Tuesday, October 2, 2018

Bolava vitthal

* बोलावा विठ्ठल *
अभंग व गीत संगीताचा कार्यक्रम 
    दिनांक ३०.०९.२०१८ रोजी BK सांस्कृतिक मंच आयोजित व समाज भारती मुंबई यांचे सौजन्यानेबा.कु.समाज मंडळ अमरावती चे वतीने  आयोजीत समाज भुषण व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रम प्रसंगी घेण्यात आलेला  बोलावा विठ्ठल हा अभंग व गीत संगीताचा कार्यक्रम  यशस्वी करण्याकरिता ज्यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पणे सहकार्य लाभले अशा सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद.
       आपल्या समाजातील गायक कलाकार  - प्रणय गोमासे मुंबई, अक्षय कातोरे अमरावती, सौ प्रीती राघोर्ते पुणे, कुमारी ऋषिका पिंगळे बडनेरा त्याच प्रमाणे याना साथ देणारे वाद्यवृंद तबला वादक- चोकेश्वर नाकाडे पुणे, पवन चिखलकर अमरावती, पॅड-  गणेश जोंधळेकर अमरावती  की बोर्ड-  प्रविण जोंधळे,अमरावती   बासरीवादक-  जानराव बेहाळे, अमरावती  निवेदक-  सैराग ठाकरे अमरावती   यांना समाज भारती तर्फे धन्यवाद.
            वरील सर्व कार्यक्रमाच्या वाद्यवृंदा चा आर्थिक भार उचलणारे BK ग्रुप चे संचालक श्री केशवजी चेटूले सर, (रु ३०००/-) श्री सुभाषजी धांदे सर,( रु ३०००/-) देवराव मते, (रु ३०००/-) श्री प्रदिप कानतोडे (रु ३०००/-) व अमरावती जिल्हा मंडळाच्या वतीने  कलाकारांना देण्यात आलेले प्रोत्साहनपर मानधन रु ५०००/- ह्या करीता  अध्यक्ष मा. भगवंतराव ईश्वरकर व त्यांचे सहकारी  ह्या सर्वांचे समाज भारती तर्फे आभार व्यक्त करीत आहे.
        ह्या प्रसंगी सर्व श्रोते मंडळींनी उस्फुर्त साथ देऊन वातावरण संगीतमय करण्याकरिता सहकार्य केले *सर्व श्रोते मंडळींचे समाज भारतीच्या वतीने आभार
        सदर कार्यक्रमाचे छायाचित्रण करून सोशल मीडियावर कार्यक्रम व्हॉयरल करणाऱ्या सर्व मंडळींचे आभार.
      आपल्या समाजाच्या मंचावर समाजाच्या कलाकारांनी समाजाच्या बंधुभगिनी व बाळ गोपाळाच्या उपस्थितीत सादर केलेला हा प्रथम प्रयोग कसा वाटला? ह्या करीता आपल्या प्रतिक्रिया निश्चित कळवाव्यात.
        
                                        धन्यवाद
                                                                                      -संपादक,समाज भारती मुंबई














पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                             मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे ल...