाली अमोल बोंद्रे
भंडारा.
[7/19, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अरे संसार संसार*
अरे संसार संसार
हाये मायावर भार
सकाय पासून मी
रूजू होतो कामावर
अरे संसार संसार
जुंपली असतो दिवसभर
नाही मले सुट्टी
नाही मले पगार
अरे संसार संसार
कोणाले नाही कदर
कोणी मले हातात पाणी
नाही देत गडवाभर
तरी मले म्हणते
तु काय करत दिवसभर
आल्या गेल्याची बरोबरी
घर साबायतो बरोबर
लहान मोठे घरचे
सोडते आडर
कधी मले म्हणत नाही
हा घे तुया पगार
नंदा भोयर
[7/19, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडती कविता
🌹शब्द सुमन🌹
स्पर्श तुझ्या.....शब्दांचे
माझ्या काळजी लागले
कसे सांगू...,सख्या तुला
मन चिंब चिंब ....झाले
प्रत्येक शब्दरूपी वाण
हृदयात माझ्या भिडला
तुझाच ध्यास ....निरंतर
मनी माझ्या जडला
झंकारलेल्या .,...मनाला
सूरतारांची सरगम साज
तूच सुरीला नगमा माझा
तूच मनमंदीराचा आवाज
ठेवा रूपातील शब्द तुझे
देते तुला... मी साभार
माळून शब्द सुमनांच्या माळा
अर्पंण करीते...कर स्विकार
सौ.कीर्ती शेंडे.,...नागपूर🙏
[7/19, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता -
" पाऊस"
पावसा पावसा कसा रे दिसतो
सर्वानाच तू मौजमस्तीनी भिजवतो
सरी वर सरी जशा मोत्यांच्या माळी
तुझे रूप पाहून मन मात्र भाळी
पावसा पावसा कसा रे दिसतो......
तू येण्याआधी मोरांना नाचवितो
पक्ष्यांना तू स्तब्धच बसवितो
पावसा पावसा कसा रे दिसतो...
मातीच्या सुगंधाने मन होते मादक
प्रियकराच्या सहवासात ओढत जाते नकळत
पावसा पावसा कसा रे दिसतो....
पाने फुले वेली वाऱ्यासंगे डोले
पर्णावर दवबिंदू वाऱ्यासंगे हाले
पावसा पावसा कसा रे दिसतो...
सृष्टीला नटवितो नद्या नाल्याना पुनर्जीवित करतो
सागराला जाऊन थेटच मिळतो
पावसा पावसा कसा रे दिसतो... शुभ्रधवल निर्मळ असं तुझं रूप
जणु स्फटिक साऱ्यांनाच फसवितो.
पावसा पावसा कसा रे दिसतो
सर्वांनाच तू मौजमस्ती ने भिजवतो.🌧️🌧️💧💧🦚🦚🌴🌴🌳🌿🌿🦚🦚
सौ. माधुरी भुते
[7/19, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *माझी आवडती कविता*
🌨️ पाऊस 🌧️
येरे येरे पावसा |
तुला देंतो पैसा |
पैसा झाला खोटा |
पाऊस आला मोठा|
येग येग सरी |
माझे मडके भरी |
सर आली धावून|
मडके गेले वाहून |
-सौ मनोरमा तिजारे, पुणे
[7/19, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मन माझे
मन माझे वळू नये.
अशी श्रद्धा हवी मला.
निष्ठा माझी ढळू नये
अशी भक्ती हवी मला.
सामर्थ्य माझे संपू नये..
अशी शक्ती हवी मला.
कधी विसरू नये.
अशी नाती हवी मला.
आपले माणूस ओळखायला..
जास्त वेळ लागला नाही.
त्यांना पाहिल्यावर गालात हसू..
डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहावल नाही. 🙏
[7/19, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 राग 🌺 ।।
रागात नाही भले,
रागात वाहीले भले भले।
रागात होई विनाशच,
राग करुन काय जाहले?
राग ठेव काबूत,
शान राहील शाबूत।
राग शिरे डोक्यात,
वाहील सारा ताबूत ।।
रागाने सुटेना समस्या,
रागाने वाढेच ताप सारा।
हसण्यासाठी जिवन हे,
समजून घे हा इशारा ।।
येता राग कुणाचा,
शोध घे अंतरी मनाचा।
मन शांत ठेवूनी,
विचार कर जनाचा ।।
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
[7/19, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कविते चा किस्सा
असा कसा बाई मले लागला व संद !
लिवण्यात सदा रायतो धुंद !
अन चुलीवरचा उतू जाते व दुद !!
लेकरं माज़ी म्हणती भूक लागली मोठी !
कर न व मा लवकर ताटी !
तुहं ध्यान आहे कोठ !
भाजीत नाही टाकलीस मीठ !
सासू म्हणे धुतलीस का व भांडी धुनी !
सासरा म्हणे कर लवकर चहा पाणी !
माह्या मनातल्या कवितेल समजलं ना कोणी !
घर धनी माहा म्हणे शिवलीस का व माझ्या पायजमाचा खिसा !
येळ आता तुले भेटलंच कसा !
कवितेनं पार तुले लावलंन पिसा !
असा आहे गा दादा माह्या कवितेचा किस्सा !!
रंजना हलमारे साकोली
[7/19, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेम
तुझी साद,माझा प्रतिसाद.
खरचं प्रेम आहे का जगात?
प्रेम नाही अविष्कार,
प्रेम नाही साक्षात्कार.
प्रेम आहे निसर्गनियम,
जो वसतो साऱ्यांच्या हृदयात.
प्रेम आहे फुलांभोवती,फिरणारा भ्रमर.
प्रेम आहे दोन जीवांचे मनोमिलन.
प्रेम नसते या जगती,
उगवले असते का अंकुर मातीतुनी?
प्रेम राधा,प्रेम कृष्ण,
प्रेम जीवनाच अनमोल मिश्रण.
प्रेम त्याग,प्रेम विरक्ती,
म्हणूनच मिळते,भक्ती आणि मुक्ती.
प्रेम दिल्याने वाढते आहे,
प्रेम लादल्याने,खुंटते आहे.
खऱ्या प्रेमाची शिकवण,
दिली साधु संतांनी.
प्रेम,प्रेम,प्रेम करा सर्वांवरती,
प्रेम सर्व प्राणीमात्रांवरी.
प्रेम नाही साधंसोपं,
प्रेम नाही मर्त्य,
प्रेम भाषा स्पंदनाची,
प्रेम भाषा अनुभूतीची.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि.19.7.2020
[7/19, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: || चंद्र आणि चांदन्या ||
दिवस मावळे येई संध्या
सजु लागल्या चांदन्या
झगमग झगमग साडया
त्यांच्या सोबत होती निशा
निशा सोबत चांदन्या पाहून
वाटे मग हेवा शशिला
हळूच चोर पावलांनी येवून
हरनांच्या रथात बैसला
घोळका तयांचा पाहुन
गेला चंद्र लाजुनी
जमली मैफिल सर्वांची
आकाशाच्या अंगणी
लागले खेळू,गावु,नाचु
सगळे मंद धुंद होवुनी
वाऱ्यासंगे पाहे हळूच
डोकावुन रातरानी
वेध लागता रविकिरणाचे
गेला घाबरूनी चंद्रमा
लुकलुक करीत झाल्या गायब
चंद्रासोबत चांदन्या
रेणुका झंझाड,भंडारा
[7/19, 6:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संस्कारधारा. (०४)
टाळेबंदीत थोडक्यात लग्न कार्य झाले
वर्हाड्यांसोबत खर्चाला बंधन आले
लग्न फक्त नवरदेव नवरीनेच अडते
व्यर्थ परंपरेत वाट माणसाची लागते.
दनाअ, नागपूर
[7/19, 6:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 प्रभात पुष्प 🌺।।३२.
* रानमाळी फुलावी फुले *
* सुंगध दरवळला चौफेर *
* करावी जंगल सफर *
* पहावा डोळे भरुन आंबेमोहर *
सौ.कमल सार्वे भंडारा.
१९| ७ २०२०.
[7/19, 6:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प--- 22 वे
सुगंध दरवळला
आसमंत हा हसला
प्राजक्ताचा सडा अंगणी पडला
रवी मनी हळूच लाजला ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/19, 6:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
विषय..आवडती कविता. (६०)
"" माझी तु होशील ना!""
गत जन्माची सखी माझी
मंगल अक्षदाने गृहलक्ष्मी झाली
सुखदुःखाचे सहवले निखारे
दिव्या माझी होशील ना ,वाती!
संसार माझे उन सावलीचे
करावी काटकसर सौम्य आवडीचे
केली मौजमजा नाही जिवनी
तरी तु जपले माझ्या मनाचे.
दिवस आठवं आजारपणाचं
माझ तुझं नसतं म्हणायचं
हातात माझ्या हात असायचं
तुझ्या संगतीनं धिर मिळवायचं.
आकाशतारे आणु ना शकलो
लाड तुझं पुरवुं ना शकलो
हवं तसं तुला देऊ नका शकलो
बोल,माझी होशील ना!ना लाजलो
तुझ्या विणेवर कर माझे जुळावे दक्ष
गितं माझे तु सुर देशिल का!
ऐकावे संसार सुर सांजवेळेचे
आयुष्यसंध्येला माझी होशील ना!
दनाअ, नागपूर
दि.१९जुलै२०२०
[7/19, 6:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गझल
अंकुरता मग,एक आठवण,तोंड लपवून ..घेते
सुकत चालल्या,डहाळीस ती,उगाच पाणी देते
बरेच झाले,..अर्ध्यावरती, डाव मोडला माझा
दारी टिचकी,रोज मनाच्या,मारून उचकी,येते
निदान काही,काळ फुलांच्या,सवे राहता,आले
हेच भाग्य बस ,आता बघतो,रोज फुलांची प्रेते
भर हंगामी,दिला दगा तू..पिक येईल कैसे?
तुझा बदलला,मौसम इथला,तुझी बदलली शेते
डाव तसेही, हरण्या साठी,खेळविल्या रे,जाते
आपण नुसते,प्यादे असतो,...खेळविणारे जेते
ओमप्रकाश ढोरे
९४२३४२७३९०
[7/19, 6:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आई
माती समान आई
सर्वात छान आई
तू सर्व विश्वव्यापी
गीता,कुराण,आई
रागात प्रेम तुझिया
इतुकी महान आई
घर मोडके तरीही
पक्की कमान आई
होऊन सावली ती
सोसे तपान आई
खुडले जरी किती ही
हिरवेच पान आई
मी भूतकाळ साधा
तू वर्तमान आई
वृंदावनात तुळशी
तैसेच स्थान आई
झालीस माय माझी
मी भाग्यवान आई
सार्या इथे जगाची
आहेच शान आई
कीर्ती तुझी धरेवर
दैदिप्यमान आई
येथे सदैव राहो
आयुष्यमान आई
omprakash dhore
9423427390
[7/19, 8:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडती कविता
पावसा पावसा
पावसा पावसा थांब, थांब
जाऊ नको लांब लांब.
पावसा पावसा ये ये
पिकांना पाणी दे दे.
पावसा पावसा ये भारी
झाडे लावूया घरोघरी.
पावसा पावसा ये सरसर
नद्या,तळी वाहू दे भरभर.
पावसा पावसा रुसू नको
धरतीला पाहून हसू नको.
तुझी माझी करू गट्टी
तुला देईन खाऊची वाटी.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.१५
घरट्यां मधून ऐकू येतं
पक्ष्यांचा किलबिलाट
चहूकडे पसरला
कुसूमांचा घमघमाट
रम्य किती पहाट.
रवी रथ चढून आला
आभाळाचा घाट
उजळला आसमंत ललाट
सुंदर किती पहाट.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ""संस्कारधारा"". (०५)
गडगडाट पावसा निघुन गेलासी
नाही शमली तृष्णा धरतीची
बळिराजाची लागली नजर आकाशी
याव्या सरीवर सरी भिजावी शेती.
दनाअ , नागपूर
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प--- 23 वे
चाहूल लागली श्रावणाची
दीप पूजा तरंग ज्योतीची
उजळे प्रकाश व्रतवैकल्याची
पूजापाठ अन ज्ञानोपासनेची ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺 प्रभात पुष्प 🌺 ।।३३.
" बीज अंकुरले बाई
काळ्या मातीत रुजले
खपली घेऊन निघले
हसू गालात आले"
सौ. कमल सार्वे भंडारा.
२०|७|२०२०.
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🦋 फुलपाखरू🦋*
*क्र.१८*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*दिप पूजन*
*पेटवा मनात ज्ञानाचा दिवा*
*त्यानेच होईल दूर*
*अज्ञानाचा, संशयाचा,*
*अहंकाराचा अंधार*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍️रूपाली अमोल बोंद्रे*
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।सुप्रभात।
गुलाब फुलला
लिली हसली
मोगरा पसरला
चोही दिशी।।
अंगण नाहला
रांगोळी सजली
रवि उगवला
प्रभात क्षणी।
सुप्रभात मैत्रीमंडळीना...आदरणीय गुरुजनाना।।। सौ.चंदा शेंडे नागपुर
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चित्रकाव्य... कविता. (६१)
"" मुखचंद्र""
नवयौवना पुनवेच्या लख्ख रात्रीला
घागर घेऊन निघाली एकटीच पाण्याला
बसुन पाणवठा रूप न्याहाळते
प्रतिबिंबात अवचित चंद्रसखा भाळला.
पाणवठा बसता मम पदर ओंघळला
जणु सख्यानेच पदर ओढीला
पाण्यात पुर्णचंद्र सख्याचे रूप पाहुनी
यौवन माझा लाजु लागला.
पाडुन अंबाडा लाविला गजरा
पाहुनी प्रतिबिंब गजरा हासला
हिरवा चुडा हळुच किणकिणला
प्रित पाहता आकाशी चंद्र हासला.
शितल कोमल वारा मदनाचा
कसला विचार मनी रूपगर्वाचा
झाली अधिर मी भेटण्या सजनाला
लुटावा यौवनगंध सुख स्वर्गाचा.
शितल रात्रीची पहाट झाली
गाठ प्रितीची हळु सुटत गेली
पाणवठ्या वरील गार वार्याची
भासते बेधुंद रात्र मिलनातली
दनाअ, नागपूर
दि२०/०७/२०२०
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. ( ६२)
""मेंदीच्या पानावर""
मनपाखरू मेंदीच्या पानावर
मनमनात कसं हसतयं राव
सुगंध दरवळला रातराणीचा
अंगणात गार वार्याचा बडेजाव.
नववधु प्रिया सोळाश्रृंगार सजली
सख्या मम हाताला मेंदी काढली
बेधुंद वारा बघं सुटला मदनाचा
सजना घे सावरूनं मजला हाती.
दवं मधुमालती पानांवर भरते
झुपके फुलांचे मम गाली झुलते.
जणु लालपांढरे तोरण बांधले
मेंदीच्या पानावर मन मोहरले.
मेंदीच्या हातावर प्रित माझी
शुभशकुनाची आहे रीत भारी
काढली नखशिखांत रंगली मेंदी
अधिर झाले मी गंधाळल्या रात्री.
दनाअ, नागपूर
दि. २०जुलै२०२०
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *मेंदीच्या पानावर*
मेंदीच्या पानावर
सुरू झाला नवा प्रवास
लग्नाच्या आधी येतो
मेंदीचा कार्यक्रम खास
मेंदी सुंदर नक्षीदार
आहे प्रेमाचे प्रतिक
खुलवते नव वधूचे
सौंदर्य अधिक
श्रावण सणांमध्ये
मेंदीचे महत्त्व अधिक
मेंदीचा लाल रंग आहे
सौभाग्याचे प्रतिक
उष्णतेचा दाह घालवणे
आहे मेंदीचे गुणधर्म
प्रेम, आनंद, सौंदर्य वाटणे
हाच मेंदीचा धर्म
*सौ.रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा*
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *मेंदीच्या पानावर*
सौभाग्याचं लेणं मेहंदी
लग्नात असे तिला मान
सौंदर्य वाढवि हाताचे
आहे ती समारंभाची शान
मेहंदी भरल्या हातांनी
रूप माझे खुलून उठते
रूपगर्वा सौंदर्यवती
चारचौघात उठून दिसते
मेहंदीचा गारवा
असो सदैव मनी
आभूषणाविना सजवी
हात पाय दोन्ही
रंगली लाल रंगाने
हातावरची नक्षीदार मेहंदी
सुखी ठेवी जीवन
समाधानी अन् आनंदी
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🌹🌹मेंदीच्या पानावर 🌹🌹
मेंदीच्या पानात दडले
आईच्या मायेचे रंग आणि
स्वप्न म्हणून
मेंदीच्या पानावर मन अजुन
झुरतय र......
मेंदीच्या पानात दडले
बाबांच्या प्रेमाचे विविध
आकार म्हणून
मेंदीच्या पानावर मन आजुन
झुरतय र.......
मेंदीच्या पानात दडले
भाऊ आणि बहीणीच्या
स्नेहाचा ओलावा म्हणून
मेंदीच्या पानावर मन आजुन
झुरतय र.....
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
सौ. शितल श्रीकांत ठवकर.
(तुमसर रोड देव्हाडी).
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मेंदीच्या पानावर---
पिवळ्या पाचूच्या, पदरात शोभे
पंख मयूर, ठिपके गाभे ।।
जमल्या मैत्रिणी, मेंदी लावाया
नाव कुणाचे, मध्ये शोधाया ।।
बोले मेंदी, हळूच कानी
आणूनी चुरगळले, मज पानातूनी
वधू बोले, तुझ्यात झुलते मन
हसते, गाते, रंगते तन ।।
जाई जुईच्या ,सुगंधापरी
वाऱ्याच्या त्या, झुळूक सरी ।।
आनंदाने मन, झोके घेते
प्रियाच्याच आठवात, स्वर्गसुख बघते ।।
मेंदीच्या पानातूनी, मनतरंग संसाराचा
चढतो बघा हा, इंद्रधनूच्या रंगाचा।।
मंगला डहाके, भंडारा
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मेंदी
स्त्री मनाचे भावविश्व,
खुलविते ही मेंदी.
बालपणापासून सोबत सदा,
करिते ही मेंदी.
छोट्या-छोट्या, नाजुकहाती,
आकार घेते, ही मेंदी.
आनंद गगनात मावेनासा होई,
रंगून जाते, ही मेंदी.
करीता पदार्पण यौवनात,
सणवारी,शुभप्रसंगी,
अगतिक चाहुल होता कुणाची,
मन हुरळून टाकी,ही मेंदी.
हळदीच्या हातावर,हिरव्या चुड्यासवे,
शुभ शकुनाने रचते,ही मेंदी.
नववधु ही बावरून जाता,
सजनाच्या नावात, रंगून सजते,ही मेंदी.
सुवासिनींच्या सहजीवनात,
रंग भरते,ही मेंदी.
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर घेई,
उंच झोका,ही मेंदी
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि.20.7.2020
[7/20, 6:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🍃मेहंदीच्या पानावर 🍃
बालपनी आमच्या लावती
मेहंदीची पाने वाटुन
आता कोनाचा जमाना
असे त्यात रसायन
सजवी दोन्ही हात
काढा हातावर मेहंदी
लग्न समारंभ सनासुदी
मन प्रसन्न आनंदी
मेहंदीच्या पानाचा
रंग असा महाभारी
हातावर मेहंदी रेखुनि
होई तयार नवरी
मेहंदीच्या पानावर
मन तिचे झूले
मेहंदीच्या रंगा सोबत
तिचे अंतरंग खुले
हिरव्या मेहंदीच्या पानांचा
चढ़े दाट लाल रंग
सखा साजनी भेटता
होई दोघेही बेधुंद
रेणुका झंझाड भंडारा
[7/20, 7:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुषमा पडोळे, भंडारा
[7/20, 7:38 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: भारती तुमसरे
[7/20, 7:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: भारती पिंगळे
[7/20, 9:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पहिलीच माझी होती, दादा
[7/20, 9:51 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सारिका राजेश रेहपाडे, लाखनी
भंडारा
[7/20, 9:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अर्चना प्रकाश चेटूले, लाखनी
भंडारा
[7/20, 9:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रक्षा राजू आथिलकर, यवतमाळ
[7/20, 9:54 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: विजया दिलीपराव पोटफोडे, अमरावती
[7/20, 9:55 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: भारती विजय पिंगळे, मलकापूर
[7/20, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रद्धा विलासराव सदावर्ते
[7/20, 10:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: लता लाकडे
गाव नाही दिलं
[7/20, 10:28 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वृषाली भगवान झंझाड,बेला
भंडारा
[7/20, 10:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अश्विनी अमर सपाटे, lute
अमरावती
[7/21, 8:59 AM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: भारती भगवान तुमसरे, यवतमाळ
[7/21, 9:02 AM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मोनिका कडगळे अमरावती
[7/21, 9:04 AM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माधुरी भुते, नागपुरे
[7/21, 9:05 AM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रेखा लांडगे नागपूर
[7/21, 4:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माधुरी सुरेश डायरे, कामठी
नागपूर
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 💢💢💢💢💢💢💢💢💢💢
_*स्पर्धेसाठी*_
*************************
_*दिनांक. ११/०७/२०२०*_
~~~~~~~~~~~~~~~
*विषय - बीज अंकुरे अंकुरे*
~~~~~~~~~~~~~~~
*कविता - बीज अंकुरे अंकुरे*
*************************
बीज अंकुरे अंकुरे
धरणीच्या पदरात
धरणीच बीजा माय
मिळे पोषक आहार
बीजा मंद वारा
सोबत निर्मळ प्रकाश
भय वाटे मनी बीजा
नभ दाटून ये आकाश
झाले अंकुराचे रोप
आला स्वप्नांना आकार
आधार दे धरणी
किलबिल करे पाखरं
भास होता अंकुरचा
मातेला हर्ष होई
बाळा नयनी भरण्या
मन आतुर होई
बीज अंकुरे अंकुरे
सुंदर तो प्रवास
रोपाचे वृक्ष होई
सृष्टीच त्याचे आवास
*नाव - सौ.रूपाली अमोल बोंद्रे*
*नोंदणी क्र. - ४५*
*जिल्हा - भंडारा*
*मो. ९९६०६१५९१८*
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावणसरी
छनछन बरसत येती धारा अलगद येई कुठून वारा नभी मेघांचा हा डोलारा मन मोराचा फुले पिसारा
अवचित येती अवचित जाती नकळे कधी मला भिजवती भरभर येऊन अंगावरती थेंब इवले अन् ओघळती
ऊन सावली खेळ खेळती प्रेमरसाचे घन ओथंबती कधी अवचित अन् वाऱ्यावरती आरूढ होऊन जणू फिरती
कधी येऊनी ऊन अलगद सोनेरी ते किरणही बिलगत वळूनी मी पाहता नभात पुन्हा पुन्हा मेघच दाटत
ऊन पाऊस खेळ हा भारी श्रावणाची ही मजाच न्यारी सरतो पाऊस आता परी धावती पुन्हा श्रावणसरी
Sau . Manorama Tijare Pune.
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावनसरी
आकाशात या मेघ दाटले
मधेच ऊन पावसाचा खेळ
रिमझिम पाउस सरी बरसती
हर्षला आनंदाचा मेळ ।।
सृष्टी हिरवा शालू नेसुनी
सुख स्पर्शाने मोर नाचती
झोके घ्यावे चिंब भिजूनी
हिरवीगार ही होई धरती ।।
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *श्रावण सर
श्रावणात या
सरी येती धावून
कधी पडे सावली
कधी पडे ऊन
ऊन सावल्यांचा
लपंडाव सुरू
रिमझिम सर
जसा फवारा सुरू
सर अंगावर येता
मन भिजल त्यात
किती आनंद घेवु
मन सुटलं मोकाट
श्रावण सरींची
आहे अनोखी भेट
निसर्ग न्हाऊन निघाला
हिरवी वनराई दाट
नंदा भोयर अमरावती
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावण सरी
आनंदात मिसळला सुखाचा सूर !
आली आली ग बाई आली श्रावण सर !
वाटे नभात जनू संगीताची मैफिल !
ढगांनी केला गजर दामिनीही छेडी अलगद तार !
मिसळला मग मेघांनी सूर !
बरसली ग अमृताची धार !
लपाछपीचा खेळ चालला !मधेच ऊन अन पावसाचा !
शेतकरी दादा असे आनंदात !
रोवनीही चालली थाटात !
आला आला ग श्रावण !
मैफिल सणांची घेऊन !
गौरी - गणपतीचा सन !
येई बालपणीची आठवण !
झिम्मा फुगडी घालू असे, मैत्रिणीचा मेळ !
सासरच्या माझ्या सख्या मोठ्या गुणवान !
कुणी रांगोळी, मेंदी, कविता, कुणी करिती व्याख्यान !
सगळ्यांना देवा ठेव आनंदात !
हीच प्रार्थना आहे तुझ्या चरणात!!
रंजना हलमारे, साकोली
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावनसरी
आकाशात या मेघ दाटले
मधेच ऊन पावसाचा खेळ
रिमझिम पाउस सरी बरसती
हर्षला आनंदाचा मेळ ।।
सृष्टी हिरवा शालू नेसुनी
सुख स्पर्शाने मोर नाचती
झोके घ्यावे चिंब भिजूनी
हिरवीगार ही होई धरती ।।
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *श्रावणसरी*
घननिळे येती दाटून
श्रावणसरी बरसती धरणीवर
भिजण्याचा मोह न आवरे
कसा ठेऊ ताबा मनावर
तप्त धरणीला शांत करे
क्षणात सरसर शिरवे पडे
ऊन सावल्यांचा खेळ असे
क्षणात कोवळे ऊन पिवळे
कधी बरसावे कधी थांबावे
धरित्रीसंगे लपंडाव खेळावे
कधी रुसून दूर निघावे
वार्यासंगे शिळ घालावे
हरित तृणांवर पडे दवबिंदू
दिसे जणू ते हिरे मोती
इंद्रधनू उगवले आकाशी
सप्तरंगी छटा दिसे आसमंती
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावणसरी
रिमझिम बरसती श्रावणसरी,
सरसर शिरवा अवनीवरी.
लपंडाव हा ऊन पावसाचा,
अंगास झोंबतो गार वारा.
वसुंधरेचा शालू हिरवा,
पदर पाचूचा उडतो रानात.
मोरही नाचतो फुलवून पिसारा,
नभात दाटता घननिळा हा.
सण ही सारे होती गोळा,
सृष्टीचा तो अनुपम सोहळा.
सहस्त्रकराने उधळण करीतो,
श्रावनसरींचा श्रावण भोळा.
बहर फुलांचा नव चैतन्याचा,
मनात स्फूर्ती काव्य कविता.
झिम्माड गाणी,झिम्मा-फुगड्या,
खेळ सारा हा श्रावणसरींचा.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि.21.7.2020
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *मेंदी*
मेंदीचा ग माझ्या
मनगटी रंग लाल
.सख्या साठी माझ्या
खुलली ती फार
तुझं साठी हा
केला मी सिंगार
हातावर माझ्या बाई
रंग आला लाल
नाजुक या हाताला
मेंदीचा गारवा
नेसली बाई मी
छान शालू हिरवा
हातावरती माझ्या
नक्षी बुट्टेदार
सख्या तुज साठी
ल्याली हा सिंगार
नंदा भोयर
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌦️ श्रावणसरी 🌦️
आषाढाने सोडली जागा
बरसल्या श्रावणसरी
उन पावसाचा खेळ
झाला सुरु या भू वरी
जाई,जूही फुले चमेली
सुगंध दरवडे चोहिकडे
हिरवळ बहारून आली
जिकडे तिकडे आनंद गडे
होता संध्याकाळी सूर्यास्त
तरु शिखरावर उन पिवळी
नभो मंडपी इंद्रधनुष्य
जणू आकाशी कमान लावली
धानाची होई रोवणी
पराटीची ही डवरनी
बळीराजा उत्साहित
आनंद मावेना गगनी
रेणुका झंझाड,बेला(भंडारा)
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावणातल्या सरीची सर
कोणालाही करता येत नाही
निसर्गाचा आनंद
कोणालाही देता येत नाही
श्रावणसरी कोसळताना
कोणालाही त्रास होत नाही
निसर्गाचा हिरवा शालू बघून
मनही आनंददायी होई
श्रावणात बघतो रोज श्रावणसरी
आज वाटे नवीन काही
निसर्गही खान तुझी
हिरवाई नजर घायाळ करी.
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ॥श्रावणसरी॥
वाजागाजा करीत निघाली
मेघामधुनी श्रावणसरी,
चाहुल लागताच निसर्गराजा
मनी हर्षिला किती।
जीवनसृष्टीचे बिजे सारी
धरतीमातेच्या पोटी,
आतुरली होती तीही
बाळ रुजविण्यासाठी।
भेगा तिच्या कायेच्या
बघुन दुःख झाले सृष्टीस
करु लागली विनवनी
ये एकदा भेटीस।
ऐकुन किविलवानी हाक तिची
देत साथ निघाली श्रावणसरी
येताच धरतीवरती
आनंदी आनंद चोहीदिशी।
सौ.चंदा शेंडे
नागपुर
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावणसरी
श्रावणाचे झाले आगमन
हर्षले आनंदाने माझे मन
सरिवर सरी बरसती
गर्जनांचे सारे खेळ असती
हिरवा शालू नेसली सृष्टी
अन् सुखावली माझी दृष्टी
ओले चिंब होऊनी सरींनी
झोके घ्यावे अलगद मन भरुनी
निसर्गाची ही रंगसंगती
नयन माझे तृप्त करिती
लपंडाव हा उन पावसाचा
असे सारा खेळ हा ईश्वराचा
सौ.कीर्ती शेंडे.....नागपूर
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: _श्रावण सरी _
वाटते मनाला श्रावण सरी व्हावे
हिरवळ दाटे चोहीकडे
मनालाही फुटती तुरे
वाटेकडे तिकडे बहरावे
वाटते मनाला श्रावणसरी व्हावे
प्रेमाच्या कल्पवृक्षा ला नवे पालवे फुटावे..............
कल्पनेच्या कळीतून ह्या फूल होऊनी चिंबचिंब व्हावे
वाटते मनाला श्रावण सरी व्हावे
बहरलेल्या प्रेम फुलाला
स्पर्शून गेला मंदवारा
लाजून गळाल्या त्या पाकळ्या
फुलाला वाटे परत कळी व्हावे
वाटते मनाला श्रावणसरी व्हावे.......
🙏🙏🙏
सौ. भूमिका राजेश बोंद्रे
अमरावती
🙏🙏
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ***श्रावण**
सुख वेचीन म्हणन्या आधी
घन दुःखाचा गहिवरतो
अन दुःख सावरू जाता
कवडसा सुखाचा येतो
या ऊन्ह सावली संगे
रमण्यात ही मौज म्हणूनी
मी हसून हल्ली माझ्या
जगण्याला श्रावण म्हणतो..
सौ अश्विनी अमर सपाटे (लुटे)
अमरावती
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावण सरी---
ओल्या ओल्या श्रावण सरी
बरसल्या या धरतीवरी
चंद्रप्रभा शोभे ही
शृंगारीका, लावण्यभरी ।।
सरीवर सरी
येती धावून
मृदगंध हा
सुगंधात न्हाऊन ।।
कधी धारांचे शिरवे
कधी उन्हाचे तापे
पिवळ्या पिवळ्या पंखावरूनी
झाडे घेती झोके ।।
डोंगर शिखरावरून
धावत सुटतो वारा
पाण्याच्या लहरी घेऊन
उड्या मारती गारा ।।
ऊन पावसाचा
आल्हाद ललाट बघुनी
मयूर थुई थुई नाचे
मोहक पिसारा फुलवूनी ।।
नवंयौवना ही भासे धरती
हिरवाकंच शालू नेसुनी
पांढरी, लाल,गुलाबी फुलांच्या
सुगंधात जातो आसमंत दरवळुनी।।
मंगला डहाके, भंडारा
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावण सरी
सरसरणारी श्रावण सरी
सुरामध्ये नाचून जाते,
फुलपाखरांच्या मनाला
विसावा गोड करून जाते,,
मातीला येणार गोडवा
अंगाला सुगंध देऊन जाते,
वृक्षला जीवनरूपी
अमृत धारा देऊन जाते,,
मोराचा फुललेला पिसारा
मोती लावित जाते,
मृदेला हिरवा रंग देऊन
हिरवळ रान करून जाते,,
गार गार गारवा
चालतच जाते,
वाटेमध्ये भेटले की
आनंद देऊन जाते,,
सौ श्वेता कानतोडे
अमरावती
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 श्रावणसरी 🌺 ।।
श्रावणात बरसती,
रिमझिम पाऊसधारा।
ऊनपिवळे शितलवारा,
चमके हिरवी वसुंधरा।।
इंद्रधनू तो सप्तरंगी,
उधळे रंगाची बरसात।
बालगोपाल पाहती नवल,
मेघांचिही लपाछपी आनंदात।।
श्रावणसरी बरसे,
धावती मेघ काळे।
धरा पाही कुतूहल,
नभात श्रावण सोहळे।।
श्रावणमासी बरसे,
सरसर श्रावणसरी।
झिम्मा फुगडीचा खेळ,
रमतो माहेरच्या दारी।।
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावण सरी
♾️♾️♾️♾️♾️
आला आला श्रावण
सकल मनभावन.
पाऊस येतो रिमझिम
गेलं भिजून अंगण.
भिजलेल्या रानवाटा
पाणी वाहे पाटापाटा
फडफड पंखांची ओल्या
शोधीत आडोसा घरटा.
ऊन पावसाचा लपंडाव
इंद्रधनूचं कमानी मांडव.
रोमरोम अंतरंगात
अलवार भिजावं.
सारे सणवार साजरे,
हर्ष उल्हासानं करावं.
संस्कृती, संस्कार
श्रावण सरीत जपावं.
घननिळा बरसावा
तन मन हर्षावा.
श्रावण सरींचा दर्प
कणाकणात दिसावा.
आला श्रावण महिना
श्रृंगार करती ललना
पानाफुलांची परडी
निघती देवदर्शना.
गणपतीला दुर्वा
शंकराला बेल
नागोबा दूध लाह्या
गौरीला पानफुलं.
शेतकऱ्यांचं दैवत
पोळ्याला पुजतं
कान्हाचा गोकुळ
रंगतो श्रावणात.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: * श्रावणसरी*
घेऊन व्रतवैकल्ये आला श्रावणमास।
दिपपुजेने करुया या मासाची सुरवात।।
श्रावणमासी या चाले उन पावसाचा खेळ।
कधी सोनेरी किरणें कधी
पावसाची रिमझिम।।
बरसता श्रावण सरी लागे मनाला हुरहुर।
नव वधुला होते
मंगळागौरीची आठवण।।
रुणझुणत्या पाखरा सवे
धाडी ती निरोप ।
घ्यायला येण्या तिला
पाहे ति वाट।।
म्हणे माहेरी जाऊन खेळेल
झिम्मा फुगडी खेळ ।
सांगेन खुशहाली सासरचि
घेईल झोके ऊंच फार।।
येता रक्षाबंधन राखी
बांधेन करास ।
तुच माझा पाठीराखा
असे सांगेन भावास।।
बरसता श्रावणसरी मन
न्हाऊन निघालं ।
या वेड्या वार् या पायी
रानावनां भटकुन.आलं।।
सौ.अंजलि बांते
..भंडारा
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावणसरी 🌈
श्रावणसरी प्रभात काळी
मेघ दाटती अंबरी
तांबूस पिवळ्या किरणामधुनी
रिमझिम रिमझिम बरसते सरी
कशी मनातून मने गुंतती
भाव दाटती उरी
उन्हात न्हाऊन सुंदर होऊन
येती श्रावणसरी...
श्रावण येतो श्रावण जातो
कधी सुखतर दु:ख खुमारी
तुझ्याच येण्याने श्रावणा
आनंदून जातो शेतकरी....
सौ.सुचेता सार्वे
पनवेल नवीमुंबई..।🌧️🌧️
[7/21, 6:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावणसरी
श्रावणमासी, श्रावणसरी बरसती
कोट्यानु कोटी कितीतरी.....
जणू मोत्यांच्या पंक्ती
शितल, शितल वारा
धरणी वर आला
धरणीचा श्रुंगार, सुरू झाला श्रावणमासी!!
श्रावणसरी आल्या धरणीला ओटी भरावया
लावण्याने नटते, हिरवा शालू नेसते, फुलांनी सजते.
श्रावणसरी बरसल्या टपो-या थेंबाने
रस्ता स्वच्छ सुंदर करी
लांब सडक काळाभोर रस्ता जणू
वाटे धरणी "केस"न्हावुन निघाली
श्रुंगार पाहुणी, नवतरूनी सजली
श्रावणमासी, सणांना तर उतच येई
श्रावणसोमवार, मंगळागौर असे कितीतरी येई, मनाला आनंद देई
कधी पडे पाऊस, कधी पडे ऊन
ऊन,पावसाचा खेळ सुरू
ढगांनी घेतला कापसाचा बोळा
बोळयातुंन निघाल्या श्रावणसरी
श्रावणसरी बरसल्या शेतशिवारा मध्ये
धानाची रोपं पाहुन, बळीराजा सुखावला
रिमझिम रिमझिम बरसल्या श्रावणसरी ,ओढ मनाला बेधुंद करी
श्रावणमासी श्रावणसरी बरसती
कोट्यानु कोटी कितीतरी....
सौ.माधुरी देवेंद्र भूते.
💨🌧️💨💧💦🌨️
[7/21, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.१६
प्रभात रंगाने उजळली अवनी
देवाची मुखी गोड गाणी
मनमोगरा फुलला आनंदूनी
भाव पुष्प हे अर्पण चरणी.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/21, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संस्कारधारा. (०६)
श्रावण सरींनी भिजले अंगण
दिपपुजेनं केले धरतीला वंदन
समाजमन सारा उजळुन निघावा
निसर्ग हिरवा कोवळा नंदनवन व्हावा.
दनाअ, नागपूर
[7/21, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹 प्रभात पुष्प. 🌹
न्याहाळती रुप
विश्व मोहिनीचे
रवि किरणे ही
चुंबीती चरणे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
[7/21, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺 प्रभात पुष्प 🌺।। ३४.
*बागेतल्या झाडांनी *
* एकच प्रश्र्न केला *
* श्रावणात पत्री तोडून *
* दुरावशील का आम्हाला?*
सौ. कमल सार्वे भंडारा.
२१|७|२०२०
[7/21, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प--- 24 वे
निलवर्णी या अंबरी
सोनपावले आली परी
उजळे धरती सत्वरी
मोत्यांची ती माळसरी ।।
-------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[7/21, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्पर्धेसाठी
दि. १०/०७/२०२०
विषय.."".वात्सल्य झरा""
वासरू गोठ्यात हंबरते
ऐकत,गाय धावत सुटते
बिलगता,माय पान्हा सोडते
वात्सल्य झरा भूवर दिसते.
पक्षी विनित खोपा बांधते
उंच खोप्यात पिल्ले ठेवते
वाट मायेची पिल्लु चिवचिवते
एकेक दाणा टिपुन भरविते.
माय पाळण्या झोपवी बाळाला
जाई कामाला शेतशिवारा
परी चित्त तिचं घराला
दिसं तगमग वात्सल्य झरा.
झरा वात्सल्याचा सतत वाहावा
मांजरी पिल्ल्यात तो पाहावा
इकडे तिकडे पकडून तोंडात
रूतती न् दात वात्सल्य जाणावा.
दशरथ अतकरी, नागपूर
नोंदणी क्र.५५
मो.७५८८७६७९४९
[7/21, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 💢💢💢💢💢💢💢💢💢💢
_*स्पर्धेसाठी*_
*************************
_*दिनांक. ११/०७/२०२०*_
~~~~~~~~~~~~~~~
*विषय - बीज अंकुरे अंकुरे*
~~~~~~~~~~~~~~~
*कविता - बीज अंकुरे अंकुरे*
*************************
बीज अंकुरे अंकुरे
धरणीच्या पदरात
धरणीच बीजा माय
मिळे पोषक आहार
बीजा मंद वारा
सोबत निर्मळ प्रकाश
भय वाटे मनी बीजा
नभ दाटून ये आकाश
झाले अंकुराचे रोप
आला स्वप्नांना आकार
आधार दे धरणी
किलबिल करे पाखरं
भास होता अंकुरचा
मातेला हर्ष होई
बाळा नयनी भरण्या
मन आतुर होई
बीज अंकुरे अंकुरे
सुंदर तो प्रवास
रोपाचे वृक्ष होई
सृष्टीच त्याचे आवास
*नाव - सौ.रूपाली अमोल बोंद्रे*
*नोंदणी क्र. - ४५*
*जिल्हा - भंडारा*
*मो. ९९६०६१५९१८*
[7/21, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (६३)
""श्रावण सरी""
हिरवी सुंदर चादर ओढली
श्रावण सरीची किमया सारी
उन पिवळे तरूशिखरावर पडले
हळुच डोकावतो इंद्रधनुष्य निलांबरी.
श्रावण सरीची सरसर छान
चिंबचिंब भिजले सारे रान
वृक्षवेलीवर फुले बहरली श्रावणमासात सणांचा मान.
आले भातपिकाचे पर्हे जोमात
बाई माणसाचे दिसती संग्राम शेतात
श्रावणसरीने शेत चिंब भिजावे
गाण्यांच्या सुरांत रोवणे व्हावे.
पाऊससरींचे अलगद येणे
प्रकाशकिरणांचे त्यात धडकने
हिरवे पिवळे शालु पदराचे
नक्षिदार रंग दिसे झाडफुलांचे.
दनाअ, नागपूर
दि.२१/०७/२०२०
[7/21, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावणसरी
श्रावणमासी, श्रावणसरी बरसती
कोट्यानु कोटी कितीतरी.....
जणू मोत्यांच्या पंक्ती
शितल, शितल वारा
धरणी वर आला
धरणीचा श्रुंगार, सुरू झाला श्रावणमासी!!
श्रावणसरी आल्या धरणीला ओटी भरावया
लावण्याने नटते, हिरवा शालू नेसते, फुलांनी सजते.
श्रावणसरी बरसल्या टपो-या थेंबाने
रस्ता स्वच्छ सुंदर करी
लांब सडक काळाभोर रस्ता जणू
वाटे धरणी "केस"न्हावुन निघाली
श्रुंगार पाहुणी, नवतरूनी सजली
श्रावणमासी, सणांना तर उतच येई
श्रावणसोमवार, मंगळागौर असे कितीतरी येई, मनाला आनंद देई
कधी पडे पाऊस, कधी पडे ऊन
ऊन,पावसाचा खेळ सुरू
ढगांनी घेतला कापसाचा बोळा
बोळयातुंन निघाल्या श्रावणसरी
श्रावणसरी बरसल्या शेतशिवारा मध्ये
धानाची रोपं पाहुन, बळीराजा सुखावला
रिमझिम रिमझिम बरसल्या श्रावणसरी ,ओढ मनाला बेधुंद करी
श्रावणमासी श्रावणसरी बरसती
कोट्यानु कोटी कितीतरी....
सौ.माधुरी देवेंद्र भूते.
💨🌧️💨💧💦🌨️
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेमाचा ओलावा
दुःखी,कष्टी जनास
द्या प्रेमाचा ओलावा
क्षणभर विरहास
त्याच्या दूर सारावा.
मधुर वाणी,तोषवी मना
मायेचा फुटावा पान्हा.
प्रेमाचा मर्मज्ञ रुजावा
हृदयी ओघळावा ओलावा.
वात्सल्य माऊलीचे
नयनात ओथंबून.
पदरात मायेचा
ओलावा येई दाटून.
तप्त ग्रीष्माची दाहकता
धरणीचे जाळी अंग
मृगाचा जलभिषेक
ओलावा देई अंतरंग.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹 *प्रेमाचा ओलावा*🌹
तुझा हा रंग रूप न पहाता,
कशे जडे प्रेम तुझ्यावरी कळेना
कसली ही जादु प्रेमाची नाती
समजावे ही आभाळमाया ओलाव्याची
तुझे ते मोहक हसणे,
करती घायाळ हृदय माझे,
क्षणात होते जे माझे,
ते क्षणात का होई तुझे
भुरभुरत्या या तुझ्या बटांना,
हलकेच मागे करावे म्हणतोय मी,
गमावेन तुझी मैत्री म्हणून
तसाच मागे सरतोय मी
हसून तुझे टाळी देणे,
अंग अंग शहारून टाके
प्रेमाचे घालावे गाऱ्हाणे
तर भीती शब्द गोठवून टाके
कधीतरी प्रेम उमजेल तुला,
म्हणून मैत्री आपली जगतोय मी,
प्रेमाची ना सक्ती तुझ्यावर
मैत्रीत तुला जपतोय मी
*- सौ. मनोरमा तिजारे,पुणे*.
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेमाचा ओलावा
लेंकरास घास भरवतिंना
आई संतुष्ट होते
वात्सल्य डोळ्यांत
प्रेमाचा ओलावा दिसतो
मातीच्या ओलाव्यातून
बीजांकुर फुटतो
हिरवी पालवी पाहून
शेतकरी सुखावतो!!
गाय हंबरुनी
वासरू जवळ येतो
वासरांस पाहून
दूधाचा पान्हा फुटतो!!
दाना टिपावयास
पाखरं निघून जातात
पिल्लांस दाना भरविताना
मन तृष्ण होते!!
सुख दुःख झेलतांना
पती,पत्नी एक होतात
संसार फुलवितांना
प्रेमाचा ओलावा दिसतो!!
सौ.माधुरी देवेंद्र भूते
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *प्रेमाचा ओलावा*
B K गृपच्या संगतीने
मिळे ओलावा प्रेमाचा
न्हवता गंध लिहिण्याचा
तरी जडला मनी ध्यास
लेखणीत उतरविण्याचा
मिळे ओलावा आम्हा
तुमच्या गोड वाणीचा
असाच जिव्हाळा असू द्यावा
तुमच्या सहवासाचा
नाही भेटलो एकमेका तरी
ओढ लागते मनी
ग्रुप मध्ये तुम्ही दिसावे
हा एकच ध्यास असतो मनी
गत जन्मीचे हे असावे
तुमचे आमचे ऋणानुबंध
परी प्रेमाच्या ओलाव्याचा
आम्हास येऊ द्यावा मधुगंध
*नंदा भोयर*
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेमाचा ओलावा---
प्रत्येक नात्यामध्ये असावा
प्रेमाचा ओलावा
फक्त दोषच न बघता
दोषासहित गुण बघावा ।।
माया, जिव्हाळा, वात्सल्यात
नात्यांचा झरा झिरपावा
सुसज्ज भिंतीच नाही तर
असावा प्रेमाचा ओलावा ।।
वागण्या, बोलण्यात स्पेस
प्रत्येकाला ती द्यावी
आपल्या बोलण्याचा कुणा
त्रास होत नाही ।।
करावा नात्यांचा विश्वास
अन प्रामाणिक पणे मान
थोरांचा आदर तिथेच
होतो शब्दांचा सन्मान ।।
प्रेमासोबत थोडं
रागावणं ही आलं
पुरणपोळी सोबत
ठेच्याच तोंडी लावणं आलं ।।
नुसत्या गोडाने
किडा लवकर लागावा
प्रेमाच्या ओलाव्यात
थोडा कठोरपनाही असावा ।।
-------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *❣️❣️प्रेमाचा ओलावा❣️❣️*
*************************
प्रेमाचा ओलावा सदैव
असो आपुल्या हृदयी
सूड घेण्याची भावना
न यावी कधी मनी
प्रत्येक नात्यात हवा
प्रेमाचा ओलावा
समजूतदारीने सर्व
भांडण आपसात मिटवा
आयुष्य वाटते प्रेम
करण्यास फारच कमी
प्रेम केल्याने आयुष्य
वाढण्याची आहे हमी
रुक्ष आयुष्यातला प्रत्येक
क्षण वाटेल हवा हवा
जेव्हा अवतीभवती
असेल मायेचा ओलावा
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: डॉ पराग दादा समर्पित
🌷 प्रेमाचा ओलावा🌷
रुप तुझं गोंडस
चेहरा राजबिंडा
बघता क्षणीच तुआपलं करणारा
बोलत असे मधुरवाणी
लकब नेहमी मदत करणारी
लहान मुलांना नेहमी तुच हवासा
लावी सर्वांना जिव्हाळा
मायेचं दोन शब्द
सर्वांना करी तृष्ण
डॉक्टर जरी होता
परदेशात जाऊन कुपोषण वर लस केली.
मोदी नी तुझी प्रसंशा केली .
अशी तुझी कीर्ती
गर्व नसे त्याला
सर्व पेंशट तुच हवासा
अशी तुझी मुर्ती
आमच्या मनात
प्रेमाचा ओलावा....
सोडून गेलास!!
माधुरी भूते
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेमाचा ओलावा
प्रेमाचा ओलावा सदैव तुझ्या डोळ्यात
पण मायेचा स्पर्श माझ्या माय माऊलीच्या गोकुळात
आकंठ बुडाले तुझ्या प्रेमात
पण माझ्या बाबांचा जिव्हाळा
आजही माझ्या काळजात
परकेपणा आजही भासतो मला
थोडे नावीन्य आजही वाटते मला
कारण अजूनही होतात ओल्या
माझ्या डोळ्यांच्या कडा
तुझे माझे ऋणानुबंध
प्रीत तुझी माझी एकमेकांवरी
पण तरी सुद्धा सख्या
सुटतील कसे माहेरचे हे रेशीम बंध
सौ. कीर्ती शेंडे....नागपूर
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेमाचा ओलावा
प्रेमातुन बहरले नाते
मला फक्त तुच दिसावा
खूप काही सांगत आहे मला हा प्रेमाचा ओलावा
शब्दातून तुझ्या मला प्रित कळली
प्रेमाने रे तुझ्या दुःख ही सुखाकडे वळली
काही न सांगता तुला माझी प्रित कळली
सांगते देवाला असाच राहू दे जिव्हाळा
सुखी ठेव आम्हाला सौभाग्याच्या लेण्याला
सतत दे प्रेमाचा ओलावा ..........
सौ . भूमिका राजेश बोंद्रे
अमरावती🙏🏻🙏🏻
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेमाचा ओलावा
****************
बीज ओटित पड़ता
मिळे धरतीचा ओलावा
प्रेमाच्या ओलाव्यानं
नवा अंकुर फुटावा
नवजात बालकाला
स्पर्श होई तो मातेचा
बाळ कसे शांत होई
ओलावा मिळे मायेचा
दुःखी,कष्टि माणसाला
मिळे आपली मदत
आपल्या प्रेमातील ओलावा
दिसे त्याच्या चेहऱ्यात
पाठिवरी फिरे हात
गुरुजीच्या मायेचा
सर्वगुण पारंगत
होई विद्यार्थी तयाचा
हृदयी असावे प्रेम
मनी भावना त्यागाची
प्रेमाच्या ओलाव्यानं
होईल प्रगति समाजाची
बी के च्या सख्या भेटती
मिळे प्रेमाचा ओलावा
सर्व राहती मिळून
मनी अंतर नसावा
रेणुका झंझाड,भंडारा
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 प्रेमाचा ओलावा 🌺।।
प्रेमाची झणकार,
ठेव जपून हृदयात।
लागू नयेच दृष्ट,
प्रेम ओलावा जप मनात।।
प्रेमात नकोच स्वार्थ,
प्रेम हे देवाघरचे लेणे।
नकोच नुसती नाती,
प्रेम हे समर्पणाचे देणे।।
प्रेम करावे,
सृष्टीतील चराचरावर,
असावा प्रेमाचा ओलावा,
सकलांच्या मनामनावर।।
प्रेम शिकावे वृक्षाकडून,
प्रेम शिकावे नभाकडून।
नाहीच रुसवे फुगवे,
प्रेम करतात जपून ।।
मातेच्या हृदयात असतो,
सदैव प्रेमाचा ओलावा।
नाहीच पडत कोरडा,
नाहीच ठेवत दुरावा।।
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: " प्रेमाचाओलावा " आपण जन्माला येतो तेव्हा मायेच्या त्या मातृत्वात...... वडिलांच्या करअंगुलीच्याआधाराने टाकलेल्या पहिल्या पाऊलखुणेत..... भाऊबहिणीच्या अल्लड खोडकर भांडणात..... शिक्षकाने गिरविले ल्या पहिल्या श्रीगणेशात... जिवलग मित्र मैत्रिणींसोबत खेळलेल्या विटी-दांडू आंधळी-कोशिंबीरित.... सासरच्या वाटे वर जाताना झालेल्या द्विधा मनस्थितीत... संसारात सासरच्या मंडळींची आवड-निवड जपत असताना... पतीच्या सोबत घालवलेल्या आंबट-गोड प्रत्येक क्षणात... मातृत्वाची चाहूल लागतात स्वतः हात मातृत्व जागृत होताना.... मुलांच्या संगतीने पुन्हा बालपण जगताना... बालपणापासून आतापर्यंत मिळालेल्या सर्व व्यक्तींचे मन जपतांना..... असाच हा प्रेमाचा ओलावा कधीच जीवनात संपुष्टात न येणारा..... पण सदैव हृदयात जतन करून ठेवणारा ..... प्रा. स्वाती रु.पिंगळे( शिंगणजुडे )अमरावती
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेमाचा ओलावा
ज्याच्या आशीर्वादाचा प्रेमळ कर !
पाठीवरून फिरतांना गहिवरतो मम उर !
मायेचा तो स्पर्श, प्रेमाचा ओलावा जुडतात दोन्ही कर !
वाटते एकदा तरी फिरुनी !
यावीस ग परतूनी !
कुशीत मग तुझ्या दडोनी !
मायेने जाईन चिंब भिजुनी !
भुकेलेला तान्हा प्राशन करी अमृत पान्हा !
अनुभता मातृत्वाच्या ओलाव्याचे ते क्षण !
स्वर्ग सुखही वाटे ठेंगण !
हंबरडा फोडते जशी गाय !
तीही एक माय !
स्तनाशी लावून वासरू !
प्रेमाने चाटते वासरू !
प्रेमाचा ओलावा जर नसेल या जगी होईल रुक्ष जीवन !
अर्थ न जगण्यास व्यर्थ होईल जीवन !!
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *प्रेमाचा ओलावा*
प्रत्येक नात्यात असावा
प्रेमाचा ओलावा।
तरच तो संपवु शकतो
दुरावा।।
सर्वां मध्ये असतात
चांगले वाईट गुण।
प्रेमाच्या ओलाव्याने
पळुन जातात दुर्गुण।।
गाय हंबरता वासरु
पळत सुटतो।
वासरु पाहताच्
गायीला पान्हा फुटतो।।
प्रेमाच्या ओलाव्याने
नाते बनत जाते।
कुठलेही नाते नसतांना
मैत्रीचे होत जाते।।
अशी हि मैत्री
जी बनवते एक नातं।
असं नातं जे कधिही
न विसरनारं।।
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेमाचा ओलावा-
प्रेम करतांनी प्रेमाचा ओलावा
कधीच नाही कळलं,
जेव्हा कळलं तेव्हा
वेगळंच काहीतरी घडलं,,
आठवणींच्या खोलात
जास्त काही शिरत नाही,
प्रेमाच्या ओलाव्याशिवाय
मनात काही उरत नाही,,
प्रेमाचा ओलावा मनातच
ठेवायचा असतो,
चारचौघात सांगून
अपमान करायचा नसतो,,
दिसायला दिसतात
तुझे निष्पाप डोळे,
पण त्या डोळ्यांनीच केले
माझे मन वेडे,,
सौ श्वेता कानतोडे
अमरावती
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेमाचा ओलावा
आई माझी जसा ममतेचा झरा
तिच्या पदरात मिळे मायेचा ओलावा
कधि सखी बनून हितगुज करि
कधी रागावुन धपाटे घाली ।।
लगेच जवळ घेवून
गोजांरून घेई
मैत्रीन जिवाभावाची
आपल्या प्रेमाच्या ओल्याव्याने
मज सावरून घेई
सौ. नंदा चेटुले
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेमाचा ओलावा...🌹
सख्या माझ्या छान
विचार आहेत सुंदर
प्रेम देतात सर्वांना
दु:खावत नाही कुणाला
वेळात वेळ काढून
लेखन कविता करतात
लाँक डाउनला मात करत
दिवस उत्तम काढतात
कधी निसर्गाच्या सानिध्यात रमतात
कधी पदार्थ बनवण्यात रमतात
तर कधी मेहंदीच्या पानावर
आई बाबा सासु सासरच्या गप्पा
मध्ये रमतात.
असाच राहु दे
बी.के ग्रुपमध्ये सर्व
गोड सख्यांचा प्रेमाचा ओलावा...🌹🌹
सौ.सुचेता सार्वे
पनवेल. नवी मुंबई🙏🏼
[7/22, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रेमाचा ओलावा
आईच्या ममतेत,
वडिलांच्या धाकात,
भाऊ बहिणीच्या भांडणात,
असतो प्रेमाचा ओलावा.
बीज अंकुरल्या मातीत,
करता निगराणी रात्रंदिस,
प्रेमाच्या ओलाव्याने,
बहर येई त्यास.
गाईचे पाडस,
ढुसन्या देई तिस.
प्रेमाच्या ओल्यावाने,
माय चाटतसे अंग.
रण-रणत्या उन्हात फिरता,
जीवास कोणी गोंजारतो.
प्रेमाच्या ओलाव्याने,
तोही लावतसे जीव.
सारेच भुकेले,
प्रेम,दया,मायेचे.
प्रेमाच्या ओलाव्याचे,
क्षण दोन्ही पुरेसे.
रंजल्या-गांजल्या जीवास,
मिळता प्रेमाचा ओलावा,
प्रसन्न होई ईश,
तोही प्रेमाचा भुकेला.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि.21.7.2020
[7/22, 6:44 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: दूरच्या रानात
हिरव्या रानात
मोराच्या मनात
पावसाच्या सरीत
नाचू आनंदात.
दूरच्या रानात
मैनेच्या कानात
गुज सांगे राघू
आंब्याच्या बनात.
कोकिळेची तान
वेलींची कमान
बहरला पळस
केशरी छान.
दूरच्या रानात
धरा नभ मिलनात
विसावा दिनकरा
सोनेरी क्षितीजात.
हरणांची पाडसं
धावती सुसाट
दूरच्या रानात
उंच उंच गवतात.
दूरच्या रानात
गार गार वात
मन धुंद होते
त्या रानगंधात.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/22, 6:44 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.१७
रात्रीच्या गर्भात घेते जन्म उषा
प्रभातीला जागवित नवी आशा.
उजळल्या प्रकाशाने दहाही दिशा
नमन तुला दिनकरा,जगदिशा .
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/22, 6:44 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ""संस्कारधारा."" (०७)
बंद झाल्या पाऊस सरी
गर्मीचा उकाडा लय भारी
शेतात निंदण काय करावं
पिकांची कांता नाही बरी.
दनाअ, नागपूर
दि.२२/०७/२०२०
[7/22, 6:44 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 प्रभात पुष्प 🌺।।३५.
* श्रावणसरी बरसे*
* धावती मेघ काळे *
* धरा पाही कुतूहल *
* नभात श्रावण सोहळे *
सौ.कमल सार्वे भंडारा.
२२|७|२०२०.
[7/22, 6:44 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: [[खेद]]
संत्रस्त जीवनाचा,..मी अश्वमेध करतो
जे बोल मज मिळाले,त्यांचेच वेद करतो
लपवून तोंड घेती,.....मागेल या भितीने
असल्या कडून कुठली,कोणी उमेद करतो?
जितकी जमेल तितकी नाती जिवंत ठेवा
पैसा बरेचदा हा ,......रक्तात भेद करतो
मज राहिला न आता,.कुत्र्यावरी भरोसा
चाटून पाय माझे ,.....ताटात छेद करतो
वाटा फितूर झाल्या,भिंतीस कान आले
परकोट हा घराचा,पडका अभेद करतो
मज वागता न आले,खोट्या जगा प्रमाणे
हा फक्त दोष माझा,मी व्यक्त खेद करतो
ओमप्रकाश ढोरे
[7/22, 6:44 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (६४)
""प्रेमाचा ओलावा""
धागा जिवनाचा प्रेमे गुपीत जावा
शब्दप्रेमाने समाज सिंचीत करावा
प्रेमाचा ओलावा कधी न् सुकावा
आहे प्रेम भुकेला त्रिलोकी राणा
भाऊ प्रेमभावाचं जगणं असावं
वापरावं शब्द कुठं कसं जाणावं
वेळप्रसंगी पाहुन बोल मोलाचं
विखारी भाषेनं मन विव्हळावं.
ओलावा प्रेमाचा हृदयी असावा
नेत्र दर्पणात सदा दिसावा
शब्दरूपानं सतत पाझरावा
सुखदुःखात तयां शब्द आठवावा.
कवी कवयत्रींनी शब्दे अभिप्राय द्यावं
बि.के.सा.सं.प.ला मायेनं बघावं
प्रेमाच्या ओल्यावात स्नेह साधावं
सर्वांमुखी "सुखिन:संतु" बोल असावं
दनाअ, नागपूर
दि.२२जुलै२०२०
[7/22, 6:44 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ईशपुष्प 25 वे
----------------
श्रावण आला, श्रावण आला
नयनरम्य सोहळा झाला
भूधरेवरी सरसर बरसला
पिवळ्या छटेत सप्तरंग ल्याला ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/22, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अंजली बांते, भंडारा
[7/22, 6:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रंजना हलमारे साकोली
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🛕शरण तुला भगवंता🛕
जन्म घेतले मी आईचे पोटी
तुच दाविली मज अप्रतिम सृष्टि
आईचे रूपी दिसे अनंता
शरण तुला भगवंता
ऊन,पाऊस,वारा तुझी देण ही
झाडा,फुलात तुझे रूप पाही
गंध चोहिकडे पसरवि अनंता
शरण तुला भगवंता
सूर्य,चंद्र,तारे बसविले नभी
ब्रम्हाण्डातुनि निर्मिली धरती
आभाळासम भासे अनंता
शरण तुला भगवंता
नद्या,नाले,ओढ़े ओसंढुन वाही
तयांच्या संगे फिरे दिशा दाही
सागरासम अथांग अनंता
शरण तुला भगवंता
पशु,पक्षी सारे आनंदात राही
प्राणीमात्रा मध्ये वसे ठाई ठाई
विविध रुपे किती वरनु आता
शरण तुला भगवंता
सौ.रेणुका झंझाड
बेला(भंडारा)
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *शरण तुला भगवंता*
***********************
तिमीरातून उजेडाकडे
तूच दाखव रे वाट
दुष्काळी भागातही
वाहू दे पाण्याचे पाट ||
अंधारलेल्या विश्वाला
तुझाच रे आधार
कडक शिक्षा देऊन
करू नकोस रे निराधार ||
चाले ना तुझ्याविना
संसाराचा गाडा
तूच आवर रे
आयुष्याचा पसारा ||
तूच माय बाप
तूच पालनकर्ता
मी आलो शरण
तुला भगवंता
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शरण तुला भगवंता
सुंदर जग हे दाखविले मला
ऋण धरती मातेचे फेडावया
जन्मास घातले तू मजला
शरण तुला मी भगवंता
निसर्गाची सुंदर रचना केली
सर्व जीवांची निर्मिती केली
पशुपक्षांमधे प्राण घातला
शरण तुला मी भगवंता
जन्मदात्री चे पांग फेडाया
कसे फेडू उपकार तिचे
म्हणून संधी तिच्या सेवेची
दिली तू मजला
शरण तुला मी भगवंता
देशसेवा हीच इशसेवा
माणसात देव आहे
पटवून दीले तू मजला
शरण तुला मी भगवंता
सौ.कीर्ती शेंडे...,नागपूर🙏
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: * शरण तुला भगवंता *
जरी जन्मले आईच्या पोटी।
तुच दिले डोळे मज
पाहण्या स्रुष्टि।
तुच दिली वाणी मज
वर्णाया स्तुती।।
शरण तुला भगवंता 🙏
जरी वाढले आईच्या कुशीत।
तिनेच शिकवले देव बाप्पा
म्हणायला।कारण तुच तिचाही बाप्पा।।
शरण तुला भगवंता🙏
जरी जातो कुणी आम्हा
सोडुनी
देवाज्ञा झाली म्हणती सारी।
वाटते आहेत ते तुझ्या
कुशीत सुरक्षित।।
शरण तुला भगवंता🙏
रोगी होता जाई डाँ . पाशी
तुच भासतो त्यांच्या ठाई।
पण तुझे अस्तित्व त्याहुनही भारी।।
शरण तुला भगवंता🙏
आनंद होता खळखळुन
हासतो।
आणी रडतोही तुझ्या पाशीच्।
तुच प्रत्येक कणाकणांत।।
शरण तुला भगवंता🙏
तुच व्यापीली स्रुष्टी।
तुच आकाश तुच प्रुथ्वि।
तुच झाडापानांत तुच प्राणीमात्रांत तुच दिली हि
काया मिसळण्या मातीत।।
शरण तुला भगवंता🙏
ही स्रूष्टी निर्माण केलीस तु
नको परिक्षा पाहु।
सर्वांना सुखी ठेव
संकट जाउ दे पळुन।।
शरण तुला भगवंता🙏
सौ अंजलि बांते भंडारा
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏 शरण तुला भगवंता🙏
आदीही तूच
अंतही तूच
तूच सर्वांचा पाठीराखा
शरण तुला भगवंता
दुःखा तला सोबती तू
सुखाची आहे खान तू
चराचरातला निर्मळ झरा
शरण तुला भगवंता
जगण्याला अर्थ दिला तू
चैतन्य आणले जीवनी तू
माणूस म्हणुनी माणसाला घडविलेस तू शरण तुला भगवंता
अनंत आहे तुझी रूपे
तू सकलांचा दाता
सृष्टीचा आहे तू निर्माता
शरण तुला भगवंता
सौ अश्विनी अमर सपाटे लुटे
अमरावती
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *शरण तुला भगवंता*
अनाथाच्या नाथा
दीनदयाळाभगवंता
तूच माझ्या बापा
शरण तुला भगवंता
करता करविता तू
सृष्टी निर्माताहि तू
तव चरणी ठेवितो माथा
शरण आलो भगवंता
ब्रम्हांडाचा विघ्नहर्ता
सृष्टी मज दाविली आता
जिवा शिवा चा रचियता
शरण तुला भगवंता
तव लेकरू मी आता
तू जगाचा दुःखहर्ता
तूच जगाचा सुखकरता
तुझ्या पायी ठेवीते माथा
शरण तुला भगवंता
नंदा भोयर
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺 शरण तुला भगवंता 🌺 जीवनाच्या प्रत्येक घडीला साथ तुझी हवी आहे.... सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणाला तुझेच नाव ओठी आहे.... तुझ्या अस्तित्वाने जगण्याची उमेद ही कायम आहे.... तुझ्या वरील विश्वासाने जीवात प्राण आहे .... कितीही संकटे आली तरी त्यांचा सामना करण्यासाठी तुझीच साथ आहे.... जीवात प्राण असेपर्यंत मी शरण तुला भगवंता....🙏 प्रा. स्वाती रु. पिंगळे (शिंगणजुडे)अमरावती
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।🌺शरण तुला भगवंता 🌺।।
शरण शरण,
आली भगवंता।
सुखी ठेव मज,
तूच गुणवंता।।
निर्मळ मन हे,
तुला पाहतांना।
लागू दे लळा हा,
फुले वाहतांना।।
अज्ञानि पामर,
सांभाळी अनंता।
भोगिल्या यातना,
पूरे भगवंता।।
क्षमा करी मज,
झाल्या जरी चुका।
घडू दे ही सेवा,
मारीयेते हाका।
आली मी शरण,
तुझियाच दारी।
घेई तू पदरी,
तुझ्या या मंदिरी।।
घडू दे सेवा,
मज हाताने।
मिळू दे वर,
तुज कराने।।
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शरण तुला भगवंता🙏
अनंता मधुसूदना अनाथांच्या नाथा
सदैव नतमस्तक होऊन टेकवीन माथा
शरण तुला भगवंता
लीला अनंत तुझ्या नकळे मानसा
तूच आमचा करता करविता
गर्विष्ठ दुर्गुणांना दाखवीत आरसा
शरण तुला भगवंता
तुझ्याच भक्तीत लीन व्हावे वाटते अनंता गजानना नामाने रे तुझ्या दुःख ही माझे सरते
शरण तुला भगवंता
नतमस्तक होऊन मी करती प्रार्थना
अवघाची श्वास व्हावा वेणू नाद
काळजाचे व्हावे वृंदावन
मन भिजले अंतरी दर्शना
शरण तुला भगवंता
सौ. भूमिका राजेश बोंद्रे
अमरावती
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏🏻शरण तुला भगवंता🙏🏻
विश्वाचा तू पालनकर्ता,
साद घालिते दयाघना।
नित्य तुला स्मरता देवा,
शरण तुला भगवंता।।
अनाथांचा होसी नाथ,
पतीतांचा करिसी उध्दार।
थोर तुझे उपकार दयाळा,
शरण तुला भगवंता।।
नाम तुझे स्मरता देवा,
षडरिपुंचा होतो नाश।
श्रद्धा-सबुरी तुझाच ध्यास,
शरण तुला भगवंता।।
अज्ञानाला सारून दूर,
ज्ञानाचा दे तू प्रकाश।
तुझ्या चरणी ठेविते माथा,
शरण तुला भगवंता।।
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि.23.7.2020
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: , मी शरण तुला भगवंता
तुझी मूर्ती बाप्पा, समोर असू दे, मी तुला सतत डोळे भरून पाहू दे,
तुझी सेवा माझ्या हातून घडू दे
शरण तुला भगवंता
तुझ्या विना नाही किनारा
मोह माया हा पसारा
तूच आहे एक सहारा
तूझ्या आशीर्वादा चा
फुलू दे पिसारा ,
शरण तुला भगवंता
उपकार तुझे कशी मानू
माझ्या चुकांवर तू पांघरू
शब्द नाही माझ्या उरू
भगवंता तू माय बाप मी
लेकरू
मी शरण तुला भगवंता
सौं शोभा राजेश खोकले
यवतमाळ
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 👋शरण तुला भगवंता👋
आई वडिलांच्या मायेने आठवते मी गाथा, विठ्ठलाच्या चरणी
ठेविते मी माथा,,
👋 शरण तुला भगवंता👋
अनाथांचा नाथ तू अनंता,
सुख दुःख सावरायला
तूच गुणवंत,,
👋शरण तुला भगवंता👋
तूच कर्ता आणि करवीता
नेहमीच प्रार्थना माझी,
सर्वाना सुखी तू ठेविता
👋शरण तुला भगवंता👋
तुझे ध्यान अंती येईल कामी,
शरण आलो तुला मी,,
👋शरण तुला भगवंता👋
माग मागुणी येतो तुझ्या दारी,
जन्म मरणाच्या चुकवाया फेरी,,
👋शरण तुला भगवंता👋
सौ श्वेता कानतोडे
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹मी शरण तुला भगवंता🌹
निर्गुण निराकार असं तुझं रूप
तुच आरंभ तुच अंत
तुच कर्ता करविता तुच रे दाता
मी शरण तुला भगवंता !!
कोरोनाची महामारी
सर्व देशाला लागले ग्रहण भारी
कोरोनाच्या राक्षसाला तुच रे भारी
मी शरण तुला भगवंता !!
डॉक्टर,पारिचारिका करीतेरे सेवा
कोरोनाच्या पेशंटला जगविण्यासाठी
देरे देवा त्यांना बळ,प्रोत्साहान.
मी शरण तुला भगवंता !!
पोलीसदादा, भारतीय सैनिक करतात रात्रंदिन देशाची सेवा
जीव स्वत:चा धोक्यात घालून
कोरोनोपाई जीव गेला त्याला खांदा देई
देरे देवा त्यांना हिंमत, आशिर्वाद!
मी शरण तुला देवा !!
शास्त्रज्ञ अन् वैज्ञानिक करतात
रे प्रयत्न औषधांसाठी,
कोरोनोची "लस" शोधण्यासाठी!
देरे देवा त्यांना "यश"!
मी शरण तुला भगवंता !!
प्रार्थना माझी मान्य कर देवा!!
मी शरण तुला भगवंता!!
सौ.माधुरी देवेंद्र भूते.
🌺🌺🌺🙏🙏🌺🌺🌺
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।शरण तुला भगवंत।।
सुर्य चंद्र नैसर्गिक तुझे रुप
पशु-पक्षी ही तुझेच जीव
मनुष्य जन्मही त्यातला एक
लाभला आम्हा अनंता
शरण तुला भगवंता।।
ऋतुचक्राचा तुझा ठेवा
जेव्हा कोपशील तु देवा
दाविल तु त्यांचा करिश्मा
कधी अति वृष्टि अति वारा
शिक्षा देशी तु आम्हांला
शरण तुला भगवंता।।
पाप पुण्य तुझेच मार्ग
लावलेस मनुष्य जन्मास सर्व
जो करती जसे कर्म
त्यास लाभे तसे मर्म
हे सुख दुःख घेण्यास
शरण तुला भगवंता।।
योग्य मार्ग दाखविण्यास
तु घेतलास योगी रुप
सार्थी लागावे मनुष्य जन्म
येऊन बसले पृथ्वीवर
दर्शन घडविते कल्यान
त्यासाठी शरण तुला भगवंता।।
सौ.चंदा शेंडे
नागपुर.
[7/23, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹 शरण तुला भगवंता. 🌹
प्रथम तुला वदिंतो ,गौरीपुत्र गणेशा
विश्वेषवरा , शरण तुला भगवंता........
वक्रतुंड तू , एकदंत तू गणेशा
गजेषवरा, शरण तुला भगवंता........
महाकाय मुख,लोचन मनोहरा
लंबोदरा, शरण तुला भगवंता.........
नेत्र कमल तव तेजाळलेले ,सुखवी मना
गजानना , शरण तुला भगवंता..........
रुप आगळे रम्य मनोहर भरले अंतर्यामी
मंगलमुर्ती , शरण तुला भगवंता..........
प्रा ण फुलांची गुंफुनी माळा आळविते
बुद्धीदाता , शरण तुला भगवंता...........
सोडीव विळखा,सावर धरती भुपती
विश्वेषवरा , शरण तुला भगवंता...........
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
.
..
[7/23, 7:51 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.१७
मन हे मोगरा
अर्पूणी चरणा
प्रभात चिंतना
सिद्ध होई.
निशेचे हे तम
निवारण्या गम
सूर्यनारायण
. येई दारी.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/23, 7:51 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ""संस्कारधारा"". (०८)
स्वार्थच सर्वत्र कसा माजला
ईशनामाचा सोंग दाखवी सगळा
उभा जलांत जसा ध्यानी बगळा
मिटुनी डोळे बोका दुध प्राशिला.
दनाअ, नागपूर
दि.२३/०७/२०२०
[7/23, 7:51 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (६५)
"" शरण तुला भगवंता""
तुम्हीच आद्या तुमीच अंता
चिंता आहे जिवना अनंता
जिव शिव जोडी घडता
जिवन सागरा तुमीच भाग्यवंता.
शरण तुला भगवंता.....
पाखरू उंच आकाशी उडवा
झुळुक वार्याची पानंफांदी हलता
माय लेकरांस पान्हा सोडावा
तुझ्या च कृपेचा सारा पसारा.
शरण तुला भगवंता....
तुझ्याच कृपेनं आलो जन्मा
सुखदुःखाचे भोग हे आता
कृपेनं तुझ्या सहतो दानता
उपकार तुझे किती कृपावंता.
शरण तुला भगवंता....
वारकर्यासह वारीत चालता
मुळा ,भाकर,भाजी त्यांना चारीता
वारीत आरोग्य सेवाही पुरविता
पंढरपुरात विटेवर तुमीच दिसता.
शरण तुला भगवंता.....
दनाअ, नागपूर
दि.२३/०७/२०२०
[7/23, 7:51 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 प्रभात पुष्प 🌺।।३६.
* क्षमा करी मज *
* झाल्या तरी चुका *
* घडू दे ही सेवा *
* मारी ते य हाका *
सौ.कमल सार्वे भंडारा.
२३|७|२०२०.
[7/23, 9:38 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शरण तुला भगवंता
किती रूपे तुझी
किती तुझे नाम
शोधू कुठे तुला अनंता
शरण तुला भगवंता.
तुच अन्नदाता
तुच विघ्नहर्ता
तुच कर्ता,अन् करविता
शरण तुला भगवंता.
तुच माय बाप
तुच बंधू सखा
तुच आयुष्य रक्षिता
शरण तुला भगवंता.
तुझ्या कृपेची
असू दे पाखरं
तुच अमुचा भाग्यविधाता
शरण तुला भगवंता.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/23, 9:38 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शरण तुला भगवंता
जगावेगळी किर्ती तुझी खुप,
पाहताे डाेळाभरुनी,अनंत तुझे रुप
तुझ्या भक्तीत व्हावे तल्लीन,
अनंतात व्हावे पाप जसे विलीन
शरण तुला जावे, पुण्य करुन
नाम तुझे घ्यावे, जपावे हरीनाम
सुगंधापरी जसे हरपुनी भान
शाेभुनी दिसे चांदिचे पाट
तुझ्या भजनी रंगण्यास केलाय थाट
शरण जावे तुला, या भक्तीत अफाट
तुच अनंत, ब्रम्हांडाचे गुणवंत
पाहुनी रुपं,तुझी सेवा करीती संत
टिळा लावुनी माझ्या कपाळी
करताे आरंभ करुनी भुपाळी
शरण जावे तुला, जमली मांदीयाळी
प्रिया र गाेमाशे
(आकाशवाणी निवेदीका) चंद्रपूर.
[7/24, 5:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
~~~~~~~~~~~~~~~~
*विषय : नवरा बायको*
नवरा बायको मध्ये
एकदा गम्मतच झाली
बायकोला आवडे शिरा
नवर्याला भेळ ओली
माझा आवडीचा शिरा
बनविन म्हणे बायको
तिची किरकिर ऐकून
नवरा झाला सायको
शिरा बनवण्या बायको
गेली स्वयंपाक घरात
तुपात भाजला रवा
साखर टाकली त्यात
गरम पाणी टाकून
मेवा टाकला मस्त
मनात आले तिच्या
करावा एकटीने फस्त
वाटीत शिरा काढून
खाऊ लागली पटपट
चव त्याची खारट लागे
पोटात जाई ना झटपट
लक्षात आले तिच्या
साखरे ऐवजी मीठ घातले
हसुन हसुन नवर्याच्या
शर्टाचे बटनच तुटले
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[7/24, 5:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
बहिण मायी पावनी माया घरी आली
तिले पाऊन स्वारी जाम खुश झाली
म्या म्हणलं बापा गाडी लयच दमात हाय
येऊन जाऊन एक नजर माया बहिणीकडंच पाये
म्या म्हणलं तुमच्या समोर मी उभी हाय
हा माणूस चष्म्यातून टकटक पाये
म्या म्हणलं आता हे लय झाली बापा
याचा काई नेम राहिला नाही आता
झट घेतला निर्णय पाठवलं तिले गावाले
म्हणे मले,
बहिणी संग कशी वागतं हाय व काही तुया जीवाले
कोण खरं अन कोण खोटं
दिसते ना बाई देवाले
*नंदा भोयर*
[7/24, 5:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
--------------------
हनीमून......
समाजात होता वधुवर
परिचय मेळावा
तिने पाहिले मी पाहिले
दोघांच्या गप्पा रंगल्या
मग काय विचारता
झाले ना बुवा लग्न
सगळे विधी पार पडले
पाहुणे गेले आप आपल्या गावी
घरात आई वडील
मी आणि बायको
बायको म्हणाली जाऊ
या का हनीमूनला
मी म्हणालो घरातच
आहे हनीमून
ती चिडली माझ्या वर
म्हणाली दाखवा कुठे आहे
मी घेतली परात
त्यात घातले पाणी
पोर्णिमेचा चंद्र होता
तिला आणले बोलावून
म्हणालो पाहा आता
पाण्यात किती छान
दिसतो आहे हनीमून
गालात हसली आणि
म्हणाली.असु द्या पैसे
नाही म्हणून सांगा
घरातच करु हनीमून
सौ.सुचेता सार्वे...
पनवेल..
[7/24, 5:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
* टिपली *
ना हातात बांगडया, ना कानात डूल
ना लावे कपारी टिकली
शेजारी दादा,माह्या
राहे एक टिपली !
लटा त तिच्या सदा, उडती वाऱ्यावर
थोबडयाले चोपडते करीम दिसभर
कापडत लागे तिले अर्धाच वार
अन,नखऱ्यान तिच्या होई
पार कलेजा गार
दिसभर पाही आरशात फेस
पाहून तिले येई पोट्याच्या तोंडाले फेस
अव पोरी समाजाचा ठेव जरा भान
टांगा उघड्या टाकून नाही वाढत तुही शान
नको बनू लक्ष्मी, न नोको बनू दुर्गा
पर माहे बया, घालनामा जराशी आंग भर झगा
बाईच्या जन्माले आलीस त बाई वाणी राय
नारी जातीची शान तुह्या वरच हाय !!
[7/24, 5:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बसले मी वर्कफ्रौम होम करीत
एक मुलगा आला दम टाकीत टाकीत
विचार ले त्याला मी काय झाले बाळा म्हणाला कसा टाटू टुटला बघा टुटला.
वाटलं मला ह्याचा हात तुटला
त्याचं सांत्व्वान केलं पाणी दिलं
गेटमध्ये जाऊन बघते बाहेर उभा कुत्रा
अरेच्या हा तर कुत्रा तू म्हणाला टुटला
होय टाटू टुटला टुटला
एवढा कां रे तू भित्रा म्हणेटुटला टुटला.
गेटमधून निघताना त्याच्या अंगावर कुत्रा भुंकला
पळून घाबरून त्याचा जिव वेडापिसा झाला
टुटला टुटला टुटला म्हणेआई टुटला टुटला
आईने बघितले दिसला कुत्रा तिला.
सौ सुषमा पडोळे भंडारा
[7/24, 5:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सिनेमा
म्या म्हणलं नवऱ्याला चला न सिनेमा पहायले
नवरा म्हणे कायले मराले
कोरोना होईन न आपल्याले
मले कानी बेंजा रड आला
नवरा म्हणे माया घरी
श्रावण सुरू झाला
सांग म्हणे कोणता सिनेमा पायत
पटकन तयारी कर का घरीच राहतं
टीव्ही त आली बातमी
बायर निघू नका
म्या केला इचार खरं हाय म्हणलं
सिनेमा नाही पायला तो काही
बिघडून नाही राहिलं
माही बायको आता शायनी झाली
विचार करून तीले अक्कल आली
घरीच राहू म्हणे कुठं नाही जाऊ
जगासोबत आपणही शायन होऊ
घरीच राहुन साथ समाजाले देऊ
🙏
सौ भूमिका राजेश बोंद्रे
अमरावती.
[7/24, 5:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता---
आजोबा म्हणे, उघाड आहे
जायचं का फिरायला बागेत
आजी हसून हो म्हणाली
पदराआडुन लाजत ।।
हळू हळू गेले दोघही
हातात हात घेत
बसलेत बाकावर
उगाच डोळे मिचकावत ।।
आजोबा आजीच्या
गोष्टी आल्या रंगात
जोरदार पावसाच्या
वाराही असे संगात ।।
भर्रकन उठले दोघेही
घराकडे परतायला
चिखलातून आजीचा
पायच हो घसरला ।।
आजोबा लागले उचलायला
तेही पडले तिच्यावर
आजींच्या केसांची पिन अडकली
आजोबांच्या शर्टाच्या बटनावर ।।
धमाकेदार पावसातही
लोकं गोळा झाले
दोघही शरमेने
गारे गार झाले ।।
-------------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[7/24, 5:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता ..
रक्षाबंधनाला भाऊ घरी आला
पायताच त्याले सटकला यायचा पारा
गूरू गूरू पाहे वटारून डोळे
डोळयानंच म्हणे विचार कधी जाते त्याले....
एक दोन दिवसांनी पाहुणचार मी केला
भावाला ईचारले स्वयपाक कसा झाला
नवराच माह्या टुरकन बोलला
म्हणे, म्हशीनी रांधला हल्याने खाल्ला......
भावानं ओळखली माई वाली गोची
म्हणे,बँग भर. न्यायला आलो घरी
नवरयाची माह्या बोलती बंद झाली
म्हणे,आता नको धाडतो काही दिसानी.
मी पण आता हट्टाला पेटली
बँग भरून जायला निघाली
नवरयानी अडवली वाट, म्हणे,
येडे,बायकोची सर येईन का कुणाले.......
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर
[7/24, 5:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता- पिनारा नवरा
स्वभाव आहे त्याचा सद्गुणी,
त्याच्या मनात रायत खुनखुनी,,
घरात सदा पिऊन असतो,
अंगात त्याच्या शेषनाग धसतो,,
आयकत नाही तो कोणाले,
शिकवतो घरातल्या लोकायले,,
साऱ्याचा सयपाक करून घेतो,
जेवणाच्या ताटावून उठून देतो,,
पोई केली पुरणाची,
भीती वाटते मारण्याची,,
ताट नाही घेऊ देत जेवायला,
कोण लागण त्याच्या तोंडाला,,
कटकटी पाई म्या तयारी केली,
कामावून सवारी घरी आली,,
इन्कार केला त्यानं जाण्याला,
म्या मनानं नवरा केला,,
सौ श्वेता कानतोडे
[7/24, 5:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
**************
झाडी मंधी लागे
रोवन्याच्या सुट्या
सुट्याय मंधी रोवले
जात सप्प्या पोट्टया
मी ही माह्या माय संग
खुशिन रोवाले गेली
घसरली धुऱ्यावुन बांधीत
चिखला मंधीच पल्ली
मी जोऱ्यान लागली लळाले
बाया खिखि लागल्या हासाले
मायनं मले धरुन उचल्लन
बांधीतल्या पाण्यान धुतलन
सपासप चालत आली
घराकळ निंघुन
दिसल्या नाही पहिजे म्हुन
मोऱ्या ठेवला वरतुन
घरापाशि आली तव्हा
मोऱ्यान गोटा नाही दिसला
ठेस लागली जोऱ्यात
थोबाड माह्या फुटला
सौ.रेणुका झंझाड.बेला/भंडारा
[7/24, 5:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पिंट्याच लगीन (हास्य कविता)
गावच्या पिंट्याले म्हणलं,झालं तुहय लगन,
बोलावलं नाही पार्टीले, अस असते का मगन?
पिंट्या म्हणला,कायच लगन,कायची पार्टी,
चाल आपल्या टपरीवर सांगतो तुले कहाणी,
शेजारच्या बंगल्यात आली नवी राहुटी
दोन पोरी अन् एक पोरगा दिसे मले तटी.
येता जाता एक पोरगी पाहे मले वाकून,
मी पाहून हासो तिले,ते पाहे मले हासून.
मले वाटे गड्या, माय जमलं जुगाड,
चांगल्या घरची पोरगी भेटली,भेटलं काही घबाड.
दोन महिन्यातच झाली लगीन घाई,
कोनाले न पुसताच वाजवली शहनाई.
लग्नानंतर झाला पुरता माया गेम,
पोरगी निघाली त्या घरची,कामवाली मेम.
मी म्हणलं तिले,तू त्या घरची लेक दिसे,रोज नटून,
ते म्हने,तिथली पोर जे देय टाकून,
तेच पाहो मी सारं वापरून.
असं झालं भावा!वरच्या रुपाले भूललो,
अन् पोरीच्या नादान असा मी नडलो....
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.
दि.24.7.2020
[7/24, 5:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
काय सांगू बाई माया
ईवायाची गंमत
आमच्या घरी आले का
भलतीच रंगे पंगत
बाई म्हणे तुमच्या हातच
जेवणच लय मस्त
दवडी भर पोळ्या
एकटाच करे फस्त
मी मनो बापा हा
उपसलात नाही
कावून असा करेत
मले नवलच वाटे बाई
गावाकड जाच नावच नाही काढे
तयारी झाली का
कोणटया काणटयात दडे
मले म्हणे बाई इथं
लयच मस्त वाटते
मी मनल इवाई तुमच्या सारखे
दहात एकच भेटते
सौ नंदा अ भोयर
[7/24, 6:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रंजना हलमारे
[7/24, 6:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी नात "मुक्ताई" ला समर्पित
संस्कारधारा. (०९)
मुक्ताई सह घरट्यात नव नात आलं
बाल लिलेनं घरसंसारात आनंद झालं
चंद्रकलेसम आहे भारी कौतुक करते
आजी आजोबा पाहुन मस्त खिदळते.
दनाअ, नागपूर
दि.२४/०७/२०२०
[7/24, 6:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.१९
आला श्रावण महिना
शिवशंभूची आराधना
पुजा गौरी गजानना
तिमीरातूनी तेजाकडे
नेई सकल जीवना.
सौ.मीरा शेबे भंडारा
[7/24, 6:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺प्रभात पुष्प 🌺।।३७.
* गुरु माझे मायबाप *
* केले आम्हा ज्ञानवान*
* वाहीला अनंत भार *
* दिले आम्हा समाधान *
सौ.कमल सार्वे भंडारा.
२४|७|२०२०.
[7/24, 6:18 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सासं.प.
हास्य कविता. (६६)
टाळेबंदीत सासर्यानं निमंत्रण धाडलं
जावईबापु फागाले आमचेकडं यावं
हरकल्या मनानं गेलो बायको पोरांसह
पोरी जावयाले पाहुनी मन सासुचं फुललं.
अमदा होळी सणाला मजाच झाली
भांगाची लहरी नशा अंगलट आली
तरंगत चालत होता नशेत माणूस
एकच सावली दोन भासायला लागली.
नशेत मले पाहुन बायको रंगात आली
काय सांगू भाऊ गडबड झाली
बायको सोडुन मेव्हणी हातात आली
घरवाली झाली वाघीण, नशाच उतरली.
भांगापेक्षा आपली दारूचं खरी
दादा, नाही विदेशी तर देशीच बरी
झाली जास्त तरी नेते तांगडत दारी
आवाज वाढवलं धाकानं बायको घेते घरी
दारू मटनाच्या पाहुणचारात खिसा
बेरोजगारीचे होऊ लागला खाली
बायकोनं पाहिलं आता वेळ नाही बरी
लय झालं राव,करा जाण्याची तयारी.
दनाअ, नागपूर
दि.२४/०७/२०२०
[7/24, 8:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता 😂🤟
एेकदिवस झालं काय?, खाली डाेकं नि वर पाय 😂
बायकाे म्हणते तिला तु line देताेस
हलकी हलकी Smile पण देताेस 😂
ति पण तुझ्याकडे टकामका बघते
तुझं थाेबाड बघितलं कि गालातल्या गालात हसते 😂
ताे बाेलला माझी जानु माेनु साेनु असं नकाे बाेलु
तुझा नवरा साधा सुधा, आहे माैल्यगुणाचा
बायकाे म्हणते आहे नवरा माझा पण काही नाही कामाचा 😂
ताे बाेलला, सजनी काय बाेलतेस मला बेकार
तीच देते मला लाईन राेज सकाळ-सकाळ 😂
नवरा बायकाेची झाली फायटींग तिने पकडले केसं
नवरा झाला टकला, बाेलली रान झालं माेकळं दिसते लई बेसं 😂👨🦲
ते भुरी लईच हसत हाेती, लपुन लपुन पाहत हाेती
मग् दाेघी भिडल्या अंगावर कब्बडी झाली सुरु
नवरा बनला रेफ्री, हाेऊदे दाेघिंचा आपण इकडुन सटकु 🏃♂️😂
सजनी सजनी म्हणत म्हणत झाले तिघे गजनी 👨🦲👨🦲👨🦲
सारा माेहल्ला पाहत हाेता, त्रिमूर्ती रंगी रंगल्या भजनी
😂😂😂😂😂😂😂
प्रिया र गाेमाशे
आकाशवाणी निवेदीका चंद्रपूर.
[7/24, 8:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 हास्य कविता 🌺 ।।
नव नव लग्न
धूंद होत सर्व
हुशारीचा मोठा
साहेबाले गर्व।।
दोघांची नौकरी
सगळीच घाई
साहेब धूंदीत
विसरुनच जाई।।
एकदा झाली
मजाच मजा
आंघोळ झाली
चड्डी शोधे राजा।।
घाई घाई म्हनल
लूंगी करा वर
चड्डी होती घातली
केली आवर सावर।।
स्वातंत्र्य दिनी
मिजासच भारी
मोजे काही दिसेना
शोधले ठिकाण सारी।।
आता काय कराव
चिडचिड घरात
म्हनल लूंगी करा वर
एक होता पायात
एक होता हातात।।
एवढ होऊन म्हणे
मीच मोठा हुशार
होते कधी कधी
सांभाळतो कारभार।।
सौ.के. बी. सार्वे भंडारा.
[7/25, 7:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज मन🙏
आपल्या समाजाचा आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे समाजसेवा कोणतेही कार्य परिणाम कारक करावयाचे ठरवल्यास प्रमाणिक कर्तव्याशी मनोवृत्ती जोपाव लागते मुंगी जशी चिकाटीने एक एक कण जमा करून कोठार साठवते त्याच प्रमाणे आपल्या समाजातील आम्ही पुरुष मंडळ असो किंवा महिला मंडळ समाज जोडण्याचे काम आवडीने करत आहे . आपल्या सगळ्यांच्या मदतीने नक्कीच यशाचे शिखर गाठू यात तिळमात्र शंका नाही
सौ . भूमिका राजेश बोंद्रे
अमरावती.🙏
[7/25, 7:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजातील मेळावे
(बाई मी निघाली शाळेला,
अल्काश्रींच्या भजनावरून)
बाई मी निघाली मेळाव्याला
गं बाई मी निघाली मेळाव्याला,
तुम्ही येणार का बोला
मंगलाताई, येणार का बोला,बोला ना......
आमच्या कुणब्यांचा मेळावा,
भरतो वर्षातून तीनदा,
गौरव गुणांचा,संक्रांतीचा,
कार्यक्रम वधुवर परिचयाचा,
म्हणुनी जाते मी मेळाव्याला,
तुम्ही येणार का बोला,बोला ना.......
आमच्या या मेळाव्यात,
तुकोबा,शिवाजी,सावित्रीचा आदर्श,
पूजन करुनी आम्ही तयांचे,
होते मान्यवरांचे स्वागत,
म्हणुनी जाते मी मेळाव्याला,
तुम्ही येणार का बोला,बोला ना.......
जेष्ठांना मिळतो सन्मान,
गुणिजनांचा होतो सत्कार,
स्त्रिया-मुलांच्या गुणांना देऊनी वाव,
सामूहिक विवाह ही पडती पार,
म्हणुनी जाते मी मेळाव्याला,
तुम्ही येणार का बोला,बोला ना.........
एकजुटीने बांधव सारे,
हर्षोउल्हासाने भरविती मेळावे,
आनंद सोहळा सुरेख फार,
होती कार्यक्रम दर्जेदार,
म्हणुनी जाते मी मेळाव्याला,
तुम्ही येणार का बोला, बोला ना........
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.जिल्हा बुलडाणा
दि.25.7.2020
[7/25, 7:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी कविता
समाजात होणारे कार्यक्रम
आहे समाज आमुचा
कळकळीचा नि धडपडीचा
करतात काम जीव ओतूनी
सर्व स्वाची कास धरुनी.
कार्यक्रम आसती विविधांगी
झटती कष्टती समाज बंधूभगिनी
दहावीबारावी गुण वंतांचा सत्कार
जयंती पुण्य तिथी कार्यक्रम वारंवार .
बक्षिसवितरण कार्यक्रम सेवानिवृत्ती कार्यक्रम
करीती आनंद भरे मोदभरे
लहानमोठे गरीब श्रीमंत नसे भेदभाव
चर्चेला मिळे इथे वाव.
कोजागिरी मेरीटविद्यार्थी सत्कार
कार्यक्रम असती वारंवार
संक्रांतीचा कार्यक्रम असे झक्कास
त्यात सर्व मूल्यांचा होई विकास .
हळदीकुंकू उखाणे प्रश्नमंजुषा
स्पर्धेत उतरण्या असते सर्वांची आशा
गीतगायनस्पर्धा संगीतखुर्ची
तिळगुळ घ्या गोड बोला भाषा गोडीची.
तुकाराम महाराजांचे वैंकुंठगमन
स्मरुनी तुकाराम बीज कार्यक्रम करीती
शिवाजी जयंती उत्साहानं साजरी होती
असे हे समाजातील होणारे कार्यक्रम असती
सौ सुषमा एस पडोळे खात रोड भंडारा
[7/25, 7:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजात होणारे कार्यक्रम-
जानेवारी येई हळदीकुंकू घेऊन
सुरुवात होई वाण वाटून।
सौभाग्यवती घेई आनंद लुटून
भेटीगाठीचे निमित्त साधून।।
तिळगूळ होई आमच्या दादांचे
कौतुक पाहतात तव भगिणींचे
विचार विनिमय सर्वांचे
आनंदात पार पाडायचे।।
आठ मार्च तो महिला दिन
करीतो आम्ही जोशात साजरा
एकाहून एक सरस त्या
रणरागिणींना करीतो मुजरा।।
तुका बिज आनंदाने
गातो अभंग मनोभावे
विचार मांडतो आपआपुले
सर्वच मिळूनी गुण्यागोविंदाने।।
गुणवंताचा होतो सन्मान
शाल श्रीफळाचा देतो मान
समाजकार्या मिळते दान
सहभोजनाचा आनंद घेतो छान।
कोजागिरीची मजाच न्यारी
सांस्कृतिक कार्य लय भारी
दुग्धशर्करा मजाच आणी
लहान थोरांना असते प्यारी।।
वधूवर मेळावा खूप छान
विवाहत्सुकांना मिळे मोकळीक
भेटीगाठीतून जुळून येती रेशीमगाठी।
समाजकार्यास होते जवळीक।।
सौ.के.बी. सार्वे भंडारा.
[7/25, 7:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजातील कार्यक्रम
समाजाने जुळवल्या नाती
माणसांना जोडणे यांच्या हाती
कार्य करतात सहकार्याने समाजाचे साथी.
कुणब्यांचा कार्या साठी करतात जीवाची ते माती.
सामुहिक विवाह, कोजागिरी पौर्णिमा, गुणवंतांचा सत्कार
हळदी कुंकू, शिवजयंती,
तुकाराम बीज, वधू वर मेळावा,
झेंडा वंदन, श्रमदान,खेडाळुंचे
सत्कार असे कितीतरी कार्यक्रम, स्पर्धाचें आयोजन करती.
असे कार्यक्रम यशस्वी करुन
मारतात ते बाजी.
अशी बावणे कुणबी यांची समाजात किर्ती.
सौ.माधुरी देवेंद्र भूते.
[7/25, 7:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजातील होणारे कार्यक्रम ---
आमच्या बा. कु.समाजाचा
आहे मला फार अभिमान
गुणवंतांच्या कार्यशीलतेचा
होतो इथे सन्मान ।।
दार महिन्याला होतात सभा
विचार विनिमय भाव तिथे
जमा खर्चाचा आढावा
पारदर्शी असतो तिथे ।।
समाजप्रबोधन, सांस्कृतिक
कार्यक्रम होतात वारंवार
महिलांच्या अस्तित्वासाठी झगडणार्या
सावित्रीबाई नची जयंती जोरदार।।
वधुवर सूचक मेळावे, आमसभा
पळतच येई कोजागिरी
दूध आटवून, नाटक नाचात
सर्व महिला गोल फेर धरी ।।
शिक्षण,क्रीडा, व्यवसायात
प्रगतीपथ जे गाठतात
समाज ऋण फेडण्या, पुरस्कार
सन्मानपत्र दिले जातात ।।
शिवजयंतीचे असती सोहळे
शूरवीरतेचे धडे
हळदी कुंकू, स्नेहमीलनात
विविध सांस्कृतिचे पडती सडे ।।
पैसा, मेहनत, वेळ वाचवण्या
सामूहिक सोहळे होतात
लहान मोठे,गरीब श्रीमंत
सारेच कामाला लागतात ।।
बा.कु.समाज भंडारा चे
अध्यक्ष सदानंद इलमे सर
शैक्षणिक कार्यशाळा घेऊनी
बंधुता,एकतेची दिसते श्रावनसर।।
मंगला डहाके, भंडारा
[7/25, 7:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझा समाज
समाजाने आम्हाला
दिली नवी स्फूर्ती
काय वर्णावी
जे झटतात त्यांची ख्याती
काही ना काही
नाविन्याच्या शोधात
नेहमी असतात
कार्यक्रमाच्या मधात
नव्या वाटा नव्या दिशा
समाजाची पालटली दशा
उंच त्यानी घेतली भरारी
समाज माझा लय भारी
[7/25, 7:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ***समाजात होणारे कार्यक्रम***
आहे माझा समाज थोर आणि महान
जिथे होई विचारपूस समाजबांधवांची वारंवार
इथे ना कोणी श्रीमंत आणि गरीब
सगळे आहे समसमान
समाज आहे खूप उत्साही
इथे जोपासला जातो छंद आणि आवड
संक्रांतीच्या उत्सवाला येतात बायका नटून-थटून
आणि रंगतात इथे अनेकविध कार्यक्रम फार
उखाण्याची स्पर्धा होते इथे जबरदस्त
शिवाय रांगोळी स्पर्धा डिश डेकोरेशन
मेहंदी स्पर्धा होतात इथे भारदस्त
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळतो येथे वाव
रिझल्ट लागल्या लागल्या होतो गुणवंताचा सत्कार
वधू-वर मिळण्यासाठी कुठलाही होऊ नये त्रास यासाठी करतात वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन खास
विवाह बंधना साठी असतात सामूहिक विवाह मेळावे गावोगाव .
अशा या कार्यक्रमाने समाजात टिकतो एकोपा आणि बंधुभाव .
सौ अश्विनी अमर सपाटे लुटे
अमरावती
[7/25, 7:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *समाजात होणारे कार्यक्रम*
कार्यक्रमाची रेलचेल
असे समाजात
एकजुटीने बांधव
शामील यात
संक्रांतीला तिळगूळ
मज्जा उखाण्यांची
खेळ खेळूनी अनेक
वाणही देती.......
गुणगौरव सोहळा
कोजागिरी साजरी
मुलेही नाचती
यात गोजिरी....
पुण्यतिथी जयंती
थोर पुरुषांची
संगती महती
तुकारामांची
तुकाराम बीज......
शिवजयंती मुख्य यात
ज्येष्ठांची सत्कार
करती समाजात
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[7/25, 7:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज कार्य।
समाज समाज समाज
असा कसा
विविध स्वभावाच्या मानवाला
बांधुन ठेवतो जसा।
समाज समाज समाज
कार्य ह्याचे हज़ार
प्रेरीत करतो सर्वाना
देतो सुप्तगुणांना वाव।
समाज समाज समाज
सर्वासाठी एक समान
कार्य आखती येथे
गरीब श्रीमंतीला नाही दुजाभाव।
समाज समाज समाज
सणवार रंगविती छान
महिलांच्या आनंदाला
असती येथे मान।
समाज समाज समाज
देती गुणगौरव पुरस्कार
जेणे करून इतरांना
सर्व क्षेत्राची असा्वी जान।
समाज समाज समाज
पटविती इतिहास
करुन पुण्यतिथि जयंती
राष्ट्रीय उत्सवालाही देती
तेवढेच मान।
समाज समाज समाज
येथे वर वधू सहवास
सार्वजनिक विवाह सोहळा
कमी खर्चात होती पार।
समाज समाज समाज
असा आमचा बावणे कुणबी समाज
याला चालविणारे कार्यकर्त
यांना माझा प्रणाम।।
सौ.चंदा शेंडे
नागपुर
[7/25, 7:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजात होणारे कार्यक्रम आणि कोणते व्हायला पाहिजे-
दरवर्षी समाजोत्सव होत आलेला आहे.त्यामध्ये आपले नेहमीचे कार्यक्रम म्हणजे गुणगौरव ,सत्कार समारंभ, वधू वर सूचक मंडळ, संक्रांतीचा, जेष्ठ नागरिकाचा सत्कार हे घेण्यात येते. त्याचप्रमाणे आता महिलांचा सखी मंच तयार झालेला आहे. त्यामधून आपल्याला महिलांचे गुण माहीत पडले.ग्रुपवर नवीन नवीन विषयाचा कार्यक्रम घेऊन सर्व महिला भगिनी विषयावर बोलायला तयार असतात. त्याचप्रमाणे आपल्या समाजाची आणखी प्रगती होवो यासाठी वक्तृत्व स्पर्धा, कवी संमेलन,शेती विषयी कार्यक्रम, विध्यार्थी यांना पुढच्या वाटचाली साठी आणि नोकरीविषयी मार्गदर्शन इ,,,, सारखे कार्यक्रम व्हायला पाहिजे.
कारण आपण म्हणतो समाजसेवा हीच ईश्वरसेवा . कुणबी म्हणजे शेतकरी असे आपल्या समाजात मानले जाते.
धन्यवाद !
सौ श्वेता कानतोडे
[7/25, 7:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजातील होणारे कार्यक्रम
समाजातील बावणे कुणबी मंडळाचा कार्यक्रम खूप छान होतो, दर तीन महिण्यानी आम्ही सभा घेतो, त्यात आम्ही आढावा घेतो ,
दरवर्षी आम्ही हळदी , कुंकू करतो, त्यात आम्ही उखाणे स्पर्धा घेतो तसेच रांगोळी स्पर्धा घेतो, लहान मुलाचे डान्स घेतो, गायन स्पर्धा होते,
बावणे कुणबी युवा मंडळ तसेच जेष्ठ नागरिक मंडळ, महिला मंडळाच्या वतीने,
दरवर्षी बावणे कुणबी मंडळ रक्त दान शिबीर घेतो , पुरुष रक्त दान करतात तसेच आमच्या महिला सुद्धा रक्त दान करतात खरोखर खूप अभिमान वाटतो, बावणे कुणबी समाज मंडळाच्या वतीने दहावी, बारावी च्या विद्यार्थी चा मुलां, मुली चे सत्कार होतो , तसेच
गरजू विध्यार्थी यांना मदत केली जाते ,
समाजासाठी आपण समाजाचे ऋणी आहोत,
अशीच समाजाची प्रगती होवो, आणि समाजाची आमच्या हातून ईश्वर सेवा होवो,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना,
सौं शोभा राजेश खोकले यवतमाळ
[7/25, 7:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संस्कारधारा. (१०)
किती हिरवी नटली रोमारोमात ही धरा
नागपंचमी सण नेमे श्रावणाचा आला
चला चला सुहासिनींनो घ्या लाह्या दुधाला
पंचारती घेऊन,गजरा लेवुन पुजा वारूळाला.
दनाअ, नागपूर
[7/25, 7:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺प्रभात पुष्प 🌺।।३८.
* मनाला स्थिर कराया *
* धरी गुरु प्रेम हृदयी या *
* तयावीण अन्य नाही कोणी *
* मनाला बोधवी सखया *
सौ.कमल सार्वे भंडारा.
२५|७|२०२०.
[7/25, 7:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*नाग असे मांसाहारी*
*नाही पाजणार दूध आम्ही*
*अंधश्रद्धा दूर करूनि*
*साजरी करू नागपंचमी*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[7/25, 7:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: दिवस आला शनिवारचा
शेतकरी सखा नाग उत्सवाचा
दुध लाई फुटाणे सोबत नैवेद्य कळईचा
शेतकरी समाज बांधव सुट्टिचा।।
सर्वाना नागपंचमी सणाच्या शुभेच्छा
सौं.चंदा शेंडे नागपुर तर्फ.....
[7/25, 7:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (६७)
"" समाजात होणारे कार्यक्रम""
बावणे कुणबी समाज आपला महान
या मंचावरून आपल्याला मिळतो सन्मान
तिळसंक्रात, तुकाराम बिज,कोजागिरी
वधुवर सुची समाजात होतात कार्यक्रम छान.
तिळसंक्रातीला होतात उखाणे स्पर्धा
नक्षीदार मेंदी,खाद्य पदार्थ सुगरण दर्जा
रांगोळी उत्सव स्पर्धा महिलांच्या सुंदर
तुकाराम बिजेला व्यासपिठ प्रबोधनपर.
वधू वर परिचय, सामुहिक लग्नसोहळा
वर्षाला होतात समाज बांधव गोळा
अनिष्ट रूढी परंपरेला ठेवून बाजूला
आपोआप आळा अनावश्यक खर्चाला.
उत्कृष्ठ गुणसंपादनाचा गुणगौरव होतो
सामाजिक कार्य, खेळाडू, सैनिकां सन्मान देतो
शरद पौर्णीमेला सांस्कृतीक पर्वणी शानदार
व्यक्तिगत परिचयाचयानंतर दुधाचा पाहुणचार.
नागपूर मंडळाचे आहे सांस्कृतिक पर्व महान
भट सभागृहात "एक संध्या सैनिका नाम"
नववर्षाला कार्यक्रमाने वाढला समाजाचा मान.
अशी आहे आमच्या बावणे कु.समाजाची शान.
दनाअ, नागपूर
दि.२५/०७/२०२०
[7/25, 7:15 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नंदा भोयर, अमरावती
[7/25, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजात होणारे कार्यक्रम कोणते व्हायला पाहिजे
समाज आमचे बावणे कुणबी समाज
कार्यक्रमाचे आयोजन करतो भरमसाठ.
कधी आरोग्याविषयी काळजी घ्यावी म्हणून महिलांन व पुरूषांसाठी घेतो आम्ही शिबीर.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नोकरीविषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येते
वर वधू मेळावा घेतला जातो.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी हळदीकुंकू चा कार्यक्रम सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला.
त्यामध्ये दोनशे महिलांनी काम केले.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक महोत्सव व हळदीकुंकू असे तो पार पडला...
समाजातील भरपूर महिलांनी सहभाग घेतला.
महाराष्ट्र दर्शन.. शेतकऱ्यांच्या आत्महत्या.. भारूड.. गोधळ. गणेश वंदना .. 🌷
आम्ही एक देशावर आधारित नाटक केले. नाटकाचे नाव
एक शाम सैनिकोके नाम
महिला दिनाच्या दिवशी आमची महिला समीतीनी वृदाश्रम मध्ये लांडू चीवडा चकली तिथल्या वृद्धांना वाटप केले.
तुकाराम बीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी सात भजनी मंडळ आले त्यांनी तुकारामाचे अभंग वभजन केले हा पण कार्यक्रम छान झाला. आमच्या मंडळाचे नाव
बावणे कुणबी समाज सेवा मंडळ
महिला समीती व युवावर्ग यांचे काम खुपच सुंदर.
समाज सेवा हिच खरी सेवा.
[7/25, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज कार्य
समाजाच्या हितासाठी,
सदैव झटतात माझ्या बंधुभगिनी,
उलटली आहे जरी,त्यांची साठी
सुंदर, सुंदर कार्यक्रम घेती,
नवनवीन योजना,कल्पना मांडती,
विचारांची देवाणघेवाण मोठी.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करिती,
दुगधशर्करा योग जुळविती,
समाजभूषण,कृषिभूषण,सन्मान देती.
महिलांचा सन्मान इथे,
हळदी कुंकू, उद्योजिका मेळावा तिथे,
असे माझे हे बी. के.एस.मोठे.
वधुवर परिचय मेळावा घेऊनी,
लग्न गोरगरिबांचे कमी खर्चात,
लावुनी देती,सामूहिक सोहळ्यात.
संत तुकाराम बीज कार्यक्रम जिथे,
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन,
म्हणून साजरा होतो तिथे.
महिलांच्या सुप्तगुणांना,वाव इथे
मेंदी,रांगोळी,पाककला
चारोळी,कविता,लेख,अनेक विविधता.
आनंदीआनंद जिकडेतिकडे
पिकनिक,भीसी,मौजमस्ती गडे
भेट देती,वृद्धाश्रम,अनाथाश्रम
चॅरीटी करीती भीसी मार्फत
अभिमान मला माझ्या समाजाचा
इथे नाही दूजाभाव ज्याचा
अखंडित कार्य सुरू असे
चला तर करू या समाजसेवा इथे
सौ.कीर्ती शेंडे.....नागपूर🙏
[7/25, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वीणा कुकडे
[7/25, 10:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजातील हाेणारे कार्यक्रम 🌹
समाजातील कार्यक्रमाची करताे, सुरुवात लय भारी
बंधु, भगिनी दुरवरुन किर्ती बघण्यास येती सारी
चिमुकल्यांच्या नाचगाण्याने येताे कार्यक्रमास बहर
या गुणवंतांच्या काैशल्याने येई अंगात लहर
चित्रकला, GK, नाट्य केव्हा रांगाेळी स्पर्धा
श्रेय सर्वांचेच असुन यात प्रत्येकच ठरताे कर्ता
कार्यक्रमाची शाेभा वाढवती किर्तीवंत पाहुणे
बावणे कुणबी समाज कुठे मिळायचा नाही म्हणे
या दिमाखदार साेहळ्यात हाेताे हळदी कुंकु
खेळ रंगताे सख्यांचा म्हणतात आपण जिंकु
प्रिया र गाेमाशे
आकाशवाणी निवेदीका, चंद्रपूर.
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता
शाळेला सोनु निघाली
शाळेला ही सोनु निघाली
आईची लाडकी घालूनी फ्राक निटनेटकी.
दप्तर प्लास्टिक खांद्यावर ती आईचा हात घेऊन हाती
स्वागताला बाई उभ्या ह्या
रांगोळ्या काढूनी.
स्वागत सोहळा उरकुन सगळे
बसली मुले वर्गामध्ये
नाव नोंदवून हजेरीपटावर
पुस्तक पाटी मिळूनी हाती
पाटी घेउनी मिरवू लागली
सोनु खुश झाली.
नविन मैत्रिणी जवळी येती
बसुनी तिच्या मग नाव विचारती
काय नाव तुझे सांग आंम्हा गडे
लाजत मुरडत नाव सांगून मुलींमध्ये मिसळली,
सौ सुषमा एस पडोळे
खात रोड भंडारा
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *ऑनलाईन क्लास*
शिक्षणाचा सारा खेळखंडोबा झाला
मास्तर म्हणते प़ोराईले मोबाईल आना
मोबाईलवर मी शिकवतो मस्त
लेकरं बिचारे लय हाय त्रस्त
कधी दिसते फळा तर
कधी दिसते मास्तर
माय बाप झाले हैराण
लेकराईन गुंडायल दप्तर
सुस्त झाले पोरं
सुचत नाही काई
कोरोनानं पोट्टयाइले
आणलं डबघाई
कोणी परीक्षा हाय कोणी म्हणते नाही
पोरायला आता समजेना काई
ऑनलाइन क्लासमध्ये काहीच मजा नाही
खरं सांगते तुम्हाले
शिक्षणाचा काणीत खेळखंडोबा झाला बाई
*नंदा भोयर*
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *चाराक्षरी*
*********************
*नागराज*
नको भीती
या नागाची
पूजा याची
करायची
पुजूनिया
नागोबाला
वर प्राप्त
करू चला
बळीराजा
मित्रासम
नाग नसे
शत्रूसम
वारुळात
असे घर
कधि राही
झाडावर
साज चढे
नागोबाचा
गळा शोभे
शंकराचा
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गुंफण नात्याची
मोह मायेचा सारा पसारा
हळूवार गुंफूया नात्यांच्या तारा
विण अशी घट्ट,पण पडू नये गाठ
कुणाचाही विश्वास बसावा दाट.
एका तरुला अनेक शाखा
शाखांवरी पाने, फुले,फळे
प्रत्येक नात्यांचा मेवा चाखा
चविष्ट असती आगळेवेगळे.
नात्यांची थाळी,पाचापक्वानांची
आंबट,गोड,तिखट,खारट,
कडू,तुरट
आनंदाने ग्रहण करून
द्यावी ढेकर तृप्तीची.
विषाच्या पेल्यातही शोधावा
अमृताच्या थेंब
कोणतही नातं मनापासुन
जाऊ न द्यावा लांब.
शब्दांची धार,करी मनावर वार
आपला परका असू नये व्यवहार.
प्रेम ,आदरभावाचे असावे सिंचन
सर्वच नात्यात आपुलकीची गुंफण.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: दैव
म्हणती का हो, यालाच दैव?
डोळे असून अंध गांधारी
विवश होती मंदोदरी
दोघीही साम्राज्ञनी
अंधकार हो तयांच्या जीवनी !
म्हणती का हो यालाच दैव?
सद्गुणी सदाचारी कुंती
लाभली न तिला जीवनात शांती
पुत्र गुणी असुनी पदरी
वनवासी ती राहे बिचारी !
म्हणती का हो यालाच दैव?
सुंदर सुकेशिनी द्रौपदी
पंचपतीचे प्राण असुनी?
विटंबना हो तिचेच जीवनी
किती असे ती अभगिनी !
म्हणती का हो यालाच दैव?
जनकाची सुकुमार जानकी श्रीरामाची अर्धांगिनी
सत्व जिचे कधी न ढळे
अग्निदिव्यात तीच का पोळे
म्हणती का हो यालाच दैव?
भगवंताची जन्मदात्री
भोगिल्या जिने तुरुंगातच रात्री
अभागी अशी ती देवकी
हीच म्हणायची का शक्ती?
म्हणती का हो यालाच दैव?
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: * देवघर *
माझे श्रद्धा स्थान ।
देवघरात माझ्या अनेक मुर्ती
त्या सर्व माझ्याकरिता समान
नाही कुणी ऊच्च थोर
नाही कुणी महान
मी मानते देवाला
तुच माझे आई बाबा
भाऊ बहिन
तुच माझे श्रद्धास्थान।
तुझ्याजवळ.तासन्तास बसल्यानेच् आस्तिक कारे?
मला तर तुझ्याशी समरस
व्हायला दोन मिनीटच् पुरे।
तुझ्या समोरच् रडले
तुझ्या समोरच् मनात
खळखळुन.हसले
तुझ्यासमोरच् मि मला
ओळखले।
तुच करुन दिली मला
स्वत्वाची जाणीव
तुच माझा स्वर्ग
तुच माझे पाताळ।
तुच माझे.श्रद्धास्थान।
सौ.अंजलि बांते भंडारा
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माणुसकी
एकदाच मिळे हा जन्म आपणा, जीवन सार्थकी आता लावुया,
भेदभाव विसरुनी सारे आता,
मिळून मिसळून राहूया,
माणुसकीची ज्योत लावुया.
गरीब असो वा श्रीमंत,
सर्वांचा एकच हिंदू धर्म,
एकाच मातेची आम्ही लेकरं,
प्रेमाचा वर्षाव करूया,
माणुसकीची ज्योत लावुया
जगणे,मरणे न आपल्या हातात,
कर्ता, करविता तोच शेवटी,
आपण नुसते नाममात्र,
चला तर मग प्रण करूया,
माणुसकीची ज्योत लावुया.
सदाचार चरणी ठेवूया,
एकमेका साहाय्य करूया,
विसरुनी सारे मतभेद,
जीवनाचा आनंद घेवूया,
माणुसकीची ज्योत लावुया.
सौ.कीर्ती शेंडे.......नागपूर🙏
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: लाडका बटाटा---
टोपलीतला, सर्वांचा लाडका
एवढासा मी, आहे बटाटा ।।
जात भेद, धर्म ,पंथ
देश, भेश, नाही पाळत ।।
कुणाशीही , होते मैत्री
सारे येती, लवकर मिसळती ।।
आपला तो, गुण देऊन
चविष्ट करतो, भाजी बनवून ।।
राहावे आपण, बटाट्यासारखे
गुणधर्म मिसळून, व्हावे म्होरके ।।
वांगा ,कोबी, तोंडले,माझ्यावरच विसंबून
माझ्यासवे सर्वांची, देतो गुणवत्ता वाढवून ।।
लहान मोठे,वृद्धानाही, आवडतो
मी फार
एवढासा मी, माझे पदार्थ होती चवदार ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता***
फुलपाखरू🦋🦋
रंगीबेरंगी फुलपाखरू
मनसोक्त झाडा फुलांवर
भिरभिर फिरते.
सोनेरी पिवळे जांभळे
रंग गोड किती दिसते
झुळकन सुळकन ईकडून
तिकडे किती दुर उडती.
फुलांबरोबर गोड
किती हसते मधुगंध
परागकण हळूच लुटते
नाचत बागडत उडुनी जाते
नाजूक नाजुक
रेशीमी पंख पसरवी
सुंदर ते फुलपाखरू
नभातले चांदणे बिलगीत
खुदकन हसते.
सौ.सुचेता सार्वे.
पनवेल नवी मुंबई
🌲🦋🌹🙏🏼
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 माझा होशील का🌺।।
चोरुन पहाणे,
तुझे ते बहाणे।
भिरभिर नजर
समजावे माझे होणे।।
विविध कारणे,
बागेत फिरणे।
स्वप्नात बघणे,
समजावे माझे होणे।।
हळूच लाजणे,
स्मित हसणे।
पाहून आनंदे
समजावे माझे होणे।।
घाल मागणी,
घेऊन पाहुणे।
फोड सुपारी
समजेन माझे होणे।।
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏🙏आठवण🙏🙏
जितके त्याला सोडत पाहते
तेवढेच ते गुंतत जाते.........
आठवणी त्या डुबून जावेस
वाटते................
सोडून गेल्यावर ही कायम मनात राहते
एकदा हसरा चेहरा पाहण्यासाठी वेड्या मनाने तोच वेडा पाहिला........
ओसाड अश्रूंचा तो आठवून गेला फक्त डोळ्यात
आठवण साठवून गेला
जातांनाही तुझ्या अश्रूत मी असावी..............
जगतानाही आयुष्यात मला तुझीच प्रतिकृती दिसावी
आवडीने आणलेल्या
फुलांचा सुगंध पाहिला
पन सोडून जाताना
त्याचं फुलांचा मी
सडा पाहिला.............
सौ. भूमिका राजेश बोंद्रे
अमरावती🙏🙏
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।शेतजमीन।
वडिलोपार्जित शेत
एक जागी स्थगित राही
वंशाचे दिवे मात्र
दिवसेंदिवस वाढत जाई।
बालपणीचे दिवस आठवता
डोळ्यात अश्रु येई
नात्यातील प्रेम जिव्हाळा
आता दिसत नाई।
बाग बगीचे आंबांची अमराई
आजही जिथला तिथे ठाई
नात्यांमध्येच दुरावा लई
कसा काय आला बाई।।
हातभर हितभर्याचा
लोचा वाटे सई
रक्ताच्या नात्यापेक्षा
मोठा कसा का होई
सुखी परिवाराच
वाठोड त्यापाईच होई।
मनुष्य जन्माच खर नाही काही
जिथली शेती तिथेच असे राही
हातभर हितभर तुकडाचाही
ओझा कुणी डोक्यावरती
नेत तर नाही।
कळत असत सर्वाना
वळत अस कस नाही
जागच्या जागी ठेऊन
देवा घरी जाण्याची
असते घाई।
म्हणुन म्हणते सार्याना
एकमेकांशी तडजोड करा
कोणतही नात तोडण्याची
चुक करू नका।
सौ.चंदा शेंडे
नागपुर.
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अबोल प्रीत
किरण कोवळी अंगावरी,
अबोल प्रीत ही जागली .
धुक्याने दूर सारली,
शाल ही पांघरली.
धुंद झाल्या रात्री,
चांदण्या या नाचती.
चंद्र हासे ढगातुनी,
पडे खळी गालावरी.
प्रीत जडली दोघांशीही,
कोडे न उलगडे तिलाही.
होऊ मी कुणाची,
कुणास म्हणू, मी आपली.
सूर्य चंद्रमाची नाती,
जपते ती दिगंतरी.
लपंडाव खेळती तिघेही,
अबोल प्रीत मनी ठेवुनी.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.जिल्हा बुलडाणा
दि.26.7.2020
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹🌹बायको🌹🌹
राजवाडा असो की महाल असो
बायकोविना सारेच वाटे शुन्य
बायकोला नावे कधी ठेवु नका
पातक माथी मारुन घेवु नका.......
खर सांगा गडया हो, बायकोशिवाय
हलत का तुमचं पान????
बागेतली फुल,संसारातील मुलं
बायकोशिवाय फुलवाल कसे?
पगार आणि नोकरीशिवाय ,
तुमच्याकडे असते काय?
खर सांगा गडया नो बायकोशिवाय
हलतं का तुमचे पान?
दोघांची बरोबर करुन तर बघा
वयाने बायको नवरयापेक्षा लहान !
समजुदारपणाचे तिला वरदान
व्यवहार शुन्य तुमचे सगळे ध्यान
खर सांगा गडया हो,बायकोशिवाय
तुमचं हलते का पान??
देवाची अदभुत निर्मिती बायको असते
तुमच्या घराचा र-वरग ती करते
पवित्र ,स्वचछ घर ती ठेवते
म्हणुन तर सगळ्यांना घराची ओढ
असते.
खर सांगा गडया हो,बायकोची पटली.
ना महती!........
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹माझी आवडती कविता 🌹
शाळा सुटली पाटी फुटली ,
आई मला भूक लागली
शाळा सुटता धावत सुटले
ठेचं लागूंनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली
धम्मक लाडू चापट पोळी
नको देऊ मज हवीच गोळी
किंवा दे मग खमंग चकली, दे ना लवकर भूक लागली
सायंकाळी जाऊ दे मला पटांगणावर खेळायला तिथे सोबती वाट पाहती दे ना खाऊ भूक लागली
सौं शोभा राजेश खोकले
यवतमाळ
[7/26, 8:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता
मैत्री
मैत्री हि मैत्री असते
डोळयानी न दिसणारं
आगळं वेगळं असं
एक नातं असते .
मन मोकळ करण्याची
एक जागा असते
जीवनातील तर विसणारी
आठवण असते
मैत्री हि मैत्री असते
बोलण्याची एक जागा असते
सांगनारी एक वक्ति असते
ऐकणारी एक मैत्री असते
मैत्री हि मैत्री असते
न समजणार नातं असते
समजून घेणार मन असते
न दिसणार क्षण असते
नेहमी आठवनार भास असते
म्हणून; मैत्री हि मैत्री असते.
सौ. मोनिका काटगळे
अमरावाती
[7/26, 8:38 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
. "" संस्कारधारा"". (११)
निसर्गाचा हा खेळ बेताल निराळा
कधी अती पाऊस कुठे पडतो कोरडा
संसारात संकटावर संकटे येतात फार
जिवनात माणसाला करतात गार.
दनाअ, नागपूर
[7/26, 8:38 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 प्रभात पुष्प 🌺।।३९.
* श्रावण मास आला *
* सासुरवासीण आली माहेरा *
* हिरवा चुडा लेवून *
* श्रावण सोहळा करते साजरा.*
सौ.कमल सार्वे भंडारा.
२६|७|२०२०.
[7/26, 8:38 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प
माझी आवडती कविता
""आध्यात्मिक कविता..""
पायी पैंजण घुंगुरवाळा
उत्सवी यावे गौरीबाळा
छोटे डोळे मोठे कान
सुखाला भक्ता द्यावे दान.
सुक्ष्म बघणे नेत्राचे
सुखदुःख ऐकणे कानाचे
अपराध दडविशी भक्तांचे
नृत्य तांडव सौख्याचे.
हरावे दुःख यावे सुखं
शेंदुर भुषण वाहन मुषक
हाती लड्डु माळ दुर्वाची
आसं तुझ्या ममतेची.
चतुर्थीला आराधना तुझी
मनोभावे पुजा मांडली
तव नामाचा करू चिंतन
करावे माझे दुःख भंजन.
दशरथ अतकरी, नागपूर
दि. २६/०७/२०२०
[7/26, 8:38 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
(पंचाक्षरी). (६९)
""सामर्थ्य कष्टाचं""
जन्मा येवून
व्यथा दारिद्रे
कसे बघावे
स्वप्न उद्याचे.
घाम गाळून
थकली काया
संपान पुर्ण
नाहीये व्हाया.
नाही थांबलो
ध्येय वेडानं
रात्रं दिवस
राबत गेलो.
दारिद्र्याला ना!
हासती सारे
पाहुनी हाल
फिरती पाठे.
रात संपली
पहाट झाली
रवि किरणे
दिसु लागली.
आशेचं स्फुट
ओठांत आले
नेत्रात माझ्या
दिसु लागले.
वाळु रगडा
तेलही गळे
सत्य पाहिले
मम कष्टाचे.
घाला घामातं
वार घणांचे
दगडा येई
रूप देवाचे.
दिल्या शब्दाला
मोडु नकोस
घेतला वसा
सोडु नकोस.
प्रयत्ने झाले
रंकांचे राजे
तव भाग्यांचे
वाजे नगारे.
दनाअ, नागपूर
दि.२६/०७/२०२०
[7/26, 8:38 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गझल
आज आभाळही कसं, ओतल्यासारखंच वाहील
घरच्या तुळशीला, पाणी घालायचंच राहील..
मी विचारपूस न केली, त्या काळ्या ढगांची
असा उन्हातही का तू, हे विचारायचंच राहीलं..
तुझे अधांतरी बरसने, हे नित्याचेच झाले
जरा विसावा घे आज, हे सांगायचेच राहीलं..
आता गंध त्या मातीचा, मला येईनासा झालाय
अंगणातील मोगर्याला, आज तोडायचच राहीलं..
बरसणाऱ्या धारांनी, तू व्यक्त करशी भावना
आसवांना आज माझ्या, वाहायचचं राहीलं..
…......................................
🌿मंगेश बांते🌿
पूणे
[7/27, 6:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कमल सारवे, वैद्य भंडारा
[7/27, 6:28 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्वेता समीर kantode , वैद्य
अमरावती
[7/27, 6:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: लता लाकडे पुणे
[7/27, 6:32 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रुपाली अमोल बोन्द्रे बाभरे, भंडारा
[7/27, 6:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आशा सुरेश वणवे, यवतमाळ
[7/27, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नंदा रामचंद्र गोमासे,
नंदा अनिल भोयर, अमरावती
[7/27, 6:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अश्विनी अमर सपाटे,लुटे, अमरावती
[7/27, 6:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नीलिमा लक्ष्मणराव ठवकर, पिंगळे यवतमाळ
[7/27, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्वेता समीर kantode, वैद्य अमरावती
[7/27, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: विद्या सारवे, नागपूर
[7/27, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अश्विनी अमर सपाटे, लुटे अमरावती
[7/27, 6:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: भारती भगवान तुमसरे, katgaले
यवतमाळ
[7/27, 6:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मोनिका katgle, वैद्य अमरावती
[7/27, 6:54 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वाती ओंकार उताने, fendar pimpalkhuta, ता-धामणगाव रेल्वे, जी अमरावती
[7/27, 6:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुचिता विवेक आथिलकर
यवतमाळ
[7/27, 6:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अनुश्री ईशान राघोर्ते, धांडे, पुणे
[7/27, 6:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वाती shinganjude
[7/27, 7:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मीरा गुलाब टिचकुळे भंडारा
[7/27, 7:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रतिभा सोपान vath, खामगाव
बुलढाणा
[7/27, 7:04 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रतिभा vath
[7/27, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मीरा टिचकुळे
[7/27, 7:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: विजया दिलीप पोटफोडे, अमरावती
[7/27, 7:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जयश्री रेहपाडे नागपूर
[7/27, 7:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माधुरी देवेंद्र भुते नागपूर
[7/27, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रोहिणी देवेंद्र मुलुंडे यवतमाळ
[7/27, 7:32 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: भूमिका राजेश बोन्द्रे, अमरावती
[7/27, 7:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वाती दयानंद सेलोकर, भंडारा
कु. अंकिता अशोकदादा बोन्द्रे भंडारा
[7/27, 7:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अंजली हेमंत बांते भंडारा
[7/27, 7:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: लता नरेंद्र लाकडे, पुणे
[7/27, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मनोरमा गजानन तिजारे ठवकर
पुणे
[7/27, 7:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: भारती विजय पिंगळे, मलकापूर
बुलढाणा
[7/27, 7:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शोभा राजेश खोकले, ठाकरे
यवतमाळ
[7/27, 7:44 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शारदा हलमारे वाडी नागपूर
[7/27, 7:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सविता विलास kuthe, झलके
कल्याण
[7/27, 7:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगला गो kantode, पिंगळे, अमरावती
[7/27, 7:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संगीता कडवं भंडारा
[7/27, 7:51 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कीर्ती प्रदीप शेंडे, गाढवे
दिघोरी नागपूर
[7/27, 7:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मुख्याध्यापिका सुषमा सुकराम पडोळे ,खात रोड भंडारा
[7/27, 7:54 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संगीता लांजेवार
[7/27, 7:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सारिका भोयर लाखनी भंडारा
[7/27, 7:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शीतल श्रीकांत ठवकर, देव्हाडी, तुमसर, भंडारा
[7/27, 8:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ज्ञानेश्वरी ल कडगले, भोयर
अमरावती
[7/27, 8:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रांजली तुषार चेटूले, भंडारा
[7/27, 8:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नंदा किशोर चेटूले भंडारा
[7/27, 8:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ममता भोयर नागपूर
[7/27, 8:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पूनम पंकज डहाके भंडारा
केस रचनार्थी मंगला डहाके
[7/27, 8:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगला झिंगरराव डहाके भंडारा
केस रचनार्थी पूनम डहाके
[7/27, 9:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हर हर शंभू
पुजा करते शंभू महादेवाची
अर्पिते शिवमुठ तांदळाची
तुज आवडती बिल्वपत्र ताजी
आमच्या *BK* ग्रुप वर दृष्टी अशीच राहू दे तुझी
मनोमन प्रार्थना करते तुला
हिच इच्छा माझी
[7/27, 9:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प
. "" संस्कारधारा"". (१२)
दिगंतरात पाखराला दिशा कळावी
घरी परतण्याची त्यास काळजी नसावी
अहो,घरटी तर कधीही बांधता येईल!
क्षितिजा पलीकडे झेपावण्याची जिद्द असावी.
दनाअ, नागपूर
दि.२७/०७/२०२०
[7/27, 9:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 प्रभात पुष्प 🌺।।४०.
* बेलपत्र नाराज होऊन म्हणाले *
* महेश्र्वरा मलाच का रे वेदना! *
* सांभाळ तुझे भक्त *
* मीच करते प्रार्थना. *
सौ. कमल सार्वे भंडारा.
२७|७|२०२०.
[7/27, 9:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (६९)
माझे मित्र "सुभाषमामा"स समर्पीत
( स्वरचित) "" गजल""
नात्यातील छळ आठवु लागलो
आयुष्यात नवरंग भरू लागलो.
छळताती शब्द हृदयास माझ्या
मनाला माझ्या समजावू लागलो.
दिले नाते देवाने नियतिने हिरावले
दुःख संसाराचे विसरू लागलो.
आयुष्यात ऐश्वर्य मला भरपूर आले
सुखाचे क्षण नात्यात वाटु लागलो.
वाटते मला नाते गरजपरस्त झाले
दुरच्यांनाही जवळ गोंजारू लागलो.
सुखात माझ्या मित्र लयं भेटले
जिवाभावाचे साथी निभवू लागलो.
दिल्या सख्ख्यांनी यातना बहु भोगलो
संकटातही तयांच्या नाती जपु लागलो.
म्हातार्या आईला भगवंत समजलो
नेत्रात तिच्या त्रिलोकी सुख पाहू लागलो.
ईश्र्वर कृपेनं जे मिळाले ते पावलो
देवाघरील नात्याला आठवु लागलो.
दनाअ, नागपूर
दि.२७/०७/२०२०
[7/27, 9:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *केशसांभाराचा साज*
केशसांभाराचा साज........
वाटले करून बघायचे.
पण मोकळे केस माझे
निसटूनच...... जायचे
केस मोकळे माझे
मलाच आवरेना....
काय करू आता
केशरचनाच जमेना
एक पिन लावली
की दुसरी निघायची
दुसरी लावली की
पहिली पुन्हा निघायची
ट्विस्ट केले पुढचे केस
जुडा केला मागच्या केसांचा
रंगीत पिना लाऊन त्यावर
माळला गजरा मोगऱ्याचा
केशसांभाराचा साज......
खूप सुंदर जमला.....
फोटो काढून त्याचा मी
स्टेटस वर ठेवला....
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[7/27, 9:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: केशसंभाराचा साज---
एक दिवस आवडला होता तुला
माझ्या केशसंभाराचा साज
तुझ्या प्रशंसेची मला मात्र
वाटत होती लाज ।।
म्हणे तू, काय तुझी वेणी
जशी नागाची डोलते ग फणी
रेशमी तुझ्या केसात
मी विसावे निवांत ।।
शांती मिळे भारी
तुझ्या लोळत्या केसात
एक एक केस जणू
मुलायम वात ।।
वरणात एक केस का दिसला
तुझा तर पारा वरतीच गेला
काळीज माझं कस घाबरल
रागाने तूं ताटावरून उठला।।
ज्या केसांसाठी फिदा
होतास तू माझ्यावर
त्याच केसांनी घाव
घातला संसारावर ।।
सुकेशीनी म्हणून मला
अभिमान होता
त्याच केसांचा आता
राग आला होता ।।
वाटते आज, केस
कापून बॉय कट करावे
अधुनिकांप्रमाणे मी
मिरवत रहावे ।।
म्हणजे कधी काळी
जेवणात केस निघाला जरी
तो तुझाच आहे,असे
म्हणता येईल तरी ।।
मंगला डहाके, भंडारा
[7/27, 9:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (७०)
""केस संभाराचा साज""
मी नार नखरेदारं
करीन सोळा श्रृंगारं
भले भले होती घायाळ
तव गळ्यात हातमाळ.
केस समोरील पिळदार
जुळा केसांचा नक्षिदार
त्यावर अंबाडा लाविला
रंगीत पिना गजरा शोभला.
श्रृंगार शोभे नारी देहाला
त्यात केसं संभार साजला
चालीत नखरा लाजवंतीला
पाहुनी सभागृह कुजबुजला.
कार्य वैवाहिक वा धार्मिक सण
नारी सजतेचं नखशिखांत
हक्क आहे तिचा साजश्रृंगारात
कार्याची शोभा तिच्या असण्यात.
दनाअ, नागपूर
दि.२७/०७/२०२०
[7/27, 9:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *केस सांभाराचा साज*
आज होता टास्क
केस रचनेचा
नाही ना मोह आवरला
मलाही आंबाडा पाडण्याचा
केस होते सुळसुळीत
खोचल्या त्यात पिना
तरी काही केल्या
आंबाडा काही पडेना
मनाशी मी ठरवलं
टास्क पूर्ण करायचा
रबरबँड लावून
आंबाडा घट्ट पाडायचा
अंबाडा झाला पाडून
गजरा त्यात माळला
खुलले माझे रूप
सख्या माझा भाळला
सौ नंदा अ भोयर
[7/27, 9:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: केशसंभाराचा साज
लांब केसांचे आकर्षण किती,
मुलगी बघताच दिली पसंती.
नव्या दिवसाची नवी नवलाई,
सुंदर गजरे रोजच माळी.
पाठीवरती झुलते केस,
मनात त्याच्या वेगळे वेध.
सागरवेणी,जुडा,अंबाडा,
जीव होई त्याचा अगदी वेडा.
छोट्या केसांची हौस ना झाली,
नवरोबाच्या आगळ्या हट्टापायी.
म्हणतो मजला,माझी राणी,
लांब केसातच तुझे सौन्दर्य भारी .
बघतो तूझ्या केसांचा साज,
आजही होई मन माझे घायाळ.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.जिल्हा बुलडाणा
दि.27.07.2020
[7/27, 9:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 केसांचा साज 🌺।।
नवनाट करुन शृंगार
नख शिखांत सजली ललना
फ्रेंचकट आंबाडा पाडून
देई गजरा माळूनी सजना।।
विधात्याचे आशिष नारीला
नटण्याचा दिला मुक्त परवाना
कुंकू,कंकण,गळसरी "वाचूनी"
सौभाग्यवती दिसे वारांगणा
आपुलाची हक्क आपुनची जपावे
शिकावे परी जपावे संस्कृतीला
स्रित्वाचा मान सोडू नयेच
जसे असे तसे जपावे सौंदर्याला।।
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
[7/27, 9:09 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: केश सांभाराचा साज
आला श्रावण मासातील पहिला सोमवार
केसांवर दिला मी जमून मार
सोपुन सुलाखुन धुतले छान
म्हणे कसा तू वाढवलंस माझा मान.
वाटलं केशसांभाराचा साज
करुन बघावं आज
केस कापलेत नुकतेच ताज
हातात काही सापडेना मज.
ठरवलंय काही झाले तरी
आज पाडायचाच जुडा
जुडा पाडतांना मज्जा च आली मना
जुड्यासाठी केस गुंफले की
आपले निसटून च जायचे.
म्हणतात जिद्द हीच दौलत ना
झालायं एकदा चा आंबाळा
आंबाळ्यावरती ल्याला मी
मोगरागुलाब गजरा
अस्सा केलाय बघा आज
मी केशसांभाराचा साज.
सौ सुषमा एस पडोळे खात रोड भंडारा
[7/28, 8:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *1) सोमनाथ (गुजरात - वेरावळ)*
वेरावळनजीक सोमनाथ श्रीशंकराचे मंदिर
ज्योतिर्लिंगात सोमनाथ अग्रस्थानी
जवळ त्याच्या पाच पांडव गुफा
दीप आराधना आरती सांजा तिन्ही
*************************
*2) मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)*
कृष्णानदीकाठी श्रीशैल्य पर्वत
विराजमान तेथे मल्लिकार्जुन
मल्लिका नाव माता पार्वतीचे
पिता शंकराचे नाव अर्जुन
***********************
*सौ स्वाती सेलोकर*
*भंडारा*
[7/28, 8:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी-
सोमनाथ-
* चंद्रोपसाने लिंगात प्रविष्ट सोम*
* म्हणती तया सोरटी सोमनाथ *
* अर्पूणी तया बेलपत्र श्वेत फुले*
* होई रोगमुक्त तो अनाथ *
मल्लिकार्जुन-
* कृष्णाकाठ शैलपर्वतावरी*
* विराजमान मल्लिकार्जून *
* योगी सिद्धेश्र्वर करी आराधना*
* पावन होई सामान्यजना *
सौ.के.बी.सार्वे भंडारा.
[7/28, 8:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी
सोमनाथ ज्योतिर्लिंग
सौराष्ट्र आद्य ज्योतिर्लिंग,
जेथे विराजमान सोमनाथ.
क्षयापासून रक्षिती सोमास (चंद्रास),
महिमा वर्णिती पुराणात.
मल्लिकार्जुनज्योतिर्लिंग
श्रीशैलम पर्वती,मल्लिकार्जुन येति,
रुष्ट पुत्र कार्तिकेयेस भेटवयासी,
पार्वतीचे शक्तिपीठासवे,
शिव ज्योतीरमय स्वरूपी दिसे.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव.जिल्हा बुलडाणा
दि.28.7.2020
[7/28, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सोमनाथ🌼🌼
बारा ज्योतिर्लिंगा मध्ये
पहिले मानाचे स्थान म्हणून
सोमनाथ शिवलिंग ला महत्त्व आहे. गुजरातच्या वेरावळ बेटा जवळ वसलेल.चैत्र, भाद्रपद, कार्तिक या तीन महिन्यात पित्तरांचे श्राद्ध करण्यास फार महत्त्व आहे इथे
ह्याच्या शिवाय तीन नद्यांचे संगम हिरण,कपिला, सरस्वती ह्या एकत्र येतात या स्थानाला फार महत्त्व आहे
........
मल्लिकार्जुन 🛕🛕
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग शिवपुराणच्या अनुसार १२ शिवलिंग मध्ये दुसरे मानाचे स्थान आहे. हे कृष्णा नदीच्या काठावर श्रीशैल पर्वतावर वसले आहे.
हे आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात वसलेले आहे. ह्याला दक्षिण कैलास या नावाने पण संभोदतात...🙏🏼
सौ.सुचेता सार्वे
पनवेल नवी मुंबई
[7/28, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *उपक्रम चारोळी*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*१.सोमनाथ ज्योतिर्लिंग (गुजरात)*
*सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ*
*सागर किनारी वसले श्रद्धास्थान*
*हिरण कपिला सरस्वतीचा संगम*
*शंभोशिवशंकर सतीचे नाथ*
*२.मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग(आंध्रप्रदेश)*
*श्रीशैलम मल्लिकार्जुन*
*ज्योतिर्लिंग आंध्रात*
*कृष्णेच्या तीरावर वसते*
*जावे दर्शना मंदिरात*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*सौ. रूपाली अमोल बोंद्रे,भंडारा*
[7/28, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी
सोमनाथ ज्योतिर्लिंग
पवित्र तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध हे ज्योतिर्लिंग
बारा ज्योतिर्लिंगात पाहिले मानाचे स्थान
वेरावळ बेटाजवळ स्थित हे लिंग
तीन नद्यांचा आहे सुंदर संगम.
भगवान शंकराचे इथे वास.
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग
श्रीशैल्य पर्वतावर विराजमान मल्लिकार्जुन
कृष्णा नदीच्या काठावर वसलेले
बारा शिवलिंगा मध्ये दुसरे मानाचे स्थान
दर्शन घेण्या भाविक उत्सुक फार.
सौ.कीर्ती प्रदीप शेंडे....नागपूर
[7/28, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: **चारोळी* 🌷सोमनाथ ज्योतिर्लिंग🌷 *बारा ज्योतिर्लिंगमध्ये प्रथम मानाचे स्थान * * त्रिवेणी संगमाने घडतात तेथे अनुष्ठान * *म्हणूनच गुजरातच्या वेराळ बेटाला मिळाला शिवभक्तीचा मान * 🌷मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग🌷 * कृष्णा नदीच्या तिरी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात शिवशक्तिचा वास *त्यांच्या कृपा दर्शनासाठी भक्तांची गर्दी दिसे खास * सौ.स्वाती सं. शिंगणजुडे ( पिंगळे)अमरावती
[7/28, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उपक्रम श्रावणी सोमवार
बारा ज्योती लिंग
सोमनाथ
प्रभात पाटणक्षेत्र संबोधिती सोमनाथला
सोमनाथ च्या दर्शने पापमुक्त होताती
ते आहेत जगाचे दा ता उत्पत्ती
लोक येती सोमनाथ दर्शनासाठी
मल्लिकार्जून
आंध्र प्रदेशातील श्रीशैलपर्वतात
मल्लिकार्जून ज्योतिर्लिंग वसताती
असती हे मंदिर क्रिष्णा जिल्ह्यात
ह्यासी दक्षिण कैलास संबोधिती
सौ सुषमा एस पडोळे खात रोड भंडारा
[7/28, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उपक्रम चारोळी
************
सोमनाथ ज्योतिर्लिंग (गुजरात)
बारा ज्योतिर्लिंगा मधुनि महान
करावे सोरटी सोमनथाचे दर्शन
मोहमंद गझनिने नेले सोने लुटून
हिंदूंचे असे ते पवित्र स्थान
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग(आंध्रप्रदेश)
कृष्णानदी तिरी असे श्रीशैलम
तिथे स्थापियले मल्लिकार्जुन
अर्जुन असे पुढे मल्लिका मागे
मंदिराला कळस सोनियाचे शोभे
सौ.रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[7/28, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺ज्योतिर्लिंग🌺
🏵️ सोमनाथ🏵️
हिरण्या ,कपिला,सरस्वती
तिन्ही नद्यांचा संगम जिथे,
गिरनार पर्वताच्या रांगा जिथे,
बारा ज्योतिर्लिंगांपैकी अग्रस्थानी असलेले" सोमनाथ" तिथे.
🌸मल्लिकार्जुन🌸
कृष्णा नदीच्या काठावर,
नल्लमलाई डोंगर रांगात,
सदाहरित जंगलात वसलेले , ज्योतिर्लिंग
"श्री शैल्यम् मल्लिकार्जुन"
सौ अंजलि बांते. भंडारा
[7/28, 8:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।सोमनाथ।
शिवशंकर भोलेनाथ पापाचे मुक्तमहार
बारा ज्योतिर्लिंगींत प्रथम स्थान
वसले गुजरात सौराष्ट्र प्रातांत
प्रभात पाटन स्थायी श्रीसोमनाथ।
।मल्लिकार्जुन।
आंध्रप्रदेशात श्री शैल्य पर्वतात
दुसरे ज्योतीर्लिंग प्राणप्रतिष्ठान
भेट दिली शिवशक्ततीने नामदान
स्थापित कृष्णकाठी मल्लिकार्जुन छान।
सौ . चंदा वनवे शेंडे
नागपुर.
[7/28, 8:32 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी
🌺सोमनाथ🌺
दक्षाच्या शापाने चंद्राला केलं त्रस्त
शिवाच्या आराधना ने चंद्र झाला क्षयमुक्त
सौराष्ट्रात विराजमान प्रथम ज्योंतीलिंग तेच सोरटी सोमनाथ
करतात रोगाचे निवारण.
🌺मल्लिकार्जुन🌺
कार्तिकेयास मनविण्यासाठी आले शिव-अर्जून, पार्वती-मल्लिका दुसरं ज्योतिर्लिंग.
श्री शैल्य पर्वतावर विराजमान मल्लिकार्जुन.
सतीचे भस्म पडले.म्हणून शक्तीपीठ
करतात पापाचे क्षालन.
माधुरी भूते
[7/28, 8:32 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹बारा ज्योतिर्लिंग 🌹
सोमनाथ = सोमनाथ जगत मंदिर समुद्र च्या किनाऱ्यावर आहे, दक्ष राजाच्या मुलीचे लग्न चंद्र् देव सोबत होते,
चंद्र् देवा ला शार्प मिळाला होता, त्यानी कालभैरव ला प्रसंन्न करून तेथे सोमनाथ मंदिर स्तिथ झाले,
मालिकार्जुन =
आंध्र प्रदेश मधील कृष्णा नदीच्या शैल आहे,
शैल दक्षिण क्षेत्र चा कैलास म्हटले जाते,
येथे शिव भगवान माता पार्बती सोबत विराजमान आहे ,
सौं शोभा राजेश खोकले (ठाकरे )
यवतमाळ
[7/28, 8:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के सा.सं.प.
. ""संस्कारधारा"". (१३)
नेमे लागं कामाला हाती भविष्य तुझ्याच रं...
असंगाशी संग नको बेसावध कसा तु रं...
येईल कष्टाने पहाट रविकिरण अंगणात रं...
ठेवं धिर मनाला उद्या आपलाचं दिवस रं...
दनाअ, नागपूर
दि.२८/०७/२०२०
[7/28, 8:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.२२
घन ओथंबून येती
श्रावण सरी बरसती
रविराज ओल्या माती
सोनकिरण पेरती.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/28, 8:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (७२)
(चारोळी फक्त दोन)
🕉️ बारा ज्योतिर्लिंग🕉️
(०१). "" श्री सोमनाथ""
बारा ज्योतिर्लिंगात श्रीसोमनाथाचे अग्रस्थान
सौराष्ट्र काठीयावाड प्रांत वेरावळ ठिकाणी
भगवान श्रीकृष्णाने देहत्याग केला या स्थानी
मोडतोड केली मोहंमद गझणी सारख्या दुष्टांनी.
(०२). ""श्री मल्लिकार्जुन""
श्रीमल्लिकार्जुन आंध्रा कृष्णेकाठी श्रीशैल गिरी
इ.स.१४०४साली श्रीकृष्णदेवरायांनी जिर्णोद्धार
विष्णु सांप्रदाय भक्तांना याचे महत्त्व फार
शिवलींग बहु दिसतात मंदिराचे कळसावर
दनाअ, नागपूर
दि.२८/०७/२०२०
[7/28, 8:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 प्रभात पुष्प 🌺।।४१.
* बागेतील फुले कुजबुजली *
* श्रावणमासी आली मंगळागौर*
* चला तिची आरास करु या *
* धरु या झिम्मा फुगडीचा फेर*
सौ.कमल सार्वे भंडारा.
२८|७|२०२०.
[7/28, 8:33 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (७२)
(चारोळी फक्त दोन)
🕉️ बारा ज्योतिर्लिंग🕉️
(०१). "" श्री सोमनाथ""
बारा ज्योतिर्लिंगात श्रीसोमनाथाचे अग्रस्थान
सौराष्ट्र काठीयावाड प्रांत वेरावळ ठिकाणी
भगवान श्रीकृष्णाने देहत्याग केला या स्थानी
मोडतोड केली मोहंमद गझणी सारख्या दुष्टांनी.
(०२). ""श्री मल्लिकार्जुन""
श्रीमल्लिकार्जुन आंध्रा कृष्णेकाठी श्रीशैल गिरी
इ.स.१४०४साली श्रीकृष्णदेवरायांनी जिर्णोद्धार
विष्णु सांप्रदाय भक्तांना याचे महत्त्व फार
शिवलींग बहु दिसतात मंदिराचे कळसावर
दनाअ, नागपूर
दि.२८/०७/२०२०
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावण सोहळा
श्रावण मासी हर्ष मानसी
सोमवार उपवास चार आसती
पहिला सोमवार शिवामूळ तांदुळ
काढून स्त्रिया पुजन करीती.
दुसरा सोमवार शिवापूठ तीळ
बिल्वपत्र अर्पूण शंकराला
हळदीकुंकू फुले वाहुनी जुळविती मेळ
आशिष मागती सुखी ठेव आम्हाला .
शिवामूठ मुग असती तिसऱ्या सोमवारी
चौथ्या सोमवारी शिवामुळ जव असती
असे हे चार उपवास असती
हर्षाचे नि आनंदाचे डोही.
श्रावण मासी सणवार हर्षवी
दिपपुजा नागपंचमी रक्षाबंधनही
स्त्रियां ची असे कसरत पंचपक्वान्न करण्याची
मुलांना वाटे मजा ते खाण्याची ,
श्रीक्रुष्ण जयंतीला क्रुष्णाची पुजा करीती
दुसरे दिवशी गोपालकाला असती
बैल पोळ्याची मजा खरी खेड्यात
आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देती.
बैलांचीआंघोळ करूनबेगड लावून रंग विती
असे सण हा पोळा पिठोरी
सजविती बैलांना प्रेम भावानी
असे हे श्रावण सोहळे विविध रंगी
सौ सुषमा सु पडोळे खात रोड भंडारा
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: || श्रावण सोहळा ||
अमावस्येच्या ज्योति उजळूणी
श्रावण सोहळा येई नटुनि
त्यौहार पहिला नागपंचमी
झिम्मा,फुगड़ी वारुळा जावूनी
सोमवारच्या असे श्रावणी
शंभु महादेवाची मनधरणी
बेलपत्र,फुलं,शिवमुठ ठेवुनि
आराधना उपवास करुनि
श्रावणातिल मंगळवारी
सौभाग्यवतींचि मंगळागौरी
सख्या नटति सर्व मिळोनि
भाऊ भेटाया रक्षाबंधनि
आठ दिवसांनी अष्टमी
झाडी मध्ये कान्होबा म्हणी
होई पूजा खेडो पाडी
दुसऱ्या दिवशी दही हांडी
ढवळया पवळया सजू लागला
म्हणे आमचा सण पोळा
शेतकरी संतुष्ट जाहला
असा संपला श्रावण सोहळा
सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *श्रावण सोहळा*
आगमन होता श्रावणचे
सणावाराला सुरुवात होई
नटण्यामुरडण्याची हौस भारी
मुलाबाळांनाही मजा येई
ऊन पावसांचा खेळ असे.
कधी उकाडा कधी लागे छत्री
श्रावण सोमवारी उपवास करून
शंभू नाथास वाहती बेलपत्री.
येता नागपंचमी सण......
बायका जाती वारुळाला
राखी बांधण्यास भावाला
माहेरी जाती रक्षाबंधनाला
झिम्मा फुगडी खेळ खेळूनी
मज्जा करती मंगळागौरीला
श्रीकृष्णाची पूजा करून
दही हंडी फोडती जन्माष्टमीला
पोळा सण बैलांचा खास
एक दिवस मिळे सुट्टी त्यास
विविधतेचे अनेक सोहळे
घेऊनी येई श्रावण मास
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌾🌈श्रावण मास🌈🌾 श्रावण आला मनी आनंद दाटला.... सर्व सृष्टीने जणू हिरवा शालू पांघरला..... कधी पावसाची सर तर कधी उन्हाचा लंपडाव..... यात मानवी मन इंद्रधनुष्याच्या रंगात रंगला .... होतात सणाचे आगमन देतात घरादाराला प्रसंन्नता... दीप पुजेने उज्वल होतात जिवनाच्या वाटा.... शिवाच्या आशीर्वादाचा वर्षाव श्रावण सोमवारात.... मंगळागौरी देते सौभाग्याचा आशीर्वाद ...... बहीण भावाच्या प्रीतीच्या रक्षाबंधनाचा सण हा खास... बाळ गोपाळांचा लाडका दहिहांडीफोडायला येतो जन्मास.... असा हा मनाला आनंद ,सुख, समाधान देतो श्रावण मास... प्रा.स्वाती सं.शिंगणजुडे( पिंगळे )अमरावती
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावण सोहळा---
शृंगारिक या सौंदर्यवतीच्या
सप्तरंगी कमानी भोवती
श्रावणाचा सण सोहळा
वाऱ्यासंगे लावण्य झोके घेती ।।
चंद्रप्रभा ही शोभे धरती
हिरव्या शालूत सजली नववधू
निलवर्णीय नभात दिसे
चंद्र हा चांदण्यांचा हसरा साधू।।
दीप उजळे प्रकाश चोहीकडे
नागपूजा ही सारे करती
श्रावण मासातील ज्योतिर्लिंगाला
बेल,फुले,शिवमूठ श्रद्धेने वाहती।।
रेशमी बंधन विश्वासाचे
अतूट भावा-बहिणीचे नाते
गोड खोडकर श्रीकृष्ण येतो
सण लाडू करंज्याचे ।।
मंगळागौरीची पूजा करूनी
आशिष मागती सौभाग्याचे
हरितालिके ला पार्वती शिवा नमती
उपवास करुनी वर अखंडतेचे।।
शेतकऱ्याचा मित्र असे बैल
प्रेमाने कुरवाळून पूजा करतो
मोठ्यांचा आशिष घेऊन
लहानांचा तान्हा पोळा सजतो ।।
श्रावणाचा नयनरम्य सोहळा
सण ,व्रतासंगे नाचत गाते
झिम्मा ,फुगड्या फेर धरुनी
आनंद ,सौख्यात तेज उजळते ।।
* * *
मंगला डहाके भंडारा
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावण सोहळा
श्रावणमासी आनंदी आनंद गडे,
झोपाळ्यावर सखी झोके घेती जिकडे तिकडे.
परिधान केला हिरवा शालू सृष्टीने,
पाणीच पाणी बाई चहू कडे.
सोमवारचे व्रत अती पावन,
महादेव आपले आहेत मनभावन.
बेलपत्र,श्वेत फुलाची आवड शिवास,
सोमवारी शिवमुठ प्रिय देवास.
नागपंचमीला नागपुजा भारी,
लाह्या,फुटाणे,शिरा,प्रसाद सर्वांच्या घरी.
नारळी पौर्णिमेला, बहीण बांधते राखी भावास,
वचन घेते रक्षणाचे, भावाकडून खास.
श्रीकृष्णाचा जन्म सोहळा, वाजवितो बासरी कृष्ण सावळा.
दहिहंडी फोडीती बाळ गोपाळ सारे,
क्षण हे आनंदाचे,डोळ्याचे फिटती पारणे.
सौ कीर्ती प्रदीप शेंडे....नागपूर
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावण महिमा
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवड दाटे चहूकडे
क्षणा त चिंब भिजवून
क्षणा त ऊन पडे,
श्रावण महिना व्रत वैयकले चे दिवस, ऊन
पावसाचे खेळ असे
श्रावणात आपल्या अंगणातले पारिजात बहरलेला पाहून मन
प्रफुलित होते,
श्रावण महिण्यात श्रावण
सोमवार शिवाला शिव मूठ
वाहायची असते, बेल , फुल शिवाची आवडती,
श्रावणात नागपंचमी येते,
चल गं सखे चल गं सखे
वारुळाला, नागदेवतेला
पुजायला असे गाणे म्हणत
नागपंचमी साजरी hote,
श्रावणात दर मंगळवारी
मंगळागौर पूजन करतात,
मुली, महिला, सर्व नटून थटून, पूजन करतात,
झिम्मा, फुगडी, गाणे , नाचून, ही मंगळागौर साजरी होते,
श्रावणात गोविंदा आला रे आला करत, आमचे बाळ , गोपाळ श्री कृष्णा जन्माष्टमी साजरी केली जाते,
श्रावणात शेतकऱ्यांचा मित्र
बैल पोळा येते,
लहान, मुलाचा तान्हा पोळा साजरा होते,
सौं शोभा राजेश खोकले, (ठाकरे )यवतमाळ
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *श्रावणस़ोहळा*
आगमन ह़ोता श्रावणमासाचे
दर्शन होता शंभू महादेवाचे
बेल पत्री वाहून यास
सोमवार दिवस प्रिय त्यास
नंतर येते नागपंचमी
नागाला पूजती सर्वजणी
दूध लाह्या फुटाणे नैवद्य देऊनी
नतमस्तक होता तवचरणी
रक्षाबंधन गोकुळाष्टमी
सणासुदीचा आनंद मनी
श्रावण मास कसा जातो निघुनी
हर्ष उल्हास सर्वांच्या मनी
नंदा भोयर
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏 श्रावण सोहळा🙏
श्रावण आला श्रावण आला
आम्हा सगळ्यांना आनंद झाला.......
सोमवार हा शंभूचा
बेलपत्री चा मान खरा
आशीर्वाद तो देई लवकर
म्हणून त्यास म्हणती
भोळा शंकर.........
मंगळवारी मंगळागौर
करुनी गजर फुंकती घागर
बाळकृष्ण येती रांगत
वर्षभराचे हितगुज सांगतं.....
स्त्रियांच्या फार आवडीचे
व्रत हे सौभाग्याचे
हरतालिकेला जमती स्त्रिया
काजळती ही म्हणती त्याला..
बाप्पा गणपतीचा काय थाट
श्रावण सरित आला नाचत
श्रावण आला श्रावण आला..
🙏
सौ. भूमिका राजेश बोंद्रे/भगत.
🙏 अमरावती🙏
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।श्रावण सोहळा।।
श्रावण सोहळा रंगला कसा
बीकेगृपला भेटा जरा
कवि कवियत्रीचा उत्साह बघा
श्रावण नटवायला झटल्या सार्या।।
भल्या पहाटे उठूनी आल्या
श्रावणातील पाऊस धारा
चिवचिवाट घाली पक्षांचा थवा
हिरवळ दाटीने मन प्रसन्न झाला।।
कर जोडुनी बीज अंकुरला
नमन त्याचे दिपसोमवतीला
विनवनी करती नागभुजंगाला
सुखी ठेव अर्पु कळई तुला।।
बारा ज्योतिर्लिंगाचा सोहळा
श्रावण सोमवार दिनी आला
सवासिनी करती पुजा अर्चना
वाहती बेलपान इच्छाआकांक्षा पुर्तीला।
रक्षाबंधनाचा दिन आला
सजला आंगण रंग बिरंगी फुलांनी सारा
बहीनभाऊ नात पवित्राला
देवाने सुरक्षा कवच प्रदान केला।
बालगोपाल कृष्णजयंती दिनाला
चोहिकडे आनंदिआनंद झाला
दही हांडी फोडुन गोपालकाला
गोड झाला ज्याच्या नशीबी त्याला मिळाला।।
पिठोरी अमावस्या सण बळीराजाचा
असतो खास सखा शेतकर्याचा
जत्रा भरते गावच्या सिवारीला
श्रावण सोहळा पुरणपोळीचा।।
सौ.चंदा वनवे शेंडे
नागपुर.
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावण सोहळा
श्रावण सोहळा आनंदाचा,
जणू सृष्टीचीच्या डोहळ्याचा,
सणासुदीचे आगमन भारी
श्रावणात सोहळ्याची दिसे तयारी.
नागपंचमीच सण,
वारूळा जाऊनि करती पूजन.
शिव आराधना सोमवारी,
बेलपत्री शिवामूठ शिवास वाही.
नववधू पूजितें मंगळागौर,
झिम्मा,फुगड्या,खेळती खेळ.
बहिणभावाच्या अतूट नात्याचा,
मनवितो सण रक्षाबंधनाचा.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन,
देशभक्तीत सारे तल्लीन.
जन्माष्टमीला सजतो पाळणा कृष्णाचा,
दहीहंडी फोडुनी प्रसाद मिळतो काल्याचा.
बैलपोळ्याचा शेतकऱ्यांना आनंद झाला,
तान्ह्या पोळ्याचा मुले मागती बोजारा.
विविध पदार्थांची चंगळ सारी
श्रावणसोहळे साजरे होई
हसत खेळत आयुष्य जाई
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव जि.बुलडाणा.
दि.29.7.2020
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावण सोहळा
श्रावण मासी येते जवळ
जिकडे तिकडे दाटे हिरवळ,
ऊन पाऊस खेळे खेळ
व्रत सणाचा आला सोहळ,,
सन आला नागपंचमीचा,
पूजन करते नागाची,,
सण आला नारळी पौर्णिमेचा,
बहीण भावाला ओवाळणी करायला,,
सण आला पोळ्याच्या,
शेतकऱयांचे बैल निघाले सजायला,,
सण आला कृष्णदेवाचा,
एक दिवसाचा पाहुणा अन
दुसऱ्या दिवशी विसर्जनाचा,,
श्रावण मासी आनंदी
आनंद गडे,
जिकडे तिकडे
चोहीकडे,,
सौ श्वेता स. कानतोडे(वैद्य)
अमरावती
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹श्रावणसोहळा🌹
श्रावणमासी श्रावणसोहळा
श्रावणसरींनी वर्षाव केला
श्रावण सणास प्रांरभ झाला
दिप उजळून जिवती झाली.
श्रावण सोमवारी शिवाची पूजा
दह्या दुधाने अभिषेक केला
श्वेत फुल,१०८ बिल्लवदळ
मुग,तीळ,जवस,जव, तांदूळ
वाहती शिवमुठ.
मंगळवारी मंगळागौर
नववधू घेती सौभाग्याचे व्रत
शिवलिंगाची पूजा करूनी वाण वाटुनी
झिम्मा, फुगडी खेळती खेळ.
नागपंचमीला नागाची पूजा करून
लाह्या, फुटाणे,शिरा चढवती भोग
बहीण भावाचे, रक्षाबंधन
राखी बांधून,भाऊ घेतो रक्षेचे व्रत
नारळी पौर्णिमेला, कोळी समाज
सागराची पूजा, अपर्ण करतात नारळ
बालगोपाल, कन्हैया,चीजन्माष्टमी
करंज्या, अनारसे चा फुलोरा बांधून दहीहंडी फोडती.
श्रावणमासी, सत्यनारायण पूजा करती.
शेवटी येती पिठोरी अमावस्या पोळा,
या दिवशी बैलाला मान
पुजा करुन,खाऊ घालतात पुरणपोळी
दुसरे दिवशी लहान पोळा
मुलं फिरवतात नंदीबैल.
असा हा श्रावणमहिन्याचा उत्सव.
सौ माधुरी भुते.
[7/29, 5:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। श्रावण सोहळा ।।
हासत नाचत श्रावण आला
सण उत्सवांची सुरुवात झाली
निसर्गाचे सुरेख रूप
बघावे ते श्रावणात
ऊन पावसाचा खेळ
सत्परंगी इंद्रधनुष्याचे
आकाशातले ते लोभस
दृष्य मनाला मोहुन टाकते
हिरवी झाडे, दरीत कोसळणारे
धबधबे, नदीतील पाण्याला आलेला खळखळणारा वेग
दृष्टी लाऊन बघावे.
जाई जुईच्या फुलांचा सुगंध
श्रावणातच फुलतो ब्रम्हकमळ
या विविध रंगबिरंगी झाड
फुलांनी नटलेला हा श्रावण
वेड लावतो। एक सकारात्मक विचारांना
चालना देतो.
🌸🌲🌼🌸🌲🌸🌼🌈
सौ.सुचेता कुकडे सार्वे
पनवेल नवी मुंबई.....।
[7/29, 5:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के हा.सं.प.
"" संस्कारधारा"". (१४)
सतत पावसाचा दिसं लपंडाव सुरू
शेतकरी राजाचा जिवं लागला मरू
मेघराजा,अंत नको माझा पाहु रं
येऊ दे सरीवर सरी भिजव शेत रं.
दनाअ, नागपूर
[7/29, 5:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (७३)
"" श्रावण सोहळा""
रिमझीम पावसावर पडतो प्रकाश पिवळा
आकाशी इंद्रधनूसह सजते हिरवी धरा
उत्साहते मन पशुपक्षांसह वनचरा
व्रत वैकल्यानं शोभते श्रावण सोहळा.
दिवे उजळुन दिपपुजा पळवा अंधकाराला
लाह्या दुधाचे पुजन वारूळा नागपंचमीला
राखीपौर्णीमेला राखी बांधते बहिण भावाला
दहीहंडी उत्सव श्रीकृष्ण जन्माष्टमीला.
अमावश्येला नेमेची येतो सण पोळ्यांचा
सर्जाराजा सोबती वर्षभर कास्तकाराचा
साजरंगाने नटवुन तयांना नेई पोळ्याला
मनोभावे पूजन पुरणपोळी देई खाण्याला.
पाडव्याला गावात नंदीपोळा भरला
बालगोपाळांसह नंदीही सजविला
रंगभुषा,वेशभुषेनं वाजत गाजत
भजन दिंडी मिरवणूक वळसा गावाला.
गावच्या लेकीसुना जमती सणाला
दोरं बांधती झुल्याचा उंच झाडाला
झिम्मा फुगड्यांसह उंच झोक्याला
आनंदच भरतो श्रावण सोहळ्याला.
दनाअ, नागपूर
दि.२९/७/२०२०
[7/29, 10:32 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्रावण मास
श्रावण मास
मनि उल्हास
संणांचा वास
गोडधोड खास
श्रावण सरी
मना तरतरी
पाचूचे वस्त्र
सृष्टी तृणभरी.
पुष्प संभार
लता अलंकार
पक्ष्यांचे गुंजन
आनंद अपार.
श्रावण मास
इंद्रधनू आकाश
तांबडे पिवळे
सूर्य प्रकाश.
बलाक माला
संध्या समयाला
नवरंग उधळी
गाणी श्रावणाला.
झोपाळा झाडाला
मुली माहेराला
नाचू गाऊ
मंगळा गौरीला.
सर्व मासात
मास श्रावण
सकलांना देई
नव संजीवन.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *संतांची भूमी*
*************************
संतांची भूमी असे
फक्त भारत देशा
साक्षात देवच वसती
घालूनि भगवे वेशा
अंधश्रद्धा दूर करूनि
समाज प्रबोधन करती
प्रथम पूजती कार्यास
कार्यासच देव मानती
संत तुकाराम महाराज
महती संगती वृक्षाची
अभंग त्यावरी लिहूनि
डोळे उघडती आमची
त्रास देऊनि संतांना
म्हणती संसार त्यागी
महान कार्य केले त्यांनी
जे असे आम्हा उपयोगी
करण्यास अनेक सत्कार्य
केल्या हाल अपेष्टा सहन
अध्यात्माची जोड असे
करण्या कुविचार दहन
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *संतांची भूमी*
भारत देश आहे
संतांची भूमी
आमच्या देशात नाही
कशाचीच कमी
सौंदर्याने नटलेला
संस्कृती आमची चांगली
शिकवण थोर संतांची
अंगी आम्ही आणली
थोरसंत थोर महापुरुष
भारत मातेच्या उदरात जन्मलेले
जे या देशाला अनमोल शिकवण देऊन गेले
आम्हा भारत मातेचा अभिमान
संतांचा राखतो आम्ही मान
गर्वाने सांगतो आम्ही
थोर संत आमच्या देशाची शान
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आध्यात्मिक कविता
विषय-संतांची भूमी
साधु,संत येती घरा
तोची दिवाळी,दसरा.
हीच आम्हा शिकवण
परमार्थ हाच जाण.
महाराष्ट्र भूमी झाली
संत जन्मांनी पावन
ज्ञानोबा,तुकोबा,नामा,
चोखा येण्यासी कारण.
संसाराचा सारा भार वाहात
जीवन घालावे परमार्थात.
न करीता कुणाचाही घात
मुखी रामनाम संसारात.
पंढरीचा विठ्ठल
साऱ्यांची माऊली.
हरी नामाच्या गजरात
भक्तांना पावली.
मुक्ताई,जनाई, कान्होपात्रा
साधीभोळी भक्तीजत्रा.
गोरोबानं तुडविला बाळ
रंगला हरीत सर्वकाळ.
रेड्याच्या मुखी वेद वदले
पडकी भिंत चालू लागे.
श्वाना देऊन तूपवाटी
देव जेवले नाम्यासाठी.
गाडगेबाबा, तुकड्यादास
स्वच्छता,श्रम ग्रामगीतास.
सर्वांठाई एकच भाव
सदाचारात पाहावा देव.
संत गजानन,शिर्डीचे साई
दोन्ही रूपं एक पाही.
भजन,किर्तन,भारुड,अभंग
संतांच्या भूमीत,सारे दंग.
साधू संतांचा महिमा अगाध
घडो सहवास भक्तीचा छंद.
संतांची भूमी आहे पावन
त्रिभुवनी हीलाचं मान.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹 संताची भूमी 🌹
संताची भूमी आहे
या भारत देशात
संताची नाही कमी
थोर संत महापुरुष
झाले आहे भूमीवर
वर्धा या जिल्यात
आर्वी हे गाव असे
संताची भूमी म्हणून
ओळखले जाते, या गावात नाही कशाची कमी,
टाकळखेळ चा लहानुजी महाराज
आहे त्या भूमी वर
आडकोजी महाराज
असे वरखेड गावात
त्या भूमी वर असे,
आर्वी या गावात
सरू माता आहे नावा
रूपात , आहे तिची
कृपा या गावात,
कौंदणपूर रुख्मिणीचे
माहेर आहे च्या भूमी वर,
या संताच्या भूमीचा
आहेत अभिमान,
या भारत देशाला
आहे , संतांची शिकवण
आहे बांडगून,
या शिकवणीचा आहे
आम्हाला अभिमान
आपण सर्व या
संतांचा राखतो मान
सौं शोभा राजेश
Khokale
यवतमाळ
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संतांची भूमी
महाराष्ट्र असे, संतांची भूमी पवित्र,
जन्मले थोर येथे, साधू संत अनेक.
जन्मापरी असे जरी, जातपंथ बहुत,
शिकविती संत सारे,
शिकवण मानवतेची एक.
ज्ञानेश्वरी, ग्रंथ ,गाथा,
असे विविध बहुमुल्य साठा.
म्हणुनी समृद्ध झाली,माझी भारत माता.
ज्ञानेश्वरे रचिला पाया,तुका झालासे कळस,
जन्मलो येथे आम्ही,लाभले भाग्य थोर.
किर्तन,भारुड, प्रवचनातून,
करती समाज प्रबोधन.
कुणी कृतीतून आपल्या,
जपती समाजहित.
खऱ्या संतांची शिकवण,
कधी न जाई वाया.
सारून अज्ञान,अंधश्रद्धा,
दुःखीतांची करावी सेवा,
हाच मिळतोआम्हा संदेश.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव जि.बुलडाणा.
दि.30.7.2020
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏🙏 संतांची भूमी🙏🙏
ही भूमी आहे संतांची
आळंदीच्या ज्ञानोबांची
गीताई रुपी अमृत दिले
करावया मानवाचा उद्धार
ही भूमी आहे संतांची
देहूच्या तुकारामां ची
गायले तुम्ही अनंत अभंग
अन् गाथा दिली जगतासी
ही भूमी आहे संतांची
पैठणच्या एकनाथां ची
जोडण्या मानवा मानवास
साथ दिली भारुडांची
ही भूमी आहे संतांची
स्वच्छतेचा मंत्र देऊनी
अंधश्रद्धा दूर सारूनी
पावन केले गाडगेबाबांनी
ही भूमी आहे संतांची
निवृत्ती नामा चोखां ची
राहुनी विठोबाच्या द्वारी
रंगवी सोहळे कीर्तनाचे
हीभूमी आहे संतांची
मुक्ताई जनाई कान्होपात्राची
अभंग ओव्या गाऊनी
महती सांगितली भक्तीची
ही भूमी आहे संतांची
नटलेल्या तुमच्या विचारांची
सोसल्या अनंत हाल-अपेष्टा तुम्ही
योग्य मार्ग दाखविण्या आम्हासी
सौ अश्विनी अमर सपाटे लुटे
अमरावती
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संतांची भुमी
पूर्वी दुष्काळ ग्रस्ता परिस्थिती महाराष्ट्राची
एकवेळचं अन्न मिळणे मुश्कील असती
सावकाराचे कर्ज फेडाया नव्हते पैसे
अशातच संत महात्मे जागरुक होती.
महाराष्ट्र भूमी असे.संतांची.शाहिरांची नरविरांची
विविध पंथी विविध भाषिकांची
परी सर्वांची एकच माई.
संत नामदेव तुकाराम विठ्ठल गोरा कुंभार
एकनाथ आणि ज्ञानेश्वर
या भुमीतच जन्मती पावन होती
ऊत्तम गुण अंगीकारती.
ज्ञानदेवे रचिला पाया
तुका झालासे कळस
अशी वाणी संतांची सरस
तयांचे आचार विचार चुरस,
संत ज्ञानेश्वरांनी रसाळवाणीने लोकांसीं केले जाग्रुत
ज्ञानाचा रचिला त्यांनी पाया
लोकांसाठी ज्ञाननिर्मीती करण्या
झिजविली काया.
अभंग असती संत तुकाराम महाराजांची भावकविता
हेमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक चिरंतन सत्याचा शोध घेतला
ब्रम्ह साक्षात्कारी महान संतकवी असती,
स्वच्छता पाळा रोगमुक्त बना संदेश देती संत गाडगेबाबा
गाडगेबाबांचा मन्त्र खरा
कोरोनाला पळवून लावा.
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अध्यात्मिक कविता---
संतांची भूमी---
महान संस्कृती भारत भूची
संत महात्मे होऊनी गेले
मानवतेची शिकवण देऊनी
कृतार्थ आम्हा केले ।।
अभंग तुकोबांचे
चढविला जीवनी कळस
ओव्या रचल्या ज्ञानेशाने
आयुष्य सार रचियेला सुरस ।।
तुकडोजी सांगती वास्तव
सदविचाराने जगावे
अंधश्रद्धा अंधार काढुनी
अनमोल कार्य करावे ।।
माया, प्रेम, दया, शांती
ह्या भजनात तल्लीन व्हावे
चोखा,नामदेव, सावतांचे विचार
संस्कृतीत चैतन्य आणावे ।।
गाडगेबाबानी स्वच्छतेचे देऊनी
मंत्र अनमोल विचार खरा
जनाबाई बोले ओव्यांमधुनी
माणसा ,महान कार्य करा ।।
महाराष्ट्र ही आहे
थोर संतांची भूमी
शुद्ध आणि पवित्रतेच्या
वसती संत रत्नांच्या खाणी ।।
----------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 संतांची भूमी 🌺।।
भारतीय संस्कृती महान
येथे उपजत संतांची खान
दया,क्षमा,शांतीचे आगर
संतोपदेश वाटे प्रेमाचे वाण।।
संत भूमीवर मेळा भरे
शिकवण देती समतेची
जात,पात,धर्म,पंथ एकतेची
नाचती वैष्णव हरे हरे।।
संत तुकोबा सांगून गेले
वृक्षवल्लि आम्हा
सोयरे वनचरे
ऐसे संत न होती पुन्हा।।
तुकड्याची ती ग्रामगीता
जनप्रबोधन ते
लोकांचिया हिता
साधे, सोपे जिवनसार ते।।
सौ.के.बी. सार्वे भंडारा.
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संताची भूमी
सर्वप्रथम गणराज गजानन।
आव्हान करते तुझे दया धन।।
महाराष्ट्रात सुरवात होते संतांच्या वाणीने,
आया बाया अभंग कीर्तन
करते गीत गाण्याने,,
श्री संत गजानन महाराज
प्रकटले शेगाव गावात,
भक्तांना विसावा देऊन
मन प्रसन्न करतात,,
श्री संत ज्ञानेश्वर महाराज
प्रकटले आळंदी गावात,
माऊलींना ज्ञानेश्वरीचे
पाठ शिकवून जातात,,
श्री संत गाडगेबाबा
प्रकटले शेंड गावात, आपल्या सर्वांना स्वच्छतेचा
मंत्र देऊन जातात,,
श्री संत तुकडोजी महाराज
प्रकटले मोझरी गावात,
भारताला ग्रामगीतेचा
संदेश देऊन जातात,,
अभंग, कीर्तन, भजन
होते संतांच्या वाणीने,
सगळेच तल्लीन होऊन
जात गीत गाण्याने,,
सौ श्वेता स. कानतोडे(वैद्य)
अमरावती
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: || संतांची भूमि ||
महाराष्ट्र ची संतवाणी
दया,क्षमा,शांति मनी
ओव्या,भारूड,अभंग,किर्तन
समाजाचा उद्धार प्रबोधन
नामदेव,ज्ञानेश्वर संत अग्रेसर
एकनाथ,तुकाराम,गोराकुंभार
शिवरायाचा गुरु रामदास स्वामि
नरहरिसोनार सावतामाळी
मनाचे श्लोक,दासबोध
घडवि सद्विचार सदवर्तन
ज्ञानेश्वरी पसायदान
खरे धर्माचे मिळे ज्ञान
तुकारामाची अभंग गाथा
तया पुढे ठेवु माथा
जे का रंजले गांजले
त्याशी म्हणे जो आपुले
कान्होपात्रा,मुक्ताबाई
जनाबाई,सखुबाई
विठ्ठल भक्तित तल्लीन होई
संतकार्याने तपोभूमि पावन होई
गाडगेबाबांची स्वच्छता
तुकडोजिंची राष्ट्रभक्ति
समाजप्रबोधन जनजागृति
स्वातंत्र लढयासाठी
सौ रेणुका झंझाड भंडारा(बेला)
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संतांची भूमी-
भारत देशात आहे संतांची खाण
असा महान आमचा भारत देश
रुढी , परंपरा आणि संस्कृतीची जाण
करून परमार्थ त्यालाअध्यात्माची जोड
संत देतात शिकवणं
भव सागरास तारुण जाण्यास
संतांची वाणी, किर्तन, प्रवचन
उध्दार मानवाचं, आत्मचिंतन ईश्र्वराचे
रामदासांनी लिहिले ग्रंथ दासबोध
शिवाजी महाराजांना केला उपदेश
ज्ञानदेवाचीं ज्ञानेश्र्वरी, तुकोबांची गाथा
एकनाथांचे भारुड, नामदेवांचे अभंग, दिलं मानवास ज्ञान
तुकडोजी महाराज, गाडगेबाबा स्वच्छता मंत्र, केले समाजप्रबोधन
गजानन महाराज, साईबाबा,ताजुद्दीन बाबा
चालते बोलते अवतार
माणसांचे सुख दुःख केले दुर
जात ,पात ,धर्म दुर ठेवून, केला एकची ,माणुसकीची धर्म.
हीच संतांची भूमी.
सौ.माधुरी देवेंद्र भूते.
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।संत भुमी।।
मराठीला मान
महाराष्ट्रची शान
वारसा जोपासत
संताची खाण।
मुघल राज्यात
महती पटली जनास
वारकरी संप्रदाय
संत शांती स्थान।
यमाई तुकाई
वसी पंढरपुर काठी
एकविस संतचरित्र
कोरविल ठाई।
महाराष्ट्राचे प्रणेते
असे किती तरी संत
माणसाची माणुसकी
उभारेल जग।
शिकवण जगास
देत असे संत
साक्ष देण्यास
चमत्कार घडवित।
जात-पात स्पृश अस्पृश्य
स्वतःकरी नष्ट
स्वतःआचरणातुन
पटवती जगास।
असे कितीतरी संत
समाज कार्य घडविण्यास
देवरुप मनुष्य
लाभला जगास।
सौ.चंदा वनवे शेंडे नागपुर.
[7/30, 8:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: देहू - आळंदी गांव हे पुण्याची पुण्याई
संत तुकाराम महाराज जन्मले देहूला
संत ज्ञानेश्वर महाराज आळंदीला
दया, क्षमा, शांती चा उपदेश देणारे
चांगदेव गर्वहरण करिता चालविली भिंत ज्ञानेश्वर माऊलींनी.
खंजरी भजन - कीर्तनाने धडे गिरविले
स्वातंत्र्याची चळवळ निर्माण केली
अमुच्या मनी अशा त्या महान मोझरी
येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, गावे तेवढी महिमा कमीच
संत गाडगे बाबांची अद्भूत माया
कीर्तन केली जनजागृतीची
स्वच्छतेचा धडा शिकविला ,निर्मुन केली अंधश्रद्धा.
अशीच कृपा गजानन महाराजांची सुखविले भक्त, दंडीले दृष्ट.
नमन त्या श्रेष्ठ संतांना.
*सौ. मनोरमा गजानन तिजारे, पुणे*.
[7/30, 8:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹संतांची भूमी🌹
जन्म माझा इथे जाहला,
पावनभूमी ही संतांची।
शिकवी आम्हा सत्य,अहिंसा,प्रेम,भूतदया
नाती माणुसकीची।।
या मातीत आम्ही घडलो,
वाढलो,फुललो
नित्य आम्हा स्मरण राहते
संतांच्या शिकवणीची।।
सदाचाराचे धडे गिरविले
माया,ममता मनी बिंबवले,
राहील स्मरण सदैव
ज्ञानेशाचे-तुकोरायांचे।।
[7/30, 8:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
""संस्कारधारा"". (१५)
कोंबडा बाग ऐकवी ब्रह्ममुहुर्ताला
ऋषी मुनी बसती योगसाधनेला
भल्या माणसां झटक रे चादरीला
बघं पुर्वेला तांबड लागलं फुटायाला.
दनाअ, नागपूर
[7/30, 8:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (७४)
"" संतांची भूमी""
महाराष्ट्र आहे संतांची भूमी
सौहार्द धरोहर संतविचारांची
धार्मिक सामाजिक विचारांची
बिजे रोवली समाजात उत्थानाची.
ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, ग्रामगीता
सतत बोधविते भारतवर्षाचे जणा
संत जनाबाई, सखुबाई, चोखामेळा
गेले पंढरपुरा सोडुन तया चे सदना.
स्वच्छता कर्मयोग मुलमंत्र गाडगेबाबाने
श्रमशक्तीत ईश्वरभक्ती पाहिली तुकड्याने
निर्जिव भिंतीने केले गर्वहरण ज्ञानेश्वराने
आध्यात्मिक ज्ञान, अंधश्रद्धा प्रहार तुकारामांने.
दलिता दिले भोजन नाथांनी अस्पृश्यता त्यागली
घेवून नैवद्या तुपाची वाटी नामदेव कुत्र्याचे पाठी
सेवा पुंडलीका मायबापाची पांडुरंग पंढरपुरी
कान्होपात्रां समाविण्या उभे ठाकले विटेवरी.
तपोवनात शिवाजी पटवर्धन, आनंदवनात
बाबा आमटे,बंग दांपत्य,सिंधुताईच्या मायेत
धुत्कारलेल्या जिवांना दिले माणुसकीचं जगणं
सन्मानाचे जिवन दिले या थोर संतानं.
संपुर्ण भारत वर्षात आहे महाराष्ट्र
पुरोगामी विचारांचा होतो पथदर्शक
पंढरपूर वारीत नाही भेदाभेद दिसत
रिंगण धावती, फुगड्या खेळती भाविक.
दनाअ, नागपूर
दि.३०/०७/२०२०
[7/31, 10:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता---
एकदा आले सुभाषदादा घरी
म्हणे पाऊस रायला येऊन
कर न बाई लवकर
तू भजे बनवून ।।
भाऊजी नाही घरी, दोघेच
बहीण भाऊ लवकर खाऊ
पावसातल्या भज्यांची
मजा आपण घेऊ ।।
मनल, खादाडया येऊ दे
तुझ्या भाऊजीला
मगच करीन गरम गरम
भजे सगळ्यांना खायला ।।
सुभाषदादा थोडा
नाराजच झाला
मनल, रुसू गिसू नको
तुझ्यापुरते करून देते, मी खायला।।
भजे खाऊन भाऊ घरी गेला
एवढ्या पावसात कुठे होते तुमी
वहिनींन चांगलं धारेवरच धरलं
भीत भीत भाऊ मने, भजे खाल्ले आमी ।।
भाऊची आता
चांगलीच सटकली
वहिनी माई चांगली
त्याच रूप पाहून, खुदकन हसली।।
-----------------------------------
मंगला डहाके, भंडारा
[7/31, 10:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
~~~~~~~~~~~~~~~
*ग्रामीण जीवन*
*************************
एक डाव गेलो मी गावात
लई लोकं जमली दिसत
पाहावं म्हणलं निरखून
हाय काय गर्दीच्या आत
देवी आली म्हणं आंगात
येडी लोकं पडत पाया
जोरजोरानं ते बाई बोंबलं
बइताड झाल्या आया बाया
आंगात जिच्या आली देवी
हळूच तिचा मी काढला चिमटा
देवीच आंगातून उतरली तिच्या
माया मांग धावली घेऊन कोयता
मी बी मंग बढिया केलं नाटक
नागोबा आला माया आंगात
फुस फुस करून मांग धावलो
ते बाई पळाली जोर जोरात
*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[7/31, 10:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *उपक्रम - हास्य कविता*
नवरात्रीचे दिवस होते
रोज देवळात होई आरती
घंटानाद, ढोल ,टाळ,
जमत असे गर्दी
एक बाई अचानक
डुलत डुलत समोर येई
आरती सुरु असता
पूर्णवेळ लोळत राही
देवी आली देवी आली
सगळे जण पाया पडत
आरती संपताच देवीची
आपले गाऱ्हाणे बाईपुढे वाचत
सोन्या चांदीच्या वस्तू
आणि असे मोठ्ठी यादी
उद्या येताना घेऊन या
दूर होतील म्हणे व्याधी
मंदिराच्या शासनाला
हे काही वेगळाच वाटे
एक दिवस सगळे मिळून
मजा पाहू म्हणे टोचून काटे
छोटे छोटे काटे
सर्व बायकांनी टोचले
माफ करा म्हणत
बाई नी हात जोडले
पोल खोल झाली
त्या ढोंगी बाईची
बळी पडू नका कुणी
अश्या अंधश्रद्धेची
सौ. रूपाली अमोल बोंद्रे, भंडारा
[7/31, 10:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सरपंचीन बाई
आमच्या गावची सरपंचीन बाई
अन, गावाचा कारभार लई चोख पाई !
पहिलं त लोक मनत तिले थुटी
पर सरपंचीन बाई आता झाली लई मोठी !
पहिलं त ते इकत होती भाजी
पर लोक आता करतेत तिचीच हाजी हाजी !
सरपंचीन बाईचा गावात लई मान !
अन भासना पाट करते चार चार पान !
सरपंचीन बाईल लागला गावाच्या इकसाचा पिसा
अन हळू हळू गरम होते तिचा बी किसा !
बाईनं गावात बांधलन लई नाल्या !
कईक वारल्या अन कईक वल्या !
सरपंचचीन बाईंची होती चंद्र मोळी झोपडी
आता बांधलन बंगला अन घेतलन गाडी !
तरी बी लोक मनते बाईचा राज नाही बरा
जेती तेती दावते आपलाच तोरा !
सरपंचचीन बाई झाली कारभारीन, अन नवरा झाला बिगाऱ्या
मंगा मंगा धावते धरूनशान झोऱ्या !!
[7/31, 10:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्यकविता
टूनकी फाट्यावर,
बसची वाट पाहयत,
आजी होती बसली.
बस दिसताच,झोरा(पिशवी) घेत,
चाल व पोरी म्हणत
आली बसपुढती.
बस थांबताच,
कंडक्टर म्हणे,
'झोरा दे आजी',
झोरा देत आजी म्हणे,
'माही पप्पी घे वरती'
आजीचे बोलणे ऐकून
लोक खो खो करून हसली
'पप्पी,'माही नात म्हणत
आजी गुपचूप येऊन बसली.
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
खामगाव,जि बुलडाणा.
दि.31.7.2020
[7/31, 10:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हास्य कविता
. भूत
साधी भोळी माणसं
साध सुध जीवन
मनानं निर्मळ नितळ
असती ग्रामीण.
अंधाराचं हरीदास
लोटा घेऊन गेला.
पडक्या वाड्या मागं
. जाऊन बसला.
ऐकलं होतं. असतं
भूताचं वावरं
बसलेल्या जागी इकडं
तिकडं नजर फिरं
पांढरें पांढरे हाले काहीतरी
. पाणी फेकून तसाचं
. . धूम ठोकली घरी.
घामाघूम झाला,बसली दातखिळी
बायको म्हणे, कायले जाता
. . भलत्याचं वेळी.
सकाळी बायको,शेण
फेकायला गेली.
दिसली तिला पांढरी फाटकी
. साडी लटकली.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/31, 10:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌺सपन🌺
रात्री मले सपन पडलं भारी
सपनात माया आले कारभारी
चल म्हणे मले
गमत नाही घरी...
चार दिवस तरी
राहू द्या माहेरी
घरी तुम्ही म्हणे
वचवच करता
म्या चिमटा घेतला त
मोठ्याने बोलता.....
तू घरी नाहीत
घर खाले धावते
घरी एकल मले
कसतरी वाटते....
भरला संसार
असा नको मोडू
अर्ध्या रस्त्यावर
एकल नको सोडू...
तू म्हणशील तसं
होईल आता सारं
भर आता बॅग
घरी चल बरं....
रात्री मले सपन पडल भारी
सकाळी उठली त दारात कारभारी....
🙏
सौ. भूमिका राजेश बोंद्रे/भगत.
अमरावती.
🌺🌺🌺🌺🌺🌺
[7/31, 10:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
माणसा संग मायाबाई
सिनेमाले गेली
टॉकीज बाई म्या कवाच नोती पायली
मले मोठा हरीक आला
सिनीमा आता सुरू झाला
सिनीमा सुरू होताच
लाईन काव गेली
म्या म्हणलं खरं नाही
यान मुद्दामूनच बंद केली
माणूस म्हणे बयाय तोंडे
समजत नाही कायी
सिनेमा पाहायची तुले लईच होती घाई
सिनीमा हा अंधारातच पायते
त्याची मजा काही येगळीच रायते
म्याबाई कवा सिनेमाचनोता पाहिला
अंधार कुट्ट पाहून माया जीव घाबरून गेला
जाऊ म्हणलं घरी आता सिनेमा नाही पाहू
भकभक उजीडात आपला टीव्हीच पावू
तवापासून मी कानी टाकीजीत
नाही गेली
अंधार पावून मी लयच भेली
. नंदा भोयर अमरावती
[7/31, 10:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.स.प.
"" संस्कारधारा"". (१६)
दादा सध्या सुगीचे दिसं आहेत शेताला
राखी पौर्णिमेला कोरोणानं येणं नाही गावाला
स्विकारावा धागा रेशमाचा रक्षावे बहिणीला
सुखी ठेव देवा माझ्या भाऊरायाला.
दनाअ, नागपूर
[7/31, 10:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हास्य कविता*
सपन पडल भारी
यम माह्या दारी
म्या म्हणलं तू
इथं कसा आला
म्हणे तुया नवऱ्यान
तुया पत्ता दिला
तू म्हणत रोज रोज
मले देव नेत नाही
या कामाले मी
कावली आता बाई
कर मंग तयारी
चाल माया संग
नवऱ्याच्या मांग
करत टंग टंग
माया संग आली त
लय खुश राहशील
स्वर्गातले देव तू
जवळून पायशीन
आम्ही बायका गंमत गंमत म्हणतो
नवऱ्या संग आमच्या रोजच भांडतो
म्हणून काय तू मले नेशील
एक दिवस तु बी मले
कंटाळून आणून देशील
नंदा अनिल भोयर
[7/31, 10:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅प्रभात चिंतन🌅
क्र.२४
सप्त सूर छेडीता
नाद ब्रम्ह गुंजला
करू ईशस्तवनाने
नमन या प्रभातीला.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[7/31, 10:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प. (७५)
विषय.. हास्य कविता
"" चेटकीण""
अरं र..र रं.. गडबडच झाली
गावात एक चेटकीण आली
बायामाणसं सारी घरात लपली
चेटकीण मस्त गावात फिरली.
मारोतीच्या पारावर सांजेला आली
लटाबटा सोडून मान डोलवु लागली
म्हणे गावात मरीमाय आली.
घाई करा तिला दुर पळवायची.
दोन बोकड ,पाच कोंबडे
आठ लिंबू,मदिरा पाहिजे
गावकर्यानी मस्त ऐकुन घेतले
गावातले शहाणे कामास लागले.
सर्व साहित्य समोर तिच्या ठेवले
कुतुहलाने सारे लोक गोळाच झाले
मरीमायचे हातपाय दिसतच नव्हते
हळूहळू बिंग तिचे फुटु लागले.
आवडाव तिनं काढता पाय घेतला
सोंगढोंग पाहुन मस्त चोप दिला
पोलिस पाटलांनी ठाणा दाखवीला
अंधश्रद्धा,दगाफटका मामला लाविला.
दनाअ, नागपूर
दि.३१/०७/२०२०